19-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या बेहदच्या नाटकामध्ये तुम्हा आत्म्यांना आपापला पार्ट मिळालेला आहे, आता तुम्हाला हे शरीर रुपी कपडे उतरवून घरी जायचे आहे, आणि नंतर नवीन राज्यामध्ये यायचे आहे”

प्रश्न:-
बाबा कोणतेही कार्य प्रेरणेने करत नाहीत, त्यांचे अवतरण होते, हे कोणत्या गोष्टीवरून सिद्ध होते?

उत्तर:-
बाबांना म्हणतातच करनकरावनहार. प्रेरणेचा तर अर्थ आहे - विचार. प्रेरणेने काही नवीन दुनियेची स्थापना होत नाही. बाबा मुलांकडून स्थापना करवितात, कर्मेंद्रियांशिवाय तर काहीही करून घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना शरीराचा आधार घ्यावा लागतो.

ओम शांती।
रुहानी मुले रुहानी बाबांच्या समोर बसली आहेत. जणू आत्मे आपल्या पित्याच्या सन्मुख बसले आहेत. आत्मा जरूर शरीरासहितच बसणार. बाबा देखील जेव्हा शरीर घेतात तेव्हाच सन्मुख असतात यालाच म्हटले जाते - ‘आत्मा परमात्मा अलग रहे…’ तुम्ही मुले समजता उच्च ते उच्च पित्यालाच ईश्वर, प्रभू, परमात्मा भिन्न-भिन्न नावे दिली आहेत, परमपिता कधी लौकिक पित्याला म्हटले जात नाही. फक्त ‘परमपिता’ लिहिले तरीही हरकत नाही. परमपिता अर्थात ते सर्वांचे पिता एकच आहेत. मुले जाणतात आम्ही परमपित्याच्या सोबत बसलो आहोत. परमपिता परमात्मा आणि आपण आत्मे शांतीधामचे रहिवासी आहोत. इथे पार्ट बजावण्याकरिता येतो, सतयुगापासून कलियुग अंतापर्यंत पार्ट बजावला आहे, ही झाली नवी रचना. रचता बाबांनी समजावून सांगितले आहे की तुम्हा मुलांनी असा पार्ट बजावला आहे. पूर्वी हे जाणत नव्हतो की, आपण ८४ जन्मांचे चक्र फिरलो आहोत. आता तुम्हा मुलांशीच बाबा बोलतात, ज्यांनी ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. सर्वच काही ८४ जन्म घेऊ शकत नाहीत. हे समजावून सांगायचे आहे की ८४ चे चक्र कसे फिरते. बाकी लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. मुले जाणतात की आपण दर ५ हजार वर्षांनंतर पार्ट बजावण्याकरिता येतो. आपण पार्टधारी आहोत. उच्च ते उच्च भगवंताचा देखील विचित्र पार्ट आहे. ब्रह्मा आणि विष्णूचा विचित्र पार्ट म्हणणार नाही. दोघेही ८४ चे चक्र फिरतात. बाकी शंकराचा पार्ट या दुनियेमध्ये तर नाहीये. त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये दाखवतात - स्थापना, विनाश, पालना. चित्रांवर समजावून सांगायचे असते. चित्र जी दाखवता त्यावर समजावून सांगायचे आहे. संगमयुगावर जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे. ‘प्रेरक’ शब्दसुद्धा चुकीचा आहे. जसे कोणी म्हणतात - आज मला बाहेर जाण्याची प्रेरणा नाहीये, प्रेरणा म्हणजेच विचार. प्रेरणेचा काही वेगळा अर्थ नाही आहे. परमात्मा काही प्रेरणेने काम करत नाही. ना प्रेरणेने ज्ञान मिळू शकते. बाबा येतात या कर्मेंद्रियांद्वारे पार्ट बजावण्याकरिता. करनकरावनहार आहेत ना. करून घेतील मुलांकडून. शरीराशिवाय तर करू शकणार नाहीत. या गोष्टींना कोणीही जाणत नाहीत. ईश्वर पित्यालाच जाणत नाहीत. ऋषी-मुनी इत्यादी म्हणत होते - ‘आम्ही ईश्वराला जाणत नाही. ना आत्म्याला, ना परमात्मा पित्याला, कोणालाच ज्ञान नाही आहे’. बाबा आहेत मुख्य क्रिएटर, डायरेक्टर, डायरेक्शन सुद्धा देतात. श्रीमत देतात. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये तर सर्वव्यापीचे ज्ञान आहे. तुम्ही समजता बाबा आमचे बाबा आहेत, ते लोक सर्वव्यापी म्हणतात त्यामुळे पिता समजूच शकत नाहीत. तुम्ही समजता ही बेहदच्या बाबांची फॅमिली आहे. सर्वव्यापी म्हटल्याने फॅमिलीचा सुवास येत नाही. त्यांना म्हटले जाते निराकारी शिवबाबा. निराकारी आत्म्यांचे पिता. शरीर आहे तेव्हाच तर आत्मा बोलते की, ‘बाबा’. शरीराविना तर आत्मा बोलू शकत नाही. भक्तिमार्गामध्ये बोलावत आले आहेत. समजतात तो पिता दुःखहर्ता सुखकर्ता आहे. सुख मिळते सुखधाममध्ये. शांती मिळते शांतीधाममध्ये. इथे आहेच दुःख. हे ज्ञान तुम्हाला मिळते संगमावर. जुन्या दुनियेच्या आणि नवीन दुनियेच्या मध्यावर. बाबा येतातच तेव्हा जेव्हा नव्या दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. नेहमी सुरवातीला म्हटले पाहिजे - ‘नव्या दुनियेची स्थापना’. सुरवातीलाच ‘जुन्या दुनियेचा विनाश’ म्हणणे चुकीचे ठरते. आता तुम्हाला बेहदच्या नाटकाचे नॉलेज मिळते. जसे त्या नाटकामध्ये ॲक्टर्स येतात तर घरातून साधे कपडे घालून येतात मग नाटकामध्ये येऊन कपडे बदलतात. आणि मग नाटक पूर्ण झाल्यावर ते कपडे उतरवून घरी जातात. इथे तुम्हा आत्म्यांना घरुन अशरीरी यायचे असते. इथे येऊन हे शरीररूपी कपडे घालता. प्रत्येकाला आपापला पार्ट मिळालेला आहे. हे आहे बेहदचे नाटक. आता ही बेहदची सारी दुनिया जुनी आहे नंतर मग नवीन दुनिया होईल. ती खूप लहान आहे, एक धर्म आहे. तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेमधून निघून परत हदच्या दुनियेमध्ये, नव्या दुनियेमध्ये यायचे आहे कारण तिथे आहे एक धर्म. अनेक धर्म, अनेक मनुष्य असल्याकारणाने बेहद होते. तिथे (नवीन दुनियेमध्ये) तर आहे एक धर्म, थोडे मनुष्य. एका धर्माच्या स्थापनेसाठी यावे लागते. तुम्ही मुले या बेहदच्या नाटकाच्या रहस्याला जाणता की हे चक्र कसे फिरते. यावेळी जे काही प्रॅक्टिकलमध्ये होते त्याचेच मग भक्तिमार्गामध्ये सण साजरे करतात. नंबरवार कोण-कोणते सण-उत्सव आहेत, हे देखील तुम्ही मुले जाणता. उच्च ते उच्च भगवान शिवबाबांची जयंती म्हणणार. ते जेव्हा येतील तेव्हा मग इतर उत्सव बनतील. शिवबाबा येऊन सर्वप्रथम गीता ऐकवतात अर्थात आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. योग देखील शिकवतात. त्याचसोबत तुम्हाला शिकवतात देखील. तर सर्वप्रथम बाबा आले शिवजयंती झाली मग म्हणणार गीता जयंती. आत्म्यांना ज्ञान ऐकवतात तर गीता जयंती झाली. तुम्ही मुलांनी विचार करून सणांना क्रमवारीने लिहून काढा. या गोष्टींना समजतील देखील आपल्या धर्माचे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय वाटतो. दुसऱ्या धर्मवाल्यांचा प्रश्नच नाही. भले कोणाला दुसरा धर्म प्रिय असेलही परंतु त्यात येऊ शकत नाहीत. स्वर्गामध्ये इतर धर्माचे थोडेच येऊ शकतील. झाडामध्ये अगदी स्पष्ट आहे. जे जे धर्म ज्या वेळी येतात पुन्हा त्याचवेळी येतील. पहिले बाबा येतात, तेच येऊन राजयोग शिकवतात तर म्हणतात - शिवजयंती सो मग गीता जयंती मग नारायण जयंती. ते तर होते सतयुग. ते देखील क्रमवारीने लिहावे लागेल. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. शिवजयंती कधी झाली हे देखील ठाऊक नाही आहे, ज्ञान ऐकवले, ज्याला गीता म्हटले जाते आणि मग विनाश देखील होतो. जगत अंबा इत्यादीच्या जयंतीची कोणती सुट्टी नाहीये. मनुष्य कोणाच्याही तिथी-तारखेला अजिबातच जाणत नाहीत. लक्ष्मी-नारायण, राम-सीतेच्या राज्यालाच जाणत नाहीत. २५०० वर्षांमध्ये जे आले आहेत, त्यांना जाणतात परंतु त्यांच्या पूर्वी जे आदि सनातन देवी-देवता होते, त्यांना किती काळ झाला, काही जाणत नाहीत. ५ हजार वर्षांपेक्षा मोठे कल्प तर असू शकत नाही. अर्ध्या बाजूला तर प्रचंड संख्या आली, बाकी अर्ध्यामध्ये यांचे राज्य. मग जास्ती वर्षांचे कल्प कसे होऊ शकते. ८४ लाख जन्म देखील होऊ शकत नाहीत. ते लोक समजतात कलियुगाची आयु लाखो वर्षे आहे. लोकांना अंधारात टाकले आहे. कुठे सर्व ड्रामा ५ हजार वर्षांचा आणि कुठे फक्त कलियुगासाठी म्हणतात की अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. जेव्हा युद्ध सुरु होते तेव्हा समजतात भगवंताला आले पाहिजे परंतु भगवंताला आले पाहिजे संगमावर. महाभारत लढाई तर लागतेच संगमावर. बाबा म्हणतात - मी देखील कल्प-कल्प संगमयुगावर येतो. बाबा येतील नवीन दुनियेची स्थापना जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी. नव्या दुनियेची स्थापना होईल तेव्हा जुन्या दुनियेचा विनाश जरूर होईल, यासाठीच हे युद्ध आहे. यामध्ये शंकराच्या प्रेरणा इत्यादीचा तर काही प्रश्नच नाही. समजते की जुनी दुनिया नष्ट होईल. घरे इत्यादी तर भूकंपामध्ये सर्व खलास होतील कारण नवीन दुनिया पाहिजे. नवी दुनिया होती जरूर. दिल्ली परिस्तान होती, यमुनेचा काठ होता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. चित्र देखील आहेत. लक्ष्मी-नारायणाला स्वर्गातीलच म्हणणार. तुम्हा मुलांनी साक्षात्कार देखील केला आहे की कसे स्वयंवर होते. या सर्व पॉइंट्सची बाबा रिवाईज (उजळणी) करवून घेतात. अच्छा पॉईंट्स आठवत नसतील तर बाबांची आठवण करा. बाबांची आठवण विसरते तर टीचरची आठवण करा. टीचर जे शिकवतात ते देखील जरूर आठवेल ना. टीचर देखील लक्षात राहील, नॉलेज देखील लक्षात राहील. उद्देश्य देखील बुद्धीमध्ये आहे. लक्षात ठेवावाच लागेल कारण तुमचे विद्यार्थी जीवन आहे ना. हे देखील जाणता जे आपल्याला शिकवत आहेत ते आपले पिता देखील आहेत, लौकिक पिता काही गायब होत नाहीत. लौकिक, पारलौकिक आणि मग हे आहेत अलौकिक. यांची कोणीही आठवण करत नाही. लौकिक पित्याकडून तर वारसा मिळतो. शेवटपर्यंत आठवण राहते. शरीर सोडले की मग दुसरा पिता मिळतो. प्रत्येक जन्मामध्ये लौकिक पिता मिळतात. पारलौकिक पित्याला देखील दुःखामध्ये आणि सुखामध्ये आठवण करतात. मूल झाले तर म्हणतील ईश्वराने मूल दिले. बाकी प्रजापिता ब्रह्माची का बरे आठवण करतील, यांच्याकडून काही मिळते थोडेच. यांना अलौकिक म्हटले जाते.

तुम्ही जाणता आम्ही ब्रह्माद्वारे शिवबाबांकडून वारसा घेत आहोत. जसे आम्ही शिकतो, हा रथ देखील निमित्त बनलेला आहे. अनेक जन्मांच्या अंताला यांचे शरीरच रथ बनले आहे. रथाचे नाव तर ठेवावे लागते ना. हा आहे बेहदचा संन्यास. रथ कायमच असतो, बाकीच्यांचा ठिकाणा नाही आहे. चालता-चालता मग भागन्ती होतात. हा रथ तर ड्रामा अनुसार मुक्रर आहे, याला म्हटले जाते भाग्यशाली रथ. तुम्हा सर्वांना भाग्यशाली रथ म्हणणार नाही. भाग्यशाली रथ एक मानला जातो, ज्यामध्ये बाबा येऊन ज्ञान देतात. स्थापनेचे कार्य करतात. तुम्ही भाग्यशाली रथ नाही झालात. तुमची आत्मा या रथामध्ये बसून शिकते. आत्मा पवित्र बनते म्हणून बलिहारी या शरीराची आहे जे यांच्यामध्ये बसून शिकवतात. हा अंतिम जन्म अत्यंत मौल्यवान आहे, शरीर बदलून मग आपण देवता बनणार. या जुन्या शरीराद्वारेच तुम्ही शिक्षण घेता. शिवबाबांचे बनता. तुम्ही जाणता आपले पहिले जीवन ‘वर्थ नॉट अ पेनी’ (कवडीमोल) होते. आता ‘पाउंड’ अर्थात मौल्यवान बनत आहे. जितके शिकाल तितके उच्च पद मिळवाल. बाबांनी समजावून सांगितले आहे - आठवणीची यात्रा आहे मुख्य. यालाच भारताचा प्राचीन राजयोग म्हणतात ज्याद्वारे तुम्ही पतितापासून पावन बनता, स्वर्गवासी तर सर्व बनतात नंतर सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. तुम्ही बेहदच्या शाळेमध्ये बसले आहात. तुम्हीच मग देवता बनाल. तुम्ही समजू शकता उच्चपद कोण प्राप्त करू शकतात. त्यांची क्वालिफिकेशन (पात्रता) काय असली पाहिजे. पूर्वी आमच्या मध्ये देखील ती पात्रता नव्हती. आसुरी मतावर होतो. आता ईश्वरीय मत मिळते. आसुरी मताने आपण उतरत्या कलेमध्ये जातो. ईश्वरीय मताने चढत्या कलेमध्ये जातो. ईश्वरीय मत देणारे एकच आहेत, आसुरी मत देणारे अनेक आहेत. आई-वडील, भाऊ-बहीण, टीचर-गुरु कितीजणांचे मत मिळते. आता तुम्हाला एकाचेच मत मिळते जे २१ जन्म कामी येते. तर अशा श्रीमतावर चालायला हवे ना. जितके चालाल तितके श्रेष्ठ पद मिळवाल. कमी चालाल तर कमी पद. श्रीमत आहेच भगवंताचे. उच्च ते उच्च भगवानच आहेत, ज्यांनी श्रीकृष्णाला उच्च ते उच्च बनवले आणि मग नीच ते नीच रावणाने बनवले. बाबा गोरे बनवतात मग रावण काळा बनवतो. बाबा वारसा देतात. ते तर आहेतच व्हाइसलेस (निर्विकारी). देवतांची महिमा गातात - ‘सर्वगुण संपन्न…’ सतयुगामध्ये आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. देवतांना सर्व जाणतात, ते संपूर्ण निर्विकारी असल्या कारणाने संपूर्ण विश्वाचे मालक बनतात. आता नाही आहेत, परत बनत आहेत. बाबा देखील संगमयुगावरच येतात. ब्रह्माच्या द्वारा ब्राह्मण. ब्रह्माची मुले तर तुम्ही सर्व झालात. ते आहेत ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. बोला, ‘प्रजापिता ब्रह्माचे नाव ऐकले नाही आहे काय?’ परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारेच सृष्टी रचतील ना. ब्राह्मण कुळ आहे. ब्रह्मामुखवंशावळी भाऊ-बहीणी झाले. इथे राजा-राणीचा प्रश्नच नाही. हे ब्राह्मण कुळ तर संगमामध्ये थोडाकाळ चालते. राजाई ना पांडवांची आहे, ना कौरवांची आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) २१ जन्म श्रेष्ठ पदाचा अधिकारी बनण्यासाठी सर्व आसुरीमतांना सोडून एका ईश्वरीय मतावर चालायचे आहे. संपूर्ण व्हाईसलेस (निर्विकारी) बनायचे आहे.

२) या जुन्या शरीरामध्ये बसून बाबांच्या शिकवणींना धारण करून देवता बनायचे आहे. हे आहे अतिशय मौल्यवान जीवन, यामध्ये वर्थ पाउंड (अमूल्य) बनायचे आहे.

वरदान:-
सर्व आत्म्यांना यथार्थ अविनाशी सहारा देणारे आधार, उद्धारमूर्त भव

वर्तमान वेळी विश्वाच्या चारही बाजूंना काही ना काही खळबळ आहे, कुठे मनाच्या अनेक टेंशनची खळबळ आहे, कुठे प्रकृतीच्या तमोप्रधान वायुमंडळामुळे खळबळ आहे, अल्पकालीन साधने सर्वांना चिंतेच्या चितेवर घेऊन जात आहेत त्यामुळे अल्पकालीन आधारांना, प्राप्तींना, विधींना थकून आता खरा वास्तविक आधार शोधत आहेत. तर तुम्ही आधार, उद्धारमूर्त आत्मे त्यांना श्रेष्ठ अविनाशी प्राप्तींची यथार्थ, वास्तविक, अविनाशी आधाराची अनुभूती करवा.

बोधवाक्य:-
समय एक अमूल्य खजिना आहे - त्यामुळे याला नष्ट करण्याऐवजी त्वरित निर्णय घेऊन सफल करा.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

जशी सूर्याची किरणे पसरतात, तसेच मास्टर सर्वशक्तिवानच्या स्टेजवर शक्ती रुपी आणि विशेषता रुपी किरणे, चहुकडे पसरत आहेत असे अनुभव करा, यासाठी “मी मास्टर सर्वशक्तिवान, विघ्न-विनाशक आत्मा आहे”, या स्वमानाच्या स्मृतीच्या सीटवर स्थित होऊन कार्य करा तर विघ्न समोरही येणार नाहीत.