22-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - तुम्हाला शिकवण्यासाठी कोण आले आहेत, जरा विचार कराल तर आनंदामध्ये रोमांच उभे राहतील, उच्च ते उच्च बाबा शिकवत आहेत, असे शिक्षण कधीही सोडून द्यायचे नाही”

प्रश्न:-
आता तुम्हा मुलांना कोणता निश्चय झाला आहे? निश्चय-बुद्धीचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
तुम्हाला निश्चय झाला आहे की आपण आता असे शिक्षण शिकत आहोत, ज्यामुळे डबल मुकुटधारी राजांचेही राजा बनणार. स्वतः भगवान शिकवून आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत. आता आपण त्यांची संतान बनलो आहोत तर मग हा अभ्यास करायला लागायचे आहे. जशी छोटी मुले आपल्या आई-वडीलांशिवाय इतर कोणाकडेच जात नाहीत. तसे बेहदचे बाबा मिळाले आहेत तर तुम्हाला दुसरे कोणीही आवडता कामा नये. एकाचीच आठवण रहावी.

गीत:-
कौन आया आज सवेरे सवेरे…

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी गाणे ऐकले - कोण आले आहे आणि कोण शिकवत आहे? ही समजून घेण्याची गोष्ट आहे. कोणी खूप हुशार असतात, कोणी कमी हुशार असतात. जो जास्त शिकलेला असतो, त्याला हुशार म्हणणार. जे शास्त्र इत्यादीचे शिक्षण घेतलेले असतात, त्यांचा आदर केला जातो. कमी शिकलेल्याला कमी आदर मिळतो. आता गाण्याचे शब्द ऐकले - कोण आले आहेत शिकवण्यासाठी! टीचर येतात ना. स्कूलमध्ये शिकणारे जाणतात टीचर आले. इथे कोण आले आहेत? एकदम रोमांच उभे राहिले पाहिजेत. उच्च ते उच्च बाबा पुन्हा शिकविण्यासाठी आले आहेत. समजून घेण्याची गोष्ट आहे ना. भाग्याची देखील गोष्ट आहे. शिकविणारे कोण आहेत? भगवान. ते येऊन शिकवतात. विवेक सांगतो - भले कोणी कितीही मोठ्यात मोठे शिक्षण शिकत असेल, एका झटक्यात ते शिक्षण सोडून येऊन भगवंताकडून शिकावे. एका सेकंदामध्ये सर्व काही सोडून बाबांकडे शिकण्यासाठी यावे.

बाबांनी समजावून सांगितले आहे - आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी बनला आहात. उत्तम ते उत्तम पुरुष आहेत हे लक्ष्मी-नारायण. दुनियेमध्ये कोणालाच ठाऊक नाही आहे की कोणत्या शिक्षणाने यांनी हे पद प्राप्त केले. तुम्ही शिकता - हे पद प्राप्त करण्यासाठी. कोण शिकवतात? भगवान. तर बाकीचे सर्व शिक्षण सोडून या शिक्षणामध्ये रुजू झाले पाहिजे कारण बाबा येतातच कल्पानंतर. बाबा म्हणतात - मी दर ५ हजार वर्षानंतर येतो सन्मुख शिकविण्याकरिता. वंडर आहे ना. असे म्हणतात देखील - भगवान आम्हाला शिकवत आहेत, हे पद प्राप्त करण्यासाठी. तरी देखील शिकत नाहीत. तर बाबा म्हणतील ना - हा शहाणा नाहीये. बाबांच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देत नाही. बाबांना विसरून जातात. तुम्ही म्हणता की ‘बाबा, आम्ही विसरतो’. टीचरला देखील विसरून जातात. ही आहेत मायेची वादळे. परंतु अभ्यास तर केला पाहिजे ना. विवेक म्हणतो भगवान शिकवत आहेत तर ताबडतोब त्या अभ्यासाला लागले पाहिजे. छोट्या मुलांनाच शिकायचे असते. आत्मा तर सर्वांची आहे. बाकी शरीर लहान-मोठे असते. आत्मा म्हणते मी तुमचा छोटा मुलगा बनलो आहे. अच्छा माझे बनला आहात तर आता शिका. दूध-पिती मुले तर नाही आहात. आधी शिक्षण. यावर खूप लक्ष द्यायचे आहे. स्टुडंट्स परत मग इथे सुप्रीम टीचरकडे येतात. ते शिकविणारे टीचर्स (टीचर्स बहिणी) देखील नियुक्त आहेत. तरी देखील सुप्रीम टीचर तर आहेत ना. ७ दिवसांची भट्टी देखील गायली गेली आहे. बाबा म्हणतात - पवित्र रहा आणि माझी आठवण करा. दैवी गुण धारण कराल तर तुम्ही असे बनाल. बेहदच्या बाबांची आठवण करावी लागेल. छोट्या मुलांना आई-वडीलांशिवाय दुसऱ्या कोणी घेतले तर त्यांच्याकडे जात नाहीत. तुम्ही देखील बेहदच्या बाबांचे बनले आहात तर दुसऱ्या कोणालाही बघणे आवडणार देखील नाही, मग तो कोणीही असेल. तुम्ही जाणता आपण उच्च ते उच्च बाबांचे आहोत. ते आम्हाला डबल सिरताज राजांचाही राजा बनवतात. लाईटचा मुकुट - मनमनाभव, रत्नजडित मुकुट - मध्याजीभव. निश्चय होतो आपण या शिक्षणाने विश्वाचे मालक बनतो, ५००० वर्षानंतर हिस्ट्री रिपीट होते ना. तुम्हाला राजाई मिळते. बाकी सर्व आत्मे शांतीधामला आपल्या घरी निघून जातात, आता तुम्हा मुलांना माहिती झाले आहे - वास्तविक आपण आत्मे बाबांसोबत आपल्या घरी राहतो. बाबांचे बनल्यामुळे आता तुम्ही स्वर्गाचे मालक बनता आणि मग बाबांना विसरून अनाथ बनता. भारत या वेळी अनाथ आहे. अनाथ त्यांना म्हटले जाते ज्यांचे आई-वडील नसतात. त्रास सहन करत राहतात. तुम्हाला तर आता बाबा मिळाले आहेत, तुम्ही साऱ्या सृष्टी चक्राला जाणता तर आनंदाने गदगद झाले पाहिजे. आपण बेहदच्या बाबांची मुले आहोत. परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारे नवीन सृष्टी ब्राह्मणांची रचतात. ही तर खूप सोपी समजून घेण्याची गोष्ट. तुमची चित्रे देखील आहेत, विराट रूपाचे चित्र देखील बनवले आहे. ८४ जन्मांची कहाणी दाखवली आहे. हम सो देवता मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतो. हे कोणताही मनुष्य जाणत नाही कारण ब्राह्मण आणि ब्राह्मणांना शिकविणाऱ्या बाबांचे, दोघांचेही नामोनिशाण गायब केले आहे. इंग्रजीमध्ये देखील तुम्ही लोक चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. जे इंग्रजी जाणतात त्यांनी मग ट्रान्सलेशन करून मग समजावून सांगितले पाहिजे. फादर नॉलेजफुल आहेत, त्यांनाच हे नॉलेज आहे की सृष्टीचे चक्र कसे फिरते. हा आहे अभ्यास. ‘योग’ला देखील बाबांची आठवण म्हटले जाते, ज्याला इंग्रजीमध्ये कम्यूनियन (मिलाफ) म्हटले जाते. बाबांसोबत मिलाफ, टीचर सोबत मिलाफ, गुरु सोबत मिलाफ. हा आहे गॉडफादर सोबत मिलाफ. स्वतः बाबा म्हणतात - माझी आठवण करा इतर कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. मनुष्य गुरु इत्यादी करतात, शास्त्र वाचतात. एम ऑब्जेक्ट काहीच नाही. सद्गती तर होत नाही. बाबा तर म्हणतात - मी आलो आहे सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. आता तुम्हाला बाबांसोबत बुद्धीचा योग ठेवायचा आहे, तेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल. चांगल्या रीतीने आठवण केल्यामुळे विश्वाचे मालक बनाल. हे लक्ष्मी-नारायण पॅराडाइजचे मालक होते ना. हे समजावून सांगणारे कोण आहेत. बाबांना म्हटले जाते नॉलेजफुल. मनुष्य मग म्हणतात अंतर्यामी. वास्तविक अंतर्यामी असा शब्दच नाही आहे. आतमध्ये राहणारी, निवास करणारी तर आत्मा आहे. आत्मा जी काम करते, तिला तर सर्व जाणतात. सर्व मनुष्य अंतर्यामी आहेत. आत्माच शिकते. बाबा तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी बनवितात. तुम्ही आत्मे आहात मूलवतनचे रहिवासी. तुम्ही आत्मे किती छोटे (सूक्ष्म) आहात. तुम्ही अनेकदा पार्ट बजावण्यासाठी आला आहात. बाबा म्हणतात मी बिंदू आहे. माझी पूजा काही करू शकत नाही. कशाला करतील, आवश्यकताच नाही. मी तुम्हा आत्म्यांना शिकविण्यासाठी येतो. तुम्हालाच राजाई देतो मग रावण राज्यामध्ये जाता तर मग मलाच विसरून जाता. सर्वप्रथम आत्मा येते पार्ट बजावण्यासाठी. मनुष्य म्हणतात ८४ लाख जन्म घेतात. परंतु बाबा म्हणतात - जास्तीतजास्त आहेतच मुळी ८४ जन्म. परदेशात जाऊन या गोष्टी ऐकवतील तर त्यांना म्हणतील हे नॉलेज तर आम्हाला इथे बसून शिकवा. तुम्हाला तिथे हजार रुपये मिळतात, आम्ही तुम्हाला दहा-वीस हजार रुपये देऊ. आम्हाला देखील नॉलेज ऐकवा. गॉडफादर आम्हा आत्म्यांना शिकवतात. आत्माच जज इत्यादी बनते. बाकी मनुष्य तर सर्व आहेत देह-अभिमानी. कोणालाच ज्ञान नाही आहे. भले मोठ-मोठे फिलॉसॉफर (तत्वज्ञानी) इत्यादी पुष्कळ आहेत, परंतु हे नॉलेज कोणालाच नाही आहे. गॉडफादर निराकार शिकविण्यासाठी येतात. आपण त्यांच्याकडून शिकतो, या गोष्टी ऐकून चक्रावून जातील. या गोष्टी तर कधीही ऐकल्या-वाचलेल्या नाहीत. एका बाबांनाच म्हणता - लिबरेटर, गाईड जेव्हा की ते लिबरेटर आहेत तर मग क्राइस्टची आठवण का करता? या गोष्टी चांगल्या रीतीने समजावून सांगा तर ते चक्रावून जातील. म्हणतील - हे आधी आम्ही ऐकूया तर खरे. पॅराडाईजची स्थापना होत आहे, त्यासाठीच ही महाभारत लढाई देखील आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला राजांचाही राजा डबल मुकुटधारी बनवतो. प्युरिटी, पीस, प्रोस्पेरिटी (पवित्रता, शांती, समृद्धी) सर्व काही होते. विचार करा, किती वर्षे झाली? क्राईस्टच्या ३००० वर्षांपूर्वी यांचे राज्य होते ना. ते म्हणतील हे तर स्पिरिचुअल नॉलेज आहे. हा (ब्रह्मा) तर डायरेक्ट त्या सुप्रीम फादरचा मुलगा आहे, त्यांच्याकडून राजयोग शिकत आहे. जगाचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, हे सर्व नॉलेज आहे. आपल्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. या योगाच्या शक्तीद्वारे आत्मा सतोप्रधान बनून गोल्डन एज्डमध्ये जाईल, मग त्यांच्यासाठी राज्य पाहिजे. जुन्या दुनियेचा विनाश देखील झाला पाहिजे. तो तर समोर उभा आहे, नंतर मग एका धर्माचे राज्य असेल. ही पाप आत्म्यांची दुनिया आहे ना. आता तुम्ही पावन बनत आहात; बोला - या आठवणीच्या बळाने आपण पवित्र बनतो बाकी सर्वांचा विनाश होईल. नैसर्गिक आपदा देखील येणार आहेत. आम्ही प्रत्यक्ष अनुभव केलेले आहे आणि दिव्यदृष्टीने बघितलेले आहे. हे सर्व खलास होणार आहे. बाबा आले आहेत डीटी वर्ल्ड स्थापन करण्यासाठी. ऐकून म्हणतील ओहो! ही तर गॉडफादरची मुले आहेत. तुम्ही मुले जाणता - हे युद्ध सुरु होईल, नैसर्गिक आपत्ती येतील. काय हालत होईल? ही मोठ-मोठी घरे इत्यादी सर्व कोसळायला लागतील. तुम्ही जाणता हे बॉम्ब्स इत्यादी ५००० वर्षांपूर्वी देखील बनवले होते आपल्याच विनाशासाठी. आता देखील बॉम्ब्स तयार आहेत. योगबल काय गोष्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही विश्वावर विजय प्राप्त करता हे बाकीचे कोणी थोडेच जाणतात. बोला, विज्ञान तुमचाच विनाश करते. आमचा बाबांसोबत योग आहे तर त्या सायलेन्सच्या बळाने आम्ही विश्वावर विजय प्राप्त करून सतोप्रधान बनतो. बाबाच पतित-पावन आहेत. पावन दुनिया जरूर स्थापन करूनच सोडतील. ड्रामा अनुसार नोंदलेले आहे. बॉम्ब्स जे बनवले आहेत ते काय ठेवून देतील काय! अशा प्रकारे समजावून सांगाल तर समजतील हे तर कोणती ऑथॉरिटी आहेत, यांच्यामध्ये गॉडने येऊन प्रवेश केला आहे. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. अशा काही गोष्टी सांगत राहाल तर ते आनंदीत होतील. आत्म्यामध्ये कसा पार्ट आहे, हा देखील अनादि पूर्वनियोजित ड्रामा आहे. मग आपल्या ठरलेल्या वेळेवर क्राइस्ट येऊन तुमचा धर्म स्थापन करतील. अशा ऑथॉरिटीने बोलाल तर ते समजतील की, बाबा सर्व मुलांना बसून समजावून सांगत आहेत. तर मुलांनी या शिक्षणाच्या मागे लागले पाहिजे. पिता, टीचर, गुरु तिघेही एकच आहेत. ते कसे नॉलेज देतात, हे देखील तुम्हीच समजता. सर्वांना पवित्र बनवून घेऊन जातात. डीटी डिनायस्टी होती (दैवी कुळ होते) तेव्हा सर्व पवित्र होते. गॉड-गॉडेज होते. बोलण्यामध्ये खूप हुशार असावा, स्पीड देखील चांगला असावा. बोला बाकी सर्व आत्मे स्वीट होममध्ये राहतात. बाबाच घेऊन जातात, सर्वांचे सद्गती दाता ते बाबा आहेत. त्यांचे बर्थ प्लेस आहे भारत. किती मोठे तीर्थ झाले.

तुम्ही जाणता सर्वांना तमोप्रधान बनायचेच आहे. पुनर्जन्म सर्वांना घ्यायचाच आहे, परत कोणीही जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी समजावून सांगितल्याने खूप आश्चर्यचकीत होतील. बाबा तर म्हणतात - जोडपे असेल तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. भारतामध्ये आधी पवित्रता होती. मग अपवित्र कसे होतात. हे देखील सांगू शकता. पूज्यच पुजारी बनतात. अपवित्र बनल्यामुळे मग आपलीच पूजा करू लागतात. राजांच्या घरामध्ये देखील या देवतांची चित्रे असतात, जे पवित्र डबल मुकुटधारी होते त्यांना जे बिना मुकुटवाले, अपवित्र आहेत ते पुजतात. ते झाले पुजारी राजा. त्यांना काही गॉड-गॉडेज म्हणणार नाही कारण या देवतांची पूजा करतात. आपे ही पूज्य, आपेही पुजारी, पतित बनतात तेव्हा मग रावण राज्याची सुरुवात होते. यावेळी रावण राज्य आहे. अशा प्रकारे बसून समजावून सांगतील तर किती मजा येईल. गाडीची दोन चाके युगल असतील तर खूप वंडर करून दाखवतील. आपण युगलच मग सो पूज्य बनणार. आपण प्युरिटी, पीस, प्रोस्पेरिटीचा (पवित्रता, शांती, समृद्धीचा) वारसा घेत आहोत. तुमची चित्रे देखील तयार होत राहतात. हा आहे ईश्वरीय परिवार. बाबांची मुले आहात, नाती आणि नातू आहात, बस्स दुसरे कोणतेही नाते नाही. याला नवीन सृष्टी म्हटले जाते तर मग देवी-देवता फार थोडेजण बनतील. मग हळू-हळू वृद्धी होत जाते. हे नॉलेज किती समजून घेण्यासारखे आहे. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील आपल्या धंद्यामध्ये जसे काही नवाब होते. कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. जेव्हा बघितले हे बाबा (शिवबाबा) शिकवत आहेत, विनाश समोर उभा आहे तर एका झटक्यात सोडून दिले. हे समजले जरूर की, आपल्याला बादशाही मिळत आहे मग या निकृष्ट कामाची काय गरज आहे. तर तुम्ही देखील समजता - स्वयं भगवान शिकवत आहेत, हे तर चांगल्या रीतीने शिकले पाहिजे ना. त्यांच्या मतावर चालले पाहिजे. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबांना तुम्ही विसरता, लाज नाही वाटत, तो नशा चढत नाही. इथून खूप चांगले रिफ्रेश होऊन जातात मग तिथे सोडावॉटर होतात. आता तुम्ही मुले गावागावामध्ये सेवा करण्याचा पुरुषार्थ करत आहात. बाबा म्हणतात - सर्वप्रथम तर हे सांगा की आत्म्यांचे पिता कोण आहेत. भगवान तर निराकारच आहेत. तेच या पतित दुनियेला पावन बनवणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वयं भगवान सुप्रीम टीचर बनून शिकवत आहेत त्यामुळे चांगल्या रीतीने शिकायचे आहे, त्यांच्या मतावर चालायचे आहे.

२) बाबांसोबत असा योग ठेवायचा आहे ज्यामुळे सायलेन्सचे बळ जमा होईल. सायलेन्सच्या बळाने विश्वावर विजय प्राप्त करायचा आहे, पतितापासून पावन बनायचे आहे.

वरदान:-
समय आणि संकल्पांना सेवेमध्ये अर्पण करणारे विधाता, वरदाता भव

आता स्वत:च्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या मागे, तनाच्या मागे, मनाच्या मागे, साधनांच्या मागे, नाती निभावण्याच्या मागे वेळ आणि संकल्प फुकट घालाविण्या ऐवजी याला सेवेमध्ये अर्पण करा, हा समर्पण समारोह साजरा करा. श्वासोश्वास सेवेची लगन (धून) लागलेली असावी, सेवेमध्ये मग्न होऊन रहा. तर सेवेमध्ये लागल्याने स्व-उन्नतीची गिफ्ट स्वतःच प्राप्त होईल. विश्व कल्याणामध्येच स्व-कल्याण सामावलेले आहे त्यामुळे निरंतर महादानी, विधाता आणि वरदाता बना.

बोधवाक्य:-
आपल्या इच्छांना कमी करा तेव्हा समस्या कमी होतील.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

जसे लौकिक रीतीने कोणी कोणाच्या प्रेमामध्ये लवलीन असतो तर त्याच्या चेहऱ्यावरून, नयनांवरून, वाणीमधून अनुभव होतो की हे लवलीन झालेले आहेत, आशिक आहेत; अगदी तसेच ज्यावेळी स्टेजवर येता तर जितके आपल्यामध्ये बाबांचे प्रेम इमर्ज होईल तितका प्रेमाचा बाण इतरांना देखील प्रेमामध्ये घायाळ करेल.