18-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आता बाबांकडून सन्मुख बसून शिकत आहात, तुम्हाला सतयुगी बादशाहीच्या लायक बनण्याकरिता पावन जरूर बनायचे आहे”

प्रश्न:-
बाबांच्या कोणत्या ऑक्युपेशनला तुम्ही मुलेच जाणता?

उत्तर:-
तुम्ही जाणता की आपले बाबा, (pause घेणे) पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि सद्गुरु देखील आहेत. बाबा कल्पाच्या संगमयुगावर येतात, जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता, एक आदि सनातन धर्माची स्थापना करण्याकरिता. बाबा आता आम्हा मुलांना मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता शिकवत आहेत. हे ऑक्युपेशन आम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाही.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
ओम् शांतीचा अर्थ तर मुलांना वारंवार समजावून सांगितला आहे. ओम् अर्थात मी आत्मा आहे आणि माझे हे शरीर आहे. शरीर देखील म्हणू शकते की ही माझी आत्मा आहे. जसे शिवबाबा म्हणतात - तुम्ही माझे आहात. मुले म्हणतात - ‘बाबा, तुम्ही आमचे आहात’. अगदी तसेच आत्मा देखील म्हणते - ‘हे माझे शरीर’. शरीर म्हणेल - माझी आत्मा. आता आत्मा जाणते - मी अविनाशी आहे. आत्म्या शिवाय शरीर काहीच करू शकत नाही. शरीर तर आहे, म्हणते माझ्या आत्म्याला त्रास देऊ नका. माझी आत्मा पाप-आत्मा आहे अथवा माझी आत्मा पुण्य-आत्मा आहे. तुम्ही जाणता माझी आत्मा सतयुगामध्ये पुण्य-आत्मा होती. आत्मा स्वतः देखील म्हणेल - मी सतयुगामध्ये सतोप्रधान अथवा खरे सोने होते. सोने नाही आहे, हे एक उदाहरण दिले जाते. माझी आत्मा पवित्र होती, गोल्डन एज्ड होती. आता तर म्हणते इमप्युर (अपवित्र) आहे. दुनियावाले हे जाणत नाहीत. तुम्हाला तर श्रीमत मिळते. तुम्ही आता जाणता आपली आत्मा सतोप्रधान होती, आता तमोप्रधान बनली आहे. प्रत्येक वस्तूचे असेच होते. बालक, युवा, वृद्ध… प्रत्येक वस्तू नवीन पासून जुनी जरूर होते. दुनिया देखील पहिली गोल्डन एज्ड सतोप्रधान होती मग तमोप्रधान आयरन एज्ड आहे, तेव्हाच तर दुःखी आहे. सतोप्रधान अर्थात सुधारलेली, तमोप्रधान अर्थात बिघडलेली. गाण्यामध्ये देखील म्हणतात - बिगड़ी को बनाने वाले… जुनी दुनिया बिघडलेली आहे कारण रावण राज्य आहे आणि सर्वजण पतित आहेत. सतयुगामध्ये सर्वजण पावन होते, त्याला - न्यू वाइसलेस वर्ल्ड (नवीन निर्विकारी दुनिया) म्हटले जाते. हे आहे - ओल्ड विशश वर्ल्ड (जुनी विकारी दुनिया). आता कलियुग आइरन एज्ड आहे. या सर्व गोष्टी काही स्कूल, कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाहीत. भगवान येऊन शिकवत आहेत आणि राजयोग शिकवत आहेत. गीतेमध्ये लिहिलेले आहे - ‘भगवानुवाच - श्रीमत भगवत गीता’. श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ, उच्च ते उच्च भगवान आहेत. त्यांचे अचूक नाव ‘शिव’ आहे. ‘रुद्र जयंती’ अथवा ‘रुद्र रात्री’ म्हटलेले कधीही ऐकले नसेल. ‘शिवरात्री’ म्हणतात. शिव तर निराकार आहेत. आता निराकाराची रात्री अथवा जयंती कशी साजरी करावी. श्रीकृष्णाची जयंती साजरी करणे तर योग्य आहे. अमक्याचा मुलगा आहे, त्याची तिथी-तारीख दाखवतात. ‘शिवा’ बद्दल तर कोणीही जाणत नाहीत की, केव्हा जन्म झाला, हे तर माहित पाहिजे ना. आता तुम्हाला समजले आहे की, श्रीकृष्णाने सतयुगाच्या सुरुवातीला कसा जन्म घेतला. तुम्ही म्हणाल - त्यांना तर ५ हजार वर्षे झाली. ते (इतर धर्माचे) देखील म्हणतात की, क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी भारत पॅराडाइज होता. इस्लामींच्या अगोदर चंद्रवंशी, त्यांच्या अगोदर सूर्यवंशी होते. शास्त्रांमध्ये सतयुगाला लाखो वर्षे दिली गेली आहेत. गीता आहे मुख्य. गीतेद्वारेच देवी-देवता धर्म स्थापन झाला. तो सतयुग-त्रेतापर्यंत चालला अर्थात गीता धर्म शास्त्राद्वारेच आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन झाला. तो सतयुग-त्रेता पर्यंत चालला अर्थात गीता धर्म शास्त्राद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना परमपिता परमात्म्याने केली. त्याच्या नंतर अर्धा कल्प ना कोणते शास्त्र बनले, ना कोणता धर्म स्थापक झाला. बाबांनी येऊन ब्राह्मणांना देवता, क्षत्रिय बनविले. अर्थात बाबा ३ धर्म स्थापन करतात. हा आहे लीप धर्म. याचा कालावधी फार थोडा असतो. तर सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता भगवंताने गायलेली आहे. बाबा पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. जन्म आहे, परंतु बाबा म्हणतात - मी गर्भामधून जन्म घेत नाही. माझे संगोपन होत नाही. सतयुगामध्ये देखील जी मुले असतात ती गर्भ महालामध्ये राहतात. रावण राज्यामध्ये गर्भ-जेलमध्ये यावे लागते. पाप जेलमध्ये भोगले जाते. गर्भामध्ये वचन देतात - ‘आम्ही पाप करणार नाही’, परंतु ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. गर्भातून बाहेर आल्या नंतर पुन्हा पाप करण्यास सुरुवात करतात. तिथले तिथेच राहिले… इथे देखील खूप प्रतिज्ञा करतात - आम्ही पाप करणार नाही. एकमेकांवर काम कटारी चालवणार नाही कारण हा विकार आदि-मध्य-अंत दुःख देतो. सतयुगामध्ये विषच (विकारच) नाहीये. तर मनुष्य आदि-मध्य-अंत २१ जन्म दुःख भोगत नाहीत कारण राम राज्य आहे. त्याची स्थापना आता बाबा पुन्हा करत आहेत. संगमावरच स्थापना होईल ना. जे कोणी धर्म स्थापन करण्याकरिता येतात त्यांनी कोणतेही पाप करायचे नाहीये. अर्धा काळ आहेत पुण्य-आत्मा, नंतर मग अर्ध्या कालावधी नंतर पाप-आत्मा बनतात. तुम्ही सतयुग-त्रेतामध्ये पुण्य आत्मा असता, नंतर मग पाप-आत्मा बनता. सतोप्रधान आत्मा जेव्हा वरून येते तर ती लगेच सजा भोगू शकत नाही. क्राइस्टची आत्मा धर्म स्थापना करण्याकरिता आली, तिला कोणती सजा मिळू शकत नाही. म्हणतात की, क्राईस्टला क्रॉसवर चढवले परंतु त्यांच्या आत्म्याने कोणते विकर्म इत्यादी केलेलेच नाही आहे. ते ज्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यांना दुःख होते. ते सहन करतात. ज्याप्रमाणे यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बाबा येतात, ते तर आहेतच सतोप्रधान. कोणतेही दुःख, त्रास यांच्या आत्म्याला होतो, शिवबाबांना होत नाही. ते तर सदैव सुख-शांतीमध्ये राहतात. सदा सतोप्रधान आहेत, परंतु येतात तर जुन्या शरीरामध्येच ना. जसे क्राइस्टच्या आत्म्याने ज्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला त्या शरीराला दुःख होऊ शकते, क्राईस्टची आत्मा दुःख भोगू शकत नाही कारण सतो, रजो, तमो मध्ये येते. नवीन-नवीन आत्मे तर येतातच ना. त्यांना जरूर पहिले सुख उपभोगावे लागेल, दुःख भोगू शकत नाहीत. कायदा असे सांगत नाही. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बाबा बसले आहेत कोणताही त्रास यांना होतो शिवबाबांना नाही. परंतु या गोष्टी तुम्ही जाणता इतर कोणालाही ठाऊक नाही आहेत.

ही सर्व रहस्ये आता बाबा बसून समजावून सांगत आहेत. या सहज राजयोगाद्वारेच स्थापना झाली होती, आणि मग भक्तिमार्गामध्ये याच गोष्टी गायल्या जातात. या संगमावर जे काही होते, तेच पुढे मग गायले जाते. भक्तीमार्ग सुरू होतो तेव्हा मग शिवबाबांची पूजा करण्यास सुरूवात होते. सर्वप्रथम भक्ती कोण करतात, तेच लक्ष्मी-नारायण जेव्हा राज्य करत होते तेव्हा पूज्य होते, मग वाम मार्गामध्ये येतात तेव्हा मग पूज्य पासून पुजारी बनतात. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्हा मुलांना सर्वात पहिले हे बुद्धीमध्ये आले पाहिजे की निराकार परमपिता परमात्मा यांच्या द्वारे आम्हाला शिकवत आहेत. इतर कोणत्याच ठिकाणी साऱ्या दुनियेमध्ये असे होऊ शकत नाही, जिथे असे सांगत असतील. बाबाच येऊन भारताला पुन्हा स्वर्गाचा वारसा देत आहेत. त्रिमूर्तीच्या चित्राखाली लिहिलेले आहे - डीटी वर्ल्ड सावरेंटी इज युवर गॉड फादरली बर्थ राईट (दैवी दुनियेचे साम्राज्य हा तुमचा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे). शिवबाबा येऊन तुम्हा मुलांना स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देत आहेत, लायक बनवत आहेत. तुम्ही जाणता बाबा आपल्याला लायक बनवत आहेत. तुम्ही जाणता बाबा आम्हाला लायक बनवत आहेत, आम्ही पतित होतो ना. पावन बनल्या नंतर मग हे शरीर राहणार नाही. रावणाद्वारे आपण पतित बनलो आहोत आता पुन्हा परमपिता परमात्मा पावन बनवून पावन दुनियेचे मालक बनवत आहेत. तेच ज्ञानाचा सागर पतित-पावन आहेत. ते निराकार बाबा आम्हाला शिकवत आहेत. सगळेच काही एकत्र शिकू शकत नाहीत. तुम्ही थोडेजण सन्मुख बसले आहात बाकी सर्व मुले जाणतात की, आता शिवबाबा ब्रह्माच्या तनामध्ये बसून सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकवत असतील. ती मुरली लेखी स्वरूपामध्ये आपल्याकडे येईल. इतर सत्संगांमध्ये असे थोडेच समजतील. आज-काल टेपरेकॉर्डर देखील निघाले आहेत म्हणून त्यात टेप करून पाठवतात. ते (दुनियावाले) म्हणतील अमक्या नावाचे गुरु सांगत आहेत, बुद्धीमध्ये मनुष्यच असतो. इथे तर तशी गोष्टच नाही आहे. इथे तर निराकार बाबा नॉलेजफुल आहेत. मनुष्याला नॉलेजफुल म्हटले जात नाही. गातात - गॉडफादर इज नॉलेजफुल, पीसफुल, ब्लिसफुल तर त्याचा वारसा देखील पाहिजे ना. त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते मुलांना मिळाले पाहिजेत, आता मिळत आहेत. गुणांची धारणा करून आपण असे लक्ष्मी-नारायण बनत आहोत. सर्वच काही राजा-राणी बनणार नाहीत. गायले जाते - राजा-राणी वजीर… तिथे वजीर सुद्धा नसतो. महाराजा-महाराणीमध्ये पॉवर असते. जेव्हा विकारी बनतात तेव्हा वजीर इत्यादी असतात. पूर्वी मिनिस्टर इत्यादी सुद्धा नव्हते. तिथे तर एका राजा-राणीचे राज्य चालत होते. त्यांना वजीराची काय गरज, सल्ला घेण्याची गरजच नाही, जेव्हा की स्वतःच मालक आहेत. हा आहे इतिहास-भूगोल. परंतु सर्वात पहिले तर उठता-बसता हे बुद्धीमध्ये आले पाहिजे की आपल्याला बाबा शिकवत आहेत, योग शिकवत आहेत. आठवणीच्या यात्रेवर राहायचे आहे. आता नाटक पूर्ण होत आहे, आपण एकदम पतित बनलो आहोत कारण विकारामध्ये जातो म्हणून पाप आत्मा म्हटले जाते. सतयुगामध्ये पाप-आत्मे नसतात. तिथे आहेत पुण्य-आत्मे. ते आहे प्रारब्ध, ज्याच्यासाठी तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात. तुमची आहे आठवणीची यात्रा, ज्याला भारताचा योग म्हटले जाते. परंतु अर्थ काही समजत नाहीत; योग अर्थात आठवण. ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. मग हे शरीर सोडून निघून जाल, त्याला स्वीट होम म्हटले जाते. आत्मा म्हणते - ‘मी त्या शांतीधामची रहिवासी आहे. तेथून मी अशरीरी आले आहे, इथे पार्ट बजावण्याकरिता शरीर घेतले आहे’. हे देखील समजावून सांगितले आहे की, माया ५ विकारांना म्हटले जाते. ही ५ भूते आहेत, काम विकाराचे भूत, क्रोधाचे भूत, एक नंबरचे आहे देह-अभिमानाचे भूत.

बाबा समजावून सांगत आहेत - सतयुगामध्ये हे विकार असत नाहीत, त्याला निर्विकारी दुनिया म्हटले जाते. विकारी दुनियेला निर्विकारी बनविणे, हे तर बाबांचेच कार्य आहे. त्यांनाच सर्वशक्तिमान ज्ञानाचा सागर, पतित-पावन म्हटले जाते. यावेळी सर्व भ्रष्टाचारातून जन्म घेतात. सतयुगामध्येच निर्विकारी दुनिया आहे. बाबा म्हणतात - आता तुम्हाला विशश पासून वाईसलेस (विकारी पासून निर्विकारी) बनायचे आहे. म्हणतात याच्याशिवाय मुले कशी जन्माला येतील. बाबा समजावून सांगत आहेत - आता हा तुमचा अंतिम जन्म आहे. मृत्यूलोकच नष्ट होणार आहे त्यानंतर मग विकारी लोकच असणार नाहीत; म्हणून बाबांकडे पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे. म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमच्याकडून वारसा अवश्य घेणार. ते (दुनियावाले) खोटी प्रतिज्ञा करतात. गॉड ज्यांच्यासाठी प्रतिज्ञा करतात, त्यांना तर जाणत नाहीत. ते कधी, कसे येतात, त्यांचे नाव-रूप-देश-काळ काय आहे, काहीच जाणत नाहीत. बाबा येऊन आपला परिचय देतात. आता तुम्हाला परिचय मिळत आहे. संपूर्ण दुनियेमध्ये कोणीही गॉड फादरला जाणत नाहीत. बोलावतात देखील, पूजा देखील करतात परंतु ऑक्युपेशनला जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता - परमपिता परमात्मा आपले पिता, टीचर, सदगुरु आहेत. हा बाबांनी स्वतः परिचय दिला आहे की, ‘मी तुमचा पिता आहे. मी या शरीरामध्ये प्रवेश केला आहे’. प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना होते. कशाची? ब्राह्मणांची. मग तुम्ही ब्राह्मण शिकून देवता बनता. मी येऊन तुम्हाला शूद्रापासून ब्राह्मण बनवतो. बाबा म्हणतात मी येतोच कल्पाच्या संगमयुगावर. कल्प ५ हजार वर्षांचे आहे. हे सृष्टी चक्र तर फिरतच राहते. मी येतो, जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता. जुन्या धर्मांचा विनाश करविण्याकरिता. नंतर मग मी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो. मुलांना शिकवतो आणि मग तुम्ही शिकून २१ जन्मांकरिता मनुष्यापासून देवता बनता. देवता तर सूर्यवंशी, चंद्रवंशी, प्रजा सर्व आहेत. बाकी पुरुषार्थानुसार उच्च पद प्राप्त करतील. आता जे जितका पुरुषार्थ करतील, तसाच कल्प-कल्प चालेल. समजतात, आम्ही कल्प-कल्प असाच पुरुषार्थ करतो, तेच पद जाऊन प्राप्त करणार. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आपल्याला निराकार भगवान शिकवत आहेत. त्यांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. आठवण केल्याशिवाय विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत. लोकांना देखील ठाऊक नाहीये की आपण किती जन्म घेतो. शास्त्रांमध्ये कोणीतरी थाप मारली आहे की, ८४ लाख जन्म असतात. आता तुम्ही जाणता ८४ जन्म आहेत. हा अंतिम जन्म आहे, नंतर मग आपल्याला स्वर्गामध्ये जायचे आहे. पहिले मूलवतनमध्ये जाऊन मग स्वर्गामध्ये येणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांकडे जी पवित्र बनण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यावर मजबूत राहायचे आहे. काम, क्रोध, इत्यादी भूतांवर विजय अवश्य प्राप्त करायचा आहे.

२) चालता-फिरता प्रत्येक कर्म करत असताना शिकविणाऱ्या बाबांची आठवण करायची आहे. आता नाटक पूर्ण होत आहे त्यामुळे या अंतिम जन्मामध्ये जरूर पवित्र बनायचे आहे.

वरदान:-
सर्व खजिन्यांनी भरपूर बनून आपल्या चेहऱ्या द्वारे सेवा करणारे सच्चे सेवाधारी भव

जी मुले सर्व खजिन्यांनी सदैव संपन्न अथवा भरपूर असतात त्यांच्या नयनांद्वारे अथवा मस्तकाद्वारे ईश्वरीय नशा दिसून येतो. त्यांचा चेहराच सेवा करतो. ज्यांच्याकडे कमी अथवा जास्त जेवढे जमा असते तर ते देखील त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते. जसे कोणी उच्च कुळाचा असतो तर त्याच्या चेहऱ्यावरून ते तेज आणि तो नशा दिसून येतो. तसा तुमचा चेहरा प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्माला स्पष्ट करेल तेव्हाच म्हणणार सच्चे सेवाधारी.

बोधवाक्य:-
समय आणि संकल्पाच्या खजिन्याची बचत करून जमेचे खाते वाढवा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

जेव्हा एकमेकांना गोड खाऊ घालता त्यामुळे थोड्या वेळाकरिता तोंड गोड होते परंतु तुम्ही स्वतःच गोड बना, मुखामध्ये नेहमीच मधुर शब्द असावेत. जसे गोड खाल्ल्याने आणि खाऊ घातल्याने खुश होता, तसे मधुर शब्द स्वतःला देखील खुश करतात, आणि इतरांना देखील खुश करतात. यामध्ये नेहमी सर्वांचे तोंड गोड करत रहा; नेहमी गोड दृष्टी, गोड बोलणे, गोड कर्म असावे.