17-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला मनसा-वाचा-कर्मणा खूप-खूप खुशीमध्ये राहायचे आहे, सर्वांना खुश
करायचे आहे, कोणालाही दुःख द्यायचे नाही”
प्रश्न:-
डबल अहिंसक
बनणाऱ्या मुलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत?
उत्तर:-
१) हे लक्षात ठेवायचे आहे की अशी कोणती गोष्ट मुखावाटे निघू नये ज्यामुळे कोणाला
दुःख होईल कारण वाचेद्वारे दुःख देणे देखील हिंसा आहे. २) आपण देवता बनणार आहोत,
त्यामुळे वर्तन अतिशय रॉयल असावे. खाणे-पिणे जास्त उत्कृष्टही नसावे किंवा जास्त
निकृष्टही नसावे.
गीत:-
निर्बल से
लड़ाई बलवान की…
ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांना (खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांना) बाबा दररोज पहिले
हेच सांगतात की, ‘स्वतःला आत्मा समजून बसा आणि बाबांची आठवण करा’. म्हटले जाते ना -
अटेंशन प्लीज! तर बाबा सांगतात एक तर बाबांकडे अटेंशन द्यायचे आहे. बाबा किती गोड
आहेत, त्यांना म्हटले जाते प्रेमाचा सागर, ज्ञानाचा सागर. तर तुम्हाला देखील प्रेमळ
बनायचे आहे. मनसा-वाचा-कर्मणा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आनंदी असले पाहिजे.
कोणालाही दुःख द्यायचे नाही. बाबा देखील कोणालाही दुःखी करत नाहीत. बाबा आलेच आहेत
सुखी बनविण्याकरिता. तुम्ही देखील कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख द्यायचे नाही.
कोणतेही असे कर्म करता कामा नये. मनसामध्ये देखील येता कामा नये. परंतु ही अवस्था
शेवटी होईल. कर्मेंद्रियांद्वारे काही ना काही चूक होते. स्वतःला आत्मा समजाल,
समोरच्याला देखील आत्मा भाऊ समजून पहाल तेव्हा मग तुम्ही कोणाला दुःख देणार नाही.
शरीरच बघणार नाही तर दुःख कसे द्याल. यामध्ये गुप्त मेहनत आहे. हे सर्व बुद्धीचे
काम आहे. आता तुम्ही पारस-बुद्धी बनत आहात. जेव्हा तुम्ही पारस-बुद्धी होता तेव्हा
तुम्ही खूप सुख पाहिले आहे. तुम्हीच सुखधामचे मालक होता ना. हे आहे दुःख धाम. हे तर
खूप सोपे आहे. ते शांतीधाम आहे आपले स्वीट होम. मग तिथून पार्ट बजावण्याकरिता आला
आहात, दुःखाचा पार्ट खूप वेळ बजावला आहे, आता सुखधाममध्ये जायचे आहे म्हणून
एकमेकांना भाऊ-भाऊ समजायचे आहे. आत्मा, आत्म्याला दुःख देऊ शकत नाही. स्वतःला आत्मा
समजून आत्म्याशी बोलत आहोत. आत्माच तख्तावर विराजमान आहे. हा देखील (ब्रह्मा तन)
शिवबाबांचा रथ आहे ना. मुली म्हणतात - आम्ही शिवबाबांच्या रथाचा शृंगार करतो,
शिवबाबांच्या रथाला खाऊ घालतो. तर शिवबाबाच आठवणीत राहतात. ते आहेतच कल्याणकारी पिता.
म्हणतात - मी ५ तत्त्वांचे देखील कल्याण करतो. तिथे कोणतीही गोष्ट कधी त्रास देत
नाही. इथे तर कधी वादळे, कधी थंडी, काय-काय होत राहते. तिथे तर सदैव वसंत ऋतू असतो.
दुःखाचे नाव नाही. तो आहेच हेवन. बाबा आले आहेत तुम्हाला हेवनचा मालक बनविण्याकरिता.
उच्च ते उच्च भगवान आहेत, उच्च ते उच्च पिता, उच्च ते उच्च सुप्रीम टीचर देखील आहेत
तर जरूर उच्च ते उच्चच बनवतील ना. तुम्ही हे लक्ष्मी-नारायण होता ना. या सर्व गोष्टी
विसरुन गेला आहात. हे बाबाच बसून समजावून सांगतात. ऋषी-मुनी इत्यादींना विचारत असत
की, तुम्ही रचयिता आणि रचनेला जाणता का, तर नेती-नेती (आम्ही जाणत नाही) म्हणायचे.
जर का त्यांच्याकडेच हे ज्ञान नव्हते तर मग परंपरेने कसे चालत येईल. बाबा म्हणतात -
हे ज्ञान मी आताच देतो. तुमची सद्गती झाली की नंतर मग ज्ञानाची गरजच नाही. दुर्गती
होतच नाही. सतयुगाला म्हटले जाते सद्गती. इथे आहे दुर्गती. परंतु हे देखील कोणाला
ठाऊक नाहीये की आपण दुर्गतीमध्ये आहोत. बाबांसाठी गायले जाते लिबरेटर, गाईड, खिवैया.
विषय सागरातून सर्वांची नौका पार करतात. त्याला म्हटले जाते क्षीरसागर. विष्णूला
क्षीरसागरामध्ये दाखवतात. हे सर्व आहे भक्तिमार्गाचे गायन. मोठ-मोठे तलाव आहेत,
ज्यामध्ये विष्णूचे भले मोठे चित्र दाखवतात. बाबा समजावून सांगतात की, साऱ्या
विश्वावर तुम्हीच राज्य केले आहे. अनेकदा पराभूत झाला आहात आणि जिंकला देखील आहात.
बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे, त्याच्यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत
बनाल, तर आनंदाने बनले पाहिजे ना. भले गृहस्थ व्यवहारामध्ये, प्रवृत्ती मार्गामध्ये
रहा परंतु कमलपुष्प समान पवित्र रहा. आता तुम्ही काट्या पासून फूल बनत आहात. लक्षात
येते की हे आहे फॉरेस्ट ऑफ थॉर्न्स (काट्यांचे जंगल). एकमेकांना किती त्रास देतात,
मारतात.
बाबा गोड-गोड मुलांना
म्हणतात तुम्हा सर्वांची आता वानप्रस्थ अवस्था आहे. छोटे-मोठे सर्वांची वानप्रस्थ
अवस्था आहे. तुम्ही वाणी पासून परे जाण्याकरिता शिकत आहात ना. तुम्हाला आता सदगुरु
मिळाले आहेत. ते तर तुम्हाला वानप्रस्थमध्ये घेऊनच जातील. ही आहे युनिव्हर्सिटी.
भगवानुवाच आहे ना - मी तुम्हाला राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवतो. ते पूज्य राजे
होते, तेच मग पुजारी राजे बनतात. तर बाबा म्हणतात - मुलांनो, चांगल्या रीतीने
पुरुषार्थ करा. दैवी गुण धारण करा. भले खा-प्या, श्रीनाथद्वारेला जा. तिथे तुपातील
पदार्थ पुष्कळ मिळतात, तुपाच्या विहिरी देखील आहेत. मग ते सर्व खातात कोण? पुजारी.
श्रीनाथला आणि जगन्नाथला दोघांनाही काळे बनवले आहे. जगन्नाथच्या मंदिरामध्ये
देवतांची घाणेरडी चित्रे आहेत, तिथे भाताचा हंडा शिजवतात. तो शिजल्यावर त्याचे ४
भाग होतात. फक्त भाताचाच भोग लागतो कारण आता साधारण आहेत ना. या बाजूला गरीब आणि
त्या बाजूला श्रीमंत. आता तर बघा किती गरीब आहेत. खाण्या-पिण्यासाठी काहीच मिळत नाही.
सतयुगामध्ये तर सर्व काही आहे. तर बाबा आत्म्यांना बसून सांगत आहेत. शिवबाबा खूप
गोड आहेत. ते तर आहेत निराकार, प्रेम आत्म्यावर केले जाते ना. आत्म्यालाच बोलावले
जाते. शरीर तर जळून गेले. त्यांच्या आत्म्याला बोलावतात, दिवा पेटवतात, यावरून
सिद्ध आहे आत्म्याला अंधार होतो. आत्मा आहेच शरीर रहित तर मग अंधार इत्यादीची गोष्ट
कशी असू शकते. तिथे या गोष्टी असत नाहीत. हा सर्व आहे भक्तिमार्ग. बाबा किती
चांगल्या रीतीने सांगत आहेत. ज्ञान खूप गोड आहे. हे तर डोळे उघडे ठेवून ऐकावे लागेल.
बाबांना तर पहाल ना. तुम्ही जाणता शिवबाबा इथे विराजमान आहेत तर डोळे उघडे ठेवून
बसले पाहिजे ना. बेहदच्या बाबांना पाहिले पाहिजे ना. पूर्वी मुली बाबांना पाहताच
ध्यानामध्ये जात होत्या, आपसात देखील बसल्या-बसल्या ध्यानामध्ये जात होत्या. डोळे
बंद आणि ध्यानामध्ये धावत असायच्या (श्रीकृष्णाला पकडण्यासाठी धावत असायच्या). कमाल
तर होती ना. बाबा सांगतात - एकमेकांना पाहता तर असे समजा की, आपण भावाशी (आत्म्याशी)
बोलत आहोत, भावाला समजावून सांगत आहोत. तुम्ही बेहदच्या बाबांचा सल्ला मानणार नाही
काय? तुम्ही हा अंतिम जन्म पवित्र बनाल तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. बाबा अनेकांना
समजावून सांगतात. कोणी तर लगेचच म्हणतात - ‘बाबा, आम्ही जरूर पवित्र बनणार’. पवित्र
राहणे तर चांगले आहे. कुमारी पवित्र आहे तर सगळे तिच्यापुढे माथा टेकवतात. लग्न करते
तेव्हा मग पुजारी बनते. सर्वांच्या पुढे डोके टेकवावे लागते. म्हणजे प्युरिटी (पवित्रता)
चांगली आहे ना. प्युरिटी आहे तर पीस, प्रॉस्पेरिटी आहे (जेव्हा पवित्रता असते तेव्हा
शांती आणि समृद्धी असते). सर्व काही पवित्रतेवर अवलंबून आहे. बोलावतात देखील हे
पतित-पावन या. पावन दुनियेमध्ये रावण असतच नाही. ते आहेच रामराज्य, सर्वजण क्षीरखंड
होऊन राहतात. धर्माचे राज्य आहे तर मग रावण कुठून आला? रामायण इत्यादी किती प्रेमाने
बसून ऐकवतात. ती सर्व आहे भक्ती. तर मुली साक्षात्कारामध्ये डान्स करू लागायच्या.
सच की बेडी (सत्याच्या नौकेचे) तर गायन आहे - हलेल परंतु बुडणार नाही. बाकी
कुठल्याही सत्संगामध्ये जाण्यासाठी कोणी कधी विरोध करत नाहीत. परंतु इथे येण्यासाठी
किती विरोध करतात. बाबा तुम्हाला ज्ञान देत आहेत. तुम्ही बी. के. बनता. ब्राह्मण तर
जरूर बनायचे आहे. बाबा आहेतच स्वर्गाची स्थापना करणारे. तर जरूर आपण देखील स्वर्गाचे
मालक असायला पाहिजे. आपण इथे नरकामध्ये येऊन का पडलो आहोत. आता लक्षात येत आहे की,
अगोदर आपण देखील पुजारी होतो, आता २१ जन्मांकरिता पुन्हा पूज्य बनत आहोत. ६३ जन्म
पुजारी बनलो, आता पुन्हा आपण पूज्य स्वर्गाचे मालक बनणार. हे आहे नरापासून नारायण
बनण्याचे नॉलेज. भगवानुवाच मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. पतित राजे पावन
राजांना नमन वंदन करतात. प्रत्येक महाराजाच्या महालामध्ये मंदिर जरूर असेल. ते
देखील राधे-कृष्णाचे किंवा लक्ष्मी-नारायणाचे किंवा मग राम-सीतेचे असेल. आजकाल तर
गणेश, हनुमान इत्यादींची देखील मंदिरे बनवत राहतात. भक्तिमार्गामध्ये किती
अंधश्रद्धा आहे. आता तुम्ही समजता - खरोखर आपण राजाई केली नंतर मग वाममार्गामध्ये
जातो (अधोगती होते), आता बाबा समजावून सांगत आहेत तुमचा हा अंतिम जन्म आहे. गोड-गोड
मुलांनो, एकेकाळी तुम्ही स्वर्गामध्ये होता. मग उतरत-उतरत जमिनीवर येऊन पडला आहात.
तुम्ही म्हणाल आम्ही खूप श्रेष्ठ होतो, आता बाबा पुन्हा आम्हाला श्रेष्ठ बनवत आहेत.
आपण दर ५ हजार वर्षांनंतर शिकतच येतो. याला म्हटले जाते - वर्ल्डची
हिस्ट्री-जिओग्राफी रिपीट (जगाच्या इतिहास-भूगोलाची पुनरावृत्ती).
बाबा म्हणतात - मी
तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनवतो. साऱ्या विश्वामध्ये तुमचे राज्य असेल.
गाण्यामध्ये देखील आहे ना - ‘बाबा तुम्ही असे राज्य देता जे कोणी हिरावून घेऊ शकत
नाही’. आता तर किती पार्टिशन्स (फूट) आहे. पाण्यावरून, जमिनीवरून किती भांडणे होत
राहतात. आपापल्या प्रांताची काळजी घेतात. काळजी घेतली नाही तर तरुण मुले दगड फेक
करायला लागतील. ते लोक समजतात हे नवीन जवान शक्तिशाली बनून भारताचे रक्षण करतील. तर
ती शक्ती आता दाखवत राहतात. दुनियेची हालत बघा कशी आहे. रावण राज्य आहे ना.
बाबा म्हणतात - हा
आहेच आसुरी संप्रदाय. तुम्ही आता दैवी संप्रदायाचे बनत आहात. तर मग देवतांचे आणि
असुरांचे युद्ध कसे बरें होईल. तुम्ही तर डबल अहिंसक बनता. ते आहेत डबल अहिंसक.
देवी-देवतांना डबल अहिंसक म्हटले जाते. अहिंसा परमो देवी-देवता धर्म म्हटले जाते.
बाबांनी समजावून सांगितले आहे - कोणाला वाणीद्वारे दुःख देणे ही देखील हिंसा आहे.
तुम्ही देवता बनत आहात तर प्रत्येक गोष्टीमध्ये रॉयल्टी असायला हवी. खाणे-पिणे
इत्यादी खूप उत्कृष्टही असू नये आणि खूप निकृष्टही नसावे. मध्यम असावे. राजा इत्यादी
फार कमी बोलतात. प्रजेचे देखील राजावर खूप प्रेम असते. इथे तर पहा काय सुरू आहे.
किती आंदोलने होतात. बाबा म्हणतात - जेव्हा अशी परिस्थिती होते तेव्हा मी येऊन
विश्वामध्ये शांती स्थापन करतो. गव्हर्मेंटला वाटते - सर्वांनी मिळून एक व्हावे. भले
सर्व ब्रदर्स तर आहेत परंतु हा तर खेळ आहे ना. बाबा मुलांना सांगतात - तुम्ही
अजिबात काळजी करू नका. आता धान्याचा तुटवडा आहे. तिथे तर धान्य इतके असेल, पैशा
शिवाय जितके पाहिजे तितके मिळत राहील. आता ती दैवी राजधानी स्थापन करत आहेत. आपण
हेल्थला देखील असे बनवतो जेणेकरून कोणता आजारच होणार नाही, गॅरंटी आहे. आपण आपले
कॅरॅक्टर (चारित्र्य) देखील या देवतां सारखे बनवतो. जसा मिनिस्टर असेल त्याप्रमाणे
त्यांना समजावून सांगू शकता. युक्तीने समजावून सांगितले पाहिजे. ओपिनियनमध्ये तर
खूप चांगले लिहितात; परंतु अरे, तुम्ही समजून देखील तर घ्या ना. तर म्हणतात - वेळ
नाही. तुम्ही मोठी लोकं तुम्ही बोलाल तर गरिबांचे देखील कल्याण होईल.
बाबा समजावून सांगतात
की, आता सगळ्यांच्या डोक्यावर काळ उभा आहे. आज-उद्या करता-करता काळ खाऊन टाकेल.
तुम्ही कुंभकर्णासारखे बनला आहात. मुलांना सांगताना देखील खूप मजा येते. बाबांनीच
ही चित्रे इत्यादी बनवून घेतली आहेत. दादाला (ब्रह्मा बाबांना) थोडेच हे ज्ञान होते.
तुम्हाला वारसा लौकिक आणि पारलौकिक पित्याकडून मिळतो. अलौकिक पित्याकडून (ब्रह्मा
बाबांकडून) वारसा मिळत नाही. हे तर दलाल आहेत, यांच्याकडून वारसा मिळत नाही.
प्रजापिता ब्रह्माची आठवण करायची नाहीये. ब्रह्माबाबा म्हणतात – ‘माझ्याकडून तर
तुम्हाला काहीही मिळत नाही. मी देखील शिकत आहे, वारसा आहेच मुळी एक हदचा आणि दुसरा
बेहदच्या पित्याचा’. प्रजापिता ब्रह्मा कसला वारसा देणार. बाबा म्हणतात – ‘मामेकम्
(मज एकाची) आठवण करा’, हा तर रथ आहे ना. रथाची काही आठवण करायची नाही आहे ना. उच्च
ते उच्च भगवंताला म्हटले जाते. बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगत आहेत. आत्माच
सर्व काही करते ना. एक खाल (शरीर) सोडून दुसरी घेते. जसे सापाचे उदाहरण आहे. भ्रामरी
देखील तुम्हीच आहात. ज्ञानाची भूं-भूं करा. ज्ञान ऐकवता-ऐकवता तुम्ही कोणालाही
विश्वाचा मालक बनवू शकता. जे बाबा तुम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत अशा बाबांची
तुम्ही का नाही आठवण करणार. आता बाबा आले आहेत तर वारसा का नाही घेतला पाहिजे. असे
का म्हणता की वेळच मिळत नाही. चांगल्या-चांगल्या मुलांना तर सेकंदात समजते. बाबांनी
समजावून सांगितले आहे - लोकं लक्ष्मीची पूजा करतात, आता लक्ष्मीकडून काय मिळते आणि
अंबेकडून काय मिळते? लक्ष्मी तर आहे स्वर्गाची देवी. तिच्याकडे पैशांची भीक मागतात.
अंबा तर विश्वाचा मालक बनवते. सर्व मनोकामना पूर्ण करते. श्रीमताद्वारे सर्व
मनोकामना पूर्ण होतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
कर्मेंद्रियांद्वारे कोणतीही चूक होऊ नये यासाठी ‘मी आत्मा आहे’, ही स्मृती पक्की
करायची आहे. शरीराकडे बघायचे नाहीये. एका बाबांकडेच लक्ष द्यायचे आहे.
२) आता वानप्रस्थ
अवस्था आहे त्यामुळे वाणी पासून परे जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, पवित्र जरूर
बनायचे आहे. बुद्धीमध्ये असावे - ‘सच की नईया हिलेगी, डूबेगी नहीं…’ (‘सत्याची नौका
हलेल, परंतु बुडणार नाही’) त्यामुळे संकटाला घाबरून जायचे नाहीये.
वरदान:-
ड्रामाच्या
नॉलेजद्वारे अचल स्थिती बनविणारे प्रकृतीजीत आणि मायाजीत भव
प्रकृती अथवा
मायेद्वारे कसलाही पेपर येवो परंतु जरा देखील डगमगायचे नाही. हे काय, असे का असा
प्रश्न जरी उत्पन्न झाला, थोडी जरी कोणती समस्या वार करणारी बनली तर नापास व्हाल;
त्यामुळे काहीही झाले तरी आतून हा आवाज निघावा की, ‘वाह मीठा ड्रामा वाह!’, ‘अरे
बापरे, हे काय झाले’ हा संकल्प देखील येऊ नये. अशी स्थिती असावी जी संकल्पामध्ये
सुद्धा खळबळ माजू नये. सदैव अचल, अडोल स्थिती रहावी, तेव्हा प्रकृतीजीत आणि
मायाजीतचे वरदान प्राप्त होईल.
बोधवाक्य:-
खुशखबरी ऐकवून
आनंद देणे हेच सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
महारथींचा पुरुषार्थ
आता विशेषत: याच अभ्यासाबद्दल आहे. आता-आता कर्मयोगी, आता-आता कर्मातीत स्टेज.
जुन्या दुनियेमध्ये, जुन्या अंतिम शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्याधीने आपल्या
श्रेष्ठ स्थितीला अशांतीमध्ये आणू नये, स्व-चिंतन, ज्ञानाचे चिंतन, शुभ-चिंतक
बनण्याचे चिंतनच चालावे. तेव्हा म्हणणार कर्मातीत स्थिती.