18-05-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.03.2005  ओम शान्ति   मधुबन


“मास्टर ज्ञान सूर्य बनून अनुभूतीची किरणे पसरवा, विधाता बना, तपस्वी बना”


आज बापदादा आपल्या चोहो बाजूच्या होलीहंस मुलांसोबत होळी साजरी करण्यासाठी आले आहेत. प्रेमाच्या धाग्याने बांधलेली मुले देखील होळी साजरी करण्यासाठी पोहोचली आहेत. मिलन साजरे करण्यासाठी किती प्रेमाने पोहोचली आहेत. बापदादा सर्व मुलांच्या भाग्याला पाहत होते - किती मोठे भाग्य, जितके होलीएस्ट आहेत तितकेच हाईएस्ट देखील आहेत. साऱ्या कल्पामध्ये बघा तुम्हा सर्वांच्या भाग्यापेक्षा मोठे भाग्य दुसऱ्या कोणाचे नाहीये. जाणता ना आपल्या भाग्याला? वर्तमान वेळी देखील परमात्म पालना, परमात्म शिक्षण आणि परमात्म वरदानांनी पालना होत आहे. भविष्यामध्ये सुद्धा विश्वाचे राज्य अधिकारी बनता. बनायचेच आहे, निश्चित आहे, निश्चयच आहे. नंतर देखील जेव्हा पूज्य बनता तर तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांसारखी विधिपूर्वक पूजा दुसऱ्या कोणाचीही होत नाही. तर वर्तमान, भविष्य आणि पूज्य स्वरूपामध्ये हाईएस्ट अर्थात उच्च ते उच्च आहात. तुमची जड चित्रे जी आहेत त्यांची देखील प्रत्येक कर्माची पूजा होते. अनेक धर्मपिता, महान-आत्मे होऊन गेले आहेत परंतु अशी विधीपूर्वक पूजा तुम्हा उच्च ते उच्च परमात्म मुलांची होते कारण यावेळी प्रत्येक कर्मामध्ये कर्मयोगी बनून कर्म करण्याच्या विधीचे फळ म्हणून पूजा देखील विधिपूर्वक होते. या संगम समयाच्या पुरुषार्थाचे प्रारब्ध मिळते. तर उच्च ते उच्च भगवान तुम्हा मुलांना देखील उच्च ते उच्च प्राप्ती करवून देत आहेत.

होली अर्थात पवित्रता, होलीएस्ट देखील आहात तर हाईएस्ट देखील आहात. या ब्राह्मण जीवनाचे फाउंडेशनच पवित्रता आहे. संकल्पमात्र सुद्धा अपवित्रता श्रेष्ठ बनू देत नाही. पवित्रताच सुख, शांतीची जननी आहे. पवित्रता सर्व प्राप्तींची चावी आहे, म्हणून तुम्हा सर्वांचे स्लोगन हेच आहे - “पवित्र बना, योगी बना”. होळी देखील जी यादगार आहे, त्यामध्ये सुद्धा पहा अगोदर पेटवतात नंतर साजरी करतात. पेटवल्या शिवाय साजरी करत नाहीत. अपवित्रतेला जाळणे, योगाच्या अग्नीद्वारे अपवित्रतेला जाळता, त्याचे यादगार ते (दुनियावाले) आगीमध्ये वस्तू जाळतात आणि जाळल्यानंतर जेव्हा पवित्र बनते तर आनंदाने साजरी करतात. पवित्र बनण्याचे यादगार मिलन साजरे करतात कारण तुम्ही सर्वजण जेव्हा अपवित्रतेला जाळता, परमात्म संगाच्या रंगामध्ये लाल होता तेव्हा सर्व आत्म्यांच्या प्रति शुभ भावना, शुभ कामनेचे मिलन साजरे करता. याचे यादगार मंगल मिलन साजरे करतात. म्हणून बापदादा सर्व मुलांना हीच स्मृती देत आहेत की, प्रत्येकाकडून सदैव आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद द्या. आपल्या आशीर्वादांच्या शुभ भावनेद्वारे मंगल मिलन साजरे करा कारण जर कोणी शापसुद्धा देत असेल, पण तो तर अपवित्रतेमुळे परवश आहे; परंतु जर तुम्ही शापाला मनामध्ये ठेवले तर तुम्ही आनंदी रहाल का? सुखात रहाल का? की व्यर्थ संकल्पांच्या ‘का, काय, कसे, कोण…’ अशा दुःखाचा अनुभव करता? शाप घेणे अर्थात स्वतःला देखील दुःख आणि अशांतीचा अनुभव करायला लावणे. जी बापदादांची श्रीमत आहे - ‘सुख द्या आणि सुख घ्या’, त्या श्रीमताचे उल्लंघन होते. तर आता सर्व मुले आशीर्वाद घेणे आणि आशीर्वाद देणे शिकला आहात ना! शिकलात का?

प्रतिज्ञा आणि दृढता, दृढतेने प्रतिज्ञा करा - सुख द्यायचे आहे आणि सुख घ्यायचे आहे. आशीर्वाद द्यायचे आहेत, आशीर्वाद घ्यायचे आहेत. आहे प्रतिज्ञा? हिंमत आहे? ज्यांच्यामध्ये हिंमत आहे की, आजपासून दृढतेचा संकल्प करतो - आशीर्वाद घेणार, आशीर्वाद देणार, त्यांनी हात वर करा. पक्के? पक्के? कच्चे होऊ नका. कच्चे बनलात ना - तर कच्च्या फळाला खूप पक्षी खातात. दृढता सफलतेची चावी आहे. सर्वांकडे चावी आहे का? आहे चावी? चावी नेहमी तुमच्याकडे असते, माया चोरी तर करत नाही ना? तिचे देखील चावीवर प्रेम आहे. कायम संकल्प करत असताना हा संकल्प इमर्ज करा, मर्ज नाही, इमर्ज. इमर्ज करा मला करायचेच आहे. बनायचेच आहे. होणारच आहे. झालेलेच आहे. याला म्हटले जाते निश्चय-बुद्धी, विजयन्ती. विजयाचा ड्रामा बनलेलाच आहे. फक्त रिपीट करायचा आहे. पूर्वनियोजित ड्रामा आहे. तयार बनलेला आहे, रिपीट करून बनवायचा आहे. काही अवघड आहे का? कधी-कधी अवघड वाटते! अवघड का वाटते? आपले आपणच सोप्याला अवघड करून टाकता. छोटीशी चूक करता - ठाऊक आहे कोणती चूक करता ते? त्यावेळी बापदादांना मुलांविषयी खूप दया कसे म्हणावे, प्रेम वाटते. प्रेम का वाटते? एका बाजूला तर म्हणता की बाबा आमच्यासोबत कंबाइंड आहेत. सोबत नाही तर कंबाइंड आहेत. तर कंबाइंड आहेत का? डबल फॉरेनर्स बाबा कंबाइंड आहेत? मागे बसलेले, कंबाइंड आहेत? गॅलरीवाले कंबाइंड आहेत?

अच्छा - आज तर बापदादांना समाचार मिळाला की मधुबन निवासी पांडव भवन, ज्ञान सरोवर आणि इथले देखील दुसऱ्या हॉलमध्ये ऐकत आहेत. तर त्यांना सुद्धा बापदादा विचारत आहेत की, बापदादा कंबाइंड आहेत का? हात वर करत आहेत. जेव्हा सर्व शक्तिवान बापदादा कंबाइंड आहेत तर मग एकटे का होता? तुम्ही कमजोर जरी असलात तरीही बापदादा तर सर्वशक्तिवान आहेत ना! एकटे राहता म्हणूनच कमजोर बनता. कंबाइंड रूपात रहा. बापदादा प्रत्येक मुलाला प्रत्येक क्षणी सहयोग देत असतात. शिवबाबा परमधाम वरून कशाला आले आहेत? कशासाठी आले आहेत? मुलांचे सहयोगी बनण्यासाठी आले आहेत. बघा ब्रह्मा बाबा देखील व्यक्त मधून अव्यक्त झाले कशासाठी? साकार शरीरापेक्षा अव्यक्त रूपाने जास्तीतजास्त सहयोग देऊ शकतात. मग जर बापदादा सहयोग देण्यासाठी ऑफर करत आहेत तर एकटे का होता? मेहनत का करू लागता? ६३ जन्म तर मेहनत केली आहे ना! तर ते मेहनतीचे संस्कार आता देखील आपल्याकडे आकर्षित करत राहतात का? प्रेमामध्ये बुडून रहा, प्रेमामध्ये लीन होऊन रहा. प्रेम मेहनती पासून मुक्त करणारे आहे. मेहनत चांगली वाटते का? का सवयीमुळे अगतिक बनता. सहज योगी आहात, बापदादा विशेष मुलांसाठी परमधामवरून सौगत घेऊन आले आहेत, माहीत आहे का कोणती सौगात आणली आहे? तळहातावर स्वर्ग घेऊन आले आहेत. तुमचे चित्र देखील आहे ना. मुलांसाठी राज्य भाग्य आणले आहे, त्यामुळे बापदादांना मुलांनी मेहनत केलेली आवडत नाही.

बापदादा प्रत्येक मुलाला मेहनत मुक्त, प्रेमामध्ये मग्न असलेले पाहू इच्छितात. तर मेहनत अथवा मायेच्या युद्धापासून मुक्त बनण्याची आज संकल्पाद्वारे होळी पेटवणार? पेटवणार का? जाळणे अर्थात नामोनिशाणही नाहीसे होणे. कोणतीही वस्तू जेव्हा जाळतात तेव्हा नामोनिशाण नष्ट होते ना! तर अशी होळी साजरी करणार? हात तर हलवत आहेत. बापदादा हात हलवताना पाहून आनंदित होत आहेत. परंतु… ‘परंतु’ आहे? परंतु बोलू का की नको? मनाचा हात हलवा. हा स्थूल हात हलवणे तर खूप सोपे आहे. जर मनाने मान्य केले की करायचेच आहे, तर झाल्यातच जमा आहे. नवीन देखील पुष्कळ आले आहेत. जे पहिल्यांदा बाबा-मिलन साजरे करण्यासाठी आले आहेत, त्यांनी हात वर करा. डबल फॉरेनर्स सुद्धा आहेत.

आता जे पहिल्यांदा आले आहेत, बापदादा विशेष त्यांना आपले भाग्य बनवल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत, परंतु या शुभेच्छा लक्षात ठेवा आणि आता सर्वांना लास्ट सो फास्ट जाण्याचा चान्स आहे, कारण फायनल रिझल्ट आऊट झालेला नाहीये. तर लास्टला येणारे देखील, अगोदर आलेल्यांपेक्षा शेवटी आला आहात ना, तर लास्ट वाले लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो फर्स्ट येऊ शकतात. सूट आहे, जाऊ शकता. तर कायम हे ध्येय लक्षात ठेवा की मला अर्थात मज आत्म्याला फास्ट आणि फर्स्ट क्लासमध्ये यायचेच आहे. हां, व्ही.आय.पी. भरपूर आले आहेत, टायटल व्ही.आय.पी. चे आहे. जे व्ही.आय.पी. आले आहेत त्यांनी हात उंच करा. (भारतातील जवळजवळ १५० पाहुणे बापदादांसमोर बसले आहेत) वेलकम. आपल्या घरी आल्याबद्दल वेलकम, भले पधारे. आता तर परिचयासाठी व्ही.आय.पी. म्हटले जाते परंतु आता व्ही.आय.पी. पासून व्ही.व्ही.आय.पी. बनायचे आहे. आता बघा, देवता तुमची जड चित्रे व्ही.व्ही.व्ही.आय.पी. आहेत तर तुम्हाला देखील पूर्वजांसारखे बनायचेच आहे. बापदादा मुलांना पाहून खुश होतात. नात्यामध्ये आलात. जे व्ही.आय.पी. आले आहेत ते उठा. बसून-बसून थकला सुद्धा असाल, थोडे उठा. अच्छा.

वर्तमान समयी बापदादा वारंवार दोन गोष्टींवर लक्ष वेधून घेत आहेत - एक आहे - ‘स्टॉप’, बिंदू लावा, पॉईंट लावा. दुसरे - ‘स्टॉक’ जमा करा. दोन्ही आवश्यक आहेत. तीन खजिने विशेष जमा करा - एक आपल्या पुरुषार्थाचे प्रारब्ध अर्थात प्रत्यक्ष फळ, ते जमा करा. दुसरे - सदैव संतुष्ट रहा, संतुष्ट करा. फक्त रहायचे नाही, करायचे देखील आहे. त्याच्या फलस्वरूप आशीर्वाद जमा करा. आशीर्वादांचे खाते कधी-कधी काही मुले जमा करतात परंतु चालता-चालता कोणत्यातरी छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये गोंधळून, हिंमतहीन होऊन जमा झालेल्या खजिन्याला देखील बिघडवून टाकतात. तर आशीर्वादांचे खाते सुद्धा जमा असावे. त्याची विधी आहे संतुष्ट रहाणे, संतुष्ट करणे. तिसरे - सेवेद्वारे सेवेचे फळ जमा करणे ` करणे आणि सेवेमध्ये देखील विशेष निमित्त भाव, निर्मान भाव, निर्मल वाणी. बेहदची सेवा. माझे नाही, बाबा. बाबा करावनहार मज करनहार कडून सेवा करवून घेत आहेत, ही आहे बेहदची सेवा. ही तिन्ही खाती चेक करा - तिन्ही खाती जमा आहेत का? ‘माझे’पणाचा अभाव असावा. इच्छा मात्रम् अविद्या. विचार करतात या वर्षामध्ये काय करायचे आहे? सीझन संपत आला आहे, आता ६ महिने काय करायचे आहे? तर एक म्हणजे खाते जमा करा, व्यवस्थित चेक करा. कुठे मनाच्या कोपऱ्यातसुद्धा हदची इच्छा तर नाही ना? ‘मी’ आणि ‘माझे’पणा तर नाही आहे ना? लेवता (घेणारे) तर नाही ना? विधाता बना, घेणारे नाही. ना नाव, ना मान, ना शान, काहीही घेणारे नाही; दाता, विधाता बना.

आता दुःख अतिशय वाढत आहे, वाढत राहील, म्हणून मास्टर सूर्य बनून अनुभूतीची किरणे पसरवा. जसा सूर्य एकाच वेळी किती प्राप्ती करून देतो, एकच प्राप्ती करून देत नाही. केवळ प्रकाश देत नाही, शक्ती सुद्धा देतो. अनेक प्रकारच्या प्राप्ती करून देतो. तसे तुम्ही सर्व या ६ महिन्यामध्ये ज्ञान सूर्य बनून सुखाची, खुशीची, शांतीची, सहयोगाची किरणे पसरवा. अनुभूती करवा. तुमच्या चेहऱ्याला बघताच दुःखाच्या लाटेमध्ये कमीत-कमी हास्य तरी येईल. तुमच्या दृष्टीने हिंमत येईल. तर हे अटेंशन द्यायचे आहे. विधाता बनायचे आहे, तपस्वी बनायचे आहे. अशी तपस्या करा जेणेकरून तपस्येची ज्वाळा काही ना काही अनुभूती करून देईल. फक्त वाणी ऐकवू नका, अनुभूती करवा. अनुभूती अमर असते. फक्त वाणी थोडा वेळ चांगली वाटते, कायम लक्षात रहात नाही, म्हणून अनुभवाची ऑथॉरिटी बनून अनुभव करवा. जे कोणी संबंध-संपर्कामध्ये येत आहेत त्यांना आपल्या सहयोगाने, बापदादांच्या कनेक्शनने हिंमत, उमंग-उत्साह द्या. जास्त मेहनत करायला लावू नका. ना तुम्ही मेहनत करायची आहे, ना इतरांना करायला लावायची आहे. निमित्त आहात ना! तर उमंग-उत्साहाचे असे व्हायब्रेशन बनवा ज्यामुळे गंभीर असणारा देखील उमंग-उत्साहामध्ये येईल. आनंदाने मन नाचू लागेल. तर ऐकलेत काय करायचे आहे? बाबा रिझल्ट बघणार की, कोणत्या स्थानाने (सेंटरने) किती आत्म्यांना दृढ बनविले, स्वतः दृढ बनले, किती आत्म्यांना दृढ बनविले? सर्वसामान्य पोतामेल बघणार नाहीत, कोणती चूक केली नाही, खोटे बोलला नाही, कोणते विकर्म केले नाही, परंतु किती आत्म्यांना उमंग-उत्साहामध्ये आणले, अनुभूती करवली, दृढतेची चावी दिली? ठीक आहे ना, करायचेच आहे ना. बापदादा देखील कशाला म्हणतील की, करणार का! नाही, करायचेच आहे. तुम्ही नाही करणार तर कोण करणार? मागाहून येणारे? तुम्हीच कल्प-कल्प बाबांद्वारे अधिकारी बनला होता, बनला आहात आणि प्रत्येक कल्पामध्ये बनणार. अशा दृढनिश्चयी मुलांचे संघटन बापदादांना बघायचेच आहे. ठीक आहे ना! हात वर करा, बनायचेच आहे, मनाचा हात वर करा. दृढ निश्चयाचा हात वर करा. हे तर सर्व पास झाले. पास झालात ना? अच्छा.

चोहो बाजूच्या दिलतख्तनशीन मुलांना, दूर बसून सुद्धा परमात्म प्रेमाचा अनुभव करणाऱ्या मुलांना, सदैव होली अर्थात पवित्रतेचे फाउंडेशन दृढ करणाऱ्या, स्वप्नमात्र सुद्धा अपवित्रतेच्या अंशा पासून सुद्धा दूर रहाणारे महावीर, महावीरणी असणाऱ्या मुलांना, सदैव प्रत्येक वेळी सर्व जमेचे खाते जमा करणाऱ्या संपन्न मुलांना, सदैव संतुष्टमणी बनून संतुष्ट राहणाऱ्या आणि संतुष्ट करणाऱ्या बाप समान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, आशीर्वाद आणि नमस्ते.

दादींसोबत संवाद:- दादी तर गुरु भाई आहेत ना, तर जवळ बसा. भाई नेहमी सोबत बसतात. छान आहे. बापदादा दररोज स्नेहाचे मालिश करतात. निमित्त आहेत ना! हे मालिश तुम्हाला चालवत आहे. छान आहे - तुम्हा सर्वांचे उदाहरण पाहून सर्वांना हिंमत येते. निमित्त दादींसारखे सेवेमध्ये, निमित्त भावामध्ये पुढे जायचे आहे. चांगले आहे, तुम्हा लोकांचा हा जो पक्का निश्चय आहे ना - करावनहार करवत आहे, चालवणारा चालवत आहे. हा निमित्त भाव सेवा करवत आहे. ‘मी’पणा आहे का? काहीतरी ‘मी’पणा येतो का? छान आहे. साऱ्या विश्वाच्या समोर निमित्त उदाहरण आहात ना. तर बापदादा सुद्धा सदैव विशेष प्रेम आणि आशीर्वाद देतच राहतात. अच्छा. पुष्कळ आले आहेत तर चांगले आहे ना! लास्ट टर्न फास्ट गेला आहे. अच्छा.

डबल विदेशी मुख्य टीचर्स बहिणींसोबत संवाद:- सर्व मिळून सर्वांची पालना करण्यासाठी निमित्त बनता हा खूप चांगला पार्ट बजावता. स्वतः देखील रिफ्रेश होता आणि दुसऱ्यांना देखील रिफ्रेश करता. छान प्रोग्राम बनवता. बापदादांना पसंत आहे. स्वतः रिफ्रेश व्हाल तेव्हा तर रिफ्रेश कराल. खूप छान. सर्वांनी रिफ्रेशमेंट चांगली केली. बापदादा खुश आहेत. खूप छान. ओम् शांती.

वरदान:-
नॉलेजफुल स्थिति द्वारे परिस्थितींना पार करणारे अंगद समान अचल-अडोल भव

रावण राज्यातील कोणतीही परिस्थिती आणि व्यक्ति जरासुद्धा संकल्प रुपामध्ये देखील हलवू शकणार नाही. असे ‘अचल-अडोल भव’चे वरदानी बना. कारण कोणतेही विघ्न खाली आणण्यासाठी नाही तर मजबूत बनविण्यासाठी येते. नॉलेजफुल कधीही पेपरला पाहून कन्फ्यूज होत नाहीत. माया कोणत्याही रुपामध्ये येऊ शकते - परंतु तुम्ही योगाग्नी जागृत ठेवा, नॉलेजफुल स्थितीमध्ये रहा तर सर्व विघ्ने स्वतः समाप्त होतील आणि तुम्ही अचल-अडोल स्थितीमध्ये स्थित रहाल.

सुविचार:-
शुद्ध संकल्पांचा खजिना जमा असेल तर व्यर्थ संकल्पांमध्ये वेळ जाणार नाही.

अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

प्युरिटीच्या पर्सनॅलिटीच्या आधारे ब्रह्मा बाबा आदि देव अथवा पहिले प्रिन्स बनले. तसे तुम्ही देखील फालो फादर करुन पहिल्या नंबरच्या पर्सनॅलिटीच्या लिस्टमध्ये या कारण की ब्राह्मण जन्माचे संस्कारच पवित्र आहेत. तुमची श्रेष्ठता अथवा महानताच पवित्रता आहे.

सूचना:- आज आंतरराष्ट्रीय योग दिवस महिन्याचा तिसरा रविवार आहे, संध्याकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत सर्व भाऊ-बहिणी संघटीत रूपामध्ये एकत्रीत होऊन प्रभु प्रेमामध्ये सामावण्याचा अनुभव करा. सदैव याच स्वमानामध्ये बसा की मी आत्मा सर्व प्राप्तींनी संपन्न सर्वश्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहे. प्रेमाचा सागर बाबांच्या प्रेमाची किरणे निघून मज आत्म्यामध्ये सामावत आहेत. तीच प्रेमाची व्हायब्रेशन्स चोहो बाजूंना वातावरणामध्ये पसरत आहेत.