22-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमच्या शिक्षणाचे फाउंडेशन (पाया) आहे प्युरिटी, प्युरिटी असेल तर
योगाचे जौहर (शक्ती) भरू शकेल, योगाचे जौहर (योगाची ताकद) असेल तरच वाणीमध्ये शक्ती
येईल”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
आता कोणता प्रयत्न पूर्णपणे करायचा आहे?
उत्तर:-
डोक्यावर जे विकर्मांचे ओझे आहे त्याला काढून टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे.
बाबांचे बनून कोणतेही विकर्म केले तर खूप जोरात कोसळाल (पूर्णतः अध:पतन होईल). बी.के.
ची जर निंदा केली, कोणता त्रास दिला तर खूप पाप होईल. मग ज्ञान ऐकून किंवा सांगून
काहीच फायदा नाही.
ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत की, तुम्ही पतितापासून पावन बनून
पावन दुनियेचे मालक कसे बनू शकता! पावन दुनियेला स्वर्ग अथवा विष्णुपुरी,
लक्ष्मी-नारायणाचे राज्य म्हटले जाते. विष्णू अर्थात लक्ष्मी-नारायणाचे कंबाइंड
चित्र असे बनविले आहे, म्हणून समजावून सांगितले जाते. बाकी विष्णूची जेव्हा पूजा
करतात तेव्हा समजू शकत नाहीत की हे कोण आहेत? महालक्ष्मीची पूजा करतात परंतु समजत
नाहीत की हे कोण आहेत? बाबा आता तुम्हा मुलांना विविध पद्धतीने समजावून सांगतात.
चांगल्या रीतीने धारण करा. काही जणांच्या बुद्धीमध्ये असते की परमात्मा तर सर्व काही
जाणतात. आम्ही जे काही चांगले अथवा वाईट करतो ते सर्व जाणतात. आता याला अंधश्रद्धेचा
भाव म्हटले जाते. भगवान या गोष्टींना जाणतच नाहीत. तुम्ही मुले जाणता भगवान तर आहेत
पतितांना पावन बनविणारे. पावन बनवून स्वर्गाचा मालक बनवितात; मग जे चांगल्या रीतीने
शिकतील ते उच्च पद मिळवतील. बाकी असे समजायचे नाही आहे की बाबा सर्वांच्या मनातील
जाणतात. याला मग अज्ञानता म्हटले जाईल. मनुष्य जे कर्म करतात त्याचे फळ त्यांना
चांगले अथवा वाईट ड्रामा अनुसार मिळतेच. यामध्ये बाबांचे काहीही कनेक्शन (संबंध
सुद्धा) नाही. हा विचार कधीही करायचा नाही की, बाबा तर सर्व काही जाणतातच. असे
पुष्कळ आहेत जे विकारामध्ये जातात, पाप करत राहतात आणि मग इथे अथवा सेंटरवर येतात.
असे समजतात की, बाबा तर जाणतात. परंतु बाबा म्हणतात - ‘मी हा धंदाच करत नाही’. ‘जानी-जाननहार’,
हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. तुम्ही बाबांना बोलावता की येऊन पतितापासून पावन बनवा,
स्वर्गाचा मालक बनवा कारण जन्म-जन्मांतरीची पापे डोक्यावर खूप आहेत. या जन्माची
देखील आहेत. या जन्मातील पापे सांगतात देखील. खूप जणांनी अशी पापे केली आहेत
ज्यामुळे पावन बनणे खूप अवघड वाटते. मुख्य गोष्ट आहेच पावन बनण्याची. शिक्षण तर खूप
सोपे आहे, परंतु विकर्मांचे ओझे कसे उतरवायचे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे बरेच
जण आहेत, जे अथाह पाप करतात, खूप डिस-सर्व्हिस करतात. बी. कें. च्या आश्रमाला त्रास
देण्याचा प्रयत्न करतात. याचे खूप पाप चढते. हे पाप इत्यादी काही ज्ञान दिल्याने
नष्ट होऊ शकत नाही. पापे नष्ट होतील केवळ योगाद्वारेच. आधी तर योगाचा पूर्ण
पुरुषार्थ केला पाहिजे, तेव्हा कोणाला तीर देखील लागू शकेल (हे ज्ञान काळजाला भिडू
शकेल). आधी पवित्र बना, योगबल भरा तेव्हा वाणीमध्ये देखील जौहर (ताकत) भरेल. नाहीतर
भले कोणाला कितीही समजावून सांगाल तरीही कोणाच्या बुद्धीला पटणार नाही, तीर लागणार
नाही. जन्म-जन्मांतरीची पापे आहेत ना. आता जी पापे करतात, ती तर जन्म-जन्मांतरीच्या
पापांपेक्षाही खूप भारी असतात. म्हणून गायले जाते - ‘सद्गुरु के निंदक…’ हे सत बाबा,
सत टीचर, सद्गुरु आहेत. बाबा म्हणतात - बी. के. ची निंदा करणाऱ्याचे देखील पाप खूप
मोठे ओझे आहे. आधी स्वतः तर पावन बना. दुसऱ्यांना हे ज्ञान समजावून सांगण्याची खूप
हौस असते आणि योग मात्र पैशाचा सुद्धा नाही, मग त्याचा उपयोगच काय? बाबा म्हणतात -
मुख्य गोष्ट आहेच आठवणीद्वारे पावन बनण्याची. बोलावतात देखील पावन बनण्यासाठी.
भक्तीमार्गामध्ये एक सवय लागली आहे, कष्ट सहन करण्याची, फालतू आवाज करण्याची.
प्रार्थना करतात परंतु भगवंताला कान कुठे आहेत, काना शिवाय, तोंडा शिवाय, ऐकणार तरी
कसे, आणि बोलणार तरी कसे? ते तर अव्यक्त आहेत. ही सर्व आहे अंधश्रद्धा.
तुम्ही बाबांची जितकी
आठवण कराल तितकी पापे भस्म होतील. असे नाही की बाबा जाणतात की, हा खूप आठवण करतो,
हा कमी आठवण करतो, हे तर आपला चार्ट आपल्यालाच बघायचा आहे. बाबांनी सांगितले आहे
आठवणीद्वारेच तुमची विकर्म विनाश होतील. बाबा देखील तुम्हालाच विचारतात की किती
आठवण करता? वर्तनावरून देखील माहित होते. आठवणी शिवाय पापे नष्ट होऊ शकत नाहीत. असे
नाही की, कोणाला ज्ञान ऐकवता तर त्याने तुमची किंवा त्यांची पापे नष्ट होतील. नाही,
जेव्हा स्वतः आठवण कराल तेव्हा पापे नष्ट होतील. मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची.
बाबा म्हणतात - माझे बनला आहात तर कोणतेही पाप करू नका. नाहीतर खूप जोराने कोसळाल.
अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही की आपण चांगले पद मिळवू शकू. प्रदर्शनीमध्ये खूप जणांना
समजावून सांगतात तर बस्स खुश होतात, आपण खूप सेवा केली. परंतु बाबा म्हणतात - आधी
तुम्ही तर पावन बना. बाबांची आठवण करा. खूप जण आठवणीमध्ये फेल होतात. ज्ञान तर खूप
सोपे आहे, फक्त ८४ जन्मांच्या चक्राला जाणून घ्यायचे आहे; त्या (लौकिक) शिक्षणामध्ये
किती गणित शिकतात, मेहनत करतात. कमावणार काय? शिकता-शिकता मृत्यू झाला तर शिक्षणच
संपते. तुम्ही मुले तर जितके आठवणीमध्ये रहाल तितकी धारणा होईल. पवित्र बनला नाहीत,
पापे भस्म केली नाहीत तर खूप सजा भोगावी लागेल. असे नाही की, आमची आठवण तर
बाबांपर्यंत पोहोचतेच. बाबा काय करतील! तुम्ही आठवण कराल तर तुम्ही पावन बनाल,
यामध्ये बाबा काय करणार, काय शाब्बासकी देणार! अशी खूप मुले आहेत जी म्हणतात - आम्ही
तर सदैव बाबांची आठवण करतच असतो, त्यांच्या शिवाय आमचे आहेच कोण? या देखील थापा
मारत राहतात. आठवणीमध्ये तर खूप मेहनत आहे. आपण आठवण करतो का नाही, हे देखील समजू
शकत नाहीत. अजाणतेपणी म्हणतात - आम्ही तर आठवण करतोच. मेहनती शिवाय कोणी थोडाच
विश्वाचा मालक बनू शकेल. उच्च पद मिळवू शकत नाही. आठवणीचे जौहर (आठवणीची ताकद)
जेव्हा भराल तेव्हाच सेवा करू शकाल. मग बघितले जाईल किती सेवा करून प्रजा बनवली.
हिशोब पाहिजे ना. आपण किती जणांना आप समान बनवतो. प्रजा बनवावी लागेल ना, तेव्हा
राजाई पद मिळवू शकाल. ती तर अजून काहीच नाही आहे. योगमध्ये राहून, जौहर भरेल तेव्हा
कोणाला पूर्ण तीर लागेल. शास्त्रांमध्ये देखील आहे ना - शेवटी भीष्मपितामह,
द्रोणाचार्य इत्यादींना ज्ञान दिले. जेव्हा तुमचा पतितपणा जावून सतोप्रधानते पर्यंत
आत्मा येते तेव्हा जौहर भरते (ताकद भरते) आणि तेव्हाच लगेच तीर लागतो. असा कधीही
विचार करू नका की बाबा तर सर्व काही जाणतात. बाबांना जाणण्याची काय आवश्यकता आहे,
जे कराल तेच मिळणार. बाबा साक्षी होऊन बघत राहतात. बाबांना लिहितात - ‘आम्ही अमक्या
ठिकाणी जाऊन सेवा केली’, बाबा विचारतील - पहिले तुम्ही आठवणीच्या यात्रेवर तत्पर
आहात? पहिली गोष्टच ही आहे - ‘और संग तोड़ एक बाप संग जोड़ो’. देही-अभिमानी बनावे
लागेल. घरी राहून देखील असे समजायचे आहे - ही तर जुनी दुनिया, जुना देह आहे. हे
सर्व नष्ट होणार आहे. आपले काम आहे बाबा आणि वारशा सोबत. बाबा असे म्हणत नाहीत की
गृहस्थ व्यवहारामध्ये राहू नका, कोणाशी बोलू नका. बाबांना विचारतात - ‘लग्नाला जाऊ?’
बाबा म्हणतात - ‘भले जा’. तिथे देखील जाऊन सेवा करा. बुद्धीचा योग शिवबाबांसोबत
असावा. जन्म-जन्मांतरीची विकर्म आठवणीच्या बळानेच भस्म होतील. इथे देखील जर विकर्म
करत असाल तर खूप सजा भोगावी लागेल. पावन बनता-बनता विकारामध्ये कोसळला तर मेलाच.
एकदम तुकडे-तुकडे होतात. श्रीमतावर न चालल्याने खूप नुकसान करतात. पावला-पावलावर
श्रीमत पाहिजे. अशी काही पापे करतात ज्यामुळे योग लागू शकत नाही. आठवण करू शकत नाही.
कोणाला जाऊन म्हणाले - ‘भगवान आलेले आहेत, त्यांच्याकडून वारसा घ्या’, तर ते मानणार
नाहीत. तीर लागणार नाही. बाबांनी सांगितले आहे भक्तांना ज्ञान ऐकवा, व्यर्थ कोणालाही
देऊ नका, नाहीतर आणखीनच निंदा करतील.
किती तरी मुले बाबांना
विचारतात - ‘बाबा, आम्हाला दान करण्याची सवय आहे, आता तर ज्ञानामध्ये आलो आहे, आता
काय करायचे? बाबा सल्ला देतात - ‘मुलांनो, गरिबांना दान देणारे तर खूप आहेत. गरीब
काही उपाशी मरत नाहीत, फकीरांकडे तर खूप पैसे पडून असतात म्हणून या सर्व
गोष्टींमधून बुद्धी काढून टाकली पाहिजे. दान इत्यादी करताना देखील खूप काळजी घेतली
पाहिजे. खूप जण अशी काही कामे करतात, काही विचारू नका आणि मग स्वतः समजत देखील
नाहीत की आपल्या डोक्यावर खूप मोठे ओझे वाढत जात आहे. ज्ञान मार्ग काही हंसीकुडीचा
(मजा करण्याचा) मार्ग नाहीये. बाबांसोबत तर मग धर्मराज देखील आहे. धर्मराजाकडून
खूप-खूप फटके खावे लागतात. असे म्हणतात ना - जेव्हा शेवटी धर्मराज हिशोब घेईल
तेव्हाच कळेल. जन्मजन्मांतरीच्या सजा भोगण्यामध्ये काही वेळ लागत नाही. बाबांनी
‘काशीकलवट’चे देखील उदाहरण दिले आहे. तो आहे भक्तीमार्ग, हा आहे ज्ञानमार्ग.
मनुष्यांचा देखील बळी चढवतात, याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. या सर्व गोष्टींना
समजून घ्यायचे आहे, असे नाही की, हा ड्रामा बनवलाच का? चक्रामध्ये आणलेच का?
चक्रामध्ये तर येतच राहणार. हा तर अनादी ड्रामा आहे ना. चक्रामध्ये आला नाहीत तर मग
दुनियाच राहणार नाही. मोक्ष तर होत नाही. मुख्य असणाऱ्याचा देखील मोक्ष होऊ शकत नाही.
५००० वर्षानंतर देखील पुन्हा तुम्ही असेच चक्र फिरणार. हा तर ड्रामा आहे ना. फक्त
कोणाला समजावून सांगितल्याने, वाणी चालविल्याने पद मिळणार नाही, आधी तर पतिता पासून
पावन बनायचे आहे. असे नाही बाबा तर सर्व जाणतात. बाबा जाणून तरी काय करतील, आधी तर
तुमची आत्मा जाणते श्रीमतावर आपण काय करत आहोत, कितपत बाबांची आठवण करतो? बाकी बाबा
बसून हे जाणतील, याने फायदाच काय? तुम्ही जे काय करता तेच तुम्ही मिळवणार. बाबा
तुमच्या ॲक्टवरून (वर्तनावरून) आणि सेवेवरून जाणतात - हा मुलगा चांगली सेवा करतो.
अमक्याने बाबांचे बनवून मग खूप विकर्म केली आहेत तर त्याच्या मुरलीमध्ये जौहर (ती
ताकद) भरू शकत नाही. ही ज्ञान तलवार आहे. त्यामध्ये आठवणीच्या बळाची ताकद पाहिजे.
योगबलाने तुम्ही विश्वावर विजय प्राप्त करता, बाकी ज्ञानाने तुम्ही नवीन दुनियेमध्ये
उच्च पद मिळवाल. आधी तर पवित्र बनायचे आहे, पवित्र बनल्याशिवाय उच्च पद मिळू शकत
नाही. इथे येतात नरापासून नारायण बनण्यासाठी. पतित थोडेच नरापासून नारायण बनतील.
पावन बनण्यासाठी व्यवस्थित युक्ती वापरली पाहिजे. अनन्य मुले जी सेंटर्स सांभाळतात
त्यांना देखील खूप मेहनत करावी लागेल, इतकी मेहनत करत नाहीत म्हणून ती ताकद भरली
जात नाही, तीर लागत नाही, आठवणीची यात्रा आहे कुठे! फक्त प्रदर्शनीमध्ये खूप जणांना
समजावून सांगतात, आधी आठवणीने पवित्र बनायचे आहे नंतर मग आहे - ज्ञान. पावन बनाल तर
ज्ञानाची धारणा होईल. पतिताला धारणा होणार नाही. मुख्य सब्जेक्ट आहे - आठवणीचा. त्या
शिक्षणामध्ये देखील सब्जेक्ट असतात ना. तुमच्याकडे देखील भले बी. के. बनतात परंतु
ब्रह्माकुमार-कुमारी, भाऊ-बहीण बनणे काही मावशीचे घर नाहीये (इतके सोपे नाही). फक्त
नावापुरते बनायचे नाही. देवता बनण्यासाठी पहिले पवित्र जरूर बनायचे आहे. नंतर मग आहे
अभ्यास. फक्त अभ्यास असेल आणि पवित्र बनला नाहीत तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही.
आत्मा पवित्र पाहिजे. पवित्र बनाल तेव्हाच पवित्र दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त करू
शकाल. बाबा पवित्रतेवरच जोर देतात. पवित्रता असल्याशिवाय तुम्ही कोणालाही ज्ञान देऊ
शकणार नाही. बाकी बाबा बघत काहीच नाहीत. स्वतः बसले आहेत ना, सर्व गोष्टी समजावून
सांगतात. भक्तीमार्गामध्ये भावनेचे भाडे मिळते. त्याचे देखील ड्रामामध्ये नोंदलेले
आहे, शरीराशिवाय बाबा बोलतील कसे? ऐकतील कसे? आत्म्याला शरीर आहे तेव्हाच तर ऐकते,
बोलते. बाबा म्हणतात मला कर्मेंद्रियेच नाहीत (देहच नाही) तर ऐकू कसे, आणि कसे जाणू
शकेन? असे समजतात की, बाबा तर जाणतात, आम्ही विकारामध्ये जातो; जर जाणत नसतील तर
त्यांना भगवान मानणारच नाही. असे देखील खूप असतात. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे
तुम्हाला पावन बनविण्याचा रस्ता सांगण्याकरिता. साक्षी होऊन बघतो. मुलांच्या
वर्तनावरून माहिती होते - हा कपूत आहे का सपूत आहे? सेवेचा देखील पुरावा पाहिजे ना.
हे देखील जाणता - जो करतो तो मिळवितो. श्रीमतावर चालेल तर श्रेष्ठ बनेल. नाही चालला
तर आपणच घाणेरडा (विकारी) बनून मग कोसळेल. कोणतीही गोष्ट असेल तर स्पष्टपणे विचारा.
अंधश्रद्धेचा प्रश्नच नाही. बाबा फक्त म्हणतात - आठवणीची ताकद नसेल तर पावन कसे
बनणार? या जन्मामध्ये देखील अशी काही पापे करतात काही विचारू नका. ही आहेच पाप
आत्म्यांची दुनिया, सतयुग आहे पुण्य आत्म्यांची दुनिया. हा आहे संगम. कोणी तर डल
हेड (मठ्ठ) असेल तर धारणा करू शकणार नाहीत. बाबांची आठवण करू शकणार नाहीत. मग टू
लेट (अति उशीर) होईल, भंभोरला (दुनियेला) आग लागेल मग योगामध्ये देखील राहू शकणार
नाही. त्या वेळेस तर हाहाकार माजेल. खूप दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत. याचीच चिंता
लागून राहिली पाहिजे की आपण आपले राज्य-भाग्य तर बाबांकडून घ्यावे. देह-अभिमान
सोडून सेवेमध्ये रुजू झाले पाहिजे. कल्याणकारी बनायचे आहे. धन व्यर्थ घालवायचे नाही.
जो लायकच नाही अशा पतिताला कधीही दान देता कामा नये, नाहीतर दान देणाऱ्यावर देखील
येते. असे नाही की दवंडी पिटवायची आहे की, भगवान आले आहेत. असे स्वतःला भगवान
म्हणवून घेणारे भारतामध्ये भरपूर आहेत. कोणीही मानणार नाही. हे तुम्ही जाणता
तुम्हाला प्रकाश मिळाला आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अभ्यासा
सोबतच पवित्र जरूर बनायचे आहे. असा लायक अथवा सपूत मुलगा बनून सेवेचा पुरावा द्यायचा
आहे. श्रीमतावर स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे.
२) स्थूल धन देखील
व्यर्थ घालवायचे नाही. पतितांना दान करायचे नाही. ज्ञान धन देखील पात्र असणाऱ्याला
पाहूनच द्यायचे आहे.
वरदान:-
जुन्या
संस्कारांचा अग्निसंस्कार करणारे खरे मरजीवा भव
जसे मृत्यू
झाल्यानंतर शरीराचे संस्कार करतात (दफन करतात) तर मग नाव, रूप समाप्त होते; तशी
तुम्ही मुले जेव्हा मरजीवा बनता तेव्हा भले शरीर तेच आहे परंतु जुने संस्कार, स्मृति
अथवा स्वभावाचा संस्कार करता. संस्कार केलेला मनुष्य परत समोर आला तर त्याला भूत
म्हटले जाते. असे इथे देखील जर कोणते संस्कार केलेले संस्कार जागृत होतात तर ही
देखील मायेची भूते आहेत. या भूतांना पळवून लावा, याचे वर्णन देखील करू नका.
बोधवाक्य:-
कर्म भोगाचे
वर्णन करण्याऐवजी, कर्मयोगाच्या स्थितीचे वर्णन करत रहा.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
जसे राजा स्वतः
कोणतेही कार्य करत नाही, तर करवून घेतो. करणारे राज्य कारभारी वेगळे असतात. जेव्हा
राज्य कारभारी ठीक नसतात तेव्हा राज्य डळमळीत होते. अशीच आत्मा देखील करावनहार आहे,
करनहार या विशेष त्रिमूर्ती शक्ती (मन-बुद्धी आणि संस्कार) आहेत. आधी यांच्यावर
रुलिंग पॉवर असावी तेव्हा ही साकार कर्मेंद्रिये आपणच योग्य रस्त्यावर चालतील.