19-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता भारत खास आणि सामान्य सर्व दुनियेवर बृहस्पतीची दशा बसणार आहे. बाबा
तुम्हा मुलांद्वारे भारताला सुखधाम बनवत आहेत”
प्रश्न:-
१६ कला संपन्न
बनण्यासाठी तुम्ही मुले कोणता पुरुषार्थ करता?
उत्तर:-
१) योगबल जमा करण्याचा. योगबलाद्वारे तुम्ही १६ कला संपन्न बनत आहात. यासाठी बाबा
म्हणतात - ‘दे दान तर सुटेल ग्रहण’. जो कामविकार खाली पाडणारा आहे, त्याचे दान द्या
तर तुम्ही १६ कला संपन्न बनाल. २) देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना, शरीराचे भान
सोडा.
गीत:-
तुम मात पिता…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी आपल्या रूहानी पित्याची महिमा ऐकली. ते गात राहतात आणि इथे
तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये त्या बाबांचा वारसा घेत आहात. तुम्ही जाणता बाबा आमच्या
द्वारेच भारताला सुखधाम बनवत आहेत. ज्यांच्याद्वारे बनवत आहेत जरूर तेच सुखधामचे
मालक बनतील. मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. बाबांची महिमा अपरंपार आहे.
त्यांच्याकडून आम्ही वारसा प्राप्त करत आहोत. आता तुम्हा मुलांवरच नव्हे तर संपूर्ण
दुनियेवर बृहस्पतीची अविनाशी दशा आहे. आता तुम्ही ब्राह्मणच जाणता की भारत खास आणि
सारी सामान्य दुनिया सर्वांवर आता बृहस्पतीची दशा बसणार आहे, कारण तुम्ही आता १६ कला
संपन्न बनत आहात. या वेळी तर एकही कला नाही आहे. मुलांनी खूप आनंदी असले पाहिजे. असे
नाही की इथे आनंद आहे आणि बाहेर गेल्यावर तो नाहीसा होईल. ज्यांची महिमा गातात, तेच
आता तुमच्यासमोर हजर आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - ५ हजार वर्षांपूर्वी देखील
तुम्हाला राज्य देऊन गेलो होतो. आता तुम्ही बघाल - हळूहळू सर्वजण आळवणी करू लागतील.
तुमची देखील स्लोगन्स (घोषवाक्ये) तयार होत राहतील. जसे इंदिरा गांधी म्हणत होत्या
की - एक धर्म, एक भाषा, एक राज्य असावे; यामध्ये देखील आत्मा बोलते ना. आत्मा जाणते
- बरोबर भारतामध्ये एक राजधानी होती, जी आता समोर उभी आहे. समजतात कधीही सर्व काही
नष्ट होईल, ही काही नवीन गोष्ट नाहीये. मग भारताला १६ कला संपूर्ण जरूर बनायचे आहे.
तुम्ही जाणता आपण या योगबलाद्वारे १६ कला संपूर्ण बनत आहोत. म्हणतात ना - दे दान तर
सुटेल ग्रहण. बाबा सुद्धा म्हणतात, विकारांचे दान द्या. हे रावण राज्य आहे. बाबा
येऊन यातून सोडवतात. यामध्ये देखील काम विकार सर्वात मोठा अवगुण आहे. तुम्ही
देह-अभिमानी बनला आहात. आता देही-अभिमानी बनावे लागेल. शरीराचे भान देखील सोडावे
लागेल. या गोष्टींना तुम्ही मुलेच समजता. दुनिया जाणत नाही. भारत जो १६ कला संपूर्ण
होता, संपूर्ण देवतांचे राज्य होते, आता ग्रहण लागलेले आहे. या लक्ष्मी-नारायणाची
राजधानी होती ना. भारत स्वर्ग होता. आता विकारांचे ग्रहण लागलेले आहे म्हणून बाबा
म्हणतात - ‘दे दान तर सुटेल ग्रहण’. हा कामविकारच खाली पाडणारा आहे, म्हणून बाबा
म्हणतात - याचे दान द्या, तर तुम्ही १६ कला संपन्न बनाल. जर नाही दिलेत तर १६ कला
संपन्न बनणार नाही. आत्म्यांना आपापला पार्ट मिळालेला आहे ना. हे देखील तुमच्या
बुद्धीमध्ये आहे - तुमच्या आत्म्यामध्ये किती पार्ट भरलेला आहे. तुम्ही विश्वाचे
राज्य-भाग्य प्राप्त करता. हा बेहदचा ड्रामा आहे. यामध्ये असंख्य ॲक्टर्स आहेत.
त्यामध्ये फर्स्टक्लास ॲक्टर आहेत - हे लक्ष्मी-नारायण. यांचा नंबर वन पार्ट आहे.
विष्णू सो ब्रह्मा-सरस्वती बनतात आणि पुन्हा ब्रह्मा-सरस्वती सो विष्णू बनतात. हे
८४ जन्म कसे घेतात - हे संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये येते. शास्त्र वाचून थोडेच कोणाला
समजते. ते तर कल्पाचे आयुष्यच लाखों वर्षांचे असल्याचे सांगतात. मग तर स्वस्तिक
सुद्धा बनू शकणार नाही. व्यापारी लोक चोपडी (खाते पुस्तक) लिहितात तर त्यावर
स्वस्तिक काढतात. गणेशाची पूजा करतात. हे आहे बेहदचे खाते पुस्तक. स्वस्तिकामध्ये ४
भाग असतात. जसे जगन्नाथपुरीमध्ये भाताचा हंडा ठेवतात आणि तो शिजला की त्याचे ४ भाग
होतात. तिथे भाताचाच भोग लावतात, कारण तिथे भात जास्त खातात. श्रीनाथद्वारे मध्ये
भात असत नाही. तिथे तर सर्व शुद्ध तुपातील ताजी पक्वाने बनवतात. जेव्हा भोजन बनवतात
तेव्हा देखील अत्यंत स्वच्छतेने, मौनमध्ये राहून बनवतात. प्रसाद अतिशय आदराने घेऊन
जातात, भोग लावून मग तो सर्व पंडे लोकांना दिला जातो. नंतर तो दुकानामध्ये ठेवतात.
तिथे खूप गर्दी असते. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) स्वतः पाहिलेले आहे. आता तुम्हा
मुलांना कोण शिकवत आहेत? मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय) बाबा येऊन तुमचे सेवाधारी बनले
आहेत, तुमची सेवा करत आहेत; एवढा नशा चढतो का? आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत.
आत्माच सर्व काही करते ना. मनुष्य मग म्हणतात - आत्मा निर्लेप आहे. तुम्ही जाणता की
आत्म्यामध्ये तर ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट भरलेला आहे; मग त्याला निर्लेप म्हणणे
म्हणजे किती रात्रं-दिवसाचा फरक होतो. जेव्हा हे कोणी चांगल्या रीतीने महिना-दीड
महिना बसून समजून घेतील तेव्हाच हे पॉइंट्स बुद्धीमध्ये पक्के होतात. दिवसेंदिवस
पॉइंट्स तर खूप निघत राहतात. हे जणू कस्तुरी सारखे आहे. मुलांना जेव्हा पूर्ण
निश्चय बसतो तेव्हा मग समजतात की, खरोखर परमपिता परमात्माच येऊन दुर्गतीमधून सद्गती
करतात.
बाबा म्हणतात - आता
तुमच्यावर बृहस्पतीची दशा आहे. मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवले होते, आता पुन्हा
रावणाने राहूची दशा बसवली आहे. आता पुन्हा बाबा आले आहेत तुम्हाला स्वर्गाचा मालक
बनविण्यासाठी. तर स्वतःला घाट्यात पाडायचे नाही. व्यापारी लोक आपले खाते नेहमी
व्यवस्थित ठेवतात. घाट्यात जाणाऱ्याला अडाणी म्हटले जाते. आता हा तर सर्वांत मोठा
व्यापार आहे. कोणी विरळा व्यापारीच हा व्यापार करेल. हाच अविनाशी व्यापार आहे; बाकी
सर्व व्यापार तर मातीमध्ये मिसळून जाणारे आहेत. आता तुमचा खरा व्यापार चालू आहे.
बाबा आहेत ज्ञानाचा सागर, सौदागर, रत्नागर. प्रदर्शनीमध्ये बघा कित्येक जण येतात.
सेंटरवर मात्र कोणी मुश्किलीने येतील. भारत तर खूप विशाल आहे ना. सर्वत्र तुम्हाला
जायचे आहे. पाण्याची गंगा संपूर्ण भारतात वाहते ना. हे देखील तुम्हाला समजावून
सांगावे लागेल की, पतित-पावन काही पाण्याची गंगा नाहीये. तुम्हा ज्ञानगंगांना जावे
लागेल. चोहो बाजूंना मेळावे आणि प्रदर्शनी होत राहतील. दिवसेंदिवस नवी चित्रे तयार
होत राहतील. अशी आकर्षक चित्रे असावीत ज्यांना पाहताच मजा येईल. हे तर योग्यच सांगत
आहेत, आता लक्ष्मी-नारायणाची राजधानी स्थापन होत आहे. शिडीचे चित्र देखील फर्स्ट
क्लास आहे. आता ब्राह्मण धर्माची स्थापना होत आहे. हे ब्राह्मणच पुढे मग देवता
बनतात. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात, तर मनातल्या मनात स्वतःला विचारत राहा -
माझ्यामध्ये कोणता छोटा-मोठा काटा तर नाही आहे ना? काम विकाराचा काटा तर नाही आहे
ना? क्रोधाचा छोटासा काटा तोही फार वाईट आहे. देवता कधी क्रोधी नसतात. दाखवतात की,
शंकराचा नेत्र उघडल्याने विनाश होतो. हा देखील एक कलंक लावलेला आहे. विनाश तर
होणारच आहे. सूक्ष्मवतनमध्ये शंकराच्या अंगावर काही साप इत्यादी थोडेच असू शकतात.
सूक्ष्मवतन आणि मूलवतनमध्ये बाग-बगीचे, सर्प इत्यादी काहीही नसते. हे सर्व इथे असते.
स्वर्ग देखील इथेच असतो. या वेळी मनुष्य काट्यांसारखे झाले आहेत, म्हणून याला
काट्यांचे जंगल म्हटले जाते. सतयुग आहे फुलांचा बगीचा. तुम्ही पाहता - बाबा कसा
सुंदर बगीचा बनवत आहेत. अत्यंत सुंदर बनवतात. सर्वांना हसीन (सुंदर) बनवतात. स्वतः
तर सदैव सुंदरच आहेत. सर्व सजणींना अथवा मुलांना सुंदर बनवतात. रावणाने पूर्णपणे
काळे करून टाकले आहे. आता तुम्हा मुलांना आनंद झाला पाहिजे की आपल्यावर बृहस्पतीची
दशा बसली आहे. अर्धा काळ सुख आणि अर्धा काळ दुःख असेल तर त्यात फायदाच काय? नाही,
तीन-चतुर्थांश भाग सुख आहे आणि एक-चतुर्थांश भाग दुःख आहे. हा ड्रामा पूर्वनियोजित
आहे. बरेच लोक विचारतात - ड्रामा असा का बनवला आहे? अरे, हा तर अनादि आहे ना! का
बनवला, हा प्रश्नच उठू शकत नाही. हा अनादि अविनाशी ड्रामा बनलेला आहे. बनी-बनाई (पूर्वनियोजित
आहे) तेच पुन्हा बनत आहे. कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. ही तर अनादि सृष्टी चालत
आलेली आहे आणि पुढे देखील चालतच राहील. प्रलय काही होत नाही.
बाबा नवीन दुनिया
निर्माण करतात, परंतु त्यामध्ये ताकद किती आहे. मनुष्य जेव्हा पतित, दुःखी होतात
तेव्हा बाबांना बोलावतात. बाबा येऊन सर्वांची काया कल्पतरू समान बनवतात, ज्यामुळे
अर्धा कल्प तुमचा कधीही अकाली मृत्यू होत नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता.
तर मुलांनी भरपूर पुरुषार्थ केला पाहिजे. जितके उच्च पद मिळवाल तितके चांगले आहे.
प्रत्येकजण जास्त कमाईसाठी पुरुषार्थ करतोच करतो. लाकूड विकणारे देखील म्हणतील -
आपण जास्त कमाई करावी. काहीजण फसवणूक करून सुद्धा कमाई करतात. पैशावरच सगळा अनर्थ
उभा राहतो. तिथे तर तुमचे पैसे कोणीही लुटू शकत नाही. पाहा, दुनियेमध्ये तर किती
काय-काय घडत आहे. तिथे अशी कोणती दुःखाची गोष्ट घडत नाही. आता तुम्ही बाबांकडून किती
वारसा घेत आहात. स्वतःची तपासणी केली पाहिजे - आपण स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक
आहोत का? (नारदाचे उदाहरण आहे) मनुष्य अनेक तीर्थयात्रा इत्यादी करत राहतात, मिळत
मात्र काहीच नाही. गाणे देखील आहे ना - ‘चारों तरफ लगाये फेरे फिर भी हरदम दूर रहे’.
आता बाबा तुम्हाला किती सुंदर यात्रा शिकवतात; यामध्ये कोणताही त्रास नाही. फक्त
बाबा म्हणतात - ‘मामेकम्(मज एकाची) आठवण करा’, तर विकर्म विनाश होतील. मी तुम्हाला
फार सुंदर युक्ति सांगतो तर मुले ऐकतात. हे माझे लोनवर घेतलेले शरीर आहे. या बाबांना
(ब्रह्मा बाबांना) किती आनंद होतो! आपण बाबांना हे शरीर लोनवर दिले आहे. बाबा मला
विश्वाचा मालक बनवतात. नाव देखील आहे भागीरथ. आता तुम्ही मुले रामपुरीमध्ये
जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तर पूर्णपणे पुरुषार्थाला लागले पाहिजे. काटा कशाला
बनायचे?
तुम्ही
ब्राह्मण-ब्राह्मणी आहात. सर्वांचा आधार मुरलीवर आहे. मुरली तुम्हाला मिळाली नाही
तर तुम्ही श्रीमत कुठून आणणार? असे नाही की फक्त एका ब्राह्मणीनेच मुरली ऐकवायची आहे.
कोणीही मुरली वाचून ऐकवू शकतो. सांगितले पाहिजे - ‘आज तुम्ही मुरली वाचून ऐकवा’. आता
तर समजावून सांगण्यासाठी प्रदर्शनीतील चित्रे देखील खूप चांगली बनवली आहेत. ही
मुख्य चित्रे तर आपल्या दुकानात ठेवा, अनेकांचे कल्याण होईल. बोला - या, आम्ही
तुम्हाला समजावून सांगतो की हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. एखाद्याचे कल्याण
करण्यामध्ये थोडा वेळ दिला तर त्यात काहीही नुकसान नाही. त्या व्यवहारासोबत हा
व्यवहार देखील करू शकता. हे बाबांचे अविनाशी ज्ञान रत्नांचे दुकान आहे. शिडीचे
चित्र आणि गीतेचा भगवान शिव, ही चित्रे नंबर वन चित्रे आहेत. भारतामध्ये शिव भगवान
आले होते, ज्यांची जयंती साजरी करतात. आता पुन्हा ते बाबा आलेले आहेत. यज्ञ देखील
रचलेला आहे. तुम्हा मुलांना राजयोगाचे ज्ञान ऐकवत आहेत. बाबाच येऊन तुम्हाला
राजांचाही राजा बनवतात. बाबा म्हणतात - मी तुम्हाला सूर्यवंशी राजा-राणी बनवतो,
ज्यांना मग विकारी राजे देखील नमस्कार करतात. तर स्वर्गाचे महाराजा-महाराणी
बनण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा काही घर इत्यादी बांधण्यास मनाई करत
नाहीत. भले बांधा. पैसे देखील शेवटी मातीमध्ये मिळणार आहेत; त्यापेक्षा घर बांधून
आरामात राहा. पैसे कार्यामध्ये लावले पाहिजेत. घर देखील बांधा, उपजीविकेसाठी देखील
ठेवा. लोक दान-पुण्य देखील करतात. जसे काश्मीरच्या राजाने आपली प्रॉपर्टी जी
प्रायव्हेट होती, ते सर्व आर्य समाजींना दान म्हणून दिली. आपल्या धर्म, जातीसाठी
करतात ना. इथे काही तशी गोष्ट नाहीये. सर्वजण मुले आहेत; जात इत्यादीची काही गोष्ट
नाही. त्या आहेत देहाच्या जाती. मी तर तुम्हा आत्म्यांना पवित्र बनवून, विश्वाची
बादशाही देतो. ड्रामानुसार भारतवासीच राज्य-भाग्य घेतील. आता तुम्ही मुले जाणता -
आपल्यावर बृहस्पतीची दशा बसलेली आहे. श्रीमत म्हणते - ‘मामेकम्(मज एकाची) आठवण करा’,
अजून कोणती गोष्ट नाही. भक्तिमार्गामध्ये व्यापारी लोक काही ना काही धर्माऊ म्हणून
जरूर बाजूला काढतात. त्याचे देखील फळ दुसऱ्या जन्मामध्ये अल्पकाळासाठी मिळते. आता
तर मी डायरेक्ट आलो आहे, तर तुम्ही या कार्यामध्ये लावा. मला स्वतःसाठी काहीही नको.
शिवबाबांना स्वतःसाठी घर इत्यादी बांधायचे आहे काय? हे सर्व तुम्हा ब्राह्मणांचे आहे.
गरीब, श्रीमंत सर्व एकत्र राहतात. काहीजण चिडतात म्हणतात - भगवंताकडे देखील समदृष्टी
नाहीये; कोणाला बंगल्यात, कोणाला झोपडीत ठेवतात. शिवबाबांना विसरून जातात.
शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहिले तर अशा गोष्टी बोलणार नाहीत. सर्वांची विचारपूस
करावी लागते ना. पाहिले जाते हे घरामध्ये इतके आरामात राहतात तर त्यानुसार व्यवस्था
करावी लागते. म्हणून सांगतात - सर्वांचे आदरातिथ्य करा. एखादी वस्तू नसेल तर ती
तुम्हाला मिळू शकते. बाबांचे तर मुलांवर प्रेम असतेच. एवढे प्रेम दुसऱ्या कोणाचे असू
शकत नाही. मुलांना किती समजावून सांगतात की, पुरुषार्थ करा. इतरांसाठी देखील युक्ति
रचा. यासाठी ३ पावले पृथ्वीची, जिथे बहिणी बसून ज्ञान समजावून सांगतील. एखाद्या
मोठ्या व्यक्तीचा हॉल असेल, तर त्यांना बोला - ‘आम्ही फक्त चित्रे ठेवतो.
सकाळ-संध्याकाळ एक-दोन तास क्लास करून निघून जाऊ. सर्व खर्च आमचा, नाव तुमचे होईल.
अनेकजण येऊन कौडीपासून हिर्यासारखे बनतील’. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जे काही
आपल्यामध्ये काटे आहेत (दुर्गुण आहेत) त्यांची तपासणी करून काढून टाकायचे आहेत.
रामपुरीमध्ये येण्याकरिता पुरुषार्थ करायचा आहे.
२) अविनाशी ज्ञान
रत्नांचा सौदा करून कोणाचेही कल्याण करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. हसीन (सुंदर)
बनायचे आहे आणि बनवायचे आहे.
वरदान:-
तमोगुणी
वायुमंडळामध्ये आपली स्थिती एकरस, अचल-अडोल ठेवणारे मास्टर सर्वशक्तिमान भव
दिवसें-दिवस परिस्थिती
अति तमोप्रधान बनणार आहे, वायुमंडळ अजूनच बिघडणार आहे. अशा वायुमंडळामध्ये कमलपुष्प
समान न्यारे राहणे, आपली स्थिती सतोप्रधान बनविणे - याकरिता इतकी हिंमत किंवा
शक्तीची आवश्यकता आहे. जेव्हा हे वरदान स्मृतीमध्ये राहते की, मी ‘मास्टर
सर्वशक्तिमान’ आहे तर प्रकृती द्वारे, भले लौकिक नात्या द्वारे, किंवा दैवी परिवारा
द्वारे कोणतीही परीक्षा आली तरीही त्यामध्ये नेहमी एकरस, अचल-अडोल रहाल.
बोधवाक्य:-
वरदाता बाबांना
आपला खरा दोस्त बनवा तर वरदानांनी तुमची झोळी भरलेली राहील.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. या परमात्म-ज्ञानाद्वारेच
विश्वामध्ये एक धर्म, एक राज्य, एक मताची स्थापना होते. तुमच्या या ब्राह्मण
संघटनच्या एकमताची विशेषता - देवता रूपाच्या प्रत्यक्ष रूपामध्ये चालते. ही
विशेषताच कमाल करेल, याद्वारेच बाबांचे नाव प्रसिद्ध होईल, प्रत्यक्षता होईल. तर या
विशेषतेमध्ये नंबर वन बना. यासाठी आपला जो मूळ संस्कार आहे, त्याला नष्ट करून,
बाप-दादांच्या संस्कारांना कॉपी करून समान आणि संपूर्ण बना तेव्हाच प्रत्येकाद्वारे
बाबा दिसून येतील आणि प्रत्यक्षता होईल.