18-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बेहदचे बाबा आले आहेत तुम्हा मुलांचा ज्ञानाने शृंगार करण्याकरिता, उच्च पद प्राप्त करायचे असेल तर नेहमी सजलेले रहा”

प्रश्न:-
कोणत्या मुलांना पाहून बेहदचे बाबा खूप आनंदित होतात?

उत्तर:-
जी मुले सेवेसाठी एव्हररेडी राहतात, अलौकिक आणि पारलौकिक दोन्ही पित्यांना पूर्णपणे फॉलो करतात, ज्ञान-योगाद्वारे आत्म्याचा शृंगार करतात. पतितांना पावन बनविण्याची सेवा करतात, अशा मुलांना पाहून बेहदच्या बाबांना खूप आनंद होतो. बाबांची इच्छा आहे की, माझ्या मुलांनी मेहनत करून उच्च पद प्राप्त करावे.

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांप्रती सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, जसे लौकिक पित्याला मुले प्रिय वाटतात तसेच बेहदच्या पित्याला देखील बेहदची मुले प्रिय वाटतात. बाबा मुलांना शिकवतात, सावध करतात जेणेकरून मुलांनी उच्च पद प्राप्त करावे. हीच पित्याची इच्छा असते. तर बेहदच्या बाबांची देखील हीच इच्छा आहे. मुलांना ज्ञान आणि योगाच्या अलंकारांनी सजवतात. तुम्हाला दोन्ही बाबा खूप चांगल्या प्रकारे सजवतात जेणेकरून मुलांनी उच्च पद प्राप्त करावे. अलौकिक पिता देखील खुश होतात तर पारलौकिक पिता देखील खुश होतात. जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात, त्यांना पाहून गायले देखील जाते - फॉलो फादर. तर दोघांनाही फॉलो करायचे आहे. एक आहेत रूहानी आणि दुसरे आहेत हे अलौकिक फादर. तर पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे.

जेव्हा भट्टीमध्ये होता तेव्हा सर्वांचा मुकुटा सहित फोटो काढला गेला होता. बाबांनी तर समजावून सांगितले आहे की लाईटचा मुकुट काही असत नाही. ही एक पवित्रतेची खूण आहे, जी सर्वांना दाखवतात. असे नाही कोणता पांढरा लाईटचा मुकुट असतो. ही तर पवित्रतेची निशाणी समजली जाते. सर्वप्रथम तुम्ही राहता सतयुगामध्ये. तुम्हीच होता ना. बाबा देखील सांगतात, ‘आत्मा और परमात्मा अलग रहे बहुकाल…’ तुम्ही मुलेच सर्वप्रथम येता आणि मग सर्वात आधी तुम्हालाच जायचे आहे. मुक्तीधामचे गेट देखील तुम्हालाच उघडायचे आहे. तुम्हा मुलांना बाबा सजवतात. माहेरी वनवासात राहतात. यावेळी तुम्हाला देखील साधारण रहायचे आहे. तुमचे राहणीमान ना उच्च असावे, ना अतिसामान्य असावे. बाबा देखील म्हणतात - साधारण तनामध्ये प्रवेश करतो. कोणत्याही देहधारीला भगवान म्हणू शकत नाही. मनुष्य, मनुष्याची सद्गती करू शकत नाही. सद्गती तर गुरुच करतात. मनुष्य साठीनंतर वानप्रस्थ स्विकारतात आणि नंतर गुरु करतात. हा देखील रिवाज आताचा आहे जो मग भक्तीमार्गामध्ये चालतो. आजकाल तर लहान मुलांना देखील गुरु करून देतात. भले वानप्रस्थ अवस्था तर नाही आहे परंतु अचानक मृत्यू तर होतो ना म्हणून मुलांना देखील गुरू करून देतात. जसे बाबा म्हणतात - तुम्ही सर्व आत्मे आहात, तुम्हाला वारसा प्राप्त करण्याचा अधिकार आहे. ते (दुनियावाले) म्हणतात - ‘गुरु बिगर ठौर नही पायेंगे’ अर्थात गुरूशिवाय तुम्ही ब्रह्ममध्ये लीन होऊ शकणार नाही. तुम्हाला काही लीन व्हायचे नाहीये. हे भक्तीमार्गातील शब्द आहेत. आत्मा तर ताऱ्याप्रमाणे, बिंदू आहे. बाबा देखील बिंदू आहेत. त्या बिंदूलाच ज्ञान सागर म्हटले जाते. तुम्ही देखील सूक्ष्म आत्मा आहात. त्यामध्ये सारे ज्ञान भरले जाते. तुम्ही पूर्ण ज्ञान घेता. पास विद् ऑनर आहेत ना. असे नाही की शिवलिंग काही इतके मोठे आहे. जितकी मोठी आत्मा आहे, तितकेच परम आत्मा आहेत. आत्मा परमधामहून पार्ट बजावण्याकरिता येते. बाबा म्हणतात - मी देखील तिथूनच येतो. परंतु मला माझे शरीर नाही आहे. मी ‘रूप’ देखील आहे तर ‘बसंत’ देखील आहे (ज्योती स्वरूप देखील आहे तर ज्ञान स्वरूप आहे). परम-आत्मा रूप आहे, त्यांच्यामध्ये सारे ज्ञान भरलेले आहे, ज्ञानाचा पाऊस पाडतात तर सर्व मनुष्य पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनतात. बाबा गती सद्गती दोन्ही देतात. तुम्ही सद्गतीमध्ये जाता बाकी सर्व गतीमध्ये अर्थात आपल्या घरी जातात. ते आहे - स्वीट होम. आत्माच या कानांद्वारे ऐकते. आता बाबा म्हणतात - गोड-गोड सिकीलध्या मुलांनो, आता परत घरी जायचे आहे, त्यासाठी जरूर पवित्र बनायचे आहे. पवित्र बनल्याशिवाय कोणीही परत जाऊ शकत नाही. मी सर्वांना घेऊन जाण्याकरिता आलो आहे. आत्म्यांना शिवाची वरात म्हटले जाते. आता शिवबाबा शिवालयाची स्थापना करत आहेत. मग रावण येऊन वेश्यालय स्थापन करतो. वाममार्गाला वेश्यालय म्हटले जाते. बाबांकडे अशी पुष्कळ मुले आहेत जी विवाह करून देखील पवित्र राहतात. संन्याशी तर म्हणतात - असे होऊ शकत नाही, जे दोघे एकत्रित राहू शकतील. इथे सांगितले जाते, यामध्ये प्राप्ती खूप आहे. पवित्र राहिल्याने २१ जन्मांची राजधानी मिळते तर एक जन्म पवित्र राहणे काही मोठी गोष्ट थोडीच आहे. बाबा म्हणतात - तुम्ही काम-चितेवर बसून एकदम काळे बनला आहात. श्रीकृष्णासाठी देखील म्हणतात - गोरा आणि सावळा, श्याम-सुंदर. हे स्पष्टीकरण याच काळातील आहे. काम-चितेवर बसल्याने सावळा बनला, आणि मग त्याला खेड्यातील मुलगा देखील म्हटले जाते; बरोबर आहे ना. श्रीकृष्ण तर असू शकत नाही. यांच्याच अनेक जन्मांच्या अंतामध्ये बाबा प्रवेश करून गोरे बनवतात. आता तुम्हाला एका बाबांचीच आठवण करायची आहे. बाबा, तुम्ही किती गोड आहात, तुम्ही किती गोड वारसा देता. आम्हाला मनुष्यापासून देवता, मंदिर लायक बनवता. अशाप्रकारे स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत. मुखावाटे काही बोलायचे नाहीये. भक्तीमार्गामध्ये तुम्ही माशुकची किती आठवण करत आला आहात - आता तुम्ही येऊन भेटला आहात, बाबा तुम्ही तर सर्वात गोड आहात. आम्ही तुमची आठवण का नाही करणार. तुम्हाला प्रेमाचा, शांतीचा सागर म्हटले जाते, तुम्हीच वारसा देता, बाकी प्रेरणेने काहीही मिळत नाही. बाबा तर सन्मुख येऊन तुम्हा मुलांना शिकवत आहेत. ही पाठशाळा आहे ना. बाबा म्हणतात - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. हा राजयोग आहे. आता तुम्ही मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतनला जाणले आहे. इतकी छोटी आत्मा कसा पार्ट बजावते. आहे देखील पूर्व-नियोजित. याला म्हटले जाते - अनादि-अविनाशी वर्ल्ड ड्रामा. ड्रामा फिरत राहतो, यामध्ये संशय वाटण्याचा काही प्रश्नच नाही. बाबा सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात, तुम्ही स्वदर्शनचक्रधारी आहात. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र फिरत राहते. तर त्याद्वारे तुमची पापे नष्ट होतात. बाकी श्रीकृष्णाने काही सुदर्शन चक्र चालवून हिंसा केलेली नाहीये. तिथे तर ना युद्धाचा हिंसाचार होतो, ना काम कटारी चालते. डबल अहिंसक असतात. यावेळी तुमचे ५ विकारांसोबत युद्ध चालते. बाकी दुसऱ्या कोणत्या युद्धाची गोष्टच नाही. आता बाबा आहेत उच्च ते उच्च, नंतर मग आहेत उच्च ते उच्च वारसा लक्ष्मी-नारायण, यांच्यासारखे श्रेष्ठ बनायचे आहे. जितका तुम्ही पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. कल्प-कल्प तुमचे हेच शिक्षण राहील. आता चांगला पुरुषार्थ केलात तर कल्प-कल्प करत रहाल. भौतिक शिक्षणाद्वारे इतके पद मिळू शकत नाही जितके रूहानी शिक्षणाद्वारे मिळते. उच्च ते उच्च हे लक्ष्मी-नारायण बनतात. हे देखील आहेत तर मनुष्यच परंतु दैवी गुण धारण करतात म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. बाकी ८-१० भुजावाले असे तर कोणी नाही आहेत. भक्तीमध्ये साक्षात्कार होतो तर खूप रडतात, दुःखाश्रू ढाळतात. इथे तर बाबा म्हणतात - अश्रू आले तर नापास. ‘अम्मा मरे तो हलुआ खाओ…’ आजकाल तर मुंबईमध्ये देखील कोणी आजारी पडतात किंवा मृत्यू होतो तेव्हा बी. के. ला बोलावतात की येऊन शांती द्या. तुम्ही समजावून सांगता - आत्म्याने एक शरीर सोडून दुसरे घेतले, यामध्ये तुमचे काय जाते. रडून उपयोग काय. म्हणतात, यांना काळाने खाल्ले…, असे काही नाही आहे. हे तर आत्मा स्वतःहून एक शरीर सोडून निघून जाते. आपल्या वेळेवर शरीर सोडून पळते. बाकी काळ अशी काही गोष्ट नाही आहे. सतयुगामध्ये गर्भ-महाल असतो, सजा होण्याची गोष्टच नाही. तिथे तुमची कर्म अकर्म होतात. मायाच नाही ज्यामुळे विकर्म होतील. तुम्ही विकर्माजीत बनता. सर्वात पहिले विकर्माजीत संवत चालते. नंतर मग भक्तिमार्ग सुरू होतो तर विक्रम संवत सुरू होते. यावेळी जी विकर्म केली आहेत त्यावर तुम्ही विजय प्राप्त करता, म्हणून नाव ठेवले जाते - ‘विकर्माजीत’. मग द्वापरमध्ये विक्रम राजा होतो, विकर्म करत राहतात. सुईवर जर गंज चढलेली असेल तर चुंबक खेचणार नाही. जितकी पापांची गंज निघत जाईल तेवढा चुंबक खेचून घेईल. बाबा तर संपूर्ण पवित्र आहेत. तुम्हाला देखील योगबलाद्वारे पवित्र बनवतात. जसे लौकिक पिता देखील मुलांना पाहून आनंदित होतात ना. बेहदचे पिता देखील मुलांच्या सेवेवर खुश होतात. मुले खूप मेहनत देखील करत आहेत. सेवेसाठी तर नेहमी एव्हररेडी रहायचे आहे. तुम्ही मुले आहात पतितांना पावन बनविणारे ईश्वरीय मिशन. आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात, बेहदचे पिता आहेत आणि तुम्ही सर्व भाऊ-बहिणी आहात. बस्स अजून दुसरे कोणतेही नाते नाही. मुक्तिधाममध्ये आहेतच बाबा आणि तुम्ही आत्मे भाऊ-भाऊ; नंतर मग तुम्ही सतयुगामध्ये जाता तर तिथे एक मुलगा आणि एक मुलगी बस्स, इथे तर खूप नाती आहेत - चुलते, काका, मामा… इत्यादी.

मूलवतन तर आहेच स्वीट होम, मुक्तिधाम. त्यासाठी माणसे किती यज्ञ इत्यादी करतात परंतु परत तर कोणी जाऊ शकत नाही. थापा खूप मारत राहतात. सर्वांचा सद्गती दाता तर आहेच एक, दुसरा कोणीही नाही. आता तुम्ही आहात संगमयुगावर. इथे आहेत असंख्य मनुष्य. सतयुगामध्ये तर फार थोडे असतात. स्थापना आणि मग विनाश होतो. आता अनेक धर्म असल्या कारणाने किती गदारोळ माजलेला आहे. तुम्ही १०० टक्के सॉल्व्हेंट (पवित्र) होता. मग ८४ जन्मा नंतर १०० टक्के इनसॉल्व्हेंट (पतित) बनला आहात. आता बाबा येऊन सर्वांना जागे करतात. आता जागे व्हा, सतयुग येत आहे. सत्य बाबाच तुम्हाला २१ जन्मांचा वारसा देतात. भारतच सचखंड बनतो. बाबा सचखंड बनवतात, तर मग झूठखंड कोण बनवतो? ५ विकाररुपी रावण. रावणाचा किती मोठा पुतळा बनवतात मग त्याला जाळतात कारण हा आहे नंबर वन शत्रू. लोकांना हे ठाऊक नाही आहे की, रावण राज्य केव्हा पासून सुरू झाले आहे. बाबा समजावून सांगतात - अर्धे कल्प आहे राम राज्य, अर्धे कल्प आहे रावण राज्य. बाकी रावण काही मनुष्य नाही आहे, ज्याला मारायचे आहे. यावेळी साऱ्या दुनियेवर रावण राज्य आहे, बाबा येऊन राम राज्य स्थापन करतात, मग जय-जयकार होतो. तिथे सदैव आनंद असतो. ते आहेच सुखधाम. याला म्हटले जाते पुरुषोत्तम संगमयुग. बाबा म्हणतात - या पुरुषार्थाद्वारे तुम्ही असे बनणार आहात. तुमची चित्रे देखील बनवली होती, खूप आले मग सुनन्ती, कथन्ती, भागन्ती झाले. बाबा येऊन तुम्हा मुलांना खूप प्रेमाने समजावून सांगतात. पिता, टीचर प्रेम करतात, गुरू देखील प्रेम करतात. ‘सद्गुरु का निंदक ठौर न पाये’. तुमचे एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. त्या गुरूंकडे तर कोणते एम ऑब्जेक्ट काही नसते. ते काही शिक्षण नाहीये, हे तर शिक्षण आहे. याला म्हटले जाते युनिव्हर्सिटी कम हॉस्पिटल, ज्याद्वारे तुम्ही एव्हरहेल्दी, वेल्दी बनता (निरोगी आणि समृद्ध बनता). इथे तर आहेच खोटे, गातात देखील - ‘झूठी काया…’ सतयुग आहे सचखंड. तिथे तर हिरे-माणकांचे महाल असतात. सोमनाथाचे मंदिर देखील भक्तिमार्गामध्ये बनवलेले आहे. किती धन होते जे मग मुसलमानांनी येऊन लुटून नेले. मोठ-मोठ्या मस्जिदी बनवल्या. बाबा तुम्हाला कुबेराचा खजिना देतात. सुरुवातीपासूनच तुम्हाला सर्व साक्षात्कार घडवत आले आहेत. अल्लाह अवलदीन बाबा आहेत ना. सर्वात पहिला धर्म स्थापन करतात. तो आहे डिटीज्म (देवी-देवता धर्म). जो धर्म आता राहिलेला नाहीये तो पुन्हा स्थापन होत आहे. सर्व जाणतात प्राचीन सतयुगामध्ये यांचेच राज्य होते, त्यांच्याहून मोठे अजून कोणीही नाही. डीटी राज्यालाच पॅराडाईज म्हटले जाते. आता तुम्ही जाणता मग इतरांना सांगायचे आहे. सर्वांना कसे माहित होईल, जेणेकरून नंतर कोणी अशी तक्रार करू नये की, आम्हाला कळलेच नाही. तुम्ही सर्वांना सांगता तरी देखील बाबांना सोडून निघून जातात. ही हिस्ट्री मस्ट रिपीट. बाबांकडे येतात तेव्हा बाबा विचारतात - यापूर्वी कधी भेटला होता? म्हणतात - होय बाबा, ५ हजार वर्षांपूर्वी आम्ही भेटायला आलो होतो. बेहदचा वारसा घेण्यासाठी आलो होतो; कोणी येऊन ऐकतात, कोणाला ब्रह्माचा साक्षात्कार होतो, तर त्याची आठवण येते. आणि मग म्हणतात - आम्ही तर हेच रूप पाहिले होते. बाबा देखील मुलांना पाहून खुश होतात. तुमची अविनाशी ज्ञानरत्नांनी झोळी भरते ना. हे शिक्षण आहे. सात दिवसांचा कोर्स करून मग भले कुठेही राहून मुरलीच्या आधारावर चालू शकता, ७ दिवसांमध्ये इतके समजावून सांगू ज्यामुळे मग तुम्हाला मुरली समजू शकेल. बाबा तर मुलांना सर्व रहस्ये चांगल्या रीतीने समजावून सांगत रहातात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वदर्शन चक्र फिरवत पापांना भस्म करायचे आहे, रूहानी शिक्षणा द्वारे आपले पद श्रेष्ठ बनवायचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अश्रू ढाळायचे नाहीत.

२) ही वानप्रस्थ अवस्थेमध्ये राहण्याची वेळ आहे, त्यामुळे वनवासामध्ये अतिशय सामान्य राहायचे आहे. राहणीमान ना उच्च असावे, ना अतिसामान्य असावे. परत घरी जाण्याकरिता आत्म्याला संपूर्ण पावन बनवायचे आहे.

वरदान:-
नेहमी मोल्ड होण्याच्या विशेषतेद्वारे संपर्क आणि सेवेमध्ये सफल होणारे सफलता मूर्त भव

ज्या मुलांमध्ये स्वतःला मोल्ड करण्याची विशेषता आहे ते सहजच गोल्डन एजच्या स्टेज पर्यंत पोहोचू शकतात. जशी वेळ असेल, जशी परिस्थिती असेल त्यानुसार आपल्या धारणांना प्रत्यक्ष करण्यासाठी मोल्ड व्हावे लागते. मोल्ड होणारेच रियल गोल्ड आहेत. जशी साकार बाबांची विशेषता पाहिली की, जशी वेळ, जशी व्यक्ती तसे रूप - असे फॉलो फादर करा, तेव्हा सेवा आणि संपर्क सर्व गोष्टींमध्ये सहज सफलतामूर्त बनाल.

बोधवाक्य:-
जिथे सर्व शक्ती आहेत तिथे निर्विघ्न सफलता सोबत आहे.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

जसे साकारमध्ये येण्या-जाण्याची प्रॅक्टिस सोपी झाली आहे, तसे आत्म्याला आपल्या कर्मातीत अवस्थेमध्ये राहण्याची देखील प्रॅक्टिस व्हावी. आता-आता कर्मयोगी बनून कर्मामध्ये येणे, कर्म समाप्त झाले की पुन्हा कर्मातीत अवस्थेमध्ये राहणे, याचा अनुभव सोपा होत जावा. नेहमी हेच ध्येय ठेवा की कर्मातीत अवस्थेमध्ये रहायचे आहे, निमित्त मात्र कर्म करण्यासाठी कर्मयोगी बना आणि पुन्हा कर्मातीत व्हा.