17-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, सूर्यवंशी राज्यपद घेण्यासाठी आपले सर्व काही बाबांवर स्वाहा करा, सूर्यवंशी राज्यपद अर्थात एअरकंडिशन तिकीट”

प्रश्न:-
या दुनियेमध्ये तुम्हा मुलांपेक्षा अधिक भाग्यवान दुसरा कोणीच नाही - ते कसे?

उत्तर:-
तुम्हा मुलांच्या सन्मुख बेहदचे बाबा आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला बेहदचा वारसा मिळत आहे. तुम्ही यावेळी बेहदचे पिता, टीचर आणि सद्गुरूचे बनून त्यांच्याकडून बेहदची प्राप्ती करत आहात. दुनियावाले तर त्यांना जाणत सुद्धा नाहीत; तर मग ते तुमच्यासारखे भाग्यवान कसे बरे असू शकतील.

गीत:-
बड़ा खुशनसीब है…

ओम शांती।
ब्राह्मणकुलभूषण मुले जाणतात की आता आपण ब्राह्मण संप्रदायाचे आहोत, नंतर मग दैवी संप्रदायाचे बनणार आहोत. मुलांना बाबा बसून समजावून सांगत आहेत - जेव्हा की बेहदचे बाबा सन्मुख आहेत आणि त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळत आहे. बाकी आणखी काय पाहिजे. भक्तिमार्ग केव्हापासून सुरू होतो, हे कोणालाच माहिती नाही. भक्तिमार्गवाले भक्त भगवंताची आठवण करतात अथवा ब्राईड्स, ब्राईडग्रुमची आठवण करतात. परंतु आश्चर्य आहे की त्यांना कोणीही ओळखत नाहीत. असे कधी तुम्ही पाहिले आहे का की, सजणी आपल्या साजनलाच ओळखत नाही. नाहीतर मग आठवण तरी कशी करू शकेल? भगवान तर सर्वांचे पिता आहेत. मुले बाबांची आठवण करतात. परंतु ओळखी शिवाय आठवण करणे सर्व व्यर्थ होते म्हणून आठवण करून काहीही फायदा होत नाही. आठवण करत असूनही कोणीही त्या एम ऑब्जेक्टला प्राप्त करू शकत नाहीत. भगवान कोण आहेत, त्यांच्याकडून काय मिळते. काहीच जाणत नाहीत. इतके सर्व धर्म क्राईस्ट, बौद्ध इत्यादी प्रीसेप्टर अथवा धर्म स्थापन करणाऱ्यांना त्यांचे फॉलोअर्स आठवण करतात परंतु त्यांची आठवण केल्याने आपल्याला काय मिळणार आहे, ते काहीच माहिती नाही. यापेक्षा तर भौतिक शिक्षण चांगले आहे. एम ऑब्जेक्ट तर बुद्धीमध्ये असतो ना. पित्याकडून काय मिळते? टीचर कडून काय मिळते? आणि गुरुकडून काय मिळते? हे इतर कोणीही समजू शकत नाहीत. तुम्ही इथे पित्याचे मग टीचरचे आणि मग सद्गुरुचे बनता. पिता आणि टीचरपेक्षा गुरु श्रेष्ठ असतो. आता तुम्हा मुलांना निश्चय झाला आहे की, आपण बाबांचे बनलो आहोत. बाबा आम्हाला ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे येऊन स्वर्गाचा मालक बनवतात अथवा शांतीधामचा मालक बनवतात.

बाबा म्हणतात - ‘लाडक्या मुलांनो, तुम्ही माझ्याकडून आपला वारसा घेणार ना!’ सर्वजण म्हणतात, ‘होय बाबा, का नाही घेणार’. अच्छा - चंद्रवंशी, राम-पद मिळवून तुम्ही खुश व्हाल का? तुम्हाला काय हवे आहे? बाबा सौगात घेऊन आले आहेत. तुम्ही सूर्यवंशी लक्ष्मीला वरणार का चंद्रवंशी सीतेला? तुम्ही आपला चेहरा तर बघा. श्री नारायणाला अथवा श्री लक्ष्मीला वरण्या लायक आहात? लायक बनल्याशिवाय वरू कसे शकता? आता बाबा बसून समजावून सांगत आहेत - हुबेहूब जसे कल्पापूर्वी समजावून सांगितले होते तसे पुन्हा समजावून सांगत आहे. तुम्ही पुन्हा येऊन वारसा घेत आहात. तुमचे एम ऑब्जेक्टच आहे - बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेण्याचे. ते आहे- सूर्यवंशी राज्यपद, सेकंड ग्रेड आहे - चंद्रवंशी. जसे एअर-कंडिशन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असतात ना. तर सतयुगाची पूर्ण राजधानी, एअर-कंडीशन समजा. एअर-कंडिशन पेक्षा श्रेष्ठ तर काहीही नसते. नंतर आहे फर्स्टक्लास. तर आता बाबा म्हणतात - तुम्ही एअर-कंडिशनचे सूर्यवंशी राज्य घेणार का चंद्रवंशी फर्स्ट क्लासचे घेणार? त्याही पेक्षा कमी तर मग सेकंड क्लासमध्ये नंबरवार वारसदार बना, मग तर तुम्ही शेवटी-शेवटी येऊन राज्य घेणार. नाहीतर मग थर्डक्लास प्रजा, मग त्यामध्ये देखील तिकीट रिझर्व असते. फर्स्टक्लास रिझर्व, सेकंडक्लास रिझर्व, नंबरवार दर्जे असतात ना. बाकी सुख तर तिथे आहेच आहे. कंपार्टमेंट्स तर वेगवेगळी आहेत ना. श्रीमंत व्यक्ती एअर-कंडिशनचे तिकीट घेतील. तुमच्यामध्ये श्रीमंत कोण बनतात? जे सर्व काही बाबांना देतात. बाबा हे सर्व काही तुमचे आहे. भारतामध्येच महिमा गायली गेली आहे - सौदागर, रत्नाकर, जादूगर ही महिमा आहे बाबांची, श्रीकृष्णाची नाही. श्रीकृष्णाने तर वारसा घेतला, सतयुगामध्ये प्रारब्ध मिळवले. तो देखील बाबांचा बनला. प्रारब्ध कुठून तरी मिळवले असेल ना. लक्ष्मी-नारायण सतयुगामध्ये प्रारब्ध भोगतात. आता तुम्ही मुले चांगल्या प्रकारे जाणता, जरूर यांनी भूतकाळामध्ये प्रारब्ध बनविले असेल ना. नेहरुंचे प्रारब्ध किती चांगले होते. जरूर त्यांनी चांगली कर्म केली होती. बिना मुकुट भारताचे बादशहा होते. भारताची महिमा तर भरपूर आहे. भारतासारखा श्रेष्ठ देश कोणता असूच शकत नाही. भारत परमपिता परमात्म्याचे बर्थप्लेस आहे. हे रहस्य कोणाच्याही बुद्धीमध्ये बसत नाही. परमात्माच सर्वांना अर्ध्याकल्पासाठी सुख-शांती देतात. भारतच एक नंबरचे तीर्थस्थान आहे. परंतु ड्रामा अनुसार एका बाबांना विसरल्यामुळे सृष्टीची हालत कशी झाली आहे म्हणून शिवबाबा परत येतात. निमित्त तर कोणीतरी बनतात ना.

आता बाबा म्हणतात - अशरीरी भव, स्वतःला आत्मा निश्चय करा. मी आत्मा कोणाची संतान आहे, हे कोणीही जाणत नाही. आश्चर्य आहे ना. म्हणतात देखील - ओ गॉडफादर दया करा. शिवजयंती देखील साजरी करतात, परंतु ते केव्हा आले होते, कोणालाच माहिती नाही. आणि ही आहे ५ हजार वर्षांची गोष्ट. बाबाच येऊन नवीन दुनिया सतयुग स्थापन करतात. सतयुगाचे आयुष्य लाखो वर्षे तर नाहीये. म्हणजे घोर अंधार आहे ना. गीतेचा उपदेश कितीतरी जण येऊन ऐकतात. परंतु ना शिकविणारे काही समजत, आणि ना शिकणारे काही समजतात. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात, फक्त बाबांची आठवण करा. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान बना. विष्णूलाच सर्व अलंकार दिले आहेत. शंख देखील दिला आहे, पद्म (कमळाचे फूल) देखील दिले आहे. वास्तविक हे अलंकार देवतांना थोडेच दिले जातात. या किती गूढ गंभीर गोष्टी आहेत. हे आहेत ब्राह्मणांचे अलंकार. परंतु ब्राह्मणांना कसे बरे द्यावे, आज ब्राह्मण आहेत, उद्या शूद्र बनतात. ब्रह्माकुमारच शूद्र-कुमार बनतात. माया वेळ लावत नाही. जर कोणती चूक केली, बाबांच्या श्रीमतावर चालला नाही, बुद्धी खराब झाली, माया व्यवस्थित थप्पड मारून तोंड फिरवते. माणसे रागामध्ये म्हणतात ना - ‘थप्पड मारून तोंड फिरवून ठेवीन’. तर माया देखील अशी आहे. बाबांना विसरले आणि माया एका सेकंदामध्ये थप्पड मारून तोंड फिरवते. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करतात. तर माया सेकंदामध्ये जीवनमुक्ती नष्ट करते. किती चांगल्या-चांगल्या मुलांना माया पकडते. माया बघते की, कुठे गडबड करत आहेत तर लगेच थप्पड मारते. बाबा तर येऊन जुन्या दुनियेपासून तोंड फिरवतात. एखादा लौकिक पिता गरीब असतो, तर जुन्या झोपडीत राहतात, आणि जेव्हा मग नवीन घर बनवतात, तर मुलांच्या बुद्धीमध्ये पक्के होते की, बस्स, आता नवीन घर तयार होईल, आम्ही तिथे जाऊन राहणार. हे जुने तोडून टाकणार. आता बाबांनी तुमच्यासाठी तळहातावर बहिश्त अथवा वैकुंठ आणला आहे. म्हणतात - लाडक्या मुलांनो, आत्म्यांसोबत बोलतात. या डोळ्यांद्वारे तुम्हा मुलांना बघत आहेत. बाबा म्हणतात - मी देखील ड्रामाच्या वश आहे. असे नाही ड्रामा शिवाय काही करू शकतो. नाही. मुले आजारी पडतात, तर असे नाही की, मी त्यांना बरे करेन, ऑपरेशन करण्यापासून वाचवेन. नाही, कर्मभोग तर सर्वांना भोगायचेच आहेत. तुमच्यावर तर खूप ओझे आहे कारण तुम्ही सर्वात जुने आहात. सतोप्रधानापासून एकदम तमोप्रधान बनले आहात. आता तुम्हा मुलांना बाबा भेटले आहेत तर बाबांकडून वारसा घेतला पाहिजे. तुम्ही जाणता कल्प-कल्प ड्रामानुसार आपण बाबांकडून वारसा घेतो. जे सूर्यवंशी, चंद्रवंशी घराण्याचे असतील ते अवश्य येतील. जे देवता होते ते शूद्र बनले आहेत, मग परत तेच ब्राह्मण बनून दैवी संप्रदायाचे बनतील. या गोष्टी बाबांशिवाय कोणीही सांगू शकणार नाही.

बाबांना तुम्ही मुले किती गोड वाटता. म्हणतात, तुम्ही तीच कल्पापूर्वीची माझी मुले आहात. मी कल्प-कल्प येऊन तुम्हाला शिकवतो. किती वंडरफुल गोष्टी आहेत. निराकार भगवानुवाच. शरीराद्वारे उवाच करतील ना (बोलतील ना). शरीर आत्म्यापासून वेगळे होते तेव्हा मग आत्मा उवाच करू शकत नाही (बोलू शकत नाही). आत्मा डिटॅच होते. आता बाबा म्हणतात - अशरीरी भव. असे नाही की प्राणायाम इत्यादी करायचा आहे. नाही, असे समजायचे आहे की, ‘मी आत्मा अविनाशी आहे’. माझ्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. बाबा स्वतः म्हणतात - माझी आत्मा देखील जी ॲक्ट करते, तो सर्व पार्ट भरलेलाच आहे. भक्तिमार्गामध्ये माझा तिथे पार्ट चालतो, आणि मग ज्ञानमार्गामध्ये इथे येऊन ज्ञान देतो. भक्तिमार्गवाल्यांना ज्ञानाविषयी माहितीच नाहीये. एखाद्याने जर दारू प्यायलीच नसेल तर त्याला चव कशी काय कळणार? त्याचप्रमाणे ज्ञान देखील जेव्हा घेतील तेव्हाच तर कळेल. ज्ञानाने सद्गती होते तर जरूर ज्ञान-सागरच सद्गती करू शकतात. बाबा म्हणतात - मी सर्वांचा सद्गती दाता आहे. सर्वोदया लीडर आहे ना. किती तऱ्हेतऱ्हेचे आहेत. खरेतर सर्वांवर दया करणारे तर बाबा आहेत. बाबांना म्हणतात - ‘हे भगवान दया करा’. तर सर्वांवर दया ते करतात, बाकी सर्व आहेत हदची दया करणारे. बाबा तर साऱ्या दुनियेला सतोप्रधान बनवितात. त्यामध्ये तत्व देखील सतोप्रधान बनतात. हे कामच आहे परमात्म्याचे. तर ‘सर्वोदया’ याचा अर्थ किती मोठा आहे. एकदम सर्वांवर दया करतात. स्वर्गाच्या स्थापनेमध्ये कोणीही दुःखी असत नाहीत. तिथे नंबर वन फर्निचर, वैभव इत्यादी उपलब्ध असते. दुःख देणारी जनावरे, माश्यांसारखे जीव इत्यादी काहीही नसतात. तिथे देखील मोठ्या व्यक्तीच्या घरामध्ये किती स्वच्छता असते. कधीही तुम्हाला माशी सुद्धा दिसणार नाही. मच्छर इत्यादी प्रवेश करू शकत नाही. स्वर्गामध्ये कोणाची ताकद नाही जे येऊ शकतील. घाण करणारी कोणतीही गोष्ट असत नाही. नॅचरल फुले इत्यादींचा सुगंध असतो. तुम्हाला सूक्ष्मवतन मध्ये बाबा शुबी-रस पाजतात. आता सूक्ष्मवतनमध्ये तर काहीच नाहीये. हे सर्व साक्षात्कार आहेत. वैकुंठामध्ये किती चांगली-चांगली फुले, बगीचे इत्यादी असतात. सूक्ष्मवतन मध्ये थोडाच बगीचा ठेवला आहे. हे सर्व आहेत साक्षात्कार. इथे बसलेले असताना तुम्ही साक्षात्कार करता.

गीता देखील एकदम फर्स्टक्लास आहे. तुम्ही जाणता - आपल्याला बाबा मिळाले आहेत, तर मग आणखी काय पाहिजे? बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहोत तर बाबांची आठवण केली पाहिजे ना. बाबांचे मत प्रसिद्ध आहे. श्रीमताद्वारे आपण श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनणार. बाकी सर्वांची आहेत आसुरी मते, म्हणून ते जाणत नाहीत की सतयुगामध्ये सदैव सुख होते; लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. लहानपणी तेच राधे-कृष्ण आहेत, त्यांचे चरित्र इत्यादी काहीही नाही. स्वर्गामध्ये सर्व मुले अतिशय सद्गुणी असतात. खोडकरपणाची कोणती गोष्टच नसते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जेव्हा की या जुन्या दुनियेपासून तोंड फिरवले आहे तर मग पुन्हा अशी कोणतीही चूक करायची नाही ज्यामुळे माया स्वतःकडे तोंड फिरवून घेईल. श्रीमताची अवज्ञा करायची नाही. बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे.

२) आपले सर्व काही बाबांना स्वाहा करून पक्का वारसदार बनून सतयुगी एअर-कंडीशनचे तिकीट घ्यायचे आहे. एम ऑब्जेक्टला बुद्धीमध्ये ठेवून पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
स्व-स्थिती द्वारे सर्व परिस्थितींशी सामना करणारे अव्यक्त स्थितीचे अभ्यासी भव

जेव्हा अव्यक्त स्थितीच्या अभ्यासाची सवय होईल तेव्हा स्व-स्थिती द्वारे प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकाल. आणि ही सवय कोर्टामध्ये जाण्यापासून (धर्मराजाच्या सजेपासून) वाचवेल; त्यामुळे या अभ्यासाला जेव्हा नॅचरल आणि नेचर बनवाल तेव्हा नॅचरल कॅलमिटीज होतील. कारण जेव्हा सामना करणारे स्व-स्थिती द्वारे प्रत्येक परिस्थितीला पार करण्याची शक्ती धारण करतील तेव्हा पडदा उघडेल. यासाठी जुन्या सवयींपासून, जुन्या संस्कारांपासून, जुन्या गोष्टींपासून… संपूर्ण वैराग्य पाहिजे.

बोधवाक्य:-
स्वतःला निमित्त, करनहार समजा म्हणजे मग कोणत्याही कर्मामध्ये थकवा येऊ शकत नाही.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये -

“मनुष्य-लोक, देव-लोक आणि भुत-प्रेतांच्या दुनियेचा विस्तार”

बरेच लोक हा प्रश्न विचारतात की, हे जे अशुद्ध जीवात्मे आहेत ज्यांना घोस्ट (भूत) म्हटले जाते, हे सत्य आहे का कल्पना आहे? अथवा भ्रम आहे? तर त्यावर आज स्पष्ट समजून सांगितले जात आहे की, मनुष्य-आत्मा जेव्हा विकर्म करते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या सजा अवश्य भोगाव्या लागतात आणि त्या देखील मनुष्य जन्मामध्येच भोगाव्या लागतात, ना की पशु-पक्षी आणि प्राणी योनीमध्ये. सुख-दुःख भोगण्याची जाणीव मनुष्यामध्ये जास्त असते, ना की प्राण्यांमध्ये. या सृष्टीच्या खेळामध्ये मुख्य पार्ट मनुष्याचा आहे. हे पशू-पक्षी इत्यादी तर जसे की सृष्टी ड्रामाची शोभा आहेत, संपूर्ण कल्पामध्ये सतयुग आदि पासून कलियुग अंतापर्यंत मनुष्य आत्म्यांचे ८४ जन्म आहेत, बाकी हे ८४ लाख तर पशू-पक्षी इत्यादींची व्हरायटी असू शकते. आता ही सर्व रहस्ये परमात्म्याशिवाय इतर कोणीही सांगू शकत नाही. आत्म्यांचे निवासस्थान आहे - ब्रह्मतत्व अर्थात निराकारी दुनिया; बाकी या पशूंचे आत्मे ब्रह्मतत्वामध्ये जाऊ शकत नाहीत, ते या अवकाशतत्वामध्येच पार्ट बजावतात, त्यांचा देखील मर्ज-इमर्जचा आणि सतो, रजो, तमोमध्ये येण्याचा पार्ट असतो म्हणून प्रकृतीच्या खूप विस्तारामध्ये न जाता पहिले आपण आपल्या आत्म्याचे कल्याण करावे अर्थात मनमनाभव.

आता येऊ मनुष्य आत्म्याच्या विषयावर. तर जे आत्मे अशुद्ध कर्म करून विकर्म बनवतात ते आपल्या अशुद्ध संस्कारांनुसार जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये येऊन आदि-मध्य-अंत अर्थात मृत्यू समयी आपल्या केलेल्या विकर्मांचा साक्षात्कार करून सूक्ष्म मध्ये सजा भोगतात. या थोड्याशा काळामध्ये अनेक जन्मांचे दुःख अनुभवले जाते; आणि मग शरीर सोडून गर्भ-जेलमध्ये जाऊन दुःख भोगतात. त्यानंतर मग संस्कारानुसार अशा आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतात की तिथे देखील आपल्या जीवनामध्ये सुख-दुःख भोगतात, याला म्हटले जाते - आदि-मध्य-अंत. परंतु काही-काही आत्म्यांना लवकर शरीर मिळत नाही ते आकारी रूपामध्ये या आकाशतत्वामध्ये घोस्ट (भूत) बनून भटकत राहतात, ही देखील एक शिक्षा आहे अर्थात भोगना आहे. त्या अशुद्ध जीवात्म्यासोबत जर कोणाचा हिशोब असेल तर ती त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याला दुःख देते अर्थात हिशोब चुकता करून मग जाऊन आपले शरीर धारण करते. एखादी जिवात्मा तर ज्याच्यामध्ये प्रवेश करते त्याला खूप मारते देखील, खूप कष्ट देते परंतु हे सर्व हिशोबामधील भोगाचा प्रकार आहे, ज्यामुळे मनुष्य तनामध्येच सर्व सुख-दुःख अनुभवले जाते. हे तर तुम्हाला सांगितले गेले आहे की, जी आत्मा मुक्तिधाम मधून या साकारी खेळामध्ये येते ती मधूनच परत मुक्तिधाम मध्ये जाऊ शकत नाही; परंतु आपल्या केलेल्या अशुद्ध आणि शुद्ध कर्मा अनुसार संस्कार धारण करून सुख-दुःखाच्या फेऱ्यामध्ये येते. सर्व आत्म्यांचा पुनर्जन्म होतो, फक्त एका परमात्म्याचा होत नाही. अच्छा!

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

बापदादांना स्वच्छ मन असणारी मुले सर्वात प्रिय आहेत. स्वच्छ मन असणारे सदैव बापदादांच्या दिलतख्तनशीन असतात. ते वृत्तीमध्ये, दृष्टीमध्ये, वाणीमध्ये, संबंध-संपर्कामध्ये सरळ, स्पष्ट आणि एकसमान दिसतात. सरळतेची (साधेपणाची) निशाणी आहे - मन, बुद्धी, वाणी एकसमान. मनामध्ये एक, वाणीमध्ये दुसरे - ही सरळतेची निशाणी नाही. सरळ स्वभाव असणारे सदैव निर्माणचित्त, निरहंकारी, नि:स्वार्थी असतात. ते सरळ चित्त, सरळ वाणी, सरळ वृत्ती, सरळ दृष्टी असणारे असतात.