16-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे, यामध्ये आशीर्वादाची गोष्ट नाहीये, तुम्ही सर्वांना हेच सांगा की, बाबांची आठवण करा तर सर्व दुःखे दूर होतील”

प्रश्न:-
लोकांना कोणत्या ना कोणत्या चिंता आहेत? तुम्हा मुलांना कोणतीही चिंता नाही - असे का?

उत्तर:-
लोकांना यावेळी चिंताच चिंता आहे - मुलगा आजारी पडला तरी चिंता, मुलाचा मृत्यू झाला तरी चिंता, कोणाला मुलगा झाला नाही तरी चिंता, कोणी धान्याचा जास्त साठा केला, पोलीस किंवा इन्कम टॅक्सवाले आले तरी चिंता… ही आहेच घाणेरडी दुनिया, दुःख देणारी. तुम्हा मुलांना कोणतीही चिंता नाही, कारण तुम्हाला सद्गुरु बाबा मिळाले आहेत. म्हणतात देखील - ‘फिक्र से फारिग कींदा स्वामी सद्गुरु… (ईश्वर सद्गुरूने चिंतेपासून मुक्त केले)’ आता तुम्ही अशा दुनियेमध्ये जाता जिथे कोणतीही चिंता नाही.

गीत:-
तू प्यार का सागर है…

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी गाणे ऐकले. अर्थ देखील समजतात, आपल्याला देखील मास्टर प्रेमाचा सागर बनायचे आहे. सर्व आत्मे बांधव आहेत. तर बाबा तुम्हा बांधवांना म्हणतात, जसा मी प्रेमाचा सागर आहे, तुम्हाला देखील खूप प्रेमाने चालायचे आहे. देवतांमध्ये खूप प्रेम आहे, किती त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना भोग लावतात. आता तुम्हाला पवित्र बनायचे आहे, काही मोठी तर गोष्ट नाहीये. ही खूपच छी-छी दुनिया आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता असते. दुःखा मागून दुःखच आहे. याला म्हटले जाते दुःखधाम. पोलीस अथवा इन्कमटॅक्सवाले येतात, लोकांना किती यातना होतात, काही विचारू नका. कोणी धान्याचा जास्त साठा केला, आले पोलीस, घाबरून पिवळे पडतात. ही कसली घाणेरडी दुनिया आहे. नरक आहे ना. स्वर्गाची आठवण देखील करतात. नरकानंतर स्वर्ग, स्वर्गानंतर नरक - हे चक्र फिरतच राहते. मुले जाणतात - आता बाबा आले आहेत स्वर्गवासी बनविण्याकरिता. नरकवासी पासून स्वर्गवासी बनवतात. तिथे विकार असत नाहीत कारण रावणच नाही. ते आहेच संपूर्ण निर्विकारी शिवालय. हे आहे वेश्यालय. आता थोडेसे थांबा, सर्वांना कळेल की, या दुनियेमध्ये सुख आहे का दुःख आहे. थोडासा जरी भूकंप इत्यादी झाला तर लोकांची काय हालत होते. सतयुगामध्ये चिंतेचा प्रश्नच नाही. इथे तर खूप चिंता आहेत - मुलगा आजारी पडला तरी चिंता, मुलाचा मृत्यू झाला तरी चिंता. चिंताच चिंता. ‘फिकर से फारिग कींदा स्वामी…’ सर्वांचा स्वामी तर एकच आहे ना. तुम्ही शिवबाबांच्या समोर बसला आहात. हे ब्रह्मा काही गुरु नाहीत. हा तर भाग्यशाली रथ आहे. बाबा या भागीरथा द्वारे तुम्हाला शिकवत आहेत. ते ज्ञानाचा सागर आहेत. तुम्हाला देखील पूर्ण नॉलेज मिळाले आहे. असे कोणते देवी-देवता नाहीत ज्यांना तुम्ही जाणत नाही. सत्य आणि असत्याची पारख तुम्हाला आहे. दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. सच-खंड होता, आता आहे झुठ-खंड.हे कोणालाच माहित नाही की, सच-खंड केव्हा आणि कोणी स्थापन केला. ही आहे अज्ञानाची अंधारी रात्र. बाबा येऊन प्रकाश देतात. गातात देखील - ‘तुम्हारी गत-मत तुम ही जानो’. उच्च ते उच्च ते एकच आहेत, बाकी सर्व आहे रचना. ते रचता आहेत बेहदचे बाबा. ते आहेत हदचे पिता जे २-४ मुलांना रचतात (जन्म देतात). मूल झाले नाही तर चिंता वाटू लागते. तिथे तर अशी कोणती गोष्टच नसते. तुम्ही आयुष्यमान भव, धनवान भव… असता. तुम्ही कोणता आशीर्वाद देत नाही. हे तर शिक्षण आहे ना. तुम्ही आहात शिक्षक. तुम्ही तर फक्त म्हणता शिवबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ही देखील टचिंग झाली ना. याला म्हटले जाते सहज योग अथवा आठवण. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. बाबा म्हणतात - मी देखील अविनाशी आहे. तुम्ही मला बोलावता की, येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. आत्माच म्हणते ना. पतित आत्मा, महान आत्मा म्हटले जाते. पवित्रता आहे तर सुख-शांती देखील आहे.

हे आहे होलिएस्ट ऑफ होली चर्च. इथे विकारीला येण्याचा आदेश नाही. एक कहाणी देखील आहे ना - इंद्रसभेमध्ये एक परी कोणाला लपवून घेऊन गेली, त्यांना जेव्हा माहित झाले तर तिला शाप दिला की, तू दगड होशील. इथे शाप इत्यादीची काही गोष्ट नाहीये. इथे तर ज्ञानाची वर्षा होते. कोणीही पतित या होली-पॅलेसमध्ये (पवित्र महालामध्ये) येऊ शकत नाही. एक दिवस असाही असेल, हॉल सुद्धा खूप मोठा बनेल. हे होलिएस्ट ऑफ होली पॅलेस आहे. तुम्ही देखील होली बनता. लोकांना वाटते विकाराशिवाय सृष्टी कशी चालणार? हे कसे शक्य आहे? स्वतःचे ज्ञान पाजळतात. देवतांच्या समोर म्हणतात देखील - ‘तुम्ही सर्वगुण संपन्न, आम्ही पापी आहोत’. तर स्वर्ग आहे होलिएस्ट ऑफ होली (परम पावन). तेच मग ८४ जन्म घेतल्यानंतर होलिएस्ट ऑफ होली बनतात. ती आहे पावन दुनिया, ही आहे पतित दुनिया. मूल झाले तर आनंद साजरा करतात, आजारी पडले तर तोंड पिवळे पडते, मृत्यू झाला तर एकदम वेडेच होतात. असे देखील कोणा-कोणाचे होते. अशांना देखील घेऊन येतात, म्हणतात - ‘बाबा, यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे डोके खराब झाले आहे’; ही दुःखाची दुनिया आहे ना. आता बाबा सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन जातात. तर श्रीमतावर चालले पाहिजे. गुण देखील खूप चांगले पाहिजेत. जो करेल तो मिळवेल. दैवी कॅरॅक्टर (दैवी चारित्र्य) देखील पाहिजे. शाळेमध्ये रजिस्टरमध्ये कॅरेक्टर (वर्तन) देखील लिहितात. कोणी तर बाहेर उनाडक्या करत राहतात. आई-वडिलांच्या नाकामध्ये दम आणतात. आता बाबा शांतीधाम-सुखधाममध्ये घेऊन जातात. याला म्हटले जाते टॉवर ऑफ सायलेन्स अर्थात सायलेन्सचे टोक, जिथे आत्मे निवास करतात ते आहे टॉवर ऑफ सायलेन्स. सूक्ष्मवतन आहे मूवी (मूकपट), त्याचा तुम्ही फक्त साक्षात्कार करता, बाकी त्यामध्ये काहीही नाही. याचा देखील मुलांना साक्षात्कार झाला आहे. सतयुगामध्ये जेव्हा वृद्ध होतात तर आनंदाने शरीर सोडतात. ही आहे ८४ जन्मांची जुनी खाल (शरीर). बाबा म्हणतात - तुम्ही पावन होता, आता पतित बनला आहात. आता बाबा आले आहेत तुम्हाला पावन बनविण्यासाठी. तुम्ही मला बोलावले आहे ना. जीवात्माच पतित बनली आणि मग तीच पावन बनेल. तुम्ही या देवी-देवता घराण्याचे होता. आता आसुरी घराण्याचे आहात. आसुरी आणि ईश्वरीय अथवा दैवी घराण्यामध्ये किती फरक आहे. हे आहे तुमचे ब्राह्मण कुळ. घराणे डिनायस्टीला म्हटले जाते, जिथे राज्य असते. इथे राज्य नाहीये. गीतेमध्ये पांडव आणि कौरवांचे राज्य लिहिले आहे परंतु असे काही नाही आहे.

तुम्ही तर आहात रूहानी मुले. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, खूप-खूप गोड बना. प्रेमाचा सागर बना. देह-अभिमानामुळेच प्रेमाचे सागर बनत नाही म्हणून मग खूप शिक्षा भोगावी लागते. मग मोचरा आणि मानी (सजा खाऊन पद मिळते). स्वर्गामध्ये तर येणार परंतु मोचरा (सजा) खूप खाणार. सजा कशी मिळते, त्याचा देखील तुम्ही मुलांनी साक्षात्कार केला आहे. बाबा तर समजावून सांगतात - खूप प्रेमाने रहा, नाहीतर क्रोधाचा अंश बनतो. आभार माना - बाबा मिळाले आहेत जे आम्हाला नरकातून काढून स्वर्गामध्ये घेऊन जातात. सजा खाणे तर खूप वाईट आहे. तुम्ही जाणता सतयुग आहे प्रेमाची राजधानी. प्रेमाशिवाय काहीही नाही. इथे तर छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा चेहरा बदलून जातो. बाबा म्हणतात - मी पतित दुनियेमध्ये आलो आहे, मला निमंत्रणच पतित दुनियेमध्ये देता. बाबा मग सर्वांना निमंत्रण देतात - अमृत प्या. ‘विष आणि अमृत’ नावाचे एक पुस्तक निघाले आहे. पुस्तक लिहिणाऱ्याला बक्षीस मिळाले आहे, प्रसिद्ध आहे. बघितले पाहिजे काय लिहिले आहे. बाबा तर म्हणतात तुम्हाला ज्ञान अमृत पाजतो, मग तुम्ही विष का खाता? रक्षाबंधन देखील यावेळचेच यादगार आहे ना. बाबा सर्वांना म्हणतात - पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करा, हा अंतिम जन्म आहे. पवित्र बनाल, योगामध्ये रहाल तर पापे नष्ट होतील. आपल्या मनाला विचारायचे आहे, मी आठवणीमध्ये राहतो का नाही? मुलाची आठवण करून खुश होतात ना. पत्नी पतीची आठवण करून खुश होते ना. हे कोण आहेत? भगवानुवाच, निराकार. बाबा म्हणतात - मी यांच्या (श्रीकृष्णाच्या) ८४ व्या जन्मा नंतर पुन्हा स्वर्गाचा मालक बनवतो. आता झाड लहान आहे. मायेची वादळे खूप लागतात. या सर्व अतिशय गुप्त गोष्टी आहेत. बाबा तर म्हणतात - ‘मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये रहा आणि पवित्र रहा’. पूर्ण राजधानी इथेच स्थापन होणार आहे. गीतेमध्ये युद्ध दाखवतात. पांडव डोंगरावर वितळून मेले. बस्स, रिझल्ट काहीच नाही.

आता तुम्ही मुले सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणता. बाबा ज्ञानाचा सागर आहेत ना. ते आहेत सुप्रीम सोल. आत्म्याचे रूप काय आहे, हे कोणालाच माहिती नाही. तुमच्या बुद्धीमध्ये तो बिंदू आहे. तुमच्यामध्ये देखील कोणी यथार्थ रीतीने समजत नाही. मग म्हणतात - बिंदूची कशी आठवण करावी. काहीही समजत नाहीत. तरीही बाबा म्हणतात - थोडेजरी ऐकले तरी त्या ज्ञानाचा विनाश होत नाही. ज्ञानामध्ये येऊन मग परत जातात, परंतु थोडेजरी ऐकले आहे तर स्वर्गामध्ये जरूर येतील. जे जास्त ज्ञान ऐकतील, धारणा करतील तर राजाईमध्ये येतील. थोडे ऐकणारे प्रजेमध्ये येतील. राजधानीमध्ये तर राजा-राणी इत्यादी सर्व असतात ना. तिथे वजीर असत नाही. इथे विकारी राजांना वजीर (मंत्री) ठेवावा लागतो. बाबा तुम्हाला खूप विशाल-बुद्धी बनवतात. तिथे वजीराची गरजच नसते. वाघ-बकरी एकत्र पाणी पितात. तर बाबा समजावून सांगतात - तुम्ही देखील लून-पाणी (खारट पाणी) बनू नका, क्षीरखंड बना. क्षीर (दूध) आणि खंड (साखर) दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत ना. मतभेद इत्यादी काहीही ठेवू नका. इथे तर मनुष्य किती भांडण-तंटे करतात. हा आहेच रौरव नरक. नरकामध्ये गटांगळ्या खात राहतात. बाबा येऊन बाहेर काढतात. बाहेर पडता-पडता मग पुन्हा अडकून पडतात. कोणी मग दुसऱ्यांना काढण्यासाठी जातात आणि स्वतःच निघून जातात. सुरुवातीला खूप जणांना मायारूपी मगरीने पकडले होते. एकदम संपूर्ण गिळंकृत केले. जरा सुद्धा निशाणी राहिलेली नाहीये. कोणाकोणाची निशाणी आहे जे मग परत येतात. कोणी तर एकदम खलास. इथे प्रत्यक्षात सर्व काही होत आहे. तुम्ही हिस्ट्री ऐकाल तर आश्चर्य वाटेल. गायन आहे - ‘तुम्ही प्रेम करा अथवा दूर लोटा, आम्ही तुमच्या दारातून बाहेर जाणार नाही’. बाबा तर कधीही तोंडून असे काहीही बोलत नाहीत. किती प्रेमाने शिकवतात. समोर एम ऑब्जेक्ट उभे आहे. उच्च ते उच्च बाबा हे (विष्णू) बनवितात. तेच विष्णू मग ब्रह्मा बनतात. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली आणि मग ८४ जन्म घेऊन हा बनला (ब्रह्मा बनला). ततत्वम्. तुमचे देखील फोटो काढत होते ना. तुम्ही ब्रह्माची मुले ब्राह्मण आहात. तुम्हाला आता काही मुकुट नाही आहे, भविष्यामध्ये मिळणार आहे म्हणून तुमचा तो फोटो देखील ठेवला आहे. बाबा येऊन मुलांना डबल मुकुटधारी बनवतात. तुम्हाला जाणीव होते खरोखर अगोदर आपल्यामध्ये ५ विकार होते. (नारदाचे उदाहरण आहे). सर्वात पहिले भक्त देखील तुम्हीच बनला आहात. आता बाबा किती उच्च बनवतात. एकदम पतितापासून पावन. बाबा (ब्रह्मा बाबा) काहीही घेत नाहीत. मग शिवबाबा कसे घेतील! तुम्ही शिवबाबांच्या भंडारीमध्ये घालता. मी तर ट्रस्टी आहे. देण्या-घेण्याचा हिशोब सर्व शिवबाबांसोबत आहे. मी शिकतो आणि शिकवतो. ज्यांनी आपलेच सर्व काही दिले तो मग काही घेईल काय. कोणत्याही गोष्टीमध्ये मोह राहत नाही. गातात देखील - अमका स्वर्गवासी झाला. मग त्याला नरकातील खाणे-पिणे इत्यादी का खाऊ घालता. अज्ञान आहे ना. नरकामध्ये आहे तर पुनर्जन्म देखील नरकामध्येच होईल ना. आता तुम्ही जाता अमरलोकमध्ये. ही बाजोली आहे (कोलांटी उडीचा खेळ आहे). तुम्ही ब्राह्मण चोटी (शिखा) आहात; नंतर मग देवता क्षत्रिय बनाल म्हणून बाबा सांगतात खूप गोड बना. तरीही स्वतःला सुधारत नाहीत; मग तर म्हणणार - त्यांचे भाग्य. स्वतःचेच नुकसान करून घेतात. सुधारतच नाहीत तर ईश्वर तरी प्रयत्न किती करणार.

बाबा म्हणतात - मी आत्म्यांसोबत बोलत आहे. अविनाशी आत्म्यांना अविनाशी परमात्मा बाबा ज्ञान देत आहेत. आत्मा कानाने ऐकते. बेहदचे बाबा हे नॉलेज ऐकवत आहेत. तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात. रस्ता दाखवणारा सुप्रीम पंडा बसला आहे. श्रीमत म्हणते - ‘पवित्र बना, माझी आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील’. तुम्हीच सतोप्रधान होता. ८४ जन्म देखील तुम्हीच घेतले आहेत. बाबा यांनाच समजावून सांगतात की, तुम्हीच सतोप्रधानापासून आता तमोप्रधान बनला आहात, आता पुन्हा माझी आठवण करा. याला योग-अग्नी म्हटले जाते. हे ज्ञान देखील आता तुम्हाला आहे. सतयुगामध्ये माझी कोणी आठवण करत नाही. याचवेळी मी म्हणतो - ‘माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील दुसरा कोणताही मार्ग नाही’. हे स्कूल आहे ना. याला म्हटले जाते - विश्वविद्यालय, वर्ल्ड युनिव्हर्सिटी. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान इतर कोणीही जाणत नाही. शिवबाबा म्हणतात - या लक्ष्मी-नारायणाला सुद्धा हे ज्ञान नाहीये. हे तर प्रारब्ध आहे ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रेमाच्या राजधानीमध्ये जायचे आहे, त्यामुळे आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहायचे आहे. कधीही लून-पाणी (खारे पाणी) बनून मतभेदामध्ये यायचे नाही. आपणच आपल्याला सुधारायचे आहे.

२) देह-अभिमानाला सोडून मास्टर प्रेमाचा सागर बनायचे आहे. आपले दैवी चारित्र्य बनवायचे आहे. खूप-खूप गोड होऊन राहायचे आहे.

वरदान:-
मनाच्या स्वतंत्रतेद्वारे सर्व आत्म्यांना शांतीचे दान देणारे मन्सा महादानी भव

बंधनात असलेल्या शरीराने भले परतंत्र आहेत परंतु मनाने जर स्वतंत्र असतील तर आपल्या वृत्ती द्वारे, शुद्ध संकल्पाद्वारे विश्वाच्या वायुमंडळाला बदलण्याची सेवा करू शकतात. आज-काल विश्वाला गरज आहे मनाच्या शांतीची. तर मनाने स्वतंत्र आत्मा मनसा द्वारे शांतीची व्हायब्रेशन पसरवू शकते. शांतीचे सागर बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यामुळे ऑटोमॅटिक शांतीची किरणे पसरतात. असे शांतीचे दान देणारे मनसा महादानी आहेत.

बोधवाक्य:-
पुरुषार्थ असा करा ज्याला पाहून इतर आत्मे देखील फॉलो करतील.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

प्रत्येक ब्राह्मण बाप-समान चैतन्य चित्र बना, लाईट आणि माइट हाऊसची प्रदर्शनी बना. संकल्प शक्तीचे, सायलेन्सचे भाषण तयार करा आणि कर्मातीत स्टेजवर वरदानीमूर्तचा पार्ट बजावा तेव्हाच संपूर्णता समीप येईल. मग सेकंदापेक्षाही वेगाने जिथे कर्तव्य करायचे असेल तिथे वायरलेस द्वारे डायरेक्शन देऊ शकाल. कर्मातीत स्टेजच्या आधारे संकल्प करा आणि सेकंदामध्ये तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तो संकल्प पोहोचेल.