19-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला नशा राहिला पाहिजे की आम्ही ब्राह्मण सो देवता बनत आहोत, आम्हा ब्राह्मणांनाच बाबांचे श्रेष्ठ मत मिळत आहे”

प्रश्न:-
ज्यांचे नवीन रक्त आहे त्यांना कोणता छंद आणि कशाचा उत्साह असला पाहिजे?

उत्तर:-
ही दुनिया जी जुनी आयर्न एज्ड बनली आहे, तिला नवीन गोल्डन एज्ड बनविण्याचा, जुन्याला नवीन बनविण्याचा छंद असायला हवा. कन्यांचे नवीन रक्त आहे, तर आपल्या हमजीन्सना (आपल्या बरोबरीच्यांना) उठवले पाहिजे (ज्ञानामध्ये आणले पाहिजे). नशा कायम ठेवला पाहिजे. भाषण करण्यासाठी देखील खूप उत्साह असला पाहिजे.

गीत:-
रात के राही...

ओम शांती।
मुलांना या गाण्याचा अर्थ तर समजला. आता भक्तीमार्गाची घोर अंधारी रात्र तर पूर्ण होत आहे. मुले समजतात आमच्यावर आता मुकुट येणार आहे. इथे बसलो आहोत, एम ऑब्जेक्ट आहे - मनुष्यापासून देवता बनण्याचे. जसे संन्यासी समजतात तुम्ही स्वतःला म्हैस समजलात तर तसे रूप होईल. ते भक्तीमार्गाचे दृष्टांत आहेत. जसा हा देखील दृष्टांत आहे की, रामाने वानरांची सेना घेतली. तुम्ही इथे बसले आहात. जाणता की आम्ही सो देवी-देवता डबल मुकुटधारी बनणार. जसे शाळेत शिकतात तर म्हणतात - मी हे शिकून डॉक्टर बनणार आहे, इंजिनीयर बनणार आहे. तुम्ही समजता या शिक्षणाने आम्ही सो देवी-देवता बनत आहोत. हे शरीर सोडू आणि आमच्या डोक्यावर मुकुट असेल. ही तर खूप वाईट घाणेरडी दुनिया आहे ना. नवी दुनिया फर्स्ट क्लास दुनिया आहे. जुनी दुनिया अगदी थर्ड क्लास आहे. ही तर नष्ट होणार आहे. नवीन विश्वाचा मालक बनविणारा जरूर विश्वाचा रचयिताच असेल. दुसरा कोणी शिकवू शकणार नाही. शिवबाबाच तुम्हाला शिकवून तयार करत आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे - पूर्ण आत्म-अभिमानी बनलात तर बाकी अजून काय पाहिजे! तुम्ही ब्राह्मण तर आहातच. जाणता आपण देवता बनत आहोत. देवता किती पवित्र होते. इथे किती पतित मनुष्य आहेत. चेहरा भले मनुष्याचा आहे, परंतु सीरत (आचरण) बघा कसे आहे. जे देवतांचे पुजारी आहेत ते स्वतः देखील त्यांच्यापुढे महिमा गातात - ‘तुम्ही सर्व गुणसंपन्न, १६ कलासंपूर्ण आहात…’ आम्ही विकारी पापी आहोत. चेहरा तर त्यांचा देखील मनुष्याचाच आहे, परंतु त्यांच्या जवळ जाऊन महिमा गातात, स्वतःला घाण, विकारी म्हणतात. आमच्यामध्ये काहीच गुण नाहीत. आहेत तर मनुष्य अर्थात मनुष्य. आता तुम्ही समजता आम्ही तर आत्ता बदलून जाऊन देवता बनू. श्रीकृष्णाची पूजा करतातच यासाठी की, आपण कृष्णपुरी मध्ये जावे. परंतु हे ठाऊक नाही आहे की, केव्हा जाऊ. भक्ती करत राहतात की भगवान येऊन भक्तीचे फळ देतील. पहिल्यांदा तर तुम्हाला हा निश्चय पाहिजे की, आपल्याला कोण शिकवत आहे. हे आहे श्री श्री शिवबाबांचे मत. शिवबाबा तुम्हाला श्रीमत देत आहेत. ज्यांना हे ठाऊकच नाहीये, ते श्रेष्ठ कसे बरे बनू शकतील? इतके सर्व ब्राह्मण श्री श्री शिवबाबांच्या मतानुसार चालत आहेत. परमात्म्याचे मतच श्रेष्ठ बनवते, ज्याच्या नशिबात असेल, त्याच्या बुद्धीत बसेल. नाही तर काहीही समजणार नाहीत. जेव्हा समजतील तेव्हा आनंदित होऊन मदत करू लागतील. बरेचजण तर जाणतच नाहीत, त्यांना काय माहीत हे कोण आहेत म्हणून बाबा कोणाला भेटत देखील नाहीत. ते तर अजूनच आपले मत देऊ लागतील. श्रीमताला न जाणल्या कारणाने त्यांना सुध्दा आपले मत देऊ लागतात. आता बाबा आलेच आहेत मुळी तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनविण्याकरिता. मुले जाणतात - ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे बाबा आम्ही तुम्हाला येऊन भेटलो आहोत. ज्यांना माहीतच नाहीये, ते असा प्रतिसाद देऊ शकत नाहीत. मुलांना या शिक्षणाचा खूप अभिमान वाटला पाहिजे. हे खूप उच्च शिक्षण आहे, परंतु माया देखील खूप विरुद्ध आहे. तुम्ही जाणता आम्ही असे शिक्षण घेतो ज्यामुळे आमच्या मस्तकावर डबल मुकुट येणार आहे. भविष्य जन्म-जन्मांतरासाठी डबल मुकुटधारी बनू. तर यासाठी मग असा पुरुषार्थ केला पाहिजे ना. याला म्हटले जाते - राजयोग. किती आश्चर्य आहे. बाबा नेहमी सांगतात - लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जा. पुजाऱ्यांना देखील तुम्ही हे ज्ञान समजावून सांगू शकता. पुजारी देखील बसून कोणाला ज्ञान सांगतील की या लक्ष्मी-नारायणाला हे पद कसे मिळाले, हे विश्वाचे मालक कसे बनले? अशा प्रकारे बसून सांगितले तर पुजाऱ्याचा देखील सन्मान होईल. तुम्ही त्यांना सांगू शकता की, आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की या लक्ष्मी-नारायणाला हे राज्य कसे मिळाले? गीतेमध्ये देखील भगवानुवाच आहे ना. मी तुम्हाला राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवतो. स्वर्गवासी तर तुम्ही बनता ना! तर मुलांना किती अभिमान वाटला पाहिजे की, आम्ही हे बनत आहोत! भले स्वतःचा आताचा फोटो आणि राजेशाही पोशाखातील फोटो देखील इथे एकत्र काढा. खाली तुमचा फोटो, वरती राजेशाहीचा फोटो असावा. यामध्ये काही खर्च तर नाहीये ना. राजेशाही पोशाख तर लगेच बनू शकतो. तर प्रत्येक क्षणी हे लक्षात राहील की, आपण सो देवता बनत आहोत. भले वरती शिवबाबा देखील असावेत. असे फोटो देखील काढावे लागतील. तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. आपण हे शरीर सोडून जाऊन देवता बनणार कारण आता आम्ही हा राजयोग शिकत आहोत. तर हे फोटो देखील मदत करतील. वरती शिव मग राजेशाहीचा फोटो. खाली तुमचे सामान्य चित्र. शिवबाबांकडून राजयोग शिकून आम्ही सो देवता डबल मुकुटधारी बनत आहोत. फोटो ठेवलेला असेल, आणि कोणी विचारले तर आपण सांगू शकतो - आम्हाला शिकवणारे हे शिवबाबा आहेत. फोटो पाहिल्यानेच मुलांना नशा चढेल. भले दुकानामध्ये देखील हे चित्र ठेवा. भक्तीमार्गामध्ये बाबा नारायणाचा फोटो ठेवत होते. पाकिटामध्ये देखील असायचा. तुम्ही देखील आपला फोटो ठेवा तर आठवण राहील की, आम्ही सो देवी-देवता बनत आहोत. बाबांची आठवण करण्याचे उपाय (मार्ग) शोधले पाहिजेत. बाबांना विसरल्यामुळेच खाली पडतात (पतन होते). विकारामध्ये पडला तर मग लाज वाटेल. आता काही मी असे देवता बनू शकणार नाही. हार्ट फेल होईल. आता मी देवता कसे बनू? बाबा म्हणतात - विकारामध्ये जाणाऱ्याचा फोटो काढा आणि त्याला सांगा की, तू स्वर्गामध्ये येण्यालायक नाहीस, तुझा पासपोर्ट समाप्त. स्वतः देखील अनुभव करतील मी तर कोसळलो (पतित बनलो). आता मी स्वर्गामध्ये कसे जाणार? जसे नारदाचे उदाहरण देतात. त्याला सांगितले - तू आपले तोंड तर बघ. लक्ष्मीला वरण्या लायक आहेस? तर चेहरा माकडाचा दिसू लागला. मग मनुष्याला देखील लाज वाटेल - माझ्यामध्ये तर हा विकार आहे, मग मी श्री नारायणाला किंवा श्री लक्ष्मीला कसे वरणार? बाबा युक्त्या तर सर्व सांगतात, परंतु कोणी विश्वास ठेवेल तर ना. विकाराची नशा येते तेव्हा समजतात या हिशोबाने आम्ही राजांचाही राजा डबल मुकुटधारी कसे बनणार. पुरुषार्थ तर केला पाहिजे ना. बाबा समजावून सांगत राहतात - अशा प्रकारच्या युक्त्या करा आणि सर्वांना सांगत रहा. ही राजयोगाची स्थापना होत आहे. आता विनाश समोर उभा आहे. दिवसेंदिवस वादळ अधिकच तीव्र होत चालले आहे. बॉम्ब्स इत्यादी देखील तयार होत आहेत. तुम्ही हे शिक्षण शिकताच मुळी भविष्य उच्च पद प्राप्त करण्यासाठी. तुम्ही एकदाच पतितापासून पावन बनता. मनुष्य समजतात थोडेच की आपण नरकवासी आहोत, कारण पत्थर-बुद्धी आहेत. आता तुम्ही पत्थर-बुद्धी पासून पारस-बुद्धी बनत आहात. नशिबात असेल तर पटकन समजेल. नाहीतर तुम्ही कितीही डोके आपटा, बुद्धीत बसणार नाही. बाबांनाच जाणत नाहीत तर नास्तिक आहेत अर्थात बिना धनीचे आहेत. जेव्हा शिवबाबांची मुले आहात तर धनीचे बनले पाहिजे ना. इथे ज्यांना ज्ञान आहे ते आपल्या मुलांना विकारांपासून वाचवत रहातील. अज्ञानी लोक तर आपल्या सारखेच मुलांना देखील विकारामध्ये अडकवत राहतील. तुम्ही जाणता इथे विकारांपासून वाचवले जाते. कुमारींना तर पहिले वाचवले पाहिजे. आई-वडील जणूकाही मुलांना विकारामध्ये ढकलून देतात. तुम्ही जाणता ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. श्रेष्ठाचारी दुनिया हवीशी वाटते. भगवानुवाच - मी जेव्हा श्रेष्ठाचारी बनविण्यासाठी येतो तेव्हा सर्व भ्रष्टाचारी असतात. मी सर्वांचा उद्धार करतो. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे - भगवंतालाच साधू-संत इत्यादी सर्वांचा उद्धार करण्यासाठी यायचे आहे. एक भगवान बाबाच येऊन सर्वांचा उद्धार करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटते - मनुष्य किती पत्थर-बुध्दी बनतात. यावेळी मोठ-मोठ्या व्यक्तींना जर का कळले की, गीतेचा भगवान शिव आहेत तर माहीत नाही काय होईल. हाहाकार माजेल. परंतु अजून अवकाश आहे. नाही तर सर्वांचे अड्डे एकदम हलू लागतील. खूप जणांची सिंहासने हलतात ना. जेव्हा युद्ध होते तेव्हा कळते, यांचे सिंहासन डळमळू लागले आहे, आता खाली पडतील. आत्ता हे डळमळले तर खूप खळबळ माजेल. पुढे जाऊन हे होणार आहे. पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता स्वतः म्हणतात - बरोबर ब्रह्मा तनाद्वारे स्थापना करत आहे. सर्वांची सद्गती अर्थात उद्धार करत आहेत. भगवानुवाच - ही पतित दुनिया आहे, या सर्वांचा उध्दार मलाच करायचा आहे. आत्ता सर्व पतित आहेत. तर पतित कोणाला पावन कसे बरे बनवू शकतील? अगोदर स्वतः तर पावन बनावे लागेल तेव्हा मग फॉलोअर्सना बनवू शकतील. भाषण करण्यासाठी खूप उत्साह पाहिजे. कन्यांचे नवीन रक्त आहे. तुम्ही जुन्या पासून नवीन बनत आहात. तुमची आत्मा जी जुनी आयर्न एज्ड बनली आहे, आता नवीन गोल्डन एज्ड बनत आहे. गंज निघून जात आहे. तर मुलांना खूप हौस पाहिजे. उत्साह कायम ठेवला पाहिजे. आपल्या हमजीन्सना (बरोबरीच्यांना) उन्नत केले पाहिजे. गायले देखील जाते, गुरू माता. माता गुरू कधी असते ते आता तुम्ही जाणता. जगत अंबाच राज-राजेश्वरी बनते. मग तिथे कोणी गुरू असतच नाही. गुरुची परंपरा आता चालते. बाबा येऊन मातांवर ज्ञान अमृताचा कलश ठेवतात. सुरुवातीपासून असे होते. सेंटर्ससाठी देखील म्हणतात ब्रह्माकुमारी पाहिजे. बाबा तर म्हणतात स्वतःच चालवा. हिंमत नाही आहे का? तर म्हणतात - नाही बाबा, टीचर पाहिजे. हे देखील चांगले आहे, मान देतात.

आज-काल दुनियेमध्ये एकमेकांना मान देखील खोटा देतात. आज प्रधानमंत्री आहेत, उद्या त्यांना काढून टाकतात. स्थायी सुख कोणालाच मिळत नाही. यावेळी तुम्हा मुलांना स्थायी राज्य-भाग्य मिळत आहे. तुम्हाला बाबा हर प्रकारे समजावून सांगतात. स्वतःला सदैव हर्षित ठेवण्यासाठी खूप चांगल्या-चांगल्या युक्त्या सांगतात. शुभ भावना ठेवायची आहे ना. ओहो! आम्ही हे लक्ष्मी-नारायण बनत आहोत; आणि जर कोणाच्या नशिबात नसेल तर पुरुषार्थ तरी कसा करतील. बाबा पुरुषार्थ तर सांगतात ना. पुरुषार्थ व्यर्थ जात नाही. तो तर सदैव सफल होतो. राज्य स्थापन होईलच. विनाश देखील महाभारत युद्धा द्वारे होणारच आहे. पुढे जाऊन तुम्ही जोर केलात तर हे सर्व येतील. आता समजणार नाहीत; नाही तर मग त्यांचे राज्यच नष्ट होईल. किती भरपूर गुरु लोक आहेत, असा कोणी मनुष्य नाही जो कोणत्या गुरूचा फॉलोअर नसेल. इथे तुम्हाला सद्गती देणारे एक सद्गुरु मिळाले आहेत. चित्र खूप चांगली आहेत. हे आहे सद्गती अर्थात सुखधाम, हे आहे मुक्तिधाम. बुद्धी देखील म्हणते - आपण सर्व आत्मे निर्वाणधाम मध्ये राहतो. जिथून मग टॉकीमध्ये (वाणीमध्ये) येतो. तिथले रहिवासी आहोत. हा सर्व खेळच भारतावर बनलेला आहे. शिवजयंती देखील इथे साजरी करतात. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे. कल्पानंतर पुन्हा येईन.’ दर ५ हजार वर्षानंतर बाबांच्या आगमनानेच पॅराडाईज (स्वर्ग) बनतो. म्हणतात देखील - क्राईस्टच्या इतकी वर्षे आधी पॅराडाईज होता, स्वर्ग होता. आत्ता नाहीये, पुन्हा होणार आहे. तर जरूर नरकवासीयांचा विनाश आणि स्वर्गवासीयांची स्थापना पाहिजे. तर तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. सर्व नरकवासी नष्ट होतील. ते तर समजतात इतकी लाखो वर्षे अजून बाकी आहेत. मुले मोठी झाली की लग्न करू… तुम्ही थोडेच असे म्हणाल. जर मुलगा सल्ल्यानुसार चालत नसेल तर मग श्रीमत घ्यावे लागते की स्वर्गवासी बनत नाहीत तर काय करायचे? बाबा म्हणतील जर आज्ञाधारक नसेल तर सोडून द्या. याबाबतीत पक्की नष्टोमोहा अवस्था पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्री श्री शिवबाबांच्या श्रेष्ठ मतावर चालून स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे. श्रीमतामध्ये मनमत मिक्स करायचे नाही. ईश्वरीय अभ्यासामध्ये मग्न होऊन राहायचे आहे.

२) आपल्या हमजीन्सच्या कल्याणाच्या युक्त्या करायच्या आहेत. सर्वांप्रती शुभ भावना ठेवून सर्वांना खरा मान द्यायचा आहे. लंगडा (खोटा) मान नाही.

वरदान:-
बाबांच्या निरंतर सोबतीच्या अनुभूती द्वारे प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पामध्ये सहयोगी बनणारे सहजयोगी भव

जसे शरीर आणि आत्म्याचा जोपर्यंत पार्ट आहे, तोपर्यंत ते वेगळे होऊ शकत नाहीत, अगदी तशी बाबांची आठवण बुद्धीतून वेगळी होऊ नये. सदैव बाबांची सोबत असावी, दुसरी कोणतीही स्मृती आपल्याकडे आकर्षित करू नये. यालाच सहज आणि स्वतः योगी म्हटले जाते. असा योगी प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक वचन, प्रत्येक कर्मामध्ये सहयोगी असतो. सहयोगी अर्थात ज्याचा एकही संकल्प सहयोगाशिवाय नसावा. असे योगी आणि सहयोगी शक्तिशाली बनतात.

बोधवाक्य:-
समस्या-स्वरूप बनण्या ऐवजी समस्येला समाप्त करणारे समाधान स्वरूप बना.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

आपल्या स्थूल आणि सूक्ष्म बंधनांची यादी समोर ठेवा. हे लक्ष्य ठेवा की, मला बंधनमुक्त बनायचेच आहे. “आत्ता नाही तर कधीच नाही” सदैव हाच पाठ पक्का करा. “स्वतंत्रता ब्राह्मण जन्माचा अधिकार आहे” - आपला जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जेव्हा स्वत:ला गृहस्थी (संसारिक) समजता, तेव्हा गृहस्थीचे जाळे असते. गृहस्थी बनणे अर्थात जाळ्यात अडकणे. ट्रस्टी अर्थात मुक्ती.