19-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपल्या स्वधर्माला विसरणे हिच सर्वात मोठी चूक आहे, आता तुम्हाला अभुल (बिनचूक) बनायचे आहे, आपल्या घराची आणि राज्याची आठवण करायची आहे”

प्रश्न:-
तुम्हा मुलांची कोणती अवस्था वेळेच्या समीपतेची निशाणी आहे?

उत्तर:-
तुम्ही मुले जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये कायमचे निमग्न रहाल, बुद्धीचे भटकणे बंद होईल, वाणीमध्ये आठवणीचे जौहर (ताकद) येईल, अपार खुशीमध्ये रहाल, घडोघडी आपल्या सतयुगी दुनियेची दृश्ये समोर येत राहतील तेव्हा समजा वेळ जवळ आहे. विनाशाला वेळ लागत नाही, यासाठी आठवणीचा चार्ट वाढवायचा आहे.

गीत:-
तुम्हें पाके हमने जहान पा लिया है…

ओम शांती।
रुहानी मुले या गाण्याचा अर्थ तर समजत असतील. आता बेहदच्या बाबांना तर प्राप्त केले आहे. बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळतो, ज्या वारशाला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. वारशाचा नशा तेव्हा निघून जातो, जेव्हा रावण राज्य सुरू होते. हा देखील ड्रामा बनलेला आहे. मुलांना सृष्टीच्या ड्रामाचे देखील ज्ञान आहे, हे चक्र कसे फिरते. याला नाटक देखील म्हणता येईल, ड्रामा देखील म्हणता येईल. मुले समजतात बरोबर बाबा येऊन सृष्टीचे चक्र देखील समजावून सांगतात. जे ब्राह्मण कुळाचे आहेत, त्यांनाच समजावून सांगतात. मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, मी तुम्हाला समजावून सांगतो. या अगोदर तुम्ही ऐकत होता की, ८४ लाख जन्म घेतल्या नंतर मग एक जन्म मनुष्याचा मिळतो. असे नाही आहे. आता तुम्ही सर्व आत्मे नंबरवार येता आणि जाता. बुद्धीमध्ये आले आहे - सर्वप्रथम आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे पूज्य होतो, मग आपणच पुजारी बनलो आहोत. ‘आपे ही पूज्य आपे ही पुजारी’ - असे गायन देखील आहे. मनुष्य मग भगवंतासाठी समजतात की आपे ही पूज्य आपे ही पुजारी बनतात. तुमचीच ही सर्व रूपे आहेत. अनेक मत-मतांतरे आहेत ना. तुम्ही आता श्रीमतावर चालता. तुम्ही समजता आपण स्टूडेंट अगोदर तर काहीच जाणत नव्हतो. मग शिकून उच्च परीक्षा पास करत जातो. ते स्टूडेंट देखील सुरुवातीला तर काहीच जाणत नाहीत, मग परीक्षा पास करता-करता समजतात की आता आम्ही बॅरिस्टरी पास केली आहे. तुम्ही देखील आता जाणता - आपण शिकून मनुष्यापासून देवता बनत आहोत ते देखील विश्वाचे मालक. तिथे तर आहेच एक धर्म, एक राज्य. तुमचे राज्य कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. तिथे तुम्हाला पवित्रता, शांती, सुख, संपत्ती सर्व काही आहे. गाण्यामध्ये देखील ऐकले ना. आता ही गाणी तुम्ही तर बनवलेली नाहीत. अचानकच ड्रामा अनुसार या वेळेसाठीच ही बनलेली आहेत. मनुष्यांनी बनवलेल्या गाण्यांचा अर्थ बाबा बसून समजावून सांगतात. आता तुम्ही इथे शांतीमध्ये बसून बाबांकडून वारसा घेत आहात, जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अर्धा कल्प सुखाचा वारसा असतो. बाबा समजावून सांगतात - गोड-गोड मुलांनो, अर्ध्याकल्पा पेक्षाही जास्त तुम्ही सुख भोगता. मग रावण राज्य सुरू होते. मंदिरे देखील अशी आहेत जिथे चित्र दाखवतात की, देवता वाममार्गामध्ये कसे जातात. ड्रेस तर तोच आहे. ड्रेस नंतर बदलतो. प्रत्येक राजाचा आपापला ड्रेस, मुकुट इत्यादी सर्व वेग-वेगळे असते.

आता मुले जाणतात आपण शिवबाबांकडून ब्रह्मा द्वारे वारसा घेत आहोत. बाबा तर बाळांनो-बाळांनो असेच म्हणतात. मुलांनो, तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही. ऐकते तर आत्माच ना. आपण आत्मा आहोत, ना की शरीर. बाकी जे पण मनुष्यमात्र आहेत त्यांना आपल्या शरीराच्या नावाचा नशा आहे कारण देह-अभिमानी आहेत. आपण आत्मा आहोत हे जाणतच नाहीत. ते तर ‘आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा’ म्हणतात. आता तुम्हाला बाबांनी समजावून सांगितले आहे. तुम्ही आत्मा सो विश्वाचे मालक देवी-देवता बनत आहात. हे ज्ञान आता आहे, हम सो देवता, नंतर मग क्षत्रिय घराण्यामध्ये येणार. ८४ जन्मांचा हिशोब देखील पाहिजे ना. सगळेच काही ८४ जन्म घेणार नाहीत. सर्व एकत्र थोडेच येतात. तुम्ही जाणता कोणते धर्म कसे येत राहतात. जुनी हिस्ट्री मग नवीन होते. आता ही आहेच पतित दुनिया. ती आहे पावन दुनिया. मग इतर धर्म येतात, इथे कर्मक्षेत्रावर हे एकच नाटक चालते. मुख्य आहेत ४ धर्म. या संगमावर बाबा येऊन ब्राह्मण संप्रदाय स्थापन करतात. विराट रूपाचे चित्र बनवतात. परंतु त्यामध्ये ही चूक आहे. बाबा येऊन सर्व गोष्टी समजावून देऊन अभुल (बिनचूक) बनवतात. बाबा तर ना कधी शरीरामध्ये येतात, ना चुका करतात. ते तर थोड्या वेळासाठी तुम्हा मुलांना सुखधामाचा आणि आपल्या घराचा रस्ता सांगण्यासाठी यांच्या रथामध्ये येतात. केवळ रस्ताच सांगत नाहीत परंतु जीवन देखील बनवतात. कल्प-कल्प तुम्ही घरी जाता आणि मग सुखाचा पार्ट देखील बजावता. मुले विसरली आहेत - आम्हा आत्म्यांचा स्वधर्म आहेच शांत. या दुःखाच्या दुनियेमध्ये शांती कशी असेल - या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. तुम्ही सर्वांना समजावून सांगता देखील. हळू-हळू सर्व येत जातील. विदेशातील लोकांना देखील माहित होईल - हे सृष्टी चक्र कसे फिरते, याचा कालावधी किती आहे. फॉरेनर्स देखील तुमच्याकडे येतील किंवा मुले तिथे जाऊन सृष्टी चक्राचे रहस्य समजावून सांगतील. ते समजतात की, क्राइस्ट गॉड जवळ जाऊन पोहोचला. क्राईस्टला गॉडचा मुलगा समजतात. बरेचजण मग असे समजतात की, क्राइस्ट देखील पुनर्जन्म घेत-घेत आता गरीब आहे. जसे तुम्ही देखील गरीब आहात ना. गरीब अर्थात तमोप्रधान. समजतात क्राईस्ट देखील इथेच आहेत, पुन्हा कधी येतील, हे जाणत नाहीत. तुम्ही समजावून सांगू शकता - तुमचे धर्म स्थापक पुन्हा आपल्या ठरलेल्या वेळेवर धर्म स्थापन करण्यासाठी येतील. त्यांना गुरु म्हणू शकत नाही. ते धर्म स्थापन करण्यासाठी येतात. सद्गती दाता केवळ एकच आहेत, बाकीचे जे कोणी धर्म स्थापन करण्यासाठी येतात ते सर्व पुनर्जन्म घेत-घेत आता येऊन तमोप्रधान बनले आहेत. अंतामध्ये संपूर्ण झाड जड-जडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. आता तुम्ही जाणता - संपूर्ण झाड उभे आहे, बाकी देवी-देवता धर्माचे फाउंडेशन नाही आहे (वडाच्या झाडाचे उदाहरण). या गोष्टी बाबाच मुलांना बसून समजावून सांगतात. तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. तुम्हाला ठाऊक झाले आहे की आपण सो देवी-देवता होतो. पुन्हा आता बनत आहोत. इथे तुम्ही येता सत्य नारायणाची कथा ऐकण्यासाठी, ज्याद्वारे नरापासून नारायण बनाल. नारायण बनाल तर जरूर लक्ष्मी देखील असेल. लक्ष्मी-नारायण असतील तर जरूर त्यांची राजधानी देखील असेल ना. एकटे लक्ष्मी-नारायण तर बनणार नाहीत. लक्ष्मी बनण्याची वेगळी कथा थोडीच आहे. नारायणा सोबत लक्ष्मी देखील बनते. लक्ष्मी देखील कधी नारायण बनते. नारायण मग कधी लक्ष्मी बनतात. काही-काही गाणी खूप सुंदर आहेत. मायेचे घुटके येतात (मायेमुळे घुसमट सुरू होते) तेव्हा अशी गाणी ऐकल्याने हर्षितपणा येईल. जसे पोहायला शिकायचे असेल तर सुरुवातीला घुसमटायला होते मग त्याला पकडतात. इथे देखील मायेकडून खूप घुसमट होते. पोहणारे तर पुष्कळ असतात. त्यांची देखील शर्यत होते तर तुमची देखील शर्यत होते - त्यापलीकडे जाण्याची. मामेकम् (मज एकाची) आठवण करायची आहे. आठवण करत नाही तर घुसमटतात. बाबा म्हणतात - आठवणीच्या यात्रेनेच बेडा पार होईल. तुम्ही त्या पलीकडे निघून जाल. तारू (होडी) कोणी खूप फास्ट असतात, कोणी हळू. इथे देखील असेच आहे. बाबांकडे चार्ट पाठवतात. बाबा तपासतात. आठवणीच्या चार्टला हे योग्य रीतीने समजतात की चुकीच्या रीतीने समजतात. कोणी-कोणी मग आपण पूर्ण दिवसभरामध्ये ५ तास आठवणीमध्ये राहिल्याचे दाखवतात. बाबा म्हणतात मी विश्वास ठेवणार नाही, जरूर चूक झाली आहे. कोणी समजतात आपण जितका वेळ इथे शिकतो तितका वेळ तर चार्ट ठीक असतो. परंतु नाही. असे खूप आहेत इथे बसलेले असताना देखील, ऐकत असताना देखील बुद्धी बाहेर कुठे-कुठे निघून जाते. पूर्ण ऐकत सुद्धा नाहीत. भक्तीमार्गामध्ये असे-असे होते. संन्याशी लोक कथा ऐकवतात आणि मग मध्ये-मध्ये विचारतात, आता मी काय ऐकवले? पाहतात हा तर तवाई प्रमाणे (वेड्यासारखा) बसला आहे तर विचारतात परंतु सांगू शकत नाहीत. बुद्धी कुठे ना कुठे निघून जाते. एक अक्षर सुद्धा ऐकत नाहीत. इथे देखील असेच आहे. बाबा बघत राहतात - समजून येते यांची बुद्धी कुठे बाहेर भटकत राहते. इकडे-तिकडे बघत बसतात. असे देखील कोणी नवीन सुद्धा येतात. बाबा समजून जातात पूर्ण समजलेले नाही आहे; म्हणून बाबा म्हणतात - नवीन असणाऱ्यांना लगेच इथे क्लासमध्ये येण्याची परवानगी देऊ नका. नाही तर वायुमंडळ खराब करतात. पुढे चालून तुम्ही पाहाल जी चांगली-चांगली मुले असतील इथे बसल्या-बसल्या वैकुंठामध्ये जातील. खूप आनंद होत राहील. वारंवार निघून जातील - आता वेळ जवळ आहे. नंबरवार पुरुषार्थानुसार तुमची अवस्था अशी होईल. घडोघडी स्वर्गामध्ये आपले महाल बघत राहतील. जे काही सांगायचे करायचे असेल त्याचा साक्षात्कार होत राहील. वेळ तर पाहत आहात की कशा प्रकारे तयारी होत आहे. बाबा म्हणतात - बघाच कसे एका सेकंदामध्ये संपूर्ण दुनियेतील मनुष्य धुळीत मिसळून जातील. बॉम्ब लावला आणि हे खलास झाले.

तुम्ही मुले जाणता आता आपली राजाई स्थापन होत आहे. आता तर आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त राहायचे आहे. ते जौहर (ताकद) भरायची आहे जेणेकरून कोणालाही दृष्टीद्वारे तीर लागेल. अखेरीला भीष्म पितामह इत्यादी सारख्यांना तुम्हीच ज्ञान बाण मारले आहेत. लगेच समजतील, हे तर सत्य सांगत आहेत. ज्ञानाचे सागर पतित-पावन निराकार भगवान आहेत. श्रीकृष्ण असू शकत नाही. त्यांचा तर जन्म दाखवतात. श्रीकृष्णाची तीच फीचर्स पुन्हा कधी मिळणार नाहीत. पुन्हा सतयुगामध्ये तेच फीचर्स मिळतील. प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येकाची फीचर्स वेगवेगळी असतात. या ड्रामाचा पार्ट असा बनलेला आहे. तिथे तर नॅचरल ब्यूटिफुल फीचर्स असतात. आता तर दिवसेंदिवस शरीर देखील तमोप्रधान होत जाते. सर्वात पहिले सतोप्रधान मग सतो, रजो, तमो होतात. इथे तर पहा कशी-कशी मुले जन्म घेतात. कोणी पायाने चालू शकत नाहीत, कोणी बुटके असतात. काय-काय होते. सतयुगामध्ये असे थोडेच असते. तिथे देवतांना दाढी इत्यादी नसते. क्लीन-शेव असते. नैन-चैन (डोळे आणि हावभावावरून) कळते की हे पुरुष आहेत, ही स्त्री आहे. पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील. तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबा कल्प-कल्प येऊन आपल्याला राजयोग शिकवून मनुष्यापासून देवता बनवितात. हे देखील तुम्ही मुले जाणता की, बाकीचे जे धर्मवाले आहेत ते सर्व आपापल्या सेक्शनमध्ये निघून जातील. आत्म्यांचे झाड देखील दाखवतात ना. चित्रांमध्ये खूप दुरुस्ती करत, बदलत जातील. जसे बाबा सूक्ष्मवतनसाठी समजावून सांगतात आणि संशय बुद्धी तर म्हणतील हे काय! अगोदर असे सांगत होते, आता असे सांगत आहेत! लक्ष्मी-नारायणाच्या दोन रूपांना मिळून विष्णू म्हणतात. बाकी ४ भुजावाले मनुष्य थोडेच असतात. रावणाची १० तोंडे दाखवतात. असे कोणते मनुष्य नसतात. दरवर्षी बसून जाळतात. जसे बाहुल्यांचा खेळ.

मनुष्य म्हणतात - शास्त्रां शिवाय आम्ही जगू शकत नाहीत. शास्त्र तर आमचे प्राण आहेत. गीतेचा बघा मान किती आहे. इथे तर तुमच्याकडे मुरल्यांचा किती मोठा ढीग जमा होतो. तुम्ही ठेवून काय करणार! दिवसें-दिवस तुम्ही नवीन पॉईंट्स ऐकत राहता. हां, पॉईंट्स नोट करणे चांगले आहे. भाषण करतेवेळी रिहर्सल कराल. हे-हे पॉईंट्स समजावून सांगणार. टॉपिकची लिस्ट असायला हवी. आज या टॉपिक वर समजावून सांगणार. रावण कोण आहे, राम कोण आहे? खरे काय आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो. यावेळी रावण राज्य संपूर्ण दुनियेमध्ये आहे. ५ विकार तर सर्वांमध्ये आहेत. बाबा येऊन पुन्हा राम राज्याची स्थापना करतात. हा जय आणि पराजयाचा खेळ आहे. हार कशी होते! ५ विकार रुपी रावणाद्वारे. पूर्वी पवित्र गृहस्थ आश्रम होता तो आता पतित बनला आहे. लक्ष्मी-नारायण तेच मग ब्रह्मा-सरस्वती. बाबा देखील म्हणतात मी यांच्या अनेक जन्मांच्या अंतामध्ये प्रवेश करतो. तुम्ही म्हणाल आम्ही देखील अनेक जन्मांच्या अंतामध्ये बाबांकडून ज्ञान घेत आहोत. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. कोणी सुस्त-बुद्धी आहेत तर त्यांना समजत नाही. ही तर राजधानी स्थापन होत आहे. पुष्कळ आले आणि मग निघून गेले, ते पुन्हा येतील. प्रजेमध्ये दिडदमडीचे पद घेतील. ते देखील पाहिजेत ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी याच नशेमध्ये रहा की आपण आता हे शिक्षण पूर्ण करून मनुष्यापासून देवता सो विश्वाचे मालक बनणार. आपल्या राज्यामध्ये पवित्रता-सुख-शांती सर्व काही असेल, त्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

२) इकडून त्या पलीकडे जाण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये चांगले पोहणारे बनायचे आहे. मायेचे घुटके खायचे नाहीत. आपली तपासणी करायची आहे, आठवणीच्या चार्टला यथार्थपणे समजून लिहायचे आहे.

वरदान:-
पुरुषार्थ आणि प्रारब्धाच्या हिशेबाला जाणून तीव्र गतीने पुढे जाणारे नॉलेज फुल भव

पुरुषार्थाद्वारे दीर्घकाळाचे प्रारब्ध बनविण्याची हीच वेळ आहे म्हणून नॉलेजफुल बनून तीव्र गतीने पुढे चला. यामध्ये असा विचार करू नका की आज नाही तर उद्या बदलूच. यालाच निष्काळजीपणा म्हटले जाते. आता पर्यंत बापदादा स्नेहाचे सागर बनून सर्व नात्याच्या प्रेमाने मुलांचा निष्काळजीपणा, साधारण पुरुषार्थ बघत, ऐकत असताना देखील एक्स्ट्रा मार्क्स देऊन पुढे नेत आहेत. तर नॉलेजफुल बनून हिंमत आणि मदतीच्या विशेष वरदानांचा लाभ घ्या.

बोधवाक्य:-
प्रकृतीचे दास बनणारेच उदास होतात, म्हणून प्रकृतीजीत बना.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. जसे कोणी सागरामध्ये सामावून गेला तर त्यावेळी सागरा व्यतिरिक्त इतर काही दिसणार नाही. तर बाबा अर्थात सर्व गुणांच्या सागरामध्ये सामावून जाणे, याला म्हटले जाते लवलीन स्थिती. तर बाबांमध्ये सामावायचे नाही, परंतु बाबांच्या आठवणीमध्ये, स्नेहामध्ये सामावून जायचे आहे.