17-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा आणि दादाची कहाणी देखील वंडरफुल आहे, बाबा जेव्हा दादामध्ये प्रवेश करतील तेव्हाच तर तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी वारशाचे अधिकारी बनाल”

प्रश्न:-
ड्रामा हा पूर्वनियोजित आहे हे ठाऊक असून देखील तुम्हाला कोणते ध्येय जरूर ठेवायचे आहे?

उत्तर:-
पुरुषार्थ करून अभ्यासातील गॅप भरून काढण्याचा अर्थात विनाशापूर्वी बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत बनण्याचे ध्येय जरूर ठेवायचे आहे. कर्मातीत अर्थात आयर्न एज्ड पासून गोल्डन एज्ड बनायचे आहे. पुरुषार्थाचा हाच थोडासा वेळ आहे त्यामुळे विनाशापूर्वी आपल्या अवस्थेला अचल-अडोल बनवायचे आहे.

ओम शांती।
ओम् शांती. हे दोन्ही कोण म्हणत आहेत? एक होते बाबा, एक होते दादा. कहाणी ऐकवतात ना - ‘एक होता राजा, एक होती राणी’. आता या मग आहेत नवीन गोष्टी. एक बाबा, एक दादा; तुम्ही म्हणाल - ‘५ हजार वर्षांपूर्वी देखील एक होते शिवबाबा, दुसरे होते ब्रह्मा दादा’. आता शिव ची संतान तर सर्वच आहेत. सर्व आत्मे एका पित्याची संतान आहेत. ते तर आहेतच आहेत. ब्रह्माची मुले ब्राह्मण देखील होती, प्रजापिता ब्रह्माची संतान ब्रह्माकुमार-कुमारी होते. त्यांना कोण शिकवत होते? शिवबाबा. प्रजापिता ब्रह्माची ही ब्रह्माकुमार-कुमारी असंख्य मुले आहेत ना. ब्रह्माकुमार-कुमारी मानतात - खरोखर, आम्ही शिवबाबांची मुले देखील आहोत, नातवंडे देखील आहोत. मुले तर आहोतच; आता ब्रह्मा द्वारा आजोबांचा वारसा घेण्याकरिता नातवंडे बनलो आहोत. आता तुम्हाला आजोबांकडून वारसा मिळतो, ज्यांना शिवबाबा म्हणतात. परंतु ब्रह्माकुमार-कुमारी असल्याकारणाने त्यांना आपण आजोबा म्हणतो. वारसा आजोबांचा आहे, ब्रह्मादादाचा नाही. वैकुंठवासी बनण्याचा वारसा त्या बाबांकडून मिळतो. अर्धा कल्प वारसा प्राप्त करता आणि नंतर मग तुम्हाला रावणाकडून शाप मिळतो. खाली उतरत जाता (पतन होत जाते). जणूकाही खाली उतरण्याची (पतन होण्याची) ग्रहचारी बसते. तुम्ही मुले समजता - आमची ग्रहचारी राहुची दशा पूर्ण झाली आहे. दशा सर्वात वाईट आहे राहूची. उच्च ते उच्च बृहस्पतीची दशा त्यानंतर राहूची दशा बसते तेव्हा मग ५ विकारांमुळे आम्ही काळे बनलो आहोत. आता पुन्हा बाबा म्हणतात - ‘दे दान तर सुटेल ग्रहण.’ आहे तुमचीच गोष्ट, ते (दुनियावाले) मग याला सूर्य-चंद्राचे ग्रहण समजले आहेत. जेव्हा ग्रहण लागते तेव्हा दान मागतात. इथे बाबा तुम्हाला म्हणतात - ५ विकारांचे दान द्या तर ग्रहचारी उतरेल. या विकारांमुळेच तुम्ही पाप-आत्मा बनला आहात. मुख्य आहे देह-अभिमान. सुरुवातीला असे खूप सतोप्रधान होता, नंतर मग सतो, रजो, तमो बनला आहात. ८४ जन्म घेतले आहेत. हा तर पक्का निश्चय आहे की, खरोखर देवताच ८४ जन्म घेतात. सर्वात पहिले त्यांनाच बाबांना येऊन भेटले पाहिजे. गायले देखील जाते - ‘आत्मायें परमात्मा अलग रहे…’

बाबा म्हणतात - सर्वात पहिले तुम्हालाच सतयुगामध्ये पाठवले होते. आणि आता पहिले तुम्हीच येऊन भेटला आहात. पूर्वी तर फक्त गात होता, परंतु त्याचा यथार्थ अर्थ आता बाबा बसून तुम्हाला समजावून सांगत आहेत. सर्व वेद, शास्त्रे, जप, तप, स्लोगन इत्यादी जे काही आहे सर्वांचे सार बाबा बसून समजावून सांगतात. चक्रा विषयी समजून घेणे तर खूप सोपे आहे. आता कलियुग आणि सतयुगाचा संगम आहे. लढाई देखील समोर उभी आहे. तुम्हाला हा देखील निश्चय आहे - सतयुगाची स्थापना होत आहे. कलियुगामध्ये जितके पण आहेत, त्या सर्वांची शरीरे नष्ट होतील, बाकी आत्मे पवित्र बनून कर्मांचा हिशोब चुकता करून निघून जातील. हा सर्वांच्या महाविनाशाचा काळ आहे. आत्मे शरीर सोडून निघून जातील. हे तुमच्या बुद्धीमध्ये आता आहे. जोपर्यंत आपण कर्मातीत अवस्थेला प्राप्त करत नाही तोपर्यंत संगमावर उभे आहोत. एका बाजूला आहेत करोडो मनुष्य, तर बाजूला फार थोडे केवळ तुम्हीच आहात. तुमच्यामध्ये देखील किती आहेत जे निश्चय-बुद्धी बनत जातात. निश्चयबुद्धी विजयन्ती मग जाऊन विष्णूच्या गळ्यातील माळा बनतील. एक आहे रुद्राक्षाची माळा, दुसरी आहे रुंडमाळा. त्या रुंडमाळेमध्ये छोटे-छोटे चेहरे असतात, ही निशाणी आहे. आपण आत्मेच येऊन मग बाबांच्या गळ्यातील माळेचे मणी बनणार आणि मग इथे नंबरवार येणार. माळा ८ ची देखील आहे, १०८ ची देखील आहे, १६१०८ ची देखील आहे. आता १६ हजार आहेत की ५-१० हजार आहेत, त्याचा काही हिशोब काढला जाऊ शकत नाही. या माळा गायल्या जातात. बाबा म्हणतात - हा सर्व विचार तुम्ही कशाला करता? जितके पण राजा कल्पापूर्वी सतयुग, त्रेतामध्ये बनले होते, तितकेच बनतील. १०० बनतील नाहीतर दोन-तीनशे बनतील, तो प्रश्न तुम्ही विचारायचा नाही.

बाबा म्हणतात - तुम्ही जितके जवळ येत जाल, तेवढे हे सर्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आज आपण इथे आहोत उद्या विनाश होईल आणि मग सतयुगामध्ये फार थोडे देवता असतील. नंतर वृद्धी होत जाते. सतयुगाची लक्षणे देखील दिसू लागतात. बाकी लाखो शिल्लक राहतील; मग लाख राहोत अथवा ९-१० लाख राहो, अचूक सांगू शकत नाही. होय, तुम्ही जेव्हा यथार्थ रित्या संपूर्ण बनण्याच्या लायक बनाल तेव्हा तुम्हाला जास्त साक्षात्कार होईल. अजून तर खूप काही समजून घेण्याची वेळ आहे. तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील. युद्धाची तयारी देखील सतत होत राहते. सर्व वस्तू महागड्या होत जातील. परदेशामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात टॅक्स इत्यादी आकारले जात राहतील. प्रचंड प्रमाणात महागाई होऊन मग एकदम स्वस्ताई होईल. सतयुगामध्ये कोणत्याही वस्तूवर खर्च होणार नाही. सर्व खाणी इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध होतील. नवीन दुनियेमध्ये प्रचंड ऐश्वर्य असते. लक्ष्मी-नारायणाकडे प्रचंड ऐश्वर्य होते ना. श्रीनाथद्वारेमध्ये मुर्त्यांसमोर देखील किती पंचपक्वानांचा भोग लावतात. तिथे मोठ्या प्रमाणात पंचपक्वाने बनवतात आणि खात राहतात. म्हणतील - ‘आम्ही देवतांना भोग अर्पण करतो. देवतांना भोग लावला नाही तर ते नाराज होतील’. आता यामध्ये नाराज होण्याचा तर प्रश्नच नाही. तुम्ही कोणावर नाराज होत नाही. जाणता ड्रामा अनुसार हा विनाश होणारच आहे. कलियुग बदलून सतयुग होणार. आपण ड्रामाला समजतो की ड्रामा अनुसार आता नवीन चक्र सुरू होणार आहे. तुम्ही देखील ड्रामाच्या वश आहात. ड्रामा अनुसार बाबा देखील आलेले आहेत. ड्रामामध्ये एक मिनिट देखील मागे-पुढे होऊ शकत नाही. जसे बाबा आले, तुम्ही पाहिले कल्पा नंतर देखील हुबेहूब असेच होईल. शास्त्रांमध्ये तर कल्पाचा कालावधी खूप मोठा लिहिला आहे. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे खरोखर विनाश समोर उभा आहे. आता तुम्ही गॅलप करत आहात (वेगाने आगेकूच करीत आहात). तुम्ही जाणता - बाबांची आठवण करून आपल्याला कर्मातीत अवस्थेला जरूर प्राप्त करायचे आहे अर्थात आयर्न एज्ड पासून गोल्डन एज्ड बनायचे आहे. आता जर पुरुषार्थ केला नाहीत तर पद भ्रष्ट होईल. हे आत्म्यांनो, आता तुम्ही पतित बनला आहात. तुम्ही हे देखील जाणता की, अनेक प्रकारचे येतील जे इतर धर्मांमध्ये धर्मांतरित झाले आहेत ते निघून येत राहतील. येऊन बाबांकडून वारसा प्राप्त करण्याचा आपला पुरुषार्थ करत राहतील. ब्राह्मण धर्मामध्ये येऊन मग देवता धर्मामध्ये येतील. ब्राह्मण धर्मामध्येच जर आले नाहीत तर देवता धर्मामध्ये कसे काय येतील. दिवसेंदिवस ब्राह्मण वृद्धीला प्राप्त होत राहतील. जेव्हा बघतील की, विनाश समोर येऊन ठेपला आहे, तेव्हा म्हणतील - ‘हे तर बरोबर सांगत आहेत’, आणि मग वृद्धी होत जाईल. ब्राह्मणांचे झाड वृद्धीला प्राप्त करून पूर्ण होईल तेव्हा मग सर्वजण परत जातील. त्यानंतर मग देवतांचे झाड वाढीस लागेल.

आता तुम्ही संगमावर राजयोग शिकत आहात. या संगमाला कल्याणकारी युग म्हटले जाते. संगमाचेच गायन आहे. गंगा आणि सागराचा संगम दाखवतात. या सर्व आहेत भक्तिमार्गातील गोष्टी. हे (शिवबाबा) आहेत ज्ञान-सागर आणि त्या ज्ञान-सागरामधून उगम

पावलेल्या या आहेत ज्ञान-गंगा. ज्ञान-सागराला ‘पतित-पावन’ हा शब्द लागू पडतो. ते समजतात पतित-पावनी गंगा आहे आणि मग गंगेमध्ये स्नान करतच येतात. या नद्या तर सतयुगापासूनच अस्तित्वात आहेत, आजकाल काही ठिकाणी नद्या देखील मनुष्य वस्तीच बुडवून टाकतात. प्रकृती देखील तमोप्रधान, सागर देखील तमोप्रधान झाला आहे. समुद्र थोडा जरी खवळला तरी सर्व काही नेस्तनाबूत करेल. सतयुगामध्ये फक्त आपण फार थोडेच भारतामध्ये यमुनेच्या काठावर राहतो. दिल्ली परिस्तान होती, पुन्हा बनणार आहे. सतयुगामध्ये फार थोडेच जीव-आत्मे असतात; मागाहून हळूहळू येत जातात. आता आहे कलियुगाचा अंत. किती प्रचंड लोकसंख्या झाली आहे, बेहदचे नाटक आहे, ज्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. भले काहीजण स्वतःला ॲक्टर समजतात देखील; परंतु कल्प ५ हजार वर्षांचे आहे, हे कोणालाच ठाऊक नाहीये. कुठे ८४ जन्म आणि कुठे ८४ लाख. आता तुम्ही लख्ख प्रकाशामध्ये आहात. तुम्हाला बाबांकडून वारसा मिळत आहे. बाबा म्हणतात - मनमनाभव. बाबांची आठवण करायची आहे. शिव भगवानुवाच, भगवंताच्या महिमेमध्ये आणि देवतांच्या महिमेमध्ये खूप अंतर आहे. बाबा जी नवीन रचना रचतात त्यांची (देवतांची) महिमा आहे - ‘सर्वगुणसंपन्न…’ आता तुम्ही असे बनत आहात. बाबांची महिमा आणि यांच्या महिमेमध्ये दिवस-रात्री इतका फरक आहे. हा राजयोग आहे ना. गायले देखील जाते - भगवान राजयोग शिकवतात. ते आहेत निराकार, तर जरुर निराकार मधून साकारमध्ये यावे लागेल. भगवंताची इतकी महिमा आहे तर जरूर यावे लागेल. त्यांचा जन्म दिव्य अलौकिक आहे इतर कोणाचाही दिव्य जन्म गायला जात नाही. मुलांना हे देखील समजावून सांगितले आहे की, एक आहेत लौकिक पिता, दुसरे आहेत पारलौकिक पिता, ज्यांचीच ‘हे भगवान’ असे म्हणून आठवण करतात आणि तिसरे आहेत अलौकिक पिता, हे मग वंडरफुल बाबा आहेत. जेव्हा पारलौकिक पिता मुलांना ॲडॉप्ट करतात तेव्हा मधे हे अलौकिक पिता येतात. प्रजापिता ब्रह्माची किती असंख्य मुले आहेत. शिवबाबा येऊन ब्रह्मा द्वारा तुम्हाला आपले बनवतात. कित्येक ब्रह्माकुमार-कुमारी बनतात. लौकिक पित्याला फारफार तर आठ-दहा मुले असतील. अच्छा, शिवबाबा देखील पारलौकिक पिता आहेत. त्यांची तर असंख्य मुले आहेत. आता आत्मे म्हणतात - आपण सर्व भाऊ आहोत. आता या संगमावर मग अलौकिक पिता मिळतात. हे ज्ञान तुम्हाला तिथे (स्वर्गामध्ये) असणार नाही. प्रजापिता ब्रह्मा, पित्याच्या रूपात तेव्हाच मिळतात जेव्हा शिवबाबा येऊन नवीन सृष्टी रचतात. तर हा अलौकिक जन्म झाला ना, याला कोणीही समजू शकत नाही. ते लौकिक, ते पारलौकिक आणि हे आहेत संगमयुगी अलौकिक पिता. लौकिक पिता तर सतयुगापासून होत आले आहेत. पारलौकिक पित्याला तिथे (सतयुगामध्ये) कोणीही आठवण करत नाही, तिथे असतोच मुळी एक पिता. ‘हे भगवान’, ‘हे परमात्मा’, असे म्हणून आठवण करत नाहीत; आणि मग द्वापरमध्ये जेव्हा भक्तीमार्ग सुरू होतो तेव्हा दोन पिता होतात. संगमावर आहेत तीन पिता. प्रजापिता ब्रह्मा देखील आता मिळतात, आता तुम्ही त्यांचे बनला आहात. तुम्ही जाणता हे अलौकिक पिता आहेत. आता तुम्ही या गोष्टींना चांगल्या रीतीने जाणता आणि आठवण करता. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. सतयुगामध्ये आठवण करण्याची गरजच नाही. दुःखामध्ये पारलौकिक पित्याचे सर्वजण स्मरण करतात. ही तर एकदम सोपी गोष्ट आहे. सतयुग-त्रेतामध्ये एक पिता असतो, द्वापरमध्ये दोन पिता असतात. यावेळी तुम्ही अलौकिक पित्याची संतान बनला आहात, ज्यांच्याद्वारे तुम्ही वारसा घेता. तुम्ही मुलेच ब्राह्मण बनता जे नंतर मग देवता बनतील. विनाश देखील तुम्हालाच पहायचा आहे, जो तुम्ही या डोळ्यांनी पहाल, बॉम्ब्स टाकतील. मनुष्य तर मरतील ना. जपानमध्ये देखील बॉम्ब टाकला, पाहिलेत ना कशी माणसे मेली. आता ही युद्धे इत्यादी चालूच राहतात. स्वतः देखील म्हणतात आम्ही वैतागलो आहोत. दहा-दहा वर्षापर्यंत युद्ध चालूच राहते. बॉम्ब्समुळे तर चुटकी मध्ये (सेकंदामध्ये) सर्व काही खलास होईल. ठिणगी पडली तर शहरेच्या शहरे नष्ट होतात, हे तर बॉम्ब्स आहेत. आगी देखील लागणार आहेत.

तुम्ही मुले जाणता - बाबा आलेले आहेत स्थापना आणि विनाश करविण्याकरिता. तर जरूर हे सर्व होणार आहे. पुरुषार्थ करण्यासाठी अजून वेळ आहे. माया वारंवार तुमचा बुद्धियोग तोडून टाकते. तुम्ही अजून अडोल स्थिर कुठे बनला आहात. म्हणतात - ‘बाबा, मायेची वादळे खूप येतात’. कोणी तर पूर्ण दिवसभरामध्ये तास-अर्धा तास सुद्धा आठवण करत नाहीत. बाबा म्हणतात - तुम्ही कर्मयोगी आहात. आठ तास तर ही सेवा कराल. आठ तास आठवण करा आठवण करू शकाल इतका पुरुषार्थ करायचा आहे. आठवण करत राहिल्याने विकर्म विनाश होत जातील, यालाच योग-अग्नी म्हटले जाते. ही आहे मेहनत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त आठवण करायची आहे. बाबा हे देखील सांगतात की, ज्यांनी गृहस्थी सोडली आहे, बाबांचे बनले आहेत, ते देखील इतकी आठवण करत नाहीत. घरी राहणारे तर अजून जास्तच आठवण करतात. अर्जुन आणि एकलव्याचे उदाहरण देतात ना. मेहनत आहे बाबांची आठवण करणे आणि चक्राला समजून घेणे. भारतामध्ये युद्ध देखील जरूर होईल. सतयुगामध्ये थोडेच युद्ध होणार. तर तुम्हा मुलांना आंधळ्यांची काठी देखील बनायचे आहे. सर्वांना मार्ग सांगायचा आहे की, बाबांची आठवण करा, चक्राची आठवण करा. स्वदर्शन चक्रधारी बना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कमीत-कमी आठ तास आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आपली अवस्था अचल-अडोल ठेवण्याकरिता आठवणीचा अभ्यास वाढवायचा आहे. चूक करायची नाही.

२) हा ड्रामा अगदी ॲक्युरेट बनलेला आहे त्यामुळे कोणावरही नाराज व्हायचे नाही. निश्चय-बुद्धी बनायचे आहे.

वरदान:-
तोडणे, मोडणे आणि जोडणे - या तीन शब्दांच्या स्मृतिद्वारे सदा विजयी भव

संपूर्ण अभ्यास आणि शिकवणीचे सार हे तीन शब्द आहेत. १) कर्म बंधन तोडायचे आहे. २) आपल्या स्वभाव-संस्काराला मोडायचे आहे आणि ३) सर्व नाती एका बाबांशी जोडायची आहेत - हेच तीन शब्द संपूर्ण विजयी बनवतील. यासाठी सदैव हेच लक्षात राहावे की या डोळ्यांनी ज्या काही विनाशी वस्तू बघतो त्या सर्व नष्ट झाल्यात जमा आहेत. त्यांना पाहून देखील आपली नवीन नाती आणि नवीन सृष्टीला बघत रहा म्हणजे मग कधीही हार होऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
योगीची निशाणी आहे - सदैव क्लीन आणि क्लिअर.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

जर ब्राह्मण जीवनामध्ये संकल्पामध्ये जरी अपवित्रता अथवा अमर्यादा येत असेल तर तख्तनशीन होण्या ऐवजी पडती कला अर्थात खाली येता. कोणतेही विकर्म तर झाले नाही, परंतु व्यर्थ कर्म जरी झाले तरीही पश्चातापा ऐवजी जाणिवेची स्टेज असते. जाणीव होते की, ‘हे चुकीचे आहे, होता कामा नये…’ ती गोष्ट काट्याप्रमाणे टोचत राहील, म्हणून या व्यर्थ पासून देखील मुक्त व्हा.