19-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - श्रीमतच तुम्हाला श्रेष्ठ बनविणारे आहे, त्यामुळे श्रीमताला विसरू नका,
स्वतःचे मत सोडून एका बाबांच्या मताप्रमाणे चाला”
प्रश्न:-
पुण्यात्मा
बनण्याची कोणती युक्ती आहे?
उत्तर:-
(१) पुण्यात्मा बनायचे असेल तर सच्च्या दिलाने, प्रेमाने एका बाबांची आठवण करा. (२)
कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करू नका. (३) सर्वांना रस्ता दाखवा. आपल्या
मनाला विचारा - हे पुण्य मी किती करतो? आपली चेकिंग करा - असे कोणतेही कर्म घडू नये
ज्याची शिक्षा १०० पट खावी लागेल. तर चेकिंग केल्यामुळे पुण्य-आत्मा बनाल.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, हे तर मुलांना माहीत आहे की आता आपण
शिवबाबांच्या मताप्रमाणे चालत आहोत. त्यांचे आहे सर्वोच्च मत. दुनिया हे जाणत नाही
की, उच्च ते उच्च शिवबाबा मुलांना श्रेष्ठ बनविण्याकरिता कसे श्रेष्ठ मत देतात. या
रावण राज्यामध्ये कोणताही मनुष्यमात्र मनुष्याला श्रेष्ठ मत देऊ शकत नाही. तुम्ही
आता ईश्वरीय मतवाले बनत आहात. या वेळी तुम्हा मुलांना पतिताचे पावन बनण्यासाठी
ईश्वरीय मत मिळत आहे. आता तुम्हाला माहित झाले आहे आम्ही तर विश्वाचे मालक होतो. हे
(ब्रह्मा बाबा) जे मालक होते त्यांना सुद्धा माहीत नव्हते. विश्वाचे मालक मग एकदम
पतित बनतात. हा खेळ खूप चांगल्या प्रकारे बुद्धीने समजून घ्यायचा आहे. चूक काय,
बरोबर काय, याच्यामध्ये आहे बुद्धीचे युद्ध. सारी दुनिया चूक आहे. एक बाबाच बरोबर
आहेत, सत्य बोलणारे आहेत. ते तुम्हाला सचखंडाचे मालक बनवत आहेत तर त्यांचे मत घेतले
पाहिजे. स्वतःच्या मतानुसार चालल्यामुळे धोका खाल. परंतु ते आहेत गुप्त. आहेत देखील
निराकार. पुष्कळ मुले चूक करतात, समजतात - हे तर दादाचे (ब्रह्मा बाबांचे) मत आहे.
माया श्रेष्ठ मत घेऊ देत नाही. श्रीमतावर चालले पाहिजे ना. बाबा तुम्ही जे सांगाल
ते आम्ही जरूर मानणार. परंतु कित्येक मुले मानत नाहीत. नंबरवार पुरुषार्थानुसार
बाबांच्या मतावर चालतात बाकी तर आपलेच मत चालवतात. बाबा आले आहेत श्रेष्ठ मत
देण्याकरिता. अशा बाबांना घडोघडी विसरतात. माया मत घेऊ देत नाही. श्रीमत तर खूप सोपे
आहे ना. दुनियेमध्ये कोणालाच ही बुद्धी नाहीये की आपण तमोप्रधान आहोत. माझे मत तर
प्रसिद्ध आहे, श्रीमत भगवत गीता. भगवान आता म्हणतात - मी ५ हजार वर्षांनंतर येतो,
येऊन भारताला श्रीमत देऊन सर्वश्रेष्ठ बनवतो. बाबा तर सावध करतात, मुले
श्रीमताप्रमाणे चालत नाहीत. बाबा दररोज समजावून सांगत राहतात - मुलांनो, श्रीमतावर
चालायला विसरू नका. यांची (ब्रह्मा बाबांची) तर गोष्टच नाही. ते (शिवबाबा) सांगत
आहेत असे समजा. तेच यांच्यामार्फत मत देतात. तेच समजावून सांगतात. खाणे-पिणे घेत
नाहीत, म्हणतात - मी अभोक्ता आहे. तुम्हा मुलांना श्रीमत देतो. नंबरवन मत देतात -
‘माझी आठवण करा’. कोणतेही विकर्म करू नका. आपल्या मनाला विचारा किती पाप केले आहे?
हे तर जाणता सर्वांच्या पापांचा घडा भरला आहे. या वेळी सगळे चुकीच्या मार्गावर आहेत.
तुम्हाला आता बाबांद्वारे राईट रस्ता मिळाला आहे. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान
आहे. गीतेमध्ये जे ज्ञान असायला हवे ते नाहीये. ती गीता काही बाबांनी बनवलेली नाहीये.
हे देखील भक्तीमार्गामध्ये नोंदलेलेच आहे. म्हणतात देखील - भगवान येऊन भक्तीचे फळ
देतील. मुलांना समजावून सांगितले आहे - ज्ञानाद्वारे सद्गती. सद्गती सुद्धा सर्वांची
होते. दुर्गती सुद्धा सर्वांची होते. ही तर दुनियाच तमोप्रधान आहे. कोणीही
सतोप्रधान नाही. पुनर्जन्म घेता-घेता आता शेवट येऊन ठेपला आहे. आता मृत्यू
सर्वांच्या डोक्यावर उभा आहे. भारताचीच गोष्ट आहे. गीताच आहे देवी-देवता धर्माचे
शास्त्र. तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या धर्मामध्ये जाऊन काय फायदा? प्रत्येक जण
आपापले कुराण, बायबल इत्यादीच वाचतात. आपल्या धर्माला जाणतात. फक्त भारतवासीच इतर
सर्व धर्मांमध्ये निघून जातात. बाकी सर्व आपल्या-आपल्या धर्मामध्ये पक्के आहेत.
प्रत्येक धर्मवाल्याचा चेहरा इत्यादी वेगळा आहे. बाबा आठवण करून देतात - मुलांनो,
तुम्ही आपल्या देवी-देवता धर्माला विसरला आहात. तुम्ही स्वर्गामध्ये देवता होतात,
‘हम सो’ याचा अर्थ भारतवासीयांना बाबांनी सांगितला आहे. बाकी आपण आत्मा म्हणजे
परमात्मा नाही आहोत. या गोष्टी तर भक्तीमार्गामध्ये गुरू लोकांनी बनवल्या आहेत. गुरू
देखील करोडोनी असतील. पत्नीला पतीसाठी सांगतात की, ‘हा तुझा गुरू, ईश्वर आहे’. जर
पतीच ईश्वर आहे तर मग ‘हे भगवान’, ‘हे राम’ कशाला म्हणतेस? मनुष्यांची बुद्धी अगदीच
दगड बनली आहे. हे (ब्रह्मा बाबा) स्वतःसुद्धा म्हणतात - ‘मी सुद्धा असाच होतो’. कुठे
वैकुंठाचा मालक श्रीकृष्ण, कुठे मग त्याला गावातला मुलगा म्हटले आहे. श्याम-सुंदर
म्हणतात. अर्थ थोडाच समजतात? आता बाबांनी तुम्हाला सांगितले आहे - जो नंबरवन सुंदर,
तोच लास्ट नंबरचा तमोप्रधान सावळा बनला आहे. तुम्ही समजता आम्ही सुंदर होतो, पुन्हा
श्याम बनलो आहोत, ८४ चे चक्र पूर्ण करून आता सावळ्यापासून सुंदर बनण्यासाठी बाबा
एकच औषध देतात की, ‘माझी आठवण करा’. तुमची आत्मा पतितापासून पावन बनेल. तुमची
जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील.
तुम्ही जाणता जेव्हा
पासून रावण आला आहे, तुम्ही घसरत-घसरत, पाप-आत्मा बनला आहात. ही आहेच पाप-आत्म्यांची
दुनिया. एकही कोणी सुंदर (पावन) नाही. बाबां व्यतिरिक्त दुसरे कोणीही सुंदर बनवू
शकत नाही. तुम्ही आला आहात स्वर्गवासी, सुंदर बनण्यासाठी. आता नरकवासी श्याम आहात
कारण काम-चितेवर चढून काळे बनला आहात. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. याच्यावर
जे विजय प्राप्त करतील तेच जगतजीत बनतील. नंबरवन आहे काम विकार. त्यांनाच पतित
म्हटले जाते. क्रोधी व्यक्तीला पतित म्हणत नाहीत. बोलावतात देखील की, येऊन
पतितापासून पावन बनवा. तर आता बाबा आलेले आहेत, म्हणतात हा अंतिम जन्म पावन बना. जसा
रात्री नंतर दिवस, दिवसानंतर रात्र होते, तसे संगमयुगानंतर मग सतयुग येणार आहे.
चक्र फिरणार आहे. बाकी आणखी कोणती आकाशामध्ये किंवा पाताळामध्ये दुनिया नाहीये.
सृष्टी तर हीच आहे. सतयुग, त्रेता… इथेच असतात. झाड देखील एकच आहे, दुसरे कोणते असू
शकत नाही. या सर्व थापा आहेत जे म्हणतात अनेक दुनिया आहेत. बाबा म्हणतात या सर्व
आहेत भक्तीमार्गातल्या गोष्टी. आता बाबा सत्य गोष्ट सांगतात. आता आपल्या आतमध्ये
डोकावून पहा - आपण कितपत श्रीमतावर चालून सतोप्रधान अर्थात पुण्य-आत्मा बनत आहोत?
सतोप्रधानाला पुण्य-आत्मा, तमोप्रधानाला पाप-आत्मा म्हटले जाते. विकारामध्ये जाणे
पाप आहे. बाबा म्हणतात - आता पवित्र बना. माझे बनला आहात तर माझ्या श्रीमतावर
चालायचे आहे. मुख्य गोष्ट आहे कोणतेही पाप करू नका. नंबरवन पाप आहे विकारामध्ये जाणे.
आणि मग अजूनही अनेक पापे होतात. चोरी-मारी, फसवणूक इत्यादी खूप करतात. मग खूप जणांना
सरकार पकडते सुद्धा. आता बाबा मुलांना म्हणतात - तुम्ही आपल्या मनाला विचारा - आपण
कोणते पाप तर करत नाही ना? असे समजू नका - आम्ही चोरी केली किंवा लाच घेतली तर हे
बाबा जानी-जाननहार आहेत, सर्व जाणतात. नाही, जानी-जाननहारचा अर्थ काही असा नाहीये.
अच्छा, कोणी चोरी केली आणि हे बाबांनी ओळखले, मग पुढे काय? जी चोरी केली त्याची सजा
शंभर पट होणारच होणार. खूप-खूप सजा खातील. पदही भ्रष्ट होईल. बाबा समजावून सांगतात
जर अशी कामे कराल तर दंड भोगावा लागेल. कोणी ईश्वराचा मुलगा बनून मग चोरी करतो,
शिवबाबा, ज्यांच्याकडून एवढा वारसा मिळतो, त्यांच्या भंडाऱ्यातून चोरी करतो, हे तर
खूप मोठे पाप आहे. काहीजणांना चोरीची सवय असते, त्यांना जेल-बर्ड म्हटले जाते. हे
आहे ईश्वराचे घर. सर्वकाही ईश्वराचे आहे ना. ईश्वराच्या घरी येतात बाबांकडून वारसा
घेण्याकरिता. परंतु काहीजणांना सवय लागते, तर त्याची सजा शंभर पट होते. सजा देखील
खूप मिळणार आणि मग जन्म-जन्मांतर घाणेरड्या घरामध्ये जन्म घेतील, तर आपलेच नुकसान
केले ना. असे बरेच आहेत जे अजिबात आठवणीमध्ये रहात नाहीत, काहीच ऐकत नाहीत.
बुद्धीमध्ये चोरी इत्यादींचेच विचार येत राहतात. असे अनेक सत्संगामध्ये जातात.
चप्पल चोरी करतात, त्यांचा धंदाच हा असतो. जिथे सत्संग असेल तिथे जाऊन चप्पल चोरी
करून येतील. दुनिया एकदमच घाणेरडी आहे. हे आहे ईश्वराचे घर. चोरीची सवय तर अत्यंत
वाईट आहे. म्हटले जाते ना - ‘कख का चोर सो लख का चोर’ (एक पैशाची चोरी असो किंवा
लाखांची असो, ती करणारा चोरच असतो). आपल्या मनाला विचारले पाहिजे - ‘आपण किती
पुण्य-आत्मा बनलो आहोत? बाबांची किती आठवण करतो? आम्ही किती स्वदर्श नचक्रधारी बनतो?
किती वेळ ईश्वरीय सेवेमध्ये असतो? किती पापे नष्ट होत चालली आहेत?’ स्वतःचा पोतामेल
रोज बघा. किती पुण्य केले, किती वेळ योगामध्ये राहिलो? कितीजणांना रस्ता दाखवला?
कामधंदा इत्यादी तो तर भले करा. तुम्ही कर्मयोगी आहात. कर्म तर भले करा. बाबा हे
बॅजेस् बनवत राहतात. चांगल्या-चांगल्या लोकांना याच्यावर समजावून सांगा. या महाभारत
युद्धाद्वारेच स्वर्गाचे दरवाजे उघडत आहेत. श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये खाली खूप
उत्तम लिहिलेले आहे, परंतु मुले अजून इतकी विशाल-बुद्धी बनलेली नाहीत. थोडेसे धन
मिळाले तर नाचायला लागतात. कोणाकडे जास्त धन झाले तर समजतात आमच्यासारखे कोणी नसेल.
ज्या मुलांना बाबांची पर्वा वाटत नाही, ती मुले बाबा इतका जो ज्ञान रत्नांचा खजिना
देतात त्याची सुद्धा कदर करत नाहीत. बाबा एक गोष्ट सांगतात, ते दुसरीच गोष्ट बोलत
राहतात. पर्वा नसल्याकारणाने खूप पापे करत राहतात. श्रीमतावर चालत नाहीत. मग खाली
कोसळतात (पतन होते). बाबा म्हणतात - हा देखील ड्रामा. त्यांच्या नशिबामध्ये नाही.
बाबा तर जाणतात ना. खूप पाप करतात, जर निश्चय असेल की बाबा आम्हाला शिकवत आहेत तर
आनंद वाटला पाहिजे. तुम्ही जाणता आम्ही भविष्य नवीन दुनियेमध्ये राजकुमार-राजकुमारी
बनणार, तर किती आनंद वाटला पाहिजे. परंतु मुले तर अजूनही उदास होत राहतात. ती अवस्था
टिकत नाही.
बाबांनी सांगितले आहे
- विनाशासाठी रंगीत तालीम सुद्धा होईल. नैसर्गिक आपत्ती सुद्धा येतील. भारताला
कमजोर करत जातील. बाबा स्वतः सांगतात - हे सर्व होणारच आहे. नाही तर विनाश कसा होईल!
बर्फवृष्टी होईल मग शेती इत्यादीची काय हालत होईल? लाखोंनी मरत असतात, कोणी सांगतात
थोडेच. तर बाबा मुख्य गोष्ट समजावून सांगतात की, आपली अशी आतून तपासणी करा, मी
बाबांची किती आठवण करतो. बाबा, तुम्ही तर खूप गोड आहात, तुमची कमाल आहे. तुमची आज्ञा
आहे - ‘माझी आठवण करा तर २१ जन्मांसाठी कधी रोगी बनणार नाही’. स्वतःला आत्मा समजून
बाबांची आठवण करा तर मी गॅरेंटी देतो; बाबा तुम्हाला सन्मुख सांगतात, तुम्ही मग
इतरांना ऐकवता. बाबा म्हणतात - ‘मज पित्याची आठवण करा, खूप प्रेम करा’. मी तुम्हाला
पतितापासून पावन बनण्याचा किती सोपा रस्ता सांगतो. काहीजण म्हणतात - आम्ही तर खूप
पाप-आत्मा आहोत. अच्छा, मग असे पाप पुन्हा करू नका, माझी आठवण करत रहा तर
जन्म-जन्मांतरीची जी पापे आहेत ती या आठवणीने भस्म होत जातील. मुख्य गोष्ट आठवणीचीच
आहे. याला म्हटले जाते ‘सहज याद’, ‘योग’ शब्द सुद्धा काढून टाका, संन्याशांचे हठयोग
तर तऱ्हेतऱ्हेचे आहेत. अनेक प्रकारांनी शिकवतात. या बाबांनी (ब्रह्मा बाबांनी)
गुरू तर खूप केले आहेत ना. आता बेहदचे बाबा म्हणतात - या सर्वांना सोडा. या सर्वांचा
सुद्धा मलाच उद्धार करायचा आहे. बाकी कोणाची ताकद नाही जो असे म्हणू शकेल. बाबांनीच
म्हटले आहे - मी या साधूंचा सुद्धा उद्धार करतो. मग हे गुरू कसे बनू शकतात? तर
मुख्य एक गोष्ट बाबा सांगतात - आपल्या मनाला विचारा, आम्ही काही पाप तर करत नाही
ना? कोणाला दुःख तर देत नाही ना? यामध्ये काहीच त्रास नाहीये. आतून तपासणी केली
पाहिजे, पूर्ण दिवसभरामध्ये किती पाप केले? किती आठवण केली? आठवणीनेच पापे भस्म
होतील. प्रयत्न केला पाहिजे. हे खूप मेहनतीचे काम आहे. ज्ञान देणारे एक बाबाच आहेत.
बाबाच मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता दाखवतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबा जो
अविनाशी ज्ञान रत्नांचा खजिना देत आहेत त्याची कदर करायची आहे. बेपर्वा बनून पाप
कर्म करायची नाहीत. जर निश्चय असेल की, भगवान आम्हाला शिकवत आहेत तर अपार आनंदामध्ये
रहायचे आहे.
२) ईश्वराच्या
घरामध्ये कधी चोरी इत्यादी करण्याचा विचार येता कामा नये. ही सवय खूप घाणेरडी आहे.
म्हटले जाते - ‘कख का चोर सो लख का चोर’. आपल्या मनाला विचारायचे आहे - आम्ही किती
पुण्यात्मा बनलो आहोत?
वरदान:-
दुर्बल, निराश,
असमर्थ आत्म्याला जास्त बळ देणारे रूहानी दयावान भव
जी रूहानी दयाळू मुले
असतात ती महादानी बनून पूर्णपणे निराश झालेल्यांमध्ये आशा उत्पन्न करतात. दुर्बलांना
बलवान बनवतात. दान नेहमी गरीबाला, निराधार असलेल्याला दिले जाते. तर जे निर्बल,
निराश, असमर्थ प्रजा क्वालिटीचे आत्मे आहेत त्यांच्याप्रती रूहानी दयावान बनून
महादानी बना. आपसामध्ये एकमेकांप्रती महादानी नको. ते तर सहयोगी साथी बनून, भाऊ-भाऊ
बनून, एकसमान पुरुषार्थी बनून, सहयोग द्या, दान नाही.
बोधवाक्य:-
सदैव एका
बाबांच्या श्रेष्ठ संगतीमध्ये रहा म्हणजे दुसऱ्या कोणत्याही संगतीचा रंग प्रभाव पाडू
शकणार नाही.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
प्युरिटीच्या सोबतच
चेहरा आणि वर्तनामध्ये रूहानियतची (आत्मिक) पर्सनॅलिटी धारण करून या श्रेष्ठ
पर्सनॅलिटीच्या रूहानी नशेमध्ये रहा. आपल्या रूहानी पर्सनॅलिटीला लक्षात ठेवून सदैव
प्रसन्नचित्त रहा तेव्हाच सर्व प्रश्न समाप्त होतील. अशांत आणि त्रासलेले आत्मे
तुमच्या प्रसन्नतेच्या दृष्टीने प्रसन्न होतील.