18-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - स्वत:वर दया करा, बाबा जे मत देतात त्यावर चाला म्हणजे अपार खुशी राहील, मायेच्या शापापासून वाचाल”

प्रश्न:-
मायेचा शाप का लागतो? शापित आत्म्याची गति काय होईल?

उत्तर:-
१. बाबांचा आणि शिक्षणाचा (ज्ञान रत्नांचा) अनादर केल्याने, आपल्या मतावर चालल्याने मायेचा शाप लागतो, २. आसुरी वर्तन असेल, दैवी गुण धारण करत नाहीत तर जसे काही स्वतःच्या बाबतीत निष्ठुर बनतात. बुद्धीला कुलूप लागते. ते मग बाबांच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करू शकत नाहीत.

ओम शांती।
रूहानी मुलांना हा तर आता निश्चय आहे की आपल्याला आत्म-अभिमानी बनायचे आहे आणि बाबांची आठवण करायची आहे. माया रुपी रावण जो आहे तो शापित आणि दुःखी बनवितो. ‘शाप’ शब्दच दुःखाचा आहे, ‘वारसा’ शब्द सुखाचा आहे. जी मुले प्रामाणिक, आज्ञाधारक आहेत, ते चांगल्या रीतीने जाणतात. जी नाफरमानबरदार (अवज्ञा करणारी) आहेत, ती मग मुलेच नाहीत. भले स्वतःला काहीही समजू दे परंतु बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत, वारसा प्राप्त करू शकत नाहीत. जे मायेच्या म्हणण्यानुसार चालतात आणि बाबांची आठवण देखील करत नाहीत, कोणाला ज्ञान समजावून सांगूही शकत नाहीत ते म्हणजे आपणच आपल्याला शापित करतात. मुले जाणतात माया खूप शक्तिशाली आहे. जर बेहदच्या बाबांचे देखील मानत नाहीत म्हणजे मग मायेचे मानतात. मायेच्या वश होतात. एक म्हण आहे ना - ‘प्रभू की आज्ञा सिर माथे…’ तर बाबा म्हणतात - ‘मुलांनो, पुरुषार्थ करून बाबांची आठवण करा तर मायेच्या कुशीतून निघून प्रभूच्या कुशीमध्ये याल’. बाबा तर बुद्धिवानांचे बुद्धिवान आहेत. बाबांचे मानले नाहीत तर बुद्धीला कुलूप लागेल. कुलूप उघडणारे तर एक बाबाच आहेत. श्रीमतावर चालत नाहीत तर त्यांचे काय हाल होतील! मायेच्या मतावर काहीच पद प्राप्त करू शकणार नाहीत. भले ऐकतात परंतु धारणा करू शकत नाहीत, ना करवून घेऊ शकत तर त्यांचे काय हाल होतील! बाबा तर गरीब निवाज आहेत. मनुष्य गरिबांना दान करतात तर बाबा देखील येऊन किती बेहदचे दान करतात. जर श्रीमतावर चालत नाहीत तर एकदम बुद्धीला कुलूप लागते. मग प्राप्ती तरी काय करणार! श्रीमतावर चालणारी मुलेच बाबांची मुले आहेत. बाबा तर दयाळू आहेत. समजतात बाहेर जाताच माया एकदम खलास करेल. कोणी आपघात (आत्महत्या) करतात तर हा देखील आपलाच सत्यानाश करतात. बाबा तर समजावून सांगत राहतात - स्वतःवर दया करा, श्रीमतावर चाला, आपल्याच मतावर चालू नका. श्रीमतावर चालल्याने खुशीचा पारा चढेल. लक्ष्मी-नारायणाचा चेहरा पहा किती खुशनुमा (आनंदी) आहे. तर पुरुषार्थ करून असे उच्च पद प्राप्त केले पाहिजे ना. बाबा अविनाशी ज्ञान रत्न देतात तर त्याचा अनादर कशासाठी करायचा! रत्नांनी झोळी भरून घेतली पाहिजे. ऐकतात तर खरे परंतु झोळी भरत नाहीत कारण बाबांची आठवण करत नाहीत. आसुरी वर्तन करतात. बाबा पुन्हा-पुन्हा समजावून सांगत राहतात - ‘स्वतःवर दया करा, दैवी गुण धारण करा’. तो आहेच आसुरी संप्रदाय. बाबा येऊन त्यांना परिस्तानी बनवतात. परिस्तान स्वर्गाला म्हटले जाते. मनुष्य किती त्रास सहन करत राहतात. संन्यासी इत्यादींकडे जातात, समजतात - मनाला शांती मिळेल. वास्तविक हा शब्दच चुकीचा आहे, त्याला काहीच अर्थ नाही. शांती तर आत्म्याला पाहिजे ना. आत्मा स्वयं शांत स्वरूप आहे. असे देखील म्हणत नाहीत की, आत्म्याला शांती कशी मिळेल? म्हणतात - मनाला शांती कशी मिळेल? आता मन काय आहे, बुद्धी काय आहे, आत्मा काय आहे, काहीच जाणत नाहीत. जे काही बोलतात किंवा करतात तो सर्व आहे भक्तीमार्ग. भक्तीमार्गवाले शिडी खाली उतरता-उतरता तमोप्रधान बनतात. भले कोणाकडे खूप धन, प्रॉपर्टी इत्यादी आहे परंतु आहेत तर रावण राज्यामध्येच ना.

तुम्हा मुलांना चित्रांवर समजावून सांगण्याची देखील खूप चांगली प्रॅक्टिस करायची आहे. बाबा सर्व सेंटर्सच्या मुलांना समजावून सांगत राहतात, नंबरवार तर आहेत ना. काही मुले राजाई पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत नाहीत तर प्रजेमध्ये जाऊन काय बनतील! सेवा करत नाहीत, स्वतःची दयाच येत नाही की आपण काय बनणार; मग समजले जाते ड्रामामध्ये यांचा पार्ट इतकाच आहे. आपले कल्याण करण्यासाठी ज्ञानाच्या सोबतच योग देखील असावा. योगामध्ये राहत नाहीत तर मग काहीच कल्याण होत नाही. योगाशिवाय पावन बनू शकत नाही. ज्ञान तर खूप सोपे आहे परंतु आपले कल्याण देखील करायचे आहे. योगामध्ये न राहिल्याने काहीच कल्याण होत नाही. योगाशिवाय पावन कसे बनाल? ज्ञान वेगळी गोष्ट आहे, योग वेगळी गोष्ट आहे. योगामध्ये खूप कच्चे आहेत. आठवण करण्याचे शहाणपणच येत नाही. तर आठवणी शिवाय विकर्म कशी विनाश होतील. मग खूप सजा खावी लागते, खूप पश्चाताप करावा लागतो. ती (भौतिक) स्थूल कमाई करत नाहीत तर कधी कोणाला सजा भोगावी लागत नाही, यामध्ये (ज्ञानामध्ये) तर पापांचे ओझे डोक्यावर आहे, त्याची खूप सजा खावी लागेल. संतान बनून देखील असभ्य बनतात तर खूप सजा होते. बाबा तर म्हणतात - स्वतःवर दया करा, योगामध्ये रहा. नाहीतर फुकटचा आपलाच घात करतात. जसे कोणी उंचावरून पडला आणि मेला नाही तर हॉस्पिटलमध्ये पडून राहील, ओरडत राहील. नाहक स्वतःला लोटून दिले, मेला नाही, बाकी काय कामाचा राहिला. इथे देखील असेच आहे. खूप उंचावर चढायचे आहे. श्रीमतावर चालत नाहीत तर कोसळतात. पुढे चालून प्रत्येकजण आपल्या पदाला पाहतील की आपण काय बनतो? जे सेवाभावी, अज्ञाधारक असतील, तेच उच्च पद प्राप्त करतील. नाही तर जाऊन दास-दासी इत्यादी बनतील. मग सजा देखील खूप कठोर मिळेल. त्यावेळी दोघेही जणू धर्मराजाचे रूप बनतात. परंतु मुले समजत नाहीत, चुका करतच राहतात. सजा तर इथेच भोगावी लागेल ना. जितकी जे सेवा करतील, शोभतील (उठून दिसतील). नाही तर काहीच कामाचे राहणार नाहीत. बाबा म्हणतात - दुसऱ्यांचे कल्याण करू शकत नाही तर निदान आपले तरी कल्याण करा. बंधनात असलेल्या देखील आपले कल्याण करत राहतात. तरी देखील बाबा मुलांना म्हणतात सावध रहा. नावा-रूपामध्ये फसल्याने माया खूप दगा देते. म्हणतात - ‘बाबा, अमकीला पाहिल्याने माझे खराब संकल्प चालतात’. बाबा समजावून सांगतात - कर्मेंद्रियांद्वारे कधीही खराब काम करायचे नाही. कोणतीही वाईट व्यक्ती जिचे वर्तन ठीक नसेल तर तिला सेंटरवर येऊ द्यायचे नाही. शाळेमध्ये कोणी गैरवर्तन करतात तर खूप मार खातात. टीचर सर्वांच्या समोर सांगतात, याने असे गैरवर्तन केले आहे, म्हणून याला शाळेतून काढले जात आहे. तुमच्या सेंटरवर देखील अशी घाणरेडी दृष्टी असणारे येतात, तर त्यांना पळवून लावले पाहिजे. बाबा म्हणतात - कधीही कु-दृष्टी असता कामा नये. सेवा करत नाहीत, बाबांची आठवण करत नाहीत तर जरूर काही ना काही घाण (अपवित्रता) आहे. जे चांगली सेवा करतात, त्यांचे नाव देखील मोठे होते. थोडा जरी संकल्प आला, कु-दृष्टी गेली तर समजले पाहिजे मायेचा वार होत आहे. एकदम सोडून दिले पाहिजे. नाहीतर वृद्धी होऊन नुकसान करतील. बाबांची आठवण कराल तर बचाव होत राहील. बाबा सर्व मुलांना सावध करतात - खबरदार रहा, कधी आपल्या कुळाचे नाव बदनाम करू नका. कोणी गंधर्व विवाह करून एकत्र राहतात तर नाव किती मोठे करतात, कोणी मग घाणेरडे (पतित) बनतात. इथे तुम्ही आला आहात आपली सद्गती करण्यासाठी, ना की दुर्गती करण्यासाठी. वाईटात वाईट आहे कामविकार, नंतर मग क्रोध. येतात बाबांकडून वारसा घेण्यासाठी परंतु माया वार करून शाप देते तर एकदम खालीच पडतात (पतन होते). म्हणजे स्वतःला शाप देतात. तर बाबा समजावून सांगत आहेत - खूप काळजी घ्यायची आहे, कोणी असा आला तर त्याला लगेच परत पाठवून दिले पाहिजे. दाखवतात देखील ना - अमृत पिण्यासाठी आले आणि मग बाहेर जाऊन असुर बनून घाण केली. ते मग हे ज्ञान ऐकवू शकत नाहीत. कुलूप बंद होते. बाबा म्हणतात - आपल्या सेवेमध्येच तत्पर राहिले पाहिजे. बाबांच्या आठवणीमध्ये राहता-राहता शेवटी मग घरी जायचे आहे. गाणे देखील आहे ना - ‘रात के राही थक मत जाना…’ आत्म्याला घरी जायचे आहे. आत्माच राही (प्रवासी) आहे. आत्म्याला रोज समजावून सांगितले जाते - आता तुम्ही शांतीधामला जाणारे प्रवासी आहात. तर आता बाबांची, घराची आणि वारशाची आठवण करत रहा. स्वतःला पहायचे आहे माया कुठे धोका तर देत नाही ना? मी आपल्या बाबांची आठवण करतो का?

आपली दृष्टी उच्च ते उच्च बाबांकडेच रहावी - हा आहे खूप उच्च पुरुषार्थ. बाबा म्हणतात - मुलांनो, खूप कु-दृष्टी सोडून द्या. देह-अभिमान अर्थात कु-दृष्टी, देही-अभिमानी अर्थात शुद्ध-दृष्टी. तर मुलांची दृष्टी बाबांकडेच राहिली पाहिजे. वारसा खूप उच्च आहे - विश्वाची बादशाही, काही कमी गोष्ट आहे! स्वप्नामध्ये देखील कोणाला वाटले नसेल की शिक्षणाने, योगाद्वारे विश्वाची बादशाही मिळू शकते. शिकून उच्च पद प्राप्त कराल तर बाबा देखील खुश होतील, टीचर देखील खुश होईल, सद्गुरु देखील खुश होईल. आठवण करत रहाल तर बाबा देखील प्रेम देत राहतील. बाबा म्हणतात - मुलांनो, आता या कमतरता काढून टाका. नाही तर फुकटचे नाव बदनाम कराल. बाबा तर विश्वाचा मालक बनवतात, भाग्य उघडतात. भारतवासीच १०० टक्के सौभाग्यशाली होते ते मग १०० टक्के दुर्भाग्यशाली बनले आहेत आता पुन्हा तुम्हाला सौभाग्यशाली बनविण्यासाठी शिकविले जाते.

बाबांनी समजावून सांगितले आहे - इतर धर्मातील ज्या बड्या-बड्या हस्ती आहेत, त्या देखील तुमच्याकडे येतील. योग शिकून जातील. म्युझियममध्ये जे टुरिस्ट येतात, त्यांना देखील तुम्ही समजावून सांगू शकता - आता स्वर्गाचे गेट उघडणार आहे. झाडाच्या चित्रावर समजावून सांगा - ‘पाहा, तुम्ही अमक्या वेळी येता. भारतवासीयांचा पार्ट अमक्या वेळी आहे. तुम्ही हे नॉलेज ऐकता मग आपल्या देशामध्ये जाऊन सांगा की, बाबांची आठवण करा तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल’. योगासाठी तर ते इच्छा ठेवतात. हठयोगी, संन्यासी काही त्यांना योग शिकवू शकत नाहीत. तुमचे मिशन देखील बाहेर जाईल. समजावून सांगण्याची खूप चांगली युक्ती पाहिजे. इतर धर्मातील जे मोठे-मोठे आहेत त्यांना यायचे तर आहे. तुमच्याकडून कोणी एक जरी चांगल्या रीतीने हे नॉलेज घेऊन जाईल तर एकापासून किती पुष्कळजण समजतील. एकाच्या बुद्धीमध्ये आले तर मग वर्तमानपत्रांमध्ये देखील टाकतील. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. नाही तर बाबांची आठवण करायला कसे शिकणार. बाबांचा परिचय तर सर्वांना मिळणार आहे. कोणी ना कोणी निघतील. म्युझियममध्ये अति पुरातन वस्तू बघण्यासाठी जातात. इथे मग तुमचे जुने नॉलेज ऐकतील. असंख्य येतील. त्यातील काहीजण चांगल्या रीतीने समजतील. इथूनच दृष्टी मिळेल किंवा मिशन बाहेर जाईल. तुम्ही म्हणाल - ‘बाबांची आठवण करा तर आपल्या धर्मामध्ये उच्च पद प्राप्त कराल’. पुनर्जन्म घेत-घेत सगळे खाली आले आहेत. खाली उतरणे अर्थात तमोप्रधान बनणे. पोप इत्यादी असे म्हणू शकत नाहीत की, बाबांची आठवण करा. बाबांना जाणतच नाहीत. तुमच्याकडे अतिशय उत्तम नॉलेज आहे. चित्र देखील सुंदर बनत राहतात. सुंदर वस्तू असेल तर म्युझियम अजूनच सुंदर होईल. बघण्यासाठी भरपूर लोक येतील. जितकी मोठी चित्रे असतील तितके चांगल्या रीतीने समजावून सांगू शकाल. आवड असली पाहिजे की, आपण असे-असे समजावून सांगावे. कायम तुमच्या बुद्धीमध्ये असावे की आपण ब्राह्मण बनलो आहोत तर जितकी सेवा कराल तितका खूप मान होईल. इथे देखील मान तर तिथे देखील मान असेल. तुम्ही पूज्य बनाल. हे ईश्वरीय नॉलेज धारण करायचे आहे. बाबा तर म्हणतात सेवेसाठी पळत रहा. बाबा कुठेही सेवेवर पाठवू दे, यामध्येच कल्याण आहे. संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये सेवेचे विचार चालले पाहिजेत. फॉरेनर्सना देखील बाबांचा परिचय द्यायचा आहे. मोस्ट बिलवेड बाबांची आठवण करा, कोणत्याही देहधारीला गुरु बनवू नका. सर्वांचे सद्गती दाता ते एक बाबाच आहेत. आता होलसेल मृत्यू समोर उभा आहे, होलसेल आणि रिटेल व्यापार असतो ना. बाबा आहेत होलसेल, वारसा देखील होलसेल देतात. २१ जन्मांसाठी विश्वाची राजाई घ्या. मुख्य चित्रे आहेत - त्रिमूर्ती, गोळा, झाड, शिडी, विराट रूपाचे चित्र आणि गीतेचा भगवान कोण?... ही चित्रे तर फर्स्ट क्लास आहेत, यामध्ये बाबांची महिमा पूर्णपणे आहे. बाबांनीच कृष्णाला असे बनवले आहे, हा वारसा गॉड फादरने दिला आहे. कलियुगामध्ये इतके असंख्य मनुष्य आहेत, सतयुगामध्ये फार थोडे आहेत. हे फेरबदल कोणी केले? जरा सुद्धा कोणी जाणत नाहीत. तर टुरिस्ट जास्त करून मोठ-मोठ्या शहरांमध्ये जातात. ते देखील येऊन बाबांचा परिचय प्राप्त करतील. सेवेसाठी पॉईंट्स तर खूप मिळत राहतात. विलायतमध्ये देखील जायचे आहे. एकीकडे तुम्ही बाबांचा परिचय देत राहाल, दुसरीकडे मारामारी चालत राहील. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतील तर जरूर बाकीच्यांचा विनाश होईल ना. वर्ल्डची हिस्ट्री-जॉग्राफी रिपीट होते. जे झाले ते पुन्हा रिपीट होईल. परंतु कोणाला समजावून सांगण्यासाठी देखील डोके पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी एका बाबांकडेच दृष्टी ठेवायची आहे. देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करून मायेच्या धोक्यापासून वाचायचे आहे. कधी कु-दृष्टी ठेवून आपल्या कुळाचे नाव बदनाम करायचे नाही.

२) सेवेसाठी धावपळ करत रहायची आहे. सेवाभावी आणि आज्ञाधारक बनायचे आहे. आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे. कोणतेही गैरवर्तन करायचे नाही.

वरदान:-
फुलस्टॉपच्या स्टेज द्वारे प्रकृतीच्या अशांतीला स्टॉप करणारे मास्टर प्रकृतीपती भव

वर्तमान वेळ अशांती वाढण्याची वेळ आहे. फायनल पेपरमध्ये एकीकडे प्रकृतीचे आणि दुसरीकडे पाच विकारांचे विक्राळ रूप असेल. तमोगुणी आत्म्यांचा वार आणि जुने संस्कार… सर्व अखेरच्या वेळी आपला चान्स घेतील. अशा वेळी समेटण्याच्या शक्तीद्वारे आता-आता साकारी, आता-आता आकारी आणि आता-आता निराकारी स्थितीमध्ये स्थित होण्याचा अभ्यास पाहिजे. दिसत असतानाही पाहू नका, ऐकत असतानाही ऐकू नका. जेव्हा अशी फुलस्टॉपची स्टेज असेल तेव्हा प्रकृती-पति बनून प्रकृतीच्या अशांतीला स्टॉप करू शकाल.

बोधवाक्य:-
निर्विघ्न राज्य-अधिकारी बनण्यासाठी निर्विघ्न सेवाधारी बना.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

नेहमी हेच स्मृतीमध्ये रहावे की मी आत्मा त्या सुप्रीम रूह सोबत कंबाइंड आहे. सुप्रीम रूह मज आत्म्याशिवाय राहू शकत नाही आणि मी देखील सुप्रीम रूह पासून वेगळी होऊ शकत नाही. प्रत्येक सेकंद हजूरला हाजिर अनुभव केल्याने रूहानी सुगंधामध्ये अविनाशी आणि एकरस रहाल.