16-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही आहात रूहानी पंडे, तुम्हाला सर्वांना शांतीधाम अर्थात अमरपुरीचा
रस्ता सांगायचा आहे”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कोणता नशा आहे, त्या नशेच्या आधारावर कोणते निश्चयाचे बोल बोलता?
उत्तर:-
तुम्हा मुलांना हा नशा आहे की आपण बाबांची आठवण करून जन्म-जन्मांतरीसाठी पवित्र बनतो.
तुम्ही निश्चयाने म्हणता की भले कितीही विघ्न पडू देत परंतु स्वर्गाची स्थापना तर
जरूर होणारच आहे. नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे. हा
पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामध्ये संशयाचा प्रश्नच नाही.
ओम शांती।
रुहानी मुलांप्रति रूहानी बाबा समजावून सांगत आहेत. तुम्ही जाणता आपण आत्मा आहोत.
यावेळी आपण रूहानी पंडे बनलो आहोत. बनतो देखील आणि बनवतो देखील. या गोष्टी चांगल्या
रीतीने धारण करा. मायेचे वादळ विसरायला लावते. रोज सकाळ-संध्याकाळ हा विचार केला
पाहिजे - ही अमूल्य रत्ने, अमूल्य जीवनासाठी रूहानी बाबांकडून मिळत आहेत. तर रूहानी
बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, तुम्ही आता मुक्तीधामचा रस्ता दाखवणारे रूहानी
पंडे अथवा गाईड्स आहात’. ही आहे खरी-खरी अमर कथा, अमरपुरी मध्ये जाण्याची. अमर-पुरी
मध्ये जाण्याकरिता तुम्ही पवित्र बनत आहात. अपवित्र भ्रष्टाचारी आत्मा अमरपुरी मध्ये
कशी बरे जाईल? मनुष्य अमरनाथच्या यात्रेला जातात, स्वर्गाला देखील अमरनाथ पुरी
म्हणणार. एकटा अमरनाथ थोडाच असतो. तुम्ही सर्व आत्मे अमरपुरी मध्ये जात आहात. ती आहे
आत्म्यांची अमरपुरी - परमधाम नंतर मग अमरपुरी मध्ये येतात शरीरासोबत. तिथे कोण घेऊन
जातात? परमपिता परमात्मा सर्व आत्म्यांना घेऊन जातात. त्याला अमरपुरी देखील म्हणू
शकता. परंतु राईट नाव शांतीधाम आहे. तिथे तर सर्वांना जायचेच आहे. ड्रामाची भावी तर
टाळायची म्हटली तरी टळणार नाही. हे चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करा.
सर्वप्रथम आत्मा तर समजा. परमपिता परमात्मा देखील आत्माच आहेत. फक्त त्यांना परमपिता
परमात्मा म्हणतात, ते आम्हाला समजावून सांगत आहेत. तेच ज्ञानाचा सागर आहेत,
पवित्रतेचा सागर आहेत. आता मुलांना पवित्र बनण्यासाठी श्रीमत देतात की, ‘मामेकम् (मज
एकाची) आठवण करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील’. आठवणीलाच योग म्हटले
जाते. तुम्ही तर मुले आहात ना. बाबांची आठवण करायची आहे. आठवणीनेच बेडा (जीवनरूपी
नौका) पार होईल. या विषय-नगरी मधून तुम्ही शिव-नगरीमध्ये जाल आणि मग विष्णुपुरीमध्ये
याल. आपण शिकतोच तिथल्यासाठी, इथल्यासाठी नाही. इथे जे राजे बनतात, ते धन दान
केल्यामुळे बनतात. असे कित्येकजण आहेत जे गरीबांची खूप काळजी घेतात, कोणी हॉस्पिटल,
धर्मशाळा इत्यादी बनवतात, कोणी धन दान करतात. जसे सिंधमध्ये मूलचंद होता, गरिबांकडे
जाऊन दान करत असत. गरिबांची खूप काळजी घेत होते. असे पुष्कळ दानशूर असतात. पहाटे
उठून मुठभर धान्य बाजूला काढतात, गरिबांना दान करतात. आजकाल तर खूप फसवणूक होत आहे.
पात्र असणाऱ्याला दान दिले पाहिजे. तेवढी अक्कल काही नाही आहे. बाहेर जे भीक
मागण्यासाठी बसलेले असतात त्यांना देणे, हे देखील काही दान नाहीये. त्यांचा तर हा
धंदाच आहे. गरिबांना दान करणारा चांगले पद प्राप्त करतो.
आता तुम्ही सर्व आहात
रूहानी पंडे. तुम्ही प्रदर्शनी अथवा म्युझियम उघडता तर त्याला असे नाव द्या ज्यामुळे
सिद्ध होईल की, गाईड टू हेवन अथवा नवीन विश्वाच्या राजधानीचे गाईड्स. परंतु मनुष्य
काहीही समजत नाहीत. हे आहेच काट्यांचे जंगल. स्वर्ग आहे फुलांचा बगीचा, जिथे देवता
राहतात. तुम्हा मुलांना हा नशा असला पाहिजे की आपण बाबांची आठवण करून
जन्म-जन्मांतरासाठी पवित्र बनतो. तुम्ही जाणता भले कितीही विघ्न पडली तरीही
स्वर्गाची स्थापना तर जरूर होणार आहे. नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा
विनाश होणारच आहे. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामध्ये संशयाचा प्रश्नच नाही. जरा
देखील संशय येता कामा नये. हे तर सगळेच म्हणतात - ‘पतित-पावन’. इंग्रजीमध्ये देखील
म्हणतात - ‘येऊन दुःखातून लिब्रेट करा’. दुःख आहेच पाच विकारांमुळे. ते (नवीन दुनिया)
आहेच व्हाईसलेस वर्ल्ड, सुख-धाम. आता तुम्हा मुलांना जायचे आहे स्वर्गामध्ये.
मनुष्य समजतात की, स्वर्ग वरती आहे, परंतु त्यांना हे माहित नाही आहे की मुक्तिधाम
वरती आहे. जीवनमुक्तीमध्ये तर इथेच यायचे आहे. हे बाबा तुम्हाला समजावून सांगतात,
त्याला चांगल्या रीतीने धारण करून ज्ञानाचेच मंथन करायचे आहे. स्टुडंट देखील घरी
हाच विचार करत असतात - ‘हा पेपर पूर्ण करून द्यायचा आहे, आज हे करायचे आहे’. तर
तुम्हा मुलांना स्वतःच्या कल्याणासाठी आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. पवित्र
बनून मुक्तिधाममध्ये जायचे आहे आणि ज्ञानाद्वारे मग देवता बनतो. आत्मा म्हणते ना मी
मनुष्यापासून बॅरिस्टर बनते. मी आत्मा मनुष्यापासून गव्हर्नर बनते. आत्मा बनते
शरीरासोबत. शरीर नष्ट झाले की मग नव्याने शिकावे लागते. आत्माच पुरुषार्थ करते
विश्वाचा मालक बनण्यासाठी. बाबा म्हणतात - हे पक्के लक्षात ठेवा की, आपण आत्मा आहोत,
देवतांना असे सांगावे लागत नाही, आठवण करावी लागत नाही कारण ते तर आहेतच पावन.
प्रारब्ध भोगत आहेत, पतित थोडेच आहेत ज्यासाठी बाबांची आठवण करतील. तुम्ही आत्मा
पतित आहात म्हणून बाबांची आठवण करायची आहे. त्यांना तर आठवण करण्याची गरजच नाही. हा
ड्रामा आहे ना. एकही दिवस एक सारखा असत नाही. हा ड्रामा चालत राहतो. पूर्ण दिवसाचा
पार्ट सेकंदा-सेकंदाला बदलत राहतो. शूट होत राहतो. तर बाबा मुलांना समजावून सांगतात,
कोणत्याही गोष्टीमध्ये हार्ट फेल (निराश) होऊ नका. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. भले
आपला धंदा इत्यादी करा, परंतु भविष्य उच्च पद प्राप्त करण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ
करा. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील रहायचे आहे. कुमारी तर गृहस्थीमध्ये गेलेल्याच नाही
आहेत. गृहस्थी त्यांना म्हटले जाते ज्यांना मुले-बाळे आहेत. बाबा तर अधरकुमारी आणि
कुमारी सर्वांना शिकवतात. ‘अधरकुमारी’ याचा अर्थ देखील समजत नाहीत. अर्धे शरीर आहे
काय? आता तुम्ही जाणता कन्या पवित्र आहेत आणि अधर-कन्या त्यांना म्हटले जाते ज्या
अपवित्र बनल्यानंतर पुन्हा पवित्र बनतात. तुमचेच यादगार उभे आहे. बाबाच तुम्हा
मुलांना समजावून सांगतात. बाबा तुम्हाला शिकवत आहेत. तुम्ही जाणता आपण आत्मे
मूलवतनला देखील जाणतो, आणि मग सूर्यवंशी, चंद्रवंशी कसे राज्य करतात, क्षत्रियपणाची
निशाणी बाण का दिला आहे, हे देखील तुम्हीच जाणता. युद्ध इत्यादीची तर गोष्टच नाही.
ना असुरांची गोष्ट आहे, ना चोरीची गोष्ट सिद्ध होते. असा तर कोणी रावण नसतो जो
सीतेला घेऊन जाईल. तर बाबा समजावून सांगतात - गोड-गोड मुलांनो, तुम्ही समजता आपण
आहोत हेवनचे, मुक्ती-जीवनमुक्तीचे पंडे. ते आहेत देहधारी पंडे. आपण आहोत रुहानी पंडे.
ते आहेत कलियुगी ब्राह्मण. तुम्ही संगमयुगी ब्राह्मण आता पुरुषोत्तम बनण्यासाठी
शिकत आहात. बाबा अनेक प्रकारे समजावून सांगत राहतात. तरीही देह-अभिमानामध्ये
आल्यामुळे विसरून जातात. मी आत्मा आहे, बाबांची संतान आहे, तो नशा राहत नाही. जितकी
आठवण करत रहाल तितका देह-अभिमान नष्ट होत जाईल. आपली काळजी घेत रहा. बघा, आपला
देह-अभिमान नष्ट झाला आहे? आपण आता जात आहोत नंतर मग विश्वाचा मालक बनणार. आपला
पार्टच हिरो-हिरोईनचा आहे. हिरो-हिरोईन नाव तेव्हा मिळते जेव्हा विजय प्राप्त करतात.
तुम्ही विजय प्राप्त करता तेव्हाच तर तुम्हाला यावेळी हिरो-हिरोईनचे नाव मिळते,
यापूर्वी नव्हते. हरणाऱ्याला हिरो-हिरोईन म्हणणार नाही. तुम्ही मुले जाणता आपण आता
जाऊन हिरो-हिरोईन बनणार. तुमचा पार्ट उच्च ते उच्च आहे. कवडीमध्ये आणि हिऱ्यामध्ये
तर खूपच फरक आहे ना. भले कोणी कितीही लखपती अथवा करोडपती असतील परंतु तुम्ही जाणता
ते सगळे नष्ट होतील.
तुम्ही आत्मे धनवान
बनत जाता. बाकी सर्वांचे दिवाळे निघत आहे. या सर्व गोष्टी धारण करायच्या आहेत.
दृढनिश्चयी होऊन रहायचे आहे. इथे नशा चढतो आणि बाहेर गेल्यावर नशा उतरतो. इथल्या
गोष्टी इथेच राहतात. बाबा म्हणतात - बुद्धीमध्ये रहावे की, बाबा आम्हाला शिकवत आहेत.
ज्या शिक्षणामुळे आपण मनुष्यापासून देवता बनणार आहोत. यामध्ये त्रासाची कोणती गोष्ट
नाही. धंदा इत्यादीमधून थोडा वेळ काढून आठवण करू शकता. हा देखील आपल्यासाठी धंदा आहे
ना. सुट्टी काढून जा आणि बाबांची आठवण करा. हे काही खोटे बोलत नाहीत. पूर्ण दिवस
असाच थोडाच वाया घालवायचा आहे. आपल्याला भविष्याचा काही तरी विचार केला पाहिजे.
युक्त्या खूप आहेत, जितके शक्य होईल वेळ काढून बाबांची आठवण करा. शरीर निर्वाहासाठी
धंदा इत्यादी सुद्धा भले करा. मी तुम्हाला विश्वाचा मालक बनण्यासाठी खूप चांगला
सल्ला देतो. तुम्ही मुले देखील सर्वांना सल्ला देणारे आहात. मंत्री सल्ला देण्यासाठी
असतात ना. तुम्ही सल्लागार आहात. सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती कशी मिळेल, या
जन्मामध्ये तो रस्ता तुम्ही सांगता. लोक स्लोगन इत्यादी बनवतात तर ती भिंतीवर
टांगतात. जसे तुम्ही लिहिता - ‘बी होली अँड राज-योगी (पवित्र बना आणि राजयोगी बना)’.
परंतु यावरून समजणार नाहीत. आता तुम्ही समजता आपल्याला बाबांकडून हा वारसा मिळत आहे,
मुक्तिधामचा देखील वारसा आहे. मला तुम्ही ‘पतित-पावन’ म्हणता तर मी येऊन पावन
बनण्याचा सल्ला देतो. तुम्ही देखील सल्लागार आहात. मुक्तिधाममध्ये कोणीही जाऊ शकत
नाहीत, जोपर्यंत बाबा सल्ला देत नाहीत, श्रीमत देत नाहीत. ‘श्री’ अर्थात श्रेष्ठ मत
आहेच शिवबाबांचे. आत्म्यांना श्रीमत मिळते शिवबाबांचे. पाप-आत्मा, पुण्य-आत्मा
म्हटले जाते. पाप-शरीर म्हणणार नाही. आत्मा शरीराद्वारे पाप करते म्हणून पाप आत्मा
म्हटले जाते, शरीराशिवाय आत्मा पापही करू शकत नाही आणि पुण्यही करू शकत नाही. तर
जितके शक्य असेल तितके विचार सागर मंथन करा. वेळ तर खूप आहे. टीचर किंवा प्रोफेसर
असतील तर त्यांना देखील युक्तीने हे रुहानी शिक्षण शिकवले पाहिजे, ज्यामुळे कल्याण
होईल. बाकी या भौतिक शिक्षणाने काय होणार. आपण हे शिकतो. बाकी थोडे दिवस आहेत,
विनाश समोर उभा आहे. आतमध्ये स्फूर्ती येत राहील की, कसा लोकांना रस्ता सांगावा.
एका मुलीला पेपर
मिळाला होता ज्यामध्ये गीतेचा भगवान कोण, असा प्रश्न विचारला होता. तर तिने लिहिले
की, गीतेचा भगवान शिव आहे, तर तिला नापास केले. तिला वाटत होते - मी तर बाबांची
महिमा लिहित आहे - गीतेचा भगवान शिव आहे. ते ज्ञानाचा सागर आहेत, प्रेमाचा सागर
आहेत. श्रीकृष्णाची आत्मा देखील ज्ञान घेत आहे. हे तिने लिहिले तर नापास झाली.
आई-वडिलांना सांगितले - मी हे शिकणार नाही. आता या रुहानी शिक्षणाला लागणार. मुलगी
देखील एकदम फर्स्टक्लास आहे. आधीच म्हणत होती - मी असे लिहिले तर नापास होईन. परंतु
सत्य तर लिहायचे आहे ना. पुढे चालून समजतील की खरोखर या मुलीने जे लिहिले होते ते
सत्य आहे. जेव्हा प्रभाव निघेल किंवा प्रदर्शनी अथवा म्युझियममध्ये त्यांना बोलवाल
तेव्हा माहित होईल आणि बुद्धीमध्ये येईल की हे तर बरोबर आहे. असंख्य मनुष्य येतात
तर विचार करायचा आहे की असे काही करावे ज्यामुळे मनुष्य लगेच समजतील की ही काहीतरी
नवीन गोष्ट आहे. कोणी ना कोणी जरूर समजतील, जे इथले असतील. तुम्ही सर्वांना रुहानी
रस्ता सांगता. बिचारे किती दुःखी आहेत, त्या सर्वांचे दुःख कसे दूर करावे. कलह तर
खूप आहेत ना. एकमेकांचे शत्रू बनतात तर कसे खलास करून टाकतात. आता बाबा मुलांना
चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात. माता तर बिचाऱ्या अबोध असतात. म्हणतात -
आम्ही काही शिकल्या-सवरलेल्या नाही आहोत. बाबा म्हणतात - शिकलेल्या नाही आहात तेच
चांगले आहे. वेद-शास्त्र जी काही वाचली आहेत ती सर्व इथेच विसरायची आहेत. आता मी जे
काही सांगतो, ते ऐका. समजावून सांगितले पाहिजे - सद्गती, निराकार परमपिता
परमात्म्याशिवाय दुसरे कोणीच करू शकत नाही. लोकांमध्ये ज्ञानच नाही आहे तर ते मग
सद्गती कसे बरे करू शकतील. सद्गती दाता ज्ञानाचा सागर आहेच मुळी एक. मनुष्य असे
थोडेच म्हणतील, जे इथले असतील तेच समजून घेण्याचा प्रयत्न करतील. एक जरी कोणी मोठी
व्यक्ती निघाली तरी आवाज होईल (प्रसिद्धी मिळेल). गायन आहे - ‘तुलसीदास गरीब की कोई
न सुनें बात’. सेवेच्या युक्त्या तर बाबा भरपूर सांगतात, मुलांनी अंमलात आणल्या
पाहिजेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) धंदा
इत्यादी करत असताना भविष्य उच्च पद प्राप्त करण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा
पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. हा ड्रामा सेकंद बाय सेकंद बदलत राहतो त्यामुळे
कोणताही सीन बघून हार्ट फेल (निराश) व्हायचे नाही.
२) हे रुहानी शिक्षण
शिकून दुसऱ्यांना शिकवायचे आहे, सर्वांचे कल्याण करायचे आहे. आतून हीच स्फूर्ती येत
रहावी की आपण सर्वांना पावन बनण्याचा सल्ला कसा द्यावा. घरचा रस्ता सांगावा.
वरदान:-
सर्व
नात्यांमधील सहयोगाच्या अनुभूती द्वारे निरंतर योगी, सहज योगी भव
दरवेळी बाबांशी
असलेल्या विविध नात्यांचा सहयोग घेणे अर्थात अनुभव करणे हाच सहजयोग आहे. बाबा
कोणत्याही वेळी नाते निभावण्यासाठी बांधील आहेत. साऱ्या कल्पामध्ये आताच सर्व
अनुभवांची खाण प्राप्त होते त्यामुळे नेहमी सर्व नात्यांचा सहयोग घ्या आणि निरंतर
योगी, सहज योगी बना कारण जो सर्व नात्यांच्या अनुभूतीमध्ये अथवा प्राप्तीमध्ये मग्न
राहतो तो जुन्या दुनियेच्या वातावरणापासून सहजच उपराम होतो.
बोधवाक्य:-
सर्व शक्तींनी
संपन्न राहणे, हीच ब्राह्मण स्वरूपाची विशेषता आहे.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
तपस्वी मूर्तचा अर्थ
आहे - तपस्येद्वारे शांतीची, शक्तीची किरणे चारी बाजूंना पसरत असल्याचा अनुभव व्हावा.
हे तपस्वी स्वरूप इतरांना देण्याचे स्वरूप आहे. जसा सूर्य विश्वाला प्रकाशाची आणि
अनेक विनाशी प्राप्तींची अनुभूती करवितो. तसेच महान तपस्वी आत्मे ज्वाला रूपी
शक्तिशाली आठवणीद्वारे प्राप्तीच्या किरणांची अनुभूती करवितात.