21-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, योग-अग्नी द्वारे पापांना भस्म करून संपूर्ण सतोप्रधान बनायचे आहे, कोणतेही पाप कर्म करायचे नाही”

प्रश्न:-
सतयुगामध्ये उच्च पद कोणत्या आधारावर मिळते? इथला कोणता कायदा सर्वांना सांगायचा आहे?

उत्तर:-
सतयुगामध्ये पवित्रतेच्या आधारावर उच्च पद मिळते. जे पवित्रतेची धारणा कमी प्रमाणात करतात ते सतयुगामध्ये उशिरा येतात आणि पद देखील कमी दर्जाचे प्राप्त करतात. इथे जेव्हा कोणी येतात तेव्हा त्यांना हा कायदा सांगा की, दान द्याल तर ग्रहण सुटेल. ५ विकारांचे दान द्या, तर तुम्ही १६ कला संपूर्ण बनाल. तुम्ही मुलांनी देखील आपल्या मनाला विचारा की, ‘माझ्यामध्ये कोणता विकार तर नाही ना?’

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत की, लोकांना कसे समजावून सांगावे की आता स्वर्गाची स्थापना होत आहे. ५ हजार वर्षांपूर्वी देखील भारतामध्ये स्वर्ग होता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. विचार केला पाहिजे, त्या वेळी किती मनुष्य होते. सतयुगाच्या सुरुवातीला जास्तीत जास्त ९ ते १० लाख असतील. सुरुवातीला झाड लहानच असते. या वेळी जेव्हा कलियुगाचा अंत आहे तर किती मोठे झाड झाले आहे, आता याचा विनाश देखील जरूर व्हायचा आहे. मुले समजतात हे तेच महाभारत युद्ध आहे. याच वेळी गीतेच्या भगवंताने राजयोग शिकवला आणि देवी-देवता धर्माची स्थापना केली. संगमावरच अनेक धर्मांचा विनाश, एका धर्माची स्थापना झाली होती. मुले हे देखील जाणतात की आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, दुसरा कोणताही धर्म नव्हता. अशी नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी बाबा संगमावर येतात. आता ती स्थापन होत आहे. जुनी दुनिया विनाश होईल. सतयुगामध्ये फक्त एकच भारत खंड होता, दुसरा कोणताही खंड नव्हता. आता तर कितीतरी खंड आहेत. भारत खंड देखील आहे, परंतु यामध्ये आदि सनातन देवी-देवता धर्म राहिलेला नाही. तो प्रायः लोप झाला आहे. आता पुन्हा परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत. बाकी सर्व धर्म विनाश होतात. हे तर लक्षात ठेवायचे आहे की, सतयुग-त्रेतामध्ये दुसरे कोणतेही राज्य नव्हते, बाकीचे सर्व धर्म हे आता आले आहेत. किती दुःख, अशांती, हिंसाचार आहे. महाभारी महाभारत युद्ध देखील तेच आहे. एका बाजूला युरोपवासी यादव देखील आहेत. ५ हजार वर्षांपूर्वी देखील यांनी मुसळांचा (मिसाइल्सचा) शोध लावला होता. कौरव आणि पांडव देखील होते. पांडवांच्या बाजूने स्वतः परमपिता परमात्मा मदतगार होते. सर्वांना हेच सांगितले की, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना माझी आठवण केल्याने तुमची पापे वाढणार नाहीत आणि भूतकाळातील विकर्म विनाश होतील.

आता बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्हीच भारतवासी सतयुगामध्ये जे सतोप्रधान होता, तेच ८४ जन्म घेता-घेता आता यावेळी तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे. आता सतोप्रधान कसे बनाल. सतोप्रधान तेव्हाच बनाल जेव्हा मज पतित-पावन बाबांची आठवण कराल. या योग-अग्नी द्वारेच पापे भस्म होतील आणि आत्मा सतोप्रधान बनेल. आणि मग स्वर्गामध्ये २१ जन्मांकरिता वारसा प्राप्त कराल. बाकी या जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे. भारत सतयुगामध्ये श्रेष्ठाचारी होता आणि सृष्टीच्या सुरुवातीला फार थोडे मनुष्य होते. भारत स्वर्ग होता, इतर कोणतेही खंड नव्हते. आता बाकीचे धर्म वाढत-वाढत झाड किती मोठे झाले आहे आणि तमोप्रधान जडजडीभूत झाले आहे. आता या तमोप्रधान झाडाचा विनाश आणि नवीन देवी-देवता धर्माच्या झाडाची स्थापना जरूर पाहिजे. संगमावरच होईल. आता तुम्ही आहात संगमावर. आदि सनातन देवी-देवता धर्माचे आता सैपलिंग (कलम) लावले जात आहे. पतित मनुष्यांना बाबा पावन बनवत आहेत, तेच मग देवता बनतील. जे पहिल्या नंबरला होते, ज्यांनी ८४ जन्म घेतले आहेत, तेच पुन्हा पहिल्या नंबरला येतील. सर्वप्रथम देवी-देवतांचा पार्ट होता. त्यांचीच पहिली ताटातूट झाली आहे. मग पुन्हा त्यांचाच पार्ट असला पाहिजे ना. सतयुगामध्ये आहेतच सर्वगुण संपन्न... आता आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया), दिवस-रात्री इतका फरक आहे. आता विशश वर्ल्डला, वाइसलेस वर्ल्ड (विकारी दुनियेला, निर्विकारी दुनिया) कोण बनवेल? बोलावतात देखील - ‘हे पावन बनविणारे, या’. आता ते आले आहेत. बाबा म्हणतात - मी तुम्हाला वाइसलेस (निर्विकारी) बनवत आहे. या विशश (विकारी) दुनियेच्या विनाशासाठी लढाई लागणार आहे. आता ते म्हणतात एक मत कसे होईल कारण आता अनेक मते आहेत ना. इतक्या अनेक मत-मतांतरांमध्ये एका धर्माचे मत कोण स्थापन करेल? बाबा समजावून सांगतात आता एका मताची स्थापना होत आहे. बाकी सर्वांचा विनाश होईल. आदि सनातन देवी-देवता धर्माचे जे पावन होते, तेच पुन्हा ८४ जन्म भोगून आता पतित बनले आहेत. मग बाबा येऊन भारतवासीयांना पुन्हा स्वर्गाचा वारसा देत आहेत अर्थात असुरा पासून देवता बनवत आहेत. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता की, बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही पतितापासून पावन बनाल’. आता तुम्ही ज्ञान-चितेवर बसा. चितेवर बसल्याने तुम्ही पावन बनता. मग द्वापर मध्ये रावण राज्य असल्यामुळे काम-चितेवर बसून-बसून भ्रष्टाचारी दुनिया बनली आहे. आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी देवी-देवता होते. फार थोडे मनुष्य होते. आता तर किती आसुरी बनले आहेत. इतर धर्म देखील ॲड होऊन झाड मोठे झाले आहे. बाबा समजावून सांगतात - झाड जडजडीभूत झाले आहे. आता पुन्हा मला ‘एक मत’ असणारे राज्य स्थापन करायचे आहे. भारतवासी म्हणतात देखील एका धर्मामध्ये एक मत असावे. हे भारतवासी विसरले आहेत की, सतयुगामध्ये एकच धर्म होता. इथे तर अनेक धर्म आहेत. आता बाबा येऊन पुन्हा एक धर्म स्थापन करत आहेत. तुम्ही मुले राजयोग शिकत आहात. जरूर भगवानच राजयोग शिकवतील. हे कोणालाच माहीत नाही. जेव्हा कोणी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना देखील समजावून सांगितले पाहिजे - ‘तुम्ही कशाचे उद्घाटन करत आहात’. बाबा या भारताला स्वर्ग बनवत आहेत. बाकी सर्व नरकवासी नष्ट होतील. विनाशा पूर्वी ज्यांना बाबांकडून वारसा घ्यायचा आहे त्यांनी येऊन समजून घ्यावे. हा बी.के. चा जो आश्रम आहे हा क्वारंटाइन क्लास आहे (ज्ञान देण्यासाठी नवीन जिज्ञासूंना स्वतंत्र वर्ग घेतले जातात), इथे ७ दिवस क्लास करायचा आहे ज्यामुळे ५ विकार निघून जातील. देवतांमध्ये हे ५ विकार नसतात. आता इथे ५ विकारांचे दान द्यायचे आहे, तेव्हा ग्रहण सुटेल. दान द्या तर ग्रहण सुटेल. मग तुम्ही १६ कला संपूर्ण बनाल. भारत सतयुगामध्ये १६ कला संपूर्ण होता, आता तर एकही कला राहिलेली नाही. सर्व गरीब बनले आहेत.

कोणी ओपनिंग करण्यासाठी येतात, तर सांगा, इथला कायदा आहे, बाबा म्हणतात ५ विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल. तुम्ही १६ कला संपूर्ण देवता बनाल. पवित्रते अनुसार पद प्राप्त कराल. बाकी एखाद्या कलेची जर कमतरता राहिली तर मग जन्म देखील उशिरा घ्याल. विकारांचे दान देणे तर चांगले आहे ना. चंद्राला ग्रहण लागते तेव्हा पूर्वी ब्राह्मण लोक दान घेत होते. आता तर ब्राह्मण मोठे लोक झाले आहेत. गरीब लोक बिचारे भीक मागत राहतात, जुने कपडे इत्यादी सुद्धा घेत असतात. वास्तविक ब्राह्मण जुने कपडे घेत नाहीत, त्यांना नवीन दिले जातात. तर आता तुम्ही समजावून सांगता - भारत १६ कला संपूर्ण होता. आता आयर्न एज्ड झाला आहे. ५ विकारांचे ग्रहण लागले आहे. आता तुम्ही ५ विकारांचे दान देऊन हा अंतिम जन्म पवित्र राहाल तर नवीन दुनियेचे मालक बनाल. स्वर्गामध्ये फार थोडे होते. नंतर मग वृद्धी झाली आहे. आता तर विनाश देखील समोर उभा आहे. बाबा म्हणतात ५ विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल. आता तुम्हाला श्रेष्ठाचारी बनून स्वर्गाचे सूर्यवंशी राज्य घ्यायचे आहे, तर भ्रष्टाचार सोडावा लागेल. ५ विकारांचे दान द्या. आपल्या मनाला विचारा की, ‘मी सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी बनलो आहे का?’ नारदाचे उदाहरण आहे ना. एक जरी विकार असेल तर लक्ष्मीला कसे वरु शकणार. प्रयत्न करत राहा, अशुद्धीला जाळत राहा. सोने जेव्हा वितळवतात, वितळता-वितळता जर आग थंड झाली तर त्यातील अशुद्धी निघत नाही, म्हणून ते निरंतर प्रखर आगीमध्ये वितळवले जाते. जेव्हा पाहतात की कचरा वेगळा झाला आहे, तेव्हाच साच्यामध्ये ओतले जाते. आता बाबा स्वतः सांगतात - कोणत्याही विकारामध्ये जाऊ नका. तीव्र वेगाने पुरुषार्थ करा. पहिली तर पवित्रतेची प्रतिज्ञा करा. बाबा, तुम्ही पावन बनविण्यासाठी आला आहात, आम्ही कधीही विकारामध्ये जाणार नाही. देही-अभिमानी बनायचे आहे. बाबा आम्हा आत्म्यांना समजावून सांगतात. ते सुप्रीम आत्मा आहेत. तुम्ही जाणता आपण पतित आहोत. आत्म्यामध्येच संस्कार असतात. मी तुमचा पिता तुम्हा आत्म्यांशी बोलतो. असे कोणीही म्हणू शकत नाही की, ‘मी तुमचा पिता, परमात्मा आहे’. मी आलो आहे पावन बनविण्याकरिता. तुम्ही सुरुवातीला सतोप्रधान होता, नंतर मग सतो, रजो, तमोमध्ये आला आहात. तमोप्रधान बनला आहात. यावेळी ५ तत्वे देखील तमोप्रधान आहेत, म्हणून दुःख देतात. प्रत्येक वस्तू दुःख देते. हीच तत्वे जेव्हा सतोप्रधान असतात - तेव्हा सुख देतात. त्याचे नावच आहे - सुखधाम. हे आहे दुःखधाम. सुखधाम आहे बेहदच्या बाबांचा वारसा. दुःखधाम आहे रावणाचा वारसा, आता जितके श्रीमतावर चालाल, तितके तुम्ही श्रेष्ठ बनाल. मग प्रसिद्ध होईल की, कल्प-कल्प हे अशाच रीतीने पुरुषार्थ करणार आहेत. ही कल्प-कल्पाची बाजी आहे. जे जास्त पुरुषार्थ करत आहेत ते आपले राज्य-भाग्य घेत आहेत. जर नीट पुरुषार्थ केला नसेल तर तो थर्ड ग्रेडमध्ये निघून जाईल. प्रजेमध्ये देखील माहीत नाही कोण जाऊन बनेल. लौकिक पिता देखील म्हणतात - ‘तू माझे नाव बदनाम करत आहेस, घरातून बाहेर पड’. बेहदचे बाबा देखील म्हणतात - तुम्हाला मायेची अशी चपराक बसेल की सूर्यवंशी-चंद्रवंशीमध्ये सुद्धा येणार नाही. तेव्हा तुम्ही स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्याल.

बाबा तर म्हणतात - वारसदार बना. राजतिलक घ्यायचा असेल तर माझी आठवण करा आणि इतरांना देखील आठवण करून द्या तर तुम्ही राजा बनाल. नंबरवार तर असतात ना. काही बॅरिस्टर एका-एका केसचे लाखो रुपये कमावतात आणि काहीजणांकडे पाहा घालण्यासाठी कोट देखील नसेल. पुरुषार्थावर अवलंबून आहे ना. तुम्ही देखील पुरुषार्थ कराल तर उच्च पद प्राप्त कराल. मनुष्या पासून देवता बनायचे आहे. भले मग मालक बना अथवा प्रजा बना. प्रजेमध्ये देखील नोकर-चाकर बनतील. स्टुडंटच्या वागणुकी वरून टीचर समजतात. आश्चर्य तर हे आहे की, आधीच्या लोकांपेक्षा नंतरचे वेगाने पुढे जातात कारण आता दिवसेंदिवस रिफाइन पॉइंट्स (सुधारित पॉईंट्स) मिळत राहतात. सैंपलिंग (कलम) लावत जातात. आधीचे तर काही जण भागन्ती झाले. नवीन ॲड होत जातात. नवीन-नवीन पॉइंट्स मिळत जातात. खूप युक्तीने समजावून सांगितले जाते. बाबा म्हणतात - अत्यंत रहस्यमय आणि मनोरंजक गोष्टी सांगतो, जेणेकरून तुम्ही लगेच निश्चय-बुद्धी बनाल. जोपर्यंत माझा पार्ट आहे, तोपर्यंत तुम्हाला शिकवत राहीन. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जेव्हा कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल तेव्हा शिक्षण पूर्ण होईल. मुले देखील समजतील. शेवटी परीक्षेचा रिझल्ट कळतो ना. या शिक्षणामध्ये नंबरवन सब्जेक्ट आहे - पवित्रतेचा. जोपर्यंत बाबांची आठवण राहत नाही, बाबांची सेवा करत नाही, तोपर्यंत चैन पडता कामा नये. तुमचे युद्ध आहेच मुळी माये सोबत. रावणाला भले जाळतात, परंतु जाणत नाहीत की हा कोण आहे. मोठ्या प्रमाणात दशहरा साजरा करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटते - भगवान रामाची, सीता भगवती चोरली गेली! मग वानरांची सेना घेतली. असे कधी होऊ शकते का? काहीच समजत नाहीत. तर जेव्हा प्रदर्शनीमध्ये येतात तेव्हा सर्वप्रथम हेच सांगितले पाहिजे की, भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा किती मनुष्य असतील? ही ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. आता कलियुग आहे, तेच महाभारी महाभारत युद्ध देखील आहे, बाबा येऊन राजयोग शिकवत आहेत. विनाश देखील होईल. इथे एक धर्म एक मत अथवा शांती कशी असू शकते? जितके एक मत होण्यासाठी प्रयत्न करतात तितकेच भांडत राहतात. बाबा म्हणतात - ‘आता मी त्या सर्वांना आपसामध्ये लढवून लोणी तुम्हाला देतो’. बाबा समजावून सांगतात - जो करेल तो प्राप्त करेल. काही मुले बाबांपेक्षा देखील श्रेष्ठ बनू शकतात. तुम्ही माझ्यापेक्षाही श्रीमंत - विश्वाचे मालक बनाल. मी बनणार नाही. मी तुम्हा मुलांची निष्काम सेवा करतो. मी दाता आहे. कोणीही असे समजू नये की, आम्ही शिवबाबांना ५ रुपये देतो. उलट शिवबाबांकडून तुम्ही स्वर्गामध्ये ५ पद्म (अफाट संपत्ती) घेता. मग हे देणे झाले काय! जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही देतो, तर हा शिवबाबांचा खूप मोठा अपमान करत आहात. बाबा तुम्हाला किती उच्च पदस्थ बनवतात. तुम्ही ५ रुपये शिवबाबांच्या खजिन्यामध्ये देता. बाबा तुम्हाला ५ कोटी रुपये देतात. कवडी पासून हिऱ्या समान बनवतात. अशी कधीही मनात शंका येऊ देऊ नका की, आम्ही शिवबाबांना दिले. ते किती भोलानाथ आहेत. कधीही असा विचार येता कामा नये की, आम्ही बाबांना देतो. नाही, शिवबाबांकडून आपण २१ जन्मांकरिता वारसा घेतो. शुद्ध विचाराने दिले नाहीत तर स्वीकार कसे होईल? सर्व गोष्टींची समज बुद्धीमध्ये ठेवली पाहिजे. ईश्वर अर्थ दान करतात, तर ईश्वर काही उपाशी आहेत काय? नाही, समजतात आपल्याला पुढच्या जन्मामध्ये मिळेल. बाबा आता तुम्हाला कर्म, अकर्म, विकर्माची गति समजावून सांगत आहेत. इथे जे कर्म कराल ते विकर्मच होईल कारण रावण राज्य आहे. सतयुगामध्ये तुमचे कर्म अकर्म होते. मी तुम्हाला आता त्या दुनियेमध्ये ट्रान्सफर करतो, जिथे तुमच्याकडून विकर्म होणारच नाही. भरपूर मुले होतील तेव्हा मग तुमचे पैसे तरी काय करणार? मी काही कच्चा व्यापारी नाहीये, जो घेईन आणि उपयोगात आणले नाही तर पुन्हा भरून द्यावे लागेल. मी पक्का व्यापारी आहे. मी सरळ सांगेन, ‘गरज नाही’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) तीव्र वेगाने पुरुषार्थ करून विकारांच्या अशुद्धीला योगाच्या अग्नीमध्ये वितळवून टाका. पवित्रतेची दृढ प्रतिज्ञा करायची आहे.

२) कर्म-अकर्म-विकर्माच्या गतिला बुद्धीमध्ये ठेवून आपले सर्व काही नवीन दुनियेसाठी ट्रान्सफर करायचे आहे.

वरदान:-
श्रीमताच्या आधारावर आनंद, शक्ती आणि सफलतेचा अनुभव करणारे सर्व प्राप्ती संपन्न भव

जी मुले स्वतःला ट्रस्टी समजून श्रीमतानुसार चालतात, श्रीमतामध्ये किंचितही मनमत अथवा परमत मिक्स करत नाहीत त्यांना निरंतर आनंद, शक्ती आणि सफलतेचा अनुभव होतो. पुरुषार्थ अथवा मेहनत कमी असून देखील प्राप्ती जास्त होईल, तेव्हा म्हणणार - यथार्थ श्रीमतावर चालणारे. परंतु माया, ईश्वरीय मतामध्ये मनमत अथवा परमताला रॉयल रूपामध्ये बदलते, आणि म्हणून सर्व प्राप्तींचा अनुभव होत नाही. याकरिता परखण्याची आणि निर्णय करण्याची शक्ती धारण करा म्हणजे मग धोका खाणार नाही.

बोधवाक्य:-
बालक सो मालक ते आहेत जे तपस्येच्या बळाद्वारे भाग्यविधाता पित्याला आपले बनवतात.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

संतुष्ट व्यक्तीला संतुष्ट ठेवणे, स्नेही असणाऱ्याला स्नेह देणे, सहयोगी सोबत सहयोगी बनणे - यात काही ‘महावीरता’ नाहीये. परंतु कोणी कितीही असहयोगी बनला, तरी आपल्या सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगी असणाऱ्याला सहयोगी बनविणे याला महावीरता म्हटले जाते. कमजोर असणाऱ्याला कमजोर समजून सोडून देऊ नका. परंतु त्याला बळ देऊन बलवान बनवा, कमजोर असणाऱ्याला हाय जंप देण्यायोग्य बनवा तेव्हा म्हणणार - महावीर अथवा सर्वांवर उपकार करणारे.