15-02-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   22.02.2009  ओम शान्ति   मधुबन


“बर्थ डे ला फास्ट सो फर्स्ट डिव्हिजनमध्ये येण्याची गिफ्ट घेण्यासाठी प्रत्येक श्वास, संकल्प समर्थ असेल, मन मोठे आणि सच्चे असेल तर प्रत्येक गरज पूर्ण होईल”


आज झीरो बाबा आपल्या हिरो मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत. आजच्या दिवशी तुम्ही सर्वजण बाबांचा आणि बाबांसोबत आपला देखील बर्थ डे साजरा करण्यासाठी आला आहात. तर बापदादा सर्व मुलांना भले मग सन्मुख बसले आहेत, किंवा दूर बसून हृदयाच्या जवळ बसले आहेत, चोहो बाजूंच्या मुलांना सर्व नात्यांनी मुबारक देत आहेत. त्यामध्ये देखील विशेष तीन मुबारक पिता, शिक्षक आणि सद्गुरूच्या रूपातील पालना, शिकवण आणि वरदानांच्या तीन शुभेच्छा चोहो बाजूच्या मुलांना विशेष देत आहेत. सर्व मुलांना मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो.

आजचा हा विशेष जन्म भक्त देखील साजरा करतात परंतु तुम्ही मुले जाणता की हा बर्थ डे बाबांच्या आणि मुलांच्या अविनाशी स्नेहाचा जन्म दिवस आहे. आदिपासून बाबा आणि मुले सोबत आहेत, सोबतच विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये देखील बाबा मुलांच्या सोबत आहेत, कारण बाबांचे आणि मुलांचे एकमेकांवर खूप-खूप प्रेम आहे. आता देखील सोबत आहेत आणि आपल्या घरी जायचे आहे तेव्हा देखील सोबत जायचे आहे. बाबा मुलांशिवाय जाऊ शकत नाहीत आणि मुले बाबांशिवाय जाऊ शकत नाहीत कारण हृदयातील प्रेमाची सोबत आहे. घरानंतर जेव्हा राज्यामध्ये याल तेव्हा देखील ब्रह्मा बाबांच्या सोबत राज्य कराल. तर सर्व जन्मांपेक्षा हा जन्म सर्वात सुंदर आणि वेगळा आहे. या जन्माची जी वैल्यू आहे ती पूर्ण कल्पामधील ८४ जन्मांमध्ये नाही आहे, असा हा सुंदर आणि परमात्म साथ असणारा विशेष हिरे तुल्य जन्म आहे. तर तुम्ही सर्व आपला जन्म दिवस साजरा करायला आला आहात की बाबांचा साजरा करायला आला आहात! की बाबा मुलांचा साजरा करायला आले आहेत आणि मुले बाबांचा साजरा करायला आली आहेत? चोहो बाजूंना भक्त देखील शिव जयंती अथवा शिवरात्री म्हणून साजरी करतात, अतिशय प्रेमाने साजरी करतात बापदादा भक्तांना पाहून भक्तांना देखील भक्तीचे फळ देतात. परंतु तुमचे साजरे करणे आणि भक्तांचे साजरे करणे यामध्ये फरक आहे. ते रात्री साजरी करतात आणि तुम्ही अमृतवेळेला साजरी करता, अमृतवेला उत्तम वेला आहे (श्रेष्ठ काळ आहे). अमृतवेलेलाच बापदादा प्रत्येक मुलाची झोळी वरदानांनी भरून टाकतात. सर्वांची झोळी वरदानांनी भरलेली आहे ना! रोज वरदाता बाबांकडून वरदान मिळतेच. तुम्हा प्रत्येक मुलाला किती वरदाने बापदादांद्वारे मिळालेली आहेत, त्या वरदानांनी झोळी भरलेली आहे ना. तर सर्वजण खूप उमंग-उत्साहाने पोहोचला आहात. बापदादा देखील मुलांना पाहून खूप-खूप आनंदित होत आहेत आणि गाणे गात राहतात - ‘वाह बच्चे वाह!’ मुले म्हणतात - ‘वाह बाबा वाह!’ आणि बाबा म्हणतात - ‘वाह बच्चे वाह! कारण जी काही बाबांची मुले बनली आहेत ती सर्व कोटींमध्ये कोणी आत्मे आहेत. विश्वामध्ये किती कोटी आत्मे आहेत परंतु त्यामधून तुम्ही मुले ज्यांना बाबा म्हणता त्यांची लक्की आणि लवली (भाग्यवान आणि लाडकी) मुले आहात; त्या कोटींमधून कोणी तुम्ही मुले आहात. नशा आहे की आम्हीच कल्प-कल्पाची कोटींमधील कोणी मुले आहोत. कितीही मोठ-मोठे पदवाले आत्मे वर्तमान समयी देखील आहेत परंतु बाबांना ओळखून, बाबांचा बर्थ डे साजरा करणारी चोहो बाजूंची ओळखणारी मुले कोटींमध्ये कोणी आहेत. तर ही खुशी आहे का की आम्ही कोटींमध्ये देखील कोणी आहोत! नशा आहे! हात वर करा. अविनाशी नशा आहे ना! कधी-कधी वाला नशा तर नाही ना? सदैव आहे आणि सदैवच राहील. माया पेपर तर घेते, अनुभव आहे ना! मायेचे देखील परमात्म्याच्या मुलांवर जास्त प्रेम आहे. मुले जाणतात की मायेचा परमात्म मुलांशी सुरुवातीपासून आतापर्यंत संबंध आहे. माया आणि परमात्म मुले दोघांचे आपसामध्ये कनेक्शन आहे, परंतु मायेचे काम आहे येणे आणि तुम्हा मुलांचे काम काय आहे? मायेला दुरूनच पळवून लावणे. येऊ देऊ नका की येऊ देखील देता? नाही. दुरूनच पळवून लावा. येऊ देता त्यामुळे मग तिला येण्याची सवय लागून जाते. ती देखील समजते यायला तर देतात ना, चला. परंतु बाबा बघतात की काही-काही मुले मायेला येऊ तर देतात परंतु पाहुणचार सुद्धा करतात, चहा-पाणी देखील प्यायला देतात; माहित आहे, कोणता पाहुणचार करतात? मायेच्या प्रभावात येऊन हाच विचार करतात की अजून तरी टू लेटचा बोर्ड लागलेला नाहीये, अजून तर थोडा वेळ आहे. पुरुषार्थ करत आहोत, पोहोचून जाऊ. तर माया देखील समजते - एकतर येऊ दिले, दुसरे म्हणजे हे तर मला साथ देत आहेत, पाहुणचार करत आहेत. काही-काही मुले मायेला ओळखतात, परंतु काही-काही मुले ओळखण्यामध्ये देखील चूक करतात, मायेचे मत आहे की बाबांचे मत आहे हे न ओळखल्या कारणाने मायेच्या प्रभावामध्ये येतात. परंतु बापदादा आपल्या लक्की महावीर विजयी मुलांना म्हणतात - येऊ देऊ नका, आधी येईल आणि नंतर मग पळवून लावाल, यामध्ये वेळ घालवू नका कारण की वेळ कमी आहे; आणि तुमचा जो वायदा आहे, विश्व परिवर्तक बनून, विश्व सेवक बनून विश्वातील आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन मुक्तीचा वारसा देणार, ते कार्य अजून संपलेले नाही आहे. त्या कार्याला समाप्त करण्यामध्ये वेळ द्यायचा आहे, जर मायेला पळवून लावण्यामध्येच वेळ घालवाल तर विश्व परिवर्तकचा जो वायदा आहे तो पूर्ण कसा करणार! बाबांचे साथीदार आहात ना, जन्मतःच वायदा केला आहे, आत्ता देखील - ‘सोबत राहणार, सोबत येणार…’ म्हणून आता ज्या बाबांकडून शक्ती मिळाल्या आहेत त्या शक्तींच्या आधारे मायेला दुरूनच पळवून लावा. यामध्ये वेळ घालवू नका. बघा, ७० वर्षांपासून पुरुषार्थ करत राहिला आहात, आता मायेचे येणे आणि तिला पळवून लावणे, आता यासाठी वेळ नाही आहे कारण जाणता देखील, नॉलेजफुल तर आहात ना! साऱ्या ड्रामाचे नॉलेज आहे, त्यामुळे नॉलेजफुल मुलांनो आता वेळ कशामध्ये लावायचा आहे? दोन खजिने भरपूर जमा करायचे आहेत. कोणते दोन खजिने? एक संकल्प आणि दुसरा वेळ. दोन्ही खजिने महान आहेत आणि तुम्ही सर्व जण जाणता कारण तुम्ही नॉलेजफुल बाबांची नॉलेजफुल मुले आहात. मास्टर नॉलेजफुल आहात ना! फुल, बुल नाही (संपन्न आहात, फक्त जाणकार नाही). काही-काहीजण नॉलेजेबुल आहेत (जाणकार आहेत) परंतु नॉलेजफुल (ज्ञान संपन्न) नाही आहेत. तुम्ही कोण आहात, नॉलेजफुल आहात? हात वर करा. नॉलेजफुल आहात की नॉलेजेबुल आहात? सर्व जण नॉलेजफुल आहात? हात वर केला, अच्छा. वाह! फुल नॉलेज आले आहे! मायेला पळवून लावण्याचे नॉलेज आहे? मागे बसलेल्यांना आहे? अच्छा. झेंडे तर हलवत आहेत. मातांना आहे? माता नॉलेजफुल आहात? डबल फॉरेनर्स! डबल फॉरेनर्स देखील झेंडे हलवत आहेत. अच्छा, बघा किती सुंदर दृश्य वाटत आहे. झेंडे तर छान वाटत आहेत. तर नॉलेजफुल अर्थात मायेला दुरूनच पळवून लावणारे. तर असे आहात? कारण बापदादांनी अगोदरच सांगितले आहे की, खजिने जमा करण्याची बँक फक्त या संगमयुगामध्येच आहे नंतर मग सारे कल्प जमा करण्याची बँक मिळणार नाही. जे आता जमा केले आहे, ते वेळेला उपयोगाला येत राहील. परंतु जमा करण्याची बँक आता संगमयुगावर उघडते, म्हणून तुम्ही काय म्हणता! सर्वांना संदेशामध्ये ऐकवता ना, ‘आता नाही तर कधीच नाही’. तर तुम्हा सर्वांना लक्षात आहे ना! ‘आता नाही तर कधीच नाही’. हे सदैव लक्षात राहते का? कारण की संगमयुगाचा जन्म सर्वात छोटासा आहे परंतु अमूल्य जन्म आहे. या जन्माचे मूल्य संपूर्ण कल्प चालते. तर चेक करता का की, आपले जमेचे खाते किती आहे? जितके इच्छिता तितके जमा होते का? कारण बापदादांनी अगोदरच सांगितले आहे की आता चालण्याचा काळ संपला आहे. उडण्याचा काळ आहे. पुरुषार्थाची वेळ पूर्ण झाली परंतु आता तीव्र पुरुषार्थाचा वेळ आहे, तो देखील थोडा आहे म्हणून बापदादांनी डबल विदेशींना टायटल दिले आहे - ‘डबल तीव्र पुरुषार्थी’. बोला, डबल तीव्र पुरुषार्थी आहात! हात वर करा. डबल तीव्र पुरुषार्थी, पक्के. अच्छा. बापदादा तर जन्माच्या मुबारक सोबत तुम्हाला शुभेच्छा देखील देत आहेत. पद्म-पद्म पटीने शुभेच्छा असो, शुभेच्छा असो, शुभेच्छा असो!

बापदादांनी बघितले बापदादांनी जो होमवर्क दिला होता, ओ. के. चा. त्यावर बऱ्याच मुलांनी अटेंशन दिले आहे. परंतु १०० मार्क्स फार कमी मुलांचे आहेत. ५० टक्केवाले जास्त आहेत. परंतु बापदादा हेच इच्छितात, ऐकवू काय इच्छितात ते? बापदादांची प्रत्येक आशेच्या दीपकाकडून, आशा पूर्ण करणाऱ्या महावीर मुलांकडून बाबांची हीच आशा आहे की समयानुसार जर आतापासून दीर्घकाळ तीव्र पुरुषार्थाचा चार्ट जमा केला नाहीत तर मग केव्हा करणार! बापदादा वेळोवेळी तीन शब्दांची आठवण करून देतात - एक अचानक, दुसरा एव्हररेडी आणि तिसरा दीर्घकाळाचे जमेचे खाते, कारण बापदादा इच्छितात की मुलांनी आपल्या राज्यामध्ये फर्स्ट जन्मापासून २१ जन्मांपर्यंत फुल राज्य भाग्याचे अधिकारी बनावे. आता तर ही खुशी आहे ना की आपले राज्य आले की आले. जसा आता संदेश देता की बाबा आले आहेत, तशीच ही देखील आनंदाची बातमी ऐकवता की आपले दैवी राज्य सुख शांतिमय राज्य आले की आले. तर जेव्हा सर्वांना हा संदेश देता तर आपला पुरुषार्थ देखील तीव्र आणि दीर्घकाळ जमा करणारा पाहिजे. हा हिशोब कायमचा लक्षात ठेवा कारण मजा नवीन घरामध्ये आहे. जर दोन-तीन जन्मानंतर आलात, घराला दोन-तीन महिने झाले तर काय म्हणाल! नवीन आहे म्हणाल की ३ महिने झाले आहेत म्हणाल? तर बापदादा इच्छितात की बापदादांचा प्रत्येक लाडका बच्चा, वाह वाह बच्चा, बाबांचा दिलतख्तनशीन बच्चा, पहिल्या जन्मामध्ये ब्रह्मा बाबांचा साथी (दोस्त) बनून यावा. पसंत आहे! पसंत आहे? आहे पसंत? अच्छा. तर काय करावे लागेल? करावे सुद्धा लागेल ना. पसंत तर आहे, बाबांना देखील पसंत आहे परंतु करावे काय लागेल? आता पासून, चला झाले ते झाले, बापदादा माफ करतील, झाले. आतापासून बाबांना बर्थ डे ची सौगात काय देणार? बाबांना काहीतरी भेट तर द्याल ना. बाबांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी आला आहात, तर बाबांना काय सौगात देणार? जी बाबांची आशा आहे प्रत्येक मुलामध्ये, लास्ट सो फास्ट होऊ शकतात. जे पहिल्यांदाच आले आहेत, त्यांनी हात वर करा. अच्छा.

तर बापदादा सर्व लास्ट आलेल्या मुलांना, पहिल्यांदा येण्याची पद्म पटीने मुबारक देत आहेत. परंतु एक भाग्य देखील सांगत आहेत, भाग्य बनविण्याची मार्जिन आहे कारण अजून टू लेटचा बोर्ड लागलेला नाहीये. जर कोणी लास्ट आलेले देखील फास्ट पुरुषार्थ करतील तर लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो फर्स्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकतात, फर्स्ट नंबर नाही, ते तर प्रसिद्ध झाले आहेत, परंतु फर्स्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकतात. पसंत आहे? आलेल्या नवीन मुलांना पसंत आहे? चान्स आहे, बापदादा सीट देतील परंतु काही करावे देखील लागेल. एक-एक श्वास, एक-एक संकल्प अटेन्शन (लक्षपूर्वक असावा), प्रत्येक श्वास, प्रत्येक संकल्प समर्थ असावा, व्यर्थ नसावा; कारण तुम्हा सर्वांचे भले अगोदर आलेल्यांचे, नाहीतर मागाहून आलेल्यांचे परंतु टायटल काय आहे? ‘समर्थ मुले’ हे आहे, ‘कमजोर मुले’ असे नाहीये. बापदादा प्रेमपूर्वक आठवण कोणती देतात? रोजची प्रेमपूर्वक आठवण - ‘लाडक्या, सिकीलध्या, दिलतख्तनशीन मुलांना…’ त्यामुळे बाबा हा गोल्डन चान्स देत आहेत परंतु घेणाऱ्यांनी घ्या. बाबा देतील, बांधील आहेत. आहेत कोणी तीव्र पुरुषार्थी! चान्स आहे. टू लेटचा बोर्ड लागला तर मग संपले. परंतु बापदादांना जन्माची भेट काय देणार? जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आला आहात ना! बापदादांनी तर तुम्हा मुलांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्हा सर्व मुलांना विशेष सौगात दिली आहे की, आजपासून शेवटपर्यंत जर तुमचा तीव्र पुरुषार्थ ९० परसेंट असेल तर १० परसेंट बापदादा वाढवतील. मंजूर आहे. आता व्यर्थ समाप्त. जसे बघा सतयुगाचे देवता येतात ना, तर त्यांना ठाऊक नाहीये की, इथे कसली भाषा बोलतात. ‘पुरुषार्थ’ शब्द बोलाल ना, तर ते म्हणतील - पुरुषार्थ म्हणजे काय! कारण की प्रारब्धवाले आहेत ना. अगदी तसेच तुम्हा तीव्र पुरुषार्थींना स्वप्नामध्ये अथवा संकल्पामध्ये किंवा प्रॅक्टिकल कर्मामध्ये ‘व्यर्थ’ काय असते, त्याची समाप्ती व्हावी. आहे हिंमत? बाबा १० टक्के ग्रेसमार्क्स देतील. आहे मंजूर. हात वर करा. किती परसेंट पक्के कराल? १०० परसेंट, नाही १०१ परसेंट, कारण बापदादांना मुलांशिवाय, मुलांच्या सोबतीशिवाय चांगले वाटत नाही. बाबा समजावून सांगत आहेत - जेव्हा ‘माझे बाबा’ म्हटले आहे आणि बाबांनी म्हटले ‘माझा बच्चा’, तर बाप समान तर बनावेच लागेल ना. आता दृढ संकल्पाची आवश्यकता आहे. तुम्ही लोकांनी पुस्तक छापले आहे ना - ‘दृढ संकल्प हीच सफलतेची चावी आहे’. तर संकल्पाला साधारण करू नका. तुम्ही आहात कोण? जर इथल्या प्रेसिडेंटने जर सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे वर्तन केले तर चांगले वाटेल का, आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही तर तीन तख्ताचे निवासी आहात. सर्वात मोठे तख्त बापदादांचे दिलतख्त आहे. तर दिलतख्तवाले पहिल्या जन्मातील साथीदार तर बनतील ना. भले तख्तावर एक बसेल परंतु रॉयल फॅमिली राज्य अधिकारी तर बनू शकता. तर सोबत निभावणारे, घरापर्यंत तर सोबत येतील. बापदादा कसेही करून घेऊन जातील. व्हाया घेऊन जातील किंवा डायरेक्ट घेऊन जातील परंतु घेऊन तर जातील. तर मग काय तुम्ही घरी तिथेच बसून राहणार काय, ब्रह्मा बाबा निघून जातील आणि तुम्ही बसून राहणार, चांगले वाटेल? राजयोगी आहात ना! स्वतःला काय टायटल देता आणि दुसऱ्यांना देखील काय शिकवता? राजयोग की प्रजायोग? भले रॉयल प्रजा देखील आहात परंतु प्रजायोगी तर नाही आहात? राजयोगी आहात. तर सर्वांना बाबांची तुम्हा सर्व मुलांप्रति दिलेली भेट लक्षात राहील? केव्हा पर्यंत? अंता पर्यंत? बापदादांनी बघितले आहे की, खूप पुरुषार्थ करतात, बापदादा जेव्हा बघतात मुले मेहनत खूप करत आहेत तर मुलांची मेहनत पाहून बाबांना चांगले वाटत नाही. त्यामुळे प्रेमामध्ये रहा तर मेहनत नष्ट होईल. ‘माझे बाबा’, म्हणजे मग इतर ‘माझे’ समाप्त. जेव्हा ‘माझे बाबा’ म्हटले तर अनेक ‘माझे’ त्यामध्ये नष्ट झाले ना. एक खेळणे आणता ना एकामध्ये एक, एकामध्ये एक असते. एकामध्ये १०-१२ वस्तू सामावलेल्या असतात, जसे या खेळण्या विषयी सांगता तर ‘एक माझे बाबा’, ‘माझे बाबा’ म्हणणारे आहात ना. ‘माझे बाबा’ आहेत ना! महारथींचा बाबा तर नाहीये! माझे बाबा. जेव्हा ‘माझे बाबा’ आहेत तर हदचे ‘माझे’, ‘तुझ्या’मध्ये सामावून टाका. ‘माझे’च्या ऐवजी ‘तुझे’ म्हणा, किती फरक आहे, ‘माझे’ आणि ‘तुझे’ किती फरक आहे? ‘मा’ आणि ‘तु’. एका शब्दाचा फरक आहे. तर पक्के आहे ना - ‘माझे बाबा’. पक्के आहे, किती परसेंट? १०० परसेंट, १०० आणि एक. असे एक बोट वर करा. जे १०१ म्हणतात, त्यांनी बोट वर करा. बापदादा बघत आहेत. टी. व्ही.मध्ये देखील बघत आहेत. अच्छा.

चोहो बाजूच्या बापदादांच्या दिलतख्तनशीन मुलांना, चोहो बाजूच्या तीव्र पुरुषार्थी मुलांना, चोहो बाजूच्या बापदादांनी जी गिफ्ट दिली, त्या गिफ्टला स्वीकार करणाऱ्या आणि मुलांनी संकल्पाद्वारे बापदादांना जी गिफ्ट दिली, त्या संकल्पाला सदैव दृढ करणाऱ्या अशा दृढ पुरुषार्थी, प्रतिज्ञा करून प्रत्यक्षता करणाऱ्या सर्व मुलांना बापदादांचे हृदयापासून खूप-खूप प्रेम आणि हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो आणि सर्व मुलांना पुन्हा-पुन्हा शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा.

वरदान:-
पाहुणा असल्याच्या वृत्ती द्वारे प्रवृत्तीला श्रेष्ठ, स्टेजला उच्च बनविणारे सदा उपराम भव

जे स्वतःला पाहुणा समजून चालतात ते आपल्या देह रुपी घरापासून देखील निर्मोही बनतात. पाहुण्याचे स्वतःचे काहीच नसते, कार्यामध्ये सर्व वस्तू लावतील परंतु आपलेपणाचा भाव नसेल. ते सर्व साधनांना स्वीकारत असताना देखील जितके न्यारे तितकेच बाबांचे प्रिय होऊन राहतात. देह, देहाची नाती आणि वैभवापासून सहज उपराम होतात. जितकी पाहुणा असल्याची वृत्ती असते तितकी प्रवृत्ती श्रेष्ठ आणि स्टेज उच्च असते.

सुविचार:-
आपल्या स्वभावाला निर्मल बनवा तर प्रत्येक पावलामध्ये सफलता सामावलेली आहे.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

दुनिये समोर आता हीच वास्तविकता दाखवायची आहे की आम्ही सर्व एक आहोत, एकाचे आहोत, एकरस स्थितीवाले आहोत. एकाच्या प्रेमामध्ये मग्न राहून एकाचे नाव प्रत्यक्ष करणारे आहोत, आता हा वेगळा आणि सुंदर गोल्डन स्थितीचा झेंडा फडकवा. छोटे आहात अथवा मोठे आहात, आजारी आहात अथवा स्वस्थ आहात, महारथी आहात आणि घोडेस्वार, सर्वांनी एकमत होऊन सहयोगी बना तर सहज सफलतामूर्त बनाल.