15-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो तुम्ही आता रूहानी बाबांकडून रुहानी ड्रिल शिकत आहात, याच ड्रिल द्वारे
तुम्ही मुक्तिधाम, शांतीधाम मध्ये निघून जाल”
प्रश्न:-
बाबा
मुलांकडून पुरुषार्थ करून घेत राहतात परंतु मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये खूप
स्ट्रिक्ट राहिले पाहिजे?
उत्तर:-
जुन्या दुनियेला आग लागण्यापूर्वी तयार होऊन, स्वतःला आत्मा समजून बाबांच्या
आठवणीमध्ये राहून बाबांकडून संपूर्ण वारसा घेण्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट रहायचे
आहे. नापास व्हायचे नाही. जसे ते स्टुडंट्स नापास होतात तेव्हा त्यांना पश्चाताप
होतो, जाणीव होते की, आपले एक वर्ष फुकटचे वाया गेले. काहीजण तर म्हणतात - नाही
शिकले तर काय झाले! परंतु तुम्हाला खूप स्ट्रिक्ट रहायचे आहे. शिक्षकाला असे म्हणावे
लागू नये की, टू लेट (उशीर झाला).
ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना रुहानी पाठशाळेमध्ये डायरेक्शन देत आहेत किंवा असे म्हणा
की, मुलांना ड्रिल शिकवत आहेत. जसे टीचर्स डायरेक्शन देतात किंवा ड्रिल शिकवतात ना.
हे रुहानी बाबा देखील मुलांना डायरेक्ट सांगत आहेत. काय सांगत आहेत? मनमनाभव. जसे
ते म्हणतात - अटेंशन प्लीज. बाबा म्हणतात - मनमनाभव. ही जशी प्रत्येकजण आपल्यावर
कृपा करतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मामेकम (मज एकाची) आठवण करा, अशरीरी बना’. हे
रूहानी आत्म्यांना रुहानी बाबाच शिकवतात. ते आहेत सुप्रीम टीचर. तुम्ही आहात नायब
टीचर (सहाय्यक शिक्षक). तुम्ही देखील सर्वांना म्हणता - ‘स्वतःला आत्मा समजा,
बाबांची आठवण करा, देही-अभिमानी भव’. ‘मनमनाभव’चा अर्थ देखील हाच आहे. मुलांच्या
कल्याणाकरिता डायरेक्शन देतात. स्वतः कोणाकडून शिकलेले नाहीत. बाकीचे तर सर्व
टीचर्स आधी स्वतः शिकून नंतर मग इतरांना शिकवतात. हे तर (शिवबाबा) काही कुठे स्कूल
इत्यादीमध्ये शिकून शिकवत नाही आहेत. हे फक्त शिकवतात. म्हणतात - मी तुम्हा
आत्म्यांना रुहानी ड्रिल शिकवतो. ते सर्व (दुनियावाले) देहधारी मुलांना शारीरिक
ड्रिल शिकवतात. त्यांना ड्रिल इत्यादी देखील शरीराद्वारेच करायचे असते. यामध्ये काही
शरीराची गोष्टच नाही. बाबा म्हणतात - माझे काही शरीर नाही आहे. मी तर ड्रिल शिकवतो,
डायरेक्शन देतो. त्यांच्यामध्ये ड्रिल शिकवण्याचा ड्रामा प्लॅन अनुसार पार्ट भरलेला
आहे, सेवा भरलेली आहे. येतातच ड्रिल शिकविण्याकरिता. तुम्हाला तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनायचे आहे. हे तर खूप सोपे आहे. बुद्धीमध्ये शिडी आहे की, कसे ८४ चे
चक्र फिरून खाली उतरलो आहोत. आता बाबा म्हणतात - तुम्हाला परत जायचे आहे. असे इतर
कोणीही आपल्या फॉलोअर्सना अथवा स्टुडंट्सना सांगणार नाहीत की, ‘माझ्या रुहानी
बाळांनो, आता परत जायचे आहे’. रुहानी बाबांशिवाय इतर कोणीही हे सांगू शकणार नाही.
मुले समजतात आता आपल्याला परत जायचे आहे. ही दुनियाच आता तमोप्रधान आहे. आपण
सतोप्रधान दुनियेचे मालक होतो आणि मग ८४ चे चक्र फिरून तमोप्रधान दुनियेचे मालक बनलो
आहोत. इथे दुःखच दुःख आहे. बाबांना म्हणतात - दु:ख-हर्ता, सुख-कर्ता अर्थात
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविणारे एक बाबाच आहेत. तुम्ही मुले समजता आपण खूप सुख
पाहिले आहे. कसे राज्य केले, ते आठवत नाही आहे परंतु एम ऑब्जेक्ट समोर आहे. तो आहेच
फुलांचा बगीचा. आता आपण काट्यापासून फूल बनत आहोत.
तुम्ही असे म्हणणार
नाही की कसा विश्वास ठेवावा. जर संशय असेल तर विनशन्ती. शाळेतून पाय बाहेर ठेवलात
तर शिक्षण बंद होईल, पद देखील विनशन्ती होईल. खूप नुकसान होईल, प्रजेमध्ये देखील कमी
पद मिळेल. मुख्य गोष्टच ही आहे की, सतोप्रधान पूज्य देवी-देवता बनायचे आहे. आता तर
देवता नाही आहात ना. तुम्हा ब्राह्मणांना समजले आहे. ब्राह्मणच येऊन बाबांकडून हे
ड्रिल शिकतात. आतून आनंद देखील होतो. हा अभ्यास आवडतो ना. भगवानुवाच आहे, भले
त्यांनी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे परंतु तुम्ही समजता श्रीकृष्णाने काही हे ड्रिल
शिकवलेले नाही आहे, हे तर बाबा शिकवतात. श्रीकृष्णाची आत्मा जी विविध नावे-रूपे
धारण करत तमोप्रधान बनली आहे, तिला देखील बाबाच शिकवतात. बाबा स्वतः शिकत नाहीत,
बाकीचे सर्व कोणा ना कोणाकडून शिकतात जरूर. हे आहेतच शिकविणारे रूहानी बाबा.
तुम्हाला शिकवतात, तुम्ही मग इतरांना शिकवता. तुम्ही ८४ जन्म घेऊन पतित बनला आहात,
आता पुन्हा पावन बनायचे आहे. त्यासाठी रुहानी बाबांची आठवण करा. भक्तीमार्गामध्ये
तुम्ही गात आला आहात - ‘हे पतित-पावन…’ आता देखील तुम्ही कुठेही जाऊन पहा. तुम्ही
राजऋषी आहात ना. कुठेही हिंडू-फिरू शकता. तुम्हाला कोणतेही बंधन नाहीये. तुम्हा
मुलांना हा निश्चय आहे - बेहदचे बाबा सेवेकरिता आलेले आहेत. बाबा मुलांकडून
शिकवण्याचा पगार कसा घेतील. टीचरचीच मुले असतील तर मोफत शिकवतील ना. हे देखील मोफत
शिकवतात. असे समजू नका की आपण काही देतो. ही काही फी नाही आहे. तुम्ही देत काहीच
नाही, इथे तर रिटर्नमध्ये खूप घेता. लोक दान-पुण्य करतात तर समजतात रिटर्नमध्ये
आपल्याला दुसऱ्या जन्मामध्ये मिळेल. ते तर अल्पकाळाचे क्षणभंगुर सुख मिळते. भले
मिळते दुसऱ्या जन्मामध्ये परंतु ते खाली नेणाऱ्या जन्मामध्ये मिळते. शिडी उतरतच येता
ना. आता तुम्ही जे करता ते आहे चढत्या कलेमध्ये जाण्यासाठी. कर्माचे फळ म्हणतात ना.
आत्म्याला कर्माचे फळ मिळते. या लक्ष्मी-नारायणाला देखील कर्मांचेच फळ मिळाले आहे
ना. बेहदच्या बाबांकडून बेहदचे फळ मिळते. ते (भक्तीमध्ये) मिळते इनडायरेक्ट.
ड्रामामध्ये नोंदलेले आहे. हा देखील पूर्व नियोजित ड्रामा आहे. तुम्ही जाणता आपण
कल्पानंतर येऊन बाबांकडून बेहदचा वारसा घेणार. बाबा आमच्यासाठी येऊन स्कूल बनवतात.
त्या गव्हर्मेंटच्या तर आहेत देहधारींसाठी शाळा. जिथे विविध प्रकारे अर्धेकल्प शिकत
आले आहेत. आता बाबा २१ जन्मांकरिता सर्व दुःख दूर करण्यासाठी शिकवत आहेत. तिथे तर
आहे राजाई. त्यामध्ये नंबरवार तर येतातच. जसे इथे देखील राजा-राणी, वजीर, प्रजा
इत्यादी सर्व नंबरवार आहेत. हे आहेत जुन्या दुनियेमध्ये, नवीन दुनियेमध्ये तर फार
थोडे असतील. तिथे खूप सुख असेल, तुम्ही विश्वाचे मालक बनता. राजा-महाराजा होऊन गेले
आहेत. ते किती आनंद साजरा करतात. परंतु बाबा म्हणतात - त्यांना तर मग खाली घसरायचेच
आहे. घसरतात (पतित होतात) तर सगळेच ना. देवतांची देखील हळूहळू उतरती कला होते. परंतु
तिथे रावण राज्यच नाही आहे त्यामुळे सुखच सुख आहे. इथे आहे रावण राज्य. तुम्ही जसे
चढता तसे उतरता देखील. आत्मे देखील रूप धारण करता-करता खाली उतरत आले आहेत. ड्रामा
प्लॅन अनुसार कल्पापूर्वी प्रमाणे घसरून तमोप्रधान बनले आहेत. काम-चितेवर चढल्यानेच
दुःख सुरू होते. आता आहे अति दुःख. तिथे मग अति सुख असेल. तुम्ही राजऋषी आहात.
त्यांचा आहेच हठयोग. तुम्ही कोणालाही विचारा - रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला
जाणता का? तर, नाही म्हणून सांगतील. विचारतील तेच जे जाणतात. स्वतःच जाणत नाहीत तर
विचारतील तरी कसे. तुम्ही जाणता ऋषी-मुनी इत्यादी कोणीही त्रिकालदर्शी नव्हते. बाबा
आम्हाला त्रिकालदर्शी बनवत आहेत. हे बाबा (ब्रह्मा बाबा) जे विश्वाचे मालक होते,
त्यांनाच ज्ञान नव्हते. या जन्मामध्ये देखील ६० वर्षांपर्यंत ज्ञान नव्हते. जेव्हा
बाबा आले आहेत तेव्हा देखील हळूहळू हे सर्व ऐकवत जात आहेत. भले निश्चय-बुद्धी बनतात
तरी देखील माया अनेकांना खाली कोसळवत राहते. नावे सांगू शकत नाही, नाहीतर निराश
होतील. समाचार तर येतात ना. वाईट संगत लागली, नवीन लग्न झालेल्याची संगत लागली आणि
चलबिचल झाला. मग म्हणतात - मी लग्न केल्याशिवाय राहू शकत नाही. ठीक आहे, दररोज
येणारा महारथी, इथून (मधुबनमध्ये) देखील कित्येकदा येऊन गेला आहे, त्याला देखील
मायारूपी मगरीने येऊन पकडले आहे. अशा बऱ्याच केसेस होत राहतात. अजून लग्न केलेले
नाहीये, तर माया तोंडात टाकून गिळंकृत करत आहे. स्त्री रुपी माया आकर्षित करत राहते.
मगरीच्या तोंडामध्ये येऊन पडले आहेत, आणि मग हळूहळू गिळून टाकेल. कोणी चुका करतात
किंवा बघितल्याने चंचल होतात. समजतात आपण वरून एकदम खाली खड्ड्यामध्ये कोसळणार. मग
सर्व म्हणतील - खूप चांगला मुलगा होता, आता बिचारा गेला, साखरपुडा झाला आणि हा मेला.
बाबा तर मुलांना नेहमी लिहीत असतात - दीर्घायुष्य लाभो. कुठे मायेचा वार जोराने लागू
नये. शास्त्रांमध्ये देखील अशा काही गोष्टी आहेत ना. आताच्या या गोष्टी नंतर गायल्या
जातील. तर तुम्ही पुरुषार्थ करत रहा. असे होऊ नये की मायारूपी मगर गिळंकृत करून
टाकेल. विविध प्रकारे माया पकडते. मुख्य महाशत्रू आहे काम विकार, याच्यापासून
स्वतःला खूप सांभाळायचे आहे. पतित दुनिया मग पावन दुनिया कशी बनत आहे, ते तुम्ही
बघत आहात. गोंधळून जाण्याचा प्रश्नच नाही. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
केल्याने सर्व दुःख दूर होतात. बाबाच पतित-पावन आहेत. हे आहे योगबल. भारताचा
प्राचीन राजयोग खूप प्रसिद्ध आहे. समजतात क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी
पॅराडाईज होता. तर जरूर इतर कोणताही धर्म नसावा. किती सोपी गोष्ट आहे. परंतु समजत
नाहीत. आता तुम्ही समजता ते राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी बाबा आलेले आहेत. ५
हजार वर्षांपूर्वी देखील बाबा आले होते. जरूर हेच ज्ञान दिले असेल, जसे आता देत
आहेत. बाबा स्वतः म्हणतात मी कल्प-कल्प संगमावर साधारण तनामध्ये येऊन राजयोग शिकवतो.
तुम्ही राजऋषी आहात; अगोदर नव्हता. बाबा आलेले आहेत तेव्हापासून बाबांजवळ राहत आहात.
शिकता देखील, सेवा देखील करता - स्थूल सेवा आणि सूक्ष्म सेवा. भक्ती मार्गामध्ये
देखील सेवा करतात आणि मग घरदार देखील सांभाळतात. बाबा म्हणतात - आता भक्ती पूर्ण
झाली, ज्ञान सुरू होत आहे. मी येतो, ज्ञानाद्वारे सद्गती देण्यासाठी. तुमच्या
बुद्धीमध्ये आहे आपल्याला बाबा पावन बनवत आहेत. बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार
तुम्हाला रस्ता सांगण्यासाठी आलो आहे. टीचर शिकवत आहेत, एम ऑब्जेक्ट समोर आहे. हे
आहे उच्च ते उच्च शिक्षण. जसे कल्पापूर्वी देखील समजावून सांगितले होते, तेच
समजावून सांगत राहतात. ड्रामाची टिक-टिक चालत राहते. सेकंद बाय सेकंद जे होऊन गेले
आहे ते पुन्हा ५ हजार वर्षानंतर रिपीट होईल. दिवस निघून जातात. हा विचार इतर
कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग होऊन गेले आहे ते
पुन्हा रिपीट होईल. होऊन देखील तेच गेले आहे जे कल्पापूर्वी झाले होते. बाकी थोडे
दिवस आहेत. ते लोक लाखो वर्षे म्हणतात, त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही देखील म्हणाल -
बाकी काही तास राहिले आहेत. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जेव्हा आग लागेल
तेव्हा जागे होतील. मग तर टू-लेट होतात. तर बाबा पुरुषार्थ करवून घेत राहतात.
तयारीत बसा. टीचरला असे सांगावे लागू नये की टू-लेट; नापास होणारे खूप पश्चाताप
करतात. समजतात आपले वर्ष फुकटचे वाया जाईल. काहीजण तर म्हणतात ना की, नाही शिकलो तर
काय झाले! तुम्हा मुलांना स्ट्रिक्ट राहिले पाहिजे. आम्ही तर बाबांकडून पूर्ण वारसा
घेणार, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये काहीही त्रास होत
असेल तर बाबांना विचारू शकता. हीच मुख्य गोष्ट आहे - बाबांनी आज पासून ५ हजार
वर्षांपूर्वी देखील म्हटले होते - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. पतित-पावन मी आहे,
सर्वांचा पिता मी आहे. श्रीकृष्ण काही सर्वांचा पिता नाही आहे. तुम्ही शिवाच्या
पुजाऱ्यांना, श्रीकृष्णाच्या पुजाऱ्यांना हे ज्ञान ऐकवू शकता. आत्माच जर पूज्य बनली
नसेल तर तुम्ही कितीही डोकेफोड करा, समजणार नाहीत. आता नास्तिक बनतात. कदाचित पुढे
जाऊन आस्तिक बनतील. समजा, लग्न करून घसरला तर नंतर पुन्हा येऊन ज्ञान घेईल. परंतु
वारसा खूप कमी होईल, कारण बुद्धीमध्ये दुसऱ्याची आठवण येऊन बसली, ती काढून टाकणे
खूप अवघड होते. अगोदर पत्नीची आठवण नंतर मुलाची आठवण येईल. मुलापेक्षाही पत्नी
जास्ती आकर्षित करेल कारण बऱ्याच काळाची आठवण आहे ना. मुलगा तर नंतर होतो, मग
मित्र-नातलग, सासरची आठवण येते. पहिली पत्नी जिने खूप काळ साथ दिली आहे, हे देखील
असेच आहे. तुम्ही म्हणाल - आम्ही देवतांसोबत खूप काळ होतो. असे तर म्हणाल की,
शिवबाबांवर खूप काळापासून प्रेम आहे. ज्यांनी ५ हजार वर्षांपूर्वी देखील आम्हाला
पावन बनवले. कल्प-कल्प येऊन आमचे रक्षण करतात; तेव्हाच तर त्यांना दु:ख-हर्ता,
सुख-कर्ता म्हणतात. तुम्हाला अतिशय क्लिअर लाईन असणारे बनायचे आहे. बाबा म्हणतात -
या डोळ्यांनी जे तुम्ही बघता ते तर कब्रदाखल होणार आहे. आता तुम्ही आहात संगमावर.
अमर लोक येणार आहे. आता आपण पुरुषोत्तम बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. हे आहे
कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग. दुनियेमध्ये बघत आहात काय-काय होत आहे. आता बाबा
आलेले आहेत, तर जुनी दुनिया देखील नष्ट होणार आहे. पुढे चालून अनेकांच्या लक्षात
येईल, जरूर कोणी आलेला आहे जो दुनियेला परिवर्तित करत आहे. ही तीच महाभारत लढाई आहे.
तुम्ही देखील किती हुशार बनला आहात. या खूप मंथन करण्याच्या गोष्टी आहेत. आपला
श्वास व्यर्थ घालवायचा नाही. तुम्ही जाणता श्वास सफल होतात ज्ञानाद्वारे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मायेपासून
वाचण्याकरिता संग-दोषापासून स्वतःला खूप-खूप सांभाळायचे आहे. आपली लाईन क्लिअर
ठेवायची आहे. श्वास व्यर्थ घालवायचे नाहीत. श्वास ज्ञानाद्वारे सफल करायचे आहेत.
२) जितका वेळ मिळेल
तितका योगबल जमा करण्यासाठी रुहानी ड्रिलचा अभ्यास करायचा आहे. आता कोणतीही नवीन
बंधने बनवायची नाहीत.
वरदान:-
बाबांच्या
छत्रछायेच्या अनुभवाद्वारे विघ्न-विनाशकाची डिग्री घेणारे अनुभवी मुर्त भव
जिथे बाबांची सोबत आहे
तिथे कोणीही काहीही करू शकत नाही. हा सोबत असल्याचा अनुभवच छत्रछाया बनतो. बापदादा
मुलांची सदैव रक्षा करतातच. पेपर येतात तुम्हा लोकांना अनुभवी बनविण्याकरिता
त्यामुळे नेहमी असे समजले पाहिजे की, हा पेपर पुढच्या वर्गात नेण्यासाठी येत आहे.
याद्वारेच कायमसाठी विघ्नविनाशकाची डिग्री आणि अनुभवी मुर्त बनण्याचे वरदान मिळेल.
जर आता कोणी थोडासा आरडाओरडा करतात किंवा विघ्न टाकतात तरीही हळूहळू शांत होतील.
बोधवाक्य:-
जे वेळेवर
सहयोगी बनतात त्यांना एकाचे पदम पटीने फळ मिळते.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
जसे बघणे, ऐकणे आणि
ऐकविणे - हे विशेष कर्म सहजच अभ्यासामध्ये आले आहे, तसेच कर्मातीत बनण्याची स्टेज
अर्थात कर्माला समेटण्याच्या शक्तीद्वारे अकर्मी अर्थात कर्मातीत बना. एक आहे
कर्माच्या-अधीन असल्याची स्टेज, दुसरी आहे कर्मातीत अर्थात कर्म-अधिकारीची स्टेज.
तर चेक करा - मज कर्मेंद्रिय-जीत, स्वराज्यधारी राजाचा राज्यकारभार ठीक चालला आहे
ना?