16-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - प्राणेश्वर बाबा आले आहेत तुम्हा मुलांना प्राणदान देण्यासाठी, प्राणदान
मिळणे अर्थात तमोप्रधानापासून सतोप्रधान बनणे”
प्रश्न:-
ड्रामाच्या
प्रत्येक रहस्याला जाणल्यामुळे कोणता सीन तुमच्यासाठी नवीन नाही आहे?
उत्तर:-
या वेळी संपूर्ण जगामध्ये ज्या दंगली चालू आहेत, ते विनाशकाले विपरीत बुद्धी बनून
आपल्याच कुळाचा खून करण्यासाठी अनेक साधने तयार करत आहेत. ही काही नवीन गोष्ट नाहीये
कारण तुम्ही जाणता की, ही दुनिया तर बदलणारच आहे. महाभारत लढाई नंतरच आपली नवीन
दुनिया येईल.
गीत:-
यह कौन आया आज…
ओम शांती।
सकाळी-सकाळी हे कोण येऊन मुरली वाजवतात? दुनिया तर अगदीच घोर अंधारामध्ये आहे.
तुम्ही आता मुरली ऐकत आहात ज्ञान-सागर, पतित-पावन प्राणेश्वर बाबांकडून. ते प्राण
वाचविणारे ईश्वर आहेत. म्हणतात ना - हे ईश्वरा, या दुःखातून वाचवा. ते हदची मदत
मागतात. आता तुम्हा मुलांना बेहदची मदत मिळत आहे, कारण बेहदचे बाबा आहेत ना. तुम्ही
जाणता - आत्मा देखील गुप्त आहे. मुलांचे शरीर प्रत्यक्ष आहे. तर बाबांचे श्रीमत आहे
मुलांप्रती. सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता प्रसिद्ध आहे. फक्त त्यामध्ये श्रीकृष्णाचे
नाव घातले आहे. आता तुम्ही जाणता - ‘श्रीमत भगवानुवाच’ आहे. हे देखील समजले आहे की
भ्रष्टाचारीला श्रेष्ठाचारी बनवणारे एक बाबाच आहेत. तेच नरापासून नारायण बनवतात. कथा
देखील आहे सत्य-नारायणाची. गायले जाते - अमरकथा. अमरपुरीचा मालक बनविण्याची अथवा
नरापासून नारायण बनविण्याची - गोष्ट एकच आहे. हा आहे मृत्युलोक. भारतच अमरपुरी होता.
हे कुणालाच ठाऊक नाही आहे. इथेच अमर बाबांनी पार्वतींना ऐकवले आहे. एकच पार्वती
किंवा एकच द्रौपदी नव्हती. हे तर खूप मुले ऐकत आहेत. शिवबाबा ब्रह्मा द्वारे ऐकवतात.
बाबा म्हणतात - मी ब्रह्माद्वारे गोड-गोड मुलांना समजावून सांगतो.
बाबांनी मुलांना समजावून सांगितले आहे की, आत्म-अभिमानी जरूर बनायचे आहे. बाबाच बनवू
शकतात. दुनियेमध्ये एकही मनुष्य मात्र असा नाही की ज्याला आत्म्याचे ज्ञान असेल.
जेव्हा आत्म्याचेच ज्ञान नाहीये, तर परमात्म्याचे ज्ञान तरी कसे असू शकते. म्हणतात
- आम्ही आत्मा सो परमात्मा आहोत. किती मोठ्या चुकी मध्ये सारी दुनिया अडकलेली आहे.
एकदम पत्थर-बुद्धी आहेत. परदेशी देखील काही कमी पत्थर-बुद्धीवाले नाहीत, त्यांच्या
बुद्धीमध्ये हेच येत नाही की आपण जे बॉम्ब इत्यादी बनवत आहोत, ते तर आपला देखील खून
आणि साऱ्या दुनियेचा सुद्धा खून करण्यासाठी बनवत आहोत. तर या वेळी बुद्धी काहीच
कामाची राहिलेली नाही. आपल्याच विनाशासाठी सगळी तयारी करत आहेत. तुम्हा मुलांसाठी
ही काही नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही जाणता - ड्रामानुसार त्यांचा देखील पार्ट आहे.
ड्रामाच्या बंधनामध्ये बांधले गेले आहेत. पत्थर-बुद्धी नसते तर अशी कामे करू शकले
असते का? साऱ्या कुळाचा विनाश करत आहेत. आश्चर्य आहे ना - काय करत आहेत!
बसल्या-बसल्या आज ठीक चालले आहेत, उद्या मिलिटरीवाले चिडले तर प्रेसिडेंटला सुद्धा
मारून टाकतात. अशा प्रकारचे योगायोग सतत घडत असतात. कोणालाच सहन करत नाहीत.
शक्तिशाली आहेत ना. आजकालच्या दुनियेमध्ये खूप अराजकता आहे, पत्थर-बुद्धी लोक देखील
प्रचंड प्रमाणात आहेत. आता तुम्ही मुले जाणता की विनाशकाळी जे बाबांपासून
विपरीत-बुद्धी आहेत, त्यांच्यासाठी ‘विनशन्ती’ गायले गेले आहे. आता या दुनियेला
बदलायचे आहे. हे देखील जाणता की खरोखर महाभारत लढाई लागली आहे. बाबांनी राजयोग
शिकवला होता. शास्त्रांमध्ये तर संपूर्ण विनाश दाखवला आहे. परंतु संपूर्ण विनाश काही
होत नाही; मग तर प्रलय होईल. कोणीच मनुष्य राहणार नाही, फक्त ५ तत्वेच राहतील. असे
तर होऊ शकत नाही. प्रलय झाला तर मग मनुष्य कुठून येईल? दाखवतात की, श्रीकृष्ण अंगठा
चोखत पिंपळाच्या पानावर सागरामध्ये आला. लहान बाळ असे कसे येऊ शकते? शास्त्रांमध्ये
अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत की काही विचारूच नका! आता तुम्हा कुमारींद्वारे या
विद्वानांना, भीष्म पितामह इत्यादींना ज्ञानाचे बाण लागतात. ते देखील पुढे चालून
येतील. जितका-जितका तुम्ही सेवेवर जोर द्याल, सर्वांना बाबांचा परिचय देत रहाल तितका
तुमचा प्रभाव वाढेल. हो, विघ्ने देखील येतील. हे देखील गायले गेले आहे की या ज्ञान
यज्ञामध्ये आसुरी संप्रदायाची खूप विघ्ने पडतात. बिचारे पत्थर-बुद्धी मनुष्य काहीच
जाणत नाहीत की हे काय आहे? म्हणतात की, यांचे तर ज्ञानच काही वेगळे आहे. हे देखील
तुम्हीच समजता की नवीन दुनियेसाठी नवीन गोष्टी आहेत.
बाबा म्हणतात - हा राजयोग तुम्हाला दुसरे कोणीही शिकवू शकणार नाहीत. ज्ञान आणि योग
बाबाच शिकवत आहेत. सद्गती दाता एक बाबाच आहेत, तेच पतित-पावन आहेत तर जरूर
पतितांनाच ज्ञान देतील ना. तुम्ही मुले समजता - आपण पारस-बुद्धी बनून पारसनाथ बनतो.
लोकांनी किती असंख्य मंदिरे बांधली आहेत. परंतु ते कोण आहेत, काय करून गेले आहेत,
याचा काहीच अर्थ समजत नाहीत. पारसनाथाचे देखील मंदिर आहे, परंतु कोणालाच ठाऊक नाहीये.
भारत पारसपुरी होता, सोन्याचे, हिरे-माणकांचे महाल होते. कालचीच तर गोष्ट आहे. ते
लोक तर फक्त एका सतयुगालाच लाखो वर्षांचे आहे असे म्हणतात. आणि बाबा म्हणतात -
पूर्ण ड्रामाच ५ हजार वर्षांचा आहे; म्हणूनच म्हटले जाते - आजचा भारत काय आहे! कालचा
भारत काय होता! लाखो वर्षांचे तर कोणाला आठवू देखील शकणार नाही. आता तुम्हा मुलांना
स्मृती मिळाली आहे. तुम्ही जाणता बाबा दर ५ हजार वर्षानंतर येऊन आपल्याला आठवण करून
देतात. तुम्ही मुले स्वर्गाचे मालक होता. ही ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. कोणालाही
विचारले की, या लक्ष्मी-नारायणाचे राज्य कधी होते? किती वर्षे झाली? तर ते लाखो
वर्षे म्हणतील. तुम्ही समजावून सांगू शकता की, ही तर ५ हजार वर्षांची गोष्ट आहे.
म्हणतात देखील की, क्राइस्टच्या अगोदर इतका काळ पॅराडाईज (स्वर्ग) होता. बाबा
येतातच मुळी भारतामध्ये. मुलांना हे देखील समजावून सांगितले आहे - बाबांची जयंती
साजरी करतात, तर जरूर काही करण्यासाठी आले असतील. पतित-पावन आहेत तर जरूर येऊन पावन
बनवत असतील. ज्ञान-सागर आहेत तर जरूर ज्ञान देतील ना. योगामध्ये बसा, स्वतःला आत्मा
समजा आणि बाबांची आठवण करा - हे ज्ञान झाले ना. ते तर आहेत हठयोगी. पद्मासन घालून
बसतात, काय-काय करतात. तुम्ही माता काही असे करू शकणार नाही. बसूही शकणार नाही. बाबा
म्हणतात - ‘गोड मुलांनो, तुम्हाला हे काही करण्याची गरजच नाही’. शाळेमध्ये
विद्यार्थी नियमाने बसतात ना. बाबा तर तेही सांगत नाहीत. जसे हवे तसे बसा. बसून
थकलात तर ठीक आहे झोपा. बाबा कुठल्याच गोष्टीला मनाई करत नाहीत. ही तर अगदी सोपी
समजण्या सारखी गोष्ट आहे, यामध्ये काही त्रास होण्याचा प्रश्नच नाही. भले कितीही
आजारी असलात तरी. माहित नाही ऐकता-ऐकता शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहता-राहता
शरीरातून प्राण निघून जाईल. गायले जाते ना - ‘गंगा का तट हो, गंगा जल मुख में हो तब
प्राण तन से निकलें’. त्या तर सर्व आहेत भक्तीमार्गातील गोष्टी. वास्तविक आहे ही
ज्ञान अमृताची गोष्ट. तुम्ही जाणता - खरोखर असेच प्राण निघून जाणार आहेत.
तुम्ही मुले येता परमधाम वरून. मला सोडून जाता. बाबा म्हणतात - मी तर तुम्हा मुलांना
सोबत घेऊन जाणार. मी आलोच आहे तुम्हा मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला ना आपले
घर ठाऊक आहे, ना आत्म्याविषयी माहिती आहे. मायेने एकदम पंखच कापून टाकले आहेत,
म्हणून आत्मा उडू शकत नाही कारण तमोप्रधान आहे. जोपर्यंत सतोप्रधान बनत नाही
तोपर्यंत शांतीधाममध्ये जाऊ शकत नाही. हे देखील जाणता - ड्रामा प्लॅन अनुसार
सर्वांना तमोप्रधान बनायचेच आहे. यावेळी सारे झाड पूर्णपणे तमोप्रधान जडजडीभूत झाले
आहे. मुले जाणतात सर्व आत्मे तमोप्रधान आहेत. नवीन दुनियेमध्ये असतातच सतोप्रधान.
इथे कोणाचीही सतोप्रधान अवस्था असू शकत नाही. इथे आत्मा जर पवित्र बनली तर मग इथे
राहूच शकणार नाही, एकदम पळून जाईल. सर्व भक्ती करतातच मुळी मुक्तीसाठी अथवा
शांतीधाममध्ये जाण्यासाठी. परंतु कोणीही परत जाऊ शकत नाही. कायदा असे सांगत नाही.
बाबा ही सारी रहस्ये बसून समजावून सांगतात धारण करण्यासाठी, तरी देखील मुख्य गोष्ट
आहे बाबांची आठवण करणे, स्वदर्शन चक्रधारी बनणे. बीजाची आठवण केल्याने पूर्ण झाड
बुद्धीमध्ये येईल. अगोदर झाड छोटे असते नंतर मग मोठे होत जाते. अनेक धर्म आहेत ना.
तुम्ही एका सेकंदामध्ये जाणता. दुनियेमध्ये कोणालाही माहिती नाही. मनुष्य सृष्टीचे
बीजरूप सर्वांचे एक बाबाच आहेत. बाबा कधी सर्वव्यापी थोडेच असू शकतात. मोठ्यात मोठी
चूक ही आहे. तुम्ही समजावून देखील सांगता मनुष्याला कधीही भगवान म्हटले जात नाही.
बाबा मुलांना सर्व गोष्टी सोप्या करून समजावून सांगतात मग ज्यांच्या भाग्यामध्ये आहे,
निश्चय असेल ते जरूर बाबांकडून वारसा घेतील. निश्चय नसेल तर कधीही समजणार नाहीत.
भाग्यातच नसेल तर मग पुरुषार्थ तरी कसा करतील. नशिबातच नसेल तर ते बसतातच असे जसे
की त्यांना काहीच समजत नाही. एवढा देखील निश्चय नाही आहे की, बाबा आले आहेत बेहदचा
वारसा देण्यासाठी. जसे कोणी नवीन व्यक्ती मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन बसला तर त्याला
काय समजणार? काहीच नाही. इथे देखील असे येऊन बसतात. या अविनाशी ज्ञानाचा कधीही
विनाश होत नाही.
हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे - राजधानी स्थापन होत आहे ना. तर नोकर-चाकर,
प्रजा, प्रजेचे देखील नोकर-चाकर सर्व पाहिजेत ना. तर असे देखील येतात. काहीजणांना
तर खूप चांगल्या रीतीने समजेल. ओपिनियन (अभिप्राय) देखील लिहितात. पुढे चालून वर
जाण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्यावेळी मात्र अवघड होईल कारण तेव्हा तर खूप
अंदाधुंदी माजलेली असेल. दिवसेंदिवस वादळे वाढत जातात. इतकी सेंटर्स आहेत. चांगल्या
रीतीने समजतील सुद्धा. हे देखील लिहिलेले आहे - ब्रह्माद्वारे स्थापना. विनाश देखील
समोर बघतात. विनाश तर होणारच आहे. गव्हर्नमेंट म्हणते जन्मदर कमी व्हावा, परंतु
यामध्ये करू तरी काय शकणार? झाडाची वृद्धि तर होणारच आहे. जोपर्यंत बाबा आहेत
तोपर्यंत सर्व धर्मांच्या आत्म्यांना इथे राहायचेच आहे. जेव्हा जाण्याची वेळ येईल
तेव्हा आत्म्यांचे येणे बंद होईल. आता तर सर्वांना यायचेच आहे. परंतु या गोष्टी
कोणालाच समजत नाहीत. बापूजी देखील म्हणत होते रावण राज्य आहे, आम्हाला रामराज्य
पाहिजे. म्हणतात - ‘अमका स्वर्गवासी झाला’, तर याचा अर्थ हा नरक आहे ना. मनुष्याला
इतके देखील समजत नाही. स्वर्गवासी झाला तर चांगले आहे ना. जरूर नरकवासी होता. बाबा
समजावून सांगतात मनुष्यांचा चेहरा मनुष्याचा आहे, वर्तन मात्र माकडासारखे आहे.
सर्वजण गात राहतात - ‘पतित-पावन सिताराम’. आम्ही पतित आहोत, पावन बनविणारे आहेत बाबा.
त्या सर्व आहेत भक्ती मार्गातील सीता, बाबा आहेत राम. कोणाला सरळ बोला तर मानणार
नाहीत. रामाला बोलावतात. आता तुम्हा मुलांना बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही
जणूकाही वेगळ्या दुनियेतील झाला आहात. जुन्या दुनियेमध्ये काय-काय करत राहतात. आता
तुम्ही समजता. तुम्ही मुले अज्ञानी पासून ज्ञानी बनले आहात. रावणाने तुम्हाला किती
अज्ञानी बनवले आहे. बाबा समजावून सांगत आहेत यावेळी सर्व मनुष्य तमोप्रधान बनले
आहेत, तेव्हाच तर बाबा येऊन सतोप्रधान बनवतात.
बाबा म्हणतात - भले तुम्ही मुले स्वतःची सेवा देखील करत रहा फक्त एक गोष्ट लक्षात
ठेवा - बाबांची आठवण करा. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याचा रस्ता इतर कोणीही
सांगू शकत नाही. सर्वांचे रूहानी सर्जन एकच आहेत. तेच येऊन आत्म्यांना इंजेक्शन
देतात कारण आत्माच तमोप्रधान बनली आहे. बाबांना अविनाशी सर्जन म्हटले जाते. आता
आत्मा सतोप्रधानापासून तमोप्रधान बनली आहे, तिला इंजेक्शन हवे आहे. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, स्वतःला आत्मा निश्चय करा आणि आपल्या बाबांची आठवण करा’. बुद्धीयोग वर
स्वीट-होम मध्ये लावा. आपल्याला स्वीट सायलेन्स होममध्ये जायचे आहे. निर्वाणधामला
स्वीट होम म्हटले जाते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या जुन्या
दुनियेचा विनाश झाल्यातच जमा आहे त्यामुळे आपल्या स्वतःला वेगळे समजायचे आहे.
झाडाच्या वृद्धी सोबतच जी विघ्नरुपी वादळे येतात, त्यांना घाबरायचे नाही, पार
व्हायचे आहे.
२) आत्म्याला
सतोप्रधान बनविण्यासाठी स्वतःला ज्ञान-योगाचे इंजेक्शन द्यायचे आहे. आपला बुद्धियोग
स्वीट-होम मध्ये लावायचा आहे.
वरदान:-
“पहिले तुम्ही”
च्या पाठाद्वारे ताजधारी बनणारे चतुर-सुजाण भव
जसे बापदादा स्वतःला
ओबिडीयंट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवाधारी) म्हणतात, सर्व्हंट म्हटल्याने स्वतः ताजधारी
बनतात, अशी तुम्ही मुले देखील स्वयं नम्रचित्त बनून दुसऱ्याला श्रेष्ठ सीट द्या,
त्यांना सीटवर बसवाल तर ते स्वतः खाली उतरून आपोआपच तुम्हाला बसवतील. जर तुम्ही
बसण्याचा प्रयत्न कराल तर ते तुम्हाला बसू देणार नाहीत म्हणून बसवणेच बसणे आहे. तर
“पहिले तुम्ही” चा पाठ पक्का करा तर संस्कार देखील सहजच जुळतील, ताजधारी देखील बनाल,
हीच चतुर-सुजाण बनण्याची पद्धत आहे, यामध्ये मेहनतही नाही आणि प्राप्ती सुद्धा
जास्त आहे.
बोधवाक्य:-
अव्यक्त
स्थितीचा अनुभव करण्यासाठी अंतर्मुखी, एकांतवासी बना.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
आजपर्यंत वेगळी-वेगळी
फुले आपापली रंगत दाखवत आहेत परंतु जेव्हा पुष्पगुच्छाच्या रूपामध्ये आपला सुगंध
पसरवाल, शक्ती-दळ प्रत्यक्ष होईल तेव्हा ही संघटनची शक्ती परमात्म प्रत्यक्षतेच्या
निमित्त बनेल. आता प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत असल्यामुळे मेहनत जास्त करावी
लागत आहे, परंतु जेव्हा संघटनमध्ये एकमत होईल तेव्हा मेहनत कमी आणि सफलता जास्त
मिळेल.