17-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपणच आपल्याला पहा की मी फूल बनलो आहे, देह-अहंकारामध्ये येऊन काटा तर बनत नाही ना? बाबा आले आहेत तुम्हाला काट्यापासून फूल बनविण्याकरिता”

प्रश्न:-
कोणत्या निश्चयाच्या आधारावर बाबांवरील प्रेम अतूट राहू शकते?

उत्तर:-
पहिले स्वतःला आत्मा निश्चय करा तेव्हा बाबांवर प्रेम कराल. हा देखील अतूट निश्चय पाहिजे की निराकार बाबा या भागीरथावर विराजमान आहेत. ते आम्हाला यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) शिकवत आहेत. जेव्हा हा निश्चय तुटतो तेव्हा प्रेम कमी होते.

ओम शांती।
काट्यांपासून फूल बनविणारे भगवानुवाच अथवा बागवान भगवानुवाच. मुले जाणतात की आपण इथे काट्यांपासून फूल बनण्यासाठी आलो आहे. प्रत्येकजण समजतात अगोदर आम्ही काटे होतो. आता फूल बनत आहोत. बाबांची महिमा तर खूप करतात, पतित-पावन या. ते खिवैया (नावाडी) आहेत, बागवान (बगिच्याचे मालक) आहेत, पाप कटेश्वर आहेत. बरीच नावे सांगतात परंतु सर्वत्र एकच चित्र आहे. त्यांची महिमा देखील गातात - ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर… आता तुम्ही जाणता की आम्ही त्या एका बाबांजवळ बसलो आहोत. काटा रूपी मनुष्यापासून आता आम्ही फूल रुपी देवता बनण्यासाठी आलो आहोत. हे एम ऑब्जेक्ट आहे. आता प्रत्येकाने आपल्या मनामध्ये डोकावून पहायचे आहे, आपल्यामध्ये दैवी गुण आहेत? मी सर्वगुणसंपन्न आहे? अगोदर तर देवतांची महिमा गात होतो, स्वतःला काटा समजत होतो. ‘हम निर्गुण हारे में कोई गुण नाही…’ कारण की ५ विकार आहेत. देह-अभिमान देखील अतिशय कट्टर अभिमान आहे. स्वतःला आत्मा समजतील तर बाबांविषयी देखील खूप प्रेम वाटेल. आता तुम्ही जाणता निराकार बाबा या रथावर विराजमान आहेत. हा निश्चय करता-करता देखील मग निश्चय तुटतो. तुम्ही म्हणता देखील - आम्ही शिवबाबांकडे आलो आहोत, जे या भागीरथ प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये आहेत, आम्हा सर्व आत्म्यांचा पिता एक शिवबाबा आहेत, ते या रथावर विराजमान आहेत. हा एकदम पक्का निश्चय पाहिजे, यामध्येच माया संशय उत्पन्न करते. कन्या पतिशी लग्न करते, ती समजत असते की, त्याच्याकडून खूप सुख मिळणार आहे परंतु कसले सुख मिळते, एका फटक्यात जाऊन अपवित्र बनते. कुमारी असते तर आई-वडील इत्यादी सर्व पाया पडतात कारण की पवित्र आहे. अपवित्र बनली आणि सर्वांच्या पाया पडायला सुरुवात करते. आज सर्व तिच्या पाया पडतात उद्या ती स्वतःच पाया पडू लागते.

आता तुम्ही मुले संगमावर पुरुषोत्तम बनत आहात. उद्या कुठे असणार? आज हे घर-परिवार तरी काय आहेत! सगळीकडे किती खराब काम चाललेले आहे! याला म्हटलेच जाते वेश्यालय. सर्व विषातून (विकारातून) जन्म घेतात. तुम्हीच शिवालयामध्ये होता, आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी खूप सुखी होता. दुःखाचे नामोनिशाण नव्हते. आता पुन्हा असे बनण्यासाठी आला आहात. लोकांना शिवालया विषयी काही माहितीच नाही आहे. स्वर्गाला म्हटले जाते शिवालय. शिवबाबांनी स्वर्गाची स्थापना केली. ‘बाबा’ असे तर सगळेच म्हणतात परंतु विचारा ते ‘फादर’ कुठे आहेत? तर म्हणतील सर्वव्यापी आहेत. कुत्रा-मांजर, कासव-माशामध्ये आहेत असे म्हणतात तर किती फरक झाला! बाबा म्हणतात - तुम्ही पुरुषोत्तम होता, मग ८४ जन्म भोगून तुम्ही काय बनला आहात? नरकवासी बनला आहात म्हणून सर्व गातात - ‘हे पतित-पावन या’. आता बाबा पावन बनविण्यासाठी आले आहेत. म्हणतात - हा अंतिम जन्म विष पिणे सोडा (विकारात जाणे सोडा). तरी देखील समजत नाहीत. सर्व आत्म्यांचे पिता आता म्हणत आहेत - पवित्र बना. सर्वजण म्हणतात देखील - ‘बाबा’, आत्म्याला पहिले ते बाबा (शिवबाबा) आठवतात, मग हे बाबा (ब्रह्मा बाबा) आठवतात. निराकार मध्ये ते बाबा (शिवबाबा), साकार मध्ये मग हे बाबा (ब्रह्मा बाबा). सुप्रीम आत्मा या पतित आत्म्यांना बसून समजावून सांगत आहे. तुम्ही देखील अगोदर पवित्र होता. बाबांसोबत रहात होता नंतर मग तुम्ही इथे आला आहात पार्ट बजावण्यासाठी. या चक्राला चांगल्या रीतीने समजून घ्या. आता आम्ही सतयुगामध्ये नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत. तुमची देखील इच्छा आहे ना की आपण स्वर्गामध्ये जावे. तुम्ही म्हणतही होता की कृष्णासारखा मुलगा मिळू दे. आता मी आलो आहे तुम्हाला असे बनविण्याकरिता. तिथे मुले असतातच श्रीकृष्णासारखी. सतोप्रधान फूल आहेत ना. आता तुम्ही कृष्णपुरीमध्ये जात आहात. तुम्ही तर स्वर्गाचे मालक बनता. स्वतःला विचारायचे आहे - मी फूल बनलो आहे? कुठे देह-अहंकारामध्ये येऊन काटा तर बनत नाही ना? मनुष्य स्वतःला आत्मा समजण्याऐवजी देह समजतात. आत्म्याला विसरल्यामुळे बाबांना सुद्धा विसरले आहेत. बाबांना बाबांद्वारेच जाणल्याने बाबांचा वारसा मिळतो. बेहदच्या बाबांकडून वारसा तर सर्वांना मिळतो. एकही असा कोणी राहत नाही ज्याला वारसा मिळत नाही. बाबाच येऊन सर्वांना पावन बनवतात, निर्वाणधाममध्ये घेऊन जातात. ते तर म्हणतात - ज्योत ज्योतीमध्ये सामावली, ब्रह्ममध्ये लीन झाला. ज्ञान काहीच नाही. तुम्ही जाणता आपण कोणाकडे आलो आहोत? हा कोणत्या मनुष्याचा सतसंग नाही आहे. आत्मे, परमात्म्यापासून दुरावले आहेत, आता त्यांचा (त्या परमात्म्याचा) संग मिळाला आहे. खरा-खरा हा सतचा संग ५ हजार वर्षांमध्ये एकदाच होतो. सतयुग-त्रेतामध्ये तर सतसंग असतही नाही. बाकी भक्तिमार्गामध्ये तर किती ढिगांनी सतसंग आहेत. आता वास्तविक सत तर आहेतच एक बाबा. आता तुम्ही त्यांच्या संगती मध्ये बसला आहात. ही देखील स्मृति रहावी की आपण गॉडली स्टुडंट आहोत, भगवान आम्हाला शिकवत आहेत, तरी देखील अहो सौभाग्य.

आपले बाबा इथे आहेत, ते पिता, टीचर आणि गुरु देखील बनतात. तीनही पार्ट आत्ता बजावत आहेत. मुलांना आपले बनवतात. बाबा म्हणतात - आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. बाबांची आठवण केल्यानेच पापे भस्म होतात मग तुम्हाला लाइटचा ताज मिळतो. ही देखील एक निशाणी आहे. बाकी असे नाही की लाईट दिसू लागते. ही पवित्रतेची निशाणी आहे. हे नॉलेज दुसऱ्या कोणालाही मिळू शकत नाही. देणारे एक बाबाच आहेत. त्यांच्यामध्ये फुल नॉलेज आहे. बाबा म्हणतात - मी मनुष्य सृष्टीचे बीजरुप आहे. हे उलटे झाड आहे. हा कल्पवृक्ष आहे ना. पहिले दैवी फुलांचे झाड होते. आता काट्यांचे जंगल बनले आहे कारण की ५ विकार आले आहेत. पहिला मुख्य आहे देह-अभिमान. तिथे देह-अभिमान असत नाही. एवढे मात्र समजतात की, आपण आत्मा आहोत; बाकी परमात्मा बाबांना जाणत नाहीत. आपण आत्मा आहोत, बस्स. अजून कोणते नॉलेज नसते; (सापाचे उदाहरण आहे). आता तुम्हाला समजावून सांगितले जाते की, जन्म-जन्मांतरीची जुनी सडलेली ही कातडी आहे जी आता तुम्हाला सोडायची आहे. आता आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत. आत्मा पवित्र झाली की मग हे शरीरच सुटून जाईल. सगळे आत्मे पळतील. हे ज्ञान तुम्हाला आत्ता आहे की हे नाटक पूर्ण होत आहे. आता आपल्याला बाबांकडे जायचे आहे, म्हणून घराची आठवण करायची आहे. या देहाला सोडून द्यायचे आहे, शरीर नष्ट झाले तर दुनिया नष्ट झाली मग नवीन घरात जाणार तर नवीन नाती तयार होतील. ते (संन्यासी) तरी सुद्धा पुनर्जन्म इथेच घेतात. तुम्हाला तर पुनर्जन्म घ्यायचा आहे फुलांच्या दुनियेमध्ये. देवतांना पवित्र म्हटले जाते. तुम्ही जाणता आम्हीच फूल होतो मग काटे बनलो आहोत आता पुन्हा फुलांच्या दुनियेमध्ये जायचे आहे. पुढे जाऊन तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. हे आहे खेळणे-बागडणे. मीरा ध्यानामध्ये खेळत असे, तिला ज्ञान नव्हते. मीरा काही वैकुंठामध्ये गेलेली नाही. इथेच कुठे असेल. या ब्राह्मण कुळातील असेल तर इथेच ज्ञान घेत असेल. असे नाही, डान्स केला तर बस वैकुंठामध्ये गेली. असे तर खूप जण डान्स करत होते. ध्यानामध्ये जाऊन बघून येत होते आणि मग जाऊन विकारी बनले. गायले जाते ना - ‘चढ़े तो चाखे वैकुंठ रस…’ बाबा आशा दाखवतात - तुम्ही वैकुंठाचे मालक बनू शकता जर ज्ञान-योग शिकलात तर. बाबांना सोडले तर गेले गटारामध्ये (विकारांमध्ये). आश्चर्यवत् बाबांचे बनन्ती, सुनन्ती, सुनावन्ती आणि मग भागन्ती होतात. अहो माया, किती मोठी ठेच लागते. आता बाबांच्या श्रीमतावर तुम्ही देवता बनता. आत्मा आणि शरीर दोन्ही श्रेष्ठ पाहिजे ना. देवतांचा जन्म विकारातून होत नाही. ती आहेच निर्विकारी दुनिया. तिथे ५ विकार असत नाहीत. शिवबाबांनी स्वर्ग बनवला होता. आता तर नरक आहे. आता तुम्ही परत स्वर्गवासी बनण्यासाठी आला आहात, जे चांगल्या रीतीने शिकतात तेच स्वर्गामध्ये जातील. तुम्ही परत शिकत आहात, कल्प-कल्प शिकत राहणार. हे चक्र फिरत राहील. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामधून कोणीही सुटू शकत नाही. जे काही बघता, मच्छर उडाला, कल्पा नंतर सुद्धा उडणार. हे समजण्यासाठी खूप चांगली बुद्धी पाहिजे. हे शूटिंग चालूच राहते. हे कर्मक्षेत्र आहे. इथे परमधामवरुन पार्ट बजावण्यासाठी आले आहेत.

आता या शिक्षणामध्ये कोणी तर खूप हुशार होतात तर कोणी अजून शिकत आहेत. कोणी शिकता-शिकता जुन्यांपेक्षाही हुशार होतात. ज्ञान सागर तर सर्वांना शिकवत राहतात. बाबांचा बनला आणि विश्वाचा वारसा तुमचाच आहे. हां, तुमची आत्मा जी पतित आहे तिला पावन जरूर बनवायचे आहे, त्यासाठी सोप्यात सोपी पद्धत आहे बेहदच्या बाबांची आठवण करत रहा तर तुम्ही हे (लक्ष्मी-नारायण) बनाल. तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेपासून वैराग्य आले पाहिजे. बाकी मुक्तिधाम, जीवनमुक्तिधाम आहे आणि एका शिवाय इतर कोणाचीही आम्ही आठवण करत नाही. पहाटे उठून अभ्यास करायचा आहे की आपण अशरिरी आलो, अशरिरी जायचे आहे. मग आपण कोणत्याही देहधारीची आठवण का म्हणून करायची! पहाटे अमृतवेलेला उठून स्वतःशी अशाप्रकारे गोष्टी करायच्या आहेत. पहाटेला अमृतवेला म्हटले जाते. ज्ञान अमृत आहे ज्ञान सागराकडे. तर ज्ञान सागर म्हणतात पहाटेचा वेळ खूप चांगला आहे. पहाटे उठून खूप प्रेमाने बाबांची आठवण करा - बाबा, तुम्ही ५ हजार वर्षांनंतर पुन्हा भेटला आहात. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर पापे भस्म होतील. श्रीमतावर चालायचे आहे. सतोप्रधान जरुर बनायचे आहे. बाबांची आठवण करण्याची सवय लागली की मग आनंदाने बसून रहाल. शरीराचे भान नष्ट होत जाईल. मग देहाचे भान राहणार नाही. अपार आनंद वाटेल. तुम्ही जेव्हा पवित्र होता तेव्हा आनंदात होता. तुमच्या बुध्दीमध्ये हे सर्व ज्ञान राहिले पाहिजे. सर्वात अगोदर जे येतात तर जरुर ते ८४ जन्म घेत असतील. त्यापेक्षा मग चन्द्रवंशी थोडे कमी जन्म, इस्लामी त्यापेक्षा कमी जन्म. नंबरवार झाडाची वृद्धी होते ना. मुख्य आहे डीटी धर्म (देवी-देवता धर्म) नंतर त्यातून ३ धर्म उदयास येतात. त्यानंतर शाखा-उपशाखा तयार होतात. आता तुम्ही ड्रामाला जाणता. हा ड्रामा उवे प्रमाणे अतिशय हळू-हळू फिरत रहातो. सेकंदा सेकंदाला टिक-टिक चालुच राहते म्हणून गायले जाते - सेकंदामध्ये जीवनमुक्ती. आत्मा आपल्या पित्याची आठवण करते. बाबा आम्ही तुमची संतान आहोत. आम्ही तर स्वर्गामध्ये असायला पाहिजे. मग नरकामध्ये का पडलो आहोत. बाबा तर स्वर्गाची स्थापना करणारे आहेत मग नरकामध्ये का पडलो आहोत. बाबा म्हणतात - तुम्ही स्वर्गामध्ये होता, ८४ जन्म घेता-घेता तुम्ही सर्व विसरला आहात. आता पुन्हा माझ्या मतावर चाला. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील कारण आत्म्यामध्येच भेसळ पडली आहे. शरीर आत्म्याचा दागिना आहे. आत्मा पवित्र तर शरीर सुद्धा पवित्र मिळते. तुम्ही जाणता आम्ही स्वर्गामध्ये होतो, आता पुन्हा बाबा आले आहेत तर बाबांकडून पूर्ण वारसा घेतला पाहिजे ना. ५ विकारांना सोडायचे आहे. देह-अभिमान सोडायचा आहे. कामकाज करत असताना बाबांची आठवण करत रहा. आत्मा आपल्या माशूकची अर्ध्या कल्पापासून आठवण करत आली आहे. आता ते माशूक आले आहेत. म्हणतात - तुम्ही काम-चितेवर बसून काळे (पतित) झाला आहात. आता मी तुम्हाला सुंदर (पावन) बनविण्यासाठी आलो आहे. त्यासाठी हा योग-अग्नि आहे. ज्ञानाला ‘चिता’ म्हणणार नाही. ‘योगा’ची चिता आहे. आठवणीच्या चितेवर बसल्यामुळे विकर्म विनाश होतील. ज्ञानाला तर नॉलेज म्हटले जाते. बाबा तुम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. उच्च ते उच्च बाबा आहेत, नंतर ब्रह्मा-विष्णू-शंकर, त्यानंतर सूर्यवंशी-चंद्रवंशी आणि नंतर मग इतर धर्मांची कलमे आहेत. झाड किती मोठे होते. आता या झाडाचे फाउंडेशन नाही आहे म्हणून बनेन ट्री चे (वडाच्या झाडाचे) उदाहरण दिले जाते. देवी-देवता धर्म प्राय: लोप झाला आहे. धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनले आहेत. आता तुम्ही मुले श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ कर्म करता. आपल्या दृष्टीला सिव्हिल (पवित्र) बनवता. तुम्ही आता भ्रष्ट कर्म (वाईट कर्म) करायची नाहीत. कोणती कु-दृष्टी जाऊ नये. स्वतःला बघा - ‘मी लक्ष्मीला वरण्या लायक बनलो आहे? मी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करतो का?’ रोज पोतामेल बघा. पूर्ण दिवसभरामध्ये देह-अभिमानामध्ये येऊन कोणते विकर्म तर केले नाही ना? नाहीतर शंभर पट होईल. माया चार्ट सुद्धा ठेवायला देत नाही. २-४ दिवस लिहून नंतर सोडून देतात. बाबांना काळजी वाटते ना. दया येते - मुले, माझी आठवण करतील तर त्यांची पापे भस्म होतील. यामध्ये मेहनत आहे. आपलेच नुकसान करून घ्यायचे नाही. ज्ञान तर खूप सोपे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पहाटे अमृतवेलेला उठून बाबांशी गोड-गोड गोष्टी करायच्या आहेत. अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. हे लक्षात रहावे की, बाबांच्या आठवणी व्यतिरिक्त इतर कशाचीही आठवण येता कामा नये.

२) आपली दृष्टी अतिशय शुद्ध पवित्र बनवायची आहे. दैवी फुलांचा बगीचा तयार होत आहे त्यामुळे फूल बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. काटा बनायचे नाही.

वरदान:-
आपल्या पावरफूल स्थितीद्वारे मनसा सेवेचे सर्टिफिकेट प्राप्त करणारे स्व-अभ्यासी भव विश्वाला लाइट आणि माइटचे वरदान देण्यासाठी अमृतवेलेला आठवणीच्या स्व-अभ्यासाद्वारे शक्तिशाली वायुमंडळ बनवा तेव्हा मनसा सेवेचे सर्टिफिकेट प्राप्त होईल. अंतिम समयी मनसा द्वारेच नजरेने निहाल करण्याची, आपल्या वृत्ती द्वारे त्यांच्या वृत्तिला बदलण्याची सेवा करायची आहे. आपल्या श्रेष्ठ स्मृतिने सर्वांना समर्थ बनवायचे आहे. जेव्हा असा लाइट-माइट देण्याचा अभ्यास होईल तेव्हा निर्विघ्न वायुमंडळ बनेल आणि हा किल्ला मजबूत होईल.

बोधवाक्य:-
हुशार ते आहेत जे मनसा-वाचा-कर्मणा तीनही सेवा एकाचवेळी एकत्र करतात.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- जे चॅलेंज करता - सेकंदामध्ये मुक्ती-जीवनमुक्तिचा वारसा प्राप्त करा, त्याला प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी स्व-परिवर्तनाची गति सेकंदापर्यंत पोहोचली आहे? स्व-परिवर्तनाद्वारे इतरांचे परिवर्तन करणे. सर्वांना अनुभव करवा की ब्रह्माकुमार अर्थात वृत्ति, दृष्टी, कृति आणि वाणी परिवर्तन. त्याचसोबत प्युरिटीची पर्सनॅलिटी, रुहानी रॉयल्टीचा अनुभव करवा. समोर येताच, भेटताच या पर्सनॅलिटीकडे आकर्षित व्हावेत.