21-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आसुरी मतावर चालल्याने बेघर झाला आहात, आता ईश्वरीय मतावर चाला तर सुखधाममध्ये जाल”

प्रश्न:-
मुलांना बाबांकडून कोणती अपेक्षा ठेवायची आहे आणि कोणती नाही?

उत्तर:-
बाबांकडून एवढीच अपेक्षा ठेवायची आहे की, आपण बाबांद्वारे पवित्र बनून आपले घर आणि घाट (राजधानी) मध्ये जावे. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका की, ‘अमका आजारी आहे, आशीर्वाद मिळावा’. इथे कृपा किंवा आशीर्वादाची गोष्टच नाही. मी तर आलो आहे तुम्हा मुलांना पतितापासून पावन बनविण्यासाठी. आता मी तुम्हाला असे कर्म शिकवितो जेणेकरून विकर्म होत नाहीत.

गीत:-
आज नहीं तो कल बिखरेंगे यह बादल…

ओम शांती।
रुहानी मुलांनी गाणे ऐकले. मुले जाणतात आता घरी जायचे आहे. बाबा आलेले आहेत नेण्यासाठी. ही आठवण देखील तेव्हा राहील जेव्हा आत्म-अभिमानी असाल. देह-अभिमानामध्ये असाल तर आठवण देखील राहणार नाही. मुले जाणतात बाबा मुसाफिर (प्रवासी) होऊन आले आहेत. तुम्ही देखील प्रवासी होऊन आला होता. आता आपल्या घराला विसरला आहात. बाबांनी पुन्हा घराची आठवण करून दिली आहे आणि दररोज समजावून सांगतात. जोपर्यंत सतोप्रधान बनत नाही तोपर्यंत येऊ शकत नाही. मुले समजतात बाबा तर बरोबर सांगत आहेत. बाबा देखील मुलांना जे श्रीमत देतात तर सपूत मुले त्यानुसार चालू लागतात. यावेळी दुसरे तर कोणते असे पिता नाहीत जे चांगले मत देतील म्हणून दरबदर (बेघर) झाले आहेत. श्रीमत देणारे एक बाबाच आहेत. त्या मतावर देखील काही मुले चालत नाहीत. वंडर आहे. लौकिक पित्याच्या मतावर चालू लागतात. ते आहे आसुरी मत. हा देखील आहे तर ड्रामा. परंतु मुलांना समजावून सांगतात - तुम्ही आसुरी मतावर चालून या अवस्थेला प्राप्त केले आहे. आता ईश्वरीय मतावर चालल्याने तुम्ही सुखधाममध्ये निघून जाल. तो आहे बेहदचा वारसा. दररोज समजावून सांगतात. तर मुलांनी किती हर्षित राहिले पाहिजे. सर्वांनाच काही इथे बसवू शकत नाही. घरी राहत असताना देखील आठवण करायची आहे. आता पार्ट पूर्ण होणार आहे, आता परत घरी जायचे आहे. मनुष्य किती विसरून गेले आहेत. म्हटले जाते ना - ‘हे तर आपले घरदारच विसरून गेले आहेत’. आता बाबा म्हणतात - घराची देखील आठवण करा. आपल्या राजधानीची देखील आठवण करा. आता पार्ट पूर्ण होणार आहे, आता माघारी घरी जायचे आहे. तुम्ही विसरला आहात काय?

तुम्ही मुले म्हणू शकता - ‘बाबा, ड्रामा अनुसार आमचा पार्टच असा आहे, जे आम्ही घरादाराला विसरून एकदम भटकत आहोत. भारतवासीच आपल्या श्रेष्ठ धर्माला, कर्माला विसरून दैवी-धर्म भ्रष्ट, दैवी-कर्म भ्रष्ट झाले आहेत. आता बाबांनी सावध केले आहे, तुमचा धर्म-कर्म तर हा होता. तिथे तुम्ही जे कर्म करत होता ते अकर्म होत होते. कर्म, अकर्म, विकर्माची गती बाबांनीच तुम्हाला समजावून सांगितली आहे. सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात. रावण राज्यामध्ये कर्म विकर्म होतात. आता बाबा आले आहेत धर्म-श्रेष्ठ कर्म-श्रेष्ठ बनविण्यासाठी. तर आता श्रीमतावर श्रेष्ठ कर्म केले पाहिजे. कोणतेही भ्रष्ट-कर्म करून कोणालाही दुःख द्यायचे नाही. हे काम ईश्वरीय मुलांचे नाही. जी डायरेक्शन्स मिळतात त्यानुसार चालायचे आहे, दैवी गुण धारण करायचे आहेत. भोजन देखील शुद्ध घ्यायचे आहे. जर काही अडचणी मुळे मिळत नसेल तर मत (सल्ला) विचारा. बाबा समजतात नोकरी इत्यादी ठिकाणी कुठेतरी थोडे खावे देखील लागते. जेव्हा की तुम्ही योगबलाने राजाई स्थापन करता, पतित दुनियेला पावन बनविता तर भोजनाला शुद्ध बनविणे काही मोठी गोष्ट आहे काय. नोकरी तर करायचीच आहे. असे तर नाही बाबांचे बनलो तर सर्व काही सोडून इथे येऊन बसायचे आहे. किती असंख्य मुले आहेत इतकी सर्व तर राहू शकत नाहीत. रहायचे सर्वांना गृहस्थ व्यवहारामध्येच आहे. हे समजायचे आहे - ‘मी आत्मा आहे, बाबा आलेले आहेत, आम्हाला पवित्र बनवून आपल्या घरी घेऊन जात आहेत नंतर मग राजधानीमध्ये येणार’. हा तर परका, रावणाचा छी-छी घाट आहे. तुम्ही अगदीच पतित बनला आहात, ड्रामा प्लॅन अनुसार. बाबा म्हणतात - आता मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलो आहे तर श्रीमतावर चाला. जितके चालाल तितके श्रेष्ठ बनाल.

आता तुम्ही समजता - आम्ही बाबांना, जे बाबा स्वर्गाचा मालक बनवतात, त्यांनाच विसरलो आहोत. आता बाबा सुधारण्यासाठी आले आहेत. तर चांगल्या रीतीने सुधारले पाहिजे ना. आनंदामध्ये आले पाहिजे. बेहदचे बाबा मिळाले आहेत, मुलांशी असे बोलतात जसे तुम्ही आत्मे आपसामध्ये बोलता. आहेत तर ते देखील आत्मा. परम आत्मा आहेत, त्यांचा देखील पार्ट आहे. तुम्ही आत्मे पार्टधारी आहात. उच्च ते उच्च पासून नीच ते नीच चा पार्ट आहे. भक्तिमार्गामध्ये मनुष्य गातात - सर्वकाही ईश्वरच करतात. बाबा म्हणतात - माझा असा पार्ट थोडाच आहे जो मी आजाऱ्याला बरे करेन. माझा पार्ट आहे रस्ता सांगणे की तुम्ही पवित्र कसे बनावे? पवित्र बनल्यानेच तुम्ही घरी देखील जाऊ शकाल, राजधानीमध्ये देखील जाऊ शकाल. दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नका. अमका आजारी आहे, आशीर्वाद मिळावा. नाही, आशीर्वाद, कृपा इत्यादीची गोष्ट माझ्याकडे अजिबात नको. त्यासाठी साधू-संत इत्यादींकडे जा. तुम्ही मला बोलावताच मुळी की, ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. पावन दुनियेमध्ये घेऊन जा’. तर बाबा विचारतात - मी तुम्हाला विषय सागरामधून बाहेर काढून पार घेऊन जातो, नंतर मग तुम्ही विषय सागरामध्ये अडकून पडता? भक्तिमार्गामध्ये तुमची ही हालत झाली आहे. ज्ञान, भक्ती तुमच्यासाठीच आहे. संन्यासी लोक देखील म्हणतात - ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. परंतु त्याचा अर्थ ते समजत नाहीत. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे ज्ञान, भक्ती आणि नंतर वैराग्य. बेहदचे वैराग्य शिकविणारा पाहिजे. बाबांनी समजावून सांगितले होते - हे कब्रस्तान आहे, याच्या नंतर परिस्तान बनणार आहे. तिथे प्रत्येक कर्म अकर्म होते. आता बाबा तुम्हाला अशी कर्म शिकवितात ज्यामुळे कोणतीही विकर्म होणार नाहीत. कोणालाही दुःख देऊ नका. पतिताकडील अन्न खाऊ नका. विकारामध्ये जाऊ नका. अबलांवर यावरूनच अत्याचार होतात. बघत असता - मायेची विघ्ने कशी पडतात. हे आहे सर्व गुप्त. म्हणतात देवतांचे आणि असुरांचे युद्ध लागले; आणि मग म्हणतात - पांडव आणि कौरवांचे युद्ध लागले. आता लढाई तर एकच आहे. बाबा समजावून सांगतात - मी तुम्हाला राजयोग शिकवत आहे भविष्य २१ जन्मांसाठी. हा मृत्यूलोक आहे. मनुष्य सत्य-नारायणाची कथा ऐकत आले आहेत, फायदा काहीच नाही. आता तुम्ही खरी गीता ऐकवता. रामायण देखील तुम्ही खरे ऐकवता. काही एकाच राम-सीतेची गोष्ट नव्हती. या वेळी तर सारी दुनियाच लंका आहे. चोहोबाजूला पाणी आहे ना. ही आहे बेहदची लंका, ज्यामध्ये रावणाचे राज्य आहे. एक बाबा आहेत ब्राईडग्रुम (नवरदेव). बाकी सर्व आहेत ब्राइड्स (वधू). तुम्हाला आता रावण राज्यातून बाबा सोडवतात. ही आहे शोक वाटिका. सतयुगाला म्हटले जाते अशोक वाटिका. तिथे कोणताही शोक असत नाही. यावेळी तर शोकच शोक आहे. एकही अशोक (शोका विना) राहत नाही. नाव तर ठेवतात - अशोक हॉटेल. बाबा म्हणतात - सारी दुनिया यावेळी बेहदचे हॉटेलच समजा. शोकाचे हॉटेल आहे. मनुष्यांचे खाणे-पिणे पशू सारखे आहे. तुम्हाला बघा बाबा कुठे घेऊन जातात. खरी-खरी अशोक वाटिका आहे सतयुगामध्ये. हद आणि बेहदचा कॉन्ट्रास्ट (विरोधाभास) बाबाच सांगतात. तुम्हा मुलांना खूप आनंद वाटला पाहिजे. जाणता बाबा आपल्याला शिकवत आहेत. आमचा देखील तोच धंदा आहे - सर्वांना रस्ता सांगणे, आंधळ्यांची काठी बनणे. चित्र देखील तुमच्याकडे आहेत. जसे स्कूलमध्ये चित्रांवरून समजावून सांगतात, हा अमका देश आहे. तुम्ही मग समजावून सांगता - ‘तुम्ही आत्मा आहात शरीर नाही. आत्मा भाऊ-भाऊ आहेत’. किती सोपी गोष्ट ऐकवता. म्हणतात देखील - आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. बाबा म्हणतात तुम्ही सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहात ना. गॉडफादर म्हणता ना. तर कधीही आपसामध्ये भांडण-तंटा करता कामा नये. शरीरधारी बनता तेव्हा मग भाऊ-बहीणी होता. आपण शिवबाबांची मुले सर्वजण भाऊ-भाऊ आहोत. प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ-बहीणी आहोत. आम्हाला वारसा आजोबांकडून घ्यायचा आहे म्हणून आजोबांचीच आठवण करतो. या मुलाला (ब्रह्माला) देखील मी माझे बनवले आहे अथवा यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व गोष्टींना तुम्ही आत्ता समजता. बाबा म्हणतात - मुलांनो, आता नवीन दैवी प्रवृत्ती मार्ग स्थापन होत आहे. तुम्ही सर्व बी. के. बेहद बाबांच्या मतावर चालता. ब्रह्मा देखील त्यांच्याच मतावर चालतात. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा बाकी सर्व नात्यांना कमी करत जा. ८ तास आठवण ठेवायची आहे, बाकी १६ तास आराम किंवा धंदा इत्यादी जे करायचे आहे ते करा. मी बाबांची संतान आहे हे विसरू नका. असे देखील नाही की, इथे येऊन हॉस्टेलमध्ये रहायचे आहे. नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये मुला-बाळांसोबत रहायचे आहे. बाबांकडे येतातच मुळी रिफ्रेश होण्यासाठी. मथुरा, वृंदावनमध्ये जातात मधुबनचा साक्षात्कार करण्यासाठी. छोट्या मॉडेल रूपामध्ये बनवून ठेवले आहे. आता तर ही बेहदची गोष्ट समजून घ्यायची आहे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे नवीन सृष्टी रचत आहेत. आपण प्रजापिता ब्रह्माची संतान बी.के. आहोत. विकाराची गोष्ट असू शकत नाही. संन्याशांचे शिष्य बनतात, जर त्याने संन्याशाचे कपडे घातले तर नाव बदलतात. इथे देखील तुम्ही बाबांचे बनले आहात तर बाबांनी नवीन नावे ठेवली आहेत. कित्येक भट्टीमध्ये राहिले होते. या भट्टी विषयी कोणालाच माहिती नाही. शास्त्रांमध्ये तर काय-काय गोष्टी लिहिल्या आहेत, तरी देखील असेच होईल. आता तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टीचे चक्र फिरते आहे. बाबा देखील स्वदर्शन चक्रधारी आहेत ना. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. बाबांना तर शरीर देखील नाही. तुम्हाला तर स्थूल शरीर आहे. ते आहेतच परम आत्मा. आत्माच स्वदर्शन चक्रधारी आहे ना. आता आत्म्याला अलंकार कसे देता येतील? समजण्यासारखी गोष्ट आहे ना. या किती अति सूक्ष्म गोष्टी आहेत. बाबा म्हणतात - वास्तविक मी आहे स्वदर्शन चक्रधारी. तुम्ही जाणता - आत्म्यामध्येच संपूर्ण सृष्टीचक्राचे ज्ञान येते. बाबा देखील परमधाममध्ये राहणारे आहेत, आपण देखील तिथेच राहणारे आहोत. बाबा येऊन आपला परिचय देतात - ‘मुलांनो, मी देखील स्वदर्शन चक्रधारी आहे. मी पतित-पावन आलो आहे तुमच्याकडे’. मला बोलावलेच आहे की, येऊन पतितापासून पावन बनवा, लिबरेट करा. त्यांना शरीर तर नाही आहे. ते अजन्मा आहेत. भले जन्म घेतात देखील परंतु दिव्य जन्म घेतात. शिव जयंती किंवा शिवरात्री साजरी करतात. बाबा म्हणतात - मी येतोच तेव्हा जेव्हा रात्र पूर्ण होते, तर दिवस बनविण्यासाठी येतो. दिवसामध्ये २१ जन्म आणि रात्रीमध्ये ६३ जन्म, आत्माच भिन्न-भिन्न जन्म घेते. आता आत्मा दिवसा मधून रात्रीमध्ये आली आहे, मग दिवसामध्ये जायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी देखील तुम्हाला बनवले आहे. यावेळी माझा पार्ट आहे. तुम्हाला देखील स्वदर्शन चक्रधारी बनवतो. तुम्ही मग इतरांना बनवा. ८४ जन्म कसे घेतले आहेत, ते ८४ जन्मांचे चक्र तर समजले आहे. अगोदर तुम्हाला हे ज्ञान होते का? अजिबात नाही. अज्ञानी होता. बाबा मूळ गोष्ट समजावून सांगत आहेत की, बाबा आहेत स्वदर्शन चक्रधारी, त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत. तुम्हा मुलांना वारसा देत आहेत. बाबा मुलांना समजावून सांगतात, आपसामध्ये भांडण-तंटे करू नका. खारट पाणी बनू नका. नेहमी हर्षित रहायचे आहे आणि सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांनाच सगळे विसरले आहेत. आता बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. निराकार भगवानुवाच - निराकारी आत्म्यांप्रति. खरेतर तुम्ही निराकारी आहात मग साकारी बनता. साकार शिवाय तर आत्मा काहीच करू शकत नाही. आत्मा शरीरातून निघून जाते तर काहीच चुळबुळ होऊ शकत नाही. आत्मा लगेच जाऊन दुसऱ्या शरीरामध्ये आपला पार्ट बजावते. या गोष्टींना चांगल्या रीतीने समजून घ्या, मनामध्ये घोटत रहा. आपण आत्मे बाबांकडून वारसा घेतो. वारसा मिळतो सतयुगाचा. जरूर बाबांनीच भारताला वारसा दिला असेल. कधी वारसा दिला, त्यानंतर पुढे काय झाले? हे लोकांना काहीच माहित नाही. आता बाबा सर्व काही सांगतात. तुम्हा मुलांनाच स्वदर्शन चक्रधारी बनवले आहे, मग तुम्ही ८४ जन्म भोगले आहेत. आता पुन्हा मी आलो आहे, किती सोपे करून समजावून सांगत राहतात. बाबांची आठवण करा आणि गोड बना. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. बाबा तर वकिलांचेही वकील आहेत, सगळ्या तंट्यांपासून सोडवतात. तुम्हा मुलांना खूप आंतरिक खुशी झाली पाहिजे. आपण बाबांची संतान बनलो आहोत. बाबांनी आम्हाला ॲडॉप्ट केले आहे वारसा देण्यासाठी. इथे तुम्ही येताच मुळी वारसा घेण्यासाठी. बाबा म्हणतात - मुले-बाळे इत्यादी बघत असताना देखील बुद्धी बाबांकडे आणि राजधानीकडे रहावी. अभ्यास किती सोपा आहे. जे बाबा तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात, त्यांना तुम्ही विसरून जाता. पहिले स्वतःला आत्मा जरूर समजा. हे ज्ञान बाबा संगमावरच देतात कारण संगमावरच तुम्हाला पतितापासून पावन बनायचे आहे.

अच्छा, गोड-गोड रुहानी ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण कुलभूषण, हे देवतांपेक्षाही उच्च कुळ आहे. तुम्ही भारताची खूप श्रेष्ठ सेवा करता. आता पुन्हा तुम्ही पूज्य बनाल. आता पुजारीला पूज्य, कवडी पासून हिऱ्या सारखे बनवत आहेत. अशा रुहानी मुलांप्रती माता-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता श्रीमतावर प्रत्येक कर्म श्रेष्ठ करायचे आहे, कोणालाही दुःख द्यायचे नाही, दैवी गुण धारण करायचे आहेत. बाबांच्या डायरेक्शनवरच चालायचे आहे.

२) नेहमी हर्षित राहण्यासाठी स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे, कधीही खारट पाणी व्हायचे नाही. सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. खूप-खूप गोड बनायचे आहे.

वरदान:-
मान मागण्या पेक्षा सर्वांना मान देणारे सदा निष्काम योगी भव

तुम्हाला कोणी मान देवो, मानो अथवा न मानो परंतु तुम्ही त्याला गोड भाऊ, गोड बहीण मानून नेहमी स्वमानामध्ये राहून, स्नेही दृष्टीने, स्नेहाच्या वृत्तीने आत्मिक मान देत चला. ‘हे मान देतील तर मी मान देईन’ - हा देखील रॉयल भिकारीपणा आहे, याबाबतीत निष्काम योगी बना. रूहानी स्नेहाच्या वर्षावाद्वारे शत्रूला देखील दोस्त बनवा. तुमच्या समोर कोणी दगड जरी फेकले तरी देखील तुम्ही त्याला रत्न द्या. कारण तुम्ही रत्नागर बाबांची मुले आहात.

बोधवाक्य:-
विश्वाचे नव-निर्माण करण्यासाठी दोन शब्द लक्षात ठेवा - निमित्त आणि निर्मान.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. सेवेमध्ये सफलतेचे मुख्य साधन आहे - त्याग आणि तपस्या. असे त्यागी आणि तपस्वी अर्थात सदा एका बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन, प्रेमाच्या सागरामध्ये सामावलेले. ज्ञान, आनंद, सुख, शांतीच्या सागरामध्ये सामावलेल्यांनाच म्हणणार - तपस्वी. असे त्याग-तपस्येवालेच खरे सेवाधारी आहेत.