22-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
‘गोड
मुलांनो - स्वतःच्या काळजावर हात ठेऊन विचारा की बाबा जे ऐकवतात ते काय आपण
यापूर्वी जाणत होतो, जे ऐकले आहे त्याला अर्थासहित समजून घेऊन आनंदात रहा”
प्रश्न:-
तुमच्या या
ब्राह्मण धर्मामध्ये सर्वात जास्त ताकद आहे, ती कोणती आणि कशी?
उत्तर:-
तुमचा हा ब्राह्मण धर्म असा आहे जो साऱ्या विश्वाची श्रीमता नुसार सद्गती करतो.
ब्राह्मणच साऱ्या विश्वाला शांत बनवतात. तुम्ही ब्राह्मण कुल भूषण देवतांपेक्षाही
उच्च आहात, तुम्हाला बाबांकडून ही ताकद मिळाली आहे. तुम्ही ब्राह्मण बाबांचे मदतगार
बनता, तुम्हालाच सर्वात मोठे बक्षीस मिळते. तुम्ही ब्रह्मांडाचे देखील मालक आणि
विश्वाचे देखील मालक बनता.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी सिकीलध्या (५००० वर्षांनंतर भेटलेल्या) मुलांप्रती बाबा बसून
समजावून सांगत आहेत. रुहानी मुले जाणतात रुहानी बाबा एकदाच दर ५००० वर्षांनंतर
येतात जरूर. कल्प नाव ठेवले आहे जे बोलावे लागते. या ड्रामाचे अथवा सृष्टीचे
आयुर्मान ५००० वर्षे आहे, या गोष्टी एक बाबाच बसून समजावून सांगतात. हे कधीही कोणा
मनुष्याच्या तोंडून ऐकू शकत नाही. तुम्ही रुहानी मुले बसला आहात. तुम्ही जाणता
बरोबर आम्हा सर्व आत्म्यांचे पिता तेच एक आहेत. बाबाच मुलांना बसून स्वतःचा परिचय
देतात. जो कोणीही मनुष्यमात्र जाणत नाहीत. कोणालाच माहिती नाही आहे की गॉड अथवा
ईश्वर ही काय वस्तू आहे; जर का त्यांना गॉड फादर पिता म्हणतात तर त्यांच्यावर खूप
प्रेम असले पाहिजे. बेहदचे बाबा आहेत तर जरूर त्यांच्याकडून वारसा देखील मिळत असेल.
इंग्रजीमध्ये चांगला शब्द बोलतात - ‘हेवनली गॉड फादर’. हेवन म्हटले जाते नवीन
दुनियेला आणि हेल म्हटले जाते जुन्या दुनियेला. परंतु स्वर्गाला कोणीही जाणत नाहीत.
संन्यासी तर मानतही नाहीत. ते कधी असे म्हणणार नाहीत की बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत.
‘हेवनली गॉड फादर’ हा शब्द खूप गोड आहे आणि हेवन (स्वर्ग) प्रसिद्ध देखील आहे.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हेवन आणि हेलचे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे संपूर्ण
चक्र बुद्धीमध्ये फिरते, जे-जे सेवायोग्य आहेत, सगळेच काही एक रस सेवायोग्य बनत
नाहीत.
तुम्ही पुन्हा एकदा
आपली राजधानी स्थापन करत आहात. तुम्ही म्हणाल आम्ही रुहानी मुले बाबांच्या श्रेष्ठ
ते श्रेष्ठ मतावर चालत आहोत. उच्च ते उच्च बाबांचेच श्रीमत आहे. श्रीमद् भगवद् गीता
देखील गायली गेली आहे (महिमा केली गेली आहे). हे आहे पहिल्या नंबरचे शास्त्र.
बाबांचे नाव ऐकताच ताबडतोब वारशाची आठवण होते. हे दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत की
गॉड फादर कडून काय मिळते. शब्द बोलतात - प्राचीन योग. परंतु समजत नाहीत की प्राचीन
योग कोणी शिकवला? ते (दुनियावाले) तर श्रीकृष्णच म्हणणार कारण गीतेमध्ये
श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. आता तुम्हाला समजते आहे की, बाबांनीच राजयोग शिकवला,
ज्याद्वारे सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती मिळते. हे देखील समजता की भारतामध्येच
शिवबाबा आले होते, त्यांची जयंती देखील साजरी करतात परंतु गीतेमधून नाव गायब
झाल्यामुळे महिमा देखील गायब झाली आहे. ज्यांच्याकडून साऱ्या दुनियेला सुख-शांती
मिळते, त्या पित्यालाच विसरले आहेत. याला म्हटलेच जाते एकच चुकीचे नाटक. मोठयात मोठी
चूक ही आहे जे बाबांनाच जाणत नाहीत. कधी म्हणतात ते नावा-रुपा पासून न्यारे आहेत आणि
मग म्हणतात कच्छ-मच्छ अवतार आहेत. दगड-धोंड्यात आहेत. चुकांवर चुका होत जातात. शिडी
खाली उतरत जातात. कला कमी होत जाते, तमोप्रधान बनत जातात. ड्रामाच्या प्लॅन अनुसार
जे बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, ज्यांनी भारताला स्वर्गाचा मालक बनवले, त्यांना
दगड-धोंड्यामध्ये आहेत असे म्हणतात. आता बाबा समजावून सांगतात की तुम्ही शिडी कसे
उतरत आला आहात, कोणाला काहीच माहिती नाहीये . ड्रामा काय आहे, विचारत राहतात. ही
दुनिया केव्हापासून बनली आहे? नवीन सृष्टी केव्हा होती तर म्हणतील - लाखो
वर्षांपूर्वी. समजतात की, जुन्या दुनियेला तर आता खूप वर्षे बाकी आहेत, याला अज्ञान
अंध:कार म्हटले जाते. गायन देखील आहे - ‘ज्ञान अंजन सद्गुरु दिया, अज्ञान अन्धेर
विनाश’. तुम्ही समजता की रचयिता बाबा जरूर स्वर्गच रचतील. बाबाच येऊन नरकाला स्वर्ग
बनवतात. रचयिता बाबाच येऊन सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. येतात देखील
अंतालाच. वेळ तर लागतो ना. हे देखील मुलांना सांगितले आहे ज्ञानासाठी इतका वेळ लागत
नाही, जितका आठवणीच्या यात्रेसाठी लागतो. ८४ जन्मांची कहाणी तर जशी एक कहाणी आहे,
आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी कोणाचे राज्य होते, ते राज्य कुठे गेले?
तुम्हा मुलांना आता
पूर्ण नॉलेज आहे. तुम्ही आहात किती साधारण परंतु अजामिल सारखे पापी, अहिल्या, कुब्जा,
भिल्लिणी यांना किती उच्च बनवता. बाबा समजावून सांगतात - तुम्ही कशापासून काय बनला
आहात. बाबा येऊन समजावून सांगतात - जुन्या दुनियेची आता हालत बघा कशी आहे? मनुष्य
काहीही जाणत नाहीत की सृष्टीचे चक्र कसे फिरते? बाबा म्हणतात तुम्ही आपल्या काळजावर
हात ठेऊन विचारा - यापूर्वी आपण हे काही जाणत होतो का? काहीच नाही. आता जाणता की
बाबा पुन्हा येऊन आम्हाला विश्वाची बादशाही देत आहेत. कोणाच्याही बुद्धीमध्ये येणार
नाही की विश्वाची बादशाही काय असते. विश्व अर्थात संपूर्ण दुनिया. तुम्ही जाणता बाबा
आम्हाला असे राज्य देतात जे आपल्याकडून अर्ध्या कल्पापर्यंत कोणीही हिसकावून घेऊ
शकत नाही. तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबांकडून कित्तीवेळा राज्य घेतले आहे.
बाबा सत्य आहेत, सत्य शिक्षक देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. कधी ऐकलेलेच नाही. आता
अर्थासहित तुम्ही समजता. तुम्ही मुले आहात, बाबांची तर आठवण करू शकता. आजकाल
लहानपणीच गुरु करतात. गुरुचे चित्र बनवून गळ्यामध्ये देखील घालतात किंवा घरामध्ये
ठेवतात. हे तर वंडर आहे - पिता, शिक्षक, सद्गुरु सर्व एकच आहेत. बाबा म्हणतात - मी
सोबत घेऊन जाणार. तुम्हाला विचारतील काय शिकता? तर बोला, ‘आम्ही नवीन दुनियेमध्ये
राजाई प्राप्त करण्यासाठी राजयोग शिकत आहोत’. हा आहेच राजयोग. जसा बॅरिस्टर योग असतो
तर जरूर बुद्धीचा योग बॅरिस्टरकडेच जाईल. टीचरची जरूर आठवण तर करतील ना. तुम्ही
म्हणाल आम्ही स्वर्गाची राजाई प्राप्त करण्यासाठीच शिकत आहोत. कोण शिकवतात? शिवबाबा
भगवान. त्यांचे नाव तर एकच आहे जे चालत आले आहे. रथाचे नाव तर नाही आहे. माझे नाव
आहेच मुळी ‘शिव’. पिता - शिव आणि रथ - ब्रह्मा म्हणणार. आता तुम्ही जाणता हे किती
वंडरफूल आहे, शरीर तर एकच आहे. यांना भाग्यशाली रथ का म्हणतात? कारण शिवबाबांची
प्रवेशता आहे तर जरूर दोन आत्मे असले पाहिजेत. हे देखील तुम्ही जाणता आणखी कोणाला
हा विचार सुद्धा येत नाही. आता दाखवतात भागीरथाने गंगा आणली. पाणी आणले काय ? आता
तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघता - काय आणले आहे? कोणी आणले आहे? कोणी प्रवेश केला आहे?
बाबांनी केला ना. मनुष्यामध्ये पाणी थोडेच प्रवेश करणार. जटांमधून थोडेच पाणी येणार.
या गोष्टींवर मनुष्य कधी विचारही करत नाहीत. म्हटलेच जाते - रिलिजन इज माइट. (धर्मामध्ये
ताकद आहे). रिलिजनमध्ये ताकद आहे. सांगा - सर्वात जास्त ताकद कोणत्या रिलिजनमध्ये
आहे? (ब्राह्मण रिलिजन मध्ये). हो, हे बरोबर आहे. जी काही ताकद आहे ती ब्राह्मण
धर्मामध्येच आहे, इतर कोणत्याही धर्मामध्ये काहीच ताकद नाहीये. तुम्ही आता ब्राह्मण
आहात. ब्राह्मणांना ताकद मिळते बाबांकडून, ज्यामुळे मग तुम्ही विश्वाचे मालक बनता.
तुमच्यामध्ये किती मोठी ताकद आहे. तुम्ही म्हणाल - ‘आम्ही ब्राह्मण धर्माचे आहोत’.
कोणाच्याच बुद्धीमध्ये येणार नाही. भले विराट रूप बनवले आहे परंतु ते सुद्धा अर्धवट.
मुख्य रचता आणि त्यांच्या पहिल्या रचनेला कोणीही जाणत नाहीत. बाबा आहेत रचता, नंतर
ब्राह्मण आहेत चोटी (शेंडी), यांच्यामध्ये ताकद आहे. बाबांची केवळ आठवण केल्याने
ताकद मिळते. मुले तर जरूर नंबरवारच बनतील ना. तुम्ही या दुनियेमध्ये सर्वोत्तम
ब्राह्मण कुल भूषण आहात. देवतांपेक्षा देखील उच्च आहात. तुम्हाला आता ताकद मिळते.
सर्वात जास्त ताकद आहे ब्राह्मण धर्मामध्ये. ब्राह्मण काय करतात? साऱ्या विश्वाला
शांत बनवतात. तुमचा धर्म असा आहे जो सर्वांची सद्गती करतो - श्रीमताद्वारे. तेव्हाच
तर बाबा म्हणतात - तुम्हाला माझ्यापेक्षाही श्रेष्ठ बनवतो. तुम्ही ब्रह्मांडाचे
मालक, विश्वाचे देखील मालक बनता. साऱ्या विश्वावर तुम्ही राज्य कराल. आता गातात ना
- ‘भारत हमारा देश है’. कधी महिमेची गाणी गातात, तर कधी मग म्हणतात - ‘भारत की क्या
हालत है…’ जाणत नाहीत की भारत इतका उच्च कधी होता! मनुष्य तर समजतात स्वर्ग अथवा
नरक इथेच आहे, ज्यांच्याकडे धन-गाडी इत्यादी आहे, ते स्वर्गात आहेत. हे समजत नाहीत
की स्वर्ग म्हटलेच जाते नवीन दुनियेला. इथे सर्व काही शिकायचे आहे. विज्ञानाचे
कौशल्य देखील मग तिथे कामाला येते. हे विज्ञान देखील तिथे सुख देते. इथे तर या
सर्वांमधून आहे अल्पकाळाचे सुख. तिथे तुम्हा मुलांसाठी हे स्थाई सुख होईल. इथे सर्व
शिकायचे आहे जे मग संस्कार घेऊन जाल. कोणते नवीन आत्मे येणार नाहीत, जे शिकतील.
इथलीच मुले विज्ञान शिकून तिथे जातात. खूप हुशार होतील. सर्व संस्कार घेऊन जातील मग
तिथे कामाला येईल. आता आहे अल्पकाळाचे सुख. मग हे बॉम्ब्स इत्यादीच सर्वांना खलास
करतील. मरणाशिवाय शांतीचे राज्य कसे होईल. इथे तर अशांतीचे राज्य आहे. हे देखील
तुमच्यामध्ये नंबरवार आहेत जे समजतात, आपण सर्वप्रथम आपल्या घरी जाणार, आणि मग
सुखधाममध्ये येणार. सुखामध्ये बाबा तर येतही नाहीत. बाबा म्हणतात - मला देखील
वानप्रस्थ रथ पाहिजे ना. भक्ती मार्गामध्ये देखील सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत आलो
आहे. संदेशींना देखील दाखवले आहे - कसे भक्त लोक तपस्या, पूजा इत्यादी करतात,
देवींना सजवून, पूजा वगैरे करून नंतर समुद्रामध्ये बुडवतात (विसर्जित करतात), किती
खर्च होतो. विचारा - हे केव्हापासून सुरु झाले आहे? तर म्हणतील - परंपरेने चालत आले
आहे. किती भटकत राहतात. हा देखील सर्व ड्रामा आहे.
बाबा वारंवार मुलांना
समजावून सांगतात मी तुम्हाला खूप गोड बनविण्यासाठी आलो आहे. हे देवता किती गोड आहेत.
आता तर मनुष्य किती कडवट आहेत. ज्यांनी बाबांना खूप मदत केली होती, त्यांची पूजा
करत राहतात. तुमची देखील पूजा होते, पदही तुम्ही खूप उच्च प्राप्त करता. बाबा स्वतः
म्हणतात - मी तुम्हाला माझ्यापेक्षाही उच्च बनवतो. उच्च ते उच्च भगवंताचे आहे -
श्रीमत. गीतेमध्ये देखील श्रीमत प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण तर यावेळी बाबांकडून वारसा
घेत आहे. श्रीकृष्णाच्या आत्म्याच्या रथामध्ये बाबांनी प्रवेश केला आहे. किती
आश्चर्यजनक गोष्ट आहे. कधी कोणाच्या बुद्धीमध्ये येणारही नाही. समजून घेणाऱ्यांना
देखील समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत लागते. बाबा किती चांगल्या रीतीने मुलांना
समजावून सांगतात. बाबा लिहितात - ‘सर्वोत्तम ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण’. तुम्ही
उच्च सेवा करता तर हे बक्षीस मिळते. तुम्ही बाबांचे मदतगार बनता तर सर्वांना बक्षीस
मिळते - नंबरवार पुरुषार्थ अनुसार. तुमच्यामध्ये देखील खूप ताकद आहे. तुम्ही
मनुष्याला स्वर्गाचा मालक बनवू शकता. तुम्ही रुहानी सेना आहात. तुम्ही हा बॅज लावला
नाही तर लोकांना समजणार कसे की, ही देखील रुहानी मिलेट्री आहे. मिलेट्री वाल्यांचा
नेहमी बॅज लावलेला असतो. शिवबाबा आहेत नवीन दुनियेचे रचयिता. तिथे या देवतांचे
राज्य होते, आता नाहीये. आता पुन्हा बाबा म्हणतात - ‘मनमनाभव’. देहासहित सर्व नाती
सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर श्रीकृष्णाच्या डिनायस्टीमध्ये (श्रीकृष्णाच्या
घराण्यामध्ये) येतील. यामध्ये लाज वाटण्याचा तर प्रश्नच नाही. बाबांची आठवण राहील.
बाबा यांच्यासाठी (ब्रह्मा साठी) देखील सांगतात - हे नारायणाची पूजा करत होते,
नारायणाचा फोटो सोबत ठेवत असत. चालता-फिरता त्याला बघत होते. आता तुम्हा मुलांना
ज्ञान आहे, बॅज तर जरुर लावलेला असला पाहिजे. तुम्ही आहात नराला नारायण बनविणारे.
राजयोग देखील तुम्हीच शिकवता. नरापासून नारायण बनवण्याची सेवा करता. स्वतःला बघायचे
आहे माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही आहे ना?
तुम्ही मुले बाबांकडे
येता, बाबा आहेत शिवबाबा, दादा आहेत त्यांचा रथ. बाबा जरूर रथाद्वारेच भेटणार ना.
बाबांकडे येतात, रिफ्रेश होण्यासाठी. सन्मुख बसल्यामुळे आठवण येते. बाबा आले आहेत
घेऊन जाण्यासाठी. बाबा सन्मुख बसल्याने मग जास्त आठवण येते. आपल्या आठवणीच्या
यात्रेला तिथे देखील तुम्ही रोज वाढवू शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला
बघायचे आहे की, माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही आहे ना! जसे देवता गोड आहेत, तसा
मीही गोड बनलो आहे का?
२) बाबांच्या श्रेष्ठ
ते श्रेष्ठ मतावर चालून आपली राजधानी स्थापन करायची आहे. सेवायोग्य बनण्यासाठी
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे, हेवन आणि हेलचे ज्ञान बुद्धीमध्ये फिरवत ठेवायचे आहे
वरदान:-
खुदाई
खिदमतगारच्या स्मृतीद्वारे सहज आठवणीचा अनुभव करणारे सहजयोगी भव
खुदाई खिदमतगार
अर्थात जी खुदा अथवा बाबांनी खिदमत (सेवा) दिली आहे, सदैव त्याच सेवेमध्ये तत्पर
राहणारे. कायम हाच नशा रहावा की मला स्वयं भगवंताने सेवा दिली आहे. कार्य करत असताना,
ज्याने काम दिले आहे त्याला कधी विसरता येत नाही. तर कर्मणा सेवेमध्ये देखील हीच
स्मृती रहावी की बाबांच्या डायरेक्शन अनुसार करत आहोत तर सहज आठवणीचा अनुभव करत सहज
योगी बनाल.
बोधवाक्य:-
कायम गॉडली
स्टुडंट लाइफची स्मृती राहिली तर माया जवळ येऊ शकत नाही.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
जितके स्थापनेच्या
निमित्त बनलेले ज्वाला-रूप असतील तितकीच विनाश-ज्वाळा प्रत्यक्ष होईल. संघटित
रूपामध्ये ज्वाला-रूपाची आठवण विनाशाचे कार्य संपन्न करेल, यासाठी प्रत्येक
सेवाकेंद्रावर विशेष योगाचे प्रोग्रॅम चालू रहावेत तेव्हा विनाश-ज्वाळेला हवा लागेल.
योग-अग्नीद्वारे विनाशाची अग्नी पेटेल, ज्वाळेने ज्वाळा प्रज्वलित होईल.