19-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता विदेही बनण्याचा अभ्यास करा, आपल्या या विनाशी देहा वरील प्रेम काढून एका शिवबाबांवर प्रेम करा”

प्रश्न:-
या बेहदच्या जुन्या दुनिये पासून ज्यांना वैराग्य आलेले आहे त्यांचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
ते या डोळ्यांनी जे काही पाहतात - ते पाहून देखील जणू पाहणार नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये हे असेल की हे सर्व नष्ट होणार आहे. हे सर्व जणू मृत झालेले आहेत. आपल्याला तर शांतीधाम, सुखधाममध्ये जायचे आहे. त्यांची आसक्ती हळूहळू नाहीशी होईल. योगमध्ये राहून जर ते कोणाशी बोलतील तर त्यांना देखील कशिश होईल (आकर्षित होतील). ज्ञानाचा नशा चढलेला असेल.

गीत:-
ओम् नमो शिवाय...

ओम शांती।
बाबा म्हणतात - गोड मुलांनो, तुम्ही शिवबाबांना ओळखले आहे. मग हे गीत गाणे म्हणजे जणू भक्तिमार्गातील गोष्ट होते. भक्तिमार्गवाले ‘शिवाय नम:’ देखील म्हणतात, मात-पिता देखील म्हणतात, परंतु जाणत नाहीत. शिवबाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळाला पाहिजे. तुम्हा मुलांना तर बाबा मिळाले आहेत, त्यांच्या कडून वारसा मिळत आहे म्हणून बाबांची आठवण करता. तुम्हाला शिवबाबा मिळाले आहेत, दुनियेला मिळालेले नाहीत. ज्यांना मिळाले आहेत ते देखील फारसे चांगल्या प्रकारे पुढे वाटचाल करू शकत नाहीत. बाबांची डायरेक्शन्स (सूचना) खूप गोड आहेत, आत्म-अभिमानी भव, देही-अभिमानी भव. आत्म्यांशीच बोलतात. देही-अभिमानी बाबा, देही-अभिमानी मुलांसोबत बोलतात. तेच एकमेव आहेत. ते तर मधुबनमध्ये तुम्हा मुलांसोबत बसले आहेत. तुम्ही मुले जाणता की, बरोबर बाबा आलेच आहेत शिकविण्यासाठी. हे शिक्षण शिवबाबांशिवाय इतर कोणीही शिकवू शकत नाही. ना ब्रह्मा, ना विष्णू. हे तर बाबाच येऊन पतितांना पावन बनवतात, अमर कथा ऐकवतात. ती देखील इथेच ऐकवतील ना. अमरनाथला तर ऐकवणार नाहीत ना. हीच अमर कथा सत्यनारायणाची कथा आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला इथेच तर ऐकवतो. बाकी हे सर्व आहेत भक्तिमार्गातील धक्के. सर्वांचे सद्गती दाता राम, केवळ एक निराकारच आहेत. तेच पतित-पावन, ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर आहेत. ते येतातच तेव्हा, जेव्हा विनाशाचा काळ असतो. संपूर्ण जगाचे गुरू तर एक परमपिता परमात्माच असू शकतात. ते निराकार आहेत ना. देवतांना देखील मनुष्य म्हटले जाते. परंतु ते दैवी गुण असलेले मनुष्य आहेत म्हणून त्यांना देवता म्हटले जाते.

तुम्हाला आता ज्ञान मिळाले आहे. ज्ञानमार्गा मध्ये अवस्था खूप मजबूत ठेवायची आहे. जितके शक्य असेल तितकी बाबांची आठवण करायची आहे. विदेही बनायचे आहे. मग देहावर प्रेमच का करावे! बाबा तुम्हाला म्हणतात शिवबाबांची आठवण करा आणि मग यांच्याकडे (ब्रह्मा बाबांकडे) या. मनुष्य तर समजतात हे दादांना भेटण्यासाठी जातात. परंतु हे तर तुम्ही जाणता की, शिवबाबांची आठवण करून आम्ही त्यांना भेटतो. तिथे (परमधाममध्ये) तर आहेतच निराकारी आत्मे, बिंदू. बिंदूला तर भेटू शकणार नाही. मग शिवबाबांना कसे भेटाल, म्हणून इथे समजावून सांगितले जाते, ‘हे आत्म्यांनो, स्वतःला आत्मा समजा आणि हेच लक्षात ठेवा की आम्ही शिवबाबांना भेटत आहोत. हे तर खूप गूढ रहस्य आहे ना. बऱ्याच जणांना तर शिवबाबांची आठवणच राहत नाही. बाबा समजावून सांगतात - नेहमी शिवबाबांची आठवण करा. शिवबाबा तुम्हाला भेटण्यासाठी येतात. बस्स, तुमचे बनलो आहोत. शिवबाबा यांच्यामध्ये येऊन ज्ञान ऐकवतात. ते देखील निराकार आत्मा आहेत, तुम्ही देखील आत्मा आहात. एक बाबाच आहेत जे मुलांना म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. ती तर बुद्धीने आठवण करायची आहे. आम्ही बाबांकडे आलो आहोत. बाबा या पतित शरीरामध्ये आले आहेत. आपण समोर येताच निश्चय करतो, ‘शिवबाबा, आम्ही तुमचे बनलो आहोत’. मुरलींमध्ये देखील हेच ऐकता - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील.

तुम्ही जाणता हे तेच पतित-पावन बाबा आहेत. सच्चे-सच्चे सतगुरू तेच आहेत. आता तुम्हा पांडवांची आहे परमपिता परमात्म्यासोबत प्रीत-बुद्धी. बाकी सर्वांची कोणा ना कोणा सोबत विपरीत-बुद्धी आहे. जे शिवबाबांचे बनतात त्यांचा तर आनंदाचा पारा खूप चढलेला असला पाहिजे. जितकी वेळ जवळ येते, तितका जास्त आनंद होतो. आता आपले ८४ जन्म पूर्ण झाले. आता हा अंतिम जन्म आहे. आम्ही आमच्या घरी जात आहोत. हे शिडीचे चित्र तर खूप चांगले आहे, यामध्ये सर्व काही क्लिअर आहे. तर मुलांनी संपूर्ण दिवस बुद्धी चालवली पाहिजे. चित्रे बनविणाऱ्यांनी तर खूप विचार सागर मंथन करायचे आहे, मुख्य जे आहेत त्यांचा विचार चालला पाहिजे. तुम्ही तर चॅलेंज देता की, ‘सतयुगी श्रेष्ठाचारी दैवी राज्यामध्ये ९ लाख असतील’. कोणी म्हणेल याला पुरावा काय आहे? तर सांगा - ‘ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ना’. सतयुगामध्ये झाड लहानच असणार. धर्म देखील एकच आहे तर जरूर मनुष्य देखील थोडेच असतील.

शिडीच्या चित्रामध्ये सारे नॉलेज येते. जसे हे कुंभकर्णाचे चित्र आहे. तर याच्या सारखे बनवले पाहिजे - बी.के. ज्ञान-अमृत पाजत आहेत, ते विष (विकार) मागत आहेत. बाबा मुरली मध्ये सर्व सूचना देत राहतात. प्रत्येक चित्राचे स्पष्टीकरण खूप सुंदर आहे. लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर सांगा - हा भारत स्वर्ग होता. एक धर्म होता तर किती मनुष्य असतील! आता झाड किती मोठे झाले आहे. आता विनाश होणार आहे. जुन्या सृष्टीला बदलणारे एक बाबाच आहेत. ४-५ मुख्य चित्रे आहेत - ज्यामुळे कोणालाही लगेच ज्ञानाचा बाण लागू शकतो. ड्रामानुसार दिवसेंदिवस ज्ञानाचे पॉइंट्स अधिक गूढ होत जातात. त्यामुळे मग चित्रांमध्ये देखील बदल होत राहतील. मुलांच्या बुद्धीमध्ये देखील बदल होतो. पूर्वी हे थोडेच समजत होते की शिवबाबा बिंदू आहेत. असे थोडेच म्हणता येईल की, आधी असे का सांगितले नाही. बाबा म्हणतात - सर्व गोष्टी अगोदरच समजावून थोड्याच सांगितल्या जातात! बाबा ज्ञानाचा सागर आहेत तर ज्ञान देतच राहतील. करेक्शन होत राहील. आधीच सर्व काही थोडेच सांगतील. मग तर ते आर्टिफिशियल होईल. अचानक कोणते योगायोग (घटना) इत्यादी घडत राहतील, तर मग म्हणणार - ड्रामा. असे नाही की, हे व्हायला नको होते. मम्माला तर शेवट पर्यंत राहायला हवे होते, मग मम्मा का निघून गेल्या? ड्रामामध्ये जे झाले ते राइट. बाबांनी देखील जे सांगितले ते ड्रामा अनुसार सांगितले. ड्रामामध्ये माझा पार्ट असा आहे. बाबा देखील सर्व काही ड्रामावरच सोपवतात. मनुष्य म्हणतात - ईश्वराची भावी. ईश्वर म्हणतात - ड्रामाची भावी. ईश्वराने म्हटले किंवा याने (ब्रह्माने) म्हटले, ते ड्रामामध्ये होते. एखादे उलटे काम झाले, ड्रामामध्ये होते, मग पुन्हा सरळ होईल. चढती कला जरूर आहे. चढावा वरून जाताना, कधी डगमग होतात. ही सर्व मायेची वादळे आहेत. जोपर्यंत माया आहे तोपर्यंत विकल्प जरूर येतील. सतयुगामध्ये मायाच नाही तर विकल्पांची गोष्टच नाही. सतयुगामध्ये कधीही कर्म, विकर्म होत नाहीत. बाकी थोडेच दिवस आहेत, म्हणून आनंद वाटतो. हा आपला अंतिम जन्म आहे. आता अमरलोकमध्ये जाण्यासाठी आपण शिवबाबांकडून अमरकथा ऐकत आहोत. या गोष्टी फक्त तुम्हीच समजता. ते लोक कुठे-कुठे अमरनाथला जाऊन धक्के खात राहतात. ते हेच समजत नाहीत की पार्वतीला कथा कोणी ऐकवली? तिथे तर ‘शिव’चे चित्र दाखवतात. अच्छा शिव कोणामध्ये बसले (अवतरीत झाले)? शिव आणि शंकर दाखवतात. तर ‘शिव’ने शंकरामध्ये बसून कथा ऐकवली काय? काहीच समजत नाहीत, भक्तिमार्गातील लोक आजही तीर्थयात्रा करायला जात राहतात. वास्तविक कथा काही मोठी नाहीये. मुख्य आहे - मनमनाभव. बस्स, बीजाची आठवण करा. ड्रामाच्या चक्राची आठवण करा. जे ज्ञान बाबांकडे आहे ते ज्ञान आमच्या आत्म्यामध्ये देखील आहे. ते देखील ज्ञान सागर आहेत, आम्ही आत्मे देखील मास्टर ज्ञान सागर बनतो. नशा चढला पाहिजे ना. ते आम्हा भावांना (आत्म्यांना) ऐकवतात. ऐकवतील तर शरीरा द्वारेच. यामध्ये संशय येता कामा नये. बाबांची आठवण करता-करता संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये येते. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील, आसक्ती नष्ट होत जाईल. काहींच्या बाबतीत प्रेम केवळ नावापुरतेच असते. आपल्या बाबतीत देखील तसेच आहे. आता तर आपण सुखधाम मध्ये जात आहोत. हे सर्व जणू मृत झालेले आहेत, मग त्यांच्यावर आपण मन का जडू द्यायचे? आम्ही शांतीधाम मध्ये जाऊन मग सुखधाम मध्ये येऊन राज्य करणार. यालाच म्हटले जाते जुन्या दुनियेपासून वैराग्य. बाबा म्हणतात - या डोळ्यांनी जे काही पाहता ते सर्व नष्ट होणार आहे. विनाशानंतर स्वर्ग पाहाल. आता तुम्हा मुलांनी खूप गोड बनले पाहिजे. योग मध्ये राहून कोणाशी बोलाल तर त्यांना खूप कशिश होईल (मंत्रमुग्ध होतील). हे ज्ञान असे आहे की बाकी सर्व काही विसरायला होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानमार्गामध्ये आपली अवस्था अतिशय मजबूत (शक्तिशाली) बनवायची आहे. विदेही बनायचे आहे. खरे प्रेम त्या एका बाबांवरच असायला हवे.

२) ड्रामाच्या भावी वर अडोल राहायचे आहे (खंबीर राहायचे आहे). ड्रामामध्ये जे झाले ते राइट. कधीही डगमगायचे नाही, कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत संशय येऊ द्यायचा नाही.

वरदान:-
कमजोरींना फुलस्टॉप देऊन आपल्या संपन्न स्वरूपाला प्रख्यात करणारे साक्षात्कार मूर्त भव

विश्व तुमच्या कल्पापूर्वीच्या संपन्न स्वरूपाचे, पूज्य स्वरूपाचे स्मरण करत आहे, त्यामुळे आता आपल्या संपन्न स्वरूपाला प्रॅक्टिकलमध्ये प्रसिद्ध करा. झालेल्या चुकांना फुलस्टॉप लावा, दृढ संकल्पा द्वारे जुन्या संस्कार-स्वभावाला समाप्त करा, दुसऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीची नक्कल करू नका, अवगुण धारण करणाऱ्या बुद्धीचा नाश करा, दिव्य गुण धारण करणारी सतोप्रधान बुद्धी धारण करा, तेव्हाच साक्षात्कार मूर्त बनाल.

बोधवाक्य:-
आपल्या अनादि आणि आदि गुणांना स्मृतीमध्ये ठेवून त्यांना स्वरूपामध्ये आणा.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-

१) निराकार परमात्म्याचे रिझर्व तन - ब्रह्मा तन आहे:-

हा तर आपल्याला पूर्ण निश्चय आहे की, परमात्मा आपल्या साकार ब्रह्मा तना द्वारे येऊन शिकवत आहेत. या पॉईंटवर अनेक जिज्ञासू प्रश्न विचारतात की, ‘अमृतवेलेच्या वेळी निराकार परमात्मा जेव्हा आपल्या साकार तनामध्ये प्रवेश करतात, तेव्हा त्याच वेळी शरीरामध्ये कोणता बदल घडून येतो?’ ते विचारतात की, ‘परमात्मा कसे येतात हे तुम्ही त्यावेळी उठून त्यांना पाहता का?’ आता यावर समजावून सांगितले जाते की, परमात्म्याची प्रवेशता होत असताना असे नाही की त्या शरीराचे नयन-चैन (चेहरामोहरा) बदलून जातो, नाही. परंतु आपण जेव्हा ध्यानामध्ये जातो तेव्हा नयन-चैन बदलतात (चेहरामोहरा बदलतो), परंतु या साकार ब्रह्माचा पार्टच गुप्त आहे. जेव्हा परमात्मा यांच्या तनामध्ये येतात तेव्हा कोणालाही कळत नाही, त्यांचे हे तन रिझर्व केलेले आहे, त्यामुळे ते सेकंदामध्ये येतात, सेकंदामध्ये जातात. आता हे रहस्य समजून घ्या. बाकी असे नाही की एखादा पॉइंट समजला नाही म्हणून हे शिक्षणच सोडून द्यायचे आहे. हे शिक्षण तर दिवसेंदिवस अधिकाधिक सखोल आणि स्पष्ट होत आहे. संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही एकाच वेळी तर शिकू शकणार नाही ना, म्हणून तुम्हाला असे थोडे-थोडे समजावून सांगितले जाते. बाकीचे जे धर्म पिता येतात त्यांच्यामध्ये देखील त्यांची आपली-आपली पवित्र आत्मा येऊन आपला पार्ट बजावते; नंतर मग त्या आत्म्यांना सुख-दुःखाच्या खेळामध्ये यायचेच आहे, ते काही परत निघून जात नाहीत. परंतु निराकार सुप्रीम सोल जेव्हा येतात तेव्हा ते सुख-दुःखा पासून न्यारे आहेत, तर ते फक्त आपला पार्ट बजावून मग निघून जातात. तर याच पॉईंटला आपण बुद्धीने नीट समजून घ्यायचे आहे.

२) आत्मा आणि परमात्मा यांच्यामधील गुण आणि शक्तींचा फरक

आत्मा आणि परमात्मा यांच्या मधील फरक याविषयी समजावून सांगितले जाते की, आत्म्याचे आणि परमात्म्याचे रूप एक सारखे ज्योति स्वरूप आहे. आत्म्याचा आणि परमात्म्याचा आकार एक सारखाच आहे, बाकी आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये फरक फक्त गुणांच्या शक्तीचा जरूर आहे. आता हे जे इतके गुण आहेत ती सारी महिमा परमात्म्याची आहे. परमात्मा सुख-दुःखा पासून न्यारे आहेत, सर्वशक्तिवान आहेत, ही पूर्णतः त्यांचीच शक्ती कार्य करत आहे. बाकी मनुष्य आत्म्याची कोणतीही शक्ती चालू शकत नाही. संपूर्ण पार्ट परमात्म्याचाच चालतो, भले परमात्मा पार्टमध्ये देखील येतात, तरी देखील स्वतः न्यारे राहतात. परंतु आत्मा पार्टमध्ये येऊन देखील पार्टधारीच्या रूपामध्ये येते, परमात्मा पार्टमध्ये येऊन देखील कर्मबंधना पासून न्यारे आहेत. आत्मा पार्टमध्ये येऊन कर्मबंधनाच्या वश होते. हाच आहे आत्मा आणि परमात्मा यांच्या मधील फरक. अच्छा. ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

एखाद्याने शिवी जरी दिली, खोटा आरोप जरी केला, तरीही तुम्हाला क्रोध येता कामा नये. अपकारीवर उपकार करणे, हेच तुम्हा ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. तो शिवी देईल आणि तुम्ही त्याला प्रेमाने जवळ घ्या, हीच कमाल आहे; यालाच म्हटले जाते - परिवर्तन. जे तुम्हाला प्रेमाने जवळ करतात, त्यांना प्रेमाने जवळ घेणे, ही काही मोठी गोष्ट नाहीये परंतु निंदा करणाऱ्याला मनापासून खरा मित्र माना, तेव्हाच म्हणणार - उपकार करणारे.