16-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपली अवस्था बघा - आपले मन एका बाबांमध्येच गुंतलेले आहे का कोणत्या कर्म संबंधांमध्ये मन गुंतलेले आहे”

प्रश्न:-
स्वतःचे कल्याण करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टींचा पोतामेल रोज बघितला पाहिजे?

उत्तर:-
‘योग आणि वर्तना’चा पोतामेल दररोज बघा. चेक करा - कोणती डिस-सर्व्हीस तर केली नाही ना? नेहमी आपल्या मनाला विचारा आपण बाबांची किती आठवण करतो? आपला वेळ कोणत्या प्रकारे सफल करतो? दुसऱ्यांना तर बघत नाही ना? मन कोणाच्या नावा-रूपामध्ये तर गुंतलेले नाही ना?

गीत:-
मुखडा देख ले…

ओम शांती।
हे कोणी म्हटले? बेहदच्या बाबांनी म्हटले - हे आत्म्यांनो. प्राण अर्थात आत्मा. असे म्हणतात ना - आत्मा निघून गेली म्हणजे प्राण निघून गेले. आता बाबा सन्मुख बसून समजावून सांगत आहेत - हे आत्म्यांनो, आठवण करा, फक्त या जन्माला बघायचे नाही परंतु जेव्हापासून तुम्ही तमोप्रधान बनले आहात, तर शिडी उतरत पतित बनले आहात. तर जरूर पापे केली असतील. आता समजून घेण्याची गोष्ट आहे. किती जन्म-जन्मांतरीचे पाप डोक्यावर राहिलेले आहे, हे कसे समजेल. स्वतःला बघायचे आहे आपला योग किती लागतो! बाबांसोबत जितका योग चांगला लागेल तितकी विकर्म विनाश होतील. बाबांनी सांगितले आहे माझी आठवण करा तर गॅरंटी आहे तुमची विकर्मे विनाश होतील. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये डोकावून बघावे की, आपला बाबांसोबत किती योग आहे? जितके आपण योग लावणार, पवित्र बनू, पापे नष्ट होत जातील, योग वाढत जाईल. पवित्र बनला नाहीत तर योग सुद्धा लागणार नाही. असे देखील कितीतरी आहेत जे पूर्ण दिवसामध्ये १५ मिनिटे सुद्धा आठवणी मध्ये राहत नाहीत. स्वतःला विचारले पाहिजे - माझे मन शिवबाबांमध्ये आहे का देहधारीमध्ये आहे? कर्म संबंधी इत्यादीं सोबत आहे? माया वादळामध्ये मुलांनाच आणणार ना! स्वतः देखील समजू शकतात माझी अवस्था कशी आहे? शिवबाबांमध्ये मन गुंतले आहे का कोणत्या देहधारीमध्ये गुंतले आहे? कर्म संबंधी इत्यादींमध्ये गुंतले असेल तर समजले पाहिजे आपली अजून खूप विकर्म बाकी आहेत, ज्यामुळे माया खड्ड्यात पाडते. स्टुडंट आतून समजू शकतात, आपण पास होणार का नाही? चांगल्या रीतीने शिकत आहोत का नाही? नंबरवार तर असतात ना. आत्म्याला स्वतःचे कल्याण करायचे आहे. बाबा डायरेक्शन देतात, जर तुम्ही पुण्य-आत्मा बनून उच्चपद प्राप्त करू इच्छिता तर त्यामध्ये फर्स्ट आहे पवित्रता. आलो देखील पवित्र आहोत आणि मग जायचे देखील पवित्र बनून आहे, पतित कधी उच्च पद मिळवू शकत नाहीत. नेहमी आपल्या मनाला विचारले पाहिजे - आपण बाबांची किती आठवण करतो, आपण काय करतो? हे तर नक्की आहे, मागे बसलेल्या स्टुडंट्सचे मन खात असते. पुरुषार्थ करतात उच्च पद प्राप्त करण्यासाठी. परंतु वर्तन देखील पाहिजे ना. बाबांची आठवण करून आपल्या डोक्यावरील पापांचे ओझे उतरवायचे आहे. पापांचे ओझे आठवणीशिवाय आपण उतरूच शकत नाही. तर बाबांसोबत किती योग असला पाहिजे. उच्च ते उच्च बाबा येऊन म्हणतात - मज पित्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. वेळ जवळ येत जात आहे. शरीरावर भरवसा नाही. अचानकच कसले-कसले ॲक्सीडेंट होतात. अकाली मृत्यूचा फुल सीझन आहे. तर प्रत्येकाने आपली तपासणी करून स्वतःचे कल्याण करायचे आहे. पूर्ण दिवसभरातील आपला योग आणि वर्तनाचा पोतामेल बघितला पाहिजे. आपण पूर्ण दिवसभरामध्ये किती पापे केली? पहिले मनसा, वाचेमध्ये येतात आणि मग कर्मणामध्ये येतात. आता मुलांना रायटीएस-बुद्धी (पवित्र-बुद्धी) मिळाली आहे की आपल्याला चांगली कामे करायची आहेत. कोणाला धोका तर दिला नाही ना? फालतू खोटे तर बोललो नाही ना? डीस-सर्व्हीस तर केली नाही ना? कोणी कोणाच्या नावा-रूपामध्ये फसतात तर यज्ञ पित्याला बदनाम करतात.

बाबा म्हणतात - कोणालाही दुःख देऊ नका. एका बाबांच्या आठवणीमध्ये रहा. हीच खूप जबरदस्त काळजी लागून राहिलेली आहे. आपण जर आठवणीमध्ये राहू शकत नाही तर काय गती होईल! यावेळी बेसावध रहाल तर शेवटी खूप पश्चाताप करावा लागेल. हे देखील समजतात जे हलके पद मिळवणारे आहेत, ते हलकेच पद मिळवतील. बुद्धीने समजू शकतात आपल्याला काय करायचे आहे. सर्वांना हाच मंत्र द्यायचा आहे की, बाबांची आठवण करा. लक्ष्य तर मुलांना मिळाले आहे. या गोष्टींना दुनियावाले समजू शकत नाहीत. सर्वप्रथम मुख्य गोष्ट आहेच मुळी बाबांची आठवण करण्याची. रचयिता आणि रचनेचे नॉलेज तर मिळाले आहे. दररोज कोणता ना कोणता नवीन-नवीन पॉईंट सुद्धा समजावून सांगण्यासाठी दिला जातो. जसे विराट रूपाचे चित्र आहे, यावर देखील तुम्ही समजावून सांगू शकता. कसे वर्णांमध्ये येतात - हे देखील शिडीच्या चित्राच्या बाजूला ठेवण्यासारखे चित्र आहे. पूर्ण दिवस बुद्धीमध्ये हेच चिंतन रहावे की कसे कोणाला समजावून सांगावे? सेवा केल्यामुळे देखील बाबांची आठवण राहील. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. स्वतःचे देखील कल्याण करायचे आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुमच्यावर ६३ जन्मांची पापे आहेत. पापे करता-करता सतोप्रधानापासून तमोप्रधान बनले आहात. आता माझे बनून मग कोणतेही पाप कर्म करू नका. खोटेपणा, दुष्टपणा, घरामध्ये अशांती निर्माण करणे, ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणे - हा कपटीपणा खूप नुकसानकारक आहे. बाबांपासून योगच तोडून टाकतो, तर किती पाप झाले. गव्हर्मेंटचे देखील असे काही देशद्रोही असतात, गव्हर्मेंटची गोष्ट कोणत्या शत्रूला सांगून मोठे नुकसान करतात. तर मग त्यांना खूप मोठी कठोर सजा मिळते. तर मुलांच्या मुखातून सदैव ज्ञान रत्ने निघाली पाहिजेत. उलटे-सुलटे समाचार देखील एकमेकांना विचारता कामा नयेत. ज्ञानाच्याच गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही बाबांसोबत कसे योग लावता? कसे कुणाला समजावून सांगता? पूर्ण दिवस हाच विचार राहिला पाहिजे. चित्रांसमोर जाऊन बसले पाहिजे. तुमच्या बुद्धीमध्ये तर नॉलेज आहे ना. भक्तिमार्गामध्ये तर अनेक प्रकारच्या चित्रांना पूजत राहतात. जाणत काहीच नाहीत. ब्लाइंड फेथ (अंधश्रद्धा), आइडल वर्शिप (मूर्ति पूजा) या गोष्टींसाठी भारत प्रसिद्ध आहे. आता तुम्ही या गोष्टी समजावून सांगण्यासाठी किती मेहनत घेता. प्रदर्शनीमध्ये किती मनुष्य येतात. भिन्न-भिन्न प्रकारचे असतात, कोणी मग समजतात की, हे तर पाहण्या, समजण्या लायक आहे. बघून घेऊ, आणि मग सेंटरवर कधीच जात नाहीत. दिवसेंदिवस दुनियेची हालत देखील खराब होत आहे. खूप भांडणे आहेत, परदेशामध्ये काय-काय होत आहे, काही विचारूच नका. किती मनुष्य मरतात. तमोप्रधान दुनिया आहे ना. भले म्हणतात की, बॉम्ब्स बनवता कामा नये. परंतु ते म्हणतात तुमच्याकडे तर पुष्कळ ठेवलेले आहेत तर मग आम्ही का नाही बनवायचे. नाहीतर गुलाम होऊन रहावे लागेल. जे काही मत निघते ते विनाशासाठीच निघते. विनाश तर होणारच आहे. असे म्हणतात - शंकर प्रेरक आहे; परंतु यामध्ये प्रेरणा इत्यादीचा तर प्रश्नच नाही. आपण तर ड्रामावर ठाम आहोत. माया खूप हुशार आहे. माझ्या मुलांना सुद्धा विकारांमध्ये पाडून घालते. किती समजावले जाते की देहावर प्रेम करू नका, नावा-रूपामध्ये फसू नका. परंतु माया देखील अशी तमोप्रधान आहे, देहामध्ये अडकवते. एकदम नाकालाच पकडते. पत्ताच लागत नाही. बाबा किती समजावून सांगतात - श्रीमतावर चाला, परंतु चालत नाहीत. रावणाचे मत लगेच बुद्धीमध्ये येते. रावण जेल मधून सोडतच नाही.

बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण करा. बस्स, आता तर आपण गेलो. अर्ध्या कल्पाच्या रोगापासून आपण सुटतो. तिथे तर आहेच निरोगी काया. इथे तर किती रोगी आहेत. हा रौरव नरक आहे ना. भले ते लोक गरुड पुराण वाचतात परंतु वाचणाऱ्याच्या अथवा ऐकणाऱ्यांच्या काहीच लक्षात येत नाही. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः म्हणतात - ‘अगोदर भक्तीचा केवढा नशा होता. भक्तीने भगवान भेटणार, हे ऐकून आनंदीत होऊन भक्ती करत होतो’. पतित बनतात तेव्हाच तर बोलावतात - हे पतित-पावन या. भक्ती करता हे तर चांगले आहे पण मग भगवंताची आठवण का करता! असे समजतात भगवान येऊन भक्तीचे फळ देईल. काय फळ देईल - ते मात्र कोणालाच माहिती नाही. बाबा म्हणतात - गीता वाचणार्यांनाच समजावून सांगितले पाहिजे, तेच आपल्या धर्माचे आहेत. पहिली मुख्य गोष्टच आहे - गीतेमधील भगवानुवाच विषयीची. आता गीतेचा भगवान कोण? भगवंताचा परिचय तर पाहिजे ना. तुम्हाला माहित झाले आहे - आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे? मनुष्य ज्ञानाच्या गोष्टींना किती घाबरतात. भक्ती किती चांगली वाटते. ज्ञानापासून तीन कोस दूर पळतात. अरे, पावन बनणे तर चांगले आहे, आता पावन दुनियेची स्थापना, पतित दुनियेचा विनाश होणार आहे. परंतु अजिबात ऐकत नाहीत. बाबांचे डायरेक्शन आहे - ‘हिअर नो इव्हिल…’ मग माया म्हणते - ‘हिअर नो बाबांच्या गोष्टी’. मायेचे डायरेक्शन आहे - ‘शिवबाबांचे ज्ञान ऐकू नका’. माया असे जोराने चापट मारते जे बुद्धीमध्ये काही राहतच नाही. बाबांची आठवण करूच शकत नाहीत. मित्र-संबंधी, देहधारींची आठवण येते. बाबांची आज्ञा मानत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’; आणि मग नाफर्मानबरदार बनून म्हणतात - आम्हाला अमक्याची आठवण येते. आठवण आली तर कोसळाल. या गोष्टींची तर घृणा आली पाहिजे. ही एकदम छि-छि (पतित) दुनिया आहे. आपल्यासाठी तर नवीन स्वर्ग स्थापन होत आहे. तुम्हा मुलांना बाबांचा आणि सृष्टीचक्राचा परिचय मिळाला आहे तर त्याच अभ्यासामध्ये व्यस्त झाले पाहिजे. बाबा म्हणतात - आपल्या अंतर्मनाला बघा. नारदाचे देखील उदाहरण आहे ना. तर बाबा देखील म्हणतात - स्वतःला बघा, आपण बाबांची आठवण करतो? आठवणीनेच पापे भस्म होतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये आठवण शिवबाबांचीच करायची आहे, दुसऱ्या कोणावरही प्रेम करायचे नाही. अंत समयी शिवबाबांची आठवण असावी तेव्हा प्राण तनामधून निघावेत. शिवबाबांची आठवण असावी आणि स्वदर्शन चक्राचे ज्ञान असावे. स्वदर्शन चक्रधारी कोण आहेत, हे देखील कोणाला थोडेच माहिती आहे. ब्राह्मणांना देखील हे नॉलेज कोणी दिले? ब्राह्मणांना हे स्वदर्शन चक्रधारी कोण बनवतात? परमपिता परमात्मा बिंदू. तर काय ते देखील स्वदर्शन चक्रधारी आहेत का? होय, आधी तर तेच आहेत. नाहीतर आम्हा ब्राह्मणांना कोणी बनवले असते. पूर्ण रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज त्यांच्यामध्ये आहे. तुमची आत्मा देखील बनते, ते देखील आत्मा आहेत. भक्तीमार्गामध्ये विष्णूला चक्रधारी बनवले आहे. आपण म्हणतो परमात्मा त्रिकालदर्शी, त्रिमूर्ती त्रिनेत्री आहेत, ते आम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतात. ते देखील जरूर मनुष्य तनामध्ये येऊन ऐकवतील. रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान जरूर रचताच ऐकवतील ना. रचता विषयीच कोणाला माहिती नाही तर रचनेचे ज्ञान कुठून मिळणार. आता तुम्ही समजता शिवबाबाच स्वदर्शन चक्रधारी आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. ते जाणतात आपण कसे या ८४ च्या चक्रामध्ये येतो. स्वतः काही पुनर्जन्म घेत नाहीत. त्यांना नॉलेज आहे, जे आपल्याला ऐकवतात. म्हणजे सर्वप्रथम तर शिवबाबा स्वदर्शन चक्रधारी झाले ना. शिवबाबाच आम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतात. पावन बनवतात कारण पतित-पावन ते आहेत. रचता देखील ते आहेत. पिता मुलांच्या जीवनाला जाणतात ना. शिवबाबा ब्रह्माद्वारे स्थापना करतात. करनकरावनहार आहेत ना. तुम्ही देखील शिका आणि शिकवा. बाबा शिकवतात आणि मग म्हणतात - इतरांना देखील शिकवा. तर शिवबाबाच तुम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतात. म्हणतात - मला सृष्टीचक्राचे नॉलेज आहे तेव्हाच तर तुम्हाला ऐकवतो. तर ८४ जन्म कसे घेतो - ही ८४ जन्मांची कहाणी बुद्धीमध्ये राहिली पाहिजे. एवढे बुद्धीमध्ये राहिले तरी देखील चक्रवर्ती राजा बनू शकता. हे आहे ज्ञान. बाकी योगाद्वारेच पापे नष्ट होतात. पूर्ण दिवसाचा पोतामेल (हिशोब) काढा. आठवणच करत नसाल तर पोतामेल तरी काय काढणार! संपूर्ण दिवसभरामध्ये काय-काय केले - हे तर लक्षात राहते ना. असेही मनुष्य आहेत जे, आपला पोतामेल काढतात की, किती शास्त्रे वाचली, किती पुण्य केले? आणि तुम्ही तर म्हणाल - किती वेळ आठवण केली? किती उत्साहाने बाबांचा परिचय दिला?

बाबांकडून जे पॉईंट्स मिळाले आहेत, त्याचे वारंवार मंथन करा. जे ज्ञान मिळाले आहे ते बुद्धीमध्ये लक्षात ठेवा, रोज मुरली वाचा. हे देखील खूप चांगले आहे. मुरलीमध्ये जे पॉईंट्स आहेत त्यांचे वारंवार मंथन केले पाहिजे. इथे राहणाऱ्यांपेक्षा देखील बाहेर परदेशामध्ये राहणारे जास्त आठवणीमध्ये राहतात. बंधनवाल्या किती माता आहेत, बाबांना कधी बघितले देखील नाहीये, परंतु आठवण किती करतात, नशा चढलेला असतो. घर बसल्या साक्षात्कार होतो किंवा अनायासे ऐकता-ऐकता निश्चय होतो. तर बाबा म्हणतात - आतून आपली तपासणी करत रहा की आम्ही किती उच्च पद मिळवणार? माझे वर्तन कसे आहे? कोणत्या खाण्या-पिण्याची लालसा तर नाही ना? कोणतीही वाईट सवय राहता कामा नये. मूळ गोष्ट आहे अव्यभिचारी आठवणीमध्ये राहणे. मनाला विचारा - आपण कोणाची आठवण करतो? किती वेळ दुसऱ्यांची आठवण करतो? नॉलेज देखील धारण करायचे आहे, पापे देखील उतरवायची आहेत. काहीजणांनी तर अशी पापे केली आहेत की काही विचारूच नका. भगवान म्हणतात - असे करा; परंतु ते म्हणतात - परवश आहोत अर्थात मायेच्या वश आहोत. ठीक आहे, मायेच्या वशमध्येच रहा. तुम्हाला आता एकतर श्रीमतावर चालायचे आहे नाहीतर आपल्या मतावर. बघितले पाहिजे या परिस्थितीमध्ये आपण कितपत पास होऊ? काय पद मिळवणार? २१ जन्मांचा घाटा होतो. जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा मग देह-अभिमानाचे नाव सुद्धा राहणार नाही. म्हणून म्हटले जाते देही-अभिमानी बना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणतेही असे काम करायचे नाही ज्यामुळे यज्ञ पित्याची बदनामी होईल. बाबांकडून जी रायटीयस-बुद्धी (पवित्र बुद्धी) मिळाली आहे त्या बुद्धीद्वारे चांगली कर्म करायची आहेत. कोणालाही दुःख द्यायचे नाही.

२) एकमेकांना उलटा-सुलटा समाचार विचारायचा नाही, आपसामध्ये ज्ञानाच्याच गोष्टी करायच्या आहेत. खोटेपणा, दुष्टपणा, घरामध्ये अशांती निर्माण करणाऱ्या गोष्टी करणे हे सर्व सोडून मुखावाटे सदैव रत्नेच काढायची आहेत. ईव्हील गोष्टी ना ऐकायच्या आहेत, ना ऐकवायच्या आहेत.

वरदान:-
५ विकार रुपी शत्रूला परिवर्तित करून सहयोगी बनविणारे मायाजीत जगतजीत भव

विजयी, नेहमी शत्रूचे रूप जरूर परिवर्तन करतो. तर तुम्ही विकार रुपी शत्रूला परिवर्तित करून सहयोगी स्वरूप बनवा ज्यामुळे ते नेहमी तुम्हाला सलाम करत राहतील. काम विकाराला शुभ-कामनेच्या रूपामध्ये, क्रोधाला रूहानी खुमारीच्या (आत्मिक नशेच्या) रूपामध्ये, लोभाला अनासक्त वृत्तीच्या रूपामध्ये, मोहाला स्नेहाच्या रूपामध्ये आणि देह-अभिमानाला स्वाभिमानाच्या रूपामध्ये परिवर्तित करा तर मायाजीत जगतजीत बनाल.

बोधवाक्य:-
रियल गोल्डमध्ये ‘माझे’पणा हीच भेसळ आहे, जी त्याचे मूल्य कमी करते, म्हणून ‘माझे’पणाला नाहीसे करा.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

कधी कोणत्या कार्यामध्ये किंवा सेवेमध्ये जेव्हा एकटेपणा अनुभव करता तेव्हा थकता. मग दोन भुजावाल्यांना साथीदार बनवता. हजार भुजा वाल्याला विसरून जाता. जेव्हा हजार भुजावाला आपले परमधाम घर सोडून तुम्हाला साथ देण्यासाठी आला आहे तर त्याला आपल्या सोबत कंबाइंड का ठेवत नाही! सदैव बुद्धीने कंबाइंड रहा तर सहयोग मिळत राहील.