22-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही या डोळ्यांनी जे काही बघता ही सारी जुन्या दुनियेची सामग्री आहे, ही संपणार आहे, म्हणून या दुखःधामला बुद्धीने विसरून जा”

प्रश्न:-
मनुष्यांनी बाबांवर कोणता दोष लावला आहे परंतु तो दोष कुणाचाच नाही आहे?

उत्तर:-
इतका मोठा जो विनाश होतो, मनुष्य समजतात ईश्वरच करवून घेतो, दु:ख देखील तोच देतो, सुख देखील तोच देतो. हा खूप मोठा दोष लावला आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी सदा सुखदाता आहे, मी कोणालाही दु:ख देऊ शकत नाही. जर मी विनाश करविला तर सर्व पाप माझ्यावर येईल. ते तर सर्व ड्रामा अनुसार होते, मी काही करवून घेत नाही.

गीत:-
रात के राही...

ओम शांती।
मुलांना शिकविण्यासाठी कितीतरी सुंदर गाणी आहेत. गाण्याचा अर्थ काढल्याने मुलांची वाणी मोकळी होईल. मुलांच्या बुद्धीमध्ये तर आहेच की आपण सर्व दिवसाच्या यात्रेवर आहोत, रात्रीची यात्रा पूर्ण झाली. भक्तीमार्ग आहेच रात्रीची यात्रा. अंधारामध्ये धक्के खावे लागतात. अर्धा कल्प रात्रीची यात्रा करून उतरत आले आहात. आता आले आहात दिवसाच्या यात्रेवर. ही यात्रा एकदाच करता. तुम्ही जाणता आठवणीच्या यात्रेने आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून मग सतोप्रधान सतयुगाचे मालक बनतो. सतोप्रधान बनल्यामुळे सतयुगाचे मालक, तमोप्रधान बनल्याने कलियुगाचे मालक बनता. त्याला म्हटले जाते स्वर्ग, याला म्हटले जाते नरक. आता तुम्ही मुले बाबांची आठवण करता. बाबांकडून सुखच मिळते. जे जास्त काही बोलू शकत नाहीत त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा - शांतीधाम आहे आम्हा आत्म्यांचे घर, सुखधाम आहे स्वर्गाची बादशाही आणि आता हे आहे दुःखधाम, रावण राज्य. आता बाबा म्हणतात या दु:खधामला विसरून जा. जरी इथे राहता परंतु बुद्धीत हे रहावे की या डोळ्यांनी जे काही बघतो ते सर्व रावण राज्य आहे. या शरीरांना बघता, ही देखील सारी जुन्या दुनियेची सामग्री आहे. ही सारी सामग्री या यज्ञामध्ये स्वाहा होणार आहे. ते पतित ब्राह्मण लोक यज्ञ रचतात तर त्यात जव-तीळ इत्यादी सामग्री स्वाहा करतात. इथे तर विनाश होणार आहे. उच्च ते उच्च आहेत बाबा, नंतर आहेत ब्रह्मा आणि विष्णू. शंकराचा इतका काही पार्ट नाहीये. विनाश तर होणारच आहे. बाबा तर विनाश त्यांच्याकडून करवून घेतात ज्यांना काही पाप लागणार नाही. जर म्हटले - ईश्वर विनाश करवितो तर त्याच्यावर दोष येईल म्हणून हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. हा बेहदचा ड्रामा आहे, ज्याला कोणीही जाणत नाहीत. रचता आणि रचनेला कोणीही जाणत नाहीत. न जाणल्या कारणाने निधनके (अनाथ) बनले आहेत. कोणी धनी नाही आहे. एखाद्या घरामध्ये वडील नसतील आणि आपसात भांडत असतील तर म्हणतात तुमचा कोणी धनी नाहीये का! आता तर करोडो मनुष्य आहेत, यांचा कोणी धनी-धोणी (मालक) नाही आहे. देशा-देशामध्ये युद्ध करत राहतात. एकाच घरामध्ये मुले वडिलांशी, पती पत्नीशी भांडत राहतात. दुःखधाममध्ये आहेच अशांती. असे म्हणणार नाही ईश्वर पिता काही दु:ख रचतात. मनुष्य समजतात दुःख-सुख तर बाबाच देतात परंतु बाबा कधी दुःख देऊ शकत नाहीत. त्यांना म्हटलेच जाते सुख-दाता तर मग दुःख कसे बरे देतील. बाबा तर म्हणतात - मी तुम्हाला खूप सुखी बनवतो. एक तर स्वतःला आत्मा समजा. आत्मा आहे अविनाशी, शरीर आहे विनाशी. आम्हा आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण परमधाम आहे, ज्याला शांतीधाम देखील म्हटले जाते. हा शब्द ठीक आहे. स्वर्गाला परमधाम म्हणणार नाही. परम अर्थात परे ते परे. स्वर्ग तर इथेच असतो. मूलवतन आहे परे ते परे, जिथे आपण आत्मे राहतो. सुख दुःखाचा पार्ट तुम्ही इथे बजावता. हे जे म्हणतात - अमका स्वर्गवासी झाला. हे आहे एकदम चुकीचे. स्वर्ग काही इथे नाही आहे. आता तर आहे कलियुग. यावेळी तुम्ही आहात संगमयुगी, बाकी सर्व आहेत कलियुगी. एकाच घरामध्ये वडील कलियुगी तर मुलगा संगमयुगी. पत्नी संगमयुगी, पती कलियुगी... किती फरक होतो. पत्नी ज्ञान घेते, पती ज्ञान घेत नाही तर एकमेकांना साथ देत नाहीत. घरामध्ये कट-कट होते. पत्नी फूल बनते, तो काट्याचा काटाच राहून जातो. एकाच घरामध्ये मुलगा जाणतो आपण संगमयुगी पुरुषोत्तम पवित्र देवता बनत आहोत, परंतु वडील म्हणतात - शादी बरबादी करून नरकवासी बन. आता रूहानी बाबा म्हणतात - मुलांनो, पवित्र बना. आत्ताची पवित्रता २१ जन्म चालेल. हे रावण राज्यच नष्ट होणार आहे. ज्याच्याशी दुश्मनी असते तर त्याचा एफिजी (पुतळा) बनवून जाळतात ना. जसे रावणाला जाळतात. तर शत्रूविषयी किती तिरस्कार वाटला पाहिजे. परंतु हे कोणाला माहित नाही की रावण कोण आहे? खूपच खर्च करतात. मनुष्याला जाळण्यासाठी इतका खर्च करत नाहीत. स्वर्गामध्ये तर अशी कोणती गोष्ट असत नाही. तिथे तर शव विजेवर ठेवले आणि खलास. तिथे हा विचार नसतो की त्याची माती कामी येईल. तिथला तर रिती-रिवाज असा आहे जे कोणताही त्रास अथवा थकव्याची गोष्ट नसते. इतके सुख असते. तर आता बाबा समजावून सांगत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण करण्याचा पुरुषार्थ करा. हे आठवण करण्याचेच युद्ध आहे. बाबा मुलांना समजावून सांगत राहतात - ‘गोड मुलांनो, स्वतःवर सतर्क होऊन पहारा देत रहा. माया कुठे नाक-कान कापू नये कारण दुश्मन आहे ना. तुम्ही बाबांची आठवण करता आणि माया वादळासारखी उडवून लावते म्हणून बाबा म्हणतात - प्रत्येकाने संपूर्ण दिवसाचा चार्ट लिहिला पाहिजे की किती बाबांची आठवण केली? मन कुठे पळाले? डायरीमध्ये नोट करा, किती वेळ बाबांची आठवण केली? आपली तपासणी केली पाहिजे म्हणजे मग माया देखील बघेल हा तर चांगला बहादूर आहे, स्वतःवर नीट लक्ष ठेवतात. पूर्ण पहारा ठेवायचा आहे. आता तुम्हा मुलांना बाबा येऊन परिचय देतात. म्हणतात - भले घरदार सांभाळा फक्त बाबांची आठवण करा हे काही त्या संन्याशांसारखे नाही आहे. ते भिकेवर चालतात. तरीही कर्म तर करावेच लागते ना. तुम्ही त्यांनाही सांगू शकता की तुम्ही हठयोगी आहात, राजयोग शिकविणारा एक ईश्वरच आहे. आता तुम्ही मुले संगमावर आहात. या संगमयुगाचीच आठवण करावी लागेल. आम्ही आता संगमयुगावर सर्वोत्तम देवता बनतो. आम्ही उत्तम पुरुष अर्थात पूज्य देवता होतो, आता कनिष्ठ बनलो आहोत, काहीच कामाचे राहिलो नाही. आता आपण काय बनतो, मनुष्य ज्यावेळी बॅरिस्टरी इत्यादी शिकत असतात तेव्हा त्यांना पद मिळत नाही. परीक्षा पास केली आणि पदाची टोपी मिळाली. जाऊन सरकारी सर्विसला लागतील. आता तुम्ही जाणता आम्हाला उच्च ते उच्च ईश्वर शिकवत आहेत तर जरूर उच्च ते उच्च पद देखील देतील. हे एम ऑब्जेक्ट आहे. आता बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, मी जो आहे, जसा आहे, ते सर्व समजावून सांगितले आहे. आत्म्यांचा पिता मी बिंदू आहे, माझ्यामध्ये सर्व ज्ञान आहे, तुम्हाला देखील आधी हे ज्ञान थोडेच होते की, आत्मा बिंदू आहे. तिच्यामध्ये पूर्ण ८४ जन्मांचा पार्ट अविनाशी नोंदलेला आहे. ख्रिश्चन पार्ट बजावून गेले आहेत, परत जरूर येतील तर खरे ना. आता सर्व ख्रिश्चन जातील. क्राईस्टची आत्मा देखील आता तमोप्रधान असेल. जो कोणी उच्च ते उच्च धर्म स्थापक आहे, तो आता तमोप्रधान आहे. हे देखील म्हणतात मी अनेक जन्मांमधील अंतिम जन्मामध्ये तमोप्रधान बनलो, आता पुन्हा सतोप्रधान बनतो. तत् त्वम् (तसेच तुम्ही सुद्धा).

तुम्ही जाणता - आपण आता ब्राह्मण बनलो आहोत देवता बनण्यासाठी. विराट रूपाच्या चित्राचा अर्थ कोणीही जाणत नाही. आता तुम्ही मुले जाणता आत्मा स्वीट होममध्ये असते तेव्हा पवित्र आहे. इथे आल्याने पतित बनली आहे. तेव्हाच तर म्हणतात - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पवित्र बनवा म्हणजे आम्ही आपल्या घरी मुक्तिधाममध्ये जाऊ. हा पॉईंट देखील धारण करण्यासाठी आहे. मनुष्य जाणत नाहीत मुक्ती-जीवनमुक्तीधाम कशाला म्हटले जाते. मुक्तिधामला शांतीधाम म्हटले जाते. जीवन-मुक्तीधामाला सुखधाम म्हटले जाते. इथे आहे दुःखाचे बंधन. जीवन-मुक्तीला सुखाचा संबंध म्हणणार. आता दुःखाचे बंधन दूर होईल. आम्ही पुरुषार्थ करतो उच्च पद मिळविण्याकरिता. तर हा नशा असला पाहिजे. आम्ही आता श्रीमतावर आपले राज्य भाग्य स्थापन करत आहोत. जगत अंबा नंबर वनमध्ये जाते. आम्ही देखील त्यांना फॉलो करणार. जी मुले आता मात-पित्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवतात तेच भविष्यामध्ये तख्तनशीन बनतील. हृदयामध्ये स्थान ते मिळवतात जे रात्रं-दिवस सेवेमध्ये बिझी राहतात. सर्वांना संदेश द्यायचा आहे की, बाबांची आठवण करा. पैसे वगैरे काहीही घ्यायचे नाहीत. ते समजतात या राखी बांधण्यासाठी येतात, काही द्यावे लागेल. सांगा आम्हाला अजून काहीही नको फक्त पाच विकारांचे दान द्या. हे दान घेण्यासाठी आम्ही आलो आहोत म्हणून पवित्रतेची राखी बांधतो. बाबांची आठवण करा, पवित्र बना तर हे (देवता) बनाल. बाकी आम्ही पैसे काहीही घेऊ शकत नाही. आम्ही ते ब्राह्मण नाही आहोत. फक्त ५ विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल. आता कोणतीही कला राहिलेली नाही. सर्वांवर ग्रहण लागलेले आहे. तुम्ही ब्राह्मण आहात ना. जिथे पण जाल - बोला, ‘दे दान तो छूटे ग्रहण’. पवित्र बना. कधीही विकारामध्ये जाऊ नका. बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही फूल बनाल. तुम्हीच फूल होता मग काटे बनला आहात. ८४ जन्म घेता-घेता घसरतच आला आहात (पतितच होत आला आहात). आता परत जायचे आहे. बाबांनी डायरेक्शन दिले आहे यांच्याद्वारे (ब्रह्माबाबांद्वारे). ते (शिवबाबा) आहेत उच्च ते उच्च भगवान. त्यांना आपले शरीर नाही आहे. अच्छा, ब्रह्मा-विष्णू-शंकराला शरीर आहे? तुम्ही म्हणाल - हो, सूक्ष्म शरीर आहे. परंतु ती मनुष्यांची सृष्टी तर नाही आहे. खेळ सर्व इथे आहे. सूक्ष्मवतनमध्ये नाटक कसे चालेल? तसेही मूलवतनमध्ये देखील जर सूर्य-चंद्रच नाहीत तर नाटक देखील कशाचे असेल! हा खूप मोठा मंडप आहे. पुनर्जन्म देखील इथे होतो. सूक्ष्मवतनमध्ये होत नाही. आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व बेहदचा खेळ आहे. आता माहित झाले आहे की, आपण जे देवी-देवता होतो ते मग वाममार्गामध्ये कसे येतो. वाममार्ग विकारी मार्गाला म्हटले जाते. अर्धा कल्प आपण पवित्र होतो, आमचाच हरण्याचा आणि जिंकण्याचा खेळ आहे. भारत अविनाशी खंड आहे. हा कधी विनाश होत नाही. आदि सनातन देवी-देवता धर्म होता तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. तुमच्या या गोष्टींना मानतील तेच ज्यांनी कल्पापूर्वी मानले असेल. ५ हजार वर्षांहून जुनी कोणतीही गोष्ट असत नाही. सतयुगामध्ये मग तुम्ही पहिले जाऊन आपले महाल बनवाल. असे नाही की, स्वर्ण-द्वारका काही समुद्राच्या खाली आहे ती बाहेर निघून येईल. दाखवतात सागरातून देवता रत्नांच्या थाळ्या भरून देत होते. वास्तविक ज्ञान सागर बाबा आहेत जे तुम्हा मुलांना ज्ञान रत्नांच्या थाळ्या भरून देत आहेत. असे दाखवतात की, शंकराने पार्वतीला कथा ऐकवली. ज्ञान रत्नांनी झोळी भरली. शंकरासाठी म्हणतात - धोत्र्याची भांग पीत होता, मग त्यांच्यासमोर जाऊन म्हणतात झोळी भरा, आम्हाला धन द्या. तर बघा शंकराची देखील निंदा केली आहे. सर्वात जास्त निंदा करतात माझी. हा देखील खेळ आहे जो तरीही पुन्हा होणार. या नाटकाला कोणीही जाणत नाही. मी येऊन आदिपासून अंतापर्यंत सर्व रहस्य समजावून सांगतो. हे देखील जाणता उच्च ते उच्च बाबा आहेत. विष्णू सो ब्रह्मा, ब्रह्मा सो विष्णू कसे बनतात हे कोणी समजू शकणार नाही.

आता तुम्ही मुले पुरुषार्थ करता की आपण विष्णू कुळाचे बनावे. विष्णुपुरीचा मालक बनण्यासाठी तुम्ही ब्राह्मण बनला आहात. तुमच्या मनामध्ये आहे - आम्ही ब्राह्मण आपल्यासाठी सूर्यवंशी-चंद्रवंशी राजधानी स्थापन करत आहोत श्रीमतावर. यामध्ये युद्ध इत्यादीची काही गोष्ट नाही. देवतांचे आणि असुरांचे युद्ध कधीही होत नाही. देवता आहेत सतयुगामध्ये. तिथे युद्ध कसे होईल. आता तुम्ही ब्राह्मण योगबलाद्वारे विश्वाचे मालक बनता. बाहुबळवाले विनाशाला प्राप्त होतील. तुम्ही सायलेन्स बळाद्वारे सायन्सवर विजय प्राप्त करता. आता तुम्हाला आत्म-अभिमानी बनायचे आहे. आपण आत्मा आहोत, आपल्याला जायचे आहे आपल्या घरी. आत्मे अति वेगवान आहेत. आता असे एरोप्लेन काढले आहे जे एका तासात कुठल्या कुठे जाते. आता आत्मा तर त्यापेक्षाही वेगवान आहे. चुटकीसरशी आत्मा कुठल्या कुठे जाऊन जन्म घेते. कोणी विलायतमध्ये देखील जाऊन जन्म घेतात. आत्मा सर्वात वेगवान रॉकेट आहे. यामध्ये मशिनरी इत्यादीची काही गोष्ट नाही. शरीर सोडले आणि हा पळाला. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आपल्याला घरी जायचे आहे, पतित आत्मा तर जाऊ शकत नाही. तुम्ही पावन बनूनच जाल बाकी तर सर्व सजा भोगून जातील. सजा तर खूप मिळते. तिथे (स्वर्गामध्ये) तर गर्भ-महलामध्ये आरामात राहतात. मुलांनी साक्षात्कार केला आहे. कृष्णाचा जन्म कसा होतो, कोणती विकाराची गोष्ट नाही. एकदम जसा लखलखाट होतो. आता तुम्ही वैकुंठाचे मालक बनता तर असा पुरुषार्थ करायला हवा. खाणे-पिणे शुद्ध पवित्र असायला हवे. डाळ-भात सर्वात चांगले आहे. ऋषिकेशमध्ये संन्यासी एका खिडकीतून घेऊन निघून जातात; हो, कोणी कसे, कोणी कसे असतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वतःवर सतर्क होऊन संपूर्ण पहारा द्यायचा आहे. मायेपासून आपले रक्षण करायचे आहे. आठवणीचा खरा-खरा चार्ट ठेवायचा आहे.

२) मात-पित्याला फॉलो करून दिलतख्तनशीन बनायचे आहे. दिवस-रात्र सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे. सर्वांना संदेश द्यायचा आहे की, बाबांची आठवण करा. ५ विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल.

वरदान:-
सेन्स आणि इसेन्सच्या बॅलन्सद्वारा आपलेपणाला स्वाहा करणारे विश्व परिवर्तक भव सेन्स अर्थात ज्ञानाचे पॉईंट्स, समज आणि इसेन्स अर्थात सर्व शक्तीस्वरूप स्मृती आणि समर्थ स्वरूप. या दोन्हींचा बॅलन्स असेल तर आपलेपणा आणि जुनेपणा स्वाहा होईल. प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल आणि प्रत्येक कर्म विश्व परिवर्तनाच्या सेवेप्रती स्वाहा केल्याने स्वतः विश्व परिवर्तक बनाल. जे आपल्या देहाच्या स्मृती सहित स्वाहा होतात त्यांच्या श्रेष्ठ वायब्रेशन द्वारा वायुमंडळाचे सहज परिवर्तन होते.

बोधवाक्य:-
प्राप्तींची आठवण करा तर दुःख आणि त्रासदायक गोष्टींचा विसर पडेल.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- श्रेष्ठ कर्मांचे फाउंडेशन आहे “पवित्रता”. परंतु पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही. हे देखील श्रेष्ठ आहे परंतु मनसा संकल्पामध्ये देखील जर कोणा आत्म्याच्या प्रती विशेष लगाव किंवा झुकाव झाला, कोणा आत्म्याच्या विशेषतेवर प्रभावित झालात किंवा त्याच्या प्रती निगेटिव्ह संकल्प चालले, असे बोल अथवा शब्द निघाले जे मर्यादा पूर्वक नाहीत तर त्याला देखील पवित्रता म्हणणार नाही.