18-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, ऐकीव
गोष्टींवर विश्वास ठेवू नका, जर कोणी उलट-सुलट गोष्टी ऐकवल्या तर एका कानाने ऐकून
दुसऱ्या कानाने सोडून द्या”
प्रश्न:-
जी मुले
ज्ञानाच्या आनंदामध्ये राहतात त्यांचे लक्षण काय असेल?
उत्तर:-
अशी मुले
ज्ञानाच्या आनंदामध्ये, जुन्या कर्मभोगाचा हिशोब मर्ज (नाहीसा) करत जातील.
ज्ञानाच्या आनंदामध्ये दुःख-वेदना, ही कष्टदायी दुनियाच विसरायला होते. बुद्धीमध्ये
असते आता तर आम्ही आनंदाच्या दुनियेमध्ये जात आहोत. रावणाने शाप देऊन दुःखी केले;
आता बाबा आले आहेत आम्हाला त्या दुःखाच्या, कष्टदायी दुनियेमधून बाहेर काढून
आनंदाच्या दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता.
गीत:-
तुम्हें पाके
हमने...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी गाणे ऐकले. जरूर मुलांना आनंदाने रोमांचीत झाले पाहिजे कारण गायले जाते की,
‘ख़ुशी जैसी खुराक नहीं’. आता तुम्हा सर्व रुहानी मुलांना बेहदचे बाबा मिळाले आहेत.
बेहदचे बाबा तर एकच असतात आणि मुले जाणतात जेव्हा आणखी मुले बनतील तेव्हा त्यांना
देखील रोमांच उभे राहतील. तुम्ही जाणता आमचे राज्य होते, नंतर राज्य गमावले, आता
पुन्हा राज्य घेत आहोत. भारतवासीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे ना. परंतु जेव्हा
चांगल्या रीतीने ऐकतील आणि समजतील तेव्हा ना! खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे ना,
कल्प-कल्प बाबा येतात. बाबांचा जन्म देखील इथेच गायला जातो. सणवार देखील जे काही
आहेत ते सर्व या वेळचे आहेत. बाबांनी येऊन तुम्हाला खूप सोपा मार्ग सांगितला आहे.
मनुष्यांना तर अनेक प्रकारची दुःखे आहेत; इथे या ज्ञानाच्या आनंदामध्ये ते कष्ट,
दुःख इत्यादी सर्व मर्ज होते (नाहीसे होते). जसे एखादा आजार बरा होत येतो तेव्हा
सर्वांना आनंद होतो. आजारपण इत्यादी दुःखद गोष्टी जणूकाही विसरल्या जातात. माहेर,
सासर, मित्र-नातेवाईक इत्यादी सर्वांना आनंद होतो. तुम्ही मुले जाणता - आपण सर्व
विश्वाचे मालक होतो, आणि मग रावणाने शाप दिला आहे. ही आहे कष्टाची, दुःखाची दुनिया.
आणि उद्या असेल आनंदाची दुनिया. आनंदाची दुनिया आठवल्याने कष्ट, दुःख इत्यादी सर्व
विसरून गेले पाहिजे. ही आहे तमोप्रधान दुनिया. विविध प्रकारचे कर्मभोग आहेत.
अबलांवर देखील किती अत्याचार होतात. अनेक प्रकारची विघ्ने येतात. हे विघ्नांचे,
कर्मभोगाचे दिवस फार थोड्या काळासाठी उरले आहेत. बाबा धीर देतात की, थोडेच दिवस बाकी
आहेत. कल्पापूर्वी देखील झाले होते. कर्मभोगाचा हिशोब चुकता होणार आहे. आनंदामध्ये
हे सर्व मर्ज करत जा. बस्स, बाबांची आणि वारशाची आठवण करत राहा. कोणतेही उलटे-सुलटे
काम करू नका. नाहीतर अजूनच दंड भोगावा लागतो, पद भ्रष्ट होते. मुलांचे काम आहे - एका
बाबांची आठवण करणे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा म्हणजे तुमची विकर्म विनाश होतील.
कर्मांचा हिशोब चुकता होईल’. फार थोडा वेळ उरला आहे, हिशोब चुकता करत जा; कारण
तुम्ही आंधळ्यांची काठी आहात. तुम्ही सुद्धा आठवण करा आणि इतरांना देखील मार्ग सांगा.
विघ्न तर खूप येतील. जितके शक्य होईल, सर्वांना हे समजावून सांगत राहा की, ‘बाबांची
आठवण करा’. शब्द देखील प्रसिद्ध आहेत, ‘मनमनाभव’ अर्थात हे आत्म्यांनो, मामेकम् (मज
एकाची) आठवण करा म्हणजे तुमची भूतकाळातील विकर्म भस्म होतील. यामध्ये गोंधळून
जाण्याचा तर प्रश्नच नाही. फक्त बाबांची आठवण करा तेव्हाच तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनाल. तुम्ही जाणता आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. चक्र फिरत आलो आहोत
आणि फिरत राहू. ही आहे जुनी दुनिया, जुने शरीर… यांना विसरून जायचे आहे. हा आहे
आत्म्यांचा बेहदचा संन्यास. त्यांचा आहे हदचा संन्यास, घरदार सोडून जातात. त्यांचा
देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. तरीही पुन्हा असेच होईल. सेकंद-सेकंद जो पास झाला तो
ड्रामा, पुन्हा तोच ड्रामा रिपीट होईल. ही सर्व शास्त्रे आहेत भक्तीमार्गाची पुस्तके.
भक्ती नंतर आहे ज्ञान. या शिडीच्या चित्रावर कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे.
मुख्य जी चित्रे आहेत ती आपल्या घरातही तुम्ही ठेवू शकता. त्रिमूर्तीच्या
चित्रामध्ये देखील स्पष्टीकरण खूप क्लियर आहे. वरती शिव सुद्धा आहेत, ब्रह्मा,
विष्णु, शंकर सुद्धा आहेत; सूक्ष्मवतनवासी आणि उच्च ते उच्च आहेत भगवान. मुले देखील
समजतात जिथे बाबा राहतात ते आम्हा आत्म्यांचे राहण्याचे स्थान आहे, ज्याला
निर्वाणधाम म्हणा अथवा शांतीधाम म्हणा - गोष्ट एकच आहे. ‘शांतीधाम’ नाव ठीक आहे अथवा
निर्वाणधाम अर्थात् वाणीपासून परे असलेले धाम, ते शांतीधामच झाले. ते शांतीधाम,
नंतर आहे - सुख आणि शांती संपत्ती धाम, त्यानंतर होते - दुःख आणि अशांतीधाम. सुखधाम
मध्ये तर कुबेराचे अथाह खजिने असतात. आज काय आहे, उद्या काय असेल. आज कलियुगाचा अंत,
उद्या असेल सतयुगाची आदि (सुरुवात). दिवस-रात्री इतका फरक आहे ना. म्हणतात देखील -
ब्रह्मा आणि ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मणांचा दिवस आणि नंतर रात्र. दिवसामध्ये आहेत
- देवता. रात्रीमध्ये आहेत - शूद्र. मध्यभागी आहात तुम्ही ब्राह्मण. या
संगमयुगाविषयी कोणालाच माहिती नाहीये. मनुष्य तर पूर्णपणे घोर अंधारात आहेत. तर
लख्ख प्रकाशामध्ये घेऊन येणे हे तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे. आता समोर तीच
महाभारताची लढाई आहे. गायले देखील गेले आहे - ‘विनाशकाले विपरीत बुद्धी विनशन्ती’.
‘विनाशकाले प्रीत बुद्धी विजयन्ती’.
तुम्ही मुले जाणता
बाबा आपल्याला पुन्हा तीच राजाई देत आहेत. ती आमची राजाई कोणीही हिरावून घेऊ शकत
नाही. रावणाचा प्रवेश तर द्वापरपासून होईल. रावणाने आमची राजाई हिरावून घेतली आहे,
ज्याला शत्रूच समजा; कारण शत्रूचाच पुतळा बनवून जाळतात. हा खूप जुना शत्रू आहे.
म्हणतात देखील - ‘रावण राज्य’, परंतु कोणाच्याच बुद्धीमध्ये येत नाही. तर घोर अंधार
म्हणणार ना. बेहदचे बाबा आहेत - नॉलेजफुल. त्यांना ज्ञानाचा दाता, दिव्य चक्षू
विधाता म्हणतात. आता तुम्हा आत्म्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. या आधी तर
तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता सर्व काही समजले आहे. बाबा ज्ञानाचा सागर आहेत तर
जरूर ज्ञान ऐकवतील ना. ज्ञान ऐकवल्याशिवाय सिद्ध कसे होईल! तुम्ही पाहता बाबा ज्ञान
ऐकवतात, ज्या ज्ञानाद्वारे मग अर्धा कल्प सद्गती होते. अर्धा कल्प भक्तीच चालणार आहे.
ज्ञानाद्वारे सद्गती संगमावरच होते. मुलांची कोणतीही गोष्ट कधीच लपून राहू शकत नाही.
बाबा म्हणतात - कोणतेही वाईट काम तुमच्याकडून झाले तर बाबांना सांगा. बाबा जाणतात
अनेकांकडून वाईट कर्म होत राहतात. रावण राज्य आहे ना. माया थप्पड मारते, परंतु
खूपजण लपवतात. बाबा म्हणतात - कोणतीही चूक झाली तर लगेच सांगितल्याने भविष्यासाठी
युक्ती मिळेल. नाहीतर ती सवय वाढत जाईल. काम महाशत्रु आहे. बाबांना लिहितात -
‘बाबा, मायेचा खूप विरोध होतो. कायमचा योग तर काही कोणाचा राहत नाही ज्यामुळे
मायेपासून बचाव होईल. देह-अभिमान खूप येतो. खूपजण आहेत जे मायेचा मार खातात.
बाबांकडे समाचार तर सर्व बाजूंनी येत राहतात ना. वृत्तपत्र इत्यादींमध्ये तर
उलट-सुलट सुद्धा कितीतरी छापतात. आजकाल मनुष्य गोष्टी तर कितीही बनवू शकतात,
तमोप्रधान आहेत ना. व्यासाची जेव्हा रजो-बुद्धी होती तर काय-काय गोष्टी बसून
लिहिल्या आहेत. बाबा मुलांना समजावून सांगतात ऐकीव गोष्टींवर कधीही विश्वास ठेवून
चिडू नका. ‘अमक्याने असे म्हटले, असे केले…’ डोकेच फिरते. समजून घेत नाहीत
तमोप्रधान दुनिया आहे. माया खाली पाडण्याचा प्रयत्न करेल. कोणीही खोट्यानाट्या
गोष्टी ऐकवल्या तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. इतरांनाही हाच संदेश
देत राहा. बाबा म्हणतात - मी संदेश घेऊन येतो. हे आत्म्यांनो, आता श्रीमतावर चाला.
आमचा संदेश ऐका. फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा. जे आठवण करतील ते स्वतःचेच
कल्याण करतील. आठवण आत्म्याला करायची आहे, विसरली देखील आत्माच आहे. आता बाबांचे
श्रीमत मिळते, यामध्ये आशीर्वाद अथवा दया इत्यादी काहीही मागायचे नाही. फक्त बाबांची
आठवण करायची आहे; अजून दुसरी कोणतीही गोष्ट विचारण्याची अथवा करण्याची सुद्धा गरज
नाही. सृष्टीचे चक्र कसे फिरते - हे तर ऐकले. यात कोणताही वादविवाद करण्याचा काही
प्रश्नच नाही. घोर अंध:कार असतो तेव्हाच बाबा येतात, म्हणून शिवरात्री साजरी करतात.
श्रीकृष्णाचा जन्म देखील रात्रीच साजरा करतात. मंदिरांमध्ये खीर-पुरी इत्यादी
रात्रीचीच बनते. आता ‘शिव’ करिता काय बनवणार? ते तर आहेत निराकार. कोणाला समजत
सुद्धा नाही की, बाबा कोणत्या घटकेला येतात आणि कसे निघून जातात. नेहमीच काही स्वार
होऊन राहत नाहीत. येतील आणि निघून जातील. आता तुम्ही जाणता आपण शिवबाबांची नातवंडे
आहोत. वारसा त्यांच्याकडून मिळतो. ब्रह्माला देखील वारसा त्यांच्याकडून मिळतो. हे (ब्रह्मा
बाबा) तर मनुष्य आहेत ना. सद्गती मध्ये पहिला नंबर या श्रीकृष्णाचा आहे. हा
सगळ्यांचा लाडका आहे कारण सतोप्रधान बाल अवस्था आहे ना. थोडा मोठा होतो तेव्हा
त्याला सतो म्हटले जाते. नंतर मग रजो, तमो. राधे-श्रीकृष्णच नंतर लक्ष्मी-नारायण
बनतात; ज्यांना बाबांनी ज्ञान दिले आहे त्यांनाच देतील. भारतामध्येच देवी-देवता
होऊन गेले आहेत, त्यामुळे मंदिरे देखील भारतामध्ये जास्त आहेत. ख्रिश्चनांच्या
चर्चमध्ये क्राइस्टच क्राइस्ट दिसतील. देवतांची किती असंख्य मंदिरे आहेत. बाबा आले
आहेत आम्हाला मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता अथवा भारताला स्वर्ग बनविण्याकरिता.
आम्ही बाबांची आठवण करून पावन बनत आहोत. बाबांसोबत आम्ही देखील भारताला स्वर्ग बनवत
आहोत, जणूकाही आम्ही बाबांसोबत आलो आहोत. भक्तिमार्गामध्ये देवतांच्या मंदिरांवर,
मूर्ती इत्यादींवर किती खर्च करून बनवतात. उत्पत्ती करून, पालना करून, नंतर विनाश
करतात (स्थापना करून, पूजा-आराधना करून, मग विसर्जित करतात). ९ दिवसांच्या आतच
बुडवून टाकतात. त्यांच्यावर खूप प्रेम असते. कलकत्त्यामध्ये नवरात्री मोठ्या
प्रमाणात साजरी करतात. या सर्व गोष्टींचे आता आश्चर्य वाटते. या आधी आपण देखील
पार्टधारी होतो. करोडो रुपये खर्च करतात. किती अंधश्रद्धा आहे. रामायणावर किती
प्रेम असते. कथा ऐकून डोळ्यातून अश्रू ढाळतात. हा सर्व आहे भक्तिमार्ग, यातून फायदा
काहीच नाही. बाबा आता आम्हाला किती बुद्धिवान बनवत आहेत. तर हे सर्व ऐकून इथल्या इथे
विसरून जाऊ नका, सर्व गोष्टी लक्षात ठेवा. पूर्ण रिफ्रेश होऊन जा. स्वतःला आत्मा
समजून देहा सहित जे काही पाहता ते सर्व विसरून जा. हे सर्व कब्रस्तान आहे.
दिल्लीमध्ये बिर्ला मंदिरामध्ये लिहिले आहे - भारत परिस्तान होता, जो धर्मराजाने
स्थापन केला होता. आता तुम्ही मुले जाणता ही दुनिया कब्रस्तान बनणार आहे.
बाबा म्हणतात - सर्व
जण काम-चितेवर बसून एकदम जळून खाक झाले आहेत. ‘क्रोध-चिता’ असे कधी म्हटले जात नाही,
‘काम-चिता’ म्हटले जाते. त्यात देखील हलका नशा, सेमी नशा देखील असतो. बाबा बसून
मुलांनाच समजावून सांगतात. घरामध्ये जर एखादा कुपुत्र असेल तर म्हणतील ना - ही कसली
बापाची अब्रू घालवतोस? पित्याची इज्जत जाते ना. बेहदचे बाबा देखील म्हणतात - तुम्ही
काळे तोंड करता तर ब्राह्मण कुलभूषण जे देवता बनतात, त्यांचे नाव बदनाम करता. तुम्ही
मुले जाणता - आपण पवित्रतेच्या शक्तीनेच भारताला पुन्हा श्रेष्ठाचारी देवता बनवत
आहोत. तुमच्यासाठी तर ही जणू कॉमन गोष्ट आहे. पाहता महाभारताची लढाई देखील समोर उभी
आहे, यातूनच स्वर्गाचे गेट उघडतात. शास्त्रांमध्ये महाभारताची लढाई तर दाखवली आहे.
परंतु त्यानंतर पुढे काय झाले - हे दाखवलेले नाही. म्हणतात प्रलय झाला. आता एका
बाजूला श्रीकृष्णाचा मातेच्या गर्भातून जन्म दाखवला आहे आणि दुसऱ्या बाजूला मग
म्हणतात की पिंपळाच्या पानावर अंगठा चोखत आला, काहीच समजत नाहीत. तिथे तर
गर्भ-महालामध्ये अतिशय आरामात राहतात. बाकी सागरामध्ये थोडाच पानावर असू शकतो. हे
तर इम्पॉसिबल आहे. तर हा सर्व ड्रामा पूर्वनियोजित आहे, ज्याला तुम्ही जाणता.
कल्प-कल्प असे होतेच होते. आता मुलांना आपले कल्याण करायचे आहे आणि दुसऱ्यांचे
देखील कल्याण करायचे आहे. मुख्य गोष्ट हीच आहे. बाबा तर स्वर्गाचे रचयिता आहेत.
त्यांना म्हटलेच जाते - ‘हेवनली गॉडफादर’. तर मग आपण मुले स्वर्गाचे मालक असलो
पाहिजे ना. शिवजयंती देखील भारतातच साजरी करतात तर जरूर भारताला काहीतरी दिले असेल.
आता तुम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहेत ना. बाबा आहेतच सद्गती दाता. ज्ञानाचा
सागर, बाबाच येऊन नॉलेज देतात. आता बाबा तुम्हाला नॉलेज देत आहेत. ५ हजार वर्षानंतर
पुन्हा इथेच येतील. मुलांना निश्चय आहे जे-जे या ब्राह्मण कुळाचे असतील ते येत
जातील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
रुहानी पित्याचा रुहानी मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) श्रीमतावर
आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे. कोणी काही खोटी गोष्ट सांगितली तर ती ऐकून न
ऐकल्यासारखे करायचे आहे. त्याच्यावर चिडायचे नाही.
२) कधीही देवता
बनणाऱ्या ब्राह्मण कुलभूषणांचे नाव बदनाम होणार नाही - याची काळजी घ्यायची आहे.
कधीही कोणतेही उलटे कर्म करायचे नाही. मागील कर्मांचे हिशोब चुकते करायचे आहेत.
वरदान:-
नशेच्या आणि
निशाण्याच्या स्मृती द्वारे सर्व कर्मेद्रियांना ऑर्डरप्रमाणे चालविणारे ताज आणि
तख्तनशीन भव
संगमयुगावर
बापदादांद्वारे सर्व मुलांना ताज आणि तख्त प्राप्त होतो. प्युरिटीचा देखील ताज आहे
तसा जबाबदाऱ्यांचा देखील ताज आहे, ‘अकाल तख्त’ देखील आहे तसेच ‘दिलतख्त’नशीन सुद्धा
आहात. जेव्हा असे डबल ताज आणि तख्तनशीन बनता तेव्हा नशा आणि निशाणा आपोआप लक्षात
राहतो. आणि मग ही कर्मेंद्रिये ‘जी हजूर’ करतात. जे ताज आणि तख्त सोडून देतात
त्यांची ऑर्डर कोणताही कर्मचारी मानत नाही.
बोधवाक्य:-
कमजोर संकल्पच
‘प्रसन्न-चित्त’ ऐवजी ‘प्रश्न-चित्त’ बनवतात.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
ईश्वरीय सेवेचे
मोठ्यात-मोठे पुण्य आहे - पवित्रतेचे दान देणे. पवित्र बनणे आणि बनविणे म्हणजेच
पुण्य आत्मा बनणे आहे; कारण कोणत्याही आत्म्याला आत्म-घाताच्या महा-पापातून सोडवता.
अपवित्रता, ‘आत्मघात’ आहे. पवित्रता, ‘जीवन-दान’ आहे.