16-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जे सर्वांची सद्गती करणारे जीवनमुक्ती दाता आहेत, ते तुमचे पिता बनले आहेत, तुम्ही त्यांची संतान आहात, तर किती नशा असला पाहिजे”

प्रश्न:-
कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये बाबांची आठवण निरंतर टिकू शकत नाही?

उत्तर:-
ज्यांना पूर्णत: निश्चय नाही त्यांच्या बुद्धीमध्ये आठवण टिकू शकत नाही. आपल्याला कोण शिकवत आहेत, हे जाणत नाही तर आठवण कुणाची करणार. जे यथार्थ रित्या ओळखून आठवण करतात त्यांचीच विकर्म विनाश होतात. बाबा स्वतःच येऊन आपली आणि आपल्या घराची यथार्थ ओळख देतात.

ओम शांती।
आता ओम् शांतीचा अर्थ तर नेहमीच मुलांना लक्षात राहील. आपण आत्मा आहोत, आपले घर आहे निर्वाणधाम अथवा मूलवतन. बाकी भक्तिमार्गामध्ये मनुष्य जो पण पुरुषार्थ करतात त्यांना माहित नसते कुठे जायचे आहे. सुख कशामध्ये आहे, दुःख कशामध्ये आहे, काहीच माहित नाही. यज्ञ, तप, दान, पुण्य, तीर्थ इत्यादी करत शिडी खाली उतरतच येतात. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे तर भक्ती बंद होते. घंटा घडियाल (तासंतास मोठ्या आवाजात घंटा वाजवणे) इत्यादी सर्व वातावरण बंद. नवीन दुनियेमध्ये आणि जुन्या दुनियेमध्ये फरक तर आहे ना. नवीन दुनिया आहे पावन दुनिया. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे सुखधाम. सुखधामला स्वर्ग, दुःखधामला नरक म्हटले जाते. लोकांना शांती हवी आहे, परंतु तिथे कोणीही जाऊ शकत नाहीत. बाबा म्हणतात - मी जोपर्यंत इथे भारतामध्ये येत नाही तोपर्यंत माझ्याशिवाय तुम्ही मुले जाऊ शकत नाही. भारतामध्येच शिवजयंती गायली जाते. निराकार जरूर साकार मध्ये येईल ना. शरीराशिवाय आत्मा काही करू शकते का? शरीराशिवाय तर आत्मा भटकत राहते. दुसऱ्याच्या शरीरामध्ये देखील प्रवेश करते. काही आत्मे चांगले असतात, कोणी चंचल असतात, एकदम वेडे बनवतात. आत्म्याला शरीर जरूर पाहिजे. तसेच परमपिता परमात्म्याला देखील शरीर नसेल तर भारतामध्ये येऊन काय करतील! भारतच अविनाशी खंड आहे. सतयुगामध्ये एकच भारत खंड आहे. बाकी सर्व खंड नष्ट होतात. महिमा करतात की, आदि सनातन देवी-देवता धर्म होता. हे (या दुनियेतील) लोक मग आदि सनातन हिंदू धर्म म्हणतात. वास्तविक सुरुवातीला काही हिंदू नाही परंतु देवी-देवता होते. युरोपमध्ये राहणारे स्वतःला ख्रिश्चन म्हणतात. जे दैवी धर्माचे श्रेष्ठ होते, तेच ८४ जन्मांमध्ये येत धर्मभ्रष्ट बनले आहेत. देवता धर्माचे जे असतील तेच इथे येतील. जर निश्चय नसेल तर समजा ते या धर्माचे नाहीत. भले इथे बसले असतील परंतु तरीही त्यांना काहीच समजणार नाही. तिथे प्रजेमध्ये कोणते कमी पद मिळवणारा असेल. सर्वांनाच सुख-शांती हवी आहे, ते असतेच सतयुगामध्ये. सगळेच काही सुखधाममध्ये जाऊ शकत नाहीत. सर्व धर्म आपापल्या वेळेवर येतात. अनेक धर्म आहेत, झाडाची वृद्धी होत राहते. मूळ खोड आहे देवी-देवता धर्म. मग आहेत तीन ट्यूब (तीन धर्म). स्वर्गामध्ये तर हे असू शकत नाहीत. द्वापर पासून पुढे नवीन धर्म येतात, त्याला व्हरायटी ह्यूमन ट्री (विविध मानवी वृक्ष) म्हटले जाते. विराट रूप वेगळे आहे, हे व्हरायटी धर्मांचे झाड आहे. विविध प्रकारचे मनुष्य आहेत. तुम्ही जाणता किती धर्म आहेत. सतयुग आदि मध्ये एकच धर्म होता, नवीन दुनिया होती. बाहेरचे देखील जाणतात, भारतच प्राचीन बहिश्त होता. खूप श्रीमंत होता म्हणून भारताला खूप मान मिळतो. एखादा श्रीमंत जेव्हा गरीब बनतो तेव्हा त्याच्यावर दया करतात. बिचाऱ्या भारताचे काय झाले आहे! हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. म्हणतात देखील - सर्वात जास्त दयाळू ईश्वरच आहेत आणि येतात देखील भारतामध्येच. गरिबांवर जरूर श्रीमंतच दया करतील ना. बाबा आहेत बेहदचे श्रीमंत, उच्च ते उच्च बनविणारे. तुम्ही कोणाची संतान बनला आहात याचा देखील नशा असला पाहिजे. परमपिता परमात्मा शिवची आपण संतान आहोत, ज्यालाच जीवनमुक्ती दाता, सद्गती दाता म्हणतात. जीवनमुक्ती सर्वप्रथम सतयुगामध्ये असते. इथे तर आहे - जीवनबंध. भक्तीमार्गामध्ये बोलावतात बाबा बंधनातून सोडवा. आता तुम्ही बोलावू शकत नाही.

तुम्ही जाणता - बाबा जे ज्ञानाचा सागर आहेत, तेच जगाच्या इतिहास-भूगोलाचे सार समजावून सांगत आहेत. हे (ब्रह्मा बाबा) तर स्वतः म्हणतात - ‘मी भगवान नाही’. तुम्हाला तर देहापासून न्यारे देही-अभिमानी बनायचे आहे. साऱ्या दुनियेला, आपल्या शरीराला देखील विसरायचे आहे. हे भगवान नाहीत. यांना म्हणतातच बापदादा. बाबा आहेत उच्च ते उच्च. हे पतित जुने तन आहे. महिमा फक्त एकाचीच आहे. त्यांच्यासोबत योग लावायचा आहे तेव्हाच पावन बनाल. नाही तर कधीच पावन बनू शकणार नाही आणि शेवटी हिशोब चुकता करून सजा खाऊन निघून जाल. भक्तिमार्गामध्ये ‘हम सो, सो हम’चा मंत्र ऐकत आला आहात. ‘आपण आत्मा सो परमपिता परमात्मा, सो आपण आत्मा’ हाच चुकीचा मंत्र परमात्म्यापासून बेमुख करणारा आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, ‘परमात्मा सो आपण आत्मा’ असे म्हणणे हे एकदम चुकीचे आहे. आता तुम्हा मुलांना वर्णांचे रहस्य देखील समजावून सांगितले गेले आहे. हम सो ब्राह्मण आहोत मग हम सो देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. मग हम सो देवता बनून क्षत्रिय वर्णामध्ये येणार. बाकी कोणाला थोडेच माहित आहे की आपण कसे ८४ जन्म घेतो? कोणत्या कुळामध्ये घेतो? तुम्ही आता समजता आपण ब्राह्मण आहोत, बाबा काही ब्राह्मण नाहीत. तुम्हीच या वर्णांमध्ये येता. आता ब्राह्मण धर्मामध्ये ॲडॉप्ट केले आहे. शिवबाबांद्वारे प्रजापिता ब्रह्माची संतान बनला आहात. हे देखील जाणता - निराकारी आत्मे खरे ईश्वरीय कुळाचे आहेत. निराकारी दुनियेमध्ये राहणारे आहेत. मग साकारी दुनियेमध्ये येतात. पार्ट बजावण्यासाठी यावे लागते. तिथून आलो मग आपण देवता कुळामध्ये ८ जन्म घेतले, नंतर मग आपण क्षत्रिय कुळामध्ये, वैश्य कुळामध्ये जातो. बाबा समजावून सांगतात - तुम्ही इतके जन्म दैवी कुळामध्ये घेतले, मग इतके जन्म क्षत्रिय कुळामध्ये घेतले. ८४ जन्मांचे चक्र आहे. तुमच्याशिवाय हे ज्ञान दुसऱ्या कोणालाही मिळू शकणार नाही. जे या धर्माचे असतील तेच इथे येतील. राजधानी स्थापन होत आहे. कोणी राजा-राणी कोणी प्रजा बनतील. सूर्यवंशी लक्ष्मी-नारायण दि फर्स्ट, सेकंड, थर्ड - अशा आठ गाद्या (पिढ्या) चालतात मग क्षत्रिय धर्मामध्ये देखील फर्स्ट, सेकंड, थर्ड असे चालते. या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगतात. ज्ञानाचे सागर जेव्हा येतात तेव्हा भक्ती संपुष्टात येते. रात्र संपून दिवस होतो. तिथे कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. आरामच आराम आहे, काहीच गोंधळ नाही. हा देखील ड्रामा बनलेला आहे. भक्ती कल्टमध्येच (भक्ती पंथामध्येच) बाबा येतात. सर्वांना परत जरूर जायचे आहे मग नंबरवार उतरतात. क्राईस्ट येईल तेव्हा मग त्यांच्या धर्माचे देखील येत राहतील. आता बघा किती ख्रिश्चन आहेत. तर मग क्राईस्ट झाला ख्रिश्चन धर्माचे बीज. या देवी-देवता धर्माचे बीज आहे - परमपिता परमात्मा शिव. तुमचा धर्म स्थापन करतात परमपिता परमात्मा. तुम्हाला ब्राह्मण धर्मामध्ये कोणी आणले? बाबांनी ॲडॉप्ट केले, तर त्यापासून छोटा ब्राह्मण धर्म तयार झाला. ब्राह्मणांची शेंडी गायली जाते. ती निशाणी आहे शेंडी मग खाली याल तर शरीर वाढत जाते. या सर्व गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात. जे बाबा कल्याणकारी आहेत तेच येऊन भारताचे कल्याण करतात. सर्वात जास्त कल्याण तर तुम्हा मुलांचेच करतात. तुम्ही कोणा पासून कोण बनता! तुम्ही अमरलोकचे मालक बनता. आताच तुम्ही काम विकारावर विजय प्राप्त करता. तिथे अकाली मृत्यू होत नाही. मृत्यूची गोष्टच नाही. बाकी चोला (शरीर) तर बदलणार ना. जसे सर्प एक कात टाकून दुसरी घेतो. इथे देखील तुम्ही ही जुनी कात टाकून नवीन दुनियेमध्ये नवीन कात घेणार. सतयुगाला म्हटले जाते गार्डन ऑफ फ्लॉवर्स (फुलांचा बगीचा). तिथे कधीही कोणते कु-वचन बोलले जात नाही. इथे तर आहेच कुसंग. मायेचा संग आहे ना म्हणून याचे नावच आहे रौरव नरक. जुनी जागा झाली की मग म्युन्सिपाल्टीवाले आधीच ती रिकामी करायला लावतात. बाबा देखील म्हणतात जेव्हा दुनिया जुनी होते तेव्हा मी येतो.

ज्ञानाने सद्गती होते. राजयोग शिकवला जातो. भक्तीमध्ये तर काहीच नाहीये. हां, जसे दान-पुण्य करतात तर अल्पकाळासाठी सुख मिळते. राजांमध्ये देखील संन्यासी लोक वैराग्य निर्माण करतात, हे तर कागविष्ठेसमान सुख आहे. आता तुम्हा मुलांना बेहदचे वैराग्य शिकवले जाते. ही आहेच जुनी दुनिया, आता सुखधामाची आठवण करा, मग व्हाया शांतीधाम इथे यायचे आहे. दिलवाडा मंदिरामध्ये हुबेहूब तुमचे या वेळचे यादगार (स्मारक) आहे. खाली तपस्येमध्ये बसले आहेत, वर आहे स्वर्ग. नाहीतर स्वर्ग कुठे दाखवणार. व्यक्तीचा मृत्यू होतो तर म्हणतात स्वर्गात गेला. स्वर्ग वर आहे असे समजतात परंतु वरती काहीही नाही. भारतच स्वर्ग, भारतच नरक बनतो. हे मंदिर पूर्ण यादगार आहे. हे मंदिर इत्यादी सर्व नंतर बनतात. स्वर्गामध्ये भक्ती असत नाही. तिथे तर सुखच सुख आहे. बाबा येऊन सर्व रहस्ये समजावून सांगतात. बाकी सर्व आत्म्यांची नावे बदलतात, शिवाचे नाव बदलत नाही. त्यांना स्वतःचे शरीर नाहीये. शरीराशिवाय शिकवणार कसे! प्रेरणेची तर कोणती गोष्टच नाही. प्रेरणेचा अर्थ आहे विचार. असे नाही, वरून प्रेरणा देतील आणि आपण तिथे पोहोचणार, यामध्ये प्रेरणेची कोणती गोष्टच नाही. ज्या मुलांना बाबांची पूर्ण ओळख नाही, पूर्ण निश्चय नाही त्यांच्या बुद्धीमध्ये आठवण देखील राहणार नाही. आपल्याला कोण शिकवत आहेत, ते जाणतच नाहीत तर आठवण तरी कोणाची करतील? बाबांच्या आठवणीनेच तुमची विकर्म विनाश होतील. जे जन्म-जन्मांतर लिंगाचीच आठवण करतात, समजतात हे परमात्मा आहेत, हे त्याचे चिन्ह आहे, हे निराकार आहेत, साकार नाहीत. बाबा म्हणतात - मला देखील प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. नाही तर तुम्हाला सृष्टी चक्राचे रहस्य कसे समजावून सांगू. हे आहे रूहानी नॉलेज. आत्म्यांनाच हे नॉलेज मिळते. हे नॉलेज एक बाबाच देऊ शकतात. पुनर्जन्म तर घ्यायचाच आहे. सर्व ॲक्टर्सना पार्ट मिळालेला आहे. निर्वाणमध्ये कोणीही जाऊ शकत नाही. मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत. जे नंबर वन विश्वाचे मालक बनतात तेच ८४ जन्मांमध्ये येतात. चक्र जरूर फिरायचेच आहे. मनुष्य समजतात मोक्ष मिळतो, किती मतमतांतरे आहेत. वृद्धी होतच राहते. परत कोणीही जात नाहीत. बाबाच ८४ जन्मांची कहाणी सांगतात. तुम्हा मुलांना शिकून मग शिकवायचे आहे. हे रूहानी नॉलेज तुमच्याशिवाय दुसरे कोणीही देऊ शकत नाही. ना शूद्र देऊ शकत, ना देवता देऊ शकत. सतयुगामध्ये दुर्गती होतच नाही ज्यासाठी नॉलेज मिळेल. हे नॉलेज आहेच सद्गतीकरिता. सद्गती दाता लिब्रेटर गाईड एकच आहेत. आठवणीच्या यात्रे शिवाय कोणीही पवित्र बनू शकत नाही. सजा जरूर भोगाव्या लागतील. पद देखील भ्रष्ट होईल. सर्वांचा हिशोब चुकता तर होणारच आहे. तुम्हाला तुमचीच गोष्ट समजावून सांगतात दुसऱ्या धर्मांमध्ये जाण्याची काय गरज आहे. भारतवासीयांनाच हे नॉलेज मिळते. बाबा देखील भारतामध्येच येऊन तीन धर्म स्थापन करतात. आता तुम्हाला शूद्र धर्मातून काढून उच्च कुळामध्ये घेऊन जातात. ते आहे नीच पतित कुळ, आता पावन बनविण्यासाठी तुम्ही ब्राह्मण निमित्त बनता. याला रुद्र ज्ञान यज्ञ म्हटले जाते. रुद्र शिवबाबांनी यज्ञ रचला आहे, या बेहदच्या यज्ञामध्ये साऱ्या जुन्या दुनियेची आहुती पडणार आहे. आणि मग नवीन दुनिया स्थापन होईल. जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुम्ही हे नॉलेज घेताच नवीन दुनियेसाठी. देवतांची सावली जुन्या दुनियेमध्ये पडत नाही. तुम्ही मुले जाणता की कल्पापूर्वी जे आले असतील तेच येऊन ज्ञान घेतील. नंबरवार पुरुषार्था नुसार अभ्यास करतील. मनुष्य इथेच शांतीची इच्छा करतात. आता आत्मा तर आहेच शांतीधामची राहणारी. बाकी इथे शांती कशी असू शकते. यावेळी तर घराघरामध्ये अशांती आहे. रावण राज्य आहे ना. सतयुगामध्ये पूर्णपणे शांतीचेच राज्य असते. एक धर्म, एक भाषा असते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या जुन्या दुनियेपासून बेहदचे वैरागी बनून आपल्या देहाला देखील विसरून शांतिधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे. निश्चय बुद्धी बनून आठवणीच्या यात्रेमध्ये रहायचे आहे.

२) ‘हम सो, सो हम’ च्या मंत्राला यथार्थ रित्या समजून घेऊन आता ब्राह्मण सो देवता बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. सर्वांना याचा यथार्थ अर्थ समजावून सांगायचा आहे.

वरदान:-
अंतर्मुखतेच्या अभ्यासाद्वारे अलौकिक भाषेला समजणारे सदा सफलता संपन्न भव

तुम्ही मुले जितकी-जितकी अंतर्मुखी स्वीट सायलेन्स स्वरूपामध्ये स्थित होत जाल तितके नयनांची भाषा, भावनेची भाषा आणि संकल्पाच्या भाषेला सहज समजत जाल. ही तीन प्रकारची भाषा रुहानी योगी जीवनाची भाषा आहे. या अलौकिक भाषा खूप शक्तिशाली आहेत. वेळेनुसार या तिन्ही भाषांद्वारेच सहज सफलता प्राप्त होईल. म्हणून आता रूहानी भाषेचे अभ्यासी बना.

बोधवाक्य:-
तुम्ही इतके हलके बना जेणेकरून बाबा तुम्हाला आपल्या पापण्यांवर बसवून सोबत घेऊन जातील.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

वर्तमान समयी विश्व कल्याण करण्याचे सोपे साधन आपल्या श्रेष्ठ संकल्पांची एकाग्रता आहे, याद्वारेच सर्व आत्म्यांच्या भटकणाऱ्या बुद्धीला एकाग्र करू शकाल. विश्वातील सर्व आत्मे विशेष हीच इच्छा ठेवतात की भटकणारी बुद्धी एकाग्र व्हावी किंवा मन चंचलता सोडून एकाग्र व्हावे, यासाठी एकाग्रता अर्थात ‘सदैव एक बाबा दुसरे ना कोणी’, या स्मृतीने एकरस स्थितीमध्ये स्थित होण्याचा विशेष अभ्यास करा.