21-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हा आत्म्यांचे प्रेम एका बाबांवर आहे, बाबांनी तुम्हाला आत्म्यावर प्रेम करायला शिकवले आहे, शरीरावर नाही”

प्रश्न:-
कोणत्या एका पुरुषार्थामध्येच माया विघ्न उत्पन्न करते? मायाजीत बनण्याची युक्ती कोणती आहे?

उत्तर:-
तुम्ही पुरुषार्थ करता की, आपण बाबांची आठवण करून आपली पापे भस्म करावी. तर या आठवणीमध्येच मायेचे विघ्न येते. बाबा उस्ताद तुम्हाला मायाजीत बनण्याची युक्ती सांगतात. तुम्ही उस्तादाला ओळखून आठवण करा तर आनंद सुद्धा वाटेल, पुरुषार्थ देखील करत रहाल आणि सेवा देखील खूप कराल. मायाजीत सुद्धा बनाल.

गीत:-
इस पाप की दुनिया से…

ओम शांती।
रुहानी मुलांनी गाणे ऐकले, अर्थ समजला. दुनियेमध्ये कोणीही अर्थ समजत नाहीत. मुले समजतात मज आत्म्याचे प्रेम परमपिता परमात्म्यासोबत आहे. आत्मा आपला पिता परमपिता परम आत्म्याला बोलावत आहे. प्रेम आत्म्यावर आहे की शरीरावर? आता बाबा शिकवत आहेत की, प्रेम आत्म्यावर असले पाहिजे. शरीर तर नष्ट होणार आहे. प्रेम आत्म्यावर आहे. आता बाबा समजावून सांगत आहेत तुमचे प्रेम परमात्मा बाबांवर असायला हवे, शरीरांवर नाही. आत्माच आपल्या पित्याला बोलावत असते की, पुण्य आत्म्यांच्या दुनियेमध्ये घेऊन चला. तुम्ही समजता - आपण पाप-आत्मा होतो, आता पुन्हा पुण्य-आत्मा बनत आहोत. बाबा तुम्हाला युक्तीने पुण्य आत्मा बनवत आहेत. बाबा सांगतील तेव्हाच तर मुलांना अनुभव होईल आणि समजतील की आम्ही बाबांद्वारे बाबांची आठवण करून पवित्र पुण्य आत्मा बनत आहोत. योगबलाने आमची पापे भस्म होत आहेत. बाकी गंगा इत्यादीमध्ये काही पापे धुतली जात नाहीत. मनुष्य गंगा स्नान करतात, शरीराला माती लावतात परंतु त्याने काही पापे धुतली जात नाहीत. आत्म्याची पापे योगबलानेच धुतली जातात. भेसळ निघून जाते, हे तर मुलांनाच माहित आहे आणि निश्चय आहे की आपण बाबांची आठवण केली तर आपली पापे भस्म होतील. निश्चय आहे तर मग पुरुषार्थ केला पाहिजे ना. या पुरुषार्थामध्येच माया विघ्न आणते. पैलवाना सोबत माया सुद्धा पैलवान होऊन कुस्ती करते. कच्चे (कमकुवत) असणाऱ्या बरोबर कशाला कुस्ती करेल! मुलांनी नेहमी हे लक्षात ठेवायचे आहे, आम्हाला मायाजीत जगतजीत बनायचे आहे. ‘माया जीते जगतजीत’, याचा अर्थ देखील कोणाला समजत नाही. आता तुम्हा मुलांना समजावून सांगितले जाते - तुम्ही कसे मायेवर विजय प्राप्त करू शकता. माया देखील समर्थ आहे ना. तुम्हा मुलांना उस्ताद मिळालेला आहे. त्या उस्तादाला (शिवबाबांना) देखील नंबरवार कोणी विरळाच जाणतो. जो जाणतो त्याला आनंद देखील होत असतो. पुरुषार्थ देखील स्वतः करतात. सेवा देखील खूप करतात. अमरनाथला खूप लोक जातात.

आता मनुष्य म्हणतात - विश्वामध्ये शांती कशी होईल? आता तुम्ही सर्वांना सिद्ध करून सांगता की, सतयुगामध्ये कशी सुख-शांती होती. संपूर्ण विश्वामध्ये शांती होती. हे लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, दुसरा कोणताही धर्म नव्हता. आजपासून ५००० वर्षे झाली जेव्हा सतयुग होते मग सृष्टीला फिरायचे तर जरूर आहे. चित्रांवरून तुम्ही एकदम क्लियर सांगता, कल्पापूर्वी देखील अशी चित्रे बनवली होती. दिवसेंदिवस इम्प्रूवमेंट (सुधारणा) होत जाते. कधी मुले चित्रांवर तिथी-तारीख लिहायचे विसरून जातात. लक्ष्मी-नारायणाच्या चित्रामध्ये तिथी-तारीख जरूर असायला हवी. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे ना की, आपण स्वर्गवासी होतो, आता पुन्हा बनायचे आहे. जितका जे पुरुषार्थ करतात तितके पद प्राप्त करतात. आता बाबांद्वारे तुम्ही ज्ञानाची ऑथॉरिटी बनला आहात. आता भक्ती संपणार आहे. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती थोडीच असणार. त्यानंतर मग अर्धा कल्प भक्ती चालते. हे देखील आता तुम्हा मुलांनाच समजते. अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य सुरु होते. संपूर्ण खेळ तुम्हा भारतवासीयांवरच आहे. ८४ चे चक्र भारतावरच आहे. भारतच अविनाशी खंड आहे, हे देखील आधी थोडेच माहिती होते. लक्ष्मी-नारायणाला गॉड-गॉडेज म्हणतात ना. किती उच्च पद आहे आणि शिक्षण किती साधारण आहे. हे ८४ चे चक्र पूर्ण करून मग आम्ही परत जातो. ८४ चे चक्र म्हटल्याने बुद्धी वर निघून जाते. आता तुम्हाला मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन सर्व लक्षात आहे. अगोदर थोडेच माहित होते की, सूक्ष्म वतन हे काय असते. आता तुम्ही समजता तिथे कसा मूवीमध्ये (संकल्पाने) संवाद करतात. मूक चित्रपट देखील निघाला होता. तुम्हाला समजावून सांगायला सोपे होते. सायलेन्स, मुव्ही, टॉकी. तुम्ही सर्व जाणता लक्ष्मी-नारायणाच्या राज्यापासून आता पर्यंत संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये आहे.

तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना हीच चिंता लागून रहावी की आपल्याला पावन बनायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत - गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना देखील या जुन्या दुनियेतून मोह काढून टाका. मुले इत्यादींचा भले सांभाळ करा. परंतु बुद्धी बाबांकडे असावी. म्हटले जाते ना - हातानी काम करत असताना बुद्धी बाबांकडे असावी. मुलांना खाऊ-पिऊ घाला, आंघोळ घाला, बुद्धीमध्ये बाबांची आठवण असावी कारण जाणता आत्म्यावर पापांचे ओझे खूप आहे म्हणून बुद्धी बाबांकडे लागलेली असावी. त्या माशूकची खूप-खूप आठवण करायची आहे. माशूक बाबा तुम्हा सर्व आत्म्यांना सांगतात की, माझी आठवण करा, हा पार्ट देखील आता चालू आहे; पुन्हा ५ हजार वर्षानंतर चालेल. बाबा किती सोपी युक्ती सांगतात. कोणताही त्रास नाही. कोणी म्हणेल आम्ही तर हे करू शकत नाही, आम्हाला खूप त्रासदायक वाटते, आठवणीची यात्रा खूप कठीण आहे. अरे, तुम्ही बाबांची आठवण करू शकत नाही! बाबांना थोडेच विसरून चालेल. बाबांची तर चांगल्या रीतीने आठवण करायची आहे तेव्हा विकर्म विनाश होतील आणि तुम्ही एव्हर हेल्दी बनाल. नाहीतर बनणार नाही. तुम्हाला खूप चांगले आणि सटीक (अचूक) मत मिळते. सटीक औषध असते ना. आम्ही गॅरंटी करतो या योगबलाने तुम्ही २१ जन्मांसाठी कधी रोगी बनणार नाही. फक्त बाबांची आठवण करा - किती सोपी युक्ती आहे. भक्तीमार्गामध्ये आठवण करत होता अजाणतेपणी. आता बाबा बसून समजावून सांगत आहेत, तुम्ही समजता आपण कल्पापूर्वी देखील बाबांकडे आलो होतो, पुरुषार्थ करत होतो. पक्का निश्चय झाला आहे. आम्हीच राज्य करत होतो मग आम्ही गमावले आता पुन्हा बाबा आलेले आहेत, त्यांच्याकडून राज्य भाग्य घ्यायचे आहे. बाबा म्हणत आहेत - माझी आठवण करा आणि राजाईची आठवण करा. मनमनाभव. अंत मति सो गति होईल. आता नाटक संपत आहे, परत जाणार. बाबा आले आहेत सर्वांना घेऊन जाण्यासाठी. जसा वर, वधूला घेऊन जाण्यासाठी येतो. ब्राइड्सला खूप आनंद होतो, आम्ही आपल्या सासरी जातो. तुम्ही सर्व सीता आहात एका रामाच्या. रामच तुम्हाला रावणाच्या जेल मधून सोडवून घेऊन जातात. लिबरेटर एकच आहेत, रावण राज्यापासून लिब्रेट करतात. म्हणतात देखील - हे रावणराज्य आहे, परंतु यथार्थ रित्या समजत नाहीत. आता मुलांना समजावून सांगितले जाते, इतरांना समजावून सांगण्यासाठी खुप चांगले-चांगले पॉईंट्स दिले जातात. बाबांनी सांगितले आहे - असे लिहा की विश्वामध्ये शांती कल्पापूर्वी प्रमाणे बाबा स्थापन करत आहेत. ब्रह्मा द्वारे स्थापना होत आहे. विष्णूचे राज्य होते तर विश्वामध्ये शांती होती ना. विष्णू सो लक्ष्मी-नारायण होतो, हे देखील कोणाला समजते थोडेच. विष्णू आणि लक्ष्मी-नारायण आणि राधे-कृष्णाला वेगवेगळे समजतात. आता तुम्हाला समजले आहे, स्वदर्शन चक्रधारी देखील तुम्ही आहात. शिवबाबा येऊन सृष्टी चक्राचे ज्ञान देतात. त्यांच्या द्वारे आता आपणही मास्टर ज्ञान सागर बनलो आहोत. तुम्ही ज्ञान नद्या आहात ना. ही तर मुलांचीच नावे आहेत.

भक्तीमार्गामध्ये मनुष्य किती स्नान करतात, किती भटकतात. खूप दान-पुण्य इत्यादी करतात, श्रीमंत लोक तर खूप दान करतात. सोने देखील दान करतात. तुम्ही देखील आता समजता - आम्ही किती भटकत होतो. आता आपण काही कोणी हठयोगी तर नाही आहोत. आपण तर आहोत राजयोगी. पवित्र गृहस्थ आश्रमचे होतो, मग रावण राज्यामध्ये अपवित्र बनलो आहोत. ड्रामा अनुसार बाबा पुन्हा गृहस्थ धर्म बनवत आहेत दुसरे कोणीही बनवू शकणार नाही. मनुष्य तुम्हाला म्हणतात की, तुम्ही सर्व पवित्र बनलात तर दुनिया कशी चालणार? बोला, इतके सर्व संन्यासी पवित्र राहतात तरीही दुनिया काही थांबली आहे काय? अरे सृष्टी इतकी वाढली आहे, खाण्यासाठी धान्य सुद्धा नाही आणखी सृष्टी पुन्हा काय वाढवणार. आता तुम्ही मुले समजता, बाबा आपल्या सन्मुख हाजिर-नाजिर आहेत (उपस्थित आहेत आणि सर्व गोष्टी पहात देखील आहेत), परंतु त्यांना या डोळ्यांनी पाहू शकत नाही. बुद्धीने जाणतो, बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत, हाज़िर-नाजिर आहेत.

जे विश्वशांतीच्या गोष्टी करतात, त्यांना तुम्ही सांगा की विश्वामध्ये शांती तर बाबा स्थापन करत आहेत. त्यासाठीच जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे, ५ हजार वर्षांपूर्वी सुद्धा विनाश झाला होता. आताही हा विनाश समोर उभा आहे मग विश्वामध्ये शांती होईल. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहेतच या गोष्टी. दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. असा कोणीही नाही ज्याच्या बुद्धीमध्ये या गोष्टी असतील. तुम्ही जाणता सतयुगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये शांती होती. एका भारत खंडा व्यतिरिक्त दुसरा कोणताही खंड नव्हता. मागाहून इतर खंड निर्माण झाले आहेत. आता किती खंड आहेत. आता हा खेळ देखील संपला आहे. म्हणतात देखील - भगवान जरूर असणार, परंतु भगवान कोण आणि कोणत्या रूपामध्ये येतात, हे जाणत नाहीत. श्री कृष्ण तर असू शकत नाही. ना कोणत्या प्रेरणेने अथवा शक्तीने काम करून घेऊ शकत. बाबा तर मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय) आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळतो. बाबाच स्वर्गाची स्थापना करतात तर मग जरूर जुन्या दुनियेचा विनाश देखील तेच करवून घेतील. तुम्ही जाणता सतयुगामध्ये हे लक्ष्मी-नारायण होते. आता पुन्हा स्वतः पुरुषार्थाद्वारे असे बनत आहेत. नशा असला पाहिजे ना. भारतामध्ये राज्य करत होतो. शिवबाबा राज्य देऊन गेले होते, असे म्हणणार नाही की, शिवबाबा राज्य करून गेले होते. नाही. भारताला राज्य देऊन गेले होते. लक्ष्मी-नारायण राज्य करत होते ना. पुन्हा बाबा राज्य देण्यासाठी आले आहेत. म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा. तुम्हीच ८४ जन्म घेतले होते. कमी पुरुषार्थ करत असतील तर समजा यांनी कमी भक्ती केली आहे. जास्त भक्ती करणारे पुरुषार्थ देखील जास्त करतील. किती क्लियर करून सांगतात परंतु जेव्हा बुद्धीमध्ये शिरेल तेव्हा. तुमचे काम आहे पुरुषार्थ करवून घेणे. कमी भक्ती केली असेल तर योग लागणार नाही. शिवबाबांची आठवण बुद्धीमध्ये टिकणार नाही. पुरुषार्थामध्ये कधीही थंड होता कामा नये. पैलवान मायेला पाहून हार्ट फेल व्हायचे नाही. मायेची वादळे तर खूप येतील. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे, आत्माच सर्व काही करते. शरीर तर नष्ट होईल. आत्मा निघून गेली, शरीर माती झाले. ते पुन्हा तर मिळू शकणार नाही. मग त्याची आठवण करून रडल्याने फायदाच काय. तीच वस्तू पुन्हा मिळेल का. आत्म्याने तर जाऊन दुसरे शरीर घेतले. आता तुम्ही किती श्रेष्ठ कमाई करता. तुमचेच जमा होते, बाकी सर्वांचे नाश होईल.

बाबा भोळे व्यापारी आहेत तेव्हाच तर तुम्हाला मूठभर तांदळाच्या बदल्यात २१ जन्मांसाठी महाल देतात, किती व्याज देतात. तुम्हाला जितके पाहिजे तितके भविष्यासाठी जमा करा. परंतु असे नाही, शेवटी येऊन तुम्ही म्हणाल की, बाबा आमचे जमा करा, परंतु त्यावेळी घेऊन बाबा काय करणार. बाबा काही अडाणी व्यापारी थोडेच आहेत. कामी येणार नाही आणि व्याज मात्र भरून द्यावे लागेल. अशांचे घेतील थोडेच. तुम्हाला मूठभर तांदळाच्या बदल्यात २१ जन्मांसाठी महाल मिळतात. किती व्याज मिळते. बाबा म्हणतात एक नंबरचा भोळा तर मी आहे. पहा तुम्हाला विश्वाची बादशाही देतो, फक्त तुम्ही माझे बनून सेवा करा. भोलानाथ आहेत तेव्हाच तर सर्वजण त्यांची आठवण करतात. आता तुम्ही आहात ज्ञानमार्गामध्ये. आता बाबांच्या श्रीमतावर चाला आणि बादशाही घ्या. म्हणतात देखील - बाबा, आम्ही आलो आहोत राजाई घेण्यासाठी. ती देखील सूर्यवंशीमध्ये. अच्छा, तुमचे तोंड गोड होवो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्रीमतावर चालून बादशाही घ्यायची आहे. मूठभर तांदूळ देऊन २१ जन्मांसाठी महाल घ्यायचे आहेत. भविष्यासाठी कमाई जमा करायची आहे.

२) गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना या जुन्या दुनियेमधून मोह काढून संपूर्ण पावन बनायचे आहे. सर्व काही करत असताना बुद्धी बाबांकडे लागलेली असावी.

वरदान:-
मनसा शुभ भावनेद्वारे एकमेकांना पुढे घेऊन जाणारे विश्व कल्याणकारी भव

जर कोणी काही रॉंग करत असेल तर त्याला अधीन समजून दयेच्या दृष्टीने परिवर्तन करा, चर्चा करू नका. जर कोणी दगड सामोरा आल्याने थांबत असेल तर तुमचे काम आहे पार करून निघून जाणे किंवा त्याला सुद्धा सोबती बनवून पार घेऊन जाणे. यासाठी प्रत्येकामधील विशेषता पहा, कमजोरी सोडत जा. आता कोणालाही वाणीद्वारे (बोलून) सावध करण्याची वेळ राहिलेली नाही परंतु मनसा शुभ भावनेद्वारे एकमेकांचे सहयोगी बनून पुढे जा आणि पुढे नेत रहा तेव्हा म्हटले जाईल विश्व कल्याणकारी.

बोधवाक्य:-
दृढ संकल्पाचा बेल्ट बांधा म्हणजे सीटवरून अपसेट होणार नाही.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

प्रत्यक्षतेचा सूर्योदय तेव्हा होईल जेव्हा चोहो बाजूला पवित्रतेची ज्योत पेटवाल. जसे ते ज्योत घेऊन प्रदक्षिणा घालतात, तसे पवित्रतेच्या ज्योतीने चोहो बाजूला लखलखाट करा तेव्हा सगळे बाबांना पाहू शकतील, ओळखू शकतील. जितकी पवित्रतेची ज्योत अचल (स्थिर) असेल तितके सहजपणे सगळे बाबांना ओळखू शकतील आणि पवित्रतेचा जयजयकार होईल.