18-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आपल्यावर आपणच दया करा, बाबा जी श्रीमत देतात त्यावर चालत रहा, बाबांची
श्रीमत आहे - मुलांनो, वेळ वाया घालवू नका, सुलटे कार्य करा”
प्रश्न:-
जी भाग्यवान
मुले आहेत, त्यांची मुख्य धारणा कोणती असेल?
उत्तर:-
भाग्यवान मुले पहाटे उठून बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करतील. बाबांसोबत गोड-गोड
गोष्टी करतील. कधीही स्वतःवर निष्ठूरपणा करणार नाहीत. ते पास विथ ऑनर होण्याचा
पुरुषार्थ करून स्वतःला राजाईच्या लायक बनवतील.
ओम शांती।
मुले बाबांच्या सन्मुख बसली आहेत तर जाणतात की आमचे बेहदचे बाबा आहेत आणि आम्हाला
बेहदचे सुख देण्यासाठी श्रीमत देत आहेत. त्यांच्यासाठी गायलेच जाते – दयाळू,
लिब्रेटर... खूप महिमा करतात. बाबा म्हणतात - फक्त महिमेचीच गोष्ट नाहीये. बाबांचे
तर कर्तव्यच आहे मुलांना मत देणे. बेहदचे बाबा सुद्धा मत देतात. उच्च ते उच्च बाबा
आहेत तर जरूर त्यांचे मत देखील उच्च ते उच्च असेल. मत घेणारी आत्मा आहे, चांगले अथवा
वाईट काम आत्माच करते. या वेळी दुनियेला मिळते रावणाचे मत. तुम्हा मुलांना मिळते
रामाचे मत. रावणाच्या मताने बेरहम होऊन उलटी कामे करतात. बाबा मत देतात सुलटे चांगले
कार्य करा. सर्वात चांगले कार्य आहे स्वतःवर दया करा. तुम्ही जाणता - आपण आत्मा
सतोप्रधान होतो, खूप सुखी होतो; मग रावणाचे मत मिळाल्याने तुम्ही तमोप्रधान बनला
आहात. आता पुन्हा बाबा मत देत आहेत की, एक तर बाबांच्या आठवणीमध्ये रहा. आता
स्वतःवर दया करा, हे मत देतात. बाबा दया करत नाहीत. बाबा तर श्रीमत देतात की,
असे-असे करा. आपल्यावर आपणच दया करा. स्वतःला आत्मा समजून आपल्या पतित-पावन बाबांची
आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. बाबा मत देतात, तुम्ही पावन कसे बनाल. बाबाच पतितांना
पावन बनविणारे आहेत. ते श्रीमत देतात. जर त्यांच्या मतावर चालत नाहीत तर स्वतःवरती
निष्ठूर होतात. बाबा श्रीमत देतात की ‘मुलांनो, वेळ वाया घालवू नका. हा पाठ पक्का
करा की, आपण आत्मा आहोत. शरीर निर्वाह अर्थ धंदा इत्यादी भले करा तरीही वेळ काढून
युक्ती रचा. काम करत असताना आत्म्याची बुद्धी बाबांकडे असली पाहिजे. जसे आशिक-माशुक
देखील काम तर करतात ना. दोघेही एकमेकांवर फिदा असतात. इथे असे नाहीये. तुम्ही
भक्तिमार्गामध्ये देखील आठवण करता. बरेच जण म्हणतात की, ‘कशी आठवण करावी? आत्म्याचे,
परमात्म्याचे रूप काय आहे, ज्याची आठवण करावी? कारण भक्तीमार्गामध्ये तर गायले जाते
की परमात्मा नावा-रूपापासून वेगळा आहे. परंतु असे नाहीये. म्हणतात देखील -
भृकुटीच्या मध्यभागी आत्मा एका ताऱ्या प्रमाणे आहे, तरीही मग का विचारतात की,
‘आत्मा काय आहे, तिला आम्ही पाहू शकत नाही’. ती तर आहेच जाणून घेण्यासारखी गोष्ट.
आत्म्याला जाणले जाते, परमात्म्याला देखील जाणले जाते. ती अति सूक्ष्म चीज आहे.
काजव्यापेक्षाही सूक्ष्म आहे. शरीरातून कशी निघून जाते, कळतही नाही. आत्मा आहे,
साक्षात्कार होतो. आत्म्याचा साक्षात्कार झाला तरी फायदा काय.(?) ती तर
ताऱ्याप्रमाणे सूक्ष्म आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. जशी आत्मा, तसे
परमात्मा देखील सोल (आत्मा) आहेत. परंतु परमात्म्याला म्हटले जाते सुप्रीम सोल. ते
जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाहीत. आत्म्याला सुप्रीम तेव्हा म्हटले जाईल जेव्हा
जन्म-मरण रहीत असेल. बाकी मुक्तिधाममध्ये तर सर्वांना पवित्र होऊन जायचे आहे.
त्यामध्ये देखील नंबरवार आहेत, ज्यांचा हिरो-हिरोईनचा पार्ट आहे. आत्मे नंबरवार तर
आहेत ना. नाटकामध्ये सुद्धा कोणी खूप पगारवाले, कोणी कमी पगारवाले असतात. मनुष्य
आत्म्यांमध्ये लक्ष्मी-नारायणाच्या आत्म्यांना सुप्रीम म्हणणार. भले पवित्र तर
सर्वच बनतात तरीही नंबरवार पार्ट आहे. कोणी महाराजा, कोणी दासी, कोणी प्रजा. तुम्ही
एक्टर्स आहात. जाणता इतके सर्व देवता नंबरवार आहेत. चांगला पुरुषार्थ कराल, उच्च
आत्मा बनाल, उच्च पद मिळवाल. तुम्हाला स्मृती आली आहे - आपण ८४ जन्म कसे घेतले. आता
बाबांकडे जायचे आहे. मुलांना याचा आनंद देखील आहे तर नशा देखील आहे. सर्वजण म्हणतात
- आम्ही नरापासून नारायण, विश्वाचे मालक बनणार. मग तर असा पुरुषार्थ करावा लागेल.
पुरुषार्थानुसार नंबरवार पद मिळवतात. सर्वांना नंबरवार पार्ट मिळालेला आहे. हा
ड्रामा पूर्वनियोजित आहे.
आता बाबा तुम्हाला
श्रेष्ठ मत देत आहेत. कसेही करून बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील, तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बना. पापांचे ओझे तर डोक्यावर खूप आहे. त्याला कसेही
करून इथे नष्ट करायचे आहे तेव्हाच आत्मा पवित्र बनेल. तमोप्रधान देखील तुम्ही आत्मा
बनला आहात तर सतोप्रधान देखील आत्म्यालाच बनायचे आहे. यावेळी जास्त पतित भारतच आहे.
हा खेळ आहेच मुळी भारतावर. बाकी ते तर (इतर धर्म स्थापक) फक्त धर्म स्थापन
करण्यासाठी येतात. पुनर्जन्म घेत-घेत मागाहून सर्व तमोप्रधान बनतात. स्वर्गाचे मालक
तुम्ही बनता. जाणता भारत खूप श्रेष्ठ देश होता. आता किती गरीब आहे, गरिबांनाच सर्व
मदत देतात. प्रत्येक गोष्टीची भीक मागतच राहतात. पूर्वी तर बरेच अन्न-धान्य इथूनच
जात होते. आता गरीब बनले आहे तर मग रिटर्न सर्व्हिस (परतफेड) चालू आहे. जे घेऊन गेले
आहेत ते उधार मिळत आहे. श्रीकृष्ण आणि ख्रिश्चन राशी एकच आहे. ख्रिश्चनांनीच भारताला
हडप केले आहे. आता पुन्हा ड्रामा अनुसार ते आपसामध्ये लढतात, लोणी तुम्हा मुलांना
मिळते. असे नाही की श्रीकृष्णाच्या मुखामध्ये लोणी होते. हे तर शास्त्रांमध्ये
लिहिले आहे. सारी दुनिया श्रीकृष्णाच्या हातामध्ये येते. संपूर्ण विश्वाचे तुम्ही
मालक बनता. तुम्ही मुले जाणता आपण विश्वाचे मालक बनतो तर तुम्हाला किती आनंद झाला
पाहिजे. तुमच्या पावला-पावलामध्ये पद्म आहेत. केवळ एका लक्ष्मी-नारायणाचे राज्य
नव्हते. डिनायस्टी (घराणी) होती ना. यथा राजा-राणी तथा प्रजा - सर्वांच्या
पावलांमध्ये पद्म असतात. तिथे तर अगणित पैसे असतात. पैशांसाठी कोणते पाप इत्यादी
करत नाहीत, अथाह धन असते. अल्लाह अवलदीनचा खेळ दाखवतात ना. अल्लाह जो अवलदीन अर्थात
जे देवी-देवता धर्म स्थापन करतात. सेकंदामध्ये जीवनमुक्ती देतात. सेकंदात
साक्षात्कार होतो. कुबेराचा खजिना दाखवतात. मीरा श्रीकृष्णासोबत साक्षात्कारामध्ये
नाचत असे. तो होता भक्तीमार्ग. इथे भक्तिमार्गाची गोष्ट नाहीये. तुम्ही तर
प्रॅक्टिकलमध्ये वैकुंठामध्ये जाऊन राज्य-भाग्य घ्याल. भक्तीमार्गामध्ये फक्त
साक्षात्कार होतो. यावेळी तुम्हा मुलांना एम ऑब्जेक्टचा साक्षात्कार होतो, जाणता
आपण हे बनणार आहोत. मुलांना विसर पडतो म्हणून बॅज दिले जातात. आता आम्ही बेहदच्या
पित्याची मुले बनलो आहोत. किती आनंद झाला पाहिजे. हे तर घडोघडी पक्के केले पाहिजे.
परंतु माया अपोजिशनमध्ये (विरोधामध्ये) आहे त्यामुळे तो आनंद देखील नाहीसा होतो.
बाबांची आठवण करत रहाल तर तो नशा राहील - बाबा आम्हाला विश्वाचा मालक बनवतात. मग
माया विसरायला लावते त्यामुळे मग काही ना काही विकर्म होतेच. तुम्हा मुलांना स्मृती
आली आहे - आपण ८४ जन्म घेतले आहेत, इतर कोणीही ८४ जन्म घेत नाहीत. हे देखील समजून
घ्यायचे आहे - जितकी आम्ही आठवण करू तितके उच्च पद मिळवू आणि मग आप-समान देखील
बनायचे आहे, प्रजा बनवायची आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तीर्थांवर देखील आधी स्वतः
जातात नंतर मग मित्र-नातलग इत्यादींना देखील एकत्र घेऊन जातात. तर तुम्ही देखील
प्रेमाने सर्वांना समजावून सांगा. सर्वांनाच काही समजणार नाही. एकाच घरात वडिलांना
समजले तर मुलाला समजणार नाही. आई-वडिल किती जरी मुलांना म्हणाले की, जुन्या
दुनियेमध्ये मन गुंतवू नकोस तरीही ऐकणार नाहीत. हैराण करतात. जे इथली कलमे असतील
तेच मग येऊन समजून घेतील. या धर्माची स्थापना बघा कशी होते, इतर धर्मवाल्यांची कलमे
लागत नाहीत. ते तर वरून येतात. त्यांचे फॉलोअर्स देखील येत राहतात. हे (शिवबाबा) तर
स्थापना करतात आणि मग सर्वांना पावन बनवून घेऊन जातात त्यासाठी त्यांना सद्गुरू,
लिब्रेटर म्हटले जाते. खरा गुरु एकच आहे. मनुष्य कधी कोणाची सद्गती करत नाहीत.
सद्गती दाता आहेतच एक, त्यांनाच सद्गुरू म्हटले जाते. भारताला सचखंड देखील तेच
बनवतात. रावण झूठ खंड बनवतो. बाबांबद्दल सुद्धा खोटे, देवतांबद्दल देखील खोटे
सांगतात. म्हणून बाबा म्हणतात - हियर नो इव्हील… याला म्हटले जाते वेश्यालय. सतयुग
आहे शिवालय. मनुष्य समजतात थोडेच. ते तर आपल्याच मतावर चालतात. किती भांडण-तंटे
चालूच असतात. मुले आईला, नवरा बायकोला मारायला वेळ लावत नाही. एकमेकांना मारत
राहतात. मुलगा बघतो बापाजवळ खूप धनदौलत आहे, देत नसेल तर मारायला सुद्धा उशीर करत
नाही. कशी घाणेरडी दुनिया आहे. आता तुम्ही काय बनत आहात. हे तुमचे एम ऑब्जेक्ट उभे
आहे. तुम्ही तर फक्त म्हणत होता - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. असे
थोडेच म्हणत होता की, विश्वाचा मालक बनवा. गॉड फादर तर हेवन स्थापन करतात तर मग आपण
हेवनमध्ये का नाही आहोत. रावण परत तुम्हाला नरकवासी बनवतो. कल्पाचा कालावधी लाखो
वर्षे म्हटल्याने विसरून गेले आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही स्वर्गाचे मालक होता. आता
पुन्हा चक्र फिरून नरकाचे मालक बनला आहात. आता बाबा तुम्हाला पुन्हा स्वर्गाचा मालक
बनवतात. म्हणतात - ‘गोड आत्म्यांनो, मुलांनो, बाबांची आठवण करा तर तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. तमोप्रधान बनण्यामध्ये अर्धे कल्प लागले आहे, परंतु
संपूर्ण कल्पच म्हणू कारण कला तर कमी होत जातात. या वेळी कोणतीही कला नाहीये.
म्हणतात - ‘मैं निर्गुण हारे में कोई गुण नाही…’, याचा अर्थ किती स्पष्ट आहे. इथे
मग ‘निर्गुण बालक’ नावाची संस्था देखील आहे. बालकांमध्ये कोणताही गुण नाहीये. नाही
तर बालकांना महात्म्यापेक्षाही महान म्हटले जाते, त्यांना विकारांविषयी देखील माहीत
नाहीये. महात्म्यांना तर विकारांविषयी माहीत असते तर शब्द देखील किती चुकीचे बोलतात.
माया एकदम अनराइटियस (असत्य) बनवून टाकते. गीता वाचतात देखील, म्हणतात देखील
भगवानुवाच - काम महाशत्रू आहे, हा आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे; तरीही पवित्र
बनण्यामध्ये किती विघ्न आणतात. मुलगा लग्न करत नाही तर किती चिडतात. बाबा म्हणतात -
तुम्हा मुलांना श्रीमतावर चालायचे आहे. जो फूल बनणारा नसेल, त्याला कितीही समजावून
सांगा कधीही मानणार नाही. काही ठिकाणी मुले म्हणतात - आम्ही लग्न करणार नाही तर
आई-वडील किती अत्याचार करतात.
बाबा म्हणतात - जेव्हा
ज्ञान यज्ञ रचतो तेव्हा अनेक प्रकारची विघ्न पडतात. तीन पावले पृथ्वीचीही देत नाहीत.
तुम्ही फक्त बाबांच्या मतानुसार आठवण करून पवित्र बनता, अजून काहीच त्रास नाही.
फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. जसे तुम्ही आत्मे या शरीरामध्ये अवतरीत
आहात तसे बाबा देखील अवतरीत आहेत. मग कच्छ अवतार, मत्स्य अवतार कसे असू शकतील! किती
शिव्या देतात! म्हणतात दगडा-धोंड्यात भगवान आहे. बाबा म्हणतात - माझी आणि देवतांची
निंदा करतात. मला यावे लागते, येऊन तुम्हा मुलांना पुन्हा वारसा देतो. मी वारसा देतो,
रावण शाप देतो. हा खेळ आहे. जे श्रीमतावर चालत नाहीत तर समजले जाते यांचे भाग्य इतके
उच्च नाही आहे. भाग्यवान असणारे पहाटे उठून आठवण करतील, बाबांसोबत गोष्टी करतील.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. आनंदाचा पारा देखील
चढेल. जे पास विद ऑनर होतात तेच राजाईच्या लायक बनू शकतात. फक्त एकच लक्ष्मी-नारायण
काही राज्य करत नाहीत. डिनायस्टी (घराणे) आहे. आता बाबा म्हणतात - तुम्ही किती
स्वच्छ बुद्धी बनता. याला म्हटले जाते सत्संग. सत्संग एकच असतो. जिथे बाबा खरे-खरे
ज्ञान देऊन सत्य खंडाचे मालक बनवतात. कल्पाच्या संगमावरच सत्याचा संग मिळतो.
स्वर्गामध्ये कोणत्याही प्रकारचा सत्संग असत नाही.
आता तुम्ही आहात
रुहानी सॅल्वेशन आर्मी (मुक्ती सेना). तुम्ही विश्वाचा बेडा पार करता. तुम्हाला
सॅल्वेज करणारे (मुक्ती देणारे), श्रीमत देणारे बाबा आहेत. तुमची महिमा अतिशय
जबरदस्त आहे. बाबांची महिमा, भारताची महिमा अपरंपार आहे. तुम्हा मुलांची देखील महिमा
अपरंपार आहे. तुम्ही ब्रह्मांडाचे सुद्धा आणि विश्वाचे देखील मालक बनता. मी तर फक्त
ब्रह्मांडाचा मालक आहे. पूजा देखील तुमची डबल होते. मी तर देवता बनत नाही परंतु
बनवितो जेणेकरून डबल पूजा व्हावी. तुमच्यामध्ये देखील नंबरवार समजतात आणि आनंदाने
पुरुषार्थ करतात. अभ्यासामध्ये किती अंतर आहे . सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे
राज्य चालते. तिथे वजीर (मंत्री) नसतात. लक्ष्मी-नारायण, ज्यांना भगवान-भगवती
म्हणतात ते काय मंत्र्याचे मत घेतील का! जेव्हा पतित राजे बनतात तेव्हा मग वजीर (मंत्री)
इत्यादी नेमतात. आता तर आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. तुम्हा मुलांना या जुन्या
दुनियेपासून वैराग्य आलेले आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ज्ञान फक्त रुहानी बाबा
शिकवतात दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. बाबाच पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता आहेत.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांच्या
आठवणी सोबतच आप समान बनविण्याची सेवा सुद्धा करायची आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम…
सर्वांना प्रेमाने समजावून सांगायचे आहे.
२) या जुन्या
दुनियेपासून बेहदचे वैरागी बनायचे आहे. हिअर नो इव्हील, सी नो एव्हिल… त्या बेहद
पित्याची मुले आहोत, ते आम्हाला कुबेराचा खजिना देतात, याच आनंदामध्ये रहायचे आहे.
वरदान:-
प्रत्येक
संकल्प, बोल आणि कर्माला फलदायी बनविणारे रुहानी प्रभावशाली भव
जेव्हा पण कोणाच्या
संपर्कामध्ये येता तर त्यांच्याप्रती मनाची भावना स्नेह, सहयोग आणि कल्याणाची आणि
प्रभावशाली असावी. प्रत्येक बोल कोणाला हिंमत आणि उत्साह देणारा, प्रभावशाली असावा.
साधारण गप्पा गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ नये. त्याच प्रमाणे प्रत्येक कर्म फलदायी
असावे - मग ते स्वतःसाठी असो किंवा इतरांसाठी. आपसात देखील प्रत्येक रूपामध्ये
प्रभावशाली बना. सेवेमध्ये रुहानी प्रभावशाली बना तेव्हा बाबांना प्रत्यक्ष
करण्याच्या निमित्त बनू शकाल.
बोधवाक्य:-
असे शुभचिंतक
मणी बना जेणेकरून तुमची किरणे विश्वाला प्रकाशित करत राहतील.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
समयानुसार शीतलतेच्या
शक्तीद्वारे प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या संकल्पांच्या गतीला, वाणीला शीतल आणि
संयमी बनवा. जर संकल्पांचा वेग फास्ट असेल तर खूप वेळ वाया जाईल, कंट्रोल करू शकणार
नाही म्हणून शीतलतेची शक्ती धारण करा तर व्यर्थापासून वाचाल. हे ‘का, काय, असे नाही
तसे’, या व्यर्थच्या फास्ट गतीपासून वाचाल.