20-07-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.02.2006  ओम शान्ति   मधुबन


“आज उत्सवाच्या दिवशी मनाच्या उमंग-उत्साहा द्वारे मायेपासून मुक्त राहण्याचे व्रत घ्या, मर्सीफुल बनून मास्टर मुक्तिदाता बना, सोबत यायचे असेल तर समान बना”


आज चोहो बाजूंच्या अति स्नेही मुलांची उमंग-उत्साहाने भरलेली गोड-गोड प्रेमपूर्वक आठवण आणि शुभेच्छा पोहोचत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये बापदादांच्या जन्मदिवसाच्या उमंगाने भरलेल्या शुभेच्छा सामावलेल्या आहेत. तुम्ही देखील सर्व विशेषत: आज शुभेच्छा देण्यासाठी आला आहात की घेण्यासाठी आला आहात? बापदादा देखील प्रत्येक सिकीलध्या (खूप वर्षानंतर भेटलेल्या) लाडक्या मुलांना, मुलांच्या जन्म दिवसाच्या पदम-पदम-पदम पटीने शुभेच्छा देत आहेत. आजच्या दिवसाची विशेषता जी साऱ्या कल्पामध्ये नाही आहे ती आज आहे आणि ती म्हणजे पित्याचा आणि मुलांचा जन्म दिवस एकाचवेळी आहे. याला म्हटले जाते विचित्र जयंती. साऱ्या कल्पामध्ये फेरी मारून बघा अशी जयंती कधी साजरी केली आहे! परंतु आज बापदादा मुलांची जयंती साजरी करत आहेत आणि मुले बापदादांची जयंती साजरी करत आहेत. नाव तर शिव जयंती म्हणतात परंतु ही एक अशी जयंती आहे की या एका जयंतीमध्ये अनेक जयंत्या सामावलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना देखील खूप आनंद होत आहे ना की आम्ही बाबांना मुबारक द्यायला आलो आहोत आणि बाबा आम्हाला मुबारक देण्यासाठी आले आहेत कारण की पित्याचा आणि मुलांचा एकत्र जन्म दिवस असणे ही अति प्रेमाची निशाणी आहे. बाबा मुलांशिवाय काहीही करू शकत नाहीत आणि मुले बाबांशिवाय काहीच करू शकत नाहीत. जन्म देखील एकत्र आहे आणि संगमयुगामध्ये रहायचे देखील एकत्र आहे कारण की बाबा आणि मुले कंबाइंड आहेत. विश्व कल्याणाचे कार्य देखील एकत्र आहे, एकटे बाबा सुद्धा करू शकत नाहीत, मुले देखील करू शकत नाहीत, सोबत एकत्र आहेत आणि बाबांचा वायदा आहे - सोबत राहणार, सोबत येणार. सोबत येणार ना! वायदा आहे ना! पित्याचे आणि मुलांचे इतके प्रेम पाहिले आहे का? पाहिले आहे की अनुभव करत आहात? म्हणून या संगमयुगाचे महत्व आहे आणि याच भेटीचे यादगार (आठवण) विविध जत्रांमध्ये बनवलेले आहे. या शिवजयंतीच्या दिवशी भक्त बोलावत आहेत - ‘या’. कधी येतील, कसे येतील…, हाच विचार करत आहेत आणि तुम्ही साजरे करत आहात.

बापदादांचे भक्तांवर प्रेम देखील आहे, दया देखील येते, किती काय प्रयत्न करतात, शोधत रहातात. तुम्ही शोधलेत? की बाबांनी तुम्हाला शोधले? कोणी शोधले? तुम्ही शोधलेत? तुम्ही तर प्रदक्षिणाच घालत राहिलात. परंतु बाबांनी बघा मुलांना शोधून काढले, भले मुले कोणत्याही कोपऱ्यामध्ये हरवली होती. आज देखील बघा भारताच्या अनेक राज्यांमधून तर आला आहात परंतु विदेश देखील कमी नाही आहे, १०० देशांमधून आलेले आहेत. आणि मेहनत कोणती केलीत? बाबांचे बनण्यामध्ये मेहनत कोणती केलीत? मेहनत केलीत का? केली आहे मेहनत? हात वर करा ज्यांनी बाबांना शोधण्यामध्ये मेहनत केली आहे. भक्तांनी केले परंतु जेव्हा बाबांनी शोधून काढले, तर मेहनत केलीत? केली मेहनत? सेकंदामध्ये सौदा केलात. एका शब्दामध्ये सौदा झाला. तो एक शब्द कोणता? “माझे”. मुलांनी म्हटले “माझे बाबा”, बाबांनी म्हटले “माझी मुले”. आणि झाले. स्वस्त सौदा आहे की अवघड आहे? स्वस्त आहे ना! जे समजतात थोडा-थोडा अवघड आहे त्यांनी हात वर करा. कधी-कधी तर अवघड वाटतो ना! की नाही? आहे सोपा परंतु आपल्या कमकुवतपणामुळे अवघड वाटू लागते.

बापदादा बघतात की भक्त देखील जे खरे भक्त आहेत, स्वार्थी भक्त नाहीत, खरे भक्त, आजच्या दिवशी खूप प्रेमाने व्रत करतात. तुम्ही सर्वांनी देखील व्रत तर घेतले आहे, ते थोड्या दिवसांकरिता व्रत घेतात आणि तुम्ही सर्वांनी असे व्रत घेतले आहे जे आत्ताचे हे एक व्रत २१ जन्म कायम रहाते. ते दरवर्षी साजरे करतात, व्रत घेतात, तुम्ही कल्पामध्ये एकदाच व्रत घेता जे २१ जन्म ना मनाने व्रत घ्यावे लागते, ना तनाने व्रत घ्यावे लागते. व्रत तर तुम्ही देखील घेता, कोणते व्रत घेतले आहे? पवित्र वृत्ति, दृष्टी, कृति, पवित्र जीवनाचे व्रत घेतले आहे. जीवनच पवित्र बनले आहे. पवित्रता म्हणजे केवळ ब्रह्मचर्य व्रत नाही, परंतु जीवनामध्ये आहार, व्यवहार, संसार, संस्कार सर्व पवित्र. असे व्रत घेतले आहे ना? मान हलवा. घेतले आहे? पक्के घेतले आहे? पक्के की थोडे-थोडे कच्चे? अच्छा, एक महाभूत काम विकार, त्याचे व्रत घेतले आहे की इतर चारही विकारांचे व्रत देखील घेतले आहे? ब्रह्मचारी तर बनलात परंतु चार जे मागे आहेत, त्याचे देखील व्रत घेतले आहे? क्रोधाचे व्रत घेतले आहे की त्याला सूट आहे? क्रोध करण्याची परवानगी मिळाली आहे? दुसरा नंबर आहे ना तर काही हरकत नाही, असे तर नाही ना? जसे महाभूताला, महाभूत समजून मन-वाणी-कर्मामध्ये पक्के व्रत घेतले आहे, असेच क्रोधाचे देखील व्रत घेतले आहे? जे समजतात आम्ही क्रोधाचे देखील व्रत घेतले आहे, याची मुलेबाळे मागे देखील आहेत - लोभ, मोह, अहंकार; परंतु बापदादा आज क्रोधा विषयी विचारत आहेत, ज्यांनी क्रोध विकाराचे पूर्ण व्रत घेतले आहे, संकल्पामध्ये देखील क्रोध नाही, मनामध्ये देखील क्रोधाची फिलिंग नाही, असे आहे? आज शिवजयंती आहे ना! तर भक्त व्रत करतील मग बापदादा व्रत तर विचारणार ना! जे समजतात की स्वप्नामध्ये देखील क्रोधाचा अंश येऊ शकत नाही, त्यांनी हात वर करा. येऊ शकत नाही. आहे? येत नाही? नाही येत? (काही जणांनी हात वर केला) अच्छा, ज्यांनी हात वर केला त्यांचा फोटो काढा, कारण बापदादा फक्त तुमच्या हात वर करण्याने मानणार नाहीत, तुमच्या साथीदारांकडून देखील सर्टिफिकेट घेतील आणि मगच प्राईज देतील. चांगली गोष्ट आहे कारण बापदादांनी बघितले की क्रोधाचा अंश देखील असतो, ईर्ष्या, मत्सर ही देखील क्रोधाची मुलेबाळे आहेत. परंतु छान आहे ज्यांनी हिंमत ठेवली आहे, त्यांना बापदादा आत्ता तर मुबारक देत आहेत परंतु सर्टिफिकेटच्या नंतर मग प्राईज देणार कारण बाप-दादांनी जे होमवर्क दिले होते, त्याचा रिझल्ट देखील बापदादा बघत आहेत.

आज बर्थ डे साजरा करत आहात, तर बर्थ डे ला काय केले जाते? एक तर केक कापतात, मग आता दोन महिने तर होऊन गेले आहेत, अजून एक महिना राहीला आहे, त्या दोन महिन्यांमध्ये आपल्या व्यर्थ संकल्पांचा केक कापलात? तो केक तर खूप सहज कापता ना, आजही कापाल. परंतु वेस्ट थॉट्सचा केक कापलात? कापावा तर लागेल ना! कारण की सोबत जायचे आहे, हा तर पक्का वायदा आहे ना! की सोबत आहोत, सोबत जाणार. सोबत जायचे असेल तर समान तर बनावे लागेल ना! जर थोडे-फार राहीले जरी असेल, दोन महिने तर पूर्ण झाले, तर आजच्या दिवशी बर्थ डे साजरा करण्यासाठी कुठून-कुठून आला आहात. प्लेन मधून देखील आला आहात, ट्रेनने देखील आला आहात, कारने देखील आला आहात, बापदादांना आनंद आहे की धावत-पळत आला आहात. परंतु बर्थ डे ला अगोदर गिफ्ट देखील देतात, तर जो एक महिना राहिलेला आहे, होळी देखील येणार आहे. होळीमध्ये देखील काहीतरी जाळलेच जाते. तर थोडे-फार जे वेस्ट थॉट्स आहेत बीज, जर बीज राहिलेले असेल तर ते रुजून कधी खोडही बाहेर येईल, कधी फांद्या देखील फुटतील; तर काय आजच्या उत्सवाच्या दिवशी मनाच्या उमंग-उत्साहाने, (मनाचा उमंग-उत्साह, चेहऱ्यावरचा नाही मनाचा, मनाच्या उमंग-उत्साहाने) जे थोडे-फार राहिलेले आहे, भले मनसामध्ये, भले वाणी मध्ये, भले संबंध-संपर्कामध्ये, काय आज बाबांच्या बर्थ डे ला बाबांना हे गिफ्ट देऊ शकता? देऊ शकता मनाच्या उमंग-उत्साहाने? फायदा तर तुमचा आहे, बाबांना तर बघायचे आहे. जे उमंग-उत्साहाने हिंमत ठेवतात, की करूनच दाखवणार, बेस्ट बनून दाखवणारच त्यांनी हात वर करा. बघा सोडावे लागेल, विचार करा. वाणीमध्ये देखील नको. संबंध-संपर्कामध्ये देखील नको. आहे हिंमत? हिंमत आहे? मधुबनवाल्यांमध्ये देखील आहे, फॉरेन वाल्यांमध्ये देखील आहे, भारतवासीयांमध्ये देखील आहे कारण बापदादांचे प्रेम आहे ना, तर बापदादा समजतात सर्वांनी एकत्र जावे, कोणी मागे रहायला नको. जेव्हा वायदा केला आहे, सोबत येणार, तर समान तर बनावेच लागेल. प्रेम आहे ना! मजबुरीने तर हात वर केला नाहीत ना?

बापदादा या संगठनचा, ब्राह्मण परिवाराचा बाप समान मुखडा पाहू इच्छितात. फक्त दृढ संकल्पाची हिंमत करा, काही मोठी गोष्ट नाहीये परंतु सहनशक्ती पाहिजे, सामावण्याची शक्ती पाहिजे. या दोन शक्ती, ज्याच्यामध्ये सहनशक्ती आहे, सामावण्याची शक्ती आहे, तो क्रोधमुक्त सहज होऊ शकतो. तर तुम्हा ब्राह्मण मुलांना तर बापदादांनी सर्व शक्ती वरदानामध्ये दिल्या आहेत, टायटलच आहे - मास्टर सर्वशक्तीवान. बस एक स्लोगन लक्षात ठेवा, जर एका महिन्यामध्ये समान बनायचेच आहे तर एक स्लोगन लक्षात ठेवा, वायदा केलेल्या मधले आहे - ‘ना दुःख द्यायचे आहे, ना दुःख घ्यायचे आहे’. बरेचजण हे चेक करतात की, आजच्या दिवशी कोणाला दुःख दिले नाही, परंतु घेतात खूप सहजपणे कारण घेण्यामध्ये दुसरा देतो ना, तर स्वतःला सोडवतात, मी थोडेच काही केले, दुसऱ्याने दिले, परंतु घेतले का? घेणारे तुम्ही आहात की देणारे? देणाऱ्याने चूक केली, ते बाबा आणि ड्रामा जाणोत तो त्याचा हिशोब, परंतु तुम्ही घेतले का? बापदादांनी रिझल्टमध्ये पाहिले आहे की, देण्यामध्ये तरीही विचार करतात परंतु घेतात मात्र फार लवकर त्यामुळे समान बनू शकणार नाही. घ्यायचे नाही, कितीही कोणी देईल, नाहीतर मग फिलिंगचा आजार वाढतो म्हणून जर छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये फिलिंग वाढत असेल तर वेस्ट थॉट्स संपू शकणार नाहीत मग बाबांसोबत कसे येणार! बाबांचे प्रेम आहे, बाबा तुम्हाला सोडू शकत नाहीत, सोबत घेऊनच जायचे आहे. मंजूर आहे? पसंत आहे ना? पसंत आहे तर हात वर करा. मागे-मागे तर यायचे नाही आहे ना! जर सोबत यायचे आहे तर गिफ्ट द्यावीच लागेल. एक महिना सर्वांनी अभ्यास करा - ना दुःख द्यायचे आहे ना दुःख घ्यायचे आहे. असे म्हणू नका - मी दिले नाही, त्याने घेतले, काही तरी होते. पर-दर्शन करायचे नाही, स्व-दर्शन. ‘हे अर्जुन’ मला बनायचे आहे.

बघा, बापदादांनी रिपोर्टमध्ये बघितले, संतुष्टतेचा रिपोर्ट अजून मेजॉरिटींचा नव्हता, म्हणून बापदादा मग एका महिन्यासाठी अंडरलाईन करवून घेत आहेत. जर एक महिना अभ्यास केला तर सवय लागेल. सवय लावायची आहे. क्षुल्लक समजून सोडून द्यायचे नाही, ‘असे तर होतेच, एवढे तर चालेल’, नाही. जर बापदादांवर प्रेम आहे तर प्रेमासाठी काय फक्त एक क्रोध विकाराला कुर्बान करू शकत नाही? कुर्बान असणाऱ्याची निशाणी आहे - फर्मान (आदेश) मानणारा. व्यर्थ संकल्प अंतिम वेळेला खूप धोका देऊ शकतो कारण चोहो बाजूंनी दुःखाचे वायुमंडळ, प्रकृतीचे वायुमंडळ आणि आत्म्यांचे वायुमंडळ आपल्या दिशेने आकर्षित करणारे असेल. जर वेस्ट थॉट्सची सवय असेल तर वेस्ट मध्येच अडकून पडाल. तर बापदादांचा आज विशेष हा हिंमतीचा संकल्प आहे, भले विदेशामध्ये रहात असाल, भले भारतामध्ये रहात असाल, आहात तर एका बापदादांची मुले. तर चोहो बाजूंच्या मुलांनी हिंमत आणि दृढता ठेवून, सफलता मूर्त बनून विश्वामध्ये हे घोषित करावे की काम विकार नाही, क्रोध नाही, आम्ही परमात्म्याची मुले आहोत. दुसऱ्यांची दारू सोडवता, विडी सोडवता, परंतु बापदादा आज प्रत्येक मुलाला क्रोधमुक्त, काम विकार मुक्त या दोन्हीसाठी हिंमत देऊन स्टेजवर विश्वाला दाखवू इच्छित आहेत. पसंत आहे? दादींना पसंत आहे? पहिली लाईन वाल्यांना पसंत आहे? मधुबनवाल्यांना पसंत आहे? मधुबनवाल्यांना देखील पसंत आहे. फॉरेनवाल्यांना पसंत आहे? तर जी गोष्ट पसंत असते ती करणे काही मोठी गोष्ट आहे. बापदादा देखील एक्स्ट्रा किरणे देतील. असा नकाशा दिसावा की हा आशीर्वाद देणारा आणि आशीर्वाद घेणारा ब्राह्मण परिवार आहे कारण काळ देखील हाक मारत आहे, बापदादांकडे तर ॲडव्हान्स पार्टीवाले देखील हृदयापासून हाक मारत आहेत. माया देखील आता थकून गेली आहे. तीची सुद्धा इच्छा आहे की आता मला देखील मुक्ती द्या. मुक्ती देतात परंतु मधे-मधे थोडी दोस्ती करतात कारण ६३ जन्म दोस्त होऊन राहिली आहे ना! तर बापदादा म्हणतात - ‘हे मास्टर मुक्तिदाता आता सर्वांना मुक्ती द्या कारण की साऱ्या विश्वाला काही ना काही प्राप्तीची ओंजळ द्यायची आहे, किती काम करायचे आहे कारण यावेळी, समय तुमचा सोबती आहे, सर्व आत्म्यांना मुक्तीमध्ये जायचेच आहे, ती हीच वेळ आहे. इतर वेळी जर तुम्ही पुरुषार्थ जरी केलात, तरीही ती वेळ नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणाला अशी मुक्तीची ओंजळ देऊ शकणार नाही. आता वेळ आहे म्हणून बापदादा म्हणतात - अगोदर स्वतःला मुक्ती द्या, मग विश्वातील सर्व आत्म्यांना मुक्ती देण्याची ओंजळ द्या. ते बोलावत आहेत, तुम्हाला दुःखी असलेल्यांची हाक ऐकू येत नाही काय? जर स्वतःमध्ये बिझी असाल तर आवाज ऐकू येणार नाही. पुन्हा-पुन्हा गाणे गात आहेत - ‘दु:खियों पर कुछ रहम करो…’ आता पासून दयाळू, कृपाळू, मर्सिफुल संस्कार दीर्घकाळ जर भरले नाहीत तर तुमच्या जड चित्रामध्ये मर्सिफुलचे, कृपेचे, दयेचे व्हायब्रेशन कसे भरणार.

डबल फॉरेनर्स असे समजता ना की, तुम्ही देखील द्वापरमध्ये मर्सीफुल बनून आपल्या जड चित्रांद्वारे सर्वांना मर्सी देणार! तुमचीही चित्रे आहेत ना की इंडिया वाल्यांचीच आहेत? फॉरेनर्स समजतात का की आमचीही चित्रे आहेत? तर चित्र काय देतात? चित्रांकडे जाऊन काय मागतात? मर्सी, मर्सी अशी जणू धून लावतात. तर आता संगमावर तुम्ही आपल्या द्वापर-कलियुगाच्या वेळेसाठी जड चित्रांमध्ये वायुमंडळ भराल तेव्हा तुमच्या जड चित्रांद्वारे अनुभव करतील. भक्तांचे कल्याण तर होईल ना! भक्त देखील आहेत तर तुमचीच वंशावळी ना. तुम्ही सर्व ग्रेट-ग्रेट ग्रँड फादरची संतान आहात. तर भक्त आहेत, भले दुःखी आहेत, परंतु आहेत तर तुमचीच वंशावळी. तर तुम्हाला दया येत नाही का? येते तर खरी परंतु थोडी-थोडी आणि कुठे बिझी होऊन जाता. आता आपल्या पुरुषार्थामध्ये जास्त वेळ घालवू नका. वेळ देण्यामध्ये लावा, तर देणे घेणे होऊन जाईल. आता छोट्या-छोट्या गोष्टी नकोत, मुक्ती दिवस साजरा करा. आजचा दिवस मुक्ती दिवस साजरा करा. ठीक आहे? हां, पहिली लाईन ठीक आहे? मधुबन वाले ठीक आहे?

आज मधुबनवाले खूप गोड वाटत आहेत कारण की मधुबनला फॉलो खूप लवकर करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मधुबनला लगेच फॉलो करतात, तर मधुबनवाले मुक्ती दिवस साजरा करणार ना तर सर्व फॉलो करतील. तुम्ही मधुबन निवासी सर्व मास्टर मुक्ती दाता बना. बनायचे आहे? (सर्व हात वर करत आहेत) छान, पुष्कळ आहेत. अच्छा, आता बापदादा सर्वांना भले इथे समोर बसले आहेत, भले देश-विदेशामध्ये दूर बसून ऐकत आहेत अथवा बघत आहेत, सर्व मुलांना ड्रिल करवत आहेत. सर्व रेडी झाले. सर्व संकल्प मर्ज करा, आता एका सेकंदामध्ये मन-बुद्धीद्वारे आपल्या स्वीट होममध्ये पोहोचा... आता परमधाम मधून आपल्या सूक्ष्मवतन मध्ये पोहोचा... आता सूक्ष्मवतन मधून स्थूल साकार वतन आपले राज्य स्वर्गामध्ये पोहोचा… आता आपल्या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये पोहोचा... आता मधुबनमध्ये या. असेच वारंवार स्वदर्शन चक्रधारी बनून चक्कर मारत रहा. अच्छा.

चोहो बाजूंच्या लवली आणि लकी (लाडक्या आणि भाग्यवान) मुलांना, सदैव स्वराज्याद्वारे स्व-परिवर्तन करणाऱ्या राजा मुलांना, सदैव दृढते द्वारे सफलता प्राप्त करणाऱ्या सफलतेच्या सिताऱ्यांना, सदैव आनंदी राहणाऱ्या भाग्यशाली मुलांना, बापदादांच्या आजच्या जन्म दिवसाची, बाबा आणि मुलांच्या बर्थ डे ची खूप-खूप मुबारक, आशीर्वाद आणि प्रेमपूर्वक आठवण, अशा श्रेष्ठ मुलांना नमस्ते.

वरदान:-
विश्व कल्याणाची जबाबदारी ओळखून वेळ आणि शक्तींची इकॉनॉमी करणारे मास्टर रचता भव विश्वाचे सर्व आत्मे तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा परिवार आहे, जितका मोठा परिवार असतो तितकीच इकॉनॉमीची काळजी घेतली जाते. तर सर्व आत्म्यांना समोर ठेवून, स्वतःला बेहदच्या सेवार्थ निमित्त समजून आपल्या वेळेला आणि शक्तिंना कार्यामध्ये लावा. स्वतःसाठीच कमावले, खाल्ले आणि गमावले - असे निष्काळजी बनू नका. सर्व खजिन्यांचे बजेट बनवा. ‘मास्टर रचयिता भव’ या वरदानला स्मृतीमध्ये ठेऊन वेळ आणि शक्तींचा स्टॉक सेवेप्रति जमा करा.

सुविचार:-
महादानी ते आहेत ज्यांच्या संकल्प आणि बोल द्वारे सर्वांना वरदानांची प्राप्ति होते.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- तुमच्या ज्या सूक्ष्म शक्ती मंत्री आणि महामंत्री आहेत, (मन आणि बुद्धी) त्यांना आपल्या ऑर्डर प्रमाणे चालवा. जर आतापासून राज्य दरबार ठीक असेल तर धर्मराजाच्या दरबारामध्ये जावे लागणार नाही. धर्मराज देखील स्वागत करेल. परंतु जर कंट्रोलिंग पॉवर नसेल तर फायनल रिझल्टमध्ये फाईन (दंड) भरण्यासाठी धर्मराजपुरीमध्ये जावे लागेल. या सजा फाईन (दंड) आहेत. रिफाइन बना म्हणजे मग फाईन भरावा लागणार नाही (सुधारणा करा म्हणजे दंड भरावा लागणार नाही).

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत, विशेष योग अभ्यासाच्या वेळी भक्तांची हाक ऐका आणि आपल्या ईष्ट देव दयाळू, दाता स्वरूपामध्ये स्थित होऊन सर्वांची मनोकामना पूर्ण करण्याची सेवा करा.