19-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, शिवबाबा तुमची फुले इत्यादी स्वीकार करू शकत नाहीत कारण ते पूज्य अथवा पुजारी बनत नाहीत, तुम्ही देखील संगमावर फुलांचे हार घालायचे नाहीत”

प्रश्न:-
भविष्य राज्य तख्ताचे अधिकारी कोण बनतात?

उत्तर:-
जे आता माता-पित्याच्या दिल तख्ताला जिंकणारे आहेत, तेच भविष्य तख्तनशीन बनतात. आश्चर्य आहे की, मुले माता-पित्यावर देखील विजय प्राप्त करतात. मेहनत करून माता-पित्याच्याही पुढे निघून जातात.

गीत:-
छोड भी दे आकाश सिंहासन…

ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या (बऱ्याच काळानंतर भेटलेल्या) मुलांनी गाणे ऐकले. या गाण्यामुळे सर्वव्यापीचे ज्ञानच नाहीसे होते. आठवण करतात, आता भारत खूप दुःखी आहे. ड्रामा अनुसार ही सर्व गाणी बनलेली आहेत. दुनियावाले जाणत नाहीत. बाबा येतात पतितांना पावन करण्यासाठी अथवा दुःखी असणाऱ्यांना दुःखातून लिबरेट करून सुख देण्याकरिता. मुलांनी जाणले आहे की, तेच बाबा आलेले आहेत. मुलांना ओळख मिळाली आहे. स्वतः बसून सांगत आहेत - ‘मी साधारण तनामध्ये प्रवेश करून संपूर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य ऐकवतो’. सृष्टी एकच आहे, फक्त नवी आणि जुनी होते. जसे शरीर लहानपणी नवीन असते नंतर जुने होते. नवे शरीर, जुने शरीर तर दोन शरीरे असे तर म्हणणार नाही. आहे एकच फक्त नव्या पासून जुने बनते. तसेच दुनिया एकच आहे, नव्या पासून आता जुनी होते. नवीन दुनिया कधी होती? हे देखील कोणी सांगू शकणार नाही. बाबा येऊन समजावून सांगतात - मुलांनो, जेव्हा नवीन दुनिया होती तेव्हा भारत नवीन होता; त्याला सतयुग म्हटले जात असे. तोच भारत मग जुना झाला आहे. याला जुनी, ओल्ड वर्ल्ड म्हटले जाते. न्यू वर्ल्ड पासून मग ओल्ड वर्ल्ड झाले आहे, आता पुन्हा त्याला नवीन जरूर बनायचे आहे. नवीन दुनियेचा मुलांनी साक्षात्कार केला आहे. अच्छा त्या नवीन दुनियेचे मालक कोण होते? बरोबर, हे लक्ष्मी-नारायण होते. आदि सनातन देवी-देवता त्या दुनियेचे मालक होते. हे बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. बाबा म्हणतात - आता निरंतर हीच आठवण करा. बाबा, परमधामहून आम्हाला शिकविण्याकरिता, राजयोग शिकविण्यासाठी आलेले आहेत. महिमा सर्व त्या एकाचीच आहे, यांची (ब्रह्मा बाबांची) कोणतीच महिमा नाही. यावेळी सर्वजण तुच्छ-बुद्धि आहेत, काहीच समजत नाहीत म्हणून मी येतो; तेव्हाच तर गाणे देखील बनवले आहे. सर्वव्यापीचे ज्ञान तर नाहीसे होते. प्रत्येकाचा पार्ट आपापला आहे.

बाबा वारंवार सांगतात - देह-अभिमान सोडून तुम्ही आत्म-अभिमानी बना आणि कर्मेंद्रियांद्वारे शिकवण धारण करा. भले या बाबांना चालता-फिरता बघता परंतु आठवण शिवबाबांची करा. असेच समजा की, शिवबाबाच सर्व काही करतात, ब्रह्मा करत नाहीत. भले यांचे रूप या डोळ्यांना दिसत असले, तरीही तुमची बुद्धी शिवबाबांकडे गेली पाहिजे. शिवबाबा नसतील तर यांची आत्मा, यांचे शरीर काहीच कामाचे नाही. कायम असेच समजा यांच्यामध्ये शिवबाबा आहेत. ते यांच्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) शिकवत आहेत. हे तुमचे टीचर नाहीत. सुप्रीम टीचर ते (शिवबाबा) आहेत. आठवण त्यांची करायची आहे. कधीही देहाची आठवण करायची नाही. बुद्धियोग बाबांसोबत लावायचा आहे. मुले आठवण करतात - पुन्हा येऊन ज्ञान-योग शिकवा, परमपिता परमात्म्याशिवाय कोणीही राजयोग शिकवू शकत नाही. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, तेच बसून गीतेचे ज्ञान ऐकवतात, नंतर मग हे ज्ञान प्राय: लोप होते. तिथे याची गरजच नाही. राजधानी स्थापन झाली. सद्गती होते. ज्ञान दिले जाते दुर्गतीपासून सद्गती होण्यासाठी. बाकी त्या तर सर्व आहेत भक्तिमार्गाच्या गोष्टी. मनुष्य जप-तप, दान-पुण्य इत्यादी जे काही करतात, त्या सर्व भक्तिमार्गाच्या गोष्टी आहेत, याद्वारे मला कोणीही भेटू शकत नाही. आत्म्याचे पंख तुटले आहेत. बुद्धी पाषाणवत बनली आहे. पाषाणा पासून मग पारस बनविण्यासाठी मला पुन्हा यावे लागेल. बाबा म्हणतात - आता किती प्रचंड लोकसंख्या आहे. मोहरी प्रमाणे संसार भरलेला आहे. आता सर्वांचा विनाश होणार आहे. सतयुगामध्ये काही इतके मनुष्य नसतात. नवीन दुनियेमध्ये सुबत्ता भरपूर असेल आणि लोकसंख्या फार थोडी असेल. इथे तर इतकी प्रचंड लोकसंख्या आहे जे पोटापुरते अन्नसुद्धा मिळत नाही. जुनी नापिक जमीन आहे आता पुन्हा नवीन होईल. तिथे आहेच एव्हरीथिंग न्यू (सर्व काही नवीन). नावच किती गोड आहे - हेवन, बहिश्त, देवतांची नवीन दुनिया. जुन्याला तोडून टाकून नवीन दुनियेमध्ये जाऊन राहण्याची इच्छा होते ना. आता आहे नवीन दुनिया, स्वर्गामध्ये जाण्याची गोष्ट. इथे जुन्या शरीराची काहीच किंमत नाही. शिवबाबांना तर काही शरीरच नाहीये.

मुले म्हणतात - बाबांना हार घालावा. परंतु यांना (ब्रह्मा बाबांना) हार घालाल तर तुमचा बुद्धियोग यांच्यामध्ये जाईल. शिवबाबा म्हणतात - हाराची गरज नाही. तुम्हीच पूज्य बनता, पुजारी देखील तुम्हीच बनता. आपेही पूज्य आपेही पुजारी. तर आपल्याच मूर्तीची पूजा करू लागतात. बाबा म्हणतात - मी ना पूज्य बनतो, ना फुले इत्यादींची गरज आहे. मी का हे घालू, म्हणून बाबा कधीही फूल, माळा इत्यादी स्वीकारत नाहीत. तुम्ही पूज्य बनता तेव्हा मग जितकी पाहिजे तितकी फुले घाला. मी तर तुम्हा मुलांचा मोस्ट बीलवेड ओबिडियंट फादर (अतिप्रिय आज्ञाधारक असा पिता) देखील आहे, टीचर देखील आहे, सेवक सुद्धा आहे. मोठ्या प्रतिष्ठित आणि राजघराण्यातील व्यक्ती जेव्हा खाली सही करतात तेव्हा लिहितात - मिंटो, करजेन इत्यादी… (‘मिंटो’ हे भारताचे गव्हर्नर होते, ‘करजेन’ हे ब्रिटिश राजनेता होते जे भारताचे व्हाईसरॉय होते). ते स्वतःसाठी ‘लॉर्ड’ असे कधीही लिहीत नाहीत. इथे तर श्री लक्ष्मी-नारायण, श्री अमका. एकदम ‘श्री’ शब्द लावतात. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत - आता या शरीराची आठवण करायची नाही. स्वतःला आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा. या जुन्या दुनियेमध्ये आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत. सोने ९ कॅरेट आहे तर दागिना देखील ९ कॅरेट. सोन्यामध्येच भेसळ पडते. आत्म्याला कधी निर्लेप समजता कामा नये. हे ज्ञान तुम्हाला आत्ता आहे. तुम्ही अर्धे कल्प २१ जन्मांसाठी प्रारब्ध प्राप्त करता तर किती पुरुषार्थ केला पाहिजे! परंतु मुले घडो-घडी विसरून जातात. शिवबाबा, ब्रह्मा द्वारे आम्हाला शिकवण देत आहेत. ब्रह्माची आत्मा देखील त्यांची आठवण करते. ब्रह्मा, विष्णू, शंकर आहेत सूक्ष्मवतनवासी. बाबा सर्वप्रथम सूक्ष्म सृष्टी रचतात, निर्वाणधाम उंचात उंच धाम आहे. आत्म्यांचे निर्वाणधाम सर्वात उंचावर आहे. एका भगवंताची सर्व भक्त आठवण करतात. परंतु तमोप्रधान बनले आहेत तर बाबांना विसरून, दगड-माती सर्वांची पूजा करत राहतात. आम्ही जाणतो की हे जे काही चालते, ड्रामा शूट होत जातो. जसे चित्रपटामध्ये एकदा जे शूटिंग होते, समजा, मधूनच एखादा पक्षी इत्यादी उडत गेला, तर तेच दृश्य पुन्हा-पुन्हा रिपीट होत राहील. पतंग उडत असताना शूट झाला तर तोच पुन्हा-पुन्हा रिपीट होत राहील. हा देखील ड्रामाचा सेकंद-सेकंद रिपीट होत जातो, शूट होत राहतो; हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. तुम्ही ॲक्टर्स आहात, संपूर्ण ड्रामाला साक्षी होऊन पाहता. एक-एक सेकंद ड्रामा अनुसार पास होतो. पान हलले, ड्रामा पास झाला. असे नाही की, प्रत्येक पान ईश्वराच्या आज्ञेनुसार हलते. नाही, हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. याला चांगल्या रीतीने समजून घ्यावे लागते. बाबाच येऊन राजयोग शिकवतात आणि ड्रामाचे नॉलेज देतात. चित्रे देखील किती सुंदर बनली गेली आहेत. घड्याळाचा काटा देखील संगमयुगावर दर्शविला आहे. कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात यांच्या मधला हा संगम आहे. आता जुन्या दुनियेमध्ये अनेक धर्म आहेत. नवीन दुनियेमध्ये मग हे धर्म असणार नाहीत. तुम्ही मुलांनी नेहमी असेच समजायचे आहे की, आम्हाला बाबा शिकवत आहेत, आम्ही गॉडली स्टुडंट आहोत. भगवानुवाच - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. राजे लोक देखील लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात. तर त्यांना पूज्य बनविणारा मी आहे. जे पूज्य होते ते आता पुजारी बनले आहेत. तुम्हा मुलांना समजले आहे - आम्ही सो पूज्य होतो आणि मग आम्ही सो पुजारी बनलो. बाबा काही बनत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी, ना पुजारी आहे, ना पूज्य बनतो, त्यामुळे मी ना हार घालतो, ना मला हार अर्पण करण्याची गरज आहे’. मग मी फुलांचा स्वीकार का करावा. तुम्ही देखील स्वीकार करू शकत नाही. कायद्याप्रमाणे त्या देवतांचा हक्क आहे, त्यांची आत्मा आणि शरीर पवित्र आहेत. तेच फुलांचे अधिकारी आहेत तिथे स्वर्गामध्ये तर आहेतच सुगंधित फूल. फूले असतातच सुगंधासाठी. परिधान करण्यासाठी देखील असतात. बाबा म्हणतात - आता तुम्ही मुले विष्णूच्या गळ्यातील हार बनता. नंबरवार तुम्हाला तख्तावर बसायचे आहे. ज्यांनी जितका कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे, तितकाच आताही करीत आहेत आणि पुढेही करू लागतील. नंबरवार तर आहेत. बुद्धी म्हणते अमुक मुलगा खूप सेवाभावी आहे. जसे दुकानामध्ये असते, कोणी शेठ बनतात, कोणी भागीदार बनतात, कोणी मॅनेजर बनतात. खालच्या पातळीवर असणाऱ्यांना देखील लिफ्ट (बढती) मिळते. इथे देखील असेच आहे. तुम्हा मुलांना देखील मात-पित्यावर विजय मिळवायचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटते - मात-पित्याच्याही पुढे कसे जाऊ शकतो. बाबा तर मुलांना मेहनत करून लायक बनवतात, तख्तनशीन बनविण्याकरिता. म्हणून म्हणतात, आता माझ्या दिलरुपी तख्तावर विजय मिळविल्याने तुम्ही भविष्याचे तख्तनशीन बनाल. इतका पुरुषार्थ करा, जे नरापासून नारायण बनाल. एम ऑब्जेक्ट आहेच मुळी एक, मग किंग्डम स्थापन होत आहे तर त्यामध्ये व्हरायटी पदे आहेत.

तुम्ही मायेला जिंकण्याचा पूर्णत: पुरुषार्थ करायचा आहे. मुले इत्यादींना देखील भले प्रेमाने वाढवा, परंतु ट्रस्टी होऊन रहा. भक्तिमार्गामध्ये म्हणत होता ना - ‘प्रभू, हे सर्व तुम्हीच दिलेले आहे’. तुमची अमानत तुम्ही घेतली. ठीक आहे, मग रडण्याचे काही कारणच नाही; परंतु ही तर आहेच रडण्याची दुनिया. मनुष्य कहाण्या खूप ऐकवतात. मोहजीत राजाची कहाणी देखील ऐकवतात. मग कोणतेही दुःख वाटत नाही. एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेतले. तिथे कधी कोणता आजार इत्यादी होत नाही. २१ जन्मांसाठी एव्हरहेल्दी, निरोगी काया असते. मुलांना सर्व साक्षात्कार होतो. तिथले रीतीरिवाज कसे चालतात, कोणत्या प्रकारचा पेहराव केला जातो. स्वयंवर इत्यादी कशी केली जातात - मुलांनी सर्व साक्षात्कार केला आहे. तो सर्व पार्ट संपला. त्यावेळी इतके ज्ञान नव्हते. आता दिवसेंदिवस तुम्हा मुलांमध्ये खूप ताकद येत जाते. हे देखील सर्व ड्रामामध्ये नोंदवलेले आहे. वंडर आहे ना. परमपिता परमात्म्याचा देखील किती जबरदस्त पार्ट आहे.

स्वतः बसून समजावून सांगतात की, भक्तिमार्गामध्ये देखील वर परमधाममध्ये बसून मी किती काम करतो. खाली (साकार वतनमध्ये) तर कल्पामध्ये एकदाच येतो. अनेक जण निराकाराचे पुजारी देखील असतात, परंतु निराकार परमात्मा कसे येऊन शिकवतात, ही गोष्टच गायब केली आहे. गीतेमध्ये देखील श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे त्यामुळे निराकाराशी असलेले प्रेमाचे नातेच तुटले आहे. हा तर परमात्म्यानेच येऊन सहज राजयोग शिकविला आणि दुनियेला परिवर्तित केले, दुनिया परिवर्तित होत राहते. युगांचे चक्र फिरत राहते. आता या ड्रामाच्या चक्रा विषयी तुम्हाला समजले आहे. मनुष्य काहीच जाणत नाहीत. सतयुगातील देवी-देवतांना देखील जाणत नाहीत. फक्त देवतांच्या खुणा शिल्लक राहिल्या आहेत. तर बाबा समजावून सांगत आहेत - नेहमी असेच समजा की आम्ही शिवबाबांचे आहोत. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. शिवबाबा, नेहमी या ब्रह्मा द्वारे आम्हाला शिकवण देतात. तर शिवबाबांच्या आठवणीमध्ये खूप मजा वाटत राहील. असे गॉड फादर कोण? ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. बरेच असे पिता आपल्या मुलांना शिकवतात देखील, तर ते जरूर असे म्हणतील की, हे माझे पिता आहेत, टीचर आहेत; परंतु ते पिता, गुरु देखील असतील असे कधी होत नाही. हो, टीचर असू शकतात. पित्याला कधी गुरु म्हणणार नाही. यांचे (ब्रह्माबाबांचे) वडील टीचर देखील होते, शिकवत असत, ते आहेत हदचे पिता टीचर. हे आहेत बेहदचे पिता टीचर. तुम्ही स्वतःला गॉडली स्टुडंट समजलात तरी देखील अहो सौभाग्य. गॉड फादर शिकवतात, ज्ञान किती क्लियर आहे. तर बाबा किती गोड आहेत. गोड वस्तूची आठवण केली जाते. जसे आशिक-माशुकचे प्रेम असते. त्यांचे विकारासाठी प्रेम असत नाही. फक्त एकमेकांना बघत राहतात. तुमचा मग आहे आत्म्यांचा परमात्मा पित्या सोबत योग. आत्मा म्हणते - बाबा किती ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत. या पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये येऊन आम्हाला किती श्रेष्ठ बनवतात. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता किये करत न लागी वार…’ सेकंदात वैकुंठामध्ये जातात. सेकंदात मनुष्यापासून देवता बनतात. हे आहे एम ऑब्जेक्ट. त्यासाठी अभ्यास करायला हवा. गुरुनानक यांनी देखील म्हटले आहे ना - ‘मुत पलीती कपड धोए…’ लक्ष्य साबण आहे ना. बाबा म्हणतात मी किती चांगला धोबी आहे. तुमची वस्त्रं अर्थात तुमची आत्मा आणि तुमचे शरीर किती शुद्ध बनवितो. तर यांची (ब्रह्मा बाबांची) कधी आठवण करायची नाही. हे सर्व कार्य शिवबाबांचे आहे त्यांचीच आठवण करा. यांच्यापेक्षा गोड ते शिवबाबा आहेत. आत्म्याला म्हणतात - तुम्हाला या डोळ्यांनी या ब्रह्माचा रथ दिसतो परंतु तुम्ही आठवण शिवबाबांची करा. शिवबाबा यांच्याद्वारे तुम्हाला कवडीपासून हिऱ्यासमान बनवत आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांच्या दिलरुपी तख्तावर विजय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. परिवारामध्ये ट्रस्टी बनून सर्वांशी प्रेमाने वागायचे आहे. मोहजीत बनायचे आहे.

२) योगबळा द्वारे आत्म्याला स्वच्छ बनवायचे आहे. या डोळ्यांनी सर्व काही बघत असताना आठवण एका बाबांचीच करायची आहे. इथे फुलांचे हार न स्वीकारता स्वतः सुगंधित फूल बनायचे आहे.

वरदान:-
प्रारब्धाच्या इच्छेचा त्याग करून चांगला पुरुषार्थ करणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव

श्रेष्ठ पुरुषार्थी त्यांना म्हटले जाते जे पुरुषार्थाचे प्रारब्ध भोगण्याची इच्छा ठेवत नाहीत. जिथे इच्छा आहे तिथे स्वच्छता संपून जाते आणि विचार करणारे बनतात. जे इथेच प्रारब्ध भोगण्याची इच्छा ठेवतात ते आपली भविष्य कमाई जमा होण्यापासून स्वतःला वंचित करतात, त्यामुळे ‘इच्छे’च्या ऐवजी ‘अच्छा’ शब्द लक्षात ठेवा. श्रेष्ठ पुरुषार्थी कायम फ्लॉलेस (डाग रहित, निर्दोष) बनण्याचा पुरुषार्थ करतात, कोणत्याही गोष्टीत फेल होत नाहीत.

बोधवाक्य:-
कोणतेही साधन कमलपुष्प बनून युज करा कारण हे तुमच्या कर्मयोगाचे फळ आहे.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

सर्वस्व त्यागी मुलांमध्ये सरळता (साधेपणा) आणि सहनशीलता हे मुख्य गुण नक्कीच असतील. अशी मुले स्वतः हर्षित राहतात आणि सर्वांना आकर्षित करतात. ते एकमेकांबद्दल स्नेहभाव बाळगतात. जर सरळता नसेल तर स्नेह सुद्धा असू शकत नाही. जसे साकार रूपामध्ये ब्रह्मा बाबांना पाहिले जितके नॉलेजफूल तितकाच सरळ स्वभाव. वृद्धांसोबत वृद्धा प्रमाणे, लहान मुलांसोबत लहान मुलासारखे राहिले.