19-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सदैव आनंदामध्ये रहा की आपल्याला कोण शिकवत आहेत, तर हे देखील मनमनाभव आहे, तुम्हाला आनंद आहे की काल आपण पत्थर-बुद्धी होतो, आज पारस-बुद्धी बनलो आहोत”

प्रश्न:-
भाग्य उघडण्याचा आधार काय आहे?

उत्तर:-
निश्चय. जर भाग्य उघडण्यास उशीर झाला तर लंगडत रहाल. निश्चय-बुद्धी चांगल्या रीतीने शिकून गॅलप करत राहतील (अभ्यास भरून काढतील). कोणत्याही गोष्टीमध्ये संशय असेल तर मागे राहतील. जे निश्चय-बुद्धी बनून आपल्या बुद्धीला बाबांकडे पळवत राहतात ते सतोप्रधान बनतात.

ओम शांती।
सर्व स्टुडंट्स शाळेमध्ये जेव्हा शिकत असतात तेव्हा त्यांना हे माहिती असते की आपल्याला शिकून काय बनायचे आहे. गोड-गोड रुहानी मुलांच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे की आपण सतयुग पारसपुरीचे मालक बनतो. या देहाची नाती इत्यादी सर्व सोडायचे आहे. आता आपल्याला पारसपुरीचे मालक पारसनाथ बनायचे आहे, हा आनंद दिवसभर राहिला पाहिजे. समजता - पारसपुरी कशाला म्हटले जाते? तिथे घरे इत्यादी सर्व सोन्या-चांदीची असतात. इथे तर दगड-विटांची घरे आहेत. आता पुन्हा तुम्ही पत्थर-बुद्धीपासून पारस-बुद्धी बनत आहात. पत्थर-बुद्धीला पारस-बुद्धी बनविणारे पारसनाथ बाबा जेव्हा येतील तेव्हा बनवतील ना! तुम्ही इथे बसले आहात, जाणता आपले स्कूल उच्च ते उच्च आहे. यापेक्षा मोठे स्कूल कोणते असत नाही. या स्कूलमधून तुम्ही करोड पद्म भाग्यशाली विश्वाचे मालक बनता, तर तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. या पत्थरपुरी मधून पारसपुरीमध्ये जाण्याचे हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. काल पत्थर-बुद्धी होता, आज पारस-बुद्धी बनत आहात. ही गोष्ट सतत बुद्धीमध्ये राहिली तरी देखील मनमनाभवच आहे. स्कूलमध्ये टीचर येतात शिकविण्यासाठी. स्टुडंटच्या मनामध्ये असते की आता टीचर आले की आले. तुम्ही मुले देखील समजता - आमचे टीचर तर स्वयं भगवान आहेत. ते आम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात तर जरूर संगमावर येतील. आता तुम्ही जाणता मनुष्य आळवत राहतात आणि ते इथे आलेले आहेत. कल्पापूर्वी देखील असे झाले होते तेव्हाच तर लिहिले आहे - ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, कारण ते आहेत पत्थर-बुद्धी. तुमची आहे विनाश काले प्रीत-बुद्धी. तुम्ही पारस-बुद्धी बनत आहात. अशी कोणती तरी युक्ती काढली पाहिजे ज्यामुळे लोकांना लवकर समजेल. इथे देखील खूप जणांना घेऊन येता, तरी देखील म्हणतात - शिवबाबा ब्रह्मा तनाद्वारे कसे शिकवत असतील! कसे येत असतील! काहीही समजत नाहीत. इतके सर्व सेंटर्सवर येतात. निश्चय-बुद्धी आहेत ना. सर्वजण म्हणतात - ‘शिव भगवानुवाच’, शिवच सर्वांचे पिता आहेत. श्रीकृष्णाला थोडेच सर्वांचा पिता म्हणणार. यामध्ये गोंधळून जाण्याचा तर प्रश्नच नाही. परंतु भाग्य जर उशिराने उजळणार असेल तर मग लंगडत राहतात. कमी शिकणाऱ्याला म्हटले जाते - हे लंगडत आहेत. संशय-बुद्धी मागे राहतील. निश्चय-बुद्धी चांगल्या रीतीने शिकणारे अभ्यास भरून काढत पुढे जात राहतील. किती सोपे करून सांगितले जाते. जशी मुले शर्यतीमध्ये पळत निशाण्यापर्यंत जाऊन मग परत येतात. बाबा देखील म्हणतात - बुद्धीने वारंवार शिवबाबांकडे धाव घेत रहाल तर सतोप्रधान बनाल. इथे समजतात देखील - हे ज्ञान चांगले आहे. तीर लागतो तरी देखील बाहेर गेल्यावर खलास होतात. बाबा ज्ञान इंजेक्शन लावतात तर त्याचा नशा चढला पाहिजे ना. परंतु चढतच नाही. इथे ज्ञान अमृताचा प्याला पितात तेव्हा परिणाम होतो आणि बाहेर गेल्यावर विसरून जातात. मुले जाणतात - ज्ञान सागर, पतित-पावन, सद्गती दाता, लिब्रेटर एक बाबाच आहेत. तेच प्रत्येक गोष्टीचा वारसा देतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही देखील संपूर्ण सागर बना. जितके माझ्यामध्ये ज्ञान आहे तितके तुम्ही देखील धारण करा’.

शिवबाबांना देहाचा नशा नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी तर सदैव शांत राहतो. तुम्हाला देखील जेव्हा देह नव्हता तेव्हा नशा नव्हता’. शिवबाबा असे थोडेच म्हणतात की, ही माझी वस्तू आहे (हे ब्रह्मा तन माझे आहे). हे तन लोनमध्ये घेतले आहे, लोनमध्ये घेतलेली वस्तू आपली थोडीच असते. मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे, थोड्या वेळासाठी सेवा करण्यासाठी. आता तुम्हा मुलांना परत घरी यायचे आहे, धाव घ्यायची आहे भगवंताला भेटण्यासाठी. इतके यज्ञ-तप इत्यादी करत राहतात, समजतात थोडेच की ते भेटणार कसे. समजतात की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवान येईल. बाबा तर खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात, प्रदर्शनीमध्ये देखील तुम्ही समजावून सांगा. सतयुग-त्रेताचा कालावधी देखील लिहिलेला आहे. त्यामध्ये २५०० वर्षापर्यंत एकदम अचूक आहे. सूर्यवंशी नंतर असतात चंद्रवंशी त्यानंतर दाखवा रावणाचे राज्य सुरु झाले आणि भारत पतित होण्यास सुरुवात झाली. द्वापर-कलियुगामध्ये रावण राज्य आले, तिथी-तारीख दिलेली आहे. मध्यभागी संगमयुगाला ठेवा. रथी देखील जरूर पाहिजे ना. या रथामध्ये प्रवेश करून बाबा राजयोग शिकवत आहेत, ज्यामुळे हे लक्ष्मी-नारायण बनतात. कोणालाही समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. लक्ष्मी-नारायणाची डिनॅस्टी (घराणे) किती काळ चालते. इतर सर्व घराणी आहेत हदची, हे आहे बेहदचे. या बेहदच्या इतिहास-भूगोलाला जाणून घेतले पाहिजे ना. आता आहे संगमयुग. त्या नंतर दैवी राज्य स्थापन होत आहे. या पत्थरपुरी, जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. विनाश झाला नाही तर मग नवीन दुनिया कशी बनणार! आता म्हणतात न्यू दिल्ली. आता तुम्ही मुले जाणता न्यू दिल्ली कधी बनणार. नवीन दुनियेमध्ये नवीन दिल्ली असते. गातात देखील - यमुनेच्या तीरावर महाल होते. जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य असते तेव्हा म्हणणार न्यू दिल्ली, पारस-पुरी. नवीन राज्य तर सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचेच असते. मनुष्य तर हे देखील विसरले आहेत की ड्रामाची सुरुवात कशी होते. मुख्य ॲक्टर्स कोण-कोण आहेत, ते जाणून घेतले पाहिजे ना. ॲक्टर्स तर खूप आहेत परंतु मुख्य ॲक्टर्सना तुम्ही जाणता. तुम्ही देखील मुख्य ॲक्टर्स बनत आहात. सर्वात मुख्य पार्ट तुम्ही बजावत आहात. तुम्ही रुहानी सोशल वर्कर्स आहात. बाकी सर्व सोशल वर्कर्स आहेत भौतिक. तुम्ही आत्म्यांना समजावून सांगता, शिकते आत्मा. मनुष्य समजतात की शरीर शिकते. हे कोणालाच माहिती नाही आहे की आत्मा या ऑर्गन्सद्वारे शिकते. मी आत्मा बॅरिस्टर इत्यादी बनतो. बाबा आम्हाला शिकवत आहेत. संस्कार देखील आत्म्यामध्येच असतात. संस्कार घेऊन जाणार आणि मग नवीन दुनियेमध्ये येऊन राज्य करणार. जसे सतयुगामध्ये राजधानी चालवली जात होती तशीच सुरू होईल. यामध्ये काहीही विचारण्याची गरजच राहत नाही. मुख्य गोष्ट आहे - कधीही देह-अभिमानामध्ये येऊ नका. स्वतःला आत्मा समजा. कोणतेही विकर्म करू नका. आठवणीमध्ये रहा, नाहीतर एका विकर्माचे ओझे १०० पट होईल. एकदम हाडन् हाड तुटून जाते. यामध्ये देखील मुख्य आहे - काम विकार. खूपजण म्हणतात - मुले त्रास देतात मग मारावे लागते. आता हे काही विचारायचे नसते. याला तर छोटे पाई-पैशाचे पाप म्हणणार. तुमच्या डोक्यावर तर जन्म-जन्मांतरीचे पाप आहे, पहिले त्यांना भस्म करा. बाबा पावन होण्याचा खूप सोपा उपाय सांगतात. तुम्ही एका बाबांच्या आठवणी द्वारे पावन बनाल. भगवानुवाच - मुलांप्रती, तुम्हा आत्म्यांसोबत बोलतो. दुसरा कोणी मनुष्य असे समजू शकणार नाही. ते तर स्वतःला शरीरच समजतात. बाबा म्हणतात मी आत्म्यांना समजावून सांगतो. गायले देखील जाते, आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा भरतो, यामध्ये कोणताही आवाज इत्यादी करायचा नसतो. हे तर शिक्षण आहे. बाबांकडे दुरून-दुरून येतात. निश्चय-बुद्धी जे असतील त्यांना पुढे चालून जोरदारपणे ओढ उत्पन्न होईल. आता इतकी ओढ कोणाला वाटत नाही कारण आठवण करत नाहीत. यात्रेवरून जेव्हा परत येतात, घराजवळ येतात तर घराची आठवण येईल, मुलांची आठवण येईल, घरी पोहोचताच आनंदाने येऊन भेटतील. आनंद वाढत जाईल. सर्वप्रथम पत्नीची आठवण येईल मग मुले-बाळे इत्यादींची आठवण येईल. तुम्हाला आठवण येईल की आपण घरी जात आहोत, तिथे बाबा आणि मुलेच असतात. डबल आनंद होतो. शांतिधाम घरी जाणार आणि मग राजधानीमध्ये येणार. बस्स, आठवणच करायची आहे, बाबा म्हणतात मनमनाभव. स्वतःला आत्मा समजून बाबांची आणि वारशाची आठवण करा. बाबा तुम्हा मुलांना गुलगुल (फूल) बनवून, डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून सोबत घेऊन जातात. जराही त्रास नाही. जसे मच्छरांचा थवा जातो ना. तुम्ही आत्मे देखील असेच बाबांसोबत जाणार. पावन बनण्यासाठी तुम्ही बाबांची आठवण करता, घराची नाही.

बाबांची नजर सर्वप्रथम गरीब मुलांवर जाते. बाबा गरीब निवाज (गरिबांचे कैवारी) आहेत ना. तुम्ही देखील गावात सेवा करण्यासाठी जाता. बाबा म्हणतात - मी देखील तुमच्या गावाला येऊन पारसपुरी बनवितो. आता तर हा नरक जुनी दुनिया आहे. याला जरूर तोडायचे आहे. नवीन दुनियेमध्ये नवीन दिल्ली, ती सतयुगामध्येच असेल. तिथे राज्य देखील तुमचेच असेल. तुम्हाला नशा चढतो आपण पुन्हा आपली राजधानी स्थापन करणार. जशी कल्पापूर्वी केली होती. असे थोडेच म्हणणार आम्ही अशा प्रकारची घरे बांधणार. नाही, तुम्ही जाणार तिथे तर ऑटोमॅटिक तुम्ही ते बनवायला सुरवात कराल कारण त्या आत्म्यामध्ये पार्ट भरलेला आहे. इथे पार्ट आहे फक्त शिकण्याचा. तिथे तुमच्या बुद्धीमध्ये आपोआप येईल की आपण असा-असा महाल बांधायचा. जसा कल्पापूर्वी बनविला होता, तसा बनवायला सुरुवात कराल. आत्म्यामध्ये देखील आधीपासूनच नोंदलेले आहे. तुम्ही तोच महाल बनविणार ज्या महालांमध्ये तुम्ही कल्प-कल्प राहता. या गोष्टींना नवीन कोणीही समजू शकणार नाही. तुम्ही समजता आपण येतो, नवीन-नवीन पॉईंट्स ऐकून रिफ्रेश होऊन जातो. नवीन-नवीन पॉईंट्स निघतात, हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी या बैलावर (रथावर) सदैव स्वार होऊन राहीन, यामध्ये मला सुख वाटत नाही. मी तर तुम्हा मुलांना शिकविण्यासाठी येतो’. असे नाही, बैलावर स्वार होऊन बसूनच आहेत. रात्रं-दिवस बैलावर स्वार होऊन रहाणे शक्य आहे का? त्यांचे तर सेकंदामध्ये येणे-जाणे असते. कायम बसून राहणे हा तर नियमच नाही. बाबा किती दुरून येतात शिकविण्यासाठी, घर तर त्यांचे ते आहे ना. पूर्ण दिवस शरीरामध्ये थोडेच बसून राहतील, त्यांना त्यात सुखही वाटणार नाही. जसे पिंजऱ्यामध्ये पोपट अडकून पडतो. मी तर हे लोनवर घेतो तुम्हाला ज्ञान सांगण्याकरिता. तुम्ही म्हणाल ज्ञानाचा सागर बाबा आम्हाला शिकविण्यासाठी येतात. आनंदाने रोमांच उभे राहिले पाहिजेत. तो आनंद मग कमी थोडाच झाला पाहिजे. हे धनी तर स्थायी (कायम) बसलेलेच आहेत. एका बैलावर कायमसाठी दोघेही स्वार होतील काय? शिवबाबा राहतात आपल्या धाममध्ये. इथे येतात, यायला उशीर थोडाच लागतो. रॉकेट बघा किती वेगवान असतात. आवाजापेक्षाही वेगवान. आत्मा देखील अति सूक्ष्म रॉकेट आहे. आत्मा पळते कशी, इथून पटकन गेली लंडनला. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती गायली आहे. बाबा स्वतः देखील रॉकेट आहेत. म्हणतात - ‘मी तुम्हाला शिकविण्यासाठी येतो. मग जातो आपल्या घरी. यावेळी खूप बिझी राहतो. दिव्यदृष्टी दाता आहे, तर भक्तांना राजी (संतुष्ट) करावे लागते. तुम्हाला शिकवतो. भक्तांची इच्छा असते साक्षात्कार व्हावा किंवा काही ना काही भीक मागतात. सर्वात जास्त भीक जगत अंबेकडे मागतात. तू जगत अंबा आहेस ना. तू विश्वाच्या बादशाहीची भिक देतेस. गरिबांना भिक्षा मिळते ना. आपण देखील गरीब आहोत शिवबाबा स्वर्गाची बादशाही भिक्षेमध्ये देतात. भिक्षा काही वेगळी नाहीये, फक्त म्हणतात - ‘बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. शांतीधाममध्ये निघून जाल. माझी आठवण कराल तर मी गॅरंटी करतो तुमचे आयुष्य देखील वाढेल’. सतयुगामध्ये मृत्यूचे नावच नसते. ते आहे अमरलोक, तिथे मृत्यूचे नावच नसते. फक्त एक कातडी (शरीर) सोडून दुसरी घेतो, याला मृत्यू म्हणणार काय! ती आहे अमरपुरी. साक्षात्कार होतो आपल्याला बाळ बनायचे आहे. आनंदाची गोष्ट आहे. बाबांची इच्छा होते आता जाऊन बाळ बनावे. जाणतात गोल्डन स्पून इन माऊथ असेल. एकच बाबांचा सिकीलधा मुलगा आहे ना. बाबांनी ॲडॉप्ट केले आहे. मी सिकीलधा मुलगा आहे तर बाबा किती प्रेम करतात. एकदम प्रवेश करतात. हा देखील खेळ आहे ना. खेळामध्ये नेहमी आनंद होतो. हे देखील जाणतात जरूर खूप-खूप भाग्यशाली रथ असेल. ज्याच्यासाठी गायन आहे - ज्ञान सागर, यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला ज्ञान देतात. तुम्हा मुलांसाठी एकच आनंदाची गोष्ट खूप आहे - भगवान येऊन शिकवतात. भगवान स्वर्गाची राजाई स्थापन करतात. आपण त्यांची मुले आहोत मग आपण नरकामध्ये का आहोत! हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. तुम्ही तर भाग्यशाली आहात जे विश्वाचा मालक बनण्यासाठी शिकत आहात. अशा शिक्षणावर किती अटेंशन दिले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) याच डबल आनंदामध्ये रहायचे आहे की आता यात्रा पूर्ण झाली, आधी आपण आपल्या घरी शांतिधाममध्ये जाणार आणि मग आपल्या राजधानीमध्ये येणार.

२) डोक्यावर जे जन्म-जन्मांतरीचे पापांचे ओझे आहे त्याला भस्म करायचे आहे, देह-अभिमानामध्ये येऊन कोणतेही विकर्म करायचे नाही.

वरदान:-
श्रेष्ठ संकल्पांच्या सहयोगाद्वारे सर्वांमध्ये शक्ती भरणारे शक्तिशाली आत्मा भव

‘सदा शक्तिशाली भव’चे वरदान प्राप्त करून सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ संकल्पांद्वारे बळ भरण्याची सेवा करा. जसे आजकाल सूर्याची शक्ती जमा करून कितीतरी कामे यशस्वी करतात. असे श्रेष्ठ संकल्पांची शक्ती इतकी जमा व्हावी ज्यामुळे दुसऱ्यांच्या संकल्पांमध्ये बळ भराल. हे संकल्प इंजेक्शनचे काम करतात. यामुळे आत वृत्तीमध्ये शक्ती येते. तर आता श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ संकल्पाद्वारे परिवर्तन करणे - या सेवेची आवश्यकता आहे.

बोधवाक्य:-
मास्टर दु:खहर्ता बनून दुःखाला देखील रूहानी सुखामध्ये परिवर्तन करणे - हेच तुमचे श्रेष्ठ कर्तव्य आहे.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

काही-काही मुले कधी-कधी मोठा खेळ दाखवतात. व्यर्थ संकल्प इतक्या फोर्सने येतात जे कंट्रोल करू शकत नाहीत, मग त्यावेळी म्हणतात - ‘काय करणार होऊन गेले ना!’ थांबवू शकत नाहीत, जे आले ते केले परंतु व्यर्थ साठी कंट्रोलिंग पॉवर पाहिजे. जसे एका समर्थ संकल्पाचे फळ पदमगुणा मिळते. असेच एका व्यर्थ संकल्पाचा हिशोब - उदास होणे, निराश होणे किंवा आनंद गायब होणे - हे देखील एकाचे अनेक पटीच्या हिशोबाने अनुभव होते.