15-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला कर्म-अकर्म-विकर्माची गुह्य गती सांगण्याकरिता, जेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असते तेव्हा कर्म अकर्म होतात, पतित बनल्याने विकर्म होतात”

प्रश्न:-
आत्म्यावर कट (गंज) चढण्याचे कारण काय आहे? गंज चढलेला असेल तर त्याची निशाणी काय असेल?

उत्तर:-
गंज चढण्याचे कारण आहे - विकार. पतित बनल्यामुळेच गंज चढतो. अजूनही जर गंज चढलेला असेल तर त्यांना जुन्या दुनियेचे आकर्षण वाटत राहील. बुद्धी क्रिमिनलकडे (विकाराच्या दिशेने) जात राहील. आठवणीमध्ये राहू शकणार नाहीत.

ओम शांती।
मुले याचा अर्थ तर समजले आहेत. ‘ओम् शांती’ म्हटल्यानेच हा निश्चय होतो की आपण आत्मे इथले रहिवासी नाही. आपण तर शांतीधामचे रहिवासी आहोत. जेव्हा घरामध्ये राहतो तेव्हा आमचा स्वधर्म शांत आहे, नंतर मग इथे येऊन पार्ट बजावतो, कारण शरीराद्वारेच कर्म करावे लागते. कर्म असते - एक चांगले आणि दुसरे वाईट. वाईट कर्म होते रावण राज्यामध्ये. रावण राज्यामध्ये सर्वांची कर्म विकर्म बनली आहेत. असा एकही मनुष्य नसेल ज्याच्याकडून विकर्म होत नसेल. लोक तर समजतात की, साधू-संन्यासी इत्यादींकडून विकर्म होऊ शकत नाही कारण ते पवित्र राहतात. संन्यास केलेला आहे. वस्तविक पवित्र कोणाला म्हटले जाते, हे अजिबात जाणत नाहीत. म्हणतात देखील - आम्ही पतित आहोत. पतित-पावनला बोलावतात. जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत दुनिया पावन बनू शकत नाही. ही पतित जुनी दुनिया आहे, म्हणून पावन दुनियेची आठवण करतात. पावन दुनियेमध्ये जेव्हा जातील तेव्हा पतित दुनियेची आठवण करणार नाहीत. ती दुनियाच वेगळी आहे. प्रत्येक नवीन वस्तू नंतर जुनी होते ना. नवीन दुनियेमध्ये एकही पतित असू शकत नाही. नवीन दुनियेचे रचयिता आहेत परमपिता परमात्मा, तेच पतित-पावन आहेत, त्यांची रचना देखील जरूर पावन असली पाहिजे. पतित सो पावन, पावन सो पतित, या गोष्टी दुनियेमध्ये कोणाच्याही बुद्धीमध्ये येऊ शकत नाहीत. कल्प-कल्प बाबाच येऊन समजावून सांगतात. तुम्हा मुलांमध्ये देखील कितीतरी निश्चय-बुद्धी बनून पुन्हा मग संशय-बुद्धी बनतात. माया एकदम गिळून टाकते. तुम्ही महारथी आहात ना. महारथींनाच भाषण करण्यासाठी बोलावतात. महाराजांना देखील समजावून सांगायचे आहे. तुम्हीच पहिले पावन पूज्य होता, आता तर ही आहेच पतित दुनिया. पावन दुनियेमध्ये भारतवासीच होते. तुम्ही भारतवासी आदि सनातन देवी-देवता धर्माचे डबल मुकुटधारी, संपूर्ण निर्विकारी होता. महारथींनी तर अशा प्रकारे समजावून सांगावे लागेल ना. या नशेने समजावून सांगावे लागेल. भगवानुवाच - काम चितेवर बसून सावळे बनतात, मग ज्ञान चितेवर बसल्याने गोरे बनाल. आता जे कोणी समजावून सांगतात ते मग काम चितेवर बसू शकत नाहीत. परंतु असे देखील आहेत जे इतरांना सांगता-सांगता स्वत: काम चितेवर बसतात. आज हे ज्ञान सांगतात आणि उद्या विकारामध्ये पडतात. माया खूप बलवान आहे. काही विचारू नका. दुसऱ्यांना ज्ञान सांगणारे स्वतः काम चितेवर बसतात. मग पश्चाताप करतात - हे काय झाले? बॉक्सिंग आहे ना. पत्नीला पाहिले आणि आकर्षण झाले, तोंड काळे केले. माया अगदी अशक्यप्राय आहे. प्रतिज्ञा करतात आणि पुन्हा कोसळतात (अधोगती होते) तर किती १०० पटीने दंड होतो. तो तर जसा शूद्र समान पतित झाला. गायले देखील आहे - ‘अमृत पिऊन मग बाहेर जाऊन दुसऱ्यांना सतावत होते. घाण करत होते’. टाळी दोन हाताने वाजते. एकाच हाताने तर वाजू शकत नाही. दोघेही खराब (विकारी) होतात. मग कोणीतरी समाचार देतात, कोणी मग लाजेपोटी समाचारच देत नाहीत. समजतात कुठे ब्राह्मण कुळामध्ये नाव बदनाम होऊ नये. युद्धामध्ये कोणी हरतात तर हाहाकार होतो. अरे इतक्या मोठ्या पैलवानाला सुद्धा पाडले! असे खूप ॲक्सीडेंट होतात. माया चापट मारते, खूप मोठे ध्येय आहे ना.

आता तुम्ही मुले समजावून सांगता जे सतोप्रधान गोरे होते, तेच काम चितेवर बसल्याने काळे तमोप्रधान बनले आहेत. रामाला देखील काळे बनवतात. चित्रे देखील अनेकांची काळी बनवतात. परंतु मुख्य असणाऱ्याची गोष्ट सांगितली जाते . इथे देखील रामचंद्राचे काळे चित्र आहे, त्यांना विचारले पाहिजे - काळे का बनवले आहे? म्हणतील ही तर ईश्वराची भावी. हे तर चालत आले आहे. का होते, काय होते - हे काहीच जाणत नाहीत. आता तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत काम चितेवर बसल्याने पतित, दुःखी, वर्थ नॉट ए पेनी बनतात. ती आहे निर्विकारी दुनिया. ही आहे विकारी दुनिया. तर अशा प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. हे सूर्यवंशी, ते चंद्रवंशी नंतर वैश्य वंशी बनायचेच आहे. वाममार्गामध्ये आल्याने मग त्यांना देवता म्हटले जात नाही. जगत नाथाच्या मंदिरामध्ये वरती देवतांचे कुळ दाखवतात ड्रेस देवतांचा आहे, ॲक्टिविटी खूप घाणेरडी दाखवतात.

बाबा ज्या गोष्टींवर लक्ष वेधून घेतात त्यावर ध्यान दिले पाहिजे. मंदिरांमध्ये खूप सेवा होऊ शकते. श्रीनाथ द्वारे मध्ये देखील समजावून सांगू शकता. विचारले पाहिजे यांना काळे का बनवले आहे? हे समजावून सांगणे तर खूप चांगले आहे. ते आहे गोल्डन एज, हे आहे आयरन एज. गंज चढतो ना. आता तुमचा गंज उतरत आहे. जे आठवणच करत नाही तर गंज देखील उतरत नाही. खूप गंज चढलेला असेल तर मग त्याला जुन्या दुनियेचे आकर्षण वाटत राहील. सर्वात मोठी कट (गंज) चढतो विकारांमुळे. पतित देखील त्याच्यामुळेच बनले आहेत. स्वतःची तपासणी करायची आहे - माझी बुद्धी क्रिमिनलकडे (विकाराकडे) तर जात नाही ना. चांगली-चांगली फर्स्टक्लास मुले देखील फेल होतात. आता तुम्हा मुलांना ही समज मिळाली आहे. मुख्य गोष्ट आहेच मुळी पवित्रतेची. सुरुवातीपासून यावरच भांडणे चालत आली आहेत. बाबांनीच ही युक्ती रचली आहे - सर्वजण म्हणत होते की, आम्ही ज्ञान अमृत पिण्यासाठी जातो. ज्ञान अमृत आहेच मुळी ज्ञान-सागराकडे. धर्मशास्त्रे वाचून काही कोणी पतितापासून पावन बनू शकत नाही. पावन बनून मग पावन दुनियेमध्ये जायचे आहे. इथे पावन बनून मग कुठे जाणार? लोक समजतात अमक्याने मोक्ष मिळवला. त्यांना काय माहित, जर मोक्ष मिळाला तर मग त्याचे क्रियाकर्म इत्यादी देखील करू शकत नाही. इथे तर दिवा इत्यादी पेटवून ठेवतात जेणेकरून त्यांना काही त्रास होऊ नये, अंधारामध्ये ठोकरा खाऊ नये. आत्मा तर एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेते, एका सेकंदाची गोष्ट आहे. मग अंधार कुठून आला? हा रिवाज चालत येतो, तुम्ही देखील करत होता, आता काही तुम्ही करत नाही. तुम्ही जाणता शरीर तर माती झाले. तिथे असा रिती-रिवाज नसतो. आजकाल रिद्धी-सिद्धीच्या गोष्टींमध्ये काही राहिलेले नाहीये. समजा कोणाला पंख येतात, उडू लागतात - मग पुढे काय, त्याने फायदा काय होणार? बाबा तर म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हा योग अग्नी आहे, ज्याद्वारे पतितापासून पावन बनाल. नॉलेज द्वारे धन मिळते. योगाद्वारे एव्हर हेल्दी पवित्र, ज्ञानाद्वारे एव्हरवेल्दी धनवान बनता. योगीचे आयुष्य नेहमी जास्त असते. भोगीचे कमी. श्रीकृष्णाला योगेश्वर म्हणतात. ईश्वराच्या आठवणी द्वारेच कृष्ण बनला आहे, त्याला स्वर्गामध्ये योगेश्वर म्हणणार नाही. तो तर प्रिन्स आहे. मागच्या जन्मामध्ये असे कर्म केले आहे, ज्यामुळे कृष्ण बनला आहे. कर्म-अकर्म-विकर्माची गती देखील बाबांनी समजावून सांगितली आहे. अर्धा कल्प आहे राम राज्य, अर्धा कल्प आहे रावण राज्य. विकारामध्ये जाणे - हे आहे सर्वात मोठे पाप. सर्व भाऊ-बहीणी आहेत ना. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. भगवंताची संतान असून मग क्रिमिनल एसॉल्ट (विकारांचे आक्रमण) कसे करु शकता. आपण बी. के. विकारामध्ये जाऊ शकत नाही. या युक्तीद्वारेच पवित्र राहू शकतो. तुम्ही जाणता आता रावण राज्य नष्ट होणार आहे नंतर मग प्रत्येक आत्मा पवित्र बनते. त्याला म्हटले जाते - घरोघरी प्रकाश. तुमची ज्योत जागृत झालेली आहे. ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. सतयुगामध्ये सर्वजण पवित्र राहतात. हे देखील तुम्ही आता समजता. इतरांना समजावून सांगण्याची ताकद मुलांमध्ये नंबरवार असते. नंबरवार आठवणीमध्ये राहतात. राजधानी कशी स्थापन होते कोणाच्याही बुद्धीमध्ये हे नसेल. तुम्ही सेना आहात ना. जाणता आठवणीच्या बळा द्वारे पवित्र बनून आपण राजा-राणी बनत आहोत. मग दुसऱ्या जन्मामध्ये गोल्डन स्पून इन माऊथ असेल. मोठी परीक्षा पास करणारे पद देखील मोठे मिळवतात. फरक पडतो ना, जितके शिक्षण, तितके सुख. हे तर स्वयं भगवान शिकवत आहेत. हा नशा चढलेला राहिला पाहिजे. चोबचीनी (शक्ती देणारा पदार्थ) मिळतो. असे भगवान-भगवती एका भगवंताशिवाय अजून दुसरे कोण बनवणार. तुम्ही आता पतितापासून पावन बनत आहात मग जन्म-जन्मांतरासाठी सुखी बनाल. उच्च पद मिळवाल. शिकता-शिकता मग घाणेरडे (विकारी) बनतात. देह-अभिमानामध्ये आल्याने मग ज्ञानाचा तिसरा नेत्र बंद होतो. माया खूप शक्तिशाली आहे. बाबा स्वतः म्हणतात खूप मेहनत आहे. मी किती मेहनत करतो - ब्रह्माच्या तनामध्ये येऊन. परंतु समजत असून देखील म्हणतात - असे थोडेच होऊ शकते, शिवबाबा येऊन शिकवतात, आम्ही मानत नाही. ही चालाखी आहे, असे देखील बोलतात. राजाई तर स्थापन होईलच. म्हणतात ना सत्याची बोट हलते परंतु बुडत नाही. किती विघ्न पडतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या नुरे रत्न, श्याम पासून सुंदर बनणाऱ्या आत्म्यांप्रती मात-पिता बापदादांची अंतःकरणापासून, उत्कट प्रेमाने प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) योग अग्नीद्वारे विकारांच्या गंजाला उतरवायचे आहे. आपली तपासणी करायची आहे की आपली बुद्धी क्रिमिनलकडे (विकाराकडे) तर जात नाही ना?

२) निश्चय बुद्धी बनल्या नंतर मग कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये संशय घ्यायचा नाही. विकर्मांपासून वाचण्यासाठी कोणतेही कर्म आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होऊन बाबांच्या आठवणीमध्ये करायचे आहे.

वरदान:-
श्रेष्ठ पालनेच्या विधी द्वारे वृद्धी करणारे सर्वांच्या आशीर्वादांचे पात्र भव

संगमयुग आशीर्वादांद्वारेच वृद्धी प्राप्त करण्याचे युग आहे. बाबांच्या, परिवाराच्या आशीर्वादांद्वारेच तुम्ही मुले वाढत आहात. आशीर्वादांमुळेच नाचत, गात, वाढत, उडत जात आहोत. ही पालना देखील वंडरफुल आहे. तर तुम्ही मुलांनी देखील मोठ्या मनाने, दयेच्या भावनेने, दाता बनून प्रत्येक क्षणाला एकमेकांना ‘खूप चांगले, खूप चांगले’ असे म्हणून आशीर्वाद देत रहा - हीच पालनेची श्रेष्ठ विधी आहे. या विधी द्वारेच सर्वांची पालना करत रहा तर आशीर्वादांचे पात्र बनाल.

बोधवाक्य:-
आपला सरळ स्वभाव बनविणे - हीच समाधान स्वरूप बनण्याची सोपी विधी आहे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये - “पुरुषार्थ आणि प्रारब्धाचा बनलेला अनादी ड्रामा”

मातेश्वरी:- पुरुषार्थ आणि प्रारब्ध दोन गोष्टी आहेत, पुरुषार्थाने प्रारब्ध बनते. हे अनादि सृष्टीचे चक्र फिरत राहते, जे आदि सनातन भारतवासी पूज्य होते, तेच मग पुजारी बनले मग पुन्हा तेच पुजारी पुरुषार्थ करून पूज्य बनतील, हे उतरणे आणि चढणे इत्यादि ड्रामाचा खेळ बनलेला आहे.

जिज्ञासू:- मातेश्वरीजी, माझा देखील हा प्रश्न आहे की, जेव्हा हा ड्रामा असा बनलेला आहे तर मग जर वर चढणार (चढती कला होणार) तर आपोआपच चढणार मग पुरुषार्थ करून फायदाच काय झाला? जे चढणार ते तरीही कोसळणार (अधोगती होईल) मग इतका पुरुषार्थच कशाला करायचा? मातेश्वरी, तुमचे म्हणणे आहे की, हा ड्रामा हुबेहूब रिपीट होतो तर काय ऑलमाइटी परमात्मा नेहमी अशा खेळाला पाहून स्वतः थकत नाहीत काय? जशी चार ऋतूमध्ये थंडी, गर्मी इत्यादीमध्ये फरक असतो तर काय या खेळामध्ये फरक होणार नाही काय?

मातेश्वरी:- बस्स, हीच तर खुबी आहे या ड्रामाची, हुबेहूब रिपीट होतो आणि या ड्रामामध्ये अजूनही एक खुबी आहे ती म्हणजे - हा ड्रामा रिपीट होत असून देखील नित्य नवा वाटतो. आधी तर आम्हाला देखील हे ज्ञान नव्हते परंतु जेव्हा नॉलेज मिळाले आहे तर जे जे सेकंद बाय सेकंद चालते, भले हुबेहुब कल्पा पूर्वीप्रमाणेच चालते परंतु जेव्हा त्याला साक्षी होऊन पाहतो तर नेहमी नवीन समजतात. आता सुख-दुःख दोघांचीही ओळख मिळाली आहे त्यामुळे असे समजू नका जर नापास होणारच आहोत तर मग शिकायचेच कशाला? नाही, मग तर असे देखील समजावे जर भोजन मिळायचे असेल तर आपोआपच मिळेल, मग इतकी मेहनत घेऊन कमवताच कशासाठी? तसे आम्ही देखील बघत आहोत आता चढत्या कलेची वेळ आली आहे, तेच देवता घराणे स्थापन होत आहे तर का नाही आताच ते सुख घ्यावे. जसे पहा आता कोणी न्यायाधीश बनू इच्छितो तर जेव्हा पुरुषार्थ करेल तेव्हाच त्या डिग्रीला प्राप्त करेल ना. जर त्यामध्ये फेल झाला तर मेहनतच व्यर्थ जाते, परंतु या अविनाशी ज्ञानामध्ये असे होत नाही, या अविनाशी ज्ञानाचा जरा देखील विनाश होत नाही. फारफार तर इतका पुरुषार्थ न केल्याने दैवी रॉयल घराण्यामध्ये जरी नाही आलात परंतु तरीही जर कमी पुरुषार्थ केलात तरी देखील त्या सतयुगी दैवी प्रजेमध्ये येऊ शकता. परंतु पुरुषार्थ करणे आवश्यक आहे कारण पुरुषार्था द्वारेच प्रारब्ध बनेल, बलिहारी पुरुषार्थाचीच गायली गेली आहे.

“हे ईश्वरीय नॉलेज सर्व मनुष्य आत्म्यांकरिता आहे”

सर्वप्रथम तर आपल्याला एक मुख्य पॉईंट अवश्य लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा की या मनुष्य सृष्टी झाडाचे बीज रूप परमात्मा आहेत तर त्या परमात्म्या द्वारे जे नॉलेज प्राप्त होत आहे ते सर्व मनुष्यांसाठी जरुरी आहे. सर्व धर्मातील लोकांना हे नॉलेज घेण्याचा अधिकार आहे. भले प्रत्येक धर्माचे नॉलेज आपापले आहे, प्रत्येकाचे धर्मशास्त्र आपापले आहे, प्रत्येकाचे मत आपापले आहे, प्रत्येकाचा संस्कार आपापला आहे परंतु हे नॉलेज सर्वांकरिता आहे. भले ते हे ज्ञान घेऊ जरी शकत नसले, आपल्या घराण्यामध्ये येऊ जरी शकत नसले, परंतु सर्वांचे पिता असल्या कारणाने त्यांच्याशी योग लावल्याने तरीही पवित्र अवश्य बनतील. या पवित्रतेच्या कारणामुळे आपल्याच सेक्शनमध्ये पद अवश्य प्राप्त करतील कारण योगाला तर सर्व मनुष्य मानतात, पुष्कळ लोक असे म्हणतात की, आम्हाला देखील मुक्ती पाहिजे; परंतु सजे पासून मुक्त होण्याची शक्ती देखील या योगाद्वारे मिळू शकते. ओम् शांती.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

तुम्हा मुलांकडे पवित्रतेची जी महान शक्ती आहे, ही श्रेष्ठ शक्तीच अग्नीचे काम करते जी सेकंदामध्ये विश्वातील कचऱ्याला भस्म करू शकते. जेव्हा आत्मा पवित्रतेच्या संपूर्ण स्थितीमध्ये स्थित होते तेव्हा त्या स्थितीच्या श्रेष्ठ संकल्पाद्वारे लगनची अग्नी (निष्ठेची अग्नी) प्रज्वलित होते आणि कचरा भस्म होतो, वास्तविक हीच योग-ज्वाला आहे. आता तुम्ही मुले आपल्या या श्रेष्ठ शक्तीला कार्यामध्ये लावा.