22-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - अभ्यासाचे आणि दैवी चरित्राचे रजिस्टर ठेवा, रोज चेक करा की माझ्याकडून
कोणती चूक तर झाली नाही ना”
प्रश्न:-
तुम्ही मुले
कोणत्या पुरुषार्थाद्वारे राजाईचा तिलक प्राप्त करू शकता?
उत्तर:-
१) नेहमी आज्ञाधारक होऊन राहण्याचा पुरुषार्थ करा. संगमावर फरमानबरदारचा (आज्ञाधारकाचा)
टिळा लावा तर राजाईचा तिलक मिळेल. बेवफादार अर्थात आज्ञेला न मानणारे राजाईचा तिलक
प्राप्त करू शकत नाहीत. २) कोणताही आजार सर्जनपासून लपवू नका. लपवाल तर पद कमी होईल.
बाबांसारखे प्रेमाचा सागर बना तर राजाईचा तिलक मिळेल.
ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत, शिक्षण अर्थात समज. तुम्ही मुले
समजता हे शिक्षण खूप सोपे तसेच खूप श्रेष्ठ आहे आणि खूप उच्च पद देणारे आहे. हे
केवळ तुम्ही मुलेच जाणता की हे शिक्षण आपण विश्वाचे मालक बनण्यासाठी शिकत आहोत. तर
शिकणाऱ्यांना खूप आनंद झाला पाहिजे. किती श्रेष्ठ शिक्षण आहे! हा तोच गीता एपिसोड
देखील आहे. संगमयुग देखील आहे. तुम्ही मुले आता जागृत झाला आहात, बाकीचे सर्व झोपी
गेले आहेत. गायन देखील आहे - मायेच्या निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. तुम्हाला बाबांनी
येऊन जागे केले आहे. केवळ एकाच गोष्टीवर समजावून सांगतात - ‘गोड मुलांनो, आठवणीच्या
यात्रेच्या बळाद्वारे तुम्ही साऱ्या विश्वावर राज्य करा. जसे कल्पापूर्वी केले होते.
बाबा ही आठवण करून देत आहेत. मुले देखील समजतात आम्हाला स्मृती आली आहे - कल्प-कल्प
आम्ही या योगबळाद्वारे विश्वाचे मालक बनतो आणि मग दैवी गुण देखील धारण केले आहेत.
पूर्ण लक्ष योगावरच द्यायचे आहे. या योगबळाद्वारे तुम्हा मुलांमध्ये ऑटोमॅटिकली दैवी
गुण येतात. खरोखर ही परीक्षा आहेच मनुष्यापासून देवता बनण्याची. तुम्ही इथे आला
आहात योगबळाद्वारे मनुष्यापासून देवता बनण्याकरिता. हे देखील जाणता की आमच्या
योगबळाद्वारे संपूर्ण विश्व पवित्र होणार आहे. पवित्र होते, आता अपवित्र बनले आहे.
संपूर्ण चक्राचे रहस्य तुम्हा मुलांना समजले आहे आणि मनामध्ये देखील आहे. भले कोणी
नवीन असेल तरी देखील त्यांना या गोष्टी समजण्यासाठी खूप सोप्या आहेत. तुम्ही देवता
पूज्य होता, नंतर मग पुजारी तमोप्रधान बनलात हे इतर कोणीही असे सांगू शकणार नाही.
बाबा क्लिअर सांगतात - तो आहे भक्ती मार्ग, हा आहे ज्ञान मार्ग. भक्ती पास्ट (भूतकाळ)
झाला. भूतकाळातील गोष्टींचे चिंतन करू नका. ही तर अधोगती होण्याची गोष्ट आहे. बाबा
आता चढण्याच्या गोष्टी ऐकवत आहेत. मुले देखील जाणतात - आपल्याला दैवी गुण जरूर धारण
करायचे आहेत. दररोज चार्ट लिहायचा आहे - आपण किती वेळ आठवणीमध्ये राहतो? माझ्याकडून
काय-काय चुका झाल्या? चूक झाली तर गंभीर नुकसान देखील होते, त्या शिक्षणामध्ये
देखील चारित्र्याचेही मूल्यांकन केले जाते. या ठिकाणी देखील चारित्र्य पाहिले जाते.
बाबा तर तुमच्या कल्याणासाठीच सांगतात. त्यातूनही रजिस्टर ठेवले जाते - अभ्यासाचे
आणि वर्तणुकीचे. इथे देखील मुलांना दैवी कॅरॅक्टर (दैवी चरित्र) बनवायचे आहे.
कोणतीही चूक होऊ नये, याची काळजी घ्यायची आहे. माझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही
ना? यासाठी कचेरी (सुनावणी) देखील करतात. इतर कोणत्याही स्कूल इत्यादी ठिकाणी
सुनावणी करण्याची पद्धत नाही. स्वतःच्या मनाला विचारायचे आहे. बाबांनी सांगितले आहे
मायेमुळे काही ना काही अवज्ञा होत राहतात. सुरुवातीला देखील कचेरी होत असे (मुलांनी
केलेल्या चुकांची सुनावणी बाबांसमोर केली जात असे). मुले खरे सांगत असत. बाबा
समजावून सांगत राहतात - जर खरे सांगितले नाही तर त्या चुका वाढत जातील. उलट जास्तच
चुकीचा दंड मिळेल. चूक न सांगितल्यामुळे मग नाफरमानबरदारीचा (अवज्ञाकारीचा) टीळा
लागतो. तर मग राजाईचा तिलक मिळू शकत नाही. आज्ञा मानत नाहीत, बेवफादार (अप्रामाणिक)
बनतात तर राजाई प्राप्त करू शकत नाहीत. सर्जन विविध प्रकारे समजावून सांगत राहतात.
सर्जन पासून जर आजार लपवाल तर पद देखील कमी होईल. सर्जनला सांगितल्याने मारणार तर
नाहीत ना. बाबा फक्त सांगतील - सावध व्हा. पुन्हा जर अशी चूक कराल तर नुकसान होईल.
खूप कमी पद मिळेल. तिथे तर नॅचरल दैवी वर्तन असेल. इथे पुरुषार्थ करायचा आहे.
वारंवार नापास व्हायचे नाही. बाबा म्हणतात - मुलांनो, जास्ती चुका करू नका. बाबा
खूप प्रेमाचा सागर आहेत. मुलांना देखील बनायचे आहे. यथा पिता तथा मुले. यथा
राजा-राणी तथा प्रजा. बाबा तर राजा बनत नाहीत. तुम्ही जाणता बाबा आपल्याला आप समान
बनवत आहेत. बाबांची जी महिमा आहे, ती तुमची देखील झाली पाहिजे. बाप समान बनायचे आहे.
माया खूप प्रबळ आहे, तुम्हाला रजिस्टर ठेवू देत नाही. मायेच्या जाळ्यामध्ये तर
पूर्णपणे अडकलेले आहात. मायेच्या जेलमधून बाहेर पडू शकत नाही. खरे सांगत नाही. तर
बाबा म्हणतात - ॲक्युरेट आठवणीचा चार्ट ठेवा. पहाटे उठून बाबांची आठवण करा.
बाबांचीच महिमा करा. बाबा, तुम्ही आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहात तर आम्ही तुमची
महिमा करणार. भक्तिमार्गामध्ये किती महिमा गातात, त्यांना तर काहीच ठाऊक नाहीये.
देवतांची महिमा नाही आहे. महिमा आहे तुम्हा ब्राह्मणांची. सर्वांना सद्गती देणारे
देखील एक बाबाच आहेत. ते क्रियेटर देखील आहेत, डायरेक्टर देखील आहेत. सेवा देखील
करतात आणि मुलांना समजावून सांगतात देखील. प्रॅक्टिकलमध्ये सांगत आहेत. ते (दुनियावाले)
तर फक्त शास्त्रांमधून भगवानुवाच ऐकत राहतात. गीता वाचत आले आहेत तर मग त्यापासून
काही मिळते का? किती प्रेमाने बसून वाचतात, भक्ती करतात समजत नाही की याद्वारे काय
होईल! हे जाणत नाहीत की आपण शिडी खालीच उतरत आहोत. दिवसें-दिवस तमोप्रधान बनायचेच
आहे. ड्रामामध्ये नोंदच अशी आहे. या शिडीचे रहस्य बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सांगू
शकणार नाही. शिवबाबाच ब्रह्माद्वारे समजावून सांगतात. हे (ब्रह्मा बाबा) देखील
यांच्याकडून (शिवबाबांकडून) समजून घेऊन मग तुम्हाला समजावून सांगतात. मुख्य मोठे
टीचर, मोठे सर्जन तर बाबाच आहेत. त्यांचीच आठवण करायची आहे. असे म्हणत नाहीत की,
ब्राह्मणीची आठवण करा. आठवण तर एकाचीच करायची आहे. कधीही कोणामध्ये मोह ठेवायचा नाही.
एका बाबांकडूनच शिकवण घ्यायची आहे. निर्मोही देखील बनायचे आहे. यासाठी खूप मेहनत
केली पाहिजे. संपूर्ण जुन्या दुनियेपासून वैराग्य. ही तर नष्ट झाल्यातच जमा आहे.
यामध्ये प्रेम किंवा आसक्ती अजिबात नको. किती मोठ-मोठी घरे इत्यादी बनवत राहतात.
त्यांना हे देखील माहित नाही की ही जुनी दुनिया बाकी किती वेळ आहे. तुम्ही मुले आता
जागे झाला आहात आणि इतरांनाही जागे करता. बाबा आत्म्यांनाच जागे करतात, वारंवार
सांगतात स्वतःला आत्मा समजा. शरीर समजता तर जसे झोपलेले आहात. स्वतःला आत्मा समजा
आणि बाबांची देखील आठवण करा. आत्मा पतित आहे तर शरीर देखील पतित मिळते. आत्मा पावन
तर शरीर देखील पावन मिळते.
बाबा म्हणतात -
तुम्हीच या देवी-देवता घराण्याचे होता. मग पुन्हा तुम्हीच बनाल. किती सोपे आहे. अशा
बेहदच्या बाबांची आपण का बरे आठवण करू नये. पहाटे उठून देखील बाबांची आठवण करा.
‘बाबा, तुमची तर कमाल आहे, तुम्ही आम्हाला किती श्रेष्ठ देवी-देवता बनवून मग
निर्वाणधाममध्ये जाऊन बसता. इतके श्रेष्ठ तर कोणी बनवूही शकणार नाही. तुम्ही किती
सोपे करून सांगता’. बाबा म्हणतात - जितका वेळ मिळेल, कामकाज करत असताना देखील
बाबांची आठवण करू शकता. बाबांची आठवणच तुमचा बेडा पार करणारी आहे अर्थात कलियुगातून
त्या पलीकडे शिवालयामध्ये घेऊन जाणारी आहे. शिवालयाची देखील आठवण करायची आहे,
शिवबाबांनी स्थापन केलेला स्वर्ग - तर दोन्हीची आठवण येते. शिवबाबांची आठवण केल्याने
आपण स्वर्गाचे मालक बनणार. हे शिक्षण आहेच नवीन दुनियेकरिता. बाबा देखील नवीन दुनिया
स्थापन करण्याकरिता येतात. जरूर बाबा येऊन कोणते तरी कर्तव्य करतील ना. तुम्ही बघत
देखील आहात की, मी ड्रामा प्लॅन अनुसार पार्ट बजावत आहे. तुम्हा मुलांना ५ हजार
वर्षांपूर्वीची आठवणीची यात्रा आणि आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगतो. तुम्ही जाणता दर
५ हजार वर्षानंतर बाबा आपल्या सन्मुख येतात. आत्माच बोलते, शरीर बोलणार नाही. बाबा
मुलांना शिकवण देतात - आत्म्यालाच प्युअर (पावन) बनायचे आहे. आत्म्याला एकदाच पावन
बनावे लागते. बाबा म्हणतात - मी अनेकदा तुम्हाला शिकवले आहे; तरीही पुढे पुन्हा
शिकवेन. असे कोणी संन्यासी म्हणू शकत नाही. बाबाच म्हणतात - मुलांनो, मी ड्रामा
प्लॅन अनुसार शिकवण्याकरिता आलो आहे. पुन्हा ५ हजार वर्षानंतर असेच येऊन शिकवेन, जसे
कल्पापूर्वी तुम्हाला शिकवून राजधानी स्थापन केली होती, अनेकदा तुम्हाला शिकवून
राजाई स्थापन केली आहे. या किती वंडरफुल गोष्टी बाबा सांगत आहेत. श्रीमत किती
श्रेष्ठ आहे. श्रीमताद्वारेच आपण विश्वाचे मालक बनतो. खूप-खूप उच्च पद आहे! कोणाला
मोठी लॉटरी लागते तर डोकेच फिरते. कोणी चालता-चालता हताश होतात की, आम्ही शिकू शकत
नाही. आम्ही विश्वाची राजाई कशी घेणार. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बाबा
म्हणतात - अतींद्रिय सुख आणि आनंदाच्या गोष्टी माझ्या मुलांना विचारा. तुम्ही जाता
सर्वांना आनंदाच्या गोष्टी सांगण्याकरिता. तुम्हीच विश्वाचे मालक होता आणि मग ८४
जन्म भोगून गुलाम बनला आहात. गायले देखील जाते - ‘मैं गुलाम, मैं गुलाम तेरा’.
समजतात की, स्वतःला नीच म्हणणे, लहान होऊन चालणे चांगले आहे. पाहा, बाबा कोण आहेत!
त्यांना कोणी जाणत नाहीत. त्यांना देखील केवळ तुम्हीच ओळखले आहे. बाबा कसे येऊन
सर्वांना बाळांनो-बाळांनो म्हणत समजावून सांगत आहेत. हा आत्मा आणि परमात्म्याचा मेळा
आहे. त्यांच्या द्वारे आपल्याला स्वर्गाची बादशाही मिळते. बाकी गंगा स्नान इत्यादी
केल्याने स्वर्गाची राजाई मिळत नाही. गंगा-स्नान तर अनेकदा केले आहे. तसे तर पाणी
समुद्रातून येते परंतु हा पाऊस कसा पडतो, याला देखील निसर्ग म्हणणार. यावेळी बाबा
तुम्हाला सर्व काही समजावून सांगतात. धारणा देखील आत्माच करते, ना की शरीर. तुम्ही
अनुभव करता बरोबर बाबांनी आपल्याला कोणापासून कोण बनवले आहे! आता बाबा म्हणतात -
मुलांनो, स्वतःवर दया करा. कोणती अवज्ञा करू नका. देह-अभिमानी बनू नका. फुकटचे आपले
पद कमी कराल. टीचर तर सांगतीलच ना. तुम्ही जाणता बाबा बेहदचे टीचर आहेत. दुनियेमध्ये
किती अनेक भाषा आहेत. जर काही प्रकाशित करत असाल तर ते सर्व भाषांमध्ये प्रकाशित
केले पाहिजे. कोणतेही लिटरेचर प्रकाशित करता तर सर्वांना एक-एक प्रत पाठवून द्या.
एक-एक प्रत लायब्ररीमध्ये पाठवली पाहिजे. खर्चाचा प्रश्नच नाही. बाबांचा भंडारा
भरपूर होईल. पैसा आपल्याकडे ठेवून काय करणार. घरी तर घेऊन जाणार नाही. जर काही घरी
घेऊन गेला तर परमात्म्याच्या यज्ञाची चोरी होईल. तोबा-तोबा, अशी बुद्धी चुकूनही
कोणाची नसावी. परमात्म्याच्या यज्ञाची चोरी! त्याच्यासारखा महान पाप आत्मा कुणी असू
शकत नाही. किती अधोगती होते. बाबा म्हणतात - हा सर्व ड्रामामध्ये पार्ट आहे. तुम्ही
राज्य कराल ते तुमचे नोकर (दास) बनतील. नोकरांशिवाय राज्य कसे चालणार! कल्पापूर्वी
देखील अशीच स्थापना झाली होती.
आता बाबा म्हणतात -
आपले कल्याण करू इच्छिता तर श्रीमतावर चाला. दैवी गुण धारण करा. क्रोध करणे दैवी
गुण नाही आहे. तो आसुरी गुण आहे. कोणी क्रोध केला तर त्याला गप्प करायचे आहे.
प्रत्युत्तर देता कामा नये. प्रत्येकाच्या वर्तनावरून समजू शकता, अवगुण तर
सर्वांमध्ये आहेत. जेव्हा कोणी क्रोध करतात तर त्यांचा चेहरा तांब्यासारखा लाल होतो.
मुखावाटे जणू बॉम्ब फेकतात. आपलेच नुकसान करतात. पद भ्रष्ट होईल. समज असणे आवश्यक
आहे. बाबा म्हणतात - जी पाप कर्म झाली आहेत, ती लिहून द्या. बाबांना सांगितल्याने
अर्धे माफ होईल. ओझे हलके होईल. जन्म-जन्मांतरा पासून तुम्ही विकारामध्ये जाऊ लागला
आहात. यावेळी तुम्ही कोणतेही पाप कर्म कराल तर शंभर पटीने वाढेल. बाबांसमोर चूक केली
तर शंभर पटीने दंड पडेल. केले असेल आणि सांगितले नाही तर जास्त वृद्धी होत जाईल.
बाबा तर समजावून सांगतील की, स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. बाबा मुलांची बुद्धी
सालिम (चांगली) बनविण्याकरिता आले आहेत. जाणतात हा कोणते पद प्राप्त करेल. ती देखील
२१ जन्मांची गोष्ट आहे. जी सेवाभावी मुले आहेत, त्यांचा स्वभाव अतिशय गोड असला
पाहिजे. काहीजण तर लगेच बाबांना सांगतात - बाबा, ही चूक झाली. बाबा खुश होतात.
भगवान खुश झाले तर अजून काय पाहिजे. हे तर पिता, टीचर, गुरु तिघेही आहेत. अन्यथा
तिघेही नाराज होतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) श्रीमतावर
चालून आपली बुद्धी सालिम (चांगली) ठेवायची आहे. कोणतीही अवज्ञा करायची नाही.
क्रोधामध्ये येऊन मुखावाटे बॉम्ब काढायचे नाहीत. गप्प रहायचे आहे.
२) मनापासून एका
बाबांची महिमा करायची आहे. या जुन्या दुनियेवर आसक्ती किंवा प्रेम करायचे नाही.
बेहदचे वैरागी आणि निर्मोही बनायचे आहे.
वरदान:-
आठवणीच्या
आधारा द्वारे मायेच्या कचऱ्यापासून दूर राहणारे सदा चिअरफुल भव
एखादी कोणत्याही
प्रकारची गोष्ट समोर आली तर फक्त बाबांवर सोडून द्या. अंतःकरणापासून म्हणा - “बाबा”.
तर ती गोष्ट नष्ट होईल. हा बाबा शब्द अंतःकरणापासून म्हणणे हीच मोठी जादू आहे. माया
सर्वात पहिली बाबांनाच विसरायला लावते त्यामुळे फक्त या गोष्टीवर लक्ष द्या तर
स्वतःला कमलपुष्प समान अनुभव कराल. आठवणीच्या आधारे मायेच्या समस्यांच्या
कचऱ्यापासून कायमचे दूर रहाल. कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये डगमगणार नाही, नेहमी एकच
मूड असेल - चिअरफुल.
बोधवाक्य:-
पवित्रतेच्या
धारणेला आणि धर्माला जीवनामध्ये उतरवणारेच महान आत्मा आहेत.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
स्वतःला बंधनांमधून
मुक्त करण्यासाठी आपल्या वर्तनाला आणि जे कठोर संस्कार आहेत त्यांना चेंज करा. अडचणी
आणणारे त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा. त्यांच्या कामाला पाहून घाबरू नका.
जितके ते आपले काम ताकतीने करत आहेत, तसेच तुम्ही तुमचे काम ताकतीने करा. त्यांचे
गुण उचला की ते आपले कर्तव्य कसे पार पाडत आहेत, तुम्ही देखील करा. स्वतःला
बंधनांमधून मुक्त करण्याची युक्ती रचा.