17-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हे रूहानी हॉस्पिटल तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी एव्हर हेल्दी बनविणारे
आहे, इथे तुम्ही देही-अभिमानी होऊन बसा”
प्रश्न:-
धंदा वगैरे
करताना सुद्धा कोणते डायरेक्शन बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे?
उत्तर:-
बाबांचे डायरेक्शन आहे - तुम्ही कोणत्याही साकारी किंवा आकारीची आठवण करू नका, एका
बाबांची आठवण राहावी तर विकर्म विनाश होतील. यामध्ये कोणी असे म्हणू शकत नाही की,
वेळ नाही. सर्व काही करत असताना सुद्धा आठवणीमध्ये राहू शकता.
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांना बाबांकडून गुडमॉर्निंग. गुडमॉर्निंगच्या नंतर मुलांना
सांगितले जाते की बाबांची आठवण करा. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन, येऊन पावन बनवा’;
तर बाबा सर्वप्रथम म्हणतात - ‘रूहानी बाबांची आठवण करा’. रूहानी पिता तर सर्वांचा
एकच आहे. पित्याला कधी सर्वव्यापी समजले जात नाही. तर मुलांनो, सर्वात पहिली जितकी
होईल तितकी बाबांची आठवण करा; एका बाबांव्यतिरिक्त कोणत्याही साकारी किंवा आकारीची
आठवण करू नका. हे तर खूप सोपे आहे ना. लोक म्हणतात - आम्ही बिझी असतो, वेळ नाही.
परंतु यामध्ये तर सदैव वेळ आहे. बाबा युक्ती सांगतात, हे सुद्धा जाणता की, बाबांची
आठवण केल्यानेच आपली पापे भस्म होतील. मुख्य गोष्ट ही आहे. धंदा इत्यादी करण्यासाठी
काही मनाई नाही. ते सर्व करत असताना फक्त बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील.
हे तर समजता आपण पतित आहोत, साधू-संत, ऋषी-मुनी इत्यादी सर्वजण साधना करतात. साधना
केली जाते भगवंताला भेटण्याकरिता. म्हणून जोपर्यंत त्यांचा परिचय होत नाही तोपर्यंत
भेटू शकत नाही. तुम्ही जाणता बाबांचा परिचय दुनियेमध्ये कोणालाच नाही आहे. देहाचा
परिचय तर सर्वांना आहे. मोठ्या गोष्टीचा परिचय चटकन होतो. आत्म्याचा परिचय तर जेव्हा
बाबा येतील तेव्हा सांगतील. आत्मा आणि शरीर दोन गोष्टी आहेत. आत्मा एक तारा आहे आणि
अति सूक्ष्म आहे. त्याला कोणी पाहू शकत नाही. तर इथे जेव्हा येऊन बसता तर
देही-अभिमानी होऊन बसायचे आहे. हे देखील एक हॉस्पिटल आहे ना - अर्ध्या कल्पासाठी
एव्हर हेल्दी बनण्याचे. आत्मा तर अविनाशी आहे, कधीही विनाश होत नाही. आत्म्याचाच
सर्व पार्ट आहे. आत्मा म्हणते - माझा कधीही विनाश होत नाही. इतके सर्व आत्मे अविनाशी
आहेत. शरीर विनाशी आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे की, आपण आत्मे
अविनाशी आहोत. आम्ही ८४ जन्म घेतो, हा ड्रामा आहे. यामध्ये कोण-कोणते धर्म स्थापक
कधी येतात, किती जन्म घेत असतील, हे तर जाणता. ८४ जन्म जे गायले जातात तर जरूर
कोणत्या एका धर्माचे असतील. सर्वांचे तर असू शकत नाहीत. सर्व धर्म काही एकत्र येत
नाहीत. आपण दुसऱ्यांचा हिशोब कशाला काढत बसायचा? जाणतो की अमक्या-अमक्या वेळी धर्म
स्थापन करण्यासाठी येतात. मग त्यांची वृद्धी होते. सर्वच सतोप्रधानापासून तमोप्रधान
तर होणारच आहेत. दुनिया जेव्हा तमोप्रधान होते तेव्हा मग बाबा येऊन सतोप्रधान सतयुग
बनवतात. आता तुम्ही मुले जाणता - आपण भारतवासीच मग नवीन दुनियेमध्ये येऊन राज्य
करणार, दुसरा कोणताही धर्म नसेल. तुम्हा मुलांमध्ये देखील ज्यांना उच्च पद घ्यायचे
आहे ते जास्त आठवणीमध्ये रहाण्याचा पुरुषार्थ करतात आणि समाचार सुद्धा लिहितात की,
‘बाबा, मी इतका वेळ आठवणीमध्ये रहातो’. बरेचजण तर लाजेपोटी पूर्ण समाचारच देत नाहीत.
समजतात, आता बाबा काय म्हणतील. परंतु माहित तर होतेच ना. शाळेमध्ये टीचर
विद्यार्थ्यांना म्हणतील ना की, तुम्ही अभ्यास केला नाहीत तर नापास व्हाल. लौकिक
आई-वडील सुद्धा मुलांच्या अभ्यासावरून समजतात, ही तर खूप मोठी शाळा आहे. इथे काही
नंबरानुसार बसवले जात नाही. बुद्धीने समजले जाते, नंबरवार तर असतातच ना. आता बाबा
चांगल्या-चांगल्या मुलांना कुठे पाठवतात, ते मग तिथे जातात तर बाकीचे लिहितात -
आम्हाला महारथी पाहिजेत, तर नक्की समजतात ते आमच्या पेक्षा हुशार, नावाजलेले आहेत.
नंबरवार तर असतात ना. प्रदर्शनीमध्ये देखील अनेक प्रकारचे येतात तर तपासणीसाठी गाईड
सुद्धा उभे केले पाहिजेत. स्वागत करणारे तर जाणतात की ही कोणत्या प्रकारची व्यक्ती
आहे. तर त्यांना मग इशारा केला पाहिजे की यांना तुम्ही माहिती समजावून सांगा. तुम्ही
देखील समजावून सांगू शकता; पहिली श्रेणी, दुसरी श्रेणी, तिसरी श्रेणी सर्व आहेत.
तिथे तर सर्वांची सेवा करायची आहेच. कोणी मोठा माणूस असेल तर नक्कीच सर्वजण त्याचे
आदरातिथ्य करतातच. हा नियम आहे. वडील किंवा टीचर वर्गात मुलांची महिमा करतात, हा
देखील सर्वात मोठा आदर देणे आहे. नाव मोठे करणाऱ्या मुलांची महिमा किंवा चांगली
पालना केली जाते. हा अमका श्रीमंत आहे, धार्मिक वृत्तीचा आहे, हा देखील आदर देणे आहे
ना. आता तुम्ही हे जाणता उच्च ते उच्च तर भगवान आहेत. म्हणतात देखील, बरोबर
सर्वश्रेष्ठ आहेत; परंतु मग विचारा त्यांचे जीवन-चरित्र सांगा तर म्हणतील -
सर्वव्यापी आहेत. बस्स, एकदम खालीच आणतात. आता तुम्ही समजावून सांगू शकता सर्वात
उच्च ते उच्च आहेत भगवान, ते मूलवतनवासी आहेत. सूक्ष्म वतनमध्ये आहेत देवता. इथे
असतात मनुष्य. उच्च ते उच्च भगवान ते तर निराकार झाले.
आता तुम्ही जाणता -
आपण जे हीरे तुल्य होतो ते आता कौडी तुल्य बनलो आहोत आणि भगवंताला तर जास्तच खाली
घेऊन गेलो आहोत. ओळखतच नाही. तुम्हा भारतवासीयांनाच ओळख मिळते आणि मग ओळख कमी होते.
आता तुम्ही बाबांची ओळख सर्वांना देत जाता. भरपूर जणांना बाबांची ओळख मिळेल. तुमची
मुख्य चित्रे आहेतच ही त्रिमूर्ती, गोळा (सृष्टीचक्र) आणि झाड (कल्पवृक्ष)
यांच्यामध्ये किती प्रकाश (ज्ञान) आहे. हे तर कोणीही सांगेल - हे लक्ष्मी-नारायण
सतयुगाचे मालक होते. अच्छा सतयुगानंतर काय होते? हे देखील आता तुम्ही जाणता. आता
कलियुगाचा अंत आणि प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. आता राजाई तर नाहीये, किती फरक आहे.
सतयुगाच्या आदिला (सुरुवातीला) राजे होते आणि आत्ता कलियुगात सुद्धा राजे आहेत. भले
ते काही पावन नाहीत परंतु कोणी पैसे देऊन सुद्धा टायटल (उपाधी) घेतात. महाराजा तर
कोणी नाहीये, उपाधी खरेदी करतात. जसे पटियालाचा महाराजा, जोधपूरचा महाराजा,
बिकानेरचा महाराजा… नाव तर घेतात ना. हे नाव अविनाशी चालत येते. आधी पवित्र महाराजे
होते, आता अपवित्र आहेत. राजा, महाराजा शब्द चालत येतो. या लक्ष्मी-नारायणासाठी
म्हणणार की, हे सतयुगाचे मालक होते, कोणी राज्य घेतले? आता तुम्ही जाणता राजाईची
स्थापना कशी होते. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला आत्ता २१ जन्मांसाठी शिकवत आहे.’ ते
(दुनियावाले) तर शिकून मग याच जन्मामध्ये बॅरिस्टर इत्यादी बनतात. तुम्ही आत्ता
शिकून भविष्यामध्ये महाराजा-महाराणी बनता. ड्रामा प्लॅन अनुसार नव्या दुनियेची
स्थापना होत आहे. आता आहे जुनी दुनिया. भले कितीही चांगले-चांगले मोठे बंगले आहेत
परंतु हिरे-माणकांचे महाल बनविण्याची कोणाची ताकद नाहीये. सतयुगामध्ये हे सर्व
हिरे-माणकांचे महाल बनवतात ना. बनवण्यासाठी काही वेळ थोडाच लागतो. इथे सुद्धा भूकंप
इत्यादी होतात तर खूप कारागीर लावतात, एक-दोन वर्षात पूर्ण शहर उभे करतात. नवी
दिल्ली बनविण्यासाठी फार-फार तर ८-१० वर्षे लागली परंतु इथल्या कामगारांमध्ये आणि
तिथल्या कामगारांमध्ये फरक तर असतोच ना. आजकाल तर नवे-नवे शोध सुद्धा लावत राहतात.
इमारती बांधणाऱ्या विज्ञानाचा देखील जोर आहे, सर्व काही तयार मिळते, लगेच फ्लॅट
तयार. खूप लवकर-लवकर बनवतात तर हे सर्व तिथे उपयोगात तर येते ना. हे सर्व सोबत
येणार आहे. संस्कार तर राहतात ना. हे विज्ञानाचे संस्कार सुद्धा येतील. तर आता बाबा
मुलांना समजावून सांगत राहतात - पावन बनायचे असेल तर बाबांची आठवण करा. बाबा सुद्धा
गुडमॉर्निंग करून मग शिकवण देतात. ‘मुलांनो, बाबांच्या आठवणीमध्ये बसला आहात?
चालता-फिरता बाबांची आठवण करा कारण जन्म-जन्मांतरीचे ओझे डोक्यावर आहे. शिडी
उतरता-उतरता ८४ जन्म घेतात. आता मग एका जन्मामध्ये चढती कला होते. जितकी बाबांची
आठवण करत रहाल तितका आनंद देखील होईल, शक्ती सुद्धा मिळेल. अशी बरीच मुले आहेत
ज्यांना पुढच्या नंबरवर ठेवले जाते परंतु अजिबात आठवणीमध्ये रहात नाहीत. भले
ज्ञानामध्ये हुशार आहेत परंतु आठवणीची यात्रा अजिबात नाहीये. बाबा तर मुलांची महिमा
करतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील नंबरवनमध्ये आहेत तर जरूर मेहनत सुद्धा करत असतील
ना. तुम्ही नेहमी समजा की शिवबाबा समजावून सांगत आहेत तर बुद्धीयोग तिथे लागून
राहील. हे देखील शिकत तर असतील ना. तरी देखील म्हणतात बाबांची आठवण करा. कोणालाही
समजावून सांगण्यासाठी चित्रे आहेत. भगवान म्हटलेच जाते निराकाराला. ते येऊन शरीर
धारण करतात. एका भगवंताची मुले सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. आत्ता या शरीरामध्ये
विराजमान आहेत. सर्व अकालमूर्त आहेत. हे अकालमूर्तचे (आत्म्याचे) तख्त आहे.
अकालतख्त काही वेगळी गोष्ट नाहीये. हे तख्त आहे अकालमूर्तचे. भृकुटी मध्यावर आत्मा
विराजमान असते, याला म्हटले जाते अकालतख्त. अकालतख्त, अकालमूर्तचे आहे. आत्मे सर्व
अकाल आहेत, किती अतिसूक्ष्म आहे. बाबा तर आहेत निराकार. ते स्वतःचे तख्त कुठून
आणणार. बाबा म्हणतात - माझे सुद्धा हे तख्त आहे. मी येऊन या तख्ताला लोनवर घेतो.
ब्रह्माच्या साधारण वृद्ध तनामध्ये अकालतख्तावर येऊन बसतो. आता तुम्हाला माहीत झाले
आहे सर्व आत्म्यांचे हे तख्त आहे. मनुष्यांबद्दलच बोलले जाते, पशूंची तर गोष्ट नाही.
पहिले तर जे मनुष्य पशूपेक्षाही वाईट बनले आहेत त्यांनी सुधारावे. कोणी पशूबद्दल
विचारले, तर सांगा - पहिले तर स्वतःमध्ये सुधारणा करा. सतयुगामध्ये तर पशू देखील
एकदम फर्स्टक्लास असतील. कचरा इत्यादी काहीही नसेल. राजाच्या महालामध्ये कबूतर
इत्यादींचा कचरा असेल तर शिक्षा करतात. जरा सुद्धा कचरा नसतो. तिथे खूप काळजी घेतली
जाते. पहाऱ्यावर असतात, कधी कोणता प्राणी इत्यादी आतमध्ये घुसू शकत नाही. खूप
स्वच्छता असते. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये देखील किती स्वच्छता असते.
शंकर-पार्वतीच्या मंदिरामध्ये कबूतर सुद्धा दाखवतात. तर जरूर मंदीराला खराब करत
असतील. शास्त्रांमध्ये तर खूप दंतकथा लिहून ठेवल्या आहेत.
आता बाबा मुलांना
समजावून सांगतात, त्यामध्ये देखील फार थोडे असे आहेत जे धारणा करू शकतात.
बाकीच्यांना तर काहीच समजत नाही. बाबा मुलांना किती प्रेमाने समजावून सांगतात -
‘मुलांनो, खूप-खूप गोड बना. मुखावाटे नेहमी रत्ने निघत रहावीत. तुम्ही रूप-बसंत
आहात. तुमच्या मुखावाटे दगड निघता कामा नयेत’. आत्म्याचीच महिमा होते. आत्मा म्हणते
- मी राष्ट्रपती आहे, अमका आहे....! माझ्या शरीराचे नाव हे आहे. अच्छा, आत्मे कोणाची
मुले आहेत? एका परमात्म्याची. तर जरूर त्यांच्याकडून वारसा मिळत असणार. मग ते
सर्वव्यापी कसे असू शकतील? आता तुम्हाला समजते आहे की, आपल्याला देखील आधी काहीच
माहित नव्हते. आता बुद्धी किती विस्तृत झाली आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये
गेलात तर समजाल ही तर सर्व खोटी चित्रे आहेत. १० भुजा वाले, हत्तीच्या सोंडेवाले
काही चित्र असते का? ही सर्व आहे भक्तीमार्गातील सामुग्री. खरे तर भक्ती असली पाहिजे
एका शिवबाबांची, जे सर्वांचे सद्गतीदाता आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे - हे
लक्ष्मी-नारायण सुद्धा ८४ जन्म घेतात. मग उच्च ते उच्च बाबाच येऊन सर्वांना सद्गती
देतात. त्यांच्यापेक्षा मोठे कोणीही नाही. या ज्ञानाच्या गोष्टी तुमच्यापैकी सुद्धा
नंबरवार धारण करू शकतात. धारणा करू शकत नसतील तर बाकी काय कामाचे राहिले? कित्येक
तर आंधळ्यांची काठी बनण्याऐवजी आपणच आंधळे बनतात. जी गाय दूध देत नाही तिला
पांजरपोळमध्ये ठेवतात. हे सुद्धा ज्ञानाचे दूध देऊ शकत नाहीत. असे खूप आहेत जे
काहीच पुरुषार्थ करत नाहीत. समजत नाहीत की आपण थोडे तरी कोणाचे कल्याण करावे.
स्वतःच्या भाग्याविषयी विचारच करत नाहीत. बस्स, जे काही मिळाले ते चांगले. तर बाबा
म्हणतील - यांच्या नशीबातच नाही. स्वतःची सद्गती करण्याचा पुरुषार्थ तर करायला
पाहिजे. देही-अभिमानी बनायचे आहे. बाबा किती उच्च ते उच्च आहेत आणि येतात पहा कसे
पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये. त्यांना बोलावतातच पतित दुनियेमध्ये. जेव्हा
रावण अगदीच भ्रष्ट करतो, तेव्हा बाबा येऊन श्रेष्ठ बनवतात. जे चांगला पुरुषार्थ
करतात ते राजा-राणी बनतात, जे पुरुषार्थ करत नाहीत ते गरीब बनतात. नशीबात नसेल तर
तदबीर (पुरुषार्थ) करू शकत नाहीत. कोणी तर खूप चांगले नशीब बनवतात. प्रत्येक जण
स्वतःला बघू शकतो की आपण काय सेवा करतो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रूप-बसंत
बनून मुखावाटे सदैव रत्ने काढायची आहेत, खूप-खूप गोड बनायचे आहे. कधीही दगड (कटू
शब्द) काढायचे नाहीत.
२) ज्ञान आणि
योगामध्ये हुशार बनून इतरांचे कल्याण करायचे आहे. आपले नशीब श्रेष्ठ बनविण्याचा
पुरुषार्थ करायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे.
वरदान:-
त्रि-स्मृती
स्वरूपाचा तिलक धारण करणारे संपूर्ण विजयी भव स्वतःची स्मृती, बाबांची स्मृती आणि
ड्रामाच्या नॉलेजची स्मृती - याच तीन स्मृतीमध्ये ज्ञानाचा विस्तार सामावलेला आहे.
नॉलेजच्या वृक्षाच्या या तीन स्मृती आहेत. जसे वृक्षाचे आधी बीज असते, त्या बीजातून
दोन पाने निघतात मग वृक्षाचा विस्तार होतो, तसे मुख्य बीज आहे - बाबांची स्मृती मग
दोन पाने अर्थात आत्मा आणि ड्रामाचे सर्व नॉलेज. या तीन स्मृतींना धारण करणारे
‘स्मृती भव’ किंवा ‘संपूर्ण विजयी भव’चे वरदानी बनतात.
बोधवाक्य:-
प्राप्तींना
नेहमी समोर ठेवा तर कमजोरी सहजच संपून जातील.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” संगमयुगामध्ये ब्रह्माकुमार
ब्रह्माकुमारी एकटे असू शकत नाहीत. फक्त बाबांच्या सोबतीचा अनुभव, कंबाइंड असल्याचा
अनुभव इमर्ज करा. असे नाही की बाबा तर आहेतच माझे, सोबतच आहेत. असे नाही, सोबत
असल्याचा प्रत्यक्ष अनुभव इमर्ज व्हावा. म्हणजे मग हा मायेचा वार, वार होणार नाही,
माया हार खाईल. फक्त घाबरू नका, हे काय झाले! हिंमत ठेवा, बाबा सोबत असल्याचे
लक्षात ठेवा तर विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे.