18-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये आला आहात जुन्या दुनियेमधून मरून नवीन दुनियेमध्ये जाण्याकरिता. आता तुमची प्रीत या भगवंतावर जडली आहे”

प्रश्न:-
कोणत्या विधीद्वारे बाबांची आठवण तुम्हाला श्रीमंत बनवते?

उत्तर:-
बाबा आहेत बिंदू. तुम्ही बिंदू बनून बिंदूची आठवण करा तर श्रीमंत बनाल. जसे एकावर एक बिंदू (शून्य) लावा तर १०, पुन्हा बिंदू लावा तर १००, मग १००० होतात, तसे बाबांच्या आठवणीद्वारे बिंदू लागत जातो. तुम्ही श्रीमंत बनत जाता. आठवणीमध्येच खरी कमाई आहे.

गीत:-
महफिल में जल उठी शमा…

ओम शांती।
या गाण्याचा अर्थ किती विचित्र आहे - प्रीत कशासाठी जडली आहे? कोणावर जडली आहे? भगवंतावर, कारण या दुनियेमधून मरून त्यांच्याकडे जायचे आहे. असे कधी कोणावर प्रेम होते का? ज्यामध्ये असा विचार येईल की, मरून जाऊ. मग कोणी प्रेम करतील का? गाण्याचा अर्थ किती वंडरफुल आहे. शमेवर परवाने प्रेम करून, फेऱ्या मारता-मारता जळून मरतात. तुम्हाला देखील बाबांच्या प्रेमामध्ये हे शरीर सोडायचे आहे अर्थात् बाबांची आठवण करत-करत शरीर सोडायचे आहे. हे गायन फक्त एकासाठीच आहे. ते बाबा जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावर जे प्रेम करतात, त्यांना या दुनियेमधून मरावे लागते. भगवंतावर प्रेम करतात, तर मरून कुठे जातील? जरूर भगवंताकडेच जातील. मनुष्य दान-पुण्य, तीर्थयात्रा इत्यादी करतात भगवानांपाशी जाण्याकरिता. शरीर सोडण्याच्या वेळी देखील मनुष्याला म्हणतात - भगवंताची आठवण कर. भगवान किती नामीग्रामी आहेत. ते जेव्हा येतात तेव्हा साऱ्या दुनियेला नष्ट करतात. तुम्ही जाणता - आपण या युनिव्हर्सिटीमध्ये येतो जुन्या दुनियेतून मरून नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. जुन्या दुनियेला पतित दुनिया, हेल (नरक) म्हटले जाते. बाबा नवीन दुनियेमध्ये जाण्याचा मार्ग सांगतात. फक्त माझी आठवण करा, मी आहे - हेवनली गॉड फादर. त्या (लौकिक) फादरकडून तुम्हाला धन मिळेल, मालमत्ता, घर इत्यादी मिळतील. मुलींना तर वारसा मिळतही नाही. त्यांना दुसऱ्या घरात पाठवले जाते. अर्थात् ती वारसदार ठरत नाहीत. हे भगवान तर आहेत सर्व आत्म्यांचे पिता, सर्वांना त्यांच्याकडे यायचेच आहे. कधी ना कधी बाबा जरूर येतात आणि सर्वांना घरी घेऊन जातात, कारण नवीन दुनियेमध्ये फार थोडे मनुष्य असतात. जुन्या दुनियेमध्ये तर पुष्कळ आहेत. नवीन दुनियेमध्ये मनुष्य देखील थोडे आणि सुख देखील भरपूर असते. जुन्या दुनियेमध्ये पुष्कळ मनुष्य आहेत त्यामुळे दुःख सुद्धा पुष्कळ आहे, म्हणून बाबांना बोलावतात. बापू गांधीजी देखील म्हणत असत - ‘हे पतित-पावन या’. फक्त ते त्यांना ओळखत नव्हते. समजतात देखील पतित-पावन परमपिता परमात्मा आहेत, तेच दुनियेचे लिबरेटर आहेत. राम-सीतेला काही सारी दुनिया मानणार नाही. सारी दुनिया परमपिता परमात्म्याला लिबरेटर, गाइड मानते. लिबरेट करतात दुःखातून. ठीक आहे, तर दुःख देणारा कोण? बाबा काही दुःख देऊ शकत नाहीत, कारण ते तर पतित-पावन आहेत. पावन दुनिया, सुखधाममध्ये घेऊन जाणारे आहेत. तुम्ही आहात त्या रूहानी बाबांची रूहानी मुले. जसा बाबा, तशी मुले. लौकिक पित्याची आहेत लौकिक अर्थात् देहधारी मुले. आता तुम्हा मुलांना हे समजून घ्यायचे आहे - आपण आत्मा आहोत, परमपिता परमात्मा आपल्याला वारसा देण्यासाठी आले आहेत. आपण त्यांची मुले बनलो तर जरूर स्वर्गाचा वारसा मिळेल. आहेतच स्वर्ग स्थापन करणारे. आपण स्टुडंट आहोत, हे विसरता कामा नये. मुलांच्या बुद्धीमध्ये असते की, शिवबाबा मधुबनमध्ये मुरली वाजवतात. ती (लाकडी) मुरली तर इथे नाहीये. श्रीकृष्णाचे डान्स करणे, मुरली वाजवणे - हे सर्व भक्तीमार्गाचे आहे. परंतु ज्ञानाची मुरली तर शिवबाबाच वाजवतात. तुमच्याकडे चांगली-चांगली गाणी बनवणारे येतील. गाणी बहुतांशी पुरुषच बनवतात. तुम्हाला ज्ञानाचीच गाणी गायची आहेत, ज्यामुळे शिवबाबांची आठवण येईल.

बाबा म्हणतात - मज अल्फची आठवण करा. शिवाला म्हणतात - बिंदू. व्यापारी लोक बिंदू लिहितील तेव्हा त्याला म्हणतील - शिव. एका पुढे बिंदू (शून्य) लिहा तर १० होतील, पुन्हा बिंदू लिहा तर १०० होतात. अजून बिंदू लिहाल तर १००० होतील. म्हणून तुम्हाला देखील शिवाची आठवण करायची आहे. जेवढी शिवाची आठवण कराल तेवढा बिंदू-बिंदू लागत जाईल. तुम्ही अर्ध्या कल्पासाठी श्रीमंत बनता. तिथे गरीब असतही नाहीत. सर्वजण सुखी असतात. दुःखाचे नाव सुद्धा नसते. बाबांच्या आठवणीने विकर्म नष्ट होत जातील. तुम्ही अतिशय श्रीमंत बनाल. याला म्हटले जाते सच्च्या बाबांद्वारे सच्ची कमाई. हीच सोबत येईल. सर्व मनुष्य रिकाम्या हाताने जातात. तुम्हाला भरलेल्या हाताने जायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - पवित्रता असेल तर पीस, प्रॉस्परिटी (शांती आणि समृद्धी) मिळेल. तू आत्मा आधी पवित्र होतीस, नंतर मग अपवित्र बनली आहेस. संन्याशांना देखील सेमी-पवित्र म्हणणार. तुमचा आहे संपूर्ण संन्यास. तुम्ही जाणता ते किती सुख उपभोगतात. थोडे सुख आहे आणि मग दुःखच. पूर्वी ते लोक बाबांना सर्वव्यापी म्हणत नव्हते. सर्वव्यापी म्हटल्यामुळे ते अजूनच घसरत जातात (पतन होते). दुनियेमध्ये अनेक प्रकारचे मेळे भरतात, कारण कमाई तर होते ना. हा देखील त्यांचा धंदाच आहे. म्हणतात - नरापासून नारायण बनण्याच्या धंद्या व्यतिरिक्त बाकी सर्व धंद्यामध्ये मातीच आहे. हा धंदा कोणी विरळाच करतो. बाबांचे बनून देहासहित सर्व काही बाबांना अर्पण करायचे आहे, कारण तुम्हाला नवे शरीर हवे आहे. बाबा म्हणतात - तुम्ही कृष्णपुरीमध्ये जाऊ शकता, परंतु आत्मा जेव्हा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल तेव्हा. श्रीकृष्णपुरीमध्ये असे म्हणणार नाहीत की, आम्हाला पावन बनवा. इथे तर सर्व मनुष्य मात्र बोलावतात - ‘ओ लिबरेटर, या. या पाप-आत्म्यांच्या दुनियेमधून आम्हाला लिबरेट करा’.

आता तुम्ही जाणता - बाबा आले आहेत आम्हाला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी. तिथे जाणे तर चांगलेच आहे ना. मनुष्याला शांती हवी आहे. आता शांती कशाला म्हणतात? कर्म केल्याशिवाय तर कोणी राहूच शकत नाही. शांती तर आहे मुळी शांतीधाममध्ये. तरीही शरीर धारण करून कर्म करावेच लागते. सतयुगामध्ये कर्म करताना देखील शांती असते. अशांतीमध्ये मनुष्याला दुःख होते, म्हणूनच म्हणतात - शांती कशी मिळेल. आता तुम्ही मुले जाणता - शांतीधाम तर आपले घर आहे. सतयुगामध्ये शांती देखील आहे, सुख देखील आहे. सर्व काही आहे. आता ते हवे की फक्त शांती पाहिजे? इथे तर दुःखच आहे, म्हणून पतित-पावन बाबांना देखील इथे बोलावतात. भक्ती करतातच मुळी भगवंताला भेटण्यासाठी. भक्ती आधी अव्यभिचारी असते, नंतर व्यभिचारी होते. व्यभिचारी भक्तीमध्ये बघा काय-काय करतात. शिडीच्या चित्रामध्ये किती सुंदर दाखवले आहे, परंतु सर्वात आधी तर हे सिद्ध केले पाहिजे की, भगवान कोण आहे? श्रीकृष्णाला असे कोणी बनवले? तो आधीच्या जन्मामध्ये कोण होता? समजावून सांगण्याची खूप चांगली युक्ती पाहिजे. जे चांगली सेवा करतात, त्यांचे मन देखील साक्ष देते. युनिव्हर्सिटीमध्ये जे चांगल्या प्रकारे शिकतील ते जरूर तीव्र गतीने पुढे जातील. नंबरवार तर असतातच. काही डल-हेड (मंद-बुद्धीचे) देखील असतात. शिवबाबांना आत्मा म्हणते - माझ्या बुद्धीचे कुलूप उघडा. बाबा म्हणतात - बुद्धीचे कुलूप उघडण्यासाठीच तर मी आलो आहे. परंतु तुमची कर्मे अशी आहेत की कुलूप उघडतच नाही. मग बाबा तरी काय करतील? तुम्ही खूप पापे केलेली आहेत. आता त्याला बाबा तरी काय करतील? टीचरला जर एखादा स्टुडंट म्हणेल की, मी कमी अभ्यास करतो, तर टीचर तरी काय करतील? टीचर कृपा तर करणार नाहीत! फारफार तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा टाइम देतील. त्यासाठी तुम्हाला मनाई नाही आहे. प्रदर्शनी उघडी आहे, बसून प्रॅक्टिस करा. भक्तीमार्गामध्ये तर कोणी म्हणतील माळेचा जप करा, कोणी म्हणतील हा मंत्र जप करा. इथे तर बाबा स्वतःचा परिचय देतात. बाबांची आठवण करायची आहे, ज्याद्वारे वारसा मिळतो. म्हणून चांगल्या प्रकारे बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायला हवा ना. यामध्ये देखील बाबा म्हणतात - विकारामध्ये कधीही जाऊ नका. थोडी जरी विकाराची चटक लागली, तर मग ती वाढत जाईल. सिगारेट इत्यादी एकदा जरी टेस्ट घेतात तरी संगाचा रंग लगेच लागतो. मग सवय सोडणे देखील कठीण होते. किती बहाणे करतात. कोणतीही वाईट सवय लागता कामा नये. छी-छी (वाईट) सवयी देखील सोडून द्यायच्या आहेत. बाबा म्हणतात - जिवंतपणी शरीराचे भान सोडून माझी आठवण करा. देवतांना भोग नेहमी पवित्रच लावला जातो, तर तुम्ही देखील पवित्र अन्न खा. आजकाल असली तूप मिळत नाही, तेल खातात. तिथे (स्वर्गामध्ये) तेल आदि काहीच नसते. इथे (कलियुगामध्ये) तर डेअरीमध्ये बघा - शुद्ध तूप ठेवलेले असते आणि बनावट देखील ठेवलेले असते. दोन्हींवर लिहिलेले असते - ‘शुद्ध तूप’, परंतु किंमतीमध्ये फरक असतो. आता तुम्हा मुलांना फुलासारखे उमललेले, आनंदित राहिले पाहिजे. स्वर्गामध्ये तर नॅचरल ब्युटी (नैसर्गिक सौंदर्य) असते. तिथे प्रकृती देखील सतोप्रधान बनते. लक्ष्मी-नारायणासारखी नॅचरल ब्युटी इथे कोणीही बनवू शकत नाही. त्यांना या डोळ्यांनी कोणी थोडेच पाहू शकतात. हो, साक्षात्कार होतो परंतु साक्षात्कार झाल्याने कोणी हुबेहूब चित्र थोडेच काढू शकतील. हां, एखाद्या आर्टिस्टला साक्षात्कार होत गेला आणि त्या वेळी बसून चित्र काढले तर... परंतु ते फार कठीण आहे. तर तुम्हा मुलांना खूप नशा असला पाहिजे. आता आपल्याला घेऊन जाण्यासाठी बाबा आले आहेत. बाबांकडून आपल्याला स्वर्गाचा वारसा मिळणार आहे. आता आपले ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. अशा प्रकारचे विचार बुद्धीमध्ये राहिल्याने आनंद होईल. विकाराचा जरा देखील विचार येता कामा नये. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. द्रौपदीने देखील म्हणूनच बोलावले होते ना. तिला काही ५ पती नव्हते. ती तर बोलावत होती की, हे दु:शासन मला विवस्त्र करत आहेत, यापासून वाचवा. मग ५ पती कसे असू शकतात. अशी गोष्ट होऊच शकत नाही. वेळोवेळी तुम्हा मुलांना नवीन-नवीन पॉइंट्स मिळत राहतात, तर बदल करावा लागेल, काही ना काही बदल करून नवीन शब्द घातला पाहिजे.

तुम्ही लिहिता की थोड्याच वेळात आम्ही या भारताला परिस्तान बनवू. तुम्ही चॅलेंज करता. बाबा मुलांना म्हणतील - ‘सन शोज फादर, फादर शोज सन’. कोणता फादर? शिव आणि शाळीग्राम, यांचे गायन आहे. शिवबाबा जे समजावून सांगतात त्याला फॉलो करा. ‘फॉलो फादर’ हे देखील त्यांचेच गायन आहे. लौकिक फादरला फॉलो केल्याने तर तुम्ही पतित बनता. हे (शिवबाबा) तर फॉलो करायला लावतात पावन बनविण्यासाठी. फरक आहे ना. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, फॉलो करून पवित्र बना’. फॉलो केल्यानेच स्वर्गाचे मालक बनाल. लौकिक पित्याला फॉलो केल्याने ६३ जन्म तुम्ही शिडी खाली उतरला आहात. आता बाबांना फॉलो करून वर चढायचे आहे. बाबांसोबत जायचे आहे. बाबा म्हणतात - हे एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे. तुम्ही बाबांना जाणून बाबांकडून वारसा प्राप्त करता. ते (ऋषी-मुनी) तर म्हणतात ब्रह्म मध्ये लीन होऊ. लीन तर व्हायचे नाही आहे, पुन्हा येणारच. बाबा दररोज समजावून सांगत राहतात - ‘गोड-गोड मुलांनो, सर्वप्रथम सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. पारलौकिक बाबा पावन बनण्याचा वारसा देतात, म्हणूनच बेहदच्या बाबांना म्हणतात देखील - ‘पावन बनवा’. ते आहेत पतित-पावन. लौकिक पित्याला पतित-पावन म्हणणार नाही. ते स्वतःच बोलावत राहतात - ‘हे पतित-पावन, या’. तर दोन पित्यांचा परिचय सर्वांना द्यायचा आहे. लौकिक पिता म्हणतील - ‘लग्न करून पतित बना’; तर पारलौकिक पिता म्हणतात - ‘पावन बना’. माझी आठवण केल्याने तुम्ही पावन बनाल. एकच बाबा सर्वांना पावन बनविणारे आहेत. हे पॉइंट्स समजावण्यासाठी फारच चांगले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट्स विचार-सागर मंथन करून समजावून सांगत रहा. हाच तुमचा धंदा आहे. तुम्ही आहातच पतितांना पावन बनविणारे. आता पारलौकिक बाबा म्हणतात - पावन बना, जेव्हा की विनाश समोर उभा आहे. आता काय करायला हवे? जरूर पारलौकिक पित्याच्या मतावर चालले पाहिजे ना. प्रदर्शनीमध्ये ही देखील प्रतिज्ञा लिहून घेतली पाहिजे - ‘पारलौकिक पित्याला फॉलो करू, पतित बनणे सोडून देऊ’. लिहा - आम्ही बाबांकडून गॅरंटी घेतो. सारी गोष्ट आहे पवित्रतेची. तुम्हा मुलांना दिवस-रात्र आनंद झाला पाहिजे - बाबा आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहेत. अल्फ आणि बे, बादशाही. आता तुम्ही समजता की शिव जयंती म्हणजेच भारताच्या स्वर्गाची जयंती. गीताच सर्व शास्त्रमई शिरोमणी आहे. गीता माता. वारसा तर बाबांकडूनच मिळतो. गीतेचे रचयिता शिवबाबाच आहेत. पारलौकिक पित्याकडून पावन बनण्याचा वारसा मिळतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपण गॉडली स्टुडंट्स आहोत हे कायम लक्षात ठेवायचे आहे. कोणतीही घाणेरडी सवय लावायची नाही. त्याला काढून टाकायचे आहे. विकाराचा थोडासुद्धा विचार येता कामा नये.

२) जिवंतपणी शरीराचे भान विसरून बाबांची आठवण करायची आहे. विविध पॉईंट्सवर विचार सागर मंथन करून पतितांना पावन बनविण्याचा धंदा करायचा आहे.

वरदान:-
संतुष्टतेच्या त्रिमूर्ती सर्टिफिकेट द्वारे सदैव सफलता प्राप्त करणारे उच्च पदाचे अधिकारी भव

सदैव सफल होण्यासाठी बाबांशी आणि परिवाराशी नीट कनेक्शन पाहिजे. प्रत्येकाला तीन सर्टिफिकिटे घ्यायची आहेत - बाबा, आपण स्वतः आणि परिवार. परिवाराला संतुष्ट करण्यासाठी छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा की, रिगार्ड देण्याचे रेकॉर्ड (आदर देण्याचे कार्य) सतत चालू रहावे, यामध्ये निष्काम बना. बाबांना संतुष्ट करण्यासाठी सच्चे बना. आणि स्वतःशी संतुष्ट राहण्यासाठी सदैव श्रीमताच्या मर्यादेच्या रेषेच्या आतमध्ये रहा. ही तीन सर्टिफिकेट उच्च पदाचा अधिकारी बनवतील.

बोधवाक्य:-
जे चित्राला (शरीराला) न बघता चैतन्य आणि चरित्राला बघतात तेच श्रेष्ठ चरित्रवान आहेत.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

जसे सर्व आत्म्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी सदैव शुभ भावना आणि कल्याणाची भावना ठेवता. तशी आपल्या या दैवी संघटनला देखील एकरस स्थितीमध्ये स्थित करून संघटनची शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा तेव्हा तुमच्या या दैवी संघटनच्या रूपामध्ये एकता आणि एकरस स्थितीचा प्रत्यक्ष रुपामध्ये साक्षात्कार होईल.