15-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, सर्वांना हाच संदेश द्या की, देहासहित देहाच्या सर्व धर्मांना विसरून स्वतःला आत्मा समजा तेव्हाच सर्व दुःख दूर होतील”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये फॉलो फादर करायचे आहे?

उत्तर:-
जसे या ब्रह्माने आपले सर्व काही ईश्वर अर्पण केले. पूर्णपणे ट्रस्टी बनला, तसे ट्रस्टी बनून राहा. कधीही पैशांचा अपव्यय करू नका किंवा पाप-आत्म्यांना पैसे देऊ नका. आपले सर्व काही ईश्वरीय सेवेसाठी वापरा, पूर्णपणे ट्रस्टी बना. बाबांच्या श्रीमतावर चालत राहा. बाबा बघत असतात की, कोणता मुलगा किती श्रीमतावर चालत आहे.

गीत:-
तू प्यार का सागर है…

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. म्हणतात - ‘बाबा, आम्ही कोठून आलो, केव्हा आलो, आणि परत घरी जाण्याचा रस्ता कसा विसरलो. हा ड्रामा आमच्या कानात सांगा. आम्ही कोण आहोत, कोठून आलो, मग कुठे निघून गेलो! ज्ञानाचा एक थेंब तरी द्या, कारण ज्ञान-सागर आहात ना. आता मुले जाणतात आपण आत्मे कुठले रहिवासी आहोत; आणि मग बाबांना आणि आपल्या स्वर्गाला कसे विसरलो आणि इथे येऊन कसे दुःखी झालो - हे रहस्य कानात सांगा. आता बाबा ज्ञानाचा सागर देखील आहेत, पवित्रतेचा सागर देखील आहेत. प्रेमाचा सागर देखील आहेत. शांतीचा, सुख आणि संपत्तीचा देखील सागर आहेत. आता बेहदच्या बाबांकडून या सर्व गोष्टी समजत आहेत. आदि काळामध्ये कोठून आलो, आणि मग मध्य काळामध्ये असे काय घडले की आम्ही रस्ताच विसरून गेलो आणि दुःखी झालो. आता आम्ही पुन्हा बाबांना म्हणतो की, ‘बाबा, आम्हाला मार्ग दाखवा, जेणेकरून आम्ही आमच्या सुखधाम शांतीधाम मध्ये परत जाऊ शकू’. स्वतः बाबाच बसून आम्हाला हे सांगतात की, तुम्ही आदि काळामध्ये कोण होता, मग मध्य काळामध्ये काय घडले. भक्तीमार्ग कसा सुरू झाला, आणि मग शेवटी काय झाले. हे आदि-मध्य-अंताचे रहस्य आता बुद्धीमध्ये पक्के झाले आहे. हा ड्रामा आहे ना. हा मनुष्यांनी जरूर जाणून घ्यायचा आहे - कारण ॲक्टर्स आहेत. जाणतात - आपण आत्मे निराकारी शांतीधाम मधून इथे टॉकी-धाम मध्ये (आवाजाच्या दुनियेमध्ये) येतो. मूलवतन, सूक्ष्मवतन आणि हे आहे स्थूलवतन. मग मूलवतन मधून आत्मे टॉकी-धाम मध्ये येतात; शरीर धारण करून पार्ट बजावण्याकरिता येतात. आत्म्याचे निवासस्थान शांतीधाम आहे. या गोष्टी दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. हे ज्ञान-सागर बाबांनीच येऊन सांगितले आहे. आता समजावून सांगत आहेत - ज्ञान-सागर म्हटले जाते परमपिता परमात्म्याला. मनुष्याला म्हणू शकत नाही. ही महिमा केवळ एका बाबांचीच गायली जाते, ज्यांना इतर कोणीही जाणत नाहीत. आता विनाशाची वेळ आहे. गायले गेले आहे - ‘विनाशकाले विपरीत-बुद्धी युरोपवासी…’

आता बाबांनी तुमचा बुद्धियोग आपल्या सोबत जोडला आहे की, मामेकम् याद करो (मज एकाची आठवण करा). मी मुसलमान आहे, हिंदू आहे, बौद्ध आहे... हे सर्व देहाचे धर्म आहेत. आत्मा तर आत्माच आहे. बाबा म्हणतात - ‘देहाचे सर्व धर्म त्यागून, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण कराल तर पतितापासून पावन बनाल’. बाबा म्हणतात - या देहाला सुद्धा विसरा. हा बाबांचा सर्वांसाठी निरोप आहे. देहासहित देहाची जी काही नाती आहेत, त्या सर्वांना विसरा. मी आत्मा आहे, आम्हा सर्व भावांचा पिता एकच आहे. हे ब्रह्मा देखील म्हणतील आम्ही आत्मे आहोत, तर सर्व भाऊ-भाऊ झालो. या वेळी सर्व भाऊ-भाऊ पतित दुःखी आहेत. सर्व काम चितेवर चढून भस्म झाले आहेत. जेव्हा द्वापरच्या सुरुवातीला रावण राज्य सुरू होते तेव्हा मग तुम्ही वाम-मार्गामध्ये जाता. तेव्हाच मग इतर धर्मांची सुरुवात होते. अर्धा काळ तुम्ही पवित्र राहाता. नंतर मग अर्ध्या काळामध्ये तुम्ही पतित बनता. २१ जन्म भारतातच गायले जातात. कुमारी ती, जी २१ कुळाचा उध्दार करते. कुमारीचा मान आहे. तुम्ही भारताचाच काय परंतु साऱ्या दुनियेचा उद्धार करत आहात. तुम्ही जाणता - आपण सर्व आत्मे शिवबाबांची संतान आहोत. तर कुमारच झालो. भाऊ-बहीण तेव्हा असता जेव्हा प्रजापिता ब्रह्माची संतान बनता. तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे. आपण आत्मे सर्व भाऊ-भाऊ आहोत, सर्व बाबांना बोलावतात - ‘हे पतित-पावन या. इथल्या रावण राज्यातून, दुःखातून आम्हाला लिबरेट करा (मुक्त करा). मग आमचा गाईड बनून आम्हाला परत घेऊन जा. आमची दुःखे हरण करा आणि सुख द्या. आता तुम्ही समजता - खरोखर, बाबा आलेले आहेत. आम्हाला या कलियुगी रावणराज्यातून सोडवून सोबत घेऊन जातील. बाबा जाणतात - सर्व आत्मे पतित आहेत, त्यामुळे शरीर देखील पतित आहे. आत्म्यालाच पावन बनवून निर्वाणधाम मध्ये घेऊन जातात. भूतकाळ हा वर्तमानकाळ आणि त्यानंतर भविष्यकाळ बनतो. आदि-मध्य-अंत आणि त्यानंतर पुन्हा आदि. कलियुग अंत, सतयुग आदि आणि मग फ्युचर असेल - सतयुग. हे तर सोपे आहे ना. अच्छा, मग मधल्या काळात असे काय झाले? आम्ही घसरलो कसे? आपण पावन देवता होतो मग पावनचे पतित कसे बनलो! आता तुम्ही समजता, बाबा म्हणतात - जेव्हा रावणराज्य सुरू होते तेव्हा तुम्ही पतित बनता. आता पुन्हा तुम्हाला भविष्यातले देवता बनविण्यासाठी आलो आहे. यामध्ये अवघड असे काहीच नाही. बाबा म्हणतात - तुम्हाला या विषय सागरातून पलीकडे घेऊन जातो. गातात देखील - ‘नैया मेरी पार लगा लो…’ सर्वजण एका बाबांनाच बोलावतात. आमची नाव जी बुडलेली आहे, ती क्षीरसागरामध्ये घेऊन चला. त्यांना खिवय्या, बागवान देखील म्हणतात. आता काट्यांच्या जंगलामध्ये अडकलो आहोत. आम्हाला पुन्हा फुलांच्या बागेमध्ये घेऊन चला. देवता फूल आहेत ना. आता सर्वजण काटे आहेत. एकमेकांना दुःखच देत राहतात. देवता कधी कोणाला दुःख देत नाहीत. तिथे तर सुखच सुख आहे. ते तर फक्त गातात, तुम्ही इथे प्रत्यक्ष ऐकत आहात. म्हणतात ना - बाबा, आम्ही कधीपासून विसरलो! या सृष्टी चक्राला आम्ही कसे विसरलो! सतयुग-त्रेतामध्ये हे जाणत नाहीत कारण तिथे तर आम्ही सुखी होतो मग दुःखी कधी झालो? जेव्हा रावण राज्य सुरू झाले. भारतवासी रावणाला जाळतच राहतात. जोपर्यंत त्याचा नायनाट होत नाही. मग सतयुगामध्ये असे थोडेच दरवर्षी जाळतील. हा आहे भक्तिमार्ग. आता रावणाचे राज्य खलास होणार आहे. भक्तिमार्गामध्ये रावणाला दरवर्षी जाळतात परंतु मरतच नाही. आता रावण तुमच्यासमोर जणू मेला आहे. तुम्ही जाणता रावण राज्य आता नष्ट होणार आहे. ५ भूतांचे मुंडके छाटले जाते. सर्वात पहिले काम विकाराचे मुंडके कापता. हा काम-विकारच महाशत्रू आहे. बाबा म्हणतात - या ५ भुतांवर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही विश्वावर विजय प्राप्त कराल. मनुष्य स्वतः देखील म्हणतात - आम्ही पतित आहोत. म्हणूनच बोलवतात - पतितांना पावन बनविण्यासाठी या. आत्मा बोलवते - ‘हे पतित-पावन, ओ बाबा… खिवय्या दयाळू बाबा, या’. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येतो. कसा येतो हे कोणीही जाणत नाहीत. गीतेमध्ये देखील आहे - भगवंताने येऊन राजयोग शिकवला आहे. परंतु भगवान कोण आहे, कधी आले हे कोणालाच ठाऊक नाहीये. गीतेचे तर खंडन केले आहे. श्रीकृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. द्वापरच्या नंतर तर दुनिया अजूनच पतित होते. तर श्रीकृष्णाने द्वापर मध्ये येऊन काय केले. मनुष्य तर काहीही समजत नाहीत. एकदम अनराइटीयस (अधर्मी) आहेत. सतयुगामध्ये असतात राइटीयस (धर्मनिष्ठ). तुम्ही आता अधर्मी पासून धर्मनिष्ठ बनत आहात. बाबा म्हणतात तुम्हीच संपूर्ण निर्विकारी पूज्य होता, आता तुम्हीच विकारी पुजारी बनला आहात. ‘आपेही पूज्य…’ आधी २१ जन्मांपर्यंत तुम्ही पूज्य होता, तुम्हीच आता पुजारी बनला आहात. सतयुगामध्ये ८ जन्म, मग त्रेतामध्ये १२ जन्म घेता. बाबाच सांगतात - तुम्ही कसे पतित बनला आहात, केव्हा पासून घसरला आहात, हे सृष्टीचे चक्र फिरत राहते. बाबा मुलांना साऱ्या जगाचा इतिहास-भूगोल, आदि-मध्य-अंताचे रहस्य बसून समजावून सांगतात. सर्वांनाच काही एकसारखे समजणार नाही. नंबरवारच समजतात.

बाबा म्हणतात - मी येऊन किंगडम (राज्य) स्थापन करतो. आता तुम्हाला सर्वगुण संपन्न बनायचे आहे, तोपर्यंत सतयुगामध्ये जाऊ शकणार नाही. इथेच बनायचे आहे आणि मग भविष्यात जाऊन तुम्ही राज्य कराल. त्याच्या दरम्यान संपूर्ण विनाश होईल. विनाश देखील बघाल जरूर. तुम्ही प्रत्यक्षात आपला पार्ट बजावाल. तुम्हाला थोडेच माहीत आहे की, पुढे काय होणार आहे. जे कल्पापूर्वी झाले असेल तेच होईल.

तुम्हाला एकूणएक वृत्तांत सांगितला जात आहे - स्थापना आणि विनाश होणार आहे. विनाश कसा होईल? तो तर जेव्हा होईल तेव्हा बघाल. दिव्य दृष्टीने तर विनाश बघितला आहे. पुढे जाऊन प्रत्यक्षात देखील बघाल. स्थापनेचा देखील साक्षात्कार दिव्य दृष्टीने केला आहे आणि प्रत्यक्षात देखील बघाल. बाकी जास्त ध्यानामध्ये जाणे देखील चांगले नाही. मग वैकुंठात जाऊन डान्स करू लागतात. ना ज्ञान, ना योग, दोन्हीपासून वंचित होतात. ध्यानामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. हा तर फक्त भोग लावला जातो. तुम्ही ब्राह्मण तिथे जाता. देवतांची आणि ब्राह्मणांची मैफिल भरते. इथे तुम्ही माहेरी बसला आहात; मग तुम्हाला विष्णुपुरीला जाण्यासाठी लायक बनवले जाते. मुलीचा जेव्हा साखरपुडा करतात तेव्हा तिला सांगितले जाते - सासरी कसे वागायचे, सर्वांशी प्रेमाने राहा, भांडण करू नको. हे देखील अगदी तसेच आहे. बाबा म्हणतात - तुम्हाला सर्वगुण संपन्न… इथेच बनायचे आहे. स्वर्गामध्ये हे भांडण-तंटे इत्यादी असतही नाहीत. आता तुम्ही विष्णुपुरी सासरी जाता. तिथे आहेत महान वैष्णव. त्यांच्यासारखे वैष्णव सृष्टीवर असत नाहीत. वैष्णव देवता विकारामध्ये थोडेच जातात. विकार एक हिंसा आहे. म्हटले जाते - ‘अहिंसा परमो देवी-देवता धर्म’. आता तुम्ही जाणता आम्ही माहेरी बसलो आहोत, आता आम्हाला विष्णुपुरीमध्ये जायचे आहे. तुम्ही जाणता की तिथे खूप सुख असते. विवाहापूर्वी मुलगी फाटके कपडे परिधान करते, ज्याला वनवास म्हणतात. तुमच्याकडे देखील आता काय आहे? काहीही नाही. हे तर दगड-धोंडे आहेत. इथे तुम्हाला काही दागिने इत्यादी घालण्याची गरज नाही. परंतु म्हणतात - गृहस्थीमध्ये राहायचे आहे, लग्न इत्यादी ठिकाणी जावे लागते; तर मग तुम्ही दागिने इत्यादी भले घाला, मनाई नाही. नाहीतर मग म्हणतील - ‘विधवा आहे, दागिने घालत नाही’, नाव बदनाम होईल. म्हणून बाबा म्हणतात - नाव बदनाम करायचे नाही. काहीही घाला, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भले कुठेही जा, हा मंत्र लक्षात ठेवा. ही परीक्षा घ्या की, आम्ही आठवणीमध्ये राहतो का? इथे आम्ही बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे जातो. त्यांच्याशी देखील तोड निभवायची आहे. परंतु ‘हथ कार डे दिल यार डे…’ तर समजतील हे पक्के आहेत. दागिने इत्यादी घालून लग्नाला भले जा, एकत्र रहा परंतु महावीर बनायचे आहे. संन्याशांना देखील दाखवतात ना - गुरुने वेश्येकडे पाठवले, सापाकडे पाठवले. जे बहादुरीने पास होऊन दाखवतात त्यांना महावीर म्हटले जाते. बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर मग कोणत्याही कर्मेंद्रियांकडून चंचलता होणार नाही. बाबांना विसरलात तर कर्मेंद्रिये चंचल होतील. तुम्ही विश्वाचे मालक बनता, ही काही लहान गोष्ट आहे का! संन्याशी या गोष्टींना अजिबात जाणत नाहीत. शास्त्रांमध्ये भले थोड्याफार गोष्टी आहेत तरी त्यांचे खंडन करण्यात आले आहे. भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो आहे. जोपर्यंत जिवंत आहात - ज्ञान-अमृत पीत राहाल, ऐकत राहाल. राजधानी स्थापन होईल. मुलांना वारंवार शिकवण दिली जाते की, एका बाबांची आठवण करा, दैवी लक्षण शिका. तुमच्याकडून कोणतेही विकर्म होऊ नये. ते तर असुरांचे काम आहे. तुम्ही आता देवता बनत आहात तर दैवी गुण धारण करायचे आहेत. सर्वात मोठा काम विकाराचा काटा आहे. सवय लागली आहे त्यामुळे वारंवार घसरून पडतात, माया थप्पड मारून आडवे करते. म्हणूनच गायले जाते - आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती… आता तुम्ही एका बाबांचे बनला आहात. म्हणता देखील - हे सर्व काही ईश्वराने दिलेले आहे. तर तुम्ही ट्रस्टी बनता. हे सर्व त्यांचे आहे, आम्हाला त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा देखील बघतात - मला सर्व काही अर्पण करून मग माझ्या श्रीमतावर कसे चालत आहेत. कोणी उलटा-सुलटा खर्च करून पाप-आत्म्यांना तर देत नाहीत ना. सुरुवातीला या ब्रह्माने देखील ट्रस्टी होऊन दाखवले ना. सर्व काही ईश्वराला अर्पण करून स्वतः ट्रस्टी बनला. बस्स, कोणालाही काहीही दिले नाही. ईश्वर अर्थ केले तर ईश्वराच्या कामासाठीच वापरायचे आहे. शरीर निर्वाह देखील करायचा होता ना. जे काही होते सर्व सेवेसाठी लावले. यांना पाहून मग इतरांनी देखील तसे केले. भट्टी बनली. भट्टी बनली नसती तर मुले सेवेसाठी इतकी हुशार कशी बनली असती. पाकिस्तानमध्ये शिकले आणि मग इथे येऊन शिकले. जेव्हा इतरांना हे ज्ञान समजावून सांगण्यालायक बनले तेव्हा सेवेसाठी बाहेर पडले. आता तर बघा किती प्रदर्शनी इत्यादी करत राहतात. मोठ्या-मोठ्या हस्तींना निमंत्रण देतात. या ज्ञान-यज्ञामध्ये अनेक प्रकारची विघ्ने देखील येतील. विघ्नांमुळे घाबरायचे नाही. अबलांवर किती अत्याचार होतात. बाबा म्हणतात - योगबलामध्ये राहून त्यांना समजावून सांगा. ईश्वर पित्याची मुले बनून देखील मग पित्याला विसरून जाता. मायेचे बनता. ही देखील जय-पराजयाची कुस्ती आहे, परंतु बॉक्सिंगसारखी आहे. माया ठोसा मारते तर तुम्ही हताश होता. बाबा म्हणतात - मायेकडून कधीही हार खायची नाही. पवित्र राहिलात तर विश्वाचे मालक बनाल. केवढी मोठी कमाई आहे! जर तुम्ही पूर्ण पुरुषार्थ केला नाही तर जाऊन दास-दासी बनाल. संपूर्ण राजधानी इथेच स्थापन होत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत ज्ञान-अमृत पीत राहायचे आहे. महावीर बनून मायेच्या बॉक्सिंगमध्ये विजयी बनायचे आहे. सर्वांशी तोड निभावत असताना, मन मात्र एका बाबांमध्ये गुंतवून ठेवायचे आहे.

२) विघ्नांना घाबरायचे नाही. सेवेमध्ये आपले सर्व काही सफल करायचे आहे. ईश्वराला अर्पण करून ट्रस्टी बनून राहायचे आहे. धन कोणत्याही चुकीच्या कामासाठी वापरायचे नाही.

वरदान:-
आपल्या संपूर्ण स्वरूपाच्या आवाहनाद्वारे अवागमनाच्या चक्रातून सुटणारे लकी सितारे भव

आता आपल्या संपूर्ण स्थितीचे आणि संपूर्ण स्वरूपाचे आवाहन करा म्हणजे मग तेच स्वरूप सदैव स्मृतीमध्ये राहील, आणि मग कधी श्रेष्ठ स्थिती, कधी कनिष्ठ स्थितीमध्ये येण्या-जाण्याचे चक्र जे चालू असते, वारंवार स्मृती आणि विस्मृतीच्या चक्रामध्ये येता, त्या चक्रातून मुक्त व्हाल. ते लोक जन्म-मरणाच्या चक्रातून सुटू इच्छितात आणि तुम्ही लोक व्यर्थ गोष्टींमधून सुटून तेजस्वी भाग्यवान तारे बनता.

बोधवाक्य:-
कोणत्याही विघ्नाच्या वश होणे अर्थात हिऱ्यावर डाग लागणे आहे.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

जसे तुमचे आदि स्वरूप पवित्र देवता आहे, तसा हा अंतिम जन्म देखील पवित्र ब्राह्मण जीवन आहे, या स्मृतीच्या आधारावर पवित्र जीवन अत्यंत सहज असल्याचा अनुभव करा. ‘पवित्र बना, योगी बना’ - हाच महामंत्र सर्व प्राप्तींची चावी आहे. जर पवित्रता नसेल, योगी जीवन नसेल तर अधिकारी असून देखील अधिकाराची अनुभूती करू शकणार नाही. हा महामंत्रच सर्व खजिन्यांच्या अनुभूतीची चावी आहे.