15-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - अमर
बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्याकरिता, आता तुम्ही तिन्ही काळ
आणि तिन्ही लोक जाणता”
प्रश्न:-
रूहानी बाबा
आत्म्यांना कोणत्या आधारावर वारसा देतात?
उत्तर:-
शिक्षणाच्या
आधारावर. जी मुले चांगल्या रीतीने शिकतात, देह-अभिमानाला सोडून देही-अभिमानी होऊन
राहण्याचा पुरुषार्थ करतात, त्यांनाच बाबांचा वारसा मिळतो. लौकिक पिता केवळ
स्वतःच्या मुलांनाच वारसा देतील परंतु पारलौकिक पित्याचे नाते आत्म्यांशी आहे,
म्हणून आत्म्यांना वारसा देतात.
गीत:-
भोलेनाथ से
निराला…
ओम शांती।
रुहानी मुले,
रुहानी बाबांकडून अमर कथा ऐकत आहेत - या मृत्यूलोक मधून अमरलोक मध्ये जाण्याकरिता.
निर्वाणधामला अमरलोक म्हटले जात नाही. अमरलोक जिथे तुमचा कधी अकाली मृत्यू होत नाही
म्हणून त्याला अमरलोक म्हटले जाते. रूहानी बाबा ज्यांना अमरनाथ म्हटले जाते. जरूर
अमरलोक मध्ये घेऊन जाण्याकरिता मृत्यूलोक मध्ये कथा ऐकवतील. भारतामध्येच तीन कथा
प्रसिद्ध आहेत. अमर कथा, सत्य नारायणाची कथा आणि तिजरीची कथा. भक्तिमार्गामध्ये तर
‘तिजरी’चा अर्थ कोणीच समजत नाहीत. ज्ञानाचा तिसरा नेत्र ज्ञान सागर अमर बाबांशिवाय
इतर कोणीही देऊ शकत नाही. इथे देखील खोट्याच कथा ऐकवतात. गोड-गोड रुहानी मुलांनी आता
जाणले आहे की आपल्याला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे, ज्या तिसऱ्या नेत्रा
द्वारे तिन्ही काळांना, तिन्ही लोकांना तुम्ही जाणले आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन,
स्थूलवतन च्या आदि-मध्य-अंताला देखील जाणले आहे, म्हणून मुले स्वतःला त्रिकालदर्शी
देखील समजतात. तुम्हा गोड-गोड मुलांव्यतिरिक्त या सृष्टीवर इतर कोणीही त्रिकालदर्शी
नसतो. तिन्ही काळांना अर्थात सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. मूलवतन,
सूक्ष्मवतन स्थूलवतनला पुष्कळजण जाणतात. परंतु तिन्ही काळांच्या आदि-मध्य-अंताला
कोणीही जाणत नाहीत. आता गोड-गोड रुहानी मुले रुहानी बाबांकडून ऐकत आहेत. आपण त्यांची
संतान बनलो आहोत. तुम्हा रूहानी मुलांना एकदाच रूहानी पिता भेटले आहेत. आत्म्यांना
शिकवतात. बाकीचे सर्व देह-अभिमानी असल्या कारणामुळे म्हणतात - मी हे शिकतो, मी हे
करतो, देह-अभिमान येतो. आता या संगमावर रूहानी बाबा येऊन रुहानी मुलांना म्हणतात -
तुम्ही चांगल्या रीतीने शिका. बाबांकडून वारसा घेण्याचा प्रत्येक मुलाला अधिकार आहे
कारण सर्व रुहानी मुले आहेत ना. लौकिक नात्यामध्ये केवळ मुलगाच वारसाचा अधिकारी बनतो.
या पारलौकिक नात्यामध्ये सर्व मुलांना, आत्म्यांना वारसा मिळतो. अमरनाथची कथा देखील
ऐकवतात. सांगितले जाते पार्वतीला पर्वतावर, गुंफेमध्ये जाऊन कथा ऐकवली. हे तर चुकीचे
आहे ना. आता तुम्ही मुले जाणता खोटे काय आहे, खरे काय आहे. सत्य तर जरूर सत्य बाबाच
ऐकवतील. बाबा एकदाच खरे सांगून सचखंडाचे मालक बनवतात. तुम्ही जाणता या झूठ खंडला आग
लागणार आहे. आता हे जे काही दिसते आहे, हे काहीच राहणार नाहीये. फार थोडा वेळ उरला
आहे. हा शिवबाबांचा ज्ञान यज्ञ आहे. जसे लौकिक नात्यामध्ये देखील पिता यज्ञ रचतात.
कोणी रुद्र यज्ञ रचतात, कोणी गीता यज्ञ रचतात. कोणी रामायण यज्ञ रचतात. हा आहे
शिवबाबा अथवा रुद्र ज्ञान यज्ञ. हा अंतिम यज्ञ आहे.
तुम्ही जाणता - आता
आपण अमरपुरीमध्ये जात आहोत. आता थोड्या मिनिटांचा रस्ता बाकी आहे. कोणत्याही
मनुष्याला हे ठाऊक नाही आहे. ते तर सांगतात - मृत्यूलोक मधून अमरलोक मध्ये
जाण्याकरिता अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. अमरलोक सतयुगाला म्हटले जाते. तुम्हा
मुलांना आता बाबा सन्मुख बसून अमरकथा, तिजरीची कथा, सत्यनारायणाची कथा सांगत आहेत.
भक्तिमार्गामध्ये काय-काय घडते, ते तर पाहिले आहे. भक्तिमार्गाचा विस्तार केवढा आहे.
जसा स्थूल झाडाचा मोठा विस्तार असतो, तसेच भक्तीचे देखील खूप मोठे कर्मकांडाचे झाड
आहे. यज्ञ, व्रत-वैकल्ये, जप-तप इत्यादी किती करतात. या जन्मात भक्त तर पुष्कळ आहेत.
मनुष्यांची वृद्धी होत राहते. तुम्ही भक्तिमार्गामध्ये आला आहात तेव्हापासून दुसरे
धर्म स्थापन झाले आहेत. प्रत्येकाचे आपापल्या धर्माशी कनेक्शन आहे. प्रत्येकाचे
रिती-रिवाज वेगळे आहेत. भारत अमरपुरी होता, आता भारत मृत्यूलोक आहे. तुम्ही आदि
सनातन देवी-देवता धर्माचे होता. परंतु आता पतित असल्या कारणाने तुम्ही स्वतःला देवता
म्हणू शकत नाही. हे तुम्ही विसरले आहात की आपणच देवता होतो. जसे ते म्हणतात -
क्राईस्टने आमचा धर्म स्थापन केला तर आमचे ख्रिस्ती चालत आले आहेत. असे नाही की
युरोपियन धर्माचे आहेत. जसे तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहणारे किंवा भारतामध्ये
राहणारे देवी-देवता धर्माचे आहात. परंतु स्वतःला देवता म्हणून घेऊ शकत नाही. समजता
की, आपण तर पापी, नीच, गरीब, विकारी आहोत. भक्ती मार्गामध्ये मनुष्य दुःखी होतात तर
बाबांनाच बोलावतात. हे केवळ तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता की, ज्या पित्याला बोलावत
आलो आहोत ते आता आम्हाला बेहदचा वारसा देण्याकरिता अमरकथा ऐकवत आहेत. आपण अमरपुरीचे
मालक बनणार आहोत. अमरपुरी स्वर्गाला म्हटले जाते. तुम्ही म्हणाल - आम्ही स्वर्गवासी
बनण्याकरिता पुरुषार्थ करत आहोत. कलियुगामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला तर म्हणतात
की, स्वर्गवासी झाला. आता त्याने काही स्वर्गात जाण्यासाठी थोडाच पुरुषार्थ केला आहे?
तुम्ही तर पुरुषार्थ करत आहात अमरपुरी, वैकुंठामध्ये जाण्याकरिता. पुरुषार्थ करवून
घेणारे कोण आहेत? अमर बाबा, ज्यांना अमरनाथ देखील म्हटले जाते. या यज्ञाला पाठशाळा
देखील म्हटले जाते. इतर कोणत्याच पाठशाळेला ‘यज्ञ’ म्हटले जात नाही. यज्ञ वेगळे रचले
जातात, ज्यामध्ये ब्राह्मण लोक बसून मंत्र पठण करतात. बाबा म्हणतात हे तुमचे कॉलेज
देखील आहे, यज्ञ देखील आहे, दोन्ही एकत्र आहेत. तुम्ही जाणता या ज्ञान यज्ञातून
विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे, यामध्ये सारी दुनिया स्वाहा होणार आहे. पुन्हा
नवीन दुनिया स्थापन होणार आहे, याचे नावच आहे महाभारी महाभारत लढाई. या लढाई सारखी
दुसरी कोणती लढाई नाही. म्हटले जाते - मुसळांद्वारे (मिसाईल्स द्वारे) युद्ध झाले.
युद्ध काही तुमच्यासोबत नाही आहे. याला महाभारत लढाई का म्हटले आहे? भारतामध्ये तर
एकच धर्म होता ना. मृत्यू तर बाहेर आहे. इथे युद्धाचा तर प्रश्नच नाही. बाबा स्पष्ट
करून सांगतात - जर तुम्हाला नवीन दुनिया हवी असेल तर जरूर जुन्या दुनियेचा विनाश
होईल.
तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये विराट रूपाविषयीचे देखील संपूर्ण ज्ञान आहे. तुम्ही हे देखील समजता की,
जे कल्पापूर्वी आले होते तेच देवता बनण्याकरिता येतील. बुद्धीचा वापर करायचा आहे.
आपण जितके ब्राह्मण बनलो आहोत, तेच आता पुन्हा देवता बनणार. प्रजापिता ब्रह्माचे
देखील गायन आहे. परमपिता परमात्मा, ब्रह्मा द्वारे मनुष्य सृष्टी रचतात म्हणून
ब्रह्माला ‘प्रजापिता’ म्हटले आहे. परंतु कशी आणि कधी रचतात? हे कोणालाच ठाऊक नाही.
सृष्टीच्या सुरुवातीला मनुष्य नव्हते का ज्यामुळे रचावे लागले? बोलावतातच मुळी -
पतित-पावन या; तर मनुष्य जेव्हा पतित बनतात तेव्हाच तर बाबा येतात. दुनिया
परिवर्तित होणार आहे. बाबा तुम्हाला नवीन दुनियेच्या लायक बनवतात. आता तुम्ही सर्व
तमोप्रधान जुन्या दुनियेमध्ये आहात; आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. बाबांनी
समजावून सांगितले आहे - प्रत्येक मनुष्य मात्राला, प्रत्येक वस्तूला सतो, रजो, तमो
मध्ये यावेच लागते. दुनिया नवीन पासून जुनी जरूर होते. कपडा देखील नवीन घालतात तर
जुना होतोच. तुम्हाला आता ज्ञान मिळाले आहे, खरी सत्य नारायणाची कथा आता तुम्ही ऐकत
आहात. गीता आहे - सर्वशास्त्रमई शिरोमणी. बाकी आहेत तिची मुले-बाळे. जसे ब्रह्माची
वंशावळी, तशीच गीता आहे मुख्य. उच्च ते उच्च आहेत माता-पिता, बाकी आहेत मुले. आता
माता-पित्याकडून वारसा मिळू शकतो. बाकी कितीही शास्त्रे इत्यादी वाचा, काहीही करा,
वारसा मिळू शकत नाही. फार-फार तर शास्त्र पठण करून त्यांची कमाई होते. ते तर झाले
अल्प काळाकरिता. इथे तुम्ही मुले ऐकता तर किती कमाई करता - २१ जन्मांकरिता, विचार
करा. ते (भक्ती करणारे) कथा ऐकवतील तर सर्वजण त्यांना पैसे देतील. इथे बाबा तुम्हा
मुलांना ऐकवत आहेत - तुम्ही २१ जन्मांकरिता किती श्रीमंत बनता. तिथे (भक्तिमार्गामध्ये)
कथा ऐकविणाऱ्याचा खिसा भरतो. भक्ती इत्यादी करणे प्रवृत्तीमार्गवाल्यांचे काम आहे.
तुम्ही आहात प्रवृत्तीमार्गवाले. तुम्ही जाणता - स्वर्गलोकमध्ये आपण पूज्य होतो.
नाहीतर ८४ जन्मांचा हा हिशोब कसा असू शकला असता? हे आहे रूहानी ज्ञान जे सुप्रीम
रुह, ज्ञान सागराकडून मिळत आहे. पतित-पावन बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. आम्हा
मुलांना अमरकथा ऐकवत आहेत. जन्मोजन्मी खोट्या कथा ऐकत आला आहात. आता सत्य कथा ऐकून
तुम्ही १६ कला संपूर्ण बनता. चंद्राला १६ कला संपूर्ण म्हटले जाते. सूर्यासाठी असे
म्हणत नाहीत.
तुम्ही जाणता आपण
आत्मे भविष्यामध्ये सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण बनणार आहोत. आणि मग अर्ध्या
कल्पानंतर त्यांच्यामध्ये भेसळ पडते. आता तुम्ही समजता आपण पुन्हा सर्वगुण संपन्न,
१६ कला संपन्न… सो देवता पुन्हा एकदा बनत आहोत. आपण आत्मे सर्वप्रथम आपल्या घरी
जाणार, नंतर मग आम्ही शरीर धारण करून सो देवता बनणार, त्यानंतर चंद्रवंशी
घराण्यामध्ये येणार. ८४ जन्मांचा हिशोब पाहिजे. कोणत्या युगामध्ये, कोणत्या
वर्षामध्ये किती जन्म झाले; बाबांनी ८४ जन्मांची खरी-खरी कथा आता ऐकवली आहे. तुम्हा
मुलांना म्हणतील की, तुम्ही भारतवासी ८४ जन्म घेता. एक तर स्वतःला ब्राह्मण समजावे
लागेल. तुम्ही मम्मा, बाबा म्हणता ना. वारसा शिवबाबांकडून घेता, ब्रह्माबाबांद्वारे.
ब्रह्मा बाबा देखील त्यांचेच झाले आहेत. ब्रह्मा कडून वारसा मिळू शकत नाही. हे
देखील भाऊ झाले. हे शरीरधारी आहेत ना. तुम्ही सर्व मुले वारसा त्यांच्याकडून (शिवबाबांकडून)
घेता. यांच्याकडून (ब्रह्मा कडून) नाही. ज्यांच्याकडून वारसा घ्यायचा नाहीये,
त्यांची आठवण करायची नाही. एका शिवबाबांचीच आठवण करायची आहे. त्यांच्यासाठीच म्हटले
जाते - ‘तुम मात-पिता हम बालक तेरे’. तुम्ही यांच्याकडे (ब्रह्मा बाबांकडे) येता तर
बुद्धीमध्ये असते, आम्ही शिवबाबांकडे जात आहोत. आठवण शिवबाबांचीच करायची आहे. आत्मा
बिंदू आहे, त्या आत्म्यामध्येच ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. आत्मा भृकुटीच्या
मध्यभागी राहते. उडते देखील एका सेकंदामध्ये; मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो,
भृकुटीच्या मध्यभागी जाऊन विराजमान होतो. बुद्धीमध्ये समज आहे - माझी आत्मा अशी आहे.
सतयुगामध्ये तर कोणती अशी गोष्ट पाहण्याची इच्छा राहत नाही. दिव्य दृष्टी द्वारे
आत्म्याला पाहू शकता. ही काही या स्थूल डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाहीये.
भक्तिमार्गामध्ये साक्षात्कार करतात. जसे रामकृष्णाचे शिष्य विवेकानंद होते, त्यांनी
सांगितले - ‘मी समोर बसलो होतो तर त्यांची आत्मा निघून माझ्या शरीरामध्ये प्रवेश
झाली’. असे कधी होत नाही. आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये कशी प्रवेश करते,
या सर्व गोष्टी तुम्हा मुलांना समजावून सांगितल्या जातात. आता तुम्ही समजता - आपण
अमरलोकमध्ये जाण्याकरिता पुरुषार्थ करत आहोत, मग आम्ही अमरलोकमध्ये जन्म घेणार. तिथे
आम्ही गर्भ-महलामध्ये असणार. इथे तर गर्भ-जेलमध्ये खूप त्राही-त्राही करतात. आता
अर्ध्या कल्पासाठी बाबा तुम्हाला सर्व दुःखांपासून सोडवतात. तर अशा बाबांची किती
प्रेमाने आठवण केली पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला
आत्मा समजून, रुहानी बाबांकडून शिकून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. सचखंडाचे मालक
बनण्याकरिता सत्य कथा ऐकायची आहे आणि ऐकवायची आहे.
२) ज्या बाबांकडून
बेहदचा वारसा मिळतो आहे, त्यांचीच आठवण करायची आहे, कोणत्याही देहधारीची नाही. या
जुन्या दुनियेला आग लागणार आहे, त्यामुळे याला पाहत असताना देखील बघायचे नाही.
वरदान:-
सायलेन्सच्या
शक्तीद्वारे आपल्या रजिस्टरला स्वच्छ करणारे लोक प्रिय, प्रभू प्रिय भव
जसा सायन्सने असा शोध
लावला आहे की, लिहिलेले सर्व काही पुसले जाते, कळत सुद्धा नाही. असे तुम्ही
सायलेन्सच्या शक्तीद्वारे आपल्या रजिस्टरला दररोज स्वच्छ करा, म्हणजे मग प्रभू
प्रिय अथवा दैवी लोकप्रिय बनाल. सच्चाई-सफाई सर्वांनाच आवडते, त्यामुळे या दिवशी
केलेले व्यर्थ संकल्प अथवा व्यर्थ कर्माची दुसऱ्या दिवशी खूण सुद्धा राहू नये,
‘झाले ते झाले’, असे म्हणून फुलस्टॉप लावा तेव्हाच रजिस्टर स्वच्छ राहील आणि साहेब
राजी होतील.
बोधवाक्य:-
व्यर्थ संकल्प
करणे अथवा इतरांचे व्यर्थ संकल्प चालविण्यासाठी निमित्त बनणे - ही देखील अपवित्रता
आहे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
मन, वाणी, कर्मामध्ये
सरळता (साधेपणा) आणि सहनशीलता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जर साधेपणा आहे परंतु
सहनशीलता नसेल तरी देखील श्रेष्ठता नाही. साधेपणा सोबत सहनशीलता असेल तर शक्ती
स्वरूप म्हटले जाते. शक्तींच्या चित्रांमध्ये साधेपणा आणि सहनशीलता दोन्ही गुण
दाखवतात. आताच्या रिझल्टमध्ये कुठे सहनशीलता जास्त आहे, कुठे साधेपणा जास्त आहे. आता
या दोन्ही गोष्टींना समान बनवा.