20-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हा मुलांना अविनाशी कमाई करवून देण्यासाठी, आता तुम्ही
ज्ञान रत्नांची जितकी कमाई करू इच्छिता तितकी करू शकता”
प्रश्न:-
आसुरी
संस्कारांना बदलून दैवी संस्कार बनविण्यासाठी कोणता विशेष पुरुषार्थ केला पाहिजे?
उत्तर:-
आसुरी संस्कारांना बदलण्यासाठी जितके शक्य होईल तितके देही-अभिमानी राहण्याचा
अभ्यास करा. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे आसूरी संस्कार बनतात. बाबा आसुरी
संस्कारांना दैवी संस्कार बनविण्यासाठी आले आहेत, पुरुषार्थ करा - पहिला मी देही
आत्मा आहे, नंतर हे शरीर आहे.
गीत:-
तूने रात
गँवाई सो के…
ओम शांती।
हे गाणे तर मुलांनी अनेक वेळा ऐकले आहे. रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा सावधानी देत
राहतात की, ही वेळ गमावण्याची नाही आहे. ही वेळ खूप मोठी कमाई करण्याची आहे. कमाई
करवून देण्यासाठी बाबा आलेले आहेत. कमाई देखील प्रचंड आहे, ज्याला जितकी कमाई करायची
असेल तितकी करू शकतात. ही आहे अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरण्याची कमाई. ही आहे
भविष्याकरिता. ती आहे भक्ती, हे आहे ज्ञान. मनुष्य हे जाणत नाहीत की, भक्ती तेव्हा
सुरु होते जेव्हा रावण राज्य सुरु होते. आणि मग ज्ञान तेव्हा सुरु होते जेव्हा बाबा
येऊन रामराज्य स्थापन करतात. ज्ञान आहेच नवीन दुनियेकरिता, भक्ती आहे जुन्या
दुनियेकरिता. आता बाबा म्हणतात - पहिले तर स्वतःला देही (आत्मा) समजायचे आहे. तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की - आपण आधी आत्मा आहोत, नंतर शरीर आहोत. परंतु ड्रामा
प्लॅन अनुसार सर्व मनुष्य चुकीचे झाले आहेत म्हणून त्यांनी उलटे समजले आहे की आधी
आपण शरीर आहोत नंतर देही आहोत. बाबा म्हणतात हे शरीर तर विनाशी आहे. याला तुम्ही
धारण करता आणि सोडता. संस्कार आत्म्यामध्ये असतात. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे
संस्कार आसुरी बनतात. मग आसुरी संस्कारांना दैवी बनविण्यासाठी बाबांना यावे लागते.
ही सर्व रचना त्या एक रचता बाबांचीच आहे. त्यांना सर्वजण बाबा म्हणतात. जसे लौकिक
पित्याला देखील बाबाच म्हटले जाते. बाबा आणि मम्मा हे दोन्ही शब्द खूप गोड आहेत.
रचता तर बाबांनाच म्हणणार. आधी ते आईला ॲडॉप्ट करतात नंतर रचना रचतात. बेहदचे बाबा
देखील म्हणतात की मी येऊन यांच्यामधे प्रवेश करतो, यांचे नाव प्रसिद्ध आहे. म्हणतात
देखील भागीरथ. मनुष्याचेच चित्र दाखवतात. काही बैल इत्यादी नाहीये. भागीरथ मनुष्याचे
तन आहे. बाबाच येऊन मुलांना स्वतःचा परिचय देतात. तुम्ही नेहमी असे म्हणा आम्ही
बापदादांकडे जातो. फक्त बाबाच म्हणाल तर ते निराकार होतात. निराकार बाबांकडे तर
तेव्हा जाऊ शकता जेव्हा शरीर सोडाल, असेच तर कोणीही जाऊ शकत नाहीत. हे नॉलेज बाबाच
देतात. हे नॉलेज आहे देखील बाबांकड़ेच. अविनाशी ज्ञान रत्नांचा खजिना आहे. बाबा आहेत
ज्ञान रत्नांचे सागर. पाण्याची गोष्ट नाही. ज्ञान रत्नांचा भांडार आहे.
त्यांच्यामध्ये नॉलेज आहे. नॉलेज पाण्याला म्हटले जात नाही. जसे मनुष्याला बॅरिस्टरी,
डॉक्टरी इत्यादीचे नॉलेज असते, हे देखील नॉलेज आहे. या नॉलेज साठीच ऋषी-मुनी इत्यादी
सर्व म्हणत होते की रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज आम्ही जाणत नाही. ते
तर एक रचताच जाणे. झाडाचे बीजरूप देखील तेच आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज
त्यांच्यामध्ये आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ऐकवतील. आता तुम्हाला नॉलेज मिळाले आहे
तर तुम्ही या नॉलेजद्वारे देवता बनता. नॉलेज प्राप्त करून मग प्रारब्ध मिळवता. तिथे
(सतयुगामध्ये) मग या नॉलेजची आवश्यकता असणार नाही. असे नाही की देवतांमध्ये हे
ज्ञान नाही म्हणजे ते अज्ञानी आहेत. नाही, ते तर या नॉलेजद्वारे पद प्राप्त करतात.
बाबांना बोलावतातच की बाबा या, आम्हाला पतितापासून पावन बनण्यासाठी रस्ता अथवा
नॉलेज सांगा कारण आम्ही जाणत नाही. आता तुम्ही जाणता आपण आत्मे शांतीधाम वरून आलो
आहोत. तिथे आत्मे शांतीने राहतात. इथे आलो आहोत पार्ट बजावण्याकरिता. ही जुनी दुनिया
आहे, तर जरूर नवीन दुनिया होती. ती केव्हा होती, कोण राज्य करत होते - हे कोणीही
जाणत नाही. तुम्ही आता बाबांद्वारे जाणले आहे. बाबा आहेतच ज्ञानाचा सागर, सद्गती
दाता. त्यांनाच बोलावतात की, बाबा येऊन आमचे दुःख हरण करा, सुख-शांती द्या. आत्मा
जाणते परंतु तमोप्रधान झाली आहे म्हणून पुन्हा बाबा येऊन परिचय देत आहेत. मनुष्य ना
आत्म्याला जाणत, ना परमात्म्याला जाणत. आत्म्याला ज्ञानच नाहीये की परमात्म-अभिमानी
बनावे. आधी तुम्ही देखील जाणत नव्हता. आता ज्ञान मिळाले आहे तर समजता खरोखर चेहरा
मनुष्याचा होता आणि चारित्र्य माकडाचे होते.
आता बाबांनी नॉलेज दिले आहे तर आपण देखील नॉलेजफुल बनलो आहोत. रचता आणि रचनेचे
ज्ञान मिळाले आहे. तुम्ही जाणता आपल्याला भगवान शिकवत आहेत, तर किती नशा असला पाहिजे.
बाबा आहेत ज्ञानाचे सागर, त्यांच्यामध्ये बेहदचे ज्ञान आहे. तुम्ही कोणाकडेही जा -
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञानच काय परंतु आपण आत्मा काय चीज आहोत, हे देखील
जाणत नाहीत. बाबांची आठवण देखील करतात, दु:खहर्ता सुखकर्ता, तरीही ईश्वराला
सर्वव्यापी म्हणतात. बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार त्यांचा देखील काही दोष नाही.
माया एकदम तुच्छ-बुद्धी बनवते. किड्यांना मग घाणीतच सुख वाटते. बाबा येतात घाणीतून
बाहेर काढण्यासाठी. मनुष्य दलदलीमध्ये फसलेले आहेत. ज्ञाना विषयी माहितीच नाहीये तर
काय करतील. दलदलीमध्ये अडकून पडले आहेत मग त्यांना बाहेर काढणे अवघड होते. त्यांना
बाहेर काढून अर्ध्या-पाऊण पर्यंत घेऊन जा तरीही हात सोडून देतात तर कोसळतात (पतन
होते). बरीच मुले इतरांना ज्ञान देता-देता स्वतःच मायेचे थप्पड खातात कारण बाबांच्या
डायरेक्शनच्या विरुद्ध कार्य करतात. दुसऱ्यांना काढण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच
कोसळतात मग त्यांना काढण्यासाठी किती मेहनत करावी लागते कारण मायेकडून हार खातात.
त्यांना त्यांचेच पाप आतल्याआत खात असते. मायेशी युद्ध आहे ना. आता तुम्ही
युद्धाच्या मैदानावर आहात. ती आहे बाहुबळाने युद्ध करणारी हिंसक सेना. तुम्ही आहात
अहिंसक. तुम्ही राज्य घेता अहिंसेने. हिंसा दोन प्रकारची असते ना. एक आहे काम कटारी
चालविणे आणि दुसरी हिंसा आहे कोणालाही मारपिट करणे. तुम्ही आता डबल अहिंसक बनता. हे
ज्ञानबळाचे युद्ध कोणीही जाणत नाहीत. अहिंसा कशाला म्हटले जाते हे कोणीही जाणत
नाहीत. भक्तीमार्गाची सामग्री किती भरपूर आहे. गातात देखील - पतित-पावन या परंतु मी
कसा येऊन पावन बनवितो - हे कोणीही जाणत नाहीत. गीतेमध्ये देखील चूक केली आहे की
मनुष्याला भगवान म्हटले आहे. शास्त्रे मनुष्यांनीच बनविली आहेत. मनुष्यच शिकतात.
देवतांना तर शास्त्र शिकण्याची आवश्यकताच नाही. तिथे काही शास्त्र असत नाहीत. ज्ञान,
भक्ती आणि नंतर आहे वैराग्य. कशाचे वैराग्य? भक्तीचे, जुन्या दुनियेचे वैराग्य आहे.
जुन्या शरीराचे वैराग्य आहे. बाबा म्हणतात - या डोळ्यांनी जे काही बघता ते राहणार
नाही. या सर्व घाणेरड्या (पतित) दुनियेपासून वैराग्य आहे. बाकी नवीन दुनियेचा तर
तुम्ही दिव्यदृष्टी द्वारा साक्षात्कार करता. तुम्ही शिकताच मुळी नवीन दुनियेकरिता.
हे शिक्षण काही या जन्मासाठी नाही आहे. बाकीचे जे काही शिक्षण आहे, ते असते त्याच
वेळेसाठी त्याच जन्मासाठी. आता तर आहे संगम म्हणून तुम्ही जे शिकता त्याचे प्रारब्ध
तुम्हाला नवीन दुनियेमध्ये मिळते. बेहदच्या बाबांकडून किती मोठे प्रारब्ध तुम्हाला
मिळते! बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाची प्राप्ती होते. तर मुलांना पूर्ण पुरुषार्थ
करून श्रीमतावर चालले पाहिजे. बाबा आहेत श्रेष्ठ ते श्रेष्ठ. त्यांच्याद्वारे तुम्ही
श्रेष्ठ बनता. ते तर सदैव आहेतच श्रेष्ठ. तुम्हाला श्रेष्ठ बनवतात. ८४ जन्म घेत-घेत
मग तुम्ही भ्रष्ट बनता. बाबा म्हणतात - मी तर जन्म-मरणामध्ये येत नाही. मी आता
भाग्यशाली रथामध्येच प्रवेश करतो, ज्याला तुम्ही मुलांनी ओळखले आहे. तुमचे आता छोटे
झाड आहे. झाडाला वादळे सुद्धा लागतात ना. पाने झडत राहतात. असंख्य फुले येतात आणि
मग वादळ आल्याने गळून पडतात. काही-काही चांगली फळे येतात तरी देखील मायेच्या वादळाने
खाली पडतात. मायेचे वादळ खूप वेगवान आहे. त्या बाजूला आहे बाहूबळ, या बाजूला आहे
योगबळ अथवा आठवणीचे बळ. तुम्ही ‘आठवण’ हा शब्द पक्का करा. ते लोक ‘योग-योग’ फक्त
शब्द बोलत राहतात. तुमची आहे आठवण. चालता-फिरता बाबांची आठवण करता, याला योग
म्हणणार नाही. संन्याशांचा ‘योग’ शब्द प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे योग शिकवतात.
बाबा किती सोपी विधी सांगतात - उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करा. तुम्ही
अर्ध्या कल्पाचे आशिक आहात. माझी आठवण करत आला आहात. आता मी आलो आहे. आत्म्याला
कोणीही जाणत नाहीत म्हणून बाबा येऊन जाणीव करून देतात. या देखील समजून घेण्यासारख्या
अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. आत्मा अति सूक्ष्म आणि अविनाशी आहे. ना आत्मा विनाश
होणारी आहे, ना तिचा पार्ट विनाश होऊ शकत. या गोष्टी जड-बुद्धीवाले फार मुश्किलीने
समजू शकतात. शास्त्रांमध्ये सुद्धा या गोष्टी नाहीत.
तुम्हा मुलांना बाबांची आठवण करण्याची खूप मेहनत करावी लागते. ज्ञान तर खूप सोपे आहे.
बाकी विनाशकाले प्रीत-बुद्धी आणि विपरीत-बुद्धी हे आठवणीसाठी म्हटले जाते. आठवण
चांगली आहे तर प्रीत-बुद्धी म्हटले जाते. प्रीत देखील अव्यभिचारी पाहिजे. स्वतःला
विचारायचे आहे - आपण बाबांची किती आठवण करतो? हे देखील समजता बाबांसोबत प्रीत
ठेवता-ठेवता जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा हे शरीर सुटेल आणि युद्ध सुरु होईल.
बाबांवर जितके प्रेम असेल तितके तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. परीक्षा तर एकदाच
होईल ना. जेव्हा वेळ पूर्ण होते, सर्वांची प्रीत-बुद्धी बनते, तेव्हा मग विनाश होतो.
तोपर्यंत भांडणे इत्यादी होत राहतील. परदेशवाले देखील समजतात आता मृत्यू समोर आहे,
कोणी प्रेरक आहे, जो आमच्याकडून बॉम्ब्स बनवून घेतो. परंतु करणार तरी काय.
ड्रामामध्ये नोंदलेले आहे ना. आपल्याच सायन्सबळाद्वारे आपल्याच कुळाचा मृत्यू घडवून
आणतात. मुले म्हणतात -पावन दुनियेमध्ये घेऊन जा, तर शरीरांना थोडेच घेऊन जातील. बाबा
काळांचाही काळ आहेत ना. या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. गायले गेले आहे - ‘मिरूआ मौत
मलूका शिकार’. ते म्हणतात विनाश थांबावा आणि शांती व्हावी. अरे, विनाशाशिवाय
सुख-शांती कशी स्थापन होईल म्हणून सृष्टीचक्रावर जरूर समजावून सांगा. आता स्वर्गाचे
गेट उघडत आहेत. बाबांनी सांगितले आहे यावर देखील एक पुस्तक छापा - ‘गेट वे टू
शांतीधाम-सुखधाम’. याचा अर्थ देखील समजणार नाहीत. आहे खूप सोपा, परंतु कोटींमध्ये
कोणी मुश्किलीने समजतात. तुम्ही प्रदर्शनी इत्यादीमध्ये कधीही निराश होता कामा नये.
प्रजा तर बनते ना. ध्येय मोठे आहे, मेहनत करावी लागते. मेहनत आहे आठवणीची. त्यामध्ये
खूपजण फेल होतात. आठवण देखील अव्यभिचारी पाहिजे. माया घडोघडी विसरायला लावते. मेहनती
शिवाय थोडेच कोणी विश्वाचे मालक बनू शकतात. पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे - आपण
सुखधामाचे मालक होतो. अनेक वेळा चक्र फिरलो आहोत. आता बाबांची आठवण करायची आहे. माया
खूप विघ्न उत्पन्न करते. बाबांकडे सेवेचे देखील समाचार येतात - ‘आज विद्वत मंडळीला
समजावून सांगितले, आज असे केले…’ ड्रामा अनुसार मातांचे नाव प्रसिद्ध होणार आहे.
तुम्हा मुलांनी हा विचार केला पाहिजे, मातांना पुढे ठेवायचे आहे. हे आहे चैतन्य
दिलवाडा मंदिर. तुम्ही चैतन्यमध्ये बनणार मग तुम्ही राज्य करत रहाल. भक्तीमार्गातील
मंदिरे इत्यादी राहणार नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एका
बाबांवर अव्यभिचारी प्रेम करता-करता कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. या
जुन्या देहापासून आणि जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य असावे.
२) कोणतेही कर्तव्य
बाबांच्या डायरेक्शनच्या विरुद्ध करायचे नाही. युद्धाच्या मैदानामध्ये कधीही हार
पत्करायची नाही. डबल अहिंसक बनायचे आहे.
वरदान:-
शुभ भावनेने
सेवा करणारे बाप समान अपकारींवर देखील उपकारी भव
जसे बाबा अपकारींवर
उपकार करतात, तसे तुमच्यासमोर कशीही आत्मा असेल परंतु आपल्या दयाळू वृत्तीने, शुभ
भावनेने त्याचे परिवर्तन करा - हीच आहे खरी सेवा. जसे वैज्ञानिक वाळूमध्ये देखील
शेती पिकवतात तसे सायलेन्सच्या शक्तीद्वारे दयाळू बनून अपकारींवर देखील उपकार करून
धरणीला परिवर्तन करा. स्व-परिवर्तनाद्वारे, शुभ भावनेद्वारे कोणतीही आत्मा परिवर्तन
होईल, कारण शुभ भावना सफलता अवश्य प्राप्त करून देते.
बोधवाक्य:-
ज्ञानाचे
सिमरण करणे हाच सदैव हर्षित राहण्याचा आधार आहे.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
तुम्हा
ब्राह्मणांसारखी रूहानी पर्सनॅलिटी साऱ्या कल्पामध्ये दुसऱ्या कोणाचीही नाही कारण
तुम्हा सर्वांची पर्सनॅलिटी बनविणारे उच्च ते उच्च स्वयं परम आत्मा आहेत. तुमची
सर्वात मोठ्यात मोठी पर्सनॅलिटी आहे - स्वप्न किंवा संकल्पामध्ये देखील संपूर्ण
प्युरिटी. या प्युरिटी सोबत चेहरा आणि वर्तनामध्ये रुहानीयतची देखील पर्सनॅलिटी आहे
- आपल्या या पर्सनॅलिटीमध्ये कायम स्थित रहा तर स्वतःच सेवा होईल.