17-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - उच्च बनायचे असेल तर आपला पोतामेल रोज बघा, कोणतेही कर्मेंद्रिय धोका देऊ
नये, डोळे खूप धोकेबाज आहेत त्यांच्या पासून सावध रहा”
प्रश्न:-
सर्वात खराब
सवय कोणती आहे, त्यापासून वाचण्याचा कोणता उपाय आहे?
उत्तर:-
सर्वात खराब सवय आहे - तोंडाचा स्वाद. कोणता चांगला पदार्थ बघितला तर लपवून खातील.
लपविणे अर्थात चोरी. चोरी रुपी माया देखील अनेकांना नाक-कान धरून पकडते. यापासून
वाचण्याचे साधन जेव्हा पण कुठे बुद्धी जाईल तर आपणच आपल्याला सजा द्या. घाणेरड्या
सवयींना काढून टाकण्यासाठी स्वतःच स्वतःला खूप फटकारले पाहिजे (खडसावले पाहिजे).
ओम शांती।
आत्म-अभिमानी होऊन बसला आहात? प्रत्येक गोष्ट स्वतःच स्वतःला विचारायची असते. मी
आत्म-अभिमानी होऊन बसलो आहे आणि बाबांची आठवण करत आहे? गायले देखील आहे - शिव शक्ती
पांडव सेना. ही शिवबाबांची सेना बसली आहे ना. त्या भौतिक सेनेमध्ये फक्त तरुण असतात,
वृद्ध किंवा मुले इत्यादी नसतात. या सेनेमध्ये तर वृद्ध, मुले, तरुण इत्यादी सर्व
बसले आहेत. ही आहे मायेवर विजय प्राप्त करण्यासाठीची सेना. प्रत्येकाला मायेवर विजय
प्राप्त करून बाबांकडून बेहदचा वारसा घ्यायचा आहे. मुले जाणतात माया खूप शक्तिशाली
आहे. कर्मेंद्रियेच सर्वात जास्त धोका देतात. चार्टमध्ये हे देखील लिहा की आज
कोणत्या कर्मेंद्रियाने धोका दिला? आज अमकीला बघितले तर मनात आले तिला हात लावावा,
असे करावे. डोळे खूप नुकसान करतात. प्रत्येक कर्मेंद्रियाला बघा, कोणते कर्मेंद्रिय
खूप नुकसान करते? यावर सूरदास चे देखील उदाहरण देतात. आपली तपासणी केली पाहिजे. डोळे
खूप धोका देणारे आहेत. चांगल्या-चांगल्या मुलांना देखील माया धोका देते. भले सेवा
चांगली करतात परंतु डोळे धोका देतात. यावर खूप बारकाईने लक्ष ठेवायचे आहे कारण शत्रू
आहे ना. आपल्या पदाला भ्रष्ट करते. जी हुशार मुले आहेत, त्यांनी व्यवस्थित नोट करून
ठेवले पाहिजे. खिशामध्ये डायरी ठेवलेलीच असावी. जसे भक्तीमार्गामध्ये बुद्धी
दुसरीकडे गेली तर स्वतःला चिमटा काढतात. तुम्ही देखील स्वतःला शिक्षा केली पाहिजे.
खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. कर्मेंद्रिये धोका तर देत नाहीत ना! त्यापासून दूर
निघून गेले पाहिजे. थांबून बघायचे सुद्धा नाही. स्त्री-पुरुषाचाच खूप गोंधळ आहे.
बघितल्यामुळे काम विकाराची दृष्टी जाते म्हणून संन्यासी लोक डोळे बंद करून बसतात.
काही-काही संन्यासी तर स्त्रीकडे पाठ करून बसतात. त्या संन्यासी इत्यादींना काय
मिळते? फार-फार तर दहा-वीस लाख, करोड जमा करतील. मेले तर संपलेच. पुन्हा दुसऱ्या
जन्मामध्ये जमा करावे लागेल. तुम्हा मुलांना तर जे काही मिळते तो अविनाशी वारसा बनतो.
तिथे धनाचा मोह असतच नाही. अशी कोणतीही अप्राप्ती नसते, ज्याच्यासाठी डोकेफोड करावी
लागेल. कलियुगाचा अंत आणि सतयुगाची आदि यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. तिथे तर
अपार सुख असते. इथे तर काहीही नाही. बाबा नेहमी म्हणतात - ‘संगम’ शब्दा सोबत
‘पुरुषोत्तम’ शब्द जरूर लिहा. अगदी स्पष्ट शब्द बोलले पाहिजेत. समजून सांगणे सोपे
होते. ‘मनुष्य से देवता किये…’ तर जरूर संगमावरच येतील ना देवता बनविण्यासाठी,
नरकवासीला स्वर्गवासी बनविण्यासाठी. मनुष्य तर घोर अंधारामध्ये आहेत. स्वर्ग कसा
असतो, माहितीच नाहीये. इतर धर्मवाले तर स्वर्गाला पाहू देखील शकत नाहीत; म्हणून बाबा
म्हणतात - तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. त्याला म्हणतातच हेवन (स्वर्ग). परंतु हे
थोडेच समजतात की आपण देखील हेवनमध्ये जाऊ शकतो. कोणालाच माहिती नाही. भारतवासी हे
विसरले आहेत. हेवनसाठी लाखो वर्षे म्हणतात. क्रिश्चन लोक स्वतः म्हणतात ३०००
वर्षांपूर्वी हेवन होता. लक्ष्मी-नारायणाला म्हणतातच गॉड-गॉडेज. जरूर गॉडच
गॉड-गॉडेज बनवतील. तर मेहनत केली पाहिजे. रोज आपला पोतामेल बघितला पाहिजे. कोणत्या
कर्मेंद्रियाने धोका दिला? जीभ देखील काही कमी नाहीये. कोणता चांगला पदार्थ बघितला
तर लपून खातील. समजतात थोडेच की हे देखील पाप आहे. चोरी झाली ना. ते देखील
शिवबाबांच्या यज्ञातून चोरी करणे खूप वाईट आहे. ‘कख का चोर सो लख का चोर’ असे म्हटले
जाते. खूप जणांना माया नाकाला पकडत राहते. या सर्व वाईट सवयी काढून टाकायच्या आहेत.
स्वतःला फटकारले पाहिजे. जोपर्यंत वाईट सवयी आहेत तोपर्यंत उच्च पद प्राप्त करू
शकणार नाही. स्वर्गामध्ये जाणे काही मोठी गोष्ट नाहीये. परंतु कुठे राजा-राणी कुठे
प्रजा! तर बाबा म्हणतात - कर्मेंद्रियांची खूप तपासणी केली पाहिजे. कोणते
कर्मेंद्रिय धोका देते? पोतामेल काढला पाहिजे. व्यापार आहे ना. बाबा म्हणतात -
माझ्यासोबत व्यापार करायचा असेल, उच्च पद प्राप्त करायचे असेल तर श्रीमतावर चाला.
बाबा डायरेक्शन देतील, त्यामध्ये देखील माया विघ्न आणेल. करू देणार नाही. बाबा
म्हणतात, हे विसरू नका. चूक केल्यामुळे मग खूप पश्चाताप करावा लागेल. कधीही उच्च पद
प्राप्त करू शकणार नाही. आता तर आनंदाने म्हणता - आम्ही नरापासून नारायण बनणार परंतु
स्वतःला विचारत रहा - कुठे कर्मेंद्रिये धोका तर देत नाही ना?
स्वतःची उन्नती करायची
असेल तर बाबा जे डायरेक्शन देतात त्याला अंमलात आणा. पूर्ण दिवसाचा पोतामेल बघा.
चुका तर खूप होत असतात. डोळे खूप धोका देतात. दया येईल - यांना खाऊ घालावे, सौगात
द्यावी. आपला खूप वेळ वाया घालवतात. माळेचा मणी बनण्यामध्ये खूप मेहनत आहे. मुख्य
आहेत आठ रत्न. नवरत्न म्हणतात. एक तर बाबा, बाकी आहेत आठ, मध्यभागी बाबांची निशाणी
तर पाहिजे ना, कोणती ग्रहचारी (संकट) इत्यादी येते तर नवरत्नांची अंगठी घालायला
देतात. इतक्या असंख्य पुरुषार्थ करणाऱ्यांमधून आठ निघतात, पास विद ऑनर्स. आठ
रत्नांची खूप महिमा आहे. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे कर्मेंद्रिया खूप धोका देतात.
भक्तीमध्ये देखील चिंता असते ना, डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे - दान-पुण्य करावे
म्हणजे पाप नष्ट होईल. सतयुगामध्ये काही चिंतेचा प्रश्नच नाही कारण तिथे रावणराज्यच
नाहीये. तिथे देखील अशा गोष्टी असतील तर मग नरक आणि स्वर्गामध्ये काही फरकच राहणार
नाही. तुम्हाला इतके उच्च पद प्राप्त करण्यासाठी स्वयं भगवान बसून शिकवत आहेत.
बाबांची आठवण येत नाही, ठीक आहे शिकविणाऱ्या टीचरची तरी आठवण यावी. अच्छा, नाही तर
निदान एवढी तरी आठवण करा की, आमचे एकच बाबा सद्गुरु आहेत. लोकांनी आसुरी मतामुळे
बाबांचा किती अपमान केला आहे. बाबा आता सर्वांवर उपकार करतात. तुम्हा मुलांनी देखील
उपकार केले पाहिजेत. कोणावरही अपकार नाही, कु-दृष्टी सुद्धा नाही. आपलेच नुकसान
करतात. ते व्हायब्रेशन मग दुसऱ्यांवर देखील परिणाम करते. बाबा म्हणतात - खूप मोठे
ध्येय आहे. रोज आपला पोतामेल बघा - कोणते विकर्म तर नाही केले? ही आहेच विकर्मी
दुनिया, विकर्मी संवत. विकर्माजीत देवतांच्या संवत विषयी कोणालाच माहिती नाहीये.
बाबा समजावून सांगतात, विकर्माजीत संवतला ५००० वर्षे झाली आणि नंतर मग विक्रम संवत
सुरु होते. राजे देखील विकर्मच करत राहतात, म्हणून बाबा म्हणतात -
कर्म-अकर्म-विकर्माची गती मी तुम्हाला समजावून सांगतो. रावण राज्यामध्ये तुमची कर्म
विकर्म बनतात. सतयुगामध्ये अकर्म होतात. विकर्म बनत नाही. तिथे विकाराचे नावच नाही.
हा ज्ञानाचा तिसरा नेत्र आता तुम्हाला मिळाला आहे. आता तुम्ही मुले बाबांद्वारे
त्रिनेत्री-त्रिकालदर्शी बनता. कोणताही मनुष्य बनवू शकत नाही. तुम्हाला बनविणारे
आहेत बाबा. पहिले तर जेव्हा आस्तिक व्हाल तेव्हा त्रिनेत्री-त्रिकालदर्शी बनाल.
साऱ्या ड्रामाचे रहस्य बुद्धीमध्ये आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन, ८४ चे चक्र सर्व
बुद्धीमध्ये आहे. नंतर मागाहून बाकीचे धर्म येतात. वृद्धी होत राहते. त्या
धर्मस्थापकांना गुरु म्हणणार नाही. सर्वांची सद्गती करणारा सद्गुरु एकच आहे. बाकी
ते (इतर धर्मस्थापक) काही सद्गती करण्यासाठी थोडेच येतात. ते धर्म स्थापक आहेत.
क्राइस्टची आठवण केल्याने सद्गती थोडीच होईल. विकर्म विनाश थोडेच होतील. अजिबात नाही.
या सर्वांना भक्तीच्या लाईनमध्ये आहेत असे म्हटले जाईल. ज्ञानाच्या लाईनमध्ये फक्त
तुम्ही आहात. तुम्ही पंडे आहात. सर्वांना शांतीधाम, सुखधामचा रस्ता सांगता. बाबा
देखील लिब्रेटर, गाईड आहेत. त्या बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील.
आता तुम्ही मुले आपली
विकर्म विनाश करण्याचा पुरुषार्थ करत आहात तर तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे की, एका
बाजूला पुरुषार्थ आहे आणि दुसऱ्या बाजूला कोणतेही विकर्म होत राहू नये. पुरुषार्था
सोबत विकर्म देखील कराल तर १०० पटीने होईल. जितके शक्य असेल तितके विकर्म करू नका.
नाहीतर वाढ देखील होईल. नाव देखील बदनाम कराल. जेव्हा जाणता भगवान आपल्याला शिकवत
आहे तर मग कोणते विकर्म केले नाही पाहिजे. छोटी चोरी किंवा मोठी चोरी, पाप तर होते
ना. हे डोळे खूप धोका देतात. बाबा मुलांच्या वर्तनावरून समजतात, कधीही विचार देखील
येऊ नये की ही आपली पत्नी आहे, आपण ब्रह्माकुमार-कुमारी आहोत, शिवबाबांची नातवंडे
आहोत. आपण बाबांकडे प्रतिज्ञा केली आहे, राखी बांधली आहे, मग डोळे का धोका देतात?
आठवणीच्या बळाने कोणत्याही कर्मेंद्रियांच्या धोक्यापासून सुटका करून घेऊ शकता. खूप
मेहनत केली पाहिजे. बाबांचे डायरेक्शन अंमलात आणून चार्ट लिहा. पती-पत्नीने देखील
आपसामध्ये याच गोष्टी करा - आम्ही तर बाबांकडून पूर्ण वारसा घेणार, टीचर कडून सर्व
काही शिकणार. असे टीचर कधी मिळू शकणार नाहीत, जे बेहदचे नॉलेज देतील. जर
लक्ष्मी-नारायणच जाणत नाहीत तर मग त्यांच्या मागून येणारे कसे बरे जाणू शकतील. बाबा
म्हणतात - या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान फक्त तुम्ही संगमावर जाणता. बाबा
खूप काही समजावून सांगतात - असे करा, तसे करा. मग इथून उठून गेले आणि खल्लास. हे
समजत नाहीत की शिवबाबा आपल्याला सांगत आहेत. नेहमी असे समजा की शिवबाबा सांगत आहेत,
यांचा (ब्रह्मा बाबांचा) फोटो देखील ठेवू नका. हा रथ (ब्रह्मा बाबांचे तन) तर
लोनमध्ये घेतलेला आहे. हे देखील पुरुषार्थी आहेत, हे देखील म्हणतात की, मी
बाबांकडून वारसा घेत आहे. तुमच्या प्रमाणेच हे देखील स्टुडंट लाईफमध्ये आहेत. पुढे
चालून तुमची महिमा होईल. आता तर तुम्ही पूज्य देवता बनण्यासाठी शिकत आहात. मग
सतयुगामध्ये तुम्ही देवता बनणार. या सर्व गोष्टी बाबांशिवाय इतर कोणीही समजावून
सांगू शकत नाही. भाग्यामध्ये नसेल तर संशय उत्पन्न होतो की, शिवबाबा कसे काय येऊन
शिकवतील! मी हे मानत नाही. मानतच नाहीत तर मग शिवबाबांची आठवण तरी कशी करतील.
विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत. ही सर्व नंबरवार राजधानी स्थापन होत आहे. दास-दासी
देखील पाहिजेत ना. राजांना दासी देखील हुंड्यामध्ये मिळतात. इथेच इतक्या दासी
ठेवतात मग सतयुगामध्ये किती असतील. असा ढीला पुरुषार्थ थोडाच केला पाहिजे ज्यामुळे
जाऊन दास-दासी बनावे लागेल. बाबांना विचारू शकता - ‘बाबा, आत्ता जर मृत्यू झाला तर
काय पद मिळणार?’ बाबा ताबडतोब सांगतील. आपला पोतामेल आपणच बघा. अंतामध्ये नंबरवार
कर्मातीत अवस्था होणार आहे. ही आहे खरी कमाई. त्या (लौकिक) कमाईमध्ये रात्रं-दिवस
किती बिझी राहतात. सट्टे वाले जे असतात ते एका हाताने जेवण जेवत असतात आणि दुसऱ्या
हातामध्ये फोनवर कारभार करत असतात. आता सांगा अशा व्यक्ती ज्ञानामध्ये चालू शकतील
का? म्हणतात - ‘आम्हाला फुरसत नाही’. अरे, इथे खरी राजाई मिळत आहे. फक्त बाबांची
आठवण करा तर विकर्म विनाश होतील. अष्ट देवता इत्यादींची देखील आठवण करतात ना.
त्यांच्या आठवणीने तर काहीच मिळत नाही. बाबा वारंवार प्रत्येक गोष्टीवर समजावून
सांगत राहतात. जेणेकरून पुन्हा कोणी असे म्हणू नये की अमक्या गोष्टीविषयी तर
सांगितलेच नाही. तुम्हा मुलांना संदेश देखील सर्वांना द्यायचा आहे. विमानातून देखील
पत्रके टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये असे लिहा - ‘शिवबाबा असे म्हणतात…’
ब्रह्मा देखील शिव बाबांचा मुलगा आहे. प्रजापिता आहे तर ते देखील पिता, हे देखील
पिता. शिवबाबा म्हटल्याने देखील खूप मुलांना प्रेमाचे अश्रू गळू लागतात. कधी बघितले
देखील नाहीये. लिहितात - ‘बाबा, केव्हा येऊन तुम्हाला भेटणार, बाबा बंधनातून सोडवा’.
खूप जणांना बाबांचा आणि नंतर प्रिन्सचा देखील साक्षात्कार होतो. पुढे चालून अनेकांना
साक्षात्कार होतील तरी देखील पुरुषार्थ तर करावा लागेल. व्यक्तीला मरते वेळी देखील
सांगतात - भगवंताची आठवण कर. तुम्ही देखील बघाल शेवटी खूप पुरुषार्थ करतील. आठवण करू
लागतील.
बाबा सल्ला देतात -
मुलांनो, जो वेळ मिळेल त्यामध्ये पुरुषार्थ करून मेकअप करा (गॅप भरून काढा).
बाबांच्या आठवणीमध्ये राहून विकर्म विनाश करा म्हणजे मग मागाहून येऊन देखील पुढे
जाऊ शकता. जसे ट्रेन लेट होते तेव्हा मेकप करतात ना (वेळेचा गॅप भरून काढतात ना).
तुम्हाला देखील इथे वेळ मिळतो तर मेकअप करा (मागे पडलेला अभ्यास पुरुषार्थाने भरून
काढा). इथे येऊन कमाई करण्यामध्ये व्यस्त व्हा. बाबा सल्ला देखील देतात - असे-असे
करा, आपले कल्याण करा. बाबांच्या श्रीमतावर चाला. विमानातून पत्रके टाका, ज्यामुळे
मनुष्य समजतील की हे तर बरोबर संदेश देत आहेत. भारत किती मोठा आहे, सर्वांना माहिती
झाले पाहिजे जेणेकरून नंतर कोणी असे म्हणू नये की, ‘बाबा, आम्हाला तर माहितीच मिळाली
नाही’. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) हुशार
बनवून आपली तपासणी करायची आहे की डोळे धोका तर देत नाहीत ना. कोणत्याही
कर्मेंद्रियाच्या वश होऊन उलटे कर्म करायचे नाही. आठवणीच्या बळाने कर्मेंद्रियांच्या
धोक्यापासून मुक्त व्हायचे आहे.
२) या खऱ्या कमाईसाठी
सवड काढायची आहे, मागाहून येऊन देखील पुरुषार्थ करून मेकअप करायचा आहे (गॅप भरून
काढायचा आहे). ही विकर्म विनाश करण्याची वेळ आहे त्यामुळे कोणतेही विकर्म करायचे
नाही.
वरदान:-
‘बालक सो मालक’
या पाठाद्वारे निरहंकारी आणि निराकारी भव
बालक बनणे अर्थात
हदच्या जीवनामध्ये परिवर्तन होणे. कोणी कितीही मोठ्या देशाचा मालक असेल, धन अथवा
परिवाराचा मालक असेल परंतु बाबांसमोर सगळे बालक आहेत. तुम्ही ब्राह्मण मुले देखील
बालक बनता तेव्हा निश्चिंत बादशहा आणि भविष्यामध्ये विश्वाचे मालक बनता. “बालक सो
मालिक हूँ” - ही स्मृती सदैव निरहंकारी-निराकारी स्थितीचा अनुभव करविते. बालक
अर्थात मुलगा बनणे म्हणजे जणू मायेपासून वाचणे आहे.
बोधवाक्य:-
प्रसन्नता हीच
ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे - तर सदैव प्रसन्नचित्त रहा.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
जे कार्य आजचे अनेक
पदमपती करू शकत नाहीत ते कार्य तुमचा एक संकल्प आत्म्याला पद्मापदमपती बनवू शकतो
त्यामुळे श्रेष्ठ संकल्पाची शक्ती जमा करा. श्रेष्ठ संकल्पाच्या शक्तीला असे स्वच्छ
बनवा जेणेकरून जरा सुद्धा व्यर्थची अस्वच्छता असू नये तेव्हाच ही शक्ती आश्चर्यजनक
कार्य करेल.