20-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, योगबलाद्वारे विकाररूपी रावणावर विजय प्राप्त करून खरा-खरा दसरा साजरा करा”

प्रश्न:-
रामायण आणि महाभारत यांचा आपसामध्ये कोणता संबंध आहे? दसरा कोणत्या गोष्टीला सिद्ध करतो?

उत्तर:-
दसरा अर्थात रावणाचा अंत (नायनाट) होणे आणि सीतांची सुटका होणे. परंतु दसरा साजरा केल्याने रावणापासून सुटका तर मिळत नाही. जेव्हा महाभारत होते तेव्हा सर्व सीतांना सुटका मिळते. महाभारत युद्धामुळे रावण राज्य नष्ट होते. त्यामुळे रामायण, महाभारत आणि गीतेचा आपसामध्ये खूप गहिरा संबंध आहे.

गीत:-
महफिल में जल उठी शमा...

ओम शांती।
बाबा आज्ञा करतात की, तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात, आता तुम्हाला दैवी संप्रदाय म्हणू शकत नाही, नंतर दैवी संप्रदाय बनणार आहात. हे जे रामायण आहे, आज (दसऱ्याला) जणू यांचे रामायण संपणार आहे, परंतु संपत नाही. जर रावण मेला तर रामायणाची कथा संपली पाहिजे, परंतु तसे होत नाही. सुटका महाभारतामुळे होते. आता या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. रामायण काय आहे आणि महाभारत काय आहे? दुनिया काही या गोष्टींना जाणत नाही. रामायण आणि महाभारत दोन्हीचा संबंध आहे. महाभारत युद्धामुळे रावण राज्य संपुष्टात येते. नंतर मग हा दसरा इत्यादी साजरा करण्याची गरजच नाही. गीता अथवा महाभारत देखील रावणराज्याला नष्ट करणारे आहे. अजून तर वेळ बाकी आहे, तयारी देखील चालू आहे - त्यांची आहे हिंसक तयारी, तुमची आहे अहिंसक. तुमची आहे गीता, तुम्ही गीतेचे ज्ञान ऐकता. त्याने काय होणार आहे? रावणराज्य संपुष्टात येणार आहे. भले ते (दुनियावाले) रावणाला मारतात, परंतु रामराज्य तर बनत नाही. आता रामायण आणि महाभारत अस्तित्वात तर आहेत ना. तर महाभारत आहे रावणाला नष्ट करण्यासाठी. या अतिशय गूढ समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, याच्यासाठी विशाल-बुद्धी पाहिजे. बाबा समजावून सांगत आहेत - महाभारत युद्धामुळे रावणराज्य नष्ट होते. असे नाही की फक्त रावणाला मारल्याने रावणराज्य नष्ट होते. त्याच्यासाठी तर संगम पाहिजे. आता संगम आहे. आता तुम्ही रावणावर विजय मिळवण्यासाठी तयारी करत आहात. यासाठी ज्ञानाची अस्त्रे-शस्त्रे पाहिजेत; ती स्थूल शास्त्रे नाही. जसे दाखवतात रावणाचे आणि रामाचे युद्ध झाले. ही सर्व शास्त्रे आहेत भक्तिमार्गाची. आता तुम्ही योगबलाद्वारे रावण राज्यावर विजय प्राप्त करता. ही आहे गुप्त गोष्ट. ५ विकार रूपी रावणावर तुमचा विजय होतो. कशामुळे? गीतेमुळे. बाबा तुम्हाला गीता ऐकवत आहेत. भागवत काही नाहीये. भागवतामध्ये कृष्ण चरित्र (श्रीकृष्णाच्या लीला) दाखवतात. कृष्णाच्या तर काही लीला नाही आहेत. तुम्ही जाणता जेव्हा विनाश होईल, महाभयंकर युद्ध होईल, त्याच्याद्वारेच रावणराज्य नष्ट होईल. शिडीच्या चित्रामध्ये देखील दाखवले गेले आहे. जेव्हापासून रावणराज्य सुरू झाले आहे, तेव्हापासून भक्तिमार्ग सुरु झाला आहे; हे तुम्हीच जाणता. गीतेचा संबंध महाभारत युद्धाशी आहे. तुम्ही गीता ऐकून राज्य मिळवता आणि युद्ध सुरू होते - सफाई होण्याकरिता. बाकी भागवतामध्ये चरित्र (लीला) इत्यादी साऱ्या निरर्थक गोष्टी आहेत. शिवपुराणामध्ये काहीही नाहीये. नाहीतर गीतेचे नाव ‘शिवपुराण’ असायला हवे होते. शिवबाबा बसून ज्ञान देत आहेत - सर्वात श्रेष्ठ गीता आहे. गीता सर्व शास्त्रांपेक्षा छोटी आहे, बाकी सर्व पुस्तके खूप मोठी बनवली आहेत. मनुष्यांच्या जीवन कहाण्या देखील खूप मोठ-मोठ्या बनवल्या आहेत. नेहरुंनी शरीर सोडले, तेव्हा त्यांच्याबद्दल कितीतरी मोठे खंड (ग्रंथ) संकलित केले गेले. तर शिवबाबांनी सांगितलेल्या या गीतेचा खंड (गीता ग्रंथ) किती मोठा असायला पाहिजे; परंतु गीता किती छोटी आहे. कारण बाबा एकच गोष्ट सांगतात की, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि सृष्टीचक्राला समजून घ्या. बस्स, म्हणून गीता छोटी बनवली आहे. हे ज्ञान कंठस्थ करण्याचे (पाठ करण्याचे) आहे. तुम्हाला माहीत आहे की, गीतेचे लॉकेट बनवतात. त्यामध्ये अतिशय छोटी अक्षरे असतात. आता बाबा देखील तुमच्या गळ्यात लॉकेट घालत आहेत - त्रिमूर्ती आणि राजाईचे. बाबा म्हणतात, गीता खरेतर २ शब्दांचीच आहे - अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). हे आहे गुप्त मंत्राचे लॉकेट - मनमनाभव. माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुमचे काम आहे योगबलाद्वारे विजय प्राप्त करणे, मग तुमच्यासाठी स्वच्छता देखील पाहिजे. बाबा समजावून सांगतात की, तुमच्या योगबलाद्वारेच रावणराज्याचा विनाश होणार आहे. रावणराज्य केव्हा सुरू झाले आहे, ते देखील जाणत नाहीत. हे ज्ञान अतिशय सोपे आहे. सेकंदाची गोष्ट आहे ना. ८४ जन्मांच्या शिडीमध्ये देखील इतके-इतके जन्म घेतले आहेत. किती सोपे आहे. बाबा ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञान ऐकवतच राहतात. तुम्ही सर्व मुरलीचे पेपर गोळा कराल तर असंख्य होतील. बाबा विस्तारपूर्वक समजावून सांगतात. नटशेलमध्ये (थोडक्यात) तर सांगतात - अल्फची आठवण करा. बस्स, बाकी वेळ कशाला लावता? तुमच्या डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. ते आठवणीद्वारेच उतरणार आहे, याच्यासाठीच मेहनत करावी लागते. तुम्ही वारंवार विसरून जाता. तुम्ही बाबांची आठवण करत राहा म्हणजे मग कधीही विघ्ने येणार नाहीत. देह-अभिमानी बनल्यामुळे विघ्ने येतात. देही-अभिमानी शेवटी बनता; त्यानंतर मग अर्धा कल्प कोणतीही विघ्ने येत नाहीत. या समजून घेण्याच्या किती गुह्य गोष्टी आहेत. सुरुवातीपासून किती सांगत आले आहेत, तरी देखील म्हणतात - फक्त अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाहीची) आठवण करा. बस्स. विस्तार झाडाचा असतो, बीज तर अतिशय छोटे असते, त्यातून निर्माण होणारा वृक्ष किती विशाल असतो.

आज दसरा आहे ना. आता बाबा, रामायणाचा महाभारताशी काय संबंध आहे हे समजावून सांगत आहेत. रामायण तर भक्तिमार्गाचे आहे. अर्ध्या कल्पापासून चालत येते. अर्थात आता रावणराज्य चालू आहे. आणि मग महाभारत आल्यावर रावणराज्य नष्ट होऊन रामराज्य सुरू होईल. रामायण आणि महाभारत यांच्यामध्ये काय फरक आहे? रामराज्याची स्थापना आणि रावणराज्याचा विनाश होणार आहे. गीता ऐकून तुम्ही विश्वाचे मालक बनण्यासाठी लायक बनता. गीता आणि महाभारत ही आता वर्तमान काळासाठी आहेत. रावणाचे राज्य संपवण्यासाठी आहेत. बाकी त्यांनी (दुनियावाल्यांनी) जे युद्ध दाखवले आहे ते चुकीचे आहे. युद्ध आहे ५ विकारांवर विजय प्राप्त करण्याचे. बाबा तुम्हाला गीतेचे केवळ दोन शब्द सांगतात - ‘मनमनाभव-मध्याजी भव’. गीतेच्या सुरुवातीला आणि शेवटी हे दोन शब्द येतात. मुले समजतात की, खरोखर गीतेचा एपिसोड चालू आहे. परंतु कोणाला सांगितले तर म्हणतील कृष्ण कुठे आहे? बाबांचे स्पष्टीकरण आणि भक्तिमार्गातील शास्त्रे यांच्यामध्ये किती फरक आहे. हे कोणीही जाणत नाही की, हे रामायण काय आहे? महाभारत काय आहे? महाभारताच्या युद्धानंतरच स्वर्गाची दारे उघडतात. परंतु मनुष्य हे समजणार नाहीत म्हणून तुम्ही आधी बाबांचाच परिचय द्या. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. बाबा हे संपूर्ण दुनियेकरिता म्हणत आहेत. एका गीतेलाच खंडन केले आहे. गीतेचा प्रचार सर्व भाषांमध्ये आहे. तुमच्या राज्यामध्ये एकच भाषा असेल. तिथे कोणतेही शास्त्र, ग्रंथ इत्यादी असणार नाहीत. तिथे भक्तिमार्गाची कोणती गोष्टच नसते. भारताचा संबंधच रामायण, महाभारत आणि गीतेशी आहे. भगवान तर मुलांना गीता ऐकवतात, ज्याद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. महाभारत युद्ध जरूर झाले पाहिजे, ज्यामुळे पतित दुनिया नष्ट होईल. गीतेद्वारे तुम्ही पावन बनता. पतित-पावन भगवान येतातच अखेरीला. म्हणतात - काम महाशत्रू आहे, याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. काम विकारापुढे कधीही हार खायची नाही, त्याच्यामुळे खूप नुकसान होते. विकारांच्या मागे लागून मोठे-मोठे प्रसिद्ध, मंत्री इत्यादी देखील स्वतःचे नाव बदनाम करतात. काम विकाराच्या मागे लागून खूप खराब होतात (पतित बनतात). म्हणून बाबा समजावून सांगत आहेत - बाबांकडे तरुण-तरुण मुले येतात. असे बरेचजण आहेत जे ब्रह्मचर्यामध्ये राहतात. पूर्ण आयुष्य विवाह करत नाहीत. मुली देखील असतात. नन्स कधीही विकारामध्ये जात नाहीत. परंतु त्याच्यामुळे कोणतीही प्राप्ती होत नाही. इथे तर पवित्र बनून जन्म-जन्मांतरासाठी स्वर्गाचे मालक बनण्याची गोष्ट आहे. जन्म-जन्मांतरांच्या पापांचे ओझे डोक्यावर आहे. ते जेव्हा संपेल तेव्हा स्वर्गामध्ये जाल. इथे मनुष्य पाप करत राहतात. फारफार तर एक जन्म कोणी संन्याशी बनतात, जन्म तर विकारातूनच घेतात. रावणराज्यामध्ये विकाराशिवाय जन्म होत नाही. विचारतात की, तिथे जन्म कसा होईल? योगबल कशाला म्हटले जाते? हे विचारण्याची आवश्यकता नाही. ती आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. रावणराज्यच नाही तर प्रश्नच उत्पन्न होऊ शकत नाही. सर्व साक्षात्कार होतील. जेव्हा वृद्ध होतात तेव्हा हा साक्षात्कार होतो की, आता आपण जाऊन छोटे बाळ बनणार, मातेच्या गर्भामध्ये जाणार. हे ठाऊक नसते की अमुक घरात जाईन. फक्त आता छोटे बाळ बनायचे आहे. मोर आणि लांडोर यांचे उदाहरण आहे. डोळ्यातील अश्रू पासून गर्भधारणा होते. पपईच्या झाडांमध्ये देखील मेल-फीमेलचे (एक नर आणि एक मादीचे) झाड असते. एकमेकांच्या बाजूला असल्यावर फळ देतात. हे देखील आश्चर्य आहे. जर जड गोष्टींमध्ये देखील असे आहे, तर चैतन्यमध्ये सतयुगामध्ये काय होऊ शकत नाही! हे सर्व पुढे गेल्यावर तपशीलवार समजून येईल. मुख्य गोष्ट आहे की, तुम्ही बाबांची आठवण करून तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून वारसा तर घ्या. मग तिथे जी पद्धत असेल ती बघाल. तुम्ही योगबलाद्वारे विश्वाचे मालक बनता, तर मूल का जन्म घेऊ शकत नाही. अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारतात, आणि मग कोणत्या प्रश्नाचे नीट उत्तर मिळाले नाही तर कोसळतात. छोट्याशा गोष्टीमध्ये सुद्धा संशय येतो. शास्त्रांमध्ये अशी काही गोष्टच नाहीये. शास्त्रे आहेत भक्तीमार्गाची. परमपिता परमात्मा येऊन ब्राह्मण धर्म, सूर्यवंशी आणि चंद्रवंशी धर्म स्थापन करतात.

तुम्ही आहात संगमयुगी ब्राह्मण. बाबांना संगमयुगावर यावे लागते. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’. त्या बाजूचे (दुसऱ्या देशातील) म्हणतात - ‘हे लिबरेटर, दुःखातून लिबरेट करा’. दुःख कोण देतो, हे देखील त्यांना माहीत नाही. तुम्ही जाणता रावणराज्य नष्ट होत आहे. तुम्हाला बाबा राजयोग शिकवत आहेत. जेव्हा शिक्षण पूर्ण होते तेव्हा विनाश होतो, ज्याचे नाव ‘महाभारत’ ठेवले आहे. महाभारतामध्ये रावणराज्य नष्ट होते. दसऱ्याला एका रावणाला मारून टाकतात. त्या आहेत हदच्या गोष्टी. या आहेत बेहदच्या गोष्टी. ही सारी दुनिया नष्ट होणार आहे. इतक्या छोट्या-छोट्या मुली तुम्ही किती मोठे नॉलेज घेत आहात. ते भौतिक नॉलेज जसे की तेल आहे. हे आहे - शुद्ध तूप. तर दिवस-रात्र इतका फरक आहे ना. रावण राज्यामध्ये तुम्हाला तेल खावे लागते. पूर्वी इतके स्वस्त शुद्ध तूप मिळत होते, नंतर मग महाग झाले, तर तेल खावे लागत आहे. हे गॅस, वीज इत्यादी आधी काहीही नव्हते. काही वर्षांमध्ये किती फरक पडला आहे. आता तुम्ही जाणता हे सर्व नष्ट होणार आहे. शिवबाबा आम्हाला लक्ष्मी-नारायणसारखे बनण्यासाठी शिकवत आहेत. हा नशा या बाबाला (ब्रह्मा बाबांना) तर खूप असतो. मुलांना माया विसरायला लावते. जर का असे म्हणता की, ‘आम्ही बाबांकडे वारसा घेण्यासाठी आलो आहोत’; तर तो नशा चढत का नाही? स्वीट होम, स्वीट राज्य विसरायला होते. बाबा जाणतात जे-जे हड्डी-सेवा करतात (सेवेमध्ये झोकून देतात) तेच महाराजकुमार बनतील. तुम्हाला हा नशा का राहत नाही? कारण आठवणीमध्ये राहत नाही. सेवेमध्ये पूर्ण तत्पर रहात नाहीत. कधीकधी तर सेवेमध्ये उड्या मारू लागतात आणि कधी मग एकदम थंड होतात. प्रत्येकाने स्वतःला विचारा, असे होते ना? कधी-कधी चुका देखील होतात, म्हणून बाबा समजावून सांगत आहेत. बोलणे अतिशय गोड असले पाहिजे. सर्वांना राजी करायचे (संतुष्ट करायचे) आहे. कोणालाही आवेश (संताप) येता कामा नये. बाबा किती प्रेमाचा सागर आहेत. आता गोहत्या बंद करण्यासाठी किती डोकेफोड करतात. बाबा म्हणतात - सर्वात मोठी हत्या आहे काम-कटारी चालवणे. पहिले तर हे बंद करा. बाकी ते काही बंद होणार नाहीये. किती डोकेफोड करतात. ही काम-कटारी दोघांनीही चालवायची नाही. कुठे मनुष्यांच्या गोष्टी, कुठे बाबांची गोष्ट. जे काम विकाराला जिंकतील, तेच पवित्र दुनियेचे मालक बनतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांसारखे प्रेमाचा सागर बनायचे आहे. कधीही आवेशामध्ये यायचे नाही (संतापायचे नाही). आपले बोलणे अतिशय गोड ठेवायचे आहे. सर्वांना राजी (संतुष्ट) करायचे आहे.

२) हड्डी-सेवा (झोकून देऊन सेवा) करायची आहे. याच नशेमध्ये राहायचे आहे की, आता आम्ही हे जुने शरीर सोडून जाऊन राजकुमार-राजकुमारी बनणार.

वरदान:-
देही-अभिमानी स्थितीमध्ये स्थित होऊन सदैव विशेष पार्ट बजावणारे संतुष्टमणि भव

जी मुले विशेष पार्टधारी आहेत त्यांचे प्रत्येक कर्म विशेष असते, कोणतेही कर्म साधारण नसते. साधारण आत्मा कोणतेही कर्म देह-अभिमानी होऊन करेल आणि विशेष आत्मा देही-अभिमानी बनून करेल. जे देही-अभिमानी स्थितीमध्ये स्थित होऊन कर्म करतात ते स्वतः देखील संतुष्ट राहतात आणि दुसऱ्यांना देखील संतुष्ट करतात त्यामुळे त्यांना ‘संतुष्टमणि’चे वरदान आपोआप प्राप्त होते.

बोधवाक्य:-
प्रयोगी आत्मा बनून, ‘योग’च्या प्रयोगाने सर्व खजिने वाढवत चला.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

कल्याणकारी भावना आणि वृत्ती ठेवून कोणत्याही आत्म्याची पालना करा, म्हणजे मग कोणत्याही अपकारी आत्म्याला आपल्या पालनेद्वारे उपकारी बनवू शकता. कितीही पतित असलेली आत्मा पतित-पावनच्या वृत्ती द्वारे पावन बनू शकते. जसे आई आपल्या मुलाची कमजोरी अथवा अवगुण बघत नाही. तिच्या मनात त्याला योग्य मार्गावर आणण्याची भावना असते. अगदी असेच ‘हे पालना करणे माझे कर्तव्य आहे’, या रूपामध्ये स्थित राहिल्याने तुम्ही यथार्थपणे प्रगती करत राहू शकाल.