17-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आता अमरलोक स्थापन करण्यासाठी निमित्त आहात, जिथे कोणतेही दुःख अथवा पाप असणार नाही, ते आहेच व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया)”

प्रश्न:-
गॉडली फॅमिलीचा वंडरफुल प्लॅन कोणता आहे?

उत्तर:-
गॉडली फॅमिलीचा प्लॅन आहे - “फॅमिली प्लॅनिंग करणे”. एका सत् धर्माची स्थापना करून अनेक धर्मांचा विनाश करणे. मनुष्य बर्थ कंट्रोल करण्यासाठी प्लॅन्स (योजना) बनवतात, बाबा म्हणतात त्यांचे प्लॅन्स यशस्वी होऊ शकत नाहीत. मीच नवीन दुनियेची स्थापना करतो तर बाकीचे सर्व आत्मे वर आपल्या घरी निघून जातात. फार थोडे आत्मेच इथे राहतात.

ओम शांती।
हे देखील घर आहे, युनिव्हर्सिटी देखील आहे आणि इन्स्टिट्यूशन देखील आहे. तुम्हा मुलांची आत्मा जाणते की ते शिवबाबा आहेत. आत्मे आहेत शाळीग्राम. ज्याचे हे शरीर आहे ते शरीर असे म्हणणार नाही की, माझी आत्मा. आत्मा म्हणते माझे शरीर. आत्मा अविनाशी आहे, शरीर आहे विनाशी. आता तुम्ही स्वतःला आत्मा समजता. आमचे बाबा शिव आहेत, ते आहेत सुप्रीम फादर. आत्मा जाणते ते आमचे सुप्रीम पिता देखील आहेत. सुप्रीम टीचर देखील आहेत, सुप्रीम गुरु सुद्धा आहेत. भक्तीमार्गामध्ये देखील बोलावतात - ओ गॉड फादर. मरते वेळी देखील म्हणतात - हे भगवान, हे ईश्वरा. बोलावतात ना. परंतु कोणाच्या बुद्धीमध्ये यथार्थ रितीने इथे बसत नाही. सर्व आत्म्यांचे पिता तर एक झाले, आणि मग असे म्हटले जाते - ‘ओ पतित-पावन’. तर गुरु देखील झाले. म्हणतात - आम्हाला दु:खातून लिबरेट करून शांतीधाममध्ये घेऊन जा. तर पिता देखील झाले आणि पतित-पावन सद्गुरु देखील झाले; तसेच सृष्टीचक्र कसे फिरते, मनुष्य ८४ जन्म कसे घेतात, तो बेहदचा इतिहास-भूगोल ऐकवतात म्हणून सुप्रीम टीचर देखील झाले. अज्ञान काळामध्ये पिता वेगळा, टीचर वेगळा, गुरु वेगळा असतो. हे बेहदचे पिता, टीचर, गुरू एकच आहेत. किती फरक झाला. बेहदचे पिता बेहदचा वारसा आपल्या मुलांना देतात. ते (हदचे पिता) देखील हदचा वारसा देतात. शिक्षण देखील हदचे आहे. जगाच्या इतिहास-भूगोलाला तर कोणीही जाणत नाहीत. हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, लक्ष्मी-नारायणाने राज्य कसे मिळवले? ते राज्य किती काळापर्यंत चालले? आणि मग त्रेताच्या राम-सीतेने किती काळ राज्य केले? काहीच जाणत नाहीत. आता तुम्ही मुले समजता बेहदचे बाबा आले आहेत आपल्याला शिकविण्याकरिता. मग बाबा सद्गतीचा रस्ता सांगतात. तुम्ही ८४ जन्म घेत-घेत पतित बनता. आता पावन बनायचे आहे. ही आहे तमोप्रधान दुनिया. प्रत्येक गोष्ट सतो, रजो, तमो मध्ये येते. ही जी सृष्टी आहे, तिचा देखील एक ठराविक कालावधी आहे, नवी सो जुनी, जुनी सो मग नवीन होते. हे तर सर्वजण जाणतात. सतयुगामध्ये भारतच होता, त्यामध्ये देवी-देवतांचे राज्य होते. गॉड-गॉडजचे राज्य होते. अच्छा, मग पुढे काय झाले? त्यांनी पुनर्जन्म घेतला. सतोप्रधानापासून सतो, सतो पासून रजो, तमोमध्ये आले. इतके-इतके जन्म घेतले. भारतामध्ये ५००० वर्षांपूर्वी जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तर तिथे मनुष्यांचे आयुर्मान सरासरी १२५ ते १५० वर्षांचे होते. त्याला अमरलोक म्हटले जाते. तिथे कधीही अकाली मृत्यू होत नाही. हा आहे मृत्यूलोक. अमरलोकमध्ये मनुष्य अमर असतात, आयुष्य मोठे असते. सतयुगामध्ये पवित्र गृहस्थ आश्रम होता. व्हाईसलेस वर्ल्ड म्हटले जाते. आता आहे विशश वर्ल्ड. आता तुम्ही मुले जाणता आपण शिवबाबांची संतान आहोत. वारसा शिवबाबांकडून मिळतो. हे दादा, ते डाडा (ग्रँड फादर) वारसा आजोबांकडून मिळतो. आजोबांच्या प्रॉपर्टीवर सर्वांचा हक्क असतो. ब्रह्माला म्हटले जाते प्रजापिता. ॲडम आणि इव्ह, आदम-बीबी. ते आहेत निराकार गॉडफादर. हे (प्रजापिता) झाले साकारी फादर. यांना स्वतःचे शरीर आहे, शिवबाबांना तर आपले स्वतःचे शरीर नाही आहे. तर तुम्हाला वारसा मिळतो शिवबाबांकडून ब्रह्माद्वारे. आजोबांची प्रॉपर्टी मिळेल तर पित्याद्वारेच ना. शिवबाबांकडूनच ब्रह्मा द्वारे तुम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहात. ‘मनुष्य से देवता किये करत न लागी वार…’ कोणी बनवले? भगवंताने. ग्रंथ-शास्त्रांमध्ये अशी महिमा करतात ना. महिमा खूप आहे. जसे बाबा म्हणतात अल्फची (बाबांची) आठवण करा तर बे बादशाही तुमची. गुरुनानक देखील म्हणतात - ‘जप साहेब को, तो सुख मिले’. त्या निराकार अकालमूर्त बाबांचीच महिमा गातात. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर सुख मिळेल. आता बाबांचीच आठवण करतात. युद्ध जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मग लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये एकच धर्म असेल. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. भगवानुवाच - पतित-पावन, ज्ञानाचा सागर भगवंताला म्हटले जाते. तेच दुःख-हर्ता, सुख-कर्ता आहेत. जर का आपण बाबांची मुले आहोत तर जरूर आपण सुखामध्ये असलो पाहिजे. बरोबर भारतवासी सतयुगामध्ये होते. बाकीचे सर्व आत्मे शांतीधाममध्ये होते. आता तर सर्व आत्मे इथे येत आहेत. मग आपण जाऊन देवी-देवता बनणार. स्वर्गामध्ये पार्ट बजावतो. ही जुनी दुनिया आहे - दुःखधाम, नवीन दुनिया आहे - सुखधाम. घर जुने होते तेव्हा त्यामधून उंदीर-साप इत्यादी निघतात ना. ही दुनिया देखील अशीच आहे. या कल्पाचे आयु ५००० वर्षे आहे. आता आहे अंत. गांधीजींची देखील इच्छा होती नवीन दुनिया नवीन दिल्ली असावी. राम-राज्य असावे. परंतु हे तर बाबांचेच काम आहे. देवतांच्या राज्यालाच रामराज्य म्हणतात. नवीन दुनियेमध्ये तर जरूर लक्ष्मी-नारायणाचे राज्य असेल. पहिले तर राधा-कृष्ण दोघेही वेगवेगळ्या राजधानीतील आहेत आणि जेव्हा त्यांचा साखरपुडा झाला तेव्हा मग लक्ष्मी-नारायण बनले. जरूर यावेळी अशी कर्म करत असतील. बाबा तुम्हाला कर्म-अकर्म-विकर्माची गती बसून समजावून सांगतात. रावण राज्यामध्ये मनुष्य जी कर्म करतात ती कर्म विकर्म बनतात. सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात. गीतेमध्ये देखील आहे परंतु नाव बदलले आहे. ही आहे चूक. कृष्ण जयंती तर असते सतयुगामध्ये. शिव आहेत निराकार परमपिता, श्रीकृष्ण तर साकारमध्ये आहे. अगोदर शिवजयंती होते त्या नंतर मग श्रीकृष्ण जयंती भारतामध्येच साजरी करतात. शिवरात्री म्हणतात. बाबा येऊन भारताला स्वर्गाचे राज्य देतात. शिवजयंती नंतर आहे कृष्ण जयंती. याच्या दरम्यान असते राखी कारण पवित्रता पाहिजे. जुन्या दुनियेचा विनाश देखील झाला पाहिजे. मग युद्ध होते तर सर्व नष्ट होतात; आणि मग तुम्ही येऊन नवीन दुनियेमध्ये राज्य कराल. तुम्ही या जुन्या दुनियेसाठी, मृत्यूलोकसाठी शिकत नाही. तुमचे शिक्षणच आहे नवीन दुनिया अमरलोकसाठी. असे तर कोणते कॉलेजही नसेल. आता बाबा म्हणतात - या मृत्यू लोकाचा अंत आहे त्यामुळे लवकरात लवकर शिकून हुशार व्हायचे आहे. ते बाबा पिता देखील आहेत, पतित-पावन देखील आहेत, शिकवतात देखील. तर ही गॉडफादरली युनिव्हर्सिटी आहे. भगवानुवाच आहे ना. कृष्ण तर सतयुगाचा प्रिन्स आहे. तो देखील शिवबाबांकडून वारसा घेत आहे. यावेळी सर्वजण भविष्याकरिता वारसा घेत आहेत मग जितके शिकतील तितका वारसा मिळेल. जर शिकले नाहीत तर पद कमी होईल. कुठेही रहा, शिकत रहा. मुरली तर परदेशात देखील जाऊ शकते. बाबा दररोज सावधानी देखील देत असतात. मुलांनो, बाबांची आठवण करा त्यामुळे तुमची विकर्म विनाश होतील. आत्म्यामध्ये जी भेसळ पडली आहे ती निघून जाईल. आत्मा १०० प्रतिशत पवित्र बनली पाहिजे. आता तर अपवित्र आहे. मनुष्य भक्ती तर खूप करतात, तीर्थक्षेत्रांवर, जत्रेमध्ये लाखो मनुष्य जातात. हे तर जन्म-जन्मांतरापासून चालत आले आहे. किती मंदिरे इत्यादी बनवतात, मेहनत करतात. तरीही शिडी खाली उतरत येतात. आता तुम्ही जाणता - आपण चढत्या कलेमुळे सुखधाममध्ये जाणार, पुन्हा आपल्याला उतरायचे आहे. मग कला कमी होत जाते. नवीन घराचा दहा वर्षानंतर भपका जरूर कमी होणार. तुम्ही नवीन दुनिया सतयुगामध्ये होता. १२५० वर्षानंतर राम-राज्य सुरु झाले, आता तर अगदीच तमोप्रधान आहेत. लोकसंख्या किती झाली आहे. दुनिया जुनी झाली आहे. ते लोक तर फॅमिली प्लॅनिंगसाठी प्लॅन्स बनवत राहतात. किती गोंधळून जातात. आपण लिहितो - हे तर गॉडफादरचेच काम आहे. सतयुगामध्ये फार-फार तर नऊ ते दहा लाख मनुष्य राहतील. बाकी सर्व आपल्या घरी स्वीट होममध्ये निघून जातील. ही गॉडली फॅमिली प्लॅनिंग आहे. एका धर्माची स्थापना, बाकी सर्व धर्मांचा विनाश. हे तर बाबा आपले काम करत आहेत. ते (दुनियावाले) म्हणतात - विकारामध्ये भले जा परंतु मुले होऊ देऊ नका. असे करता-करता होणार तर काहीच नाही. हे प्लॅनिंग तर बेहदच्या बाबांच्या हातामध्ये आहे. बाबा म्हणतात - मीच दुःखधामला सुखधाम बनविण्यासाठी आलो आहे. दर ५००० वर्षानंतर मी येतो. कलियुगाच्या अंताला आणि सतयुगाच्या सुरुवातीला. आता हा आहे संगम जेव्हा पतित दुनियेपासून पावन दुनिया बनते. जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना हे तर बाबांचेच काम आहे. सतयुगामध्ये होताच मुळी एक धर्म. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक, महाराजा-महाराणी होते. हे देखील तुम्ही जाणता, ही माळा कोणाची बनली आहे. वर आहे फूल शिवबाबा मग आहेत युगल मणी - ब्रह्मा-सरस्वती. त्यांची ही माळा आहे जे विश्वाला नरकापासून स्वर्ग, पतितापासून पावन बनवतात. जे सेवा करून जातात, त्यांचीच आठवण राहते. तर बाबा समजावून सांगत आहेत - हे सतयुगामध्ये पवित्र होते ना. प्रवृत्तीमार्ग पवित्र होता. आता तर पतित आहेत. गातात देखील - ‘पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. सतयुगामध्ये थोडेच असे बोलावतील. सुखामध्ये कोणीही बाबांची आठवण करत नाहीत. दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. बाबा आहेतच लिबरेटर, दयाळू, ब्लिसफुल ते येऊन सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती देतात. बोलावतात देखील त्यांनाच की, येऊन स्वीट होममध्ये घेऊन चला. आता तर सुखच नाही आहे. हे आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. सतयुगामध्ये तर राजा, राणी, प्रजा असतात. बाबा सांगतात - तुम्ही कसे विश्वाचे मालक बनता. तिथे तुमच्याकडे अथाह, अगणित धन असते. सोन्याच्या विटांनी घरे बनतात. मशिनमधून सोन्याच्या विटा तयार होऊन निघत राहतात. मग त्यामध्ये सुद्धा हिरे-माणके जडवतात. द्वापरमध्ये देखील किती हिरे होते, जे लुटून घेऊन गेले. आता तर सोने नजरेला सुद्धा पडत नाही. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. बाबा म्हणतात - मी दर ५००० हजार वर्षानंतर येतो. जुन्या दुनियेच्या विनाशासाठी हे अणू बॉम्ब इत्यादी बनले आहेत. हे आहे विज्ञान. बुद्धीतून अशा काही गोष्टी निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे आपल्याच कुळाचा विनाश करतील. हे बॉम्ब्स काही ठेवण्यासाठी थोडेच बनवतात. ही रिहर्सल होत राहील. जोपर्यंत राजधानी स्थापन होत नाही तोपर्यंत युद्ध चालू होऊ शकत नाही. तयारी तर होत आहे, त्याच्या सोबत नॅचरल कॅलॅमिटीज (नैसर्गिक आपत्ती) देखील येतील. इतके मनुष्य असणार नाहीत.

आता मुलांनी या जुन्या दुनियेला विसरायचे आहे. बाकी स्वीट होम स्वर्गाच्या बादशाहीची आठवण करायची आहे. जसे नवीन घर बनवतात तर मग बुद्धीमध्ये नवीन घराचीच आठवण राहते ना. आता देखील नवीन दुनियेची स्थापना होत आहे. बाबा आहेत सर्वांचे सद्गती दाता. सर्व आत्मे निघून जातील. आणि शरीरे इथेच नष्ट होतील. आत्मा पवित्र बनेल, बाबांच्या आठवणीने. पवित्र जरूर बनायचे आहे. देवता पवित्र आहेत ना. त्यांच्यासमोर कधी विडी, तंबाखू इत्यादी ठेवले जात नाहीत, ते वैष्णव आहेत. विष्णुपुरी म्हटले जाते. ते आहेच व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). हे आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). आता निर्विकारी दुनियेमध्ये जायचे आहे. फार थोडा वेळ बाकी आहे. हे तर स्वतः देखील समजतात - अणू बॉम्बसद्वारे सर्व नष्ट होतील. युद्ध तर होणारच आहे. म्हणतात - आम्हाला कोणी प्रेरणा देणारा आहे, जे आम्ही बनवत आहोत. जाणतात देखील आपल्या कुळाचा विनाश होत आहे. परंतु बनविल्याशिवाय राहू शकत नाहीत. शंकराद्वारे विनाश, याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. विनाश समोर उभा आहे. ज्ञान यज्ञातून ही विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे. आता तुम्ही स्वर्गाचे मालक बनण्यासाठी शिकत आहात. ही जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन बनेल. हे चक्र फिरतच राहते. हिस्ट्री मस्ट रिपीट. प्रथम आदि सनातन देवी-देवता धर्म होता, मग चंद्रवंशी क्षत्रिय धर्म आणि त्यानंतर इस्लामी, बौद्धि इत्यादी आले आणि पुन्हा जरूर पहिल्या नंबरवाला येईल आणि मग सर्व नष्ट होतील. तुम्हा मुलांना कोण शिकवत आहे? ते निराकार शिवबाबा. तेच शिक्षक आहेत, सद्गुरु आहेत. आल्याबरोबरच शिक्षण सुरु करतात, म्हणून लिहिलेले आहे - शिवजयंती सो गीता जयंती. गीता जयंती सो श्रीकृष्ण जयंती. शिवबाबा सतयुगाची स्थापना करतात. कृष्णपुरी सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्हाला शिकवणारा कोणी साधु, संत, मनुष्य नाही आहे. हे तर दुःख-हर्ता, सुख-कर्ता, बेहदचे बाबा आहेत. २१ जन्मांसाठी तुम्हाला वारसा देतात. विनाश तर होणारच आहे, या वेळेसाठीच म्हटले जाते - ‘कीनकी दबी रही धुल में, कीनकी राजा खाए…’ चोऱ्या-माऱ्या सुद्धा खूप होतील. आग सुद्धा लागणार आहे. या यज्ञामध्ये सर्व स्वाहा होतील. आता थोडी-थोडी आग लागेल आणि मग बंद होईल. थोडा अजून वेळ आहे. सर्व आपसामध्ये युद्ध करतील. सोडवणारा कोणीही राहणार नाही. रक्ताच्या नद्यांनंतर मग दुधाच्या नद्या वाहतील, याला म्हटले जाते - ‘खुने नाहेक खेल’ (विनाकारण रक्तरंजित खेळ). मुलांनी साक्षात्कार देखील केला आहे नंतर मग या डोळ्यांनी देखील बघाल. विनाशापूर्वी बाबांची आठवण करायची आहे तर तमोप्रधानापासून आत्मा सतोप्रधान बनेल. बाबा नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी तुम्हाला तयार करत आहेत. राजधानी पूर्ण स्थापन होईल आणि मग विनाश होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) विष्णुपुरीमध्ये जाण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे. संपूर्ण पावन बनायचे आहे, अशुद्ध खाण्या-पिण्याचा त्याग करायचा आहे. विनाशापूर्वी आपले सर्व काही सफल करायचे आहे.

२) लवकरात लवकर शिकून हुशार व्हायचे आहे. कोणतेही विकर्म होऊ नये यावर लक्ष ठेवायचे आहे.

वरदान:-
तक्रारीला आठवणीमध्ये परिवर्तन करणारे स्वतः आणि निरंतर योगी भव

संगम युगाची विशेषता आहे - आता-आता पुरुषार्थ, आता-आता प्रत्यक्ष फळ. आता स्मृती स्वरूप आता प्राप्तीचा अनुभव. भविष्याची गॅरंटी तर आहेच परंतु भविष्या पेक्षाही श्रेष्ठ भाग्य आत्ताचे आहे. या भाग्याच्या नशेमध्ये रहा तर स्वतः आठवण राहील. जिथे आठवण आहे तिथे तक्रार नाही. ‘काय करू, कसे करू, हे होत नाहीये, थोडी मदत द्या’ - ही आहे तक्रार. तर तक्रारीला सोडून स्वतः योगी निरंतर योगी बना.

बोधवाक्य:-
जे स्वतःला पाहुणे समजून राहतात तेच महान स्थितीचा अनुभव करतात.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

संघटनचे बळ, स्नेहाचे बळ, एकमेकांना सहयोग देण्याचे बळ आणि सहनशीलतेचे बळ जमा करा तर माया कधीही वार करू शकणार नाही, आणि मग जयजयकारचा ढोल वाजू लागेल. जेव्हा इतके सर्व अनेक असताना देखील एक दिसतील, एकाच्याच प्रेमामध्ये मग्न, एकरस स्थितीमध्ये स्थित असतील तेव्हा प्रत्यक्षतेची निशाणी दिसू लागेल. तुम्हा सर्वांची प्रतिज्ञाच प्रत्यक्षतेला समीप आणेल.