17-10-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.02.2012  ओम शान्ति   मधुबन


आता स्मृती स्वरूप अनुभवाची ऑथॉरिटी बना, ज्वालामुखी योगद्वारे सर्वांना लाईट माईटच्या किरणांचा सहयोग द्या


आज बापदादा आपल्यासमोर अथवा चोहो बाजूच्या आपल्या छोट्याशा संसाराला पाहून हर्षित होत आहेत कारण हा संसार आहे छोटा परंतु अत्यंत सुंदर आहे, कारण या संसारातील प्रत्येक आत्मा श्रेष्ठ आत्मा आहे. कोटींमध्ये कोणी आत्मे आहेत. बाबांच्या वारश्याचे अधिकारी आत्मे आहेत. बापदादा प्रत्येक मुलाला पाहून खुश होतात की हा एक-एक बच्चा राजा बच्चा आहे. बापदादांनी प्रत्येक मुलाला स्वराज्य अधिकारी आणि विश्व राज्य अधिकारी बनवले आहे. या वेळी सर्व स्वराज्य अधिकारी आहेत अर्थात मन-बुद्धी, संस्कार, कर्मेंद्रियांचे राजा आहेत. कर्मेंद्रियांच्या वश नाहीत. मनाचे देखील मालक आहेत. तर असेच तुम्ही प्रत्येक जण स्वतःला मनाचा मालक, संस्कारांचा देखील मालक समजता का? असे तर नाही ना की, कधी तुम्ही मनाचे मालक असता आणि कधी मन तुमचे मालक असते! कारण तुम्ही म्हणताच मुळी - ‘माझे मन’, ‘मी मन’ असे म्हणत नाही. तर ‘माझे’चे तुम्ही मालक आहात. चेक करा कधी मन तर मालक बनत नाही ना? कारण यावेळी बापदादांनी प्रत्येकाला स्वराज्य अधिकारीच्या सीटवर बसवले आहे. आताचे स्वराज्यधारी आहात आणि भविष्याचे राज्य तर तुमचे आहेच. डबल राज्य अधिकारी आहात. बापदादा पाहतात की, प्रत्येक बच्चा स्वराज्य अधिकारीसोबतच स्वमानधारी देखील आहे. तर ‘मी स्वमानधारी आत्मा आहे’, या स्मृतीमध्ये बसा आणि मग पहा किती स्वमानांची लिस्ट तुमच्यासमोर येते ते. अनेक स्वमानांची माळ समोर येते ना!

बापदादांनी मुलांच्या स्वमानांची माळ प्रत्येक मुलाच्या गळ्यामध्ये घातली आहे. स्वमान ऐकताच तुमच्यासमोर देखील तुमचे स्वमान स्मृतीमध्ये आले! आठवा, अनादि स्वरूपामध्ये तुमचा स्वमान किती मोठा आहे! अनादि स्वरूपामध्ये गेलात? प्रत्येकाचा स्वमान आहे - एक तर बाबांसोबत चमकणारा आत्मा आहे, बाबांच्या सोबत असल्यामुळे विशेष चमकताना दिसत आहे. पाहत आहात ना? जसे इथे आकाशातही एखादा तारा विशेष चमकत असतो, तसे बाबांच्या सोबत असल्यामुळे चमकणारी आत्मा आहात. आठवले का आपले अनादि स्वरूप? सेकंदामध्ये आपल्या अनादि स्वरूपामध्ये स्थित होऊ शकता? आता एका सेकंदामध्ये त्या अनादि स्वरूपामध्ये एका सेकंदासाठी स्थित व्हा. किती नशा चढतो! पुढे चला, या सृष्टी चक्राच्या आदिमध्ये (सुरुवातीला) आलात! ही ड्रिल करा सतयुगाच्या आदि काळातील आपले स्वरूप पहा, किती श्रेष्ठ सुख स्वरूप आहे. किती सर्व प्राप्ती स्वरूप आहे. दुःखाचे नामोनिशाणही नाही. प्रकृति किती सुंदर सतोगुणी आहे. अनुभव करा आपल्या देवता स्वरूपाचा. आपले स्वरूप पाहत आहात? कोणताही राजा असो, महात्मा असो, नेता असो, असा सर्व प्राप्ती स्वरूप कोणाला पाहिले आहे! तर एका सेकंदासाठी आपल्या देवता स्वरूपामध्ये स्थित व्हा. आपल्या स्वमानामध्ये मजा येते ना! हम सो देवता... बापदादा ही ड्रिल करून घेत आहेत. मग खाली या, कोणते युग आले? द्वापरमध्ये देखील तुमचा स्वमान पूजनीय आहे. पूज्य स्वरूप आहे. आपल्या पूज्य स्वरूपाला पाहत आहात ना? सर्वजण किती भावनेने आणि

नियमानुसार पूजा करतात. अशी नियमानुसार पूजा इतर कोणाचीही होत नाही. भले मग धर्मपिता आले, गुरू बनले, नेते बनले, अभिनेते बनले, परंतु अशी नियमानुसार पूजा कोणाचीही होत नाही. तर आपला स्वमान पाहिला, अनुभव केला का? आता संगममध्ये या, सर्वजण फेरी मारत आहात ना? मागे बसलेले फेरी मारत आहात ना! हात वर करा. आपला स्वमान पहा, कारण स्वराज्य अधिकारी आहात ना! तर संगमावर स्वयं भगवान, तुमच्या जीवनामध्ये स्वत: मालक तुम्हा मुलांमध्ये पवित्रतेची विशेषता भरत आहेत. जी पवित्रता तुमच्या सर्व अविनाशी सुखांची खाण आहे. आणि बनविणारे कोण? स्वयं भगवान. ती तर आताही प्रत्यक्ष प्रमाण तुम्हाला पवित्रतेची संपत्ती बाबांकडून प्राप्त झाली आहे. आता चेक करा - पवित्रता सर्व प्राप्तींचा आधार आहे, पवित्रतेमुळे तुम्ही सर्व मास्टर सर्वशक्तिमान बनलात. तर चेक करा सर्व शक्ती प्राप्त आहेत? काही-काही मुले म्हणतात की, बाबांनी तर सर्व शक्ती दिल्या आहेत परंतु काही-काही वेळा ज्या शक्तीची गरज असते ती थोड्या वेळानंतर येते. घटना घडून जाते आणि मग शक्ती येते. याचे कारण काय? वरदानामध्ये बाबांनी दिली तरीही वेळेवर येत नाही याचे कारण काय? आपल्या मास्टर सर्वशक्तिमानच्या स्मृतीच्या सीटवर नसता, कोणीही जेव्हा एखाद्याची ऑर्डर मानतात ती सीटवर असणाऱ्यांची ऑर्डर मानतात. तर जेव्हापण तुम्ही कोणत्याही शक्तीला ऑर्डर करता, तेव्हा पहिले हे पाहा की, मी स्मृतीच्या सीटवर आहे? स्वमानाच्या सीटवर आहे? स्मृतीच्या सीटवर स्थित व्हा, म्हणजे मग सर्व शक्ती तुमच्याकडे वेळेवर येण्यासाठी बांधील आहेत; कारण सर्वशक्तिमान बाबांनी तुम्हाला मास्टर सर्वशक्तिमान बनवले आहे. तर एवढे पॉवरफुल स्वमानधारी बनून चालत आहात ना? आपले स्वमान पाहिले? संगमा नंतर कुठे जाणार आहात? रिटर्न जर्नी कराल ना! म्हणून बापदादा हेच इच्छित आहेत की, प्रत्येकाने पूर्ण दिवसभरामध्ये ही एक्सरसाइज करत राहावे. वेळ काढा वारंवार ही स्वमानाची माळ परिधान केल्याने, अनुभव केल्याने बापदादांनी जे स्वराज्य अधिकारी बनवले आहे, त्यांच्या बाबतीत असे होऊच शकत नाही की, स्वमान तुमच्या ऑर्डरनुसार चालणार नाही. फक्त सीटवर सेट राहा.

बापदादांनी पाहिले की सर्वजण अटेन्शन ठेवतात, परंतु नियमितपणे आपली दिनचर्या सेट करा. मधूनमधून आपल्या या स्वमानाच्या स्मृती स्वरूपामध्ये स्थित होऊन राहा. जसा ट्रॅफिक कंट्रोल करता तसे आपल्या आदिकाळापासून रिटर्न जर्नी पर्यंतच्या या स्वमानाच्या स्मृतीमध्ये मधूनमधून स्थित होण्यासाठी आपला टाइम फिक्स करा. हे चालता-फिरता देखील करू शकता कारण मनाला सीटवर बसवायचे आहे. बापदादांनी पाहिले, यापूर्वी देखील सांगितले आहे की, योग सर्वजण लावता परंतु आता गरज कशाची आहे? या नाजूक काळातील परिस्थितीला पाहता तुम्हाला यापूर्वी देखील सांगण्यात आले होते की, आता ज्वालामुखी योगची गरज आहे, ज्याद्वारे डबल काम होईल. एक तर आपल्या जुन्या संस्कारांचा संस्कार होऊन जाईल, आता संस्कारांना तुम्ही मारता तर खरे, परंतु त्यांना जाळून टाकत नाही. मारल्यानंतरही कधी-कधी ते जागे होतात. जसे रावणाला फक्त मारले नाही, तर जाळून टाकले गेले. तसे तुम्ही देखील आपल्या जुन्या संस्कारांना जे मधूनमधून तीव्र पुरुषार्थामध्ये अडथळा आणतात त्यांना जाळून टाका आणि त्यासाठी ‘ज्वालामुखी योग’ची गरज आहे. एक तर स्वतःसाठी आणि दुसरे म्हणजे ज्वालामुखी योग द्वारा इतरांनाही लाईट रूप असल्यामुळे, माईट रूप असल्यामुळे

त्यांना देखील आपल्या किरणांद्वारे सहयोग देऊ शकता. तर आता सर्वांनी आपल्या ‘योग’ला ‘ज्वालामुखी योग’ मध्ये परिवर्तित केले आहे का? वेळेनुसार आता आत्म्यांना तुमच्या सहयोगाची गरज आहे. बाकी बापदादा तर अमृतवेलेला प्रत्येक मुलाला प्रेम देत असतात.

बापदादा पाहतात लक्ष्य खूप चांगले ठेवतात, हिंमतही ठेवतात परंतु पूर्ण दिवसभर तेवढीच एकाग्रता टिकवून ठेवणे, जशी अमृतवेलेला असते, ती कमी होत जाते. कारण काय असते? हे जे कर्म करण्यामध्ये व्यस्त होता, कर्मयोगी बनून कर्म करणे, यामध्ये फरक पडतो. तुम्ही फक्त योग लावणारे नाही आहात, तर योगी जीवनशैली, असणारे आहात. तर जीवनशैली ही निरंतर असते, कधी-कधी नसते. तर बापदादा आता काय इच्छित आहेत? प्रेमामध्ये तर बहुतेक सर्व पास आहेत, प्रेमाच्या सब्जेक्टमध्ये बाबांनी पाहिले की मेजॉरिटी ‘बाबा’ शब्दासोबत ‘माझे बाबा’, ‘माझे बाबा’ म्हणत प्रेमाचा अनुभव करतात. प्रेमामध्ये तर मेजॉरिटी पास आहेत, आता कशामध्ये पास व्हायचे आहे? पित्यासमान बनण्यामध्ये. सर्वांची इच्छा काय आहे? पित्या समान बनायचे आहे की बाबा, बाबाच राहतील आणि तुम्ही मुले, मुलेच रहाल, असे चालणार नाही; परंतु पित्यासमान बनावे तर लागेलच. प्रेम म्हणजे काय? प्रेम असणारी व्यक्ती जे सांगेल ते करायचेच आहे. तर तुम्ही सर्व जण बाबांचे लाडके आहात, बाबांचे तुमच्यावर प्रेम आहे? यामध्ये हात वर करा. प्रेम आहे, छान! प्रेम आहे? तर आता बापदादा हेच इच्छित आहेत की जसे प्रेम आहे, तसे हे लक्ष्य ठेवा की आम्हाला पित्या समान बनायचेच आहे, यामध्ये हात वर करा. तर निश्चय ठेवता, हात तर खूप छान वर करता. बापदादा पाहत आहेत.

बापदादांची हीच इच्छा आहे की, प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरून आणि वर्तनामधून तो अत्यंत खुशनुमा आणि खुशनसीब (आनंदी आणि भाग्यवान) दिसून यावा, कारण आता समयानुसार तुमचा चेहरा खूप सेवा करणार आहे. गरज पडेल. यासाठी बापदादांची इच्छा आहे की आतापासूनच लक्ष्य ठेवा, जसा आता या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना सेवा करण्याचा उमंग आहे. तसा उमंग चेहऱ्याद्वारे सेवा करण्याचा असावा, कारण दिवसेंदिवस नाजूक काळ येणारच आहे. तर अशा वेळी तुमचा चेहरा आत्म्यांना चिअरफुल (हर्षित) करणारा असावा.

बापदादांनी आज अमृतवेलेला फेरी मारली, तेव्हा काय पाहिले? सर्वजण आपल्या आवडीने बसतात देखील परंतु सर्वात मोठी ऑथॉरिटी आहे अनुभवाची. तर पाहिले की, मुले बसतात, परंतु अनुभवाची ऑथॉरिटी बनून बसावे, स्मृतीमध्ये बसतात परंतु स्मृती स्वरूप अनुभव व्हावा. अनुभवाच्या ऑथॉरिटीचा आनंद तो थोडा वेळ असतो. विचार करतात - ‘मी बापदादांची तख्तनशीन आहे’, परंतु त्या स्वरूपाच्या स्मृती स्वरूप अनुभवी मूर्त, अनुभवामध्ये हरवून जावे, त्याला आता अजून पुढे वाढवावे लागेल कारण अनुभवाची ऑथॉरिटी सर्वात मोठ्यात मोठी आहे. स्मृती स्वरूप राहणे याला म्हटले जाते - अनुभव. तर अनुभवामध्ये हरवून जा, ज्या स्वरूपाची स्मृती ठेवता, त्या स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये राहा, आता याची जास्त गरज आहे कारण अनुभव कधीही विसरला जात नाही. कोणालाही तुम्ही कोणाच्या अनुभवाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा अनुभवाचा प्रभाव पडतो. तर स्वतःला ज्या स्वरूपाच्या स्मृतीमध्ये ठेवता त्या स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये हरवून जा, अनुभव आपल्या पुरुषार्थामध्ये देखील खूप मदत करतो. तर बापदादांनी पाहिले अनुभवाच्या ऑथॉरिटीमध्ये नंबरवार आहेत. तर आता या अनुभवाच्या ऑथॉरिटीच्या अभ्यासावर आणखी अटेन्शन द्या. अनुभव स्वरूपाची स्थिती सदैव एकरूप झालेली असते, त्यांचा चेहरा, चलन सेवा करत असतात.

तर आज बापदादा मुलांचे रेकॉर्ड पाहत होते. त्यामध्ये एक तर ‘ज्वालामुखी योग’ यावर आणखी अटेन्शन द्या, ज्यामुळे स्वभाव संस्कार परिवर्तनामध्ये सहयोग मिळेल. संस्कार ज्याला तुम्ही नेचर म्हणता ते अजूनही अधून-मधून आपले काम करतात. बाकी बापदादा खुश आहेत कोणत्या गोष्टीवर? जाणता, कोणत्या गोष्टीवर बापदादा खुश आहेत? माहित आहे? आजकालच्या मुरल्या ऐकताना बापदादांनी पाहिले की, आपल्या दिनचर्येवर जास्त अटेंशन गेले आहे. अटेंशन वाढले आहे तर संस्कारांचे टेंशन कमी होत जाईल. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे - जेव्हा पण टेंशन येईल ना, तेव्हा ‘अ’ लावा, ‘अ’ ॲड करा, ‘अटेन्शन’. जायचे तर सर्वांना आहेच. हा तर पक्का वायदा आहेच - सोबत येणार, सोबत राज्य करणार. तर सर्वजण आनंदात आहात की कधी-कधी आनंदी असता? जे समजतात की, आम्ही नेहमी आनंदात असतो, कधी-कधी नाही, सदैव आनंदात असतो, पहा विचार करून हात वर करा. अच्छा. हात देखील विचार करून वर करत आहेत. आनंद आपली वस्तू आहे. आपली वस्तू का घालवायची? तर आता काय कराल? पुढे चालायचे तर आहेच. तर आता पुढे काय कराल?

प्रत्येक सेंटर निर्विघ्न, व्यर्थ संकल्परहित, होऊ शकते का? होऊ शकते की याच्यासाठी वेळ हवा आहे? अजूनपर्यंत बापदादांकडे कोणत्याही सेंटरने हा रिपोर्ट दिलेला नाहीये की, आमचे सेंटर सदैव निर्विघ्न आहे, साथीदार देखील निर्विघ्न आहेत. फक्त स्वतः निर्विघ्न नाही, परंतु साथीदार देखील निर्विघ्न असावेत. ती देखील वेळ येणार आहे. होऊन जाईल कारण बनायचे तर मुलांनाच आहे आणि काहीजण उदाहरण म्हणून येतील जे नंतर तीव्र पुरुषार्थी बनून पुढे जातील, परंतु मेजॉरिटी तर तुम्हालाच पुढे जायचे आहे. बापदादांनी पाहिले की मुरलीवर मेजॉरिटींचे प्रेम आहे परंतु जसे जगत-अंबेने प्रत्यक्ष जीवनामध्ये दाखवून दिले की, जे बाबांनी सांगितले ते करायचेच आहे, लक्ष्य ठेवले आणि पुरुषार्थाकडे लक्ष सुद्धा दिले. तुमच्या दीदी-दादी, ज्या ॲडव्हान्स पार्टीमध्ये देखील गेल्या आहेत त्यांनी सुद्धा अटेंशन दिले, आता तुम्हा लोकांची प्रतीक्षा करत आहेत. त्या विचारत आहेत की समाप्तीचे गेट कधी उघडणार? एक-दोघे तर उघडणार नाहीत ना! तर आता पुरुषार्थ करून गेट उघडण्याच्या वेळेला समीप आणा. संपन्न बनणे अर्थात समीप आणणे.

सर्व चोहो बाजूंच्या मुलांना बापदादा हृदयापासून प्रेम देत आहेत. त्याच सोबत बापदादांनी दोन महिन्यांसाठी जे काम दिले आहे, त्याचीही आठवण करून देत आहेत, का? जास्त करून हे व्यर्थ संकल्प पुरुषार्थाला वेगवान करण्याऐवजी धीमा करतात. म्हणून चोहो बाजूच्या मुलांना बापदादा प्रेमपूर्वक आठवणी सोबत याची देखील आठवण करून देत आहेत की, आता संगमाचा काळ किती श्रेष्ठ आणि मनोहारी आहे, या संगमाच्या काळातच बाबांकडून सर्व खजिने प्राप्त होतात, संगमाचा एक-एक सेकंद महान आहे, त्यामुळे संगमाच्या वेळेचे मूल्य सदैव आपल्या बुद्धीमध्ये ठेवा. संगमाचा एक सेकंद किती प्राप्ती करून देतो. तुम्हाला कोणी विचारले की, तुम्हाला काय मिळाले आहे!, तर काय उत्तर द्याल? ‘अप्राप्त नाही कोणतीही वस्तू आम्हा ब्राह्मणांच्या हृदयामध्ये’. ‘जे मिळवायचे होते ते मिळाले’. आता त्याला कार्यामध्ये लावत तीव्र पुरुषार्थी बनून समयाला समीप आणा. अच्छा. बापदादा पाहतात की सर्वांना उमंग येतो देखील आणि हा उमंग सदैव पुढे वाढवत राहा. अच्छा.

वरदान:-
आपल्या स्वरूपाद्वारे भक्तांना लाइटच्या क्राउनचा साक्षात्कार घडविणारे इष्ट देव भव

जेव्हापासून तुम्ही बाबांची मुले बनलात, पवित्रतेची प्रतिज्ञा केली तेव्हा रिटर्न मध्ये लाइटचा ताज प्राप्त झाला. या लाईटच्या ताज समोर रत्नांनी मढवलेला ताज काहीच नाही. जितके-जितके संकल्पामध्ये, बोलमध्ये आणि कर्मामध्ये प्युरिटीला धारण करत जाल तितका हा लाइटचा क्राउन स्पष्ट होत जाईल आणि इष्ट देवाच्या रूपामध्ये भक्तांसमोर प्रत्यक्ष होत जाल.

सुविचार:-
सदैव बापदादांच्या छत्रछायेच्या आत राहा, तर तुम्ही विघ्न-विनाशक बनाल.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

जसे बापदादा सदैव मुलांसोबत प्रत्येक पावलावर सहयोगी आहेत आणि शेवटपर्यंत राहतील. बाबांना कोणा प्रति घृणा वाटत नाही. सदैव अपकारी असणाऱ्यांचे देखील ते शुभचिंतक आहेत, असे फॉलो फादर. प्रत्येक आत्म्याप्रति सदैव शुभ भाव आणि भावना ठेवा. ‘याने असे का केले,’ हा विचार करण्याऐवजी या आत्म्याचे कल्याण कसे होईल - हा विचार करा तेव्हा म्हटले जाईल शुभचिंतक अथवा विश्व कल्याणकारी आत्मा.

विशेष सूचना - महिन्याच्या तिसऱ्या रविवारचा योग अभ्यास-

आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपाने एकत्र येऊन सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत आपल्या शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थित होऊन, शांतीच्या सागराच्या खोलवर जाऊन त्या परम सुखाची अथवा शीतलतेची गहन अनुभूति करावी, तसेच सर्व आत्म्यांना शांतीचे दान देण्याची सेवा करावी.