18-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अतींद्रिय सुखाचा अनुभव करण्यासाठी नेहमी याच स्मृतीमध्ये राहा की, आम्ही कोणाची मुले आहोत, जर बाबांना विसरलात तर सुख नाहीसे होईल”

प्रश्न:-
बाबा भेटल्याचा स्थायी आनंद कोणत्या मुलांना होतो?

उत्तर:-
ज्या मुलांनी आपली सर्व नाती एकाशीच जोडलेली आहेत, जे एका बाबांच्याच आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करतात, कोणत्याही देहधाऱ्याची आठवण करत नाहीत त्यांनाच स्थायी आनंद होतो. जर देहधाऱ्याची आठवण असेल तर खूप रडावे लागेल. विश्वाचे मालक बनणारे कधीही रडत नाहीत.

गीत:-
बचपन के दिन भुला न देना…

ओम शांती।
बाबा म्हणतात - गोड मुलांनो, आपण बेहदच्या बाबांची मुले आहोत, हे विसरू नका. हे विसरलात तर स्वतःला रडवाल. छी-छी (घाणेरड्या) दुनियेमध्ये बुद्धी निघून जाईल. बाबांची आठवण राहिल्याने अतींद्रिय सुखाचा अनुभव होतो. ते सुख, बाबांना विसरल्यामुळे नाहीसे होईल. निरंतर आठवण राहिली पाहिजे की, आपण बाबांची मुले आहोत, नाहीतर स्वतःला रडवाल. सर्व भगवंताची मुले आहेत, सर्व म्हणतात - ‘ओ बाबा, ओ परमपिता परमात्मा रक्षण करा’. परंतु बाबांकडून रक्षण कधी होते - हे कोणालाही माहीत नाही. साधू-संत इत्यादी कोणीही जाणत नाहीत की बाबांकडून आपल्याला मुक्ती-जीवनमुक्ती कधी मिळणार आहे कारण भगवंतालाच कणा-कणात म्हटले आहे. आता तुम्ही मुलांनी बेहदच्या बाबांना ओळखले आहे. मोस्ट बिलवेड (अत्यंत प्रिय) बाबा आहेत, त्यांच्यापेक्षा प्रिय वस्तू दुसरी कोणतीही नसते. अशा बाबांना न ओळखणे ही खूप मोठी चूक आहे. शिवजयंती कशासाठी साजरी करतात, ते कोण आहेत? हे देखील कोणीही जाणत नाही. बाबा म्हणतात - तुम्ही किती बुद्धू बनला आहात. माया रावणाने तुम्हाला काय बनवले आहे! आता तुम्ही मुले जाणता की, ही आपली जन्मभूमी आहे. मी दर ५ हजार वर्षानंतर येतो. ते (दुनियावाले) मग म्हणतात ४० हजार वर्षानंतर जेव्हा हे कलियुग पूर्ण होईल तेव्हा येतील. चित्र देखील दाखवले जाते त्रिमूर्तीचे. ‘त्रिमूर्ती मार्ग’ असे नावही ठेवले आहे परंतु तीन मूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकर यांना कोणीही जाणत नाही. ब्रह्मा काय करून गेले? विष्णू आणि शंकर काय करतात, कुठे राहतात, काहीही जाणत नाहीत. पूर्णपणे घोर अंधारात आहेत. बाबा आहेत रचयिता. त्यांची ही रचना किती मोठी आहे. केवढे बेहदचे नाटक आहे. यामध्ये बेहदचे मनुष्य राहतात. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी जेव्हा सतयुग होते, भारतामध्ये जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा दुसरे कोणतेही राज्य नव्हते. भगवती - श्री लक्ष्मीला आणि भगवान - श्री नारायणाला म्हटले जाते. राम-सीतेला देखील भगवान - राम, भगवती - सीता असे म्हणतात. आता हे भगवान - नारायण, भगवती - लक्ष्मी हे आले कुठून? राज्य करून गेले आहेत. परंतु त्यांची जीवन कहाणी तर एकालाही माहीत नाही. फक्त गात राहतात - ‘हे भगवान दुःख हर्ता, सुख कर्ता’. परंतु हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही - ते दुःख हर्ता, सुख कर्ता कसे आहेत. सर्वांना कोणते सुख दिले? आणि सर्वांचे दुःख कधी हरण केले? काहीच जाणत नाहीत.

तुम्ही मुले आता इथे राजयोग शिकत आहात - भगवती लक्ष्मी, भगवान नारायण बनण्यासाठी. जाणता की, भगवती सीता, भगवान राम सुद्धा बनायचे आहे. ८ जन्म सतयुगामध्ये पूर्ण करून मग राम-सीतेच्या राज्यामध्ये येणार आहेत. २१ जन्मांसाठी बेहदची राजाई तुम्ही इथे स्थापन करत आहात. तुम्ही भगवती-भगवान स्वर्गाचे मालक बनत आहात. स्वर्ग काही आकाशात नाहीये. हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. अगदीच तुच्छ-बुद्धी आहेत. म्हणतात - अमका स्वर्गवासी झाला. परंतु समजत काहीच नाहीत. अच्छा, ख्रिश्चन, बौद्ध सर्वजण हेवनमध्ये (स्वर्गात) जातील काय? ते तर नंतर येऊन आपला धर्म स्थापन करतात, तर मग ते स्वर्गात कसे काय येऊ शकतात? स्वर्ग कशाला म्हटले जाते, हे देखील त्यांना माहीत नाही. संन्यासी लोक म्हणतात - ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली. कोणी मग म्हणतात - निर्वाणधाम गेला. निर्वाण देखील एक लोक आहे ना. ते तर निवासस्थान आहे. ज्योत ज्योतीमध्ये लीन होण्याचा प्रश्नच नाही. आत्मा ज्योतीमध्ये जर विलीन झाली मग तर आत्माच नष्ट होईल. खेळच संपून जातो. या ड्रामातून कोणतीही आत्मा सुटू शकत नाही. कोणीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. कोणालाही गाण्याचा देखील अर्थ समजत नाही, जीवनमुक्तीचा अर्थ समजत नाही, आणि आत्मा-परमात्म्याचा अर्थ सुद्धा समजत नाही.

बाबा म्हणतात - तुमचा चेहरा तर मनुष्याचा आहे, जो या देवतांचाही होता. सतयुगाच्या सुरुवातीला देवता होते. त्यांचे २५०० वर्षे राज्य चालले. बाकी २५०० वर्षांची गोष्ट आहे, ज्यामध्ये बाकीचे सर्व धर्म येतात. ५ हजार वर्षांऐवजी मनुष्य म्हणतात - कल्पवृक्षाचे आयुर्मान लाखो वर्षांचे आहे. परंतु तुमची गोष्ट समजून घेण्यासाठी देखील ते येणार नाहीत. हां, येतीलही तेच, ज्यांनी कल्पापूर्वी येऊन समजून घेतले असेल. सर्वप्रथम तर हेच समजावून सांगायचे आहे की, एक आहे हदचा संन्यास, जो संन्यासी लोक घरदार सोडून जंगलामध्ये जाऊन राहतात, सुरुवातीला ते सतोप्रधान होते. मग आता तमोप्रधान बनले आहेत तर जंगलातून परत येऊन मोठ-मोठे बंगले बनवले आहेत. या संन्याशांनी देखील पवित्रतेच्या आधारावर भारताला जरूर थोपवून धरले आहे. भारताची सेवा केली आहे. हा संन्यास धर्म नसता तर भारत पूर्णपणे विकारांमध्ये जळून खाक झाला असता, पतित बनला असता. हा देखील ड्रामा बनलेला आहे. त्यांच्यामध्ये पूर्वी पवित्रतेची ताकद होती, ज्यामुळे भारताला आधार मिळाला. या देवतांचे जेव्हा राज्य होते तेव्हा भारत किती श्रीमंत होता. त्यांचे इतके मोठे-मोठे हिरे-माणकांचे महाल होते. ते सर्व कुठे गेले? सर्व खाली धरणीमध्ये गाडले गेले. म्हणतात - लंका आणि द्वारका समुद्रात बुडाल्या. आता काही अस्तित्वात नाहीत. सोन्याचे महाल इत्यादी सर्व होते ना. जर का मंदिरे इत्यादी ठिकाणी हिरे-माणके जडवू शकतात, तर तिथे काय असणार नाही! तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबा पुन्हा आलेले आहेत; म्हणतात - बाबांची आठवण करा. आठवण एकाचीच करायची आहे, ज्यांच्याद्वारे विकर्म विनाश होतात. परंतु ते विसरून जातात आणि देहधाऱ्याची आठवण येते. देहधाऱ्याच्या आठवणीने तर काहीच फायदा नाही. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. ‘अम्मा मरे तो भी हलूआ खाना…’ एका बाबांच्या आठवणीमध्येच कमाई आहे. आपण शिवबाबांची मुले आहोत, त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. यावेळी जर बाबांची आठवण केली नाहीत तर नंतर खूप पश्चाताप करावा लागेल, रडावे लागेल. विश्वाचे मालक बनणाऱ्यांना रडण्याची काय गरज आहे. तुम्ही बाबांना विसरता तेव्हाच माया थप्पड मारते; म्हणून बाबा वारंवार सांगत असतात की, बाबांची आणि वारशाची आठवण करा. अमरनाथने अमरपुरीमध्ये काही एकाच पार्वतीला बसून अमरकथा ऐकवली नसेल. जरूर खूप जण असतील. जे कोणी मनुष्यमात्र आहेत त्या सर्वांना बाबा समजावून सांगत आहेत की, आता पतित बनू नका, हा अंतिम जन्म पवित्र बना. तिथे स्वर्गामध्ये कोणतेही विकार नसतात. तिथे देखील जर विकार असते तर मग स्वर्ग आणि नरकामध्ये फरक तो काय राहिला? देवी-देवतांचा महिमा गातात - सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण... आहेत. भगवान येऊन सर्वांना भगवान-भगवतीच बनवतील, भगवंताशिवाय कोणीही बनवू शकत नाही. भगवान तर एकच आहेत. गायले देखील जाते - भगवान-भगवतीची राजधानी. यथा राजा-राणी तथा प्रजा देखील तशीच असेल. परंतु भगवान-भगवती म्हटले जात नाही म्हणून म्हटले जाते आदि सनातन देवी-देवता धर्म. हे कोणालाही माहीत नाही. यांच्या (ब्रह्माच्या) आत्म्याला देखील बाबा समजावून सांगतात. एक बाबांची, एक दादांची असे दोन आत्मे आहेत ना. एक आत्मा ८४ जन्म घेते, दुसरी आत्मा पुनर्जन्म रहित आहे. बाबा कधीही पुनर्जन्म घेत नाहीत. एकदाच येऊन साऱ्या विश्वाला पवित्र बनविण्याकरिता आम्हाला राजयोग शिकवतात. बाबा तुम्हाला सांगतात - मी यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) प्रवेश केला आहे. हे ८४ जन्म भोगून आले आहेत. आता यांच्या अनेक जन्मांतील हा अंतिम जन्म आहे. आता मी निराकार आहे तर येऊन मुलांना कसा काय राजयोग शिकवू? प्रेरणे द्वारे तर काहीही होऊ शकत नाही. श्रीकृष्ण भगवानुवाच तर होऊ शकत नाही. श्रीकृष्ण कसा काय येऊ शकतो? तो तर आहेच सतयुगाचा प्रिन्स, १६ कला संपूर्ण... मग त्रेतामध्ये असतात १४ कला संपूर्ण, मग श्रीकृष्णाला द्वापरमध्ये का घेऊन गेले आहेत? त्यांना तर आधीच आले पाहिजे. बाबा म्हणतात - पहिले, बाबांची आठवण करा. नाहीतर माया एकदम थप्पड मारेल. लाजाळूचे एक झाड असते, त्याला स्पर्श केला की ते कोमेजून जाते. तुमची देखील अशीच अवस्था होते, बाबांची आठवण केली नाहीत तर खलास. गाण्यातही ऐकले - ‘बचपन के दिन भुला न देना’. बाबांना विसरलात तर कुठे ना कुठे फटका बसेल. बाबा म्हणतात - तुम्ही माझी मुले आहात ना. हे शरीर तर विषातून (विकारातून) जन्माला आले आहे. ते यांचे लौकिक आई-वडील आहेत. हे (शिवबाबा) तर आहेत पारलौकिक पिता आणि यांना (ब्रह्मा बाबांना) मग अलौकिक पिता म्हटले जाते. हे (ब्रह्मा बाबा) हदचे होते, नंतर मग बेहदचे बनले. आता बघा ही लौकिक मुलगी (निर्मलशांता) बसली आहे. ही लौकिक सुद्धा आहे, अलौकिक सुद्धा आहे, आणि पारलौकिक सुद्धा आहे. बाकी शिवबाबांना तर भाऊ-बहीणी नाहीत. ना लौकिक, ना अलौकिक, ना पारलौकिक.

किती फरक आहे. एका बाबांचे बनणे काही मावशीचे घर नाही (सोपी गोष्ट नाही). अशा बाबांशी नाते जोडायचे आहे, वेळ लागतो. शिवबाबांच्या आठवणीत राहणे खूप मोठी मेहनत आहे. ५० वर्षांपासून राहणारे देखील कितीतरीजण संपूर्ण दिवसभरात शिवबाबांची आठवण सुद्धा करत नाहीत, असे देखील आहेत. बाकी सर्वांना विसरून एकाची आठवण करणे अतिशय मेहनतीचे काम आहे. कोणी एक टक्का आठवण करतात, कोणी दोन टक्के, कोणी अर्धा टक्कासुद्धा फार कष्टाने आठवण करतात. हे खूप मोठे ध्येय आहे. तर बाबा म्हणतात - बालपणाला विसरायचे नाही. बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळतो. तुम्ही जाणता की, आपण जिवंतपणी मरून बाबांचे येऊन बनलो आहोत - नवीन दुनियेमध्ये जाण्याकरिता. तर तुम्हाला स्थायी (कायमचे) आनंदात राहिले पाहिजे; ओहो! आपण डबल मुकुटधारी बनणार! मनुष्य हे थोडेच जाणतात की सतयुगामध्ये या देवतांना १६ कला संपूर्ण आणि १४ कला संपूर्ण का म्हणतात? काहीच जाणत नाहीत. ही भक्तिमार्गाची शास्त्रे इत्यादी पुन्हा बनतील. हे हठयोग, तीर्थयात्रा इत्यादी सर्व पुन्हा केल्या जातील. परंतु याने काय होईल? हेवनमध्ये जातील काय? नाही, खूप रिद्धी-सिद्धीने कामे करतात. रिद्धी-सिद्धीवाले भरपूर आहेत. हजारो माणसे त्यांच्या मागे लागलेली असतात. रिद्धी-सिद्धीने घड्याळे इत्यादी बऱ्याच वस्तू काढतात. हे थोडेच समजतात की हे सर्व अल्पकाळासाठी आहे. यामध्ये खूप मेहनत करावी लागते. हे रिद्धी-सिद्धी इत्यादी शिकण्याची देखील पुस्तके असतात. किती लाखो माणसे त्यांच्या मागे लागतात. तुम्ही मुले जाणता आम्हाला बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळत आहे. या डोळ्यांनी जे काही पाहता ते राहणार नाही. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही अशरीरी आला होता मग शरीरासोबत पार्ट बजावला. जर ८४ लाखांचा हिशोब सांगितला तर १२ महिने लागतील. असे असूच शकत नाही. ८४ जन्मांचा हिशोब सांगणे तर अगदी सोपे आहे. तुम्ही ८४ चे चक्र फिरत राहता. सूर्यवंशी असता तेव्हा चंद्रवंशी नसता. सूर्यवंशी घराणे पूर्ण झाले, नंतर मग चंद्रवंशी.... बनलात.

आता तुम्ही जाणता आपण आहोत ब्राह्मण वंशी मग देवता वंशी बनायचे आहे, त्यासाठी आपण शिकत आहोत. आणि मग शिडी खाली उतरता-उतरता वैश्य, शूद्र वंशी बनणार. आता आपल्या ८४ जन्मांची स्मृती आली आहे. या चक्राची देखील आठवण करावी लागेल. बाबांची आठवण केल्याने एव्हरहेल्दी , एव्हरवेल्दी बनाल. पापे नष्ट होतील. चक्राला जाणल्याने चक्रवर्ती बनाल. तुम्ही जाणता - ही जुनी दुनिया कब्रस्तान बनणार आहे. काहीही राहणार नाही. नष्ट होऊन जाईल. ‘राम गयो, रावण गयो…’ सतयुगामध्ये रामाचा किती छोटा परिवार असेल. आता रावणाचा किती मोठा परिवार आहे. मुले जाणतात की ही राजधानी स्थापन होत आहे. प्रत्येक गोष्टीत पहिला पुरुषार्थ करायचा असतो. बाबा पुरुषार्थ करवून घेतात - मुलांनो, माझी आठवण करा. ज्या बाबांकडून अथाह स्वर्गाची बादशाही मिळते, तुम्ही त्यांची आठवण करणार नाही काय? बाबा आठवण करून देतात की, तुम्ही स्वर्गाचे मालक होता. आता पुन्हा पुरुषार्थ करून स्वर्गाचे मालक बना. अच्छा !

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये लाजाळूचे झाड बनायचे नाही. ईश्वरीय बालपणाला विसरून खचून जायचे नाही. या डोळ्यांनी जे काही दिसते, ते पाहत असूनही पाहायचे नाही.

२) एका बाबांच्या आठवणीतच कमाई आहे त्यामुळे देहधाऱ्यांची आठवण करून रडायचे नाही. बाबांची आणि वारशाची आठवण करून विश्वाची बादशाही घ्यायची आहे.

वरदान:-
श्रेष्ठ मताच्या आधारे मायावी संगदोषापासून दूर राहणारे शक्ती स्वरूप भव

मुलांची एक तक्रार असते की, नातेवाईक ऐकत नाहीत, संगत चांगली नाही, म्हणून आम्ही शक्तिशाली बनू शकत नाही. परंतु श्रेष्ठ मताच्या आधारे ज्ञान स्वरूप, शक्ती स्वरूपाचे वरदानी बनून आपली स्थिती अचल बनवा. साक्षी होऊन प्रत्येकाचा पार्ट बघा. आपल्या सतोगुणी पार्टमध्ये स्थित राहा. सदैव बाबांच्या संगतीमध्ये राहा म्हणजे मग तमोगुणी आत्म्याच्या संगाच्या रंगाचा प्रभाव पडू शकणार नाही.

बोधवाक्य:-
कर्मयोगी तो आहे जो कर्मरूपी कल्पवृक्षाच्या फांदीवर बसून कर्म करत असतानाही उपराम स्थितीमध्ये राहील.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

जसे एखाद्याचे विशेष नेचर असते (विशेष स्वभाव असतो), त्या स्वभावाच्या अधीन होऊन इच्छा नसतानाही चालत राहतात. म्हणतात की, माझी इच्छा नाहीये परंतु हा माझा स्वभाव आहे. तसा तुम्हा मुलांचा सरळ स्वभाव असावा जेणेकरून सर्वांना अनुभव होईल की हे सहज योगी, स्वतः योगी आहेत. काय करू, कसा योग लावू… या गोष्टी समाप्त. आहोतच सदा सहयोगी अर्थात योगी. याच एका गोष्टीला नेचर आणि नॅचरल केल्याने (नैसर्गिक स्वभाव बनविल्याने) सर्व सब्जेक्टमध्ये परफेक्ट व्हाल.