20-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, बाबा
आले आहेत तुम्हाला या पापी दुनियेमधून काढून चैनीच्या (आरामदायी) दुनियेमध्ये घेऊन
जाण्यासाठी, बाबांकडून तुम्हाला सुख-शांतीच्या दोन सौगात मिळतात”
प्रश्न:-
साऱ्या
दुनियेमध्ये खऱ्या-खऱ्या नन्स तुम्ही आहात, खऱ्या नन्स कोणाला म्हटले जाईल?
उत्तर:-
खऱ्या नन्स
त्या आहेत ज्यांच्या बुद्धीमध्ये एकाचीच आठवण असेल अर्थात ‘नन बट वन’. त्या (या
दुनियेतील नन्स) स्वतःला भले नन्स म्हणवून घेतात परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये फक्त
एका क्राईस्टची आठवण नसते, क्राईस्टला देखील गॉडचा मुलगा म्हटले जाईल. तर त्यांच्या
बुद्धीमध्ये दोन आहेत आणि तुमच्या बुद्धीमध्ये एक बाबा आहे; म्हणून तुम्ही
खऱ्या-खऱ्या नन्स आहात. तुम्हाला बाबांचा आदेश आहे की, पवित्र राहायचे आहे.
गीत:-
इस पाप की
दुनिया से…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी गाणे ऐकले. कोणी ऐकले? आत्म्यांनी. आत्म्याला परमात्मा म्हटले जाऊ शकत नाही.
मनुष्याला भगवान म्हणू शकत नाही. अच्छा, आता तुम्ही आहात ब्राह्मण. तुम्हाला आता
देवता म्हटले जात नाही. ब्रह्माला देखील देवता म्हटले जाऊ शकत नाही. भले म्हटले जरी
जाते - ब्रह्मा देवताए नमः, विष्णू देवताए नमः.. परंतु ब्रह्मा आणि विष्णूमध्ये तर
खूप फरक आहे. विष्णूला देवता म्हटले जाते, ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही कारण ते
आहेत ब्राह्मणांचे पिता. ब्राह्मणांना देवता म्हटले जाऊ शकत नाही. आता या गोष्टी
कोणी मनुष्य, मनुष्याला समजावून सांगू शकत नाही, भगवानच समजावून सांगतात. मनुष्य तर
अंधश्रद्धेमध्ये जे येईल ते बोलून टाकतात. आता तुम्ही मुले समजता - रुहानी बाबा
आम्हा मुलांना शिकवत आहेत. स्वतःला आत्मा समजले पाहिजे. मी आत्मा हे शरीर धारण करते.
मज आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत. जसे कर्म करतो तसेच शरीर मिळते. शरीरापासून आत्मा
वेगळी होते तेव्हा मग शरीरावर प्रेम राहत नाही. आत्म्यावर प्रेम असते. आत्म्यामध्ये
देखील प्रेम तेव्हाच असते जेव्हा आत्मा शरीरामध्ये असते. पितरांना मनुष्य बोलावतात,
शरीर तर त्यांचे नष्ट झाले तरी देखील त्यांच्या आत्म्याची आठवण करतात म्हणून
ब्राह्मणाच्या शरीरामध्ये बोलावतात. म्हणतात - ‘अमक्याची आत्मा ये, हे भोजन येऊन
खा’. अर्थात आत्म्यामध्ये मोह असतो. परंतु अगोदर शरीरामध्ये मोह होता, ते शरीर आठवत
होते. ते असे समजत नाहीत की, आम्ही आत्म्याला बोलावत आहोत. आत्माच सर्व काही करते.
आत्म्यामध्ये चांगले अथवा वाईट संस्कार असतात. सर्वात पहिला आहे - देह-अभिमान
त्याच्यानंतर मग इतर विकार येतात. सर्वांना मिळून म्हटले जाते - विकारी.
ज्यांच्यामध्ये हे विकार नसतात त्यांना म्हटले जाते - निर्विकारी. हे तर समजता -
खरोखर भारतामध्ये जेव्हा देवी-देवता होते तेव्हा त्यांच्यामध्ये दैवी गुण होते. या
लक्ष्मी-नारायणाचा आहेच मुळी देवी-देवता धर्म. जसे ख्रिश्चन धर्मामध्ये मेल अथवा
फिमेल सर्व ख्रिश्चन आहेत. इथे देखील म्हटले जाते - देवी-देवता. राजा-राणी, प्रजा
सर्व देवी-देवता धर्माचे आहेत. हा अत्यंत श्रेष्ठ असा सुख देणारा धर्म आहे. मुलांनी
गाणे देखील ऐकले; हे आत्म्याने म्हटले की, ‘बाबा, अशा जागी घेऊन चला जिथे मला
आराम-शांती असेल’. ते तर आहे - सुखधाम आणि शांतीधाम. इथे खूप बेचैन (अशांत) आहेत.
सतयुगामध्ये बेचैनी (अशांती) नसते. आत्मा जाणते बाबांशिवाय कोणीही शांतीच्या
दुनियेमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. बाबा म्हणतात - मुक्ती आणि जीवनमुक्ती या दोन सौगात
मी कल्प-कल्प आणतो. परंतु तुम्ही विसरून जाता; विसरणे हेच ड्रामामध्ये आहे. सर्व
काही विसरून जाल तेव्हाच तर मी येईन. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात, तुम्हाला
निश्चय आहे की, आपण ८४ जन्म घेतले आहेत. जे पूर्ण ज्ञान घेणार नाहीत ते नवीन
दुनियेमध्ये देखील सुरुवातीला येणार नाहीत. त्रेता किंवा त्रेताच्या अंतामध्ये
येतील. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. सतयुगामध्ये सुख होते, या
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. अच्छा, याच्या अगोदरच्या जन्मामध्ये हे कोण होते,
कुणालाच ठाऊक नाही. आधीच्या जन्मामध्ये हे ब्राह्मण होते. त्याआधी शूद्र होते.
वर्णांवर तुम्ही चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता.
आता तुम्हाला समजते
आहे की, आपण २१ जन्मांकरिता चैन (आराम) प्राप्त करणार आहोत. बाबा आम्हाला तो मार्ग
दाखवत आहेत. आपण आता पतित आहोत म्हणून बेचैन (अशांत) आहोत, दुःखी आहोत. जिथे आराम
असेल त्याला ‘सुख-शांती’ म्हटले जाईल. तर आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये
आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. समजता, खरोखर सतयुगामध्ये भारत किती सुखी होता. दुःख
अथवा बेचैनीचे (अशांतीचे) नाव नव्हते. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात स्वर्गामध्ये
जाण्याकरिता. आता तुम्ही ईश्वरीय संप्रदायाचे बनला आहात आणि ते आहेत आसुरी
संप्रदायाचे. म्हणतात ना - पाप-आत्मा. आत्मे अनेक आहेत, परमात्मा एक आहे. सगळे
ब्रदर्स आहेत, सगळे परमात्मा असू शकत नाहीत. इतकी छोटीशी गोष्ट देखील लोकांच्या
बुद्धीमध्ये नाहीये. बाबांनी समजावून सांगितले आहे - ही सारी दुनिया मोठा बेहदचा
टापू (बेट) आहे; दुनियेमध्ये छोटी-छोटी बेटे असतात. या बेहदच्या बेटावर रावणाचे
राज्य आहे. या गोष्टी मनुष्य समजत नाहीत. ते तर फक्त कथा ऐकवत राहतात. कथेला ज्ञान
म्हटले जात नाही. त्याने काही मनुष्य सद्गती प्राप्त करू शकत नाहीत. ज्ञानाद्वारे
सद्गती मिळते. ज्ञान देणारे आहेत एक बाबा, दुसरे कोणीही नाही. भक्तांचे भगवानच येऊन
रक्षण करतात. मनुष्य, मनुष्याचे रक्षण करू शकत नाही. शिवबाबा सर्व मुलांना वारसा
देतात. ते पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. वकील, बॅरिस्टर
देखील आहेत कारण यमदूतांच्या सजेपासून सोडविणारे आहेत. सतयुगामध्ये कोणीही जेलमध्ये
जाणार नाहीत. बाबा सर्वांना जेलमधून सोडवतात. मुलांच्या सर्वश्रेष्ठ मनोकामना सर्व
पूर्ण होतात. रावणाद्वारे अशुद्ध कामना पूर्ण होतात. बाबांद्वारे शुद्ध कामना पूर्ण
होतात. शुद्ध कामना पूर्ण झाल्याने तुम्ही कायमचे सुखी बनता. अशुद्ध कामना आहे -
पतित विकारी बनणे. पावन राहणाऱ्याला ‘ब्रह्मचारी’ म्हटले जाते. तुम्हाला देखील
पवित्र राहायचे आहे. पवित्र बनून मग पवित्र दुनियेचा मालक बनायचे आहे. पतितापासून
पावन एक बाबाच बनवतात. साधू-संत इत्यादी तर विकारातून जन्म घेतात, देवतांसाठी असे
थोडेच म्हटले जाईल. तिथे विकार असतच नाहीत. ती आहेच पावन दुनिया. लक्ष्मी-नारायण
संपूर्ण निर्विकारी होते, भारत पवित्र होता. हे आता तुम्ही समजता. सतयुगामध्ये
प्युरिटी होती तर पीस आणि प्रॉस्पेरिटी होती (पवित्रता होती तर शांती-समृद्धी होती),
सर्वजण सुखी होते, जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले आहे तेव्हापासून घसरत आले आहेत
(पतन होत आले आहे). आता तर काहीच कामाचे राहिलेले नाहीत. एकदम कवडी समान बनले आहेत.
आता बाबांद्वारे पुन्हा हिऱ्या समान बनता. भारत जेव्हा सतयुग होता तेव्हा हिऱ्या
समान होता. आता तर कवडी समान सुद्धा नाहीये. आपल्या धर्माविषयीच कोणाला काही माहिती
नाहीये. पाप करत राहतात. तिथे तर पापाचे नाव सुद्धा नाहीये. तुम्ही देवी-देवता
धर्माचे खूप प्रसिद्ध आहात, देवतांची असंख्य चित्रे आहेत. बाकीच्या धर्मांमध्ये
बघाल तर एकच चित्र असते, ख्रिश्चनांजवळ एकच क्राईस्टचे चित्र असेल. बौद्ध लोकांजवळ
एका बुद्धाचेच चित्र असेल. ख्रिश्चन, क्राईस्टचीच आठवण करतात, त्यांना ‘नन्स’ म्हटले
जाते. नन्स अर्थात एका क्राईस्टशिवाय दुसरे कोणीही नाही; म्हणूनच म्हणतात - ‘नन बट
क्राईस्ट’, ब्रह्मचारी राहतात. तुम्ही देखील नन्स आहात. तुम्ही आपल्या गृहस्थ
व्यवहारामध्ये राहून नन्स बनता. एका बाबांचीच आठवण करता. नन बट वन, एक शिवबाबा दुसरा
कोणीही नाही. त्यांच्या बुद्धीमध्ये तरी देखील दोन येतात. क्राईस्टसाठी देखील
समजतील की, तो गॉडचा मुलगा होता. परंतु त्यांना गॉड विषयीचे नॉलेज नाहीये. तुम्हा
मुलांना नॉलेज आहे, साऱ्या दुनियेमध्ये असा कोणीही नाही ज्याला परमात्म्याचे नॉलेज
असेल. परमात्मा कुठे राहतात, कधी येतात, त्यांचा काय पार्ट चालतो, हे कोणीही जाणत
नाहीत. भगवंताला जानी-जाननहार (सर्व काही जाणणारा) म्हणतात. समजतात ते आमच्या
मनातील गोष्टी जाणतात. बाबा म्हणतात - मी जाणत नाही, मला काय गरज पडली आहे, जे
प्रत्येकाच्या अंतर्मनातील विचार वाचत बसेन; मी आलोच आहे पतितांना पावन
बनविण्याकरिता. जर कोणी पवित्र राहात नाहीत, खोटे बोलतात तर नुकसान स्वतःचे करून
घेतील. गायले गेले आहे - देवतांच्या सभेमध्ये असूर जाऊन बसत होते. तिथे अमृत वाटले
जात असे; कोणी विकारामध्ये जाऊन पुन्हा लपून येऊन बसतात तर ते असूर झाले ना. स्वतःच
स्वतःचे पद भ्रष्ट करतील. प्रत्येकाला आपला स्वतःचा पुरुषार्थ करायचा आहे. नाहीतर
आपलाच सत्यानाश करतात. खूपजण असे आहेत जे लपून येऊन बसतात. म्हणतात - आम्ही विकारात
थोडेच जातो, परंतु विकारात जात राहतात. हे जणू स्वतःलाच फसवतात. स्वतःचाच सत्यानाश
करतात. परमपिता परमात्मा, ज्यांचा राईट हँड धर्मराज आहेत त्यांच्यासमोर खोटे बोलतात
तर स्वतःच दंडाचे भागीदार बनतात. बऱ्याच सेंटर्सवर देखील असे असतात. बाबा जेव्हा
पहिल्यांदा दिल्लीला गेले होते तेव्हा दररोज एक माणूस येत होता आणि विकारामध्ये जात
होता. विचारले जायचे की, जर पवित्र राहत नाहीस तर तू येतोस कशाला? तर म्हणायचा -
‘मी जर आलो नाही तर निर्विकारी कसा बनेन? पवित्रता चांगली वाटते परंतु राहू देखील
शकत नाही. शेवटी सुधारेन तर खरा. जर आलोच नाही, तर बेडा गर्क होईल (जीवन रुपी नाव
बुडून जाईल). दुसरा कोणताही मार्गच नाही म्हणून मला इथे यावे लागते.’
बाबा समजावून सांगतात
- ‘तू वायुमंडळ खराब करत आहेस, कुठवर असा येत राहशील?’ जे पावन बनतात त्यांना
पतितांची जणू घृणा वाटते. म्हणतात - ‘बाबा, यांच्या हातचे जेवण देखील चांगले वाटत
नाही’. बाबांनी युक्ती देखील सांगितली आहे, खाण्या-पिण्याची कटकट होते, तर असे नाही
की नोकरी सोडून द्याल, परंतु युक्तीने चालवायचे असते. कोणाला सांगितले तर लगेच
चिडतात, पवित्र कसे राहणार? हे तर कधी ऐकलेले नाही. संन्यासी देखील राहू शकत नाहीत.
जेव्हा घरदार सोडून जातात तेव्हा पवित्र राहू शकतात. परंतु हे कोणाला माहीत नाही की
इथे पतित-पावन परमपिता परमात्मा शिकवत आहेत. परंतु मानत नाहीत म्हणून विरोध करतात.
शिवबाबा ब्रह्मा तनामध्ये येतात, हे कोणत्या शास्त्रामध्ये आहे ते दाखवा. हे तर
गीतेमध्ये लिहिलेले आहे की, मी साधारण वृद्ध तनामध्ये येतो. ते (ब्रह्मा बाबा)
स्वतःच्या जन्मांना जाणत नाहीत. हे तर लिहिलेले आहे, मग तुम्ही हे कसे म्हणता की,
परमात्मा मनुष्य तनामध्ये कसे येतील. पतित तनामध्येच येऊन मार्ग सांगतील ना.
यापूर्वी देखील आले होते आणि सांगितले होते - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तेच
परमधाममध्ये राहतात आणि म्हणतात - ‘मज एकाची आठवण करा’. श्रीकृष्णाचे शरीर काही
मूलवतनमध्ये तर असणार नाही, ज्यामुळे म्हणेल की, ‘मज एकाची आठवण करा’. एक परमपिता
परमात्माच साधारण तनामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना म्हणतात - मामेकम् (मज एकाची)
आठवण करा, तर या योग अग्नीने तुमची पापे नष्ट होतील; आणि म्हणूनच मला पतित-पावन
म्हणतात. पतित-पावन जरूर आत्म्यांचे असणार ना. पतित देखील आत्माच बनते.
बाबा म्हणतात - तुम्ही
पवित्र आत्मा १६ कला संपूर्ण होता. आता नो कला, एकदम पतित बनला आहात. मी कल्प-कल्प
येऊन तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही जे काम-चितेवर बसून पतित बनता तर मी तुम्हाला
ज्ञान-चितेवर बसवून पावन बनवतो. भारतामध्ये पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, आता
अपवित्र प्रवृत्ती मार्ग आहे. कोणालाच चैन (आराम) नाहीये. आता बाबा म्हणतात -
दोघांनीही (पती-पत्नीने) ज्ञान-चितेवर बसा. प्रत्येक आत्म्याला आपापल्या कर्मानुसार
शरीर मिळते. असे नाही की दुसऱ्या जन्मामध्ये तेच पती-पत्नी एकमेकांना भेटतील. नाही,
इतकी रेस करू शकणार नाहीत. ही तर अभ्यासाची गोष्ट आहे ना. अज्ञानकाळामध्ये असे होऊ
शकते की, एकमेकांवर खूप प्रेम असेल तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात; तो तर
आहे पतित विकारी मार्ग. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी चितेवर बसते. दुसऱ्या जन्मामध्ये
देखील त्याला जाऊन भेटते. परंतु दुसऱ्या जन्मामध्ये त्याला थोडेच समजणार. तुम्ही
देखील बाबांसोबत ज्ञान-चितेवर चढत आहात. हे छी-छी शरीर (पतित शरीर) सोडून निघून जाल.
तुम्हाला हे आता माहीत झाले आहे, त्यांना तर हे माहित नसते की आपण मागच्या
जन्मामध्ये असे साथीदार होतो. तुम्हाला देखील नंतर तिथे या गोष्टी लक्षात राहणार
नाहीत. आता तुमच्या बुद्धीमध्ये एम ऑब्जेक्ट आहे. मम्मा-बाबा, लक्ष्मी-नारायण बनतील.
विष्णू आहे देवता. प्रजापिता ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही. ब्रह्माच देवता बनतात.
ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा कसे बनतात - हे आता तुम्ही समजून घेतले आहे.
आता तुम्ही जाणता - चैन (आराम) केवळ स्वर्गामध्येच असतो. एखाद्याचा मृत्यू झाला तर
म्हणतात स्वर्गात गेला अर्थात शांतीमध्ये गेला. बेचैनी मध्ये (अशांती मध्ये) पतित
राहतात. तरीही बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर विकर्म
विनाश होतील. बाकी आहेत सविस्तर समजून घेण्याच्या गोष्टी. बाबा नॉलेजफुल आहेत तर
तुम्हाला देखील आपल्यासारखे नॉलेजफुल बनवतील. बाबांच्या आठवणीने तुम्ही सतोप्रधान
बनाल, ही आत्म्यांची रेस आहे (शर्यत आहे). जे जास्त आठवण करतील ते लवकर बनतील. ही
आहे योग आणि अभ्यासाची शर्यत. शाळेमध्ये देखील शर्यत असते ना. भरपूर स्टुडंट्स
असतात, त्यांच्या मधून जे नंबर वन येतात त्यांना स्कॉलरशिप मिळते. एकच अभ्यास लाखो,
करोडो आत्म्यांसाठी असतो, तर इतक्या शाळा देखील असतील ना. आता तुम्हाला हे शिक्षण
शिकायचे आहे. सर्वांना मार्ग सांगा, आंधळ्यांची काठी बना. घराघरामध्ये संदेश
पोहोचवायचा आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
रुहानी पित्याचा रुहानी मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता अशुद्ध
कामनांचा त्याग करून शुद्ध कामना बाळगायच्या आहेत. सर्वात शुद्ध कामना आहे - पवित्र
बनून पवित्र दुनियेचा मालक बनणे... कोणतीही चूक लपवून स्वतःला फसवायचे नाही.
धर्मराज बाबांसोबत नेहमी खरे राहायचे आहे.
२) ज्ञान-चितेवर बसून
या अभ्यासामध्ये रेस करून भविष्य नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त करायचे आहे. योग
अग्नीद्वारे विकर्मांच्या खात्याला भस्म करायचे आहे.
वरदान:-
बुद्धीची
प्रीत एका प्रियतमाशी जोडून सदैव सन्मुख असल्याची अनुभूती करणारे विजयी रत्न भव
प्रीत बुद्धी अर्थात
बुद्धीची लगन (बुद्धीची तार) एका प्रियतमासोबत जोडलेली असावी. ज्यांचे एकावर प्रेम
जडले आहे त्यांचे इतर कोणत्याही व्यक्ती अथवा वैभवावर प्रेम जडू शकत नाही. ते सदैव
बापदादांना आपल्या सन्मुख असल्याचा अनुभव करतील. त्यांना मनसा मध्ये देखील
श्रीमताच्या विरुद्ध व्यर्थ संकल्प अथवा विकल्प येऊ शकत नाहीत. त्यांच्या मुखातून
अथवा हृदयातून हेच शब्द निघतात - ‘तुम्हीं से खाऊं, तुम्हीं से बैठूँ.... तुम्हीं
से सर्व संबंध निभाऊं…’ असे सदैव प्रीत-बुद्धी बनून राहणारेच विजयी रत्न बनतात.
बोधवाक्य:-
‘पाहिजे-पाहिजे’ असा संकल्प येणे हे देखील रॉयल रूपातील मागणे आहे.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
संगमयुगावर बापदादांनी
सर्व मुलांना सर्वात पहिले व्रत दिले आहे - “संपूर्ण पवित्र भव”. हे पवित्रतेचे
व्रत केवळ ब्रह्मचर्याचे व्रत नाहीये परंतु ब्रह्मा बाबांप्रमाणे प्रत्येक
शब्दामध्ये पवित्रतेचे व्हायब्रेशन सामावलेले असावे. प्रत्येक संकल्पामध्ये
पवित्रतेचे महत्व असावे. प्रत्येक कर्मामध्ये, कर्मयोगी जीवनाचा अनुभव व्हावा, याला
म्हटले जाते - ब्रह्मचारी सो ब्रह्माचारी.