21-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पुरुषार्थ करून चांगल्या प्रकारे दैवी गुण धारण करायचे आहेत, कोणालाही दुःख द्यायचे नाही, तुमची कोणतीही आसुरी ए क्टिविटी (आसुरी वर्तन) असता कामा नये”

प्रश्न:-
कोणते आसुरी गुण तुमच्या श्रृंगाराला बिघडवतात?

उत्तर:-
आपसामध्ये भांडण-तंटा करणे, चिडणे, सेंटरवर अशांती माजवणे, दुःख देणे - हे आसुरी गुण आहेत, जे तुमच्या श्रृंगाराला बिघडवतात. जी मुले बाबांची बनून देखील या आसुरी गुणांचा त्याग करत नाहीत, उलटी कर्मे करतात त्यांचे खूप नुकसान होते. हिशोबच हिशोब आहे. बाबांच्या सोबत धर्मराज देखील आहे.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
रूहानी मुलांनी हे तर जाणले आहे की उच्च ते उच्च भगवान आहेत. मनुष्य फक्त गातात आणि तुम्ही दिव्य दृष्टीने पाहता. तुम्ही बुद्धीने देखील जाणता की आपल्याला ते शिकवत आहेत. आत्माच शिकते शरीराद्वारे. सर्व काही आत्माच करते शरीराद्वारे. शरीर विनाशी आहे, ज्याला आत्मा धारण करून पार्ट बजावते. आत्म्यामधेच संपूर्ण पार्टची नोंद आहे. ८४ जन्मांची देखील आत्म्यामध्येच नोंद आहे. सर्वप्रथम तर स्वतःला आत्मा समजायचे आहे. बाबा आहेत सर्वशक्तिमान. त्यांच्याकडून तुम्हा मुलांना शक्ती मिळते. योगाने जास्त शक्ती मिळते, ज्यामुळे तुम्ही पावन बनता. बाबा तुम्हाला शक्ती देतात विश्वावर राज्य करण्याची. इतकी महान शक्ती देतात; ते सायन्स अभिमानी इत्यादी एवढे सारे बनवतात विनाशासाठी. त्यांची बुद्धी आहे विनाशासाठी, तुमची बुद्धी आहे अविनाशी पद प्राप्त करण्यासाठी. तुम्हाला खूप शक्ती मिळते ज्याद्वारे तुम्ही विश्वावर राज्य प्राप्त करता. तिथे प्रजेचे प्रजेवर राज्य नसते. तिथे आहेच राजा-राणीचे राज्य. उच्च ते उच्च आहेत भगवान. आठवण देखील त्यांची करतात. लक्ष्मी-नारायणाचे फक्त मंदिर बनवून पूजा करतात. तरी देखील उच्च ते उच्च भगवान गायले जातात. आता तुम्ही समजता हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. उच्च ते उच्च विश्वाची बादशाही मिळते बेहदच्या बाबांकडून. तुम्हाला किती उच्च पद मिळते. तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. ज्यांच्याकडून काही मिळते त्यांची आठवण केली जाते ना. कन्येचे पतीवर किती प्रेम असते, किती पतीसाठी जीव की प्राण करत असते. पती मरतो तर ‘अरे देवा, हे परमेश्वरा!’ असे म्हणून आकांत करते. हे तर पतींचेही पती आहेत, तुमचा किती श्रृंगार करत आहेत - हे उच्च ते उच्च पद प्राप्त करवून देण्यासाठी. तर तुम्हा मुलांना किती नशा असला पाहिजे. दैवी गुण देखील तुम्हाला इथेच धारण करायचे आहेत. अनेकांमध्ये अजूनही आसुरी अवगुण आहेत, भांडण-तंटा करणे, चिडणे, सेंटरवर धमचक्र (अशांती) माजवणे… बाबा जाणतात खूप समाचार येतात. काम महाशत्रू आहे तर क्रोध देखील काही कमी शत्रू नाहीये. अमक्यावर प्रेम आहे, माझ्यावर का नाही! अमकी गोष्ट यांना विचारली, मला का नाही विचारली! अशा प्रकारे बोलणारे संशय-बुद्धी पुष्कळ आहेत. राजधानी स्थापन होत आहे ना. असे मग काय पद प्राप्त करतील. पदांमध्ये फरक तर खूप असतो. सफाई कर्मचारी सुद्धा बघा चांगल्या-चांगल्या महालांमध्ये राहतात, कोणी कुठे राहतात. प्रत्येकाला आपला पुरुषार्थ करून चांगल्या रीतीने दैवी गुण धारण करायचे आहेत. देह-अभिमानामध्ये आल्याने आसुरी ॲक्टिव्हिटी (वर्तन) होते. जेव्हा देही-अभिमानी बनून चांगल्या रीतीने धारणा करत रहाल तेव्हा उच्च पद प्राप्त कराल. पुरुषार्थ असा करायचा आहे - दैवी गुण धारण करण्याचा; कोणालाही दुःख द्यायचे नाही. तुम्ही मुले दुःखहर्ता, सुखकर्ता बाबांची मुले आहात. कोणालाही दुःख देता कामा नये. जे सेंटर सांभाळतात त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे. जसे बाबा म्हणतात - मुलांनो, जर कोणी चूक करत असेल तर शंभर पटीने दंड होतो. देह-अभिमान आल्याने खूप घाटा होतो कारण तुम्ही ब्राह्मण सुधारण्यासाठी निमित्त बनले आहात. जर आपण स्वतःच सुधारला नसाल तर दुसऱ्यांना काय सुधारणार. खूप नुकसान होते. पांडव गव्हर्मेंट आहे ना. उच्च ते उच्च बाबा आहेत त्यांच्या सोबत धर्मराज देखील आहे. धर्मराजा द्वारे खूप मोठी सजा खातात. अशी काही कर्म करतात तर खूप नुकसान होते. हिशोबच हिशोब आहे, बाबांकडे पूर्ण हिशोब असतो. भक्तीमार्गामध्ये देखील हिशोबच हिशोब आहे. म्हणतात देखील भगवान तुमचा हिशोब घेणार. इथे बाबा स्वतः म्हणतात धर्मराज खूप हिशोब घेईल. मग त्यावेळी काय करू शकाल! साक्षात्कार होईल - आपण हे-हे केले. तिथे (भक्तिमार्गामध्ये) थोडासाच मार पडेल, इथे तर खूप मार खावा लागेल. तुम्हा मुलांना सतयुगामध्ये गर्भ-जेलमध्ये यायचे नाहीये. तिथे तर गर्भ-महाल आहे. कोणते पाप इत्यादी करत नाहीत. तर असे राज्य-भाग्य प्राप्त करण्यासाठी मुलांनी खूप सावधगिरी बाळगायची आहे. कितीतरी मुले ब्राह्मणी टीचर पेक्षाही हुशार होतात. ब्राह्मणी पेक्षाही श्रेष्ठ भाग्य बनते. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे - चांगली सेवा केली नाहीत तर जन्म-जन्मांतर दास-दासी बनाल.

बाबा सन्मुख येताच मुलांना विचारतात - ‘मुलांनो, आत्म-अभिमानी होऊन बसला आहात?’ बाबांचे मुलांप्रती महावाक्य आहे - मुलांनो, आत्म-अभिमानी बनण्याचा भरपूर पुरुषार्थ करायचा आहे. हिंडता-फिरताना देखील विचार सागर मंथन करत रहायचे आहे. अशी बरीच मुले आहेत ज्यांना वाटते की, आपण लवकरात लवकर या नरकातील छी-छी (विकारी) दुनियेमधून सुखधाम मध्ये जावे. बाबा म्हणतात - चांगले-चांगले महारथी योगामध्ये खूप फेल आहेत. त्यांच्याकडूनही पुरुषार्थ करवून घेतला जातो. योग नसेल तर एकदम कोसळाल (अधोगती होईल). नॉलेज तर खूप सोपे आहे. इतिहास-भूगोल पूर्ण बुद्धीमध्ये येतो. खूप चांगल्या-चांगल्या मुली आहेत ज्या प्रदर्शनी समजावून सांगण्यामध्ये खूप हुशार आहेत. परंतु योग नाही, दैवी गुण सुद्धा नाहीत. कधी-कधी विचार येतो, मुलांच्या अजून काय-काय अवस्था आहेत. दुनियेमध्ये किती दुःख आहे. लवकरात लवकर ही नष्ट व्हावी. वाट बघत बसले आहेत, लवकर सुखधामला जावे. तळमळत राहतात. जसे बाबांना भेटण्यासाठी तळमळतात, कारण बाबा आपल्याला स्वर्गाचा रस्ता सांगतात. अशा बाबांना पाहण्यासाठी तळमळतात. वाटते की, अशा बाबांच्या सन्मुख जाऊन रोज मुरली ऐकावी. आता तर समजता इथे कोणत्याही त्रासाचा प्रश्नच नाही. बाहेर राहिल्याने तर सर्वांशी तोड निभवावी लागते. नाही तर कलह होईल म्हणून सर्वांना धीर देतात. यामध्ये खूप गुप्त मेहनत आहे. आठवणीची मेहनत कोणीही सध्या करू शकत नाही. गुप्त आठवणीमध्ये राहाल तर बाबांच्या डायरेक्शन नुसार चालाल सुद्धा. देह-अभिमानामुळे बाबांच्या डायरेक्शनप्रमाणे चालतच नाहीत. सांगतो चार्ट बनवा म्हणजे खूप उन्नती होईल. हे कोणी म्हटले? शिवबाबांनी. टीचर काम देतात तर तो अभ्यास करून येतात ना. इथे चांगल्या-चांगल्या मुलांना देखील माया करू देत नाही. चांगल्या-चांगल्या मुलांचा चार्ट बाबांकडे येईल तर बाबा सांगतील पहा कसे आठवणीमध्ये राहता. समजता आपण आत्मे आशिक, एका माशुकचे आहोत. ते जिस्मानी आशिक-माशुक तर अनेक प्रकारचे असतात. तुम्ही खूप जुने आशिक आहात. आता तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. काही ना काही सहन करावेच लागेल. मिया मिट्ठू बनायचे नाही. बाबा असे थोडेच म्हणतात की, तुमची हाडे द्या. बाबा तर म्हणतात - स्वास्थ्य चांगले ठेवाल तर सेवा देखील चांगल्या रीतीने करू शकाल. आजारी व्हाल तर पडून रहाल. कोणी-कोणी हॉस्पिटलमध्ये देखील हे ज्ञान समजावून सांगण्याची सेवा करतात तर डॉक्टर लोक म्हणतात हे तर फरिश्ते आहेत. सोबत चित्रे घेऊन जातात. जे अशा प्रकारे सेवा करतात त्यांना दयाळू म्हटले जाईल. सेवा करतात तर काहीजण निघतात. जितके-जितके आठवणीच्या बळामध्ये रहाल तितके मनुष्यांना तुम्ही आकर्षित कराल, यामध्येच ताकद आहे. प्युरिटी फर्स्ट. म्हटले देखील जाते अगोदर प्युरीटी, पीस, नंतर प्रॉस्पेरिटी (अगोदर पवित्रता, शांती आणि नंतर समृद्धी). आठवणीच्या बळानेच तुम्ही पवित्र बनता. मग आहे ज्ञान-बळ. आठवणीमध्ये कमजोर बनू नका. आठवणीमध्येच विघ्न पडतील. आठवणीमध्ये राहिल्याने तुम्ही पवित्र देखील बनाल आणि दैवी गुण देखील येतील. बाबांची महिमा तर जाणता ना. बाबा किती सुख देतात. २१ जन्मांसाठी तुम्हाला सुखाच्या लायक बनवितात. कधीही कोणाला दुःख देता कामा नये.

बरीच मुले डिससर्व्हिस (उलटे काम) करून आपणच आपल्याला जसे शापित करतात, इतरांना खूप हैराण करतात. कपूत मुले बनतात तर आपणच आपल्याला शापित करतात. डिससर्व्हिस केल्याने एकदम जमिनीवर कोसळतात (पतन होते). अशी खूप मुले आहेत जी विकारामध्ये जातात किंवा क्रोधामध्ये येऊन हे शिक्षणच सोडून देतात. अनेक प्रकारची मुले इथे बसली आहेत. इथून रिफ्रेश होऊन जातात तेव्हा मग केलेल्या चुकीचा पश्चाताप करतात. तरी देखील पश्चातापाने काही माफ होऊ शकत नाही. बाबा म्हणतात - स्वतःच स्वतःला क्षमा करा. आठवणीमध्ये राहा. बाबा कोणाला क्षमा करत नाहीत. हे तर शिक्षण आहे. बाबा शिकवतात, मुलांनी स्वतःवर कृपा करून शिकायचे आहे. मॅनर्स चांगले ठेवायचे आहेत. बाबा ब्राह्मणीला म्हणतात, रजिस्टर घेऊन या. प्रत्येकाचा समाचार ऐकून मग त्याविषयी समजावून सांगितले जाते. तर त्यांना वाटते ब्राह्मणी ने आपला रिपोर्ट दिला आहे आणि मग अजून जास्तच डिससर्व्हिस करू लागतात. खूप मेहनत करावी लागते. माया खूप मोठी शत्रू आहे. माकडा पासून मंदिर बनू देत नाही. उच्च पद प्राप्त करण्या ऐवजी एकदमच खाली कोसळतात (पतन होते). मग कधीच उठू शकत नाहीत, मरून जातात. बाबा मुलांना वारंवार समजावून सांगतात हे खूप उच्च ध्येय आहे, विश्वाचा मालक बनायचे आहे. मोठ्या व्यक्तीची मुले खूप रॉयल्टीने राहतात. कुठे पित्याची इज्जत जाऊ नये. म्हणतील - ‘तुझे वडील किती चांगले आहेत, तू किती कपूत आहेस. तू तुझ्या वडिलांची इज्जत घालवत आहेस!’ इथे तर प्रत्येकजण आपली इज्जत गमावतात. खूप सजा खावी लागते. बाबा इशारा देतात, अतिशय सावधगिरीने चाला. जेल बर्ड्स (तुरुंगातील पक्षी) बनू नका. जेल बर्ड्स देखील इथेच असतात, सतयुगामध्ये तर कोणतेही जेल असत नाही. तरीही शिकून उच्च पद प्राप्त केले पाहिजे. चुका करू नका. कोणालाही दुःख देऊ नका. आठवणीच्या यात्रेवर रहा. आठवणच उपयोगाला येईल. प्रदर्शनीमध्ये देखील मुख्य गोष्ट हीच सांगा. बाबांच्या आठवणीनेच पावन बनाल. पावन बनावे असे तर सर्वांनाच वाटते. ही आहेच पतित दुनिया. सर्वांची सद्गती करण्यासाठी तर एक बाबाच येतात. क्राइस्ट, बुद्ध इत्यादी हे कोणाची सद्गती करू शकत नाहीत. आणि मग ब्रह्माचे देखील नाव घेतात. ब्रह्माला देखील सद्गती दाता म्हणू शकत नाही. जे देवी-देवता धर्माचे निमित्त आहेत. भले देवी-देवता धर्माची स्थापना तर शिवबाबा करतात तरी देखील नाव तर आहे ना - ब्रह्मा, विष्णू, शंकर… त्रिमूर्ती ब्रह्मा म्हटले जाते. बाबा म्हणतात - हे (ब्रह्मा) देखील गुरु नाहीत. गुरु तर एकच आहेत, त्यांच्या द्वारे तुम्ही रूहानी गुरु बनता. बाकी ते आहेत धर्म स्थापक. धर्म स्थापकांना सद्गती दाता कसे म्हणता येईल, या अतिशय सखोल गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. इतर धर्म स्थापक तर केवळ धर्म स्थापन करतात, ज्यांच्या मागे सर्व येतात, ते काही सर्वांना परत घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यांना तर पुनर्जन्मामध्ये यायचेच आहे, हे स्पष्टीकरण सर्वांसाठी आहे. एकही गुरू सद्गती करणारे नाहीत. बाबा समजावून सांगतात गुरु पतित-पावन एकच आहेत, तेच सर्वांचे सद्गती दाता, लिबरेटर आहेत, सांगितले पाहिजे आमचे गुरु एकच आहेत, जे सद्गती देतात, शांतीधाम, सुखधामला घेऊन जातात. सतयुग इत्यादीमध्ये फार थोडे असतात. तिथे कोणाचे राज्य होते, चित्र तर दाखवाल ना. भारतवासीच मानतील, देवतांचे पुजारी लगेच मानतील की, खरोखर हे तर स्वर्गाचे मालक होते. स्वर्गामध्ये यांचे राज्य होते. तेव्हा मग बाकी सर्व आत्मे कुठे होते? जरूर म्हणतील निराकारी दुनियेमध्ये होते. हे देखील तुम्ही आता समजता. आधी काहीच ठाऊक नव्हते. आता तुमच्या बुद्धीमध्ये चक्र फिरत राहते. बरोबर ५ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये यांचे राज्य होते, जेव्हा ज्ञानाची प्रारब्ध पूर्ण होते तेव्हा मग भक्तीमार्ग सुरू होतो आणि मग पाहिजे जुन्या दुनियेपासून वैराग्य. बस्स, आता आपण नवीन दुनियेमध्ये जाणार. जुन्या दुनियेतून मन विटते. तिथे पती, मुले इत्यादी सर्व असेच भेटतील. बेहदचे बाबा तर आम्हाला विश्वाचा मालक बनवतात.

जी मुले विश्वाचे मालक बनणारी आहेत, त्यांचे विचार अतिशय उच्च आणि वर्तन अतिशय रॉयल असेल. भोजन देखील फार कमी, जास्त लोभ असता कामा नये. आठवणीमध्ये राहणाऱ्यांचे भोजन देखील खूप सूक्ष्म असेल. अनेकांची खाण्यामध्ये देखील बुद्धी जाते. तुम्हा मुलांना तर खुशी आहे विश्वाचा मालक बनण्याची. म्हटले जाते - ‘खुशी जैसी खुराक नहीं. सदैव या आनंदामध्ये रहाल तर खाणे-पिणे देखील खूप कमी होईल. खूप जास्त खाल्ल्याने भारी होतात आणि मग डुलकी इत्यादी घेतात. मग म्हणतात - बाबा, झोप येते. भोजन नेहमी समतोल असले पाहिजे, असे नाही की चांगले भोजन आहे तर खूप खाल्ले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपण दुःखहर्ता, सुखकर्ता बाबांची मुले आहोत, आपण कोणालाही दुःख द्यायचे नाही. डिससर्व्हीस करून आपणच आपल्याला शापित करायचे नाही.

२) आपले विचार खूप उच्च आणि रॉयल ठेवायचे आहेत. दयाळू बनून सेवेवर तत्पर रहायचे आहे. खाण्या-पिण्याचा लोभ सोडून द्यायचा आहे.

वरदान:-
ऑनेस्ट (प्रामाणिक) बनून स्वतःला बाबांसमोर स्पष्ट करणारे चढत्या कलेचे अनुभवी भव

स्वतःला जे आहोत जसे आहोत तसेच बाबांसमोर प्रत्यक्ष करणे - हेच सर्वात मोठ्यात मोठे चढत्या कलेचे साधन आहे. बुद्धीवर जी अनेक प्रकारची ओझी आहेत, त्यांना समाप्त करण्याची हीच सोपी युक्ती आहे. ऑनेस्ट (प्रामाणिक) बनून स्वतःला बाबांसमोर स्पष्ट करणे अर्थात पुरुषार्थाचा मार्ग स्पष्ट करणे. कधीही चालाखीने मनमत आणि परमताचे प्लॅन बनवून बाबांसमोर किंवा निमित्त बनलेल्या आत्म्यांसमोर कोणती गोष्ट ठेवता - तर ही ऑनेस्टी नाही. ऑनेस्टी अर्थात जसे बाबा जे आहेत जसे आहेत मुलांच्या समोर प्रत्यक्ष आहेत, तसेच मुले बाबांसमोर प्रत्यक्ष व्हावीत.

बोधवाक्य:-
खरा तपस्वी तो आहे जो सदैव सर्वस्व त्यागीच्या पोझीशनमध्ये राहतो.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

वर्तमान हे भविष्याचे दर्पण आहे. वर्तमानाची स्टेज अर्थात दर्पणाद्वारे आपले भविष्य स्पष्ट पाहू शकता. भविष्य राज्य-अधिकारी बनण्यासाठी चेक करा की वर्तमान समयी माझ्यामध्ये रुलिंग पॉवर कितपत आहे? पहिल्या सूक्ष्म शक्ती, ज्या विशेष कार्यकर्ता आहेत - संकल्प शक्तीवर, बुद्धीवर पूर्ण अधिकार असेल तेव्हाच आपले भविष्य उज्वल बनवू शकाल.