15-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला आता भविष्य २१ जन्मांकरिता इथेच शिक्षण शिकायचे आहे, काट्यापासून सुगंधी फूल बनायचे आहे, दैवीगुण धारण करायचे आहेत आणि करवून घ्यायचे आहेत”

प्रश्न:-
कोणत्या मुलांच्या बुद्धीचे कुलूप नंबरवार उघडत जाते?

उत्तर:-
जे श्रीमतावर चालत राहतात. पतित-पावन बाबांच्या आठवणीमध्ये राहतात. ज्यांचा योग शिक्षण देणाऱ्या सोबत आहे त्यांच्या बुद्धीचे कुलूप उघडत जाते. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, अभ्यास करा आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, आम्ही बाबांकडून ऐकतो. देही-अभिमानी बनून ऐका आणि ऐकवा तर कुलूप उघडत जाईल.

ओम शांती।
बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - जेव्हा इथे बसता तर असेही नाही की फक्त शिवबाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. ती होईल फक्त शांती मग सुख देखील पाहिजे. तुम्हाला शांतीमध्ये रहायचे आहे आणि स्वदर्शन चक्रधारी बनून राजाईची देखील आठवण करायची आहे. तुम्ही पुरुषार्थ करताच नरापासून नारायण अथवा मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. इथे भले कितीही दैवीगुण असतील तरीही त्यांना देवता म्हणणार नाही. देवता असतातच स्वर्गामध्ये. दुनियेमध्ये लोकांना स्वर्गा बद्दल माहितीच नाही आहे. तुम्ही मुले जाणता नवीन दुनियेला स्वर्ग, जुन्या दुनियेला नरक म्हटले जाते. हे देखील भारतवासीच जाणतात. जे देवता सतयुगामध्ये राज्य करत होते त्यांची चित्रे देखील भारतामध्येच आहेत. ती आहेत आदि सनातन देवी-देवता धर्माची. मग भले त्यांची चित्रे बाहेर घेऊन जातात, पूजेसाठी. बाहेर कुठेही जातात तर जाऊन तिथे मंदिर बनवतात. प्रत्येक धर्माचे कुठेही जातात तर आपल्या धर्माच्या मूर्तींचीच पूजा करतात. ज्या-ज्या गावांवर विजय मिळवतात तिथे जाऊन चर्च इत्यादी बांधतात. पूजेसाठी प्रत्येक धर्माचे चित्र आपापले आहे. आधी तुम्ही देखील जाणत नव्हता की आपणच देवी-देवता होतो. स्वतःला वेगळे समजून त्यांची पूजा करत होतो. इतर धर्मवाले पूजा करतात तर ते जाणतात की आमचा धर्म स्थापक क्राईस्ट आहे, आम्ही ख्रिश्चन आहोत अथवा बौद्धी आहोत. हे हिंदू लोक आपल्या धर्माला न जाणल्या कारणाने स्वतःला हिंदू म्हणतात आणि पूजतात देवतांना. हे देखील समजत नाहीत की, आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहोत. आम्ही आपल्या मोठ्यांना पुजतो. ख्रिश्चन एका क्राईस्टची पूजा करतात. भारतवासियांना हेच माहित नाहीये की आपला धर्म कोणता आहे? तो कोणी आणि कधी स्थापन केला होता? बाबा म्हणतात - हा भारताचा आदि सनातन देवी-देवता धर्म जेव्हा प्रायःलोप होतो तेव्हा मी येतो पुन्हा स्थापन करण्यासाठी. हे ज्ञान आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. आधी काहीच जाणत नव्हता. समजून न घेताच भक्तिमार्गामध्ये चित्रांची पूजा करत राहत होता. आता तुम्ही जाणता आपण भक्तिमार्गामध्ये नाही आहोत. आता तुम्हा ब्राह्मण कुल भूषण आणि शूद्र कुळवाल्यांमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते देखील या वेळी तुम्हाला समजते आहे. सतयुगामध्ये तुम्हाला हे समजणार नाही. या वेळीच तुम्हाला समज मिळते (हे ज्ञान मिळते). बाबा आत्म्यांना समज (ज्ञान) देतात. जुन्या दुनिये विषयी आणि नवीन दुनिये विषयी तुम्हा ब्राह्मणांनाच माहित आहे. जुन्या दुनियेमध्ये असंख्य मनुष्य आहेत. इथे तर मनुष्य किती भांडण-तंटे करतात. हे आहेच काट्यांचे जंगल. तुम्ही जाणता आपण देखील काटे होतो. आता बाबा आम्हाला फूल बनवत आहेत. काटे (विकारी) या सुगंधी फुलांना नमन करतात. हे रहस्य आता तुम्ही जाणले आहे. हम सो देवता होतो जे आता परत येऊन सुगंधी फूल (ब्राह्मण) बनलो आहोत. बाबांनी समजावून सांगितले आहे हा ड्रामा आहे. पूर्वी हे नाटक, चित्रपट इत्यादी काहीच नव्हते. हे देखील आत्ता बनले आहेत. का बनले आहेत? कारण बाबांना दृष्टांत देण्यासाठी सोपे व्हावे. मुले देखील समजू शकतात. हे विज्ञान देखील तुम्हा मुलांना शिकायचे आहे ना. बुद्धीमध्ये हे सर्व विज्ञानाचे संस्कार घेऊन जातील जे मग तिथे कामी येतील. दुनिया काही एकदम तर नष्ट होत नाही. संस्कार घेऊन जाऊन मग जन्म घेतात. विमान इत्यादी देखील बनवतात. ज्या-ज्या कामाच्या वस्तू तिथल्या लायकीच्या आहेत त्या बनतात. आगबोटी बनवणारे देखील असतात परंतु आगबोटी काही तिथे कामी येणार नाहीत. भले कोणी ज्ञान घेवो अथवा न घेवो परंतु त्यांचे संस्कार कामी येणार नाहीत. तिथे आगबोटी इत्यादींची गरजच नाही. ड्रामामध्येच नाही. हो विमानांची, वीज इत्यादीची गरज पडेल. ते (जुन्या दुनियेतील वैज्ञानिक) शोध लावत राहतात. तिथून मुले शिकून येतात. या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्येच आहेत.

तुम्ही जाणता - आपण शिकतोच मुळी नवीन दुनियेकरिता. बाबा आम्हाला भविष्य २१ जन्मांकरिता शिकवत आहेत. आम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी पवित्र बनत आहोत. आधी नरकवासी होतो. मनुष्य म्हणतात देखील - अमका स्वर्गवासी झाला. परंतु आपण नरकात आहोत हे समजत नाहीत. बुद्धीचे कुलूप उघडत नाही. तुम्हा मुलांचे आता हळू-हळू कुलूप उघडत जाते, नंबरवार. कुलूप त्यांचे उघडेल जे श्रीमतावर चालू लागतील आणि पतित-पावन बाबांची आठवण करतील. बाबा ज्ञानही देतात आणि आठवण देखील शिकवतात. टीचर आहेत ना. तर टीचर जरूर शिकवतील. जितका टीचर आणि अभ्यासा सोबत योग असेल तितके उच्च पद प्राप्त कराल. त्या अभ्यासामध्ये योग (आठवण) तर असतोच. जाणतात बॅरिस्टर शिकवतात. इथे बाबा शिकवत आहेत. हे देखील विसरून जातात कारण नवीन गोष्ट आहे ना. देहाची आठवण करणे तर खूप सोपे आहे. घडोघडी देहच आठवतो. आपण आत्मा आहोत हे विसरून जातात. आम्हा आत्म्यांना बाबा समजावून सांगतात. आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत. बाबा तर जाणतात - मी परमात्मा आहे, आत्म्यांना शिकवतो की स्वतःला आत्मा समजून इतर आत्म्यांना बसून शिकवा. हे आत्मा कानांनी ऐकते, ऐकविणारे आहेत परमपिता परमात्मा. त्यांना सुप्रीम आत्मा म्हणणार. तुम्ही जेव्हा कोणाला हे ज्ञान समजावून सांगता तर हे बुद्धीमध्ये आले पाहिजे की, मज आत्म्यामध्ये ज्ञान आहे, आत्म्याला हे ऐकवत आहे. मी बाबांकडून जे ऐकले आहे ते आत्म्यांना ऐकवतो. ही आहे अगदी नवी गोष्ट. तुम्ही दुसऱ्याला जेव्हा शिकवता तर देही-अभिमानी होऊन शिकवत नाही, विसरून जाता. ध्येय तर आहे ना. बुद्धीमध्ये हे लक्षात राहिले पाहिजे - मी आत्मा अविनाशी आहे. मी आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे पार्ट बजावत आहे. तू आत्मा शूद्र कुळामध्ये होतीस, आता ब्राह्मण कुळामध्ये आहेस. नंतर मग देवता कुळामध्ये जाल. तिथे शरीर देखील पवित्र मिळेल. आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत. बाबा मुलांना शिकवत आहेत. मुले मग म्हणतील - आम्ही भाऊ-भाऊ आहोत, भावाला शिकवत आहोत. आत्म्यालाच समजावून सांगतात. आत्मा शरीराद्वारे ऐकते. या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. लक्षात येत नाहीत. अर्धे कल्प तुम्ही देह-अभिमानामध्ये राहिलात. यावेळी तुम्हाला देही-अभिमानी होऊन रहायचे आहे. स्वतःला आत्मा निश्चय करायचा आहे, आत्मा निश्चय करून बसा. आत्मा निश्चय करून ऐका. परमपिता परमात्माच ऐकवतात तेव्हाच तर म्हणतात ना - ‘आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल…’ तिथे तर शिकवत नाही. इथेच येऊन शिकवतो. इतर सर्व आत्म्यांना आपापले शरीर आहे. हे बाबा तर आहेत सुप्रीम-आत्मा. त्यांना शरीर नाहीये. त्यांच्या आत्म्याचेच नाव आहे - शिव. तुम्ही जाणता - हे शरीर (ब्रह्मा बाबांचे शरीर) माझे नाहीये. मी सुप्रीम-आत्मा आहे. माझी महिमा वेगळी आहे. प्रत्येकाची महिमा आपली-आपली आहे ना. गायन देखील आहे ना - परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करतात. ते ज्ञानाचा सागर, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. ते सत् आहेत, चैतन्य आहेत, आनंद, सुख-शांतीचा सागर आहेत. ही आहे बाबांची महिमा. मुलाला पित्याच्या प्रॉपर्टी बद्दल माहित असते - आमच्या बाबांकडे हा कारखाना आहे, ही मिल आहे, नशा असतो ना. मुलगाच त्या प्रॉपर्टीचा मालक बनतो. ही भौतिक प्रॉपर्टी तर एकदाच मिळते. बाबांकडे कोणती प्रॉपर्टी आहे, ते ऐकले.

तुम्ही आत्मे अमर आहात. कधीही मरत नाही. प्रेमाचा सागर देखील बनता. हे लक्ष्मी-नारायण प्रेमाचा सागर आहेत. कधी भांडत नाहीत. इथे तर किती भांडण-तंटे करतात. प्रेमामध्ये तर अजूनच घोटाळा होतो. बाबा येऊन विकार बंद करतात तर किती मार पडतो. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, पावन बना तर पावन दुनियेचे मालक बनाल’. काम महाशत्रू आहे म्हणून बाबांकडे येतात तर म्हणतात जी विकर्म केली आहेत, ती सांगा तर हलके व्हाल, यामध्ये देखील मुख्य विकाराची गोष्ट आहे. बाबा मुलांच्या कल्याणार्थ विचारतात. बाबांनाच म्हणतात - ‘हे पतित-पावन या’; कारण पतित, विकारामध्ये जाणाऱ्यालाच म्हटले जाते. ही दुनिया देखील पतित आहे, मनुष्य देखील पतित आहेत, ५ तत्व देखील पतित आहेत. तिथे तुमच्यासाठी तत्व देखील पवित्र हवीत. या आसुरी पृथ्वीवर देवतांची सावली पडू शकत नाही. लक्ष्मीचे आवाहन करतात परंतु ती इथे थोडीच येऊ शकते. ही ५ तत्व देखील बदलली पाहिजेत. सतयुग आहे - नवीन दुनिया, ही आहे जुनी दुनिया. हिचा अंत होण्याची वेळ आहे. मनुष्य समजतात अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. जेव्हा की कल्पच मुळी ५ हजार वर्षांचे आहे तर मग फक्त एक कलियुग ४० हजार वर्षांचे कसे असू शकते. किती अज्ञान अंध:कार आहे. ज्ञानच नाहीये. भक्ती आहे ब्राह्मणांची रात्र. ज्ञान आहे ब्रह्मा आणि ब्राह्मणांचा दिवस. जे आता प्रॅक्टिकलमध्ये होत आहे. शिडीच्या चित्रामध्ये खूप क्लिअर दाखवले आहे. नवी दुनिया आणि जुन्या दुनियेला अर्धे-अर्धे म्हणणार. असे नाही की नव्या दुनियेला जास्ती वेळ, जुन्या दुनियेला थोडा वेळ देतील. नाही, पूर्ण अर्धे-अर्धे होईल. तर क्वार्टर देखील करू शकतील. अर्ध्यामध्ये नसेल तर पूर्ण क्वार्टर देखील होऊ शकणार नाही. स्वस्तिकामध्ये सुद्धा ४ भाग देतात. समजतात आम्ही गणेश काढतो. आता मुले समजतात ही जुनी दुनिया विनाश होणार आहे. आम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहोत. आम्ही नरापासून नारायण बनतो नव्या दुनियेसाठी. श्रीकृष्ण देखील नव्या दुनियेचा आहे. श्रीकृष्णाचे तर गायन झाले, त्याला महात्मा म्हणतात कारण छोटे मूल आहे. लहान मुले प्रिय वाटतात. मोठ्यांवर इतके प्रेम करत नाहीत जितके छोट्यांवर करतात कारण सतोप्रधान अवस्था आहे. विकाराची दुर्गंधी नाहीये. मोठे झाल्यावर विकारांचा दुर्गंध येतो. छोट्या मुलांची कधी क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) असू शकत नाही. हे डोळेच धोका देणारे आहेत म्हणून दृष्टांत देतात की, त्याने आपले डोळे काढून टाकले. अशी कोणती गोष्ट नाही आहे. असे कोणी डोळे काढत नाहीत. हे यावेळी बाबा ज्ञानाच्या गोष्टी समजावून सांगत आहेत. तुम्हाला तर आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. आत्म्याला स्पिरिच्युअल नॉलेज मिळाले आहे. आत्म्यामध्येच ज्ञान आहे. बाबा म्हणतात - मला ज्ञान आहे. आत्म्याला निर्लेप म्हणू शकत नाही. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्मा अविनाशी आहे. आहे किती लहान. त्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट आहे. अशी गोष्ट कोणी सांगू शकणार नाही. ते तर निर्लेप म्हणतात म्हणून बाबा म्हणतात - अगोदर आत्म्याला रियलाइज करा. कोणी विचारतात पशु-पक्षी कुठे जातील? अरे, पशु-पक्षांची तर गोष्टच सोडा. आधी आत्म्याला तर रियलाईज करा. मी आत्मा कशी आहे, काय आहे…? बाबा म्हणतात - जेव्हा की स्वतःला आत्मा म्हणून ओळखत नाहीत, तर मग मला कसे काय ओळखणार. या सर्व सूक्ष्म गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहेत. आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट आहे. तो बजावला जात राहतो. कोणी मग म्हणतात - जर ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे तर मग आम्ही पुरुषार्थच कशाला करायचा! अरे पुरुषार्थाशिवाय तर पाणी देखील मिळू शकत नाही. असे नाही, ड्रामा अनुसार आपणच सर्व काही मिळेल. कर्म तर जरूर करायचेच आहे. चांगले आणि वाईट कर्म असते. हे बुद्धीद्वारे समजू शकतो. बाबा म्हणतात - हे रावण राज्य आहे, यामध्ये तुमची कर्म विकर्म बनतात. तिथे रावण राज्यच नाही जे विकर्म होईल. मीच तुम्हाला कर्म, अकर्म, विकर्माची गती समजावून सांगतो. तिथे तुमची कर्म अकर्म होतात, रावण राज्यामध्ये कर्म विकर्म होतात. गीता पठण करणारे देखील कधी हा अर्थ सांगत नाहीत, ते तर फक्त वाचून ऐकवतात, संस्कृतमध्ये श्लोक ऐकवून मग हिंदी मध्ये अर्थ सांगतात. बाबा म्हणतात - काही-काही शब्द बरोबर आहेत. भगवानुवाच आहे परंतु भगवान कोणाला म्हटले जाते, हे कोणालाच माहीत नाहीये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बेहद बाबांच्या प्रॉपर्टीची मी आत्मा मालक आहे, जसे बाबा शांती, पवित्रता, आनंदाचा सागर आहेत, तसा मी आत्मा मास्टर सागर आहे, याच नशेमध्ये रहायचे आहे.

२) ‘ड्रामा’, असे म्हणून पुरुषार्थ सोडून द्यायचा नाहीये, कर्म जरूर करायची आहेत. कर्म-अकर्म-विकर्माच्या गतीला समजून कायम श्रेष्ठ कर्मच करायची आहेत.

वरदान:-
वेळेच्या महत्वाला जाणून स्वतःला संपन्न बनविणारे विश्वाचे आधारमुर्त भव

संपूर्ण कल्पाच्या कमाईचे, श्रेष्ठ कर्मरूपी बीज पेरण्याचे, ५ हजार वर्षांच्या संस्कारांचे रेकॉर्ड भरण्याचा, विश्व कल्याण अथवा विश्व परिवर्तनाचा हा काळ चालू आहे. जर काळाचे ज्ञान असणारे देखील वर्तमान वेळ वाया घालवत असतील किंवा येणाऱ्या काळावर सोडून देत असतील तर काळाच्या आधारावर स्वतःचा पुरुषार्थ झाला. परंतु विश्वाचे आधारमुर्त आत्मे कोणत्याही प्रकारच्या आधारावर चालत नाहीत. ते एका अविनाशी मदतीच्या आधारे कलियुगी पतित दुनियेपासून किनारा करून स्वतःला संपन्न बनविण्याचा पुरुषार्थ करतात.

बोधवाक्य:-
स्वतःला संपन्न बनवा तर विशाल कार्यामध्ये स्वतः सहयोगी बनाल.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

वर्तमान काळातील पुरुषार्थामध्ये प्रत्येक संकल्पाला पॉवरफुल बनवायचे आहे. संकल्पच जीवनातील श्रेष्ठ खजिना आहे. जसे खजिन्याद्वारे जे हवे, जितके हवे, तितके प्राप्त करू शकतो, तसेच श्रेष्ठ संकल्पाद्वारे कायमस्वरूपी श्रेष्ठ प्रारब्ध मिळवू शकता. यासाठी एक छोटेसे स्लोगन लक्षात ठेवा की, विचार करून करायचे आणि बोलायचे आहे तेव्हा कायमसाठी श्रेष्ठ जीवन बनवू शकाल.