15-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हा आत्म्यांशी रुहरिहान करतात, तुम्ही आला आहात बाबांकडे २१ जन्मांसाठी आपले जीवन इन्शुरन्स करण्यासाठी, तुमचे लाईफ असे इंश्योर होते जे तुम्ही अमर बनता”

प्रश्न:-
मनुष्य देखील आपले जीवन इंश्योर करतात आणि तुम्ही मुले देखील करता, तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे?

उत्तर:-
मनुष्य आपले लाईफ इंश्योर करतात की मेल्यानंतर परिवाराला पैसे मिळावेत, तुम्ही मुले इन्शुरन्स करता की २१ जन्म आपण मरू नये. अमर बनावे. सतयुगामध्ये काही इन्शुरन्स कंपनी असत नाही. आता तुम्ही आपली लाईफ इंश्योर करता मग कधीही तुम्ही मरणार नाही, हा आनंद कायम राहिला पाहिजे.

गीत:-
यह कौन आज आया सवेरे…

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रूहानी मुलांशी रूहरिहान करतात, तुम्ही मुले जाणता बाबा आपल्याला आता २१ जन्मच काय परंतु ४०-५० जन्मांसाठी इंश्योर करत आहेत. ते लोक इंश्योर करतात मेल्यानंतर त्यांच्या परिवाराला पैसा मिळावा. तुम्ही इंश्योर करता २१ जन्मांसाठी मरायचेच नाही म्हणून. अमर बनवतात ना. तुम्ही अमर होता, मुलवतन देखील अमरलोक आहे. तिथे जगण्या-मरण्याची गोष्टच राहत नाही. ते आहे आत्म्यांचे निवास स्थान. आता ही रूहरिहान बाबा आपल्या मुलांशी करतात इतर कोणाशीही करत नाहीत. जे आत्मे स्वतःला जाणतात त्यांच्याशीच बोलतात. बाकी दुसऱ्या कोणालाही बाबांची भाषा समजणार नाही. प्रदर्शनीमध्ये इतके येतात, तुमच्या भाषेला समजतात काय. कोणी मुश्किलीने थोडे समजतात. तुम्हाला देखील समजावून सांगता-सांगता किती वर्षे झाली आहेत तरीही किती थोडेजणच समजतात. आहे देखील सेकंदामध्ये समजण्याची गोष्ट. आपण आत्मे जे पावन होतो तेच पतित बनलो आहोत, आता पुन्हा आपल्याला पावन बनायचे आहे. त्यासाठी स्वीट फादरची आठवण करायची आहे. त्यांच्यापेक्षा स्वीट अजून कोणती वस्तू असत नाही. या आठवण करण्यामध्येच मायेची विघ्ने पडतात. हे देखील जाणता बाबा आपल्याला अमर बनविण्यासाठी आले आहेत. पुरुषार्थ करून अमर बनून, अमर पुरीचा मालक बनायचे आहे. अमर तर सगळेच बनणार आहेत. सतयुगाला म्हटलेच जाते अमरलोक. हा आहे मृत्यूलोक. ही अमरकथा आहे, असे नाही की फक्त शंकराने पार्वतीला अमर कथा ऐकवली. त्या तर सर्व आहेत भक्ती मार्गाच्या गोष्टी. तुम्ही मुलांनी फक्त माझ्या एकाकडूनच ऐका. मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ज्ञान मीच देऊ शकतो. ड्रामा प्लॅन अनुसार सारी दुनिया तमोप्रधान बनली आहे. अमरपुरीमध्ये राज्य करणे - यालाच अमर पद म्हटले जाते. तिथे इन्शुरन्स कंपनी इत्यादी असत नाहीत. आता तुमचे लाईफ इंश्योर करत आहेत. तुम्ही कधीही मरणार नाही. हा बुद्धीमध्ये आनंद राहिला पाहिजे. आपण अमर पुरीचे मालक बनतो, तर अमरपुरीची आठवण करावी लागेल. व्हाया मूलवतनच जायचे असते. हे देखील मनमनाभव होते. मूलवतन आहे मनमनाभव, अमरपुरी आहे मध्याजी भव. प्रत्येक गोष्टीमध्ये दोन शब्दच येतात. तुम्हाला किती प्रकारे अर्थ समजावतात. तर बुद्धीमध्ये बसेल. सर्वात जास्त मेहनत आहेच स्वतःला आत्मा निश्चय करण्यामध्ये. मी आत्म्याने हा जन्म घेतला आहे. ८४ जन्मांमध्ये भिन्न-भिन्न नाव, रूप, देश, काळ फिरत आलो आहोत. सतयुगामध्ये इतके जन्म, त्रेतामध्ये इतके… हे देखील खूप मुले विसरून जातात. मुख्य गोष्ट आहे स्वतःला आत्मा समजून स्वीट बाबांची आठवण करणे. उठता-बसता हे बुद्धीमध्ये राहिल्याने आनंद होत राहील. पुन्हा बाबा आलेले आहेत, ज्यांची आपण अर्धा कल्प आठवण करत होतो की, या, येऊन पावन बनवा. पावन असतात मूलवतनमध्ये आणि अमरपुरी सतयुगामध्ये. भक्तीमध्ये मनुष्य पुरुषार्थ करतात मुक्तीमध्ये किंवा कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी. मुक्ती म्हणा किंवा निर्वाणधाम म्हणा, वानप्रस्थ शब्द करेक्ट आहे. वानप्रस्थी तर शहरांमध्येच राहतात. संन्याशी लोक तर घर-दार सोडून जंगलामध्ये जातात. आजकालच्या वानप्रस्थींमध्ये काहीच दम राहिलेला नाहीये. संन्यासी तर ‘ब्रह्म’ला भगवान म्हणतात. ‘ब्रह्मलोक’ म्हणत नाहीत. आता तुम्ही मुले जाणता पुनर्जन्म तर कोणाचाही थांबत नाही. सगळे आपला-आपला पार्ट बजावतात. आवागमनापासून कधीही सुटायचे नाही. यावेळी करोडो मनुष्य आहेत अजूनही येत राहतील, पुनर्जन्म घेत राहतील. मग फर्स्ट फ्लोअर रिकामा होईल. मूल वतन आहे फर्स्ट फ्लोअर, सूक्ष्म वतन आहे सेकंड फ्लोअर. हे आहे थर्ड फ्लोअर किंवा याला ग्राउंड फ्लोअर म्हणा. अजून दुसरा कोणता फ्लोअर नाही आहे. ते समजतात ग्रहांवर देखील दुनिया आहे. तसे काही नाही आहे. फर्स्ट फ्लोअरमध्ये आत्मे राहतात. बाकी मनुष्यांसाठी तर ही दुनिया आहे.

तुम्ही बेहदची वैरागी मुले आहात, तुम्हाला या जुन्या दुनियेमध्ये राहत असताना देखील या डोळ्यांनी सर्व काही दिसत असतानाही बघायचे नाहीये. हा आहे मुख्य पुरुषार्थ; कारण हे सर्व नष्ट होणार आहे. असे नाही की संसार बनलेलाच नाही. बनलेला आहे परंतु त्याच्यापासून वैराग्य येते अर्थात साऱ्या जुन्या दुनियेपासून वैराग्य. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीच्या नंतर आहे ज्ञान, मग भक्ती पासून वैराग्य येते. बुद्धीने समजता की ही जुनी दुनिया आहे. हा आपला अंतिम जन्म आहे, आता सर्वांना परत जायचे आहे. लहान मुलांना देखील शिवबाबांची आठवण करून द्यायची आहे. उलटे-सुलटे खाणे-पिणे इत्यादीची कोणतीही सवय लावता कामा नये. लहानपणापासून जशी सवय लावाल तशीच सवय लागते. आजकाल संग दोष खूप खराब आहे. ‘संग तारे कुसंग बोरे…’ हा विषयसागर वेश्यालय आहे. सत् तर एकच परमपिता परमात्मा आहेत. गॉड इज वन म्हटले जाते. ते येऊन सत्य गोष्ट सांगतात. बाबा म्हणतात - हे रुहानी मुलांनो, मी तुमचा पिता तुमच्याशी रुहरिहान करत आहे. मला तुम्ही बोलावता ना. तेच ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत. नवीन सृष्टीचे रचयिता आहेत. जुन्या सृष्टीचा विनाश करवितात’. हे त्रिमूर्ती तर प्रसिद्ध आहेत. उच्च ते उच्च आहेत - शिव. अच्छा, मग सूक्ष्म वतनमध्ये आहेत ब्रह्मा-विष्णू-शंकर. त्यांचा साक्षात्कार देखील होतो कारण पवित्र आहेत ना. त्यांना चैतन्यमध्ये या डोळ्यांनी पाहू शकत नाही. खूप नवधा भक्ती केल्यानंतर पाहू शकतात. समजा कोणी हनुमानाचा भक्त असेल तर त्याचा साक्षात्कार होईल. शिवाच्या भक्ताला तर खोटे सांगितले गेले आहे की, परमात्मा अखंड ज्योती स्वरूप आहे. बाबा म्हणतात मी तर इतका छोटासा बिंदू आहे, ते म्हणतात अखंड ज्योती स्वरूप अर्जुनाला दाखवले. त्याने म्हटले बस मी सहन करू शकत नाही. त्यांना साक्षात्कार झाला तर हे गीतेमध्ये लिहिलेले आहे. मनुष्य समजतात अखंड ज्योतीचा साक्षात्कार झाला. आता बाबा म्हणतात - या सर्व भक्तिमार्गाच्या गोष्टी मनाला खुश करण्यासाठी आहेत. मी तर म्हणतच नाही की, मी अखंड ज्योती-स्वरूप आहे. जशी बिंदू प्रमाणे तुमची आत्मा आहे तसाच मीही आहे. जसे तुम्ही ड्रामाच्या बंधनामध्ये आहात तसाच मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. सर्व आत्म्यांना आपापला पार्ट मिळालेला आहे. पुनर्जन्म तर सर्वांना घ्यायचाच आहे. नंबरवार सर्वांना यायचेच आहे. पहिला नंबर असणारा हा मग खालच्या नंबरला जातो. बाबा किती गोष्टी समजावून सांगतात. हे समजावून सांगितले आहे की सृष्टी रुपी चक्र कसे फिरत राहते. जशी दिवसा नंतर रात्र येते तसेच कलियुगा नंतर सतयुग, मग त्रेता… मग संगमयुग येते. संगम युगावरच बाबा चेंज (परिवर्तन) करतात. जे सतोप्रधान होते आता तेच तमोप्रधान बनले आहेत. तेच मग सतोप्रधान बनतील. बोलावतात देखील - हे, पतित-पावन या. तर आता बाबा म्हणतात - मनमनाभव. मी आत्मा आहे, मज पित्याची आठवण करायची आहे . हे यथार्थ रीतीने कोणी मुश्किलीने समजतात. आम्हा आत्म्यांचे बाबा किती गोड आहेत. आत्माच गोड आहे ना. शरीर तर नष्ट होते मग त्याच्या आत्म्याला बोलावतात. प्रेम तर आत्म्यावरच असते ना. संस्कार आत्म्यामध्ये असतात. आत्माच शिकते, ऐकते, देह तर नष्ट होतो. मी आत्मा अमर आहे. मग तुम्ही माझ्यासाठी रडता कशासाठी! हा तर देह-अभिमान आहे ना. तुमचे देहावर प्रेम आहे, असले पाहिजे आत्म्यावर प्रेम. अविनाशी गोष्टीवर प्रेम असले पाहिजे. विनाशी गोष्टींवर प्रेम असल्याने भांडण-तंटे करतात. सतयुगामध्ये आहेत देही-अभिमानी, म्हणून आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेतात. रडणे-ओरडणे काहीही नसते.

तुम्हा मुलांना आपली आत्म-अभिमानी अवस्था बनविण्यासाठी खूप प्रॅक्टिस करायची आहे - ‘मी आत्मा आहे, आपल्या भावाला (आत्म्याला) बाबांचा संदेश ऐकवतो, आपला भाऊ या कर्मेंद्रियांद्वारे ऐकतो’, अशी अवस्था तयार करायची आहे. बाबांची आठवण करत रहा तर विकर्म विनाश होत राहतील. स्वतःला देखील आत्मा समजा, त्याला देखील आत्मा समजा तेव्हा पक्की सवय होईल, ही आहे गुप्त मेहनत. अंतर्मुखी होऊन या अवस्थेला पक्के करायचे आहे. जितका वेळ काढू शकाल तितका यामध्ये लावा. ८ तास मग धंदा इत्यादी भले करा, झोपही घ्या, बाकी वेळ यामध्ये लावा. ८ तासापर्यंत पोहोचायचे आहे, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होत राहील. पतित-पावन बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. ज्ञान तुम्हाला आताच संगमावर मिळते. महिमा सारी या संगमयुगाची आहे, जेव्हा की बाबा बसून तुम्हाला ज्ञान समजावून सांगतात, यामध्ये स्थूल काही गोष्ट नाही. हे जे तुम्ही लिहिता ते सर्व नष्ट होईल. लिहून देखील यासाठी घेता म्हणजे पॉईंट्स लिहिल्याने लक्षात राहील. कोणाची बुद्धी तीक्ष्ण असते तर बुद्धीमध्ये लक्षात राहते. नंबरवार तर आहेत ना. मुख्य गोष्ट, बाबांची आठवण करायची आहे आणि सृष्टी चक्राची आठवण करायची आहे. कोणतेही विकर्म करायचे नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील रहायचे आहे. पवित्र जरूर बनायचे आहे. घाणेरडे विचार असणारी बरीच मुले असे समजतात - ही अमकी मला खूप आवडते, तिच्याशी मला गंधर्व विवाह केला पाहिजे. परंतु हा गंधर्व विवाह तर तेव्हा केला जातो जेव्हा मित्र-संबंधी इत्यादी खूप हैराण करतात, तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी केला जातो. असे थोडेच सर्व म्हणतील आम्ही गंधर्व विवाह करणार. ते कधीही राहू शकणार नाहीत. पहिल्या दिवशीच जाऊन गटारामध्ये पडतील. नावा-रूपामध्ये मन जडते. ही तर खूप खराब गोष्ट आहे. गंधर्व विवाह करणे काही मावशीचे घर नाहीये. एकमेकांशी मन जुळले की म्हणतात गंधर्व विवाह करावा, यामध्ये नातेवाईकांनी खूप सावध राहिले पाहिजे. समजले पाहिजे ही मुले कामाची नाहीत. ज्याच्यावर मन जडले आहे त्याला बाजूला केले पाहिजे. नाही तर बोलत राहणार. या सभेमध्ये खूप सावधगिरी बाळगायची असते. पुढे चालून खूप नियमानुसार सभा भरेल. अशा प्रकारचे विचार असणाऱ्यांना येऊ देणार नाही.

जी मुले रुहानी सेवेमध्ये तत्पर राहतात, जे योगामध्ये राहून सेवा करतात, तेच सतयुगी राजधानी स्थापन करण्यामध्ये मदतगार बनतात. सेवाभावी मुलांना बाबांचे डायरेक्शन आहे - ‘आराम हराम आहे’. जे खूप सेवा करतात ते जरूर राजा-राणी बनतील. जे-जे मेहनत करतात, आप समान बनवितात, त्यांच्यामध्ये ताकद देखील असते. स्थापना तर ड्रामा अनुसार होणारच आहे. चांगल्या रीतीने सर्व पॉईंट्स धारण करून मग सेवेमध्ये लागले पाहिजे. आराम देखील हराम आहे. सेवाच सेवा, तेव्हा उच्च पद प्राप्त कराल. ढग आले आणि रिफ्रेश होऊन सेवेवर गेले. सेवा तर तुमची खूप उत्तम होईल. वेगवेगळ्या प्रकारची चित्रे निघतील, ज्यामुळे मनुष्य लगेच समजतील. या चित्रांमध्ये देखील सुधारणा होत जातील, यामध्ये देखील जे आपल्या ब्राह्मण कुळाचे असतील ते चांगल्या रीतीने समजतील, समजावून सांगणारे देखील चांगले असतील तर काही समजतील. जे चांगल्या रीतीने धारणा करतात, बाबांची आठवण करतात - त्यांच्या चेहऱ्यावरूनच माहित होते. बाबा आम्ही तर तुमच्याकडून पूर्ण वारसा घेणार; तर त्यांच्या मनामध्ये आनंदाचे ढोल वाजत राहतील, सेवेची खूप आवड असेल. रिफ्रेश झाले आणि हे पळाले. सेवेसाठी प्रत्येक सेंटरवरून खूप तयार झाले पाहिजेत. तुमच्या सेवेचा खूप विस्तार होत जाईल. तुमच्या सोबत अजून येत जातील. सरतेशेवटी एक दिवस संन्याशी देखील येतील. आता तर त्यांची राजाई आहे. त्यांच्या पायाशी लोळण घेतात, पूजा करतात. बाबा म्हणतात - ‘ही भूत पूजा आहे. माझे तर पाय नाहीत, त्यामुळे पुजायला देखील देणार नाहीत. मी तर हे शरीर लोन घेतले आहे म्हणून यांना भाग्यशाली रथ म्हटले जाते.

यावेळी तुम्ही मुले खूप सौभाग्यशाली आहात कारण तुम्ही इथे ईश्वरीय संतान आहात. गायन देखील आहे - ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’ तर जे खूप काळापासून वेगळे राहिलेले आहेत तेच येतात, त्यांनाच येऊन शिकवितो. श्रीकृष्णाचा हा अंतिम जन्म आहे त्यामुळे नाव देखील या एकाचे श्याम-सुंदर पडले आहे. शिव विषयी तर कोणालाच माहीती नाही आहे की काय चीज आहे. या गोष्टी बाबाच येऊन समजावून सांगतात. मी आहे परम आत्मा, परमधाम मध्ये राहणारा आहे. तुम्ही देखील तिथलेच राहणारे आहात. मी सुप्रिम पतित-पावन आहे. तुम्ही आता ईश्वरीय बुद्धीवाले बनला आहात. ईश्वराच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे ते तुम्हाला ऐकवत आहेत. सतयुगामध्ये भक्तीची गोष्ट नसते. हे ज्ञान तुम्हाला आता मिळत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अंतर्मुखी होऊन आपली अवस्था तयार करायची आहे, अभ्यास करायचा आहे - मी आत्मा आहे, आपल्या भावाला (आत्म्याला) बाबांचा संदेश देत आहे… असे आत्म-अभिमानी बनण्याची गुप्त मेहनत करायची आहे.

२) रूहानी सेवेची आवड ठेवायची आहे. आप समान बनण्याची मेहनत करायची आहे. संगाचा दोष खूप खराब आहे, त्यापासून स्वतःला सांभाळायचे आहे. उलटे खाणे-पिणे इत्यादीची सवय लावायची नाही.

वरदान:-
विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये नेहमी बिझी राहणारे विश्वाचे आधार मूर्त भव

विश्व कल्याणकारी मुले स्वप्नामध्ये देखील फ्री राहू शकत नाहीत. जे दिवस-रात्र सेवेमध्ये बिझी राहतात त्यांना स्वप्नामध्ये देखील कितीतरी नवीन-नवीन गोष्टी, सेवेचे प्लॅन आणि पद्धती दिसतात. ते सेवेमध्ये बिझी असल्याकारणाने आपल्या पुरुषार्थाच्या व्यर्थापासून आणि इतरांच्या देखील व्यर्थापासून सुरक्षित राहतात. त्यांच्या समोर नेहमी बेहद विश्वातील आत्मे इमर्ज असतात. त्यांना जरा देखील निष्काळजीपणा येऊ शकत नाही. अशा सेवाधारी मुलांना आधार मूर्त बनण्याचे वरदान प्राप्त होते.

बोधवाक्य:-
संगम युगाचा एक-एक सेकंद वर्षांच्या बरोबरीने आहे म्हणून अलबेलेपणामध्ये वेळ गमावू नका.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

ज्याच्या सोबत स्वयं सर्वशक्तिमान् बाबा कंबाइंड आहेत, सर्व शक्ती स्वतः त्याच्या सोबत असतील. जिथे सर्व शक्ती आहेत तिथे सफलता नाही, हे असंभव आहे. लौकिकमध्ये देखील कोणी चांगला साथीदार मिळाला तर त्याला सोडू शकत नाहीत. हा तर अविनाशी साथीदार आहे. कधी धोका देणारा साथीदार नाही. नेहमीच साथ निभावणारा साथीदार आहे, तर नेहमी त्याच्या सोबतच रहा.