16-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
आता खरे-खरे राजयोगी आहात, तुम्हाला राजऋषी देखील म्हटले जाते, राजऋषी अर्थातच
पवित्र”
प्रश्न:-
तुम्ही मुले,
मनुष्यांना मायारूपी रावणाच्या दलदलीतून केव्हा बाहेर काढू शकाल?
उत्तर:-
जेव्हा तुम्ही
स्वतः त्या दलदलीतून बाहेर पडलेले असाल. दलदलीतून बाहेर पडलेल्यांचे लक्षण आहे -
इच्छा मात्रम् अविद्या. एका बाबांशिवाय दुसरे काहीच आठवू नये. चांगले कपडे घालावे,
चांगले पदार्थ खावे… हा मोह नसावा, तुम्ही पूर्णत: वनवासामध्ये आहात. या शरीराला
देखील विसरलेले आहात, माझे काहीच नाही, मी आत्मा आहे - अशी आत्म-अभिमानी मुलेच
रावणाच्या दलदलीतून मनुष्यांना बाहेर काढू शकतात.
गीत:-
तू प्यार का
सागर है…
ओम शांती।
एकेकाळी गाणे
जेव्हा वाजवले जात असे तेव्हा बाबा मुलांना गाण्याचा अर्थ देखील विचारत होते. आता
सांगा तुम्ही केव्हा पासून रस्ता विसरले आहात? (कोणी म्हटले द्वापर पासून, कोणी
म्हटले सतयुगापासून). जे म्हणतात द्वापर पासून विसरलो आहोत, ते चुकीचे आहेत. सतयुगा
पासून रस्ता विसरला आहात. मार्ग दाखविणारे तर तुम्हाला आत्ता भेटले आहेत.
सतयुगामध्ये तर मार्ग दाखविणाऱ्या बाबांना तुम्ही जाणतही नाही. तिथे कोणीच बाबांना
जाणत नाहीत. अर्थात विसरून गेले आहेत. विसरणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता
पुन्हा मार्ग दाखविण्यासाठी आले आहेत. म्हणतात ना - ‘प्रभू राह बताओ’. आपण
सतयुगापासून बाबांना विसरलो आहोत. बाबा प्रश्न विचारतात - बुद्धीला चालना
देण्याकरिता. हे ज्ञानच वेगळे आहे ना, ज्ञानाचा सागर बाबाच आहेत. बाबा सन्मुख बसून
सांगत आहेत - ‘ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर मीच आहे’. तुम्ही देखील जाणता - बरोबर
पतित-पावन देखील एक बाबाच आहेत. हे तर भक्तिमार्गवाले देखील मानतात. पावन दुनिया
आहेच मुळी शांतीधाम आणि सुखधाम. आता सुखधाम आणि दुःखधाम अर्धे-अर्धे आहे. हे तर मुले
चांगल्या रीतीने जाणतात. बाबा प्रेमाचा सागर आहेत, तेव्हाच तर सर्वजण त्यांना
‘फादर’ असे म्हणून बोलावतात; परंतु ते कोण आहेत, कसे येतात, हे विसरून जातात. ५
हजार वर्षांची गोष्ट आहे, बरोबर या देवी-देवतांचे राज्य होते. सतयुगात आहे सद्गती;
आणि मग दुर्गती कशी होते, हे कोण सांगेल? बाबाच येऊन समजावून सांगतात - द्वापर
पासून तुमची दुर्गती झालेली आहे तेव्हाच तर बोलावत आहात. तुम्ही समजता या काही नवीन
गोष्टी नाहीत. बाबा कल्प-कल्प येतात. आता निराकार बाबा आत्म्यांना समजावून सांगत
आहेत. कोणीही आपल्या आत्म्याबद्दल जाणत नाहीत. असे कधीच कोणी म्हणणार नाही की,
‘माझ्या आत्म्यामध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे’. कधीच असे म्हणणार नाहीत की, ‘मी
अनेकदा हा बनलो आहे, पार्ट बजावला आहे’. ड्रामाला तर ते जाणतच नाहीत. जरी
लाखों-हजारो वर्षे म्हटली तरीही ड्रामा तर आहे ना. ड्रामा रिपीट होतो. असे तर
म्हणतीलच ना. मुलांना हे ज्ञान, बाबाच सन्मुख बसून देत आहेत. त्यांच्याशी थेट बोलत
आहेत. तुम्ही जाणता - आपल्याला शिवबाबांनी येऊन ब्रह्मा द्वारे आपले बनवून ब्राह्मण
बनविले आहे. शिवबाबांचा हा (ब्रह्मा) मुलगा देखील आहे ना. तर वन्नी (पत्नी) देखील
आहे. पहा, कित्येक मुलांची काळजी घेतली जात आहे. एकटा पुरुष असल्यामुळे सरस्वतीला
मदतीला घेतले आहे की, मुलांना सांभाळ. या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीत. हे आहे
प्रॅक्टिकल (वास्तव). बाबाच राजयोग शिकवतात, ज्यांना राजयोग शिकवला, ते राजे बनले.
८४ जन्मांमध्ये आले. बायबल, कुराण, वेद-शास्त्रे इत्यादी पुष्कळ वाचतात, परंतु
त्यांना त्यातले काहीच समजत नाही. आता तुम्ही काही तत्व-योगी नाही आहात. तुमचा तर
बाबांसोबत योग आहे अर्थात बाबांचीच आठवण आहे. तुम्ही आता राजयोगी, राजऋषी आहात
अर्थात योगीराज आहात. ‘योगी’, पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. स्वर्गाची राजाई
घेण्याकरिता तुम्ही योगी बनले आहात. बाबा सर्वात पहिले हेच सांगतात - पवित्र बना.
त्यांचे नावच ‘योगी’ आहे. तुम्ही सर्व राजयोगी आहात. ही तुम्हा ब्रह्मामुखवंशावळी
ब्राह्मणांचीच गोष्ट आहे. तुम्हाला राजयोग शिकवत आहेत, तर स्टुडंट झालात ना.
स्टुडंट्सना टीचर कधी विसरेल काय? तुम्ही जाणता - शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. परंतु
तरीही माया विसरायला लावते. तुम्ही आपल्या शिकविणाऱ्या टीचरलाच विसरून जाता. स्वयं
भगवान शिकवत आहेत - हे लक्षात येईल तेव्हाच तर नशा चढेल. स्कूलमध्ये आय. सी. एस.
शिकतात तर किती नशा असतो. तुम्ही मुले तर २१ जन्मांकरिता हे राजयोगाचे शिक्षण शिकता.
तरीही (सतयुगामध्ये) तिथे शिकावे तर लागतेच. राजविद्या देखील शिकावी लागेल, भाषा
इत्यादी शिकावी लागेल.
तुम्ही मुले समजता -
सतयुगापासून आपण हा मार्ग विसरायला सुरूवात करतो. मग एक-एक ढाका (पायरी), प्रत्येक
जन्मामध्ये खाली उतरतो. आता तुम्हाला सर्व काही आठवते आहे की, कसे आपण चढतो, कसे
आपण उतरतो. ही शिडी व्यवस्थित लक्षात ठेवा. ८४ जन्म पूर्ण झाले, आता आपल्याला जायचे
आहे; तर आनंद होतो, हे बेहदचे नाटक आहे. आत्मा किती सूक्ष्म आहे. पार्ट
बजावता-बजावता आत्मा थकून जाते; तेव्हाच तर म्हणतात - ‘बाबा, मार्ग दाखवा ज्यामुळे
आम्हाला विश्रांती मिळेल, सुख-शांती मिळेल’. तुम्ही सुखधाममधे असता तेव्हा तिथे
तुम्हाला सुख-शांती देखील असते. तिथे कोणताही कोलाहल नाही. आत्म्याला शांती आहे.
शांतीची दोन स्थान आहेत - शांतीधाम आणि सुखधाम. दुःखधाम मध्ये अशांती आहे. हे
शिक्षण आहे. तुम्ही जाणता की, बाबा आपल्याला सुखधाममध्ये व्हाया शांतिधाम घेऊन जात
आहेत. तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जाणता आपण इथे पार्ट बजावण्याकरिता
आलो आहोत, आता परत जायचे आहे. याचा आनंद आहे. शांतीचा आनंद नाहीये. पार्ट बजावण्यात
आपल्याला मजा वाटते, आनंद होतो. जाणता - बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील.
काहीजण म्हणतात - आम्हाला मनाची शांती मिळावी. हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. नाही,
आपण बाबांची आठवण करतो जेणेकरून विकर्म विनाश व्हावी. मन काही शांत राहू शकत नाही.
कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. बाकी अनुभव होतो, आपण बाबांकडून पवित्रता,
सुख-शांतीचा वारसा घेत आहोत, तर आनंद झाला पाहिजे. हे तर आहेच दुःखधाम, इथे सुख
असूच शकत नाही. मनुष्य शांतीधाम, सुखधामला विसरले आहेत. तर ज्यांच्याकडे खूप पैसे
आहेत, ते समजतात की, आम्ही तर खूप सुखात आहोत, संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये
निघून जातात. तिथे कोणताही कोलाहल नसतो, त्यामुळे शांत तर होतात, परंतु ते आहे
अल्पकाळाकरिता. आत्म्याचा स्वधर्म जो शांती आहे, त्यामध्ये तुम्ही शांतीमध्ये राहाता.
इथे तर प्रवृत्तीमध्ये यायचेच आहे. पार्ट बजावायचाच आहे. इथे येतोच मुळी कर्म
करण्याकरिता. आत्म्याला कर्मामध्ये तर जरूर यायचेच आहे. तुम्ही मुले समजता - हे
स्पष्टीकरण बेहदचे बाबा देत आहेत. निराकार भगवानुवाच - आता तुम्ही जाणता - आपण आत्मा
आहोत, आपले पिता परम-आत्मा आहेत. परम-आत्मा अर्थात परमात्मा. त्यांना सर्व आत्मे
बोलावतात. बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता बाबा म्हणतात - मुलांनो,
देही-अभिमानी बना. हीच मेहनत आहे. अर्ध्या कल्पापासून जी भेसळ पडते, ती या आठवणी
द्वारेच साफ होईल. तुम्हाला खरे सोने बनायचे आहे. ज्याप्रमाणे खऱ्या सोन्यामध्ये
भेसळ (दुसरा धातू) मिसळून मग दागिना बनवतात. तुम्ही मुळातच खरे सोने होता, नंतर मग
तुमच्यामध्ये भेसळ पडली आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आपण पार्ट बजावला आहे.
आता आम्ही माहेरी जात आहोत. ज्याप्रमाणे परदेशातून जेव्हा मायदेशी माघारी येतात तर
आनंद होतो, तुम्हाला देखील आनंद होत आहे, तुम्ही जाणता बाबा आपल्यासाठी स्वर्ग घेऊन
आले आहेत. बेहदच्या बाबांची सौगात आहे - बेहदची बादशाही अर्थात सद्गती. संन्यासी
लोक मुक्तीची सौगात पसंत करतात. कोणाचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतात - स्वर्गवासी
झाला. संन्यासी म्हणतात - ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली, ज्यामध्ये सर्वजण विलीन
होतील. ते तर राहण्याचे ठिकाण आहे, जिथे आपण आत्मे राहतो. बाकी अशी कोणती ज्योती
अथवा आग थोडीच आहे, ज्यामध्ये सर्व जण विलीन होतील. ब्रह्म मह्तत्व आहे, जिथे आत्मे
राहतात. बाबा देखील तिथेच राहतात. ते देखील आहेत बिंदू, बिंदूचा कोणाला साक्षात्कार
झाला तरी समजू शकणार नाहीत. मुले अनेकदा म्हणतात - बाबा, आठवणीत राहणे कठीण आहे.
बिंदू रूपाची कशी आठवण करावी. अर्धाकल्प तर मोठ्या लिंगरूपाचीच आठवण केली. ते देखील
बाबाच समजावून सांगत आहेत. बिंदूची तर पूजा होऊ शकत नाही. यांचे (शिवबाबांचे) मंदिर
कसे बरे बनवावे? बिंदू तर दिसतही नाही, म्हणून शिवलिंग मोठ्या आकारात बनवतात. बाकी
आत्म्यांचे रूप शाळीग्राम ते तर खूप छोटे-छोटे बनवतात. अंड्याप्रमाणे बनवतात.
म्हणतील - बाबा, हे तुम्ही आधीच का नाही सांगितले की, परमात्मा बिंदू प्रमाणे आहेत.
बाबा म्हणतात - त्यावेळी हे सांगण्याचा पार्टच नव्हता. अरे, तुम्ही आय. सी. एस. अगदी
सुरुवातीपासूनच का नाही शिकत? शिक्षणाचे देखील काही नियम आहेत ना. तुम्हाला जर कोणी
असे विचारले तर तुम्ही सांगू शकता - अच्छा, बाबांना विचारतो आणि सांगतो किंवा आमच्या
मोठ्या टीचर आहेत त्यांना पत्र लिहून विचारतो. बाबांना सांगायचे असेल तर सांगतील
अन्यथा म्हणतील की, ‘जसजसे पुढे जाल तसतसे तुम्हाला ते समजेल’. सर्व काही एकाच वेळी
तर सांगणार नाहीत. या सर्व आहेत नवीन गोष्टी. तुमच्या वेद-शास्त्रांमध्ये जे आहे
त्याचे सार बाबा बसून सांगत आहेत. याची देखील भक्तिमार्गामध्ये नोंद आहे की, पुन्हा
तुम्हाला ती (वेद-शास्त्रे) वाचावीच लागतील. हा भक्तीचा पार्ट बजावावाच लागेल. पतित
बनण्याचा देखील पार्ट बजावायचाच आहे. म्हणतात - भक्तीच्या दलदलीमध्ये अडकलो आहोत.
वरकरणी तर खूप सुंदर दिसते. जसे मृगजळाच्या पाण्याचे उदाहरण देतात. भक्ती देखील
अत्यंत आकर्षक आहे. बाबा म्हणतात हे मृगजळाचे पाणी आहे. मृगतृष्णा समान या
दलदलीमध्ये अडकून पडतात. मग त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते, पूर्णपणे त्यात
गुरफटले जातात. इतरांना काढण्याकरिता जातात आणि मग स्वतःच अडकून पडतात. असे अनेकजण
या जाळ्यात अडकले आहेत. आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती इतरांना काढन्ती; आणि
चालता-चालता मग स्वत:च अडकतात. किती चांगली-चांगली फर्स्टक्लास मुले होती. मग
त्यांना त्या दलदलीतून बाहेर पडणे खूप अवघड होते. बाबांना विसरून जातात, तर
दलदलीतून काढण्यासाठी किती मेहनत करावी लागते. कितीही समजावून सांगा डोक्यातच जात
नाही. आता तुम्ही समजू शकता की आपण माया रुपी रावणाच्या दलदलीतून किती बाहेर पडलो
आहोत. जितके-जितके त्यातून बाहेर पडत जातील, तितका-तितका आनंद होत राहील. जो स्वतः
त्या दलदलीतून बाहेर पडला असेल त्याच्याकडे इतरांना बाहेर काढण्याची शक्ती असेल.
तिरंदाजी मध्ये कोणी हुशार असतात, तर कोणी कमजोर असतात. भिल्ल (एकलव्य) आणि
अर्जुनाचे उदाहरण आहे ना. अर्जुन तर सोबत राहणारा होता; अर्जुन काही एकालाच म्हणत
नाहीत, जे बाबांचे बनून बाबांच्या सोबत राहतात, त्यांना म्हटले जाते अर्जुन. सोबत
राहणाऱ्यांची आणि बाहेर राहणाऱ्यांची शर्यत लावली जाते. भिल्ल अर्थात बाहेर राहणारा
वेगाने पुढे निघून गेला. दृष्टांत एकाचा दिला जातो. गोष्ट तर अनेकांची आहे. तीर
देखील हा ज्ञानाचा तीर आहे. प्रत्येकजण स्वतःला समजू शकतात की, आपण बाबांची किती
आठवण करतो, इतर कोणाची आठवण तर येत नाही ना! चांगले कपडे घालण्याचा अथवा
चांगले-चांगले खाण्याचा मोह तर होत नाही! इथे चांगले कपडे घालाल तर तिथे कमी होईल.
इथे तर आपल्याला वनवासात राहायचे आहे. बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या या शरीराला
देखील विसरून जा. हे तर जुने तमोप्रधान शरीर आहे. तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात.
इच्छा मात्रम् अविद्या.
बाबा म्हणतात - तुम्ही
इथे दागिने इत्यादी सुद्धा घालायचे नाहीत; असे का सांगतात? याची देखील अनेक कारणे
आहेत? जर कधी कोणाचा दागिना हरवला तर म्हणतील - तिथे बी. के. ला देऊन आली आहे; आणि
मग भुरटे चोर देखील रस्त्याने चालताना दागिने हिसकावून घेतात. आजकाल लुटणाऱ्या महिला
देखील भरपूर झाल्या आहेत. महिला देखील लूटमार करतात. दुनियेची हालत पहा काय झाली आहे?
तुम्ही समजता, ही दुनिया एकदम वेश्यालय आहे. आपण इथे शिवबाबांसोबत शिवालयामध्ये बसलो
आहोत. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंद स्वरूप आहेत. आत्म्याचीच महिमा आहे. आत्माच
म्हणते मी प्रेसिडेंट बनलो आहे, मी अमका आहे. आणि तुमची आत्मा म्हणते - मी ब्राह्मण
आहे. बाबांकडून वारसा घेत आहे. आत्म-अभिमानामध्ये राहायचे आहे, यामध्येच मेहनत आहे.
हा माझा अमका आहे, हा माझा आहे… हे लक्षात राहते आणि आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, हे
मात्र विसरायला होते. इथे ‘माझे-माझे’ म्हणणे सोडावे लागते. मी आत्मा आहे, यांची
आत्मा (ब्रह्मा बाबांची आत्मा) देखील जाणते. बाबा समजावून सांगत आहेत, मी देखील ऐकत
राहतो. सर्वात पहिले मी ऐकतो, भले मी देखील सांगू शकतो परंतु मुलांच्या कल्याणार्थ
म्हणतो - ‘तुम्ही नेहमी असेच समजा की शिवबाबा सांगत आहेत. विचार सागर मंथन करणे
मुलांचे काम आहे. जसे तुम्ही करता, तसेच मी देखील करतो’. नाहीतर पहिल्या नंबरमध्ये
कसे जातील, परंतु स्वतःला गुप्त ठेवतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
‘माझे-माझे’ सर्व काही सोडून स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्म-अभिमानी राहण्याची
मेहनत करायची आहे. इथे पूर्णपणे वनवासात राहायचे आहे. काहीही घालण्याच्या किंवा
खाण्याच्या इच्छे पासून इच्छा मात्रम् अविद्या बनायचे आहे.
२) पार्ट बजावताना,
कर्म करताना आपल्या शांतीच्या स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. शांतीधाम आणि
सुखधामची आठवण करायची आहे. या दुःख-धामला विसरून जायचे आहे.
वरदान:-
रुहाब (आत्मिक
नशा) आणि दयेच्या गुणा द्वारे विश्व नव निर्माण करणारे विश्व कल्याणकारी भव
विश्व कल्याणकारी
बनण्याकरिता मुख्य दोन धारणा आवश्यक आहेत, एक - ईश्वरीय रुहाब (आत्मिक नशा) आणि
दुसरी - दया. जर आत्मिक नशा आणि दया दोन्ही एकत्र आणि सारख्या प्रमाणात असतील तर
रुहानियतची स्टेज बनते. तर जेव्हा पण कोणते कर्तव्य करता अथवा मुखाने शब्द वर्णन
करता तर चेक करा की, दया आणि रुहाब (आत्मिक नशा) दोन्ही समान रूपामध्ये आहेत?
शक्तींच्या चित्रांमध्ये या दोन्ही गुणांची समानता दाखवतात, याच्याच आधारावर विश्व
नव निर्माण करण्यामध्ये निमित्त बनू शकता.
बोधवाक्य:-
बाबांच्या
प्रेमापोटी व्यर्थ संकल्प समर्पण करा - हीच खरी कुर्बानी आहे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
जितके जे स्वत: सरळ
असतील तितकीच आठवण देखील सरळ राहील. जितका जो प्रत्येक गोष्टीमध्ये स्पष्ट अर्थात
स्वच्छ असेल तितका तो सरळ असेल. जो जसा स्वतः असतो तसेच त्याच्या रचनेमध्ये देखील
तेच संस्कार असतात. तर प्रत्येक गुणाचे प्रत्यक्ष उदाहरण स्वरूप बना.